Quantcast
Are you the publisher? Claim or contact us about this channel


Embed this content in your HTML

Search

Report adult content:

click to rate:

Account: (login)

More Channels


Showcase


Channel Catalog


Articles on this Page

(showing articles 1 to 25 of 25)
(showing articles 1 to 25 of 25)


Channel Description:

News from India by India number one website
  0 0

  म. टा. प्रतिनिधी, नाशिक

  महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याची 'रामसर'च्या दर्जाची प्रतीक्षा संपली असून, वनविभागाने सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पाणथळ म्हणून हे राज्यातील पहिले ठिकाण ठरेल, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दोन दिवसांत याबाबत सविस्तर माहिती जाहीर होणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ वनधिकाऱ्यांनी दिली.

  गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याला रामसरचा दर्जा मिळावा, यासाठी वनविभागातर्फे पाठपुरावा सुरू होता. स्वित्झर्लंडच्या रामसर सचिवालयाकडे केंद्र सरकारने गेल्या महिन्यात प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती वनविभागातील वरिष्ठ वनधिकाऱ्यांनी दिली आहे. सोमवारी (दि.२७) याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या देशातील २६ पाणथळांच्या यादीत नांदूरमध्यमेश्वरचा समावेश आहे. सस्तन वन्यजीवांच्या आठ, तर चोवीस प्रजातींचे मासे, २६५ पेक्षा जास्त देशी-विदेशी पक्षी, पाचशेपेक्षा जास्त झुडुपांचे प्रकार, ४१ प्रजातींचे फुलपाखरू आणि विविध पाणवनस्पती, असा अनमोल ठेवा या अभयारण्यात आहे. रामसरमध्ये आढळणाऱ्या १४८ स्थलांतरीत पक्ष्यांपैकी ८८ प्रजाती नांदूरमध्यमेश्वरमध्ये आढळून येत आहेत. शिवाय देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या २६५ प्रजाती असून, दरवर्षी वीस हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद तिथे होत असल्याची बाजू प्रस्तावात जमेची ठरली आहे.

  नांदूरमध्यमेश्वरला हा दर्जा प्राप्त होणार असल्याने, वैभवशाली पाणथळांच्या ठिकाणांत नाशिकची जगाच्या नकाक्षावर नवी ओळख निर्माण होईल. रामसरचा दर्जा मिळाल्याने येथील पर्यटनाला अधिक चालना मिळणार असून, संवर्धनासह वन्यजीव अभयारण्याचे संरक्षण अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असल्याचे मत वनधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

  - -

  दहा वर्षांची प्रतीक्षा

  गेल्या दहा वर्षांपासून नांदूरमध्यमेश्वरला रामरसचा दर्जा मिळण्यासाठी नाशिक वन विभागाकडून प्रस्ताव सादर होत आहे. या प्रस्तावात अनेकदा त्रुटी आढळल्या होत्या. मात्र, नोव्हेंबर २०१९ अखेरीस सादर झालेला प्रस्वात मंजूर झाला आहे. यामुळे दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नांदूरमध्यमेश्वरला रामसरचा दर्जा प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  तीनवेळा स्मरणपत्र पाठवूनदेखील मनपाला मिळेना बंदोबस्त

  ...

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजाराविरोधात कारवाई न केल्यामुळे न्यायालयाची अवकृपा टाळण्यासाठी महापालिकेने या भंगार बाजारावर तिसऱ्यांदा हातोडा मारण्याची तयारी केली आहे. मात्र पोलिस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. भंगार बाजार काढण्यासाठी महापालिकेने पोलिसांना संरक्षणासाठी तब्बल तीन वेळा पत्र लिहिले. परंतु, प्रतिसाद मिळत नसल्याने अनधिकृत भंगार बाजाराला पोलिसांकडूनच अप्रत्यक्षरीत्या संरक्षण मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  अंबड-लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजर हा शहरासाठी डोकेदु:खी ठरला आहे. हा बाजार हटविण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई पोहचली होती. यामुळे महापालिकेने आतापर्यंत दोन वेळा भंगार बाजार हटवला आहे. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पहिल्यांदा ७ जानेवारी २०१७ मध्ये ७५४ हातोडा चालवला होता. या कारवाईच्या काही महिन्यांतच हा बाजार पुन्हा अनधिकृतपणे बसला. त्यामुळे त्यांच्याच कार्यकाळात ऑक्टोबर २०१७ मध्ये दुसऱ्यांदा अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पुन्हा भंगार बाजार बसू नये, यासाठी दक्षता घेण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची होती; परंतु त्यानंतरही भंगार दुकानांनी अतिक्रमण करीत तिसऱ्यांदा येथे दुकाने थाटली.

  ...

  विविध कारणांनी रखडली कारवाई

  या प्रकरणातील याचिकाकर्ते दिलीप दातीर यांनी हा भंगार बाजार हटविण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. मनपा प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी हा बाजार हटविण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली होती; परंतु पोलिस संरक्षण मिळाले नसल्याचे कारण देत ही कारवाई थांबली. त्यामुळे दातीर यांनी प्रशासनावर दबाव वाढविण्यासाठी आयुक्त गमे यांना नोटीस बजावत उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाने तिसऱ्यांदा हा भंगार बाजार हटविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासंदर्भात अतिक्रमण उपायुक्त राहुल पाटील यांनी पहिल्यांदा लेखी पत्र दिले. तसेच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची भेट घेत पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. परंतु, प्रभाग क्रमांक २६ मधील पोटनिवडणुकीचे कारण देत पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यास पोलिसांकडून नकार दिला गेला. त्यानंतरही महापालिकेने आतापर्यंत दोन वेळा पत्र पाठवून बंदोबस्त मिळण्याची मागणी केली. परंतु, पोलिस प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद पालिकेला मिळत नसल्याने संशयाचे ढग निर्माण होऊ लागले आहेत.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  विभागीय आयुक्त राजाराम माने यांचे मत

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था टिकविणे आणि तिला अधिक बळकटी देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याचसाठी देशाच्या सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाचे महत्त्व असाधारण असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी शनिवारी केले.

