Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

घंटागाडीचा राग राज दरबारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील वादग्रस्त घंटागाडी मागील शुक्लकाष्ठ सुटत नसल्याचे चित्र असून आता या ठेक्याचा वाद मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दरबारी पुन्हा जाणार आहे. स्थायी समितीवर ठेवण्यात आलेल्या डॉकेटमधील अटी व शर्ती या ठेकेदारधार्जिण्या असल्याचा आरोप सभागृहनेत्या सुरेखा भोसले यांनी करीत असून त्यांनी राज ठाकरेंकडे धाव घेतली आहे. नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने या ठेक्यात मनसेकडून चूक होऊ नये म्हणून लक्ष घाला, अशी विनंती केली आहे. त्यांनी थेट राज ठाकरेंकडे धाव घेतल्याने मनसेतील सुंदोपसुंदीही समोर आली आहे.

सध्याच्या घंटागाडी ठेकेदारांनी या योजनेची वाट लावली असून दोन वर्षांपासून हा ठेकाच वादात अडकला आहे. कधी हायकोर्ट तर कधी ब्लॅकलिस्टेडच्या वादामुळे घंटागाडी योजनेला खीळ बसली आहे. घंटागाडीचा ठेका पाच वर्षांसाठी देण्याचा निर्णय झाल्याने प्रशानाने काढलेल्या निविदेत जुन्याच ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांनी एन्ट्री केली आहे. तर हा ठेका आता १७६ कोटींवर गेला आहे. तसेच नव्या डॉकेटमध्ये पहिल्या डॉकेटच्या अटी शर्ती वगळण्यात आल्याचा दावा केला जात आहे. नव्या घंडागाड्यांसह विविध जाचक अटी गायब झाल्याचा आरोप केला जात आहे. स्थायी समितीने या ठेकेदारांना काम देण्यासाठी आता विशेष सभा बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे, घंटागाडीच्या ठेक्यावरून मनसेतच आता दोन गट पडले आहेत. मनसेच्या सभागृहनेत्या सुरेखा भोसले यांनी नव्या डॉकेटमधील अटी शर्तींवर संशय व्यक्त केला आहे. जुन्या अटी-शर्ती बदलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून या ठेक्यासंदर्भात महापौर अशोक मुर्तडक व स्थायी समिती सभापती सलिम शेख यांच्यासोबत चर्चा केली आहे. दोघांनीही बैठक घेत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तर भोसले यांनी थेट राज ठाकरेंना लक्ष घालण्यासाठी आर्जव केले. आरोग्याच्या दृष्टीने हा ठेका महत्त्वाचा असून मनसेच्या वतीने चूक होऊ नये व नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सर्व गटनेत्यांची बैठक एकत्रित निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच एकाच वर्षांसाठी ठेका देण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे घंटागाडीचा विषय पुन्हा चिघळणार असल्याचे चित्र आहे.

निविदेतील अटी-शर्ती कायम राहणार? घंटागाडीच्या डॉकेटसदंर्भात संशय व्यक्त केल्यानंतर सभापती सलिम शेख यांनी पहिल्याच अटी-शर्ती कायम असल्याचा दावा केला आहे. स्थायी समितीची या संदर्भात विशेष बैठक होणार असून त्यात नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. नव्या घंटागाड्यांच्या समावेशासह जीपीएसचाही त्यात समावेश असणार आहे. तर ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांसदर्भात स्थायीत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे या घंटागाडी ठेक्याचा निर्णय हा नाशिककरांच्या हिताच्या बाजूनेच घेतला जाईल, असा दावा त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२२ वर्षांनंतर ‘त्यांचा’ पुन्हा झाला शाळाप्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

आजच्या आधुनिक युगात प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळ येत आहे. याचाच प्रत्यय आला तो नाशिक एज्युकेशन संचालित भगूर मधील ति. झं. विद्यामंदिराच्या १९९४ सालच्या विद्यार्थ्यांना. तब्बल २२ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा आनंद सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भगूर येथील माहेरवाशीण व सध्या नाशिकरोड येथे वास्तव्य असलेल्या रेणुका कातकाडे यांनी शाळेतील काही मित्र-मैत्रिणींशी सहज म्हणून संपर्क साधला. यातून एकमेकांविषयीची जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली. आपल्या वर्गातील अन्य सहकाऱ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळविण्यास सुरुवात झाली. यातून एकमेकांचा संपर्क निर्माण झाला. या सर्व माजी वर्गमित्र-मैत्रिणींना एकत्र आणत रेणुका यांनी व्हॉट्सअॅपवर 'टीझेडव्हीएम' हा शाळेच्या नावाने ग्रुप तयार केला. यामध्ये शाळेतील आणि विशेषत: १९९४ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने शाळेतील त्याच वर्गात पुन्हा एकदा सवंगाड्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार १९९४ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेटर करण्याचे ठरले. त्यानुसार मेळाव्यास नाशिकसह धुळे, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई आदी शहरांमधून ३५ जण भगूर येथील आपल्या 'टीझेडव्हीएम' शाळेत झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

