नाशिक शहरातील अनेक रस्ते खोदून सध्या ४ जी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. पुन्हा रस्ते खोदावे लागू नये यासाठी महापालिकेने आताच रस्त्यांमध्ये केबल टनेल टाकावेत, अशी मागणी उद्योजकांनी आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
↧