  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये दहाव्या राष्ट्रीय मतदार दिन झाला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपायुक्त दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, सहाय्यक जिल्हाधिकारी पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे, उपविभागीय अधिकारी नीलेश श्रींगी, निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील, दिव्यांग मतदारांचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर दिव्यांग जलतरण व नेमबाजपटू जयश्री टोचे आदी उपस्थित होते.

  यावेळी माने म्हणाले, की प्रत्येक पात्र मतदारांनी त्यांची मतदारनोंदणी करणे आवश्यक आहे. याशिवाय निवडणुकीत मतदानाचा हक्क आवर्जून बजावला पाहिजे. जागरुक मतदार हे प्रगत लोकशाहीचे द्योतक मानले जाते. राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजे मतदानाचा अधिकार मिळाल्याचा उत्सव असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेचा बीएलओ, एनजीओ कणा असल्याचे मत जिल्हाधिकारी मांढरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वाटप झाले. यावेळी उपस्थितांना मतदानाचे महत्त्व पटविण्याबाबतची प्रतिज्ञा देण्यात आली. निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते 'बीएलओं'चा सत्कार झाला. यावेळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृती विषयावर पथनाट्यांचे सादरीकरण केले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताकदिनी अधिसूचना

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  महसूल विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवांसाठी सामान्यांना हेलपाटे मारावे लागू नये, या सेवा त्यांना विहीत मुदतीत मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे आग्रही आहेत. तब्बल १०१ सेवा ह्या सेवा हमी कायद्याच्या चौकटीत बसविण्यात आल्या असून निर्धारीत कालावधीत संबंधित सेवा पुरविणे महसूल यंत्रणेला अनिवार्य ठरणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची अंमलबजावणी करणारा नाशिक हा पहिला जिल्हा असेल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

  कोणत्याही सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची असहकार्याची वृत्ती आणि वेळकाढूपणाची मानसिकता यामुळे हेलपाटे मारण्याशिवाय गत्यंतर नाही अशी नागरिकांची धारणा झाली आहे. 'सरकारी काम अन सहा महिने थांब' असा साधारणत: सरकारी कामांबाबतचा अनुभव असल्याने लोक त्रस्त होतात. पाठपुरावा करूनही दाद दिली जात नसल्याने जिल्हाधिकारी इतकेच नव्हे तर विभागीय आयुक्तांकडेही दाद मागितली जाते. महसूल विभागाच्या कामात गतिमानता यावी, नागरिकांना वेळेत सेवा मिळाव्यात याबाबत जिल्हाधिकारी मांढरे आग्रही आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात सेवा हमी कायद्याची प्रभावी आणि परिणामकारकपणे अंमलबजावणी करता यावी, यासाठी मांढरे यांनी ठोस पाऊले उचलली आहेत. अगदी सातबारा उताऱ्यापासून उत्पन्न, जातीच्या दाखल्यापर्यंतचे विविध दाखले, विविध प्रकारच्या परवानग्या वेळेतच मिळतील याची काळजी घेतली जाणार आहे. सुरुवातीला २० सेवांचा समावेश या सेवा हमी अधिसूचनेत करण्यात आला होता. यामध्ये आणखी ८१ सेवांची भर पडली असून त्यामुळे तब्बल १०१ सेवा वेळेतच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  कार्यालयांबाहेर फलक लावण्याचे निर्देश

  तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे महसूल अधिकारी व त्यांची कार्यालये कोणती सेवा देण्यास बांधील आहेत, याची माहिती नागरिकांना सहज होऊ शकेल. या कार्यालयांच्या दर्शनी भागावरच सेवा आणि कालावधीचा फलक लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार फलक उभारणीस सुरुवात झाली आहे. मुदतीत सेवा मिळाली नाही तर नागरिकांना व्हॉट्सअॅपवर तक्रार करता यावी, यासाठी व्हॉटसअॅपचा क्रमांकही ठळकपणे नमूद करावा लागेल. प्रजासत्ताकदिनी या अधिसूचनेची प्रसिद्धी करण्यात येणार असून सोमवारपासून या सेवा विहित काळातच मिळू शकणार आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  पंधरा किलोच्या डब्यामागे ३० ते ९० रुपयांनी दरात घट

  म. टा. प्रतिनिधी, नाशिक

  नववर्ष हे महागाई घेऊन आल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले. पेट्रोल, डिझेल, तेल, बाजरी, ज्वारी, गॅस आदी वस्तूंच्या दरात कमालीची वाढ झाली. यामुळे गृहिणी मेटाकुटीस आल्या आहेत. तथापि, खाण्याचे तेलाच्या दरात घसरण झाल्याने गृहिणींना थोडा दिलासा मिळाला आहे. पंधरा किलोच्या खाद्यतेल डब्याचे सुमारे ३० ते ९० रुपयांपर्यंत दर कमी झाले आहेत. दरम्यान, खाद्यतेलाचे दर येत्या काही दिवसांत आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

  मंदी व बेरोजगारी वाढत असतानाच महागाईनेही डोके वर काढल्याने सर्वसामान्य मेटाकुटीस आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने आर्थिक गणित कोलमडत आहे. कांदा अजूनही ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. बटाटाही भाव खात असून, जुना बटाटा ३५, तर नवीन बटाटा २५ ते ३० रुपयांनी विक्री होत आहे. त्यातच खाण्याचे तेलही महागल्याने सर्वसामान्यांचे जगणच महाग झाले. पंधरा किलोचे तेलाचे डबे १५६० ते १६३० रुपयांपर्यंत महागले होते. यामुळे गृहिणींना भाजी बनविताना काटकसर करावी लागत होती. पंधरा किलोच्या १५३० रुपये दर असलेल्या डब्याच्या किमतीत ३० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच पंधरा किलोच्या १६३० रुपयांना मिळणाऱ्या तेलाच्या डब्याची किंमत तब्बल ९० रुपयांनी कमी झाली असून, हा डबा आता १५४० रुपयांना मिळत आहे. यामुळे गृहिणींना थोडा दिलासा मिळाला आहे. साखर, गूळ, शेंगदाणे, डाळिंच्या दरात फारसा बदल झालेला नाही. साखर, ३८, गूळ ६०, शेंगदाणे १०० रुपये किलोने विक्री होत आहेत. या दरात येत्या काही दिवसांत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