जुन्या आठवणींना उजाळा प्रत्येक जण आपल्या प्रपंचाच्या रहाटगाड्यात व्यस्त होता. मात्र, शाळेतील माजी सहकाऱ्यांना बघण्याची, भेटण्याची आंतरिक इच्छा तीव्र असल्याने त्यांनी वेळात वेळ काढला. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली. ते शिकत असलेल्या वर्गाचे पूजन केले. पुन्हा एकदा आपापल्या बेंचवर बसत त्या दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला. पुणे-सिन्नर महामार्गावरील केशरबाग येथे भेट देत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटला. यावेळी रेणुका कातकाडे, विलास बोडके, दीपक कणसे, धनंजय विश्वंभर, प्रमोद आडके, विनोद शिंदे, आश्विनी शिंदे, योगिता कदम, मुकेश लोट, सुखदेव जाधव, राजेंद्र जाधव, भास्कर सोनवणे, प्रशांत कस्तुरे, मंगेश पिंपळे, प्रकाश टिळे, प्रदीप कस्तुरे, सतीश म्हस्के, विनोद जाधव, मनीषा दिवटे, पल्लवी चव्हाण, मनीषा लकारिया, माई कुलथे, अर्जुन सोनवणे, अनिता साळुंखे, रत्नाकर मोहिते, विशाल कातकाडे आदी सहभागी झाले.

१९९४ च्या तत्कालीन शालेय विद्यार्थ्यांना एकत्र पाहत असताना पुन्हा शालेय आठवणींना उजाळा मिळाला. 'टीझेडव्हीएम' शाळेच्या नावाने ग्रुप बनविल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. - रेणुका कातकाडे, ग्रुप अॅडमिन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचे आरोग्य धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाने विश्रांती घेतल्याने शहरात माशा आणि चिलटे यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून रोग सदृशकय वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिक आजारी पडत असून खासगी दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.

मागील आठवड्यात शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. याकाळात शहरात असलेली घाण बऱ्यापैकी वाहून जाणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. ही घाण रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी ओल्या कचऱ्याचे ढीग साचले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मान्सून पूर्व कामे हाती घेऊन नाले साफ करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली. याचा परिणाम म्हणून शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात माशा झाल्या त्याच प्रमाणे चिलटे देखील झाले. हे चिलटे डोळ्यासमोर येत असल्याने अस्वस्थता वाढत आहे. गाडीवरून जाताना डोळ्यात चिलटे गेल्याने अनेकांचे अपघात होत असताना वाचले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मते नदीला पूर येत नाही व घाण वाहून जात नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच रहाणार आहे.

रोगराईला निमंत्रण

वातावरणामुळे रोगराईत वाढ झाली असून अनेकांना सर्दी, ताप खोकला याची लागण झाली आहे. पावसाळा सोबत रोगराई घेऊन येतो. या मोसमात अतिसार, जुलाब, उलट्या आणि सीझनल फ्ल्यू म्हणजे एनफ्लुएन्झा यांचा प्रादुर्भाव नेहमीच होत असतो. कॉलरा हा अतिसाराचा रोग आहे. मुले आणि प्रौढ व्यक्ती यांच्या आतड्यांमध्ये व्हिब्रियो कॉलेरेई या जीवाणूचे संक्रमण होते. उघड्यावरील पदार्थ खाल्याने जास्त आजार फैलावत आहे.

उघड्यावरील अन्नपदार्थ सेवन करण्याचे टाळावे. सरत्या पावसाबरोबर ब्रॉन्कायटीस म्हणजे खोकला, ताप आणि धाप लागणे हा विकारही आढळून येतो. अनेकदा डोळे येण्याचे आजार बळावतात. पूर्वी डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात आली होती. सुरुवातीला सीझनल फ्ल्यूमध्ये आणि स्वाइन फ्ल्यूमध्येही अशीच लक्षणे दिसतात. त्यामुळे अशा रुग्णाने जागरुक राहून जवळजवळ रोजच आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. - डॉ. सुनील घोडके

माशा या विषारी जिवाणूंचा प्रसार करतात. त्यामुळे उघड्यावरचे अन्न खाऊ नयेत. पाणी उकळून प्यावे. ताजे अन्न, गवती चहा, आलं, फळं याचे नियमित सेवन करावे. मधाबरोबर सितोफलादी चूर्णाचे चाटण घ्यावे. कडुनिंब, गुगुळ, उद, वावडिंग यांचा घरात धूर करावा. यामुळे दमट हवामान कमी होतं व रोगकारक क्षमता कमी होते. - डॉ. राहुल सावंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेय गुंतवणूकदारांचे पैसे मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा दिलासादायक निर्णय मंगळवारी जिल्हा कोर्टाने दिला आहे. ठेवीदारांचे पैसे देण्याचे काम सुरू करा, असे सांगून जिल्हा कोर्टाने मंगळवारी 'मैत्रेय'च्या संचालिका वर्षा सत्पाळकर, तसेच इतर संचालकांचा जामीनही मंजूर केला.

