लेखी करारानंतरही सरकारने कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या केलेल्या फसवणुकीने संतप्त झालेल्या प्राध्यापकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने संघटनेच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा यंदा होणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या कामकाजावर पूर्ण बहिष्कार टाकू, असा इशारा नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने दिला आहे.
↧