  ... यामुळे वाढले होते दर

  मलेशियाच्या पंतप्रधानांनी काश्मीर प्रश्नासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर टीका केली होती. यामुळे भारताने मलेशियातून होणारी पामतेलाची आयात बंद केली होती. यामुळे पामोलिन तेलाचा सुमारे ५० टक्के पुरवठा ठप्प झाला होता. यामुळे ३० टक्के तेलाची तूट निर्माण होऊन खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाली. भारतात ६० टक्के व मुंबईत ७० टक्के पामोलिन तेलाचेच सेवन होते.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  नाशिक वाढदिवस : २६ जानेवारी

  ००००००००००

  (फोटो)

  जयेश ठक्कर

  बांधकाम व्यावसायिक

  ज्योत्स्ना पुराणिक

  गुंतवणूक सल्लागार

  ......

  (विना फोटो)

  राजेंद्र डोखळे

  संचालक, लासलगाव कृउबा

  भारत टाकेकर

  उद्योजक

  प्रशांत आव्हाड

  माजी नगरसेवक

  शरद कुलकर्णी

  उद्योजक

  ........

  २७ जानेवारी (फोटो)

  राधाकिसन सारडा

  कार्याध्यक्ष, संस्कृती वैभव

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  डोंगराचे डोळे

  वैभव गिलाणकर, नाशिक

  -----

  एका आकाराने अक्राळविक्राळ असलेल्या व चहूबाजूंना लांब पसरलेल्या डोंगराची ही कथा आहे. हा डोंगर त्याच्या आसपासच्या जमिनीचा पालकच होता, तो स्वतःच्या इच्छाशक्तीने त्याला लागून असलेल्या भूमीला आधार द्यायचा, तिचं आरोग्य, सुपीकता बळकट ठेवायचा. त्याच्या जमिनीवर राहणारे जीवही त्याच्यामुळेच समृद्ध होते, त्यांच्या पिढ्यानपिढ्या डोंगरामुळेच सुखाने जगत आलेल्या होत्या. डोंगर आपल्या मोठाल्या, दाहीदिशांना वळणाऱ्या डोळ्यांनी सगळीकडे नजर ठेवायचा, कुठे कुणाला काय लागतं, आपल्या जमिनीवर राहणारी माणसे, मुकी जनावरं, पक्षी सर्व जण आनंदात आहेत की नाही याकडे लक्ष ठेवायचा.

  पण हा सर्व आता फक्त सुखद भूतकाळ ठरतो की काय असं वाटू लागलं होतं कारण एक जगावेगळी गोष्ट घडली होती ती म्हणजे त्या जमिनीचा तो पालक डोंगर आजारी पडला होता. हो, खुद्द डोंगर आजारी पडला होता! त्याची इच्छाशक्ती कमकुवत होऊ लागली होती, सर्वत्र नजर ठेवणारे त्याचे डोळे अधू होऊ लागले होते. याचा परिणाम म्हणजे जमिनीची सुपीकता खालावू लागली होती, तिथे राहणाऱ्या लोकांना भरघोस पीक मिळत नव्हतं, प्राण्यांना खायला मिळत नव्हतं, त्यामुळे ते तिथून निघून जाण्याचा विचार करत होते. डोंगराला याचं खूप दुःख होत होतं.

  एके दिवशी डोंगर तसाच दुखीकष्टी होऊन विचार करत होता तेव्हा त्याच्या डोक्यावर दुपारचा तळपता सूर्य आला, त्याने काळजीने डोंगराला विचारलं, 'काय डोंगरदादा, तुमची तब्येत अजूनही बरी झाली नाही?'

  'नाही, सूर्यदादा', डोंगर खिन्नतेने म्हणाला,

  'काय करू आता मी? मी या जमिनीचा, तिच्यावर राहणाऱ्या जीवांचा पालक आहे, आधार आहे पण मीच जर आता दुर्बल झालो तर मी ज्यांना पोसतो ते कसे सक्षम होणार? ते कसे कुणाला आधार देणार? जेव्हा कुणामागे त्याचे पालक खंबीरपणे उभे असतात तेव्हाच त्यांनाही कुणासाठी तरी खंबीर राहायची उमेद मिळते.'

  सूर्याने विचार केला आणि त्याने डोंगरावर उपचार करायचे ठरवले, आपली शक्ती वापरून त्याने अंतराळातील दोन खडक उर्जाभारीत केले व त्यांना उल्का बनवून डोंगराच्या दिशेला फेकलं! त्याने डोंगराला आवाज दिला, 'डोंगरदादा, वर पाहा', डोंगराने आपले डोळे वर केल्याबरोबर त्या दोन्ही उल्का त्याच्या डोळ्यांमध्ये अमृतथेंबांसारख्या पडल्या! एकदम प्रखर प्रकाश चमकला, डोंगराच्या रोमारोमात ऊर्जा पसरली! त्याच्यातून ती चोहीकडील जमिनीत पसरली, फक्त एवढंच नाही तर जिथे त्या दोन्ही उल्का पडल्या तिथून दोन नद्या फुटल्या आणि वाहू लागल्या! जणू ते डोंगराचे आनंदाश्रूच होते!

  'सूर्यदादा, तू खरंच आज सिद्ध केलंस की तुझ्याएवढा महान पालनकर्ता दुसरा कुणीही नाही!' असं म्हणून डोंगराने त्या दिवसापासून परत आपल्या जमिनीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि तिथल्या सर्व जीवांना पुन्हा एकदा सुखाचे दिवस येऊ लागले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  - स्मार्ट सिटीतून रोबोटिक मशीनची खरेदी

  - पुढील आठवड्यात मशीन होणार दाखल

  ..