मैत्रेय संचालकांचा जामीन मंजूर करण्याच्या निर्णयापर्यंत एस्क्रो खात्यात जवळपास साडेसहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. हे पैसे गुंतवणूकदारांना देण्यात यावे, अशी भूमिका पोलिसांनी सुरुवातीपासून घेतली होती. यासाठी कोर्टाने एक कमिटी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पूर्तता केली. त्यानुसार मंगळवारी पैसे परत देण्याचे आदेश दिले. पुढील आठवड्यापासून गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यासंबंधी कार्यवाही सुरू होणार असल्याचे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी स्पष्ट केले. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे, याच उद्देशाने आम्ही बाजू मांडली, असे सत्पाळकर यांनी स्पष्ट केले.

ऐतिहासिक निर्णय

आर्थिक फसवणुकीची शेकडो प्रकरणे समोर येत असतात. पोलिस गुन्हे दाखल करतात. आरोपींना अटकदेखील होते. मात्र, ठेवीदारांना पैसे परत मिळत नाहीत. मैत्रेय प्रकरणात परिस्थिती भिन्न राहिली. पोलिसांचा तपास उजवा ठरला. तपासाधिकाऱ्यांनी संकलित केलेले पुरावे योग्य पद्धतीने कोर्टासमोर मांडण्याचे काम सरकारी पक्षातर्फे झाले. याचा परिणाम म्हणून पुढील आठवड्यापासून पैसे परत करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.



तपास योग्य पद्धतीने झाल्याचे कोर्टाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले. आता प्रत्येक आठवड्याला प्राधान्यक्रम ठरवून ठेवीदारांना पैसे परत करण्यात येतील. - एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

शक्य तितकी रक्कम एस्क्रो खात्यात जमा करावी, यासाठी आम्हीही प्रयत्न करतो. नाशिकप्रमाणेच इतर ठिकाणांवरील गुंतवणूकदारांना लवकरात लवकर पैसे कसे मिळतील, याचे नियोजन सुरू आहे. - वर्षा सत्पाळकर, संचालिका, मैत्रेय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विमानतळाच्या सुरक्षेला भगदाड

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक ः हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या जागेत असलेल्या ओझर येथील नाशिक विमानतळाच्या सुरक्षेला मोठे भगदाड पडल्याची बाब समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कार्गो आणि टर्मिनलच्या ठिकाणी आत जाण्यास मज्जाव करणाऱ्या एचएएल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अनेक जण सुरक्षा कुंपण भेदून आत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे विमानतळाची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे दिसून येत आहे.

हवाई दलासाठी लढावू उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या एचएएलच्या जागेत नाशिक विमानतळ साकारण्यात आले आहे. याच ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल आणि कार्गो कॉम्प्लेक्सही विकसित करण्यात आले आहे. एचएएल आणि कॉनकॉरतर्फे कॉनकॉर या कार्गो सेवा देणाऱ्या कंपनीची स्थापनाही करण्यात आली. कॉनकॉरद्वारे कार्गो कॉम्प्लेक्सचे काम पाहिले जाते, तर पॅसेंजर टर्मिनलची मालकी एचएएलकडेच आहे. विमानतळ आणि रनवे यावर संपूर्णतः एचएएलचे नियंत्रण आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या एचएएलकडून या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेचा दिखावा केला जातो. प्रत्यक्षात तो किती पोकळ आहे हेच या भगदाडामुळे समोर आले आहे.

जानोरी गावालगत कार्गो कॉम्प्लेक्स आणि पॅसेंजर टर्मिनलसाठी प्रवेश आहे. यातील कार्गो कॉम्प्लेक्सलगत असलेली सुरक्षा अतिशय त्रोटक असल्याचे दिसून येत आहे. जानोरी गावालगतच्या कार्गो कॉम्प्लेक्सभोवती एचएएलकडून सुरक्षा कुंपण घालण्यात आले आहे. रन-वे आणि कार्गो कॉम्प्लेक्स हे दोन्ही अतिशय जवळजवळ आहेत. मात्र, सुरक्षा कुंपणाला चक्क भगदाड पडल्याचे निदर्शनास येत आहे. दोन ठिकाणी हे भगदाड पडले असून, दगडी कुंपणावरील तारेचे कुंपणही कुचकामी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच थेट कुंपण ओलांडून कुणीही आत प्रवेश करू शकत आहे. विशेष म्हणजे, या भगदाडापासून समोर थेट रन-वेच आहे!

मंगळवारी (२६ जुलै) रन-वेवर कार्गो विमान उभे होते. या विमानाद्वारे शारजाह येथे शेळ्यांची निर्यात केली जात होती. यानिमित्त एचएएलने कार्गो कॉम्प्लेक्स आणि टर्मिनलच्या गेटवर अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. आयकार्ड तपासणीसह अन्य सुरक्षेची काळजी घेतली जात होती. असे असताना कुंपणाला पडलेले भगदाड मात्र ही सारी सुरक्षा व्यवस्था फोल असल्याचेच दर्शवत होते. कारण कार्गो विमान हे कुंपणाच्या भगदाडापासून अतिशय हाकेच्या अंतरावर दिसते. दरम्यान, जानोरी गावातील काही ग्रामस्थ कार्गो कॉम्प्लेक्सