काहीसा कोंदट, पण पुरेशी स्वच्छता असलेला सिव्हिलमधील बर्न वॉर्ड. या वॉर्डात जायला लोक घाबरतात, येथे जायचं म्हटलं तरी पावलं थबकतात. अश्रुंनी भरलेले चेहरे अन् आपला ‘माणूस’ व्यवस्थित घरी येईल याची आस लावून बसलेले त्यांचे नातलग या वॉर्डाबाहेर घुटमळताना पाहिली की अधिकच हेलावल्या सारखं होतं.
↧