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  गोदावरी नदीतील प्रदूषण, अस्वच्छता आणि पानवेली काढण्यासाठी दरवर्षी ठेकेदाराची नियुक्ती करूनही स्वच्छता राखण्याचे काम व्यवस्थित केले जात नाही. त्यामुळे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या निधीतून गोदावरी स्वच्छतेसह पानवेली काढण्यासाठी 'ट्रॅश स्कीमर' या रोबोटिक मशीनची खरेदी केली आहे. पाणी व जमिनीवर चालेल, असे बदल महापालिकेने या मशीनमध्ये करून घेतले असून, आठवडाभरात हे मशीन शहरात दाखल होणार आहे.

  गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणासंदर्भात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासह तिच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. गोदावरीसह तिच्या उपनद्यांमध्ये शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासह गोदावरीतील पानवेली काढणे आणि स्वच्छता करण्यासाठी ४२ लाखांचा ठेका आधीच देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारामार्फत १८ कर्मचाऱ्यांच्या मदतीने तीन टप्प्यात नदीची स्वच्छता करण्यात येत आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र नदी स्वच्छतेचे काम कागदावरच होत असल्याचा आरोप नागरिकांसह नगरसेवकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे गोदावरीसह नंदिनी, वालदेवी आणि वाघाडी या उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी एक कोटी ४० लाखांचे तीन स्वतंत्र ठेके देण्याची तयारी महापालिकेने केली होती. परंतु, गोदावरीचीच स्वच्छता होत नसल्याने अन्य ठिकाणी पैसा का खर्च करायचा, यावर सदस्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे ठेकेदारासंदर्भात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महापालिकेने 'ट्रॅश स्कीमर'द्वारे गोदावरीची स्वच्छता करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून तब्बल एक कोटी ७५ लाख रुपये खर्चून हे रोबोटिक मशीन खरेदी करण्यात आले असून, हे मशीन पर्यावरण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. या मशीनमध्ये गोदावरी नदीच्या आराखड्यानुसार बदल करण्यात आले असून, हे मशीन पाणी तसेच जमिनीवरही चालणार आहे. दोन्ही ठिकाणांची स्वच्छता करणार असल्याची माहिती पर्यावण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन वंजारी यांनी दिली. मशीनचे काम पूर्ण झाले असून, पुढील आठवड्यात महापालिकेला मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  ...

  पाच वर्ष गँरटी

  महापालिकेने यापूर्वीही रोबोटिक मशीन खरेदी केले आहेत. परंतु, देखभाल दुरुस्तीअभावी या रोबोटिक मशीन धूळ खात पडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने या ट्रॅश स्किमरची देखभाल व दुरुस्ती पाच वर्षे सदरची कंपनी करणार आहे. पानवेली, प्लास्टिक, नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम या मशीनद्वारे होणार आहे. त्यामुळे महापालिकेचा आर्थिक खर्चही वाचणार असल्याचा दावा पर्यावरण विभागाने केला आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवथाळी या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ आज (दि. २६) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हा शुभारंभाचा कार्यक्रम होणार आहे. मालेगावात कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

  जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी ही शिवथाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेच्या कॅन्टीनमध्ये सकाळी ११ वाजता आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते, तर नाशिकरोड परिसरातील दीपक हॉटेल येथे आमदार सरोज आहिरे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. गरीब नागरिकांनी या थाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, नाशिक

  नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेसचालक संघटनेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आज (दि. २६) होणार आहे. राज्यात सर्वप्रथम या संघटनेचे कार्यालय साकारले जात आहे. सभासदांच्या देणग्यांमधून हे कार्यालय साकारले जात आहे. सी-२१२, विराज कॅपिटल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, शिंगाडा तलाव येथे आज दुपारी दोन वाजता हा सोहळा होणार आहे.

  या कार्यालयाचे उद्घाटन आज पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर, किशोर दराडे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, संदीप युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष संदीप झा, प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, मिसेस इंटरनॅशनल डॉ. नमिता कोहक, नामको चेअरमनचे सोहनलाल भंडारी, ब्रह्मकुमारीच्या पुष्पा दीदी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जिल्ह्यातील हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन, संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. जयंत मुळे, सरचिटणीस प्रा. सीए लोकेश पारख, राज्य मंत्रालयीन कामकाज समिती प्रमुख प्रा. यशवंत बोरसे, माजी राज्याध्यक्ष प्रा. शिवाजी कांडेकर, उपाध्यक्ष मुकुंद रणाळकर आदींनी केले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0
 • 01/25/20--14:30: फास्ट -
 • आज गोदा सन्मान

  नाशिक : 'गोदा सन्मान २०२०' या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आज (दि.२६) सायंकाळी सहा वाजता रामकुंड येथील गांधी तलाव येथे आयोजन केले आहे. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. खासदार संजय राऊत हे सोहळ्याचे अध्यक्ष आहेत. सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार असून, नाशिककरांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन किशोर बेलसरे, अशोक कुटे, चिराग शर्मा, हेमंत काळमेख यांसह इतर संयोजकांनी केले आहे.

  ...

  आज वर्धापन दिन

  नाशिक : मायको एम्प्लॉइज फोरमचा ३१ वा वर्धापन दिन आज (दि. २६) सायंकाळी साडेपाच वाजता सिडको येथील राजे संभाजी स्टेडियमशेजारील फोरमच्या कार्यालयात होणार आहे. महापौर सतीश कुलकर्णी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने आणि बॉश लिमिटेडचे डेप्युटी जनरल मॅनेजर नीलेश फणसे प्रमुख पाहुणे असणार आहेत. सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान होणार आहे. सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन फोरमने केले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  आधी

  डोंगरातील गुहेतील वास्तव

  नंतर

  वळे कुटुंबाला मिळालेले घरकुल

  गुहेतील शतकोत्तरी वास्तव्याचा प्रवास अखेर थांबला....

  म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

  पिढ्यान् पिढ्या डोंगरकपारीतील गुहेतलं त्यांचं शंभर वर्षांचं वास्तव्य म्हणजे सलग सात वनवासच. ना घरपण, ना विजेचा दिवा, ना शिक्षण, ना डांबरी रस्ता. असं आदिम जीवन जगणाऱ्या कुटुंबाचा गावाशी संबंधही नाही. ही दंतकथा नाही, तर वस्तुस्थिती आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पळसुंदे (फोफसंडी वाडी) येथील सोमनाथ घमाजी वळे (वय ६०) कुटुंबाचं हा वर्षानुवर्षांचा गुहेतला वनवास अखेर संपुष्टात आला असून, त्यांना पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून घरकुल मिळाले आहे.

