श्री जलाराम स्वीट मार्टच्या आगीत अग्निशमन दलाचे सहा जवान जखमी झाले आहेत. दुकान मालकाने डिझेल भट्ट्याबाबत माहिती लपवून ठेवल्यानेच ही दुर्घटना झाल्याचा आरोप स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी केला असून दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी अग्निशमन दलाच्या प्रमुखांना दिले आहेत.
↧