बागलाण तालुक्यातील भंडारपाडे शिवारालगत असलेल्या कपाळे डोंगराच्या वनीकरणाला रविवारी काही विकृतांनी आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. वनवा पेटल्यामुळे सुमारे दोन एकर क्षेत्रावरिल वनसंपदा खाक झाली. या आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
↧