  अश्मयुगीन काळात मानव डोंगर दऱ्यांतील गुहा आणि कपारींत वास्तव्याला होता, हे सर्वश्रुत आहे. मात्र, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांचा कालावधी उलटल्यानंतरही काही कुटुंबे अश्मयुगीन मानवाप्रमाणे डोंगरदऱ्यांतील गुहांतच वास्तव्याला आहेत ही बाब कुणीही मान्य करणार नाही. मात्र, जुन्नर, आंबेगाव, संगमनेर आणि इगतपुरी या चार तालुक्यांच्या मधोमध वसलेल्या पळसुंदे (फोफसंडी वाडी) येथील सोमनाथ वळे यांचे कुटुंब शंभर वर्षांपासून या गावालगत उत्तरेकडील डोंगरात ६०० फूट उंचीवरील एका गुहेतच (स्थानिक भाषेत गडदी) वास्तव्याला होते. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून योगायोगाने शासकीय यंत्रणेतील अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, ग्रामसेवक अविनाश मंडलिक या वळे कुटुंबापर्यंत पोहोचले आणि या कुटुंबाचा गुहेतील शतकोत्तरी वास्तव्याचा प्रवास दोन महिन्यांपूर्वी कायमचा संपुष्टात आला. वळे कुटुंबाला पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून पळसुंदे गावातील गावठ्यात हक्काचे घर मिळाल्याने या कुटुंबाचा शंभर वर्षांनंतर गुहेतून गृहप्रवेश झाला आहे. वळे कुटुंबाचा हा घराचा वनवास संपविण्यासाठी पळसुंदे गावच्या सरपंच स्वाती उमरे यांनीदेखील पुढाकार घेतला.

  वळे कुटुंबाची कहाणी

  सोमनाथ वळे यांचे आजोबा, वडील आणि आता त्यांच्यासह त्यांच्या नातवापर्यंतच्या पिढ्यांचे वास्तव्य या गुहेतच होते. ब्रिटिशांच्या जंगल कायद्याने त्यांचे गुरे चराईचे हक्काचे जंगल अभयारण्यात समाविष्ट झाल्याने वळे कुटुंब शंभर वर्षांपूर्वीच भूमिहीन झाले. घरासाठी जागाच शिल्लक न राहिल्याने त्यांच्या आधीच्या पिढ्यांचे वास्तव्य तब्बल सहाशे फूट उंचीवरील डोंगरकपारीतील गुहेतच होते. पशुपालन हा मुख्य व्यवसाय. जोडीला जंगलातून मध, डिंक, कंदमुळे जमा करणेही आलेच. शिक्षणाची तर गंधवार्ताच नाही. दळणवळणाच्या सुविधा तर कोसो दूर. मोबाइल, इंटरनेट हे शब्द तर कल्पितच. गावाशी संबंधही अभावानेच. मात्र, २०१८-१९ या वर्षी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वळे कुटुंबापर्यंत पोहोचली आणि या कुटुंबाला स्वप्नातील घर मिळाले. वळे कुटुंबाकडे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कोणत्याही स्वरूपाची कागदपत्रेच नव्हती. मात्र, शासकीय यंत्रणेकडे इच्छाशक्ती असल्यास अशक्य ते शक्य होते, याचे वळे कुटुंबाचा गुहेतून गृहप्रवेश हे चपखल उदाहरण ठरले आहे.

  गुहेतून घरात वास्तव्याला जाऊ, असे या कुटुंबाला स्वप्नातही वाटले नव्हते. जनावरे, दरड कोसळणे ही भीतीही त्यांना होती. घर मिळताच वळे कुटुंबाला खूप आनंद झाला.

  - अविनाश मंडलिक

  ग्रामसेवक, पळसुंदे

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  नाशिक : केटीएचएममध्ये मंगळवार (दि. २८) पासून ब्लॅक अँड व्हाईट तसेच चॉकलेट व रोज डेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ जानेवारी रोजी साडी व टाय डे रंगणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी बीबीए फेस्टिव्हल, १० फेब्रुवारी रोजी कम्युटर सायन्स फेस्टिव्हल, ११ फेब्रुवारी रोजी कॉमर्स फेस्टिव्हल, १२ फेब्रुवारी रोजी सायन्स फेस्टिव्हल, १३ फेब्रुवारी रोजी आर्ट फेस्टिव्हल, तर १४ फेब्रुवारीला बी-व्होक फेस्टिव्हल होणार आहे. या सर्व फेस्टिव्हलचे आयोजन हे सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत संस्थेच्या रावसाहेब थोरात हॉल, गंगापूर रोड येथे करण्यात आले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिवसेनेतर्फे दिला जाणाऱ्या जिल्हास्तरीय जीवनगौरव व गुणवंत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांना, तर आदर्श संस्था पुरस्कार मालेगावच्या महात्मा गांधी विद्या मंदिरला जाहीर झाला आहे. दीपक व्याळीज व नामदेव बेलदार यांना राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरविले जाणार आहे.

