सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे पश्चिम पट्ट्यात असलेली उंबरदरी व कोनांबे ही धरणे पूर्णपणे भरली आहेत. म्हाळुंगी नदीचे पाणी वाढल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचप्रमाणे देव नदीही वाहती झाल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.
↧