डॉ. गायकवाड यांना मारहाण झाल्याची माहिती जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मिळताच त्यांनी दुपारी चारपासून काम बंद केले. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. डॉक्टरांच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन या घटनेच्या निषेधाचे पत्रही दिले. डॉ. गायकवाड यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असून डॉक्टर संरक्षण कायद्यान्वये मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
↧