  नारायण सूर्यवंशी (माध्यमिक विद्यालय, विल्होळी), कल्पना सोनवणे (जनता विद्यालय पवननगर), योगेश पाटील (माध्यमिक विद्यालय, साकोरा) यांना तर नंदलाल धांडे (उन्नती विद्यामंदिर), सुनंदा सोनवणे (स्व. प्रभाकर वैशंपायन विद्यालय) यांना प्राथमिक विभागाचे उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून गौरविण्यात येणार आहे. गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनुक्रमे येवला तालुक्यातील जि. प. शाळा नांदूरच्या जयश्री राठोड व मखमलाबादच्या अभिनव बालविकास मंदिरच्या सुवर्णा गायकवाड यांना उपक्रमशील शिक्षक, तर नाशिकचे प्रशांत केंदळे (साहित्य), निफाडचे बाळकृष्ण ठोके (अध्यात्म), मालेगावच्या संगीता चव्हाण, चांदवडचे जीभाऊ शिंदे (सहकार), मालेगावचे राजेंद्र निकम (संघटन), घनश्याम अहिरे (पत्रकारिता), कळवणचे संजय देवरे (सामाजिक), दिंडोरीचे दत्तात्रय वाणी (विज्ञान), नाशिकच्या मीनाक्षी गवळी (महिला सबलीकरण), चांदवडचे देवीदास हिरे (कला), इगतपुरीचे विजय कुमावत (नाट्य), विजय पाटील, कळवणचे रणजीत निकम (आदिवासी विभाग), नाशिकचे शंकर आहेर, सुरगाण्याचे रामू चौधरी (क्रीडा), येवलाचे दत्तू लभडे (दिव्यांग), बागलाणचे दत्तात्रय ह्याळीज (एनसीसी), निफाडचे बाळकृष्ण शिंदे (स्काऊट), नाशिकच्या मनीषा ताकाटे (गाइड), चैताली विश्वास (इंग्रजी माध्यम), गंगाधर कोरडे व सिन्नरचे पांडुरंग विंचू (शिक्षकेत्तर), मालेगावचे कैलास सावंत (प्रयोगशाळा सहाय्यक परिचर), एकलहरे येथील माया टिल्लू (अंगणवाडी), देवळाली कॅम्पचे संजय आढाव (माहिती व तंत्रज्ञान), दिंडोरीचे अशोक काळे, निफाडचे बापू शेरेकर, शंकर सांगळे तर देवळालीच्या ज्योती चव्हाण यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सर्व पुरस्कारांचे वितरण मार्चमध्ये केले जाणार आहे. पुरस्कारांची घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, संयोजक संग्राम करंजकर, निवड समितीचे अध्यक्ष के. के. आहिरे, शहरप्रमुख विक्रम सोनवणे, शिक्षक सेनेचे बबन चव्हाण आदींनी केली.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, नाशिक

  इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) च्या वतीने घेण्यात आलेला सीएस फाऊंडेशनच्या परीक्षेत शहरातील समृद्धी तिडके या विद्यार्थिनीने ३४६ गुणांसह देशात नववा क्रमांक पटकाविला.

  इशा झंझारी (३१६ गुण) हिने देशात २४ वा क्रमांक पटकाविला आहे. कंपनी आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजात कंपनी सचिव या पदासाठी आयसीएसआय तर्फे कंपनी सेक्रेटरी हा अभ्यासक्रम घेण्यात येते. या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या विद्यार्थ्यांसमवेत नाशिकमध्ये १२४ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत दिव्या पुरस्वानी (२६४), वेदांग पोळ (२४०), सोहम कासट (२३४), गौरी काकडे, अश्विनी नागरे, आकाश हिवराळे आदी विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  नववर्ष स्वागत समितीचा उपक्रम

  ...

  म. टा. प्रतिनिधी, नाशिक

  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस भोंसला सैनिकी शाळेच्या मैदानाकडे वळणारी अबालवृद्धांची हजारो पावले, प्रत्येकाच्या ओठी गुंजणारी 'वंदे मातरम्' या देशभक्तिपर गीताची ओळ अन् तालवाद्यांच्या तालावर थिरकणारी राष्ट्रभक्तीने भारावलेली हजारो मनं अशा वातावरणात सुमारे दहा हजार मुखांनी 'वंदे मातरम्'चे सामूहिक गायन सादर केले. समाजाच्या सर्व स्तरातील व वयोगटातील नागरिकांनी या भव्य कार्यक्रमात सहकुटुंब सहभाग घेत या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  राष्ट्रीय विकास मंडळ संचलित नववर्ष स्वागत समितीच्या वतीने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन भोंसला सैनिकी शाळेच्या मैदानात करण्यात आले. शनिवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम अन् देशभक्तिपर कार्यक्रमांच्या सादरीकरणाने सुरू झालेल्या या सोहळ्यास वंदे मातरमच्या गायनाने बहर आणला.

  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर २४ जानेवारी १९५० साली संविधान सभेत 'वंदे मातरम्'च्या कडव्यास राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला आहे. या निमित्ताने या दिवसाच्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यात आला. या सोहळ्यासाठी सर्व धर्माच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले होते. यासोबतच तृतीयपंथी, दिव्यांग नागरिकांसाठीही कार्यक्रमात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मुख्य सोहळ्याच्या अगोदर कथ्थक, भरतनाट्यम आदी कार्यक्रमांद्वारे देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. याशिवाय स्वातंत्र्यासाठी 'वंदे मातरम्'चा मंत्र जपत आत्मबलिदान देणाऱ्या क्रांतिवीरांची माहितीही नागरिकांसाठी सादर करण्यात आली होती.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  पंचवटी : निमाणी मंगल कार्यालयाच्या मोकळ्या जागेत बसलेल्या युवकांना वाहतूक पोलिसांनी हटकले असता, त्यांच्याकडे दोन चॉपर आढळले. ते हस्तगत करून पोलिसांनी या चार संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणी संशयित आकाश रामदास शिंदे (वय २२, रा. पवार चाळ, रोहिणीनगर, पेठ रोड), आकाश घनश्याम गायकवाड (वय १९, रा. घर न. ३८, गार्डन शेजारी, सुदर्शन कॉलनी, पेठ रोड), गिरीश शिवाजी महाले (वय २२, रा. फ्लॅट न.४, बिल्डिंग न.२, रोहिणीनगर, पेठ रोड), शुभम कैलास आहेर (वय २०, घर न. ४६१४, सद्गुरू कृपया सर्व्हिस, म्हसोबानगर, पेठ रोड) यांना अटक केली असून, पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  गौतमनगर भागातील कुटुंबांचे स्थलांतर नाही

  म. टा. वृत्तसेवा, सातपूर

  गौतमनगर झोपडपट्टीतील घरे चुंचाळे घरकुल योजनेत स्थलांतरीत झाल्याने, तेथील मोकळी जागा 'एमआयडीसी'ने ताब्यात घेण्याबाबत नुकत्याच झालेल्या 'एमआयडीसी'च्या बैठकीत 'निमा', 'आयमा'चे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यामार्फत सूचना करण्यात आली होती. परंतु, अद्यापही तेथील कुटुंबे घरकुलांमध्ये स्थलांतरित न झाल्याचे निदर्शनास आले असून, या भागातील अतिक्रमण जैसे थे आहे.

