वाळू माफियांनी नदीपात्रात वाळूचा उपसा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साक्री तालुक्यात घडली. तिच्यासोबत बुडालेल्या तिच्या तीन भावंडांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. आठ दिवसांतील अशा स्वरुपाची ही दुसरी घटना आहे.
↧