  महापालिकेने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेत चुंचाळे शिवारात साडेपाच हजार घरकुलांची उभारणी केली आहे. शहराबाहेर अंबड एमआयडीसीला लागून असलेल्या घरकुल योजनेत गौतमनगर व शांतीनगर झोपडपट्टी भागातील रहिवाशांना सदनिका वाटप करण्यात आल्या होत्या. परंतु, या घरकुलांमध्ये काही कुटुंबेच वास्तव्यास गेली आहेत. अधिक सदस्य असलेली कुटुंबे अद्यापही याच भागात राहत असल्याचे दिसून आले आहे. काही ठराविक कुटुंबांनाच घरकुले देण्यात आल्याची चर्चा आहे. यबााबत विचारणा केली असता, एकाच कुटुंबात तीन जोडपी व मुले असल्यास, ही घरे कशी पुरेशी होतील? असा सवाल या रहिवाशांनी केला. घरकुलांचे वाटप करतांना घरातील सदस्यांची माहिती घेण्याची मागणी, गौतमनगर येथील रहिवाशांनी केली. त्यामुळे घरकुले उपलब्ध होऊनही या भागातील अतिक्रमण जैसे थे आहे.

  गौतमनगर भागातील काही रहिवाशांना चुंचाळे शिवारातील घरकुल योजनेत सदनिका वाटप करण्यात आल्या. परंतु माझ्या घरात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. महापालिकेच्या छोट्याशा घरकुलात सर्वांना राहणे शक्य नाही. याबाबात महापालिकेने माहिती घेत कुटूंबाच्या संख्येनुसार घरकुले वाटप केली पाहिजेत.

  - बबिता काळे,

  रहिवासी, गौतमनगर

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. वृत्तसेवा, निफाड

  चांदोरी येथील गोदावरी नदीमध्ये आत्महत्या केलेल्या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या इंदिरानगर, नाशिक येथील पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी निफाड न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

  ज्योती जगधने या महिलेने शनिवार चांदोरी येथील गोदावरी नदीत आत्महत्या केली. तिच्याकडे सापडलेल्या डायरीतील नोंदीवरून इंदिरानगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक महेंद्र चव्हाण व सहाय्यक जगताप यांच्याविरोधात तिच्या चुलत्याने सायखेडा पोलिसात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून महेंद्र चव्हाण व जगताप यांच्यासह ज्योतीचा पती बाबासाहेब जगधने, बाळू जाधव यांच्यावर इंदिरानगर येथील निरीक्षक महेंद्र चव्हाण व सहाय्यक निरीक्षक जगताप यांच्यासह पती बाळू जाधव यांच्यावर सदर महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपी फरार झाले होते.

  सायखेडा पोलिसांनी या दोघांना अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना केल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक आशिष अडसूळ यांनी दिली. दरम्यान, निरीक्षक महेंद्र ओमकार चव्हाण याने निफाड न्यायालयात २३ जानेवारी रोजी अॅड. पुराणिक यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन दाखल केला आहे. यावर ३० जानेवारी रोजी निफाड येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  संजय राऊत यांची इच्छा; मी मनाने कधीही भाजपजवळ गेलो नाही

  म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

  राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे टिकणार आणि 'मी पुन्हा येईन' हे न सांगता परत येईल, असा टोला भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. दिल्लीत प्रधानमंत्री म्हणून मराठी माणूस बसावा, ही आपली इच्छा आहे. शरद पवार यांच्या रुपाने मराठी माणूस पंतप्रधान व्हावा अन् सर्व राज्याने त्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे, असे मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. नेहरू आणि गांधी कुटुंबाच्या त्यागावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याची जहरी टीका राऊतांनी केली आहे.

  ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने नाशिकमध्ये खासदार राऊत यांची शनिवारी प्रकट मुलाखत पार पडली. मुलाखतकार राजू पुरुळेकर यांनी राऊतांची प्रकट मुलाखत घेत, महाघाडी सरकारच्या स्थापनेमागील इतिहास उलगडून काढत, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यास भाग पाडले. नाशिक हे बंडाचे केंद्रस्थान असल्याचे सांगत, शरद पवारांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर या सरकारविरोधात पहिली ठिणगी पडल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले. राज्यात तर, टोळीराज सुरू होते. देशाच्या नसानसात सध्या विष पेरण्याचे काम सुरू आहे. धार्मिक द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळे देश विभाजित होईल, अशी भीती वाटायला लागली आहे, असे मत त्यांनी मांडले.

  महाराष्ट्राने मात्र मोदी, शहा यांचा सर्व मनसुबे उधळून लावले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार येणार याची फक्त मला आणि पवारांनाच खात्री होती असा खुलासा करत, आमचे फोन टॅपिंग ऐकूनच भाजपचा आत्मविश्वास गेला, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला. काँग्रेसला तर सत्तेत येऊ, असे स्वप्नातही वाटल नव्हत. पवारांनी काँग्रेसच्या निर्णयाची आम्हाला जाणीव करून दिल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला.

  महाराष्ट्र हातातून जाणं हाच भाजपला मोठा धक्का आहे. मुंबईची लूट करून राज्य चालवायचा, त्यांचा मनसुबा होता. महाराष्ट्र हातात नसणं म्हणजे देश हातात नसण असे आहे. सन २०२४ मध्ये त्याचे परिणाम भाजपला दिसतील, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. मोदी सुद्धा गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे पवार सुद्धा देशाचे नेतृत्व करू शकतात असे सांगत, पवारांच्या रुपाने मराठी माणूस देशाचा पंतप्रधानपदी बसावा, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  यांना भीती वाटतेय

  फोन टॅपिंग प्रकरण आणि कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासावरून देखील राऊतांनी भाजवर हल्ला केला. राज्य सरकारशी चर्चा न करता कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राने घेतला हे दबावतंत्र किंवा काही लपवायचं असेल याचाच भाग असल्याचा टोला त्यांनी लगावला. यांना काहीतरी बाहेर येईल, याची यांना भीती वाटत आहे. राज्यात हस्तक्षेप करण्याचाही हा प्रकार असून या झुंडशाही पुढे महाराष्ट्र कधीची झुकणार नाही. महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीच झुकणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रमाणेच महाराष्ट्रही कणखर भूमिका घेईल, असे संकेत राऊत यांनी यावेळी दिले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0
 • 01/25/20--14:30: Article 4
 • मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. वृत्तसेवा, सिडको

  महापौर सतीश कुलकर्णी यांनी मागील काही दिवसांपासून 'महापौर आपल्या दारी', असा दौरा सुरू केला आहे. त्यांतर्गत शनिवारी सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये दौरा आयोजित करण्यात आला होता. मोकाट जनावरांच्या समस्येपासून कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यापर्यंत अनेक तक्रारींची पाढा यावेळी नागरिकांनी महापौरांसमोर वाचला. या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.

  यावेळी प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, नगरसेविका रत्नमाला राणे, छाया देवांग यांच्यासह मनपाच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर प्रभागातील विविध भागात महापौरांनी भेट दिली. यावेळी साईबाबानगर मैदान, हिरामन गायकवाड सभागृह, स्वामी विवेकानंद पुतळा मैदान आदी भागातील पाहणी करून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. महाकाली मंदिर परिसरात असणारी जुनी विहीर बंद करावी, पावसाळी नालेसफाई व्हावेत, परिसरातील भुयारी गटारी वारंवार तुंबत असतात. परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पथदीप बंद पडतात पाणी येण्याची व जाण्याची वेळ बदलावी, विवेकानंद पुतळा येथे वाचनालय करून त्या मोकळ्या मैदानात कंपाउंड करावे, विजतारा भूमिगत कराव्यात, अशा मागण्या नागरिकांनी केल्या.

  पाहणीनंतर महापौरांनी सांगितले की, महापौर दौऱ्याचा उद्देश नागरिकांच्या समस्या सुटणे हा आहे. मोकाट जनावरांचा त्रास १ मार्चनंतर बंद होईल, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. परिसरात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करून, प्रभागात ३ तास पुरेसे पाणी मिळण्याबाबत महापालिकेच्यावतीने नियोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

  साईबाबानगर परिसराचे रस्ते काँक्रिटीकरण करून मैदानाला पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करणे, ज्या नागरिकांच्या घरात पाणी जाते त्याठिकाणच्या रस्त्यांची उंची कमी करणे, स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळील मैदानास संरक्षण भिंत बांधून जेष्ठ नागरिकांसाठी शेड उभारणी करणे यादृष्टीने प्रस्ताव सादर करून त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.

  ..........

  सवय बदला, नाशिक बदलेल

  महापालिकेच्यावतीने लवकरच 'सवय बदला नाशिक बदलेल', असे बॅनर लावून जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच घंटागाडीतच कचरा टाकावा, असे आवाहन महापौरांनी केले. २६ जानेवारी पासून महापौर ॲप सुरू करण्यात येत असून त्यावर नागरिकांना त्यांच्या तक्रारी नोंद करण्याबाबत यावेळी आवाहन करण्यात आले. सार्वजनिक युरीनल उभारण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी करून, जागा निश्चित करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  सिडको : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान हेलीकॉप्टर अपघातात नाशिकचे पायलट निनाद अरुण मांडवगणे शहीद झाले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शहीद मांडवगणेंना मरणोत्तर वायुसेना शौर्यपदक जाहीर झाले आहे. निनाद यांच्यावर नाशिक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यानंतर यांच्या पत्नीनेदेखील वायुसेनेत दाखल होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार सध्या त्या हैदराबाद येथे प्रशिक्षण घेत आहेत.

  ----

  शहीद निनाद याला आज वायूसेना शौर्यपदक मिळाले आहे, त्यामुळे अभिमान वाटतो. शासनाने या पदकाच्या माध्यमातून या वीरांच्या शौर्याचे कौतुकच केले आहे.

  - अनिल मांडवगणे,

  शहीद निनादचे वडील

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  टीम मटा

  नाशिकनगरी गेल्या दोन दिवसांपासून भावभक्तीने फुलल्याचे पाहायला मिळाले. हिंदू धर्मीयांबरोबर मुस्लिम धर्मीयांच्याही धार्मिक कार्यक्रमांनी शहर गजबजलेले होते. आत्मा मालिक ध्यानयोग मिशन, संत निरंकारी मंडळातर्फे सत्संग, ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचा सेल्फ गव्हर्नन्स विथ गुड गव्हर्नन्स, तसेच सुन्नी दावत-ए-इस्लामी संस्थेतर्फे राज्यस्तरीय सुन्नी इज्तेमाने शहर भक्तिभावाने भारलेले होते.

  एकाच वेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी कुंभमेळ्यानंतर प्रथमच नाशिककरांनी अनुभवली. आत्मा मालिक ध्यान योग मिशन आणि ध्यानपीठातर्फे सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या उपस्थितीत प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला सामुदायिक आत्मचिंतन सोहळा झाला. या सोहळ्यात विदेशी भक्तांनी लक्ष वेधले होते. सुन्नी इज्तेमामध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ धर्मगुरू मुफक्किरे इस्लाम हजरत मौलाना कमरुज्जमा आजमी, सुन्नी दावत-ए-इस्लामीचे संस्थापक अध्यक्ष मौलाना शाकीर अली नुरी आदींनी हजेरी लावली. संत निरंकारी मंडळातर्फे झालेल्या सत्संग सोहळ्यात भाविकांची मोठी उपस्थिती होती.

  संबंधित वृत्त...४

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत, तसेच पिण्यासाठी अनुक्रमे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे २ हजार १५ हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते, तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार १८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते.

  सविस्तर वृत्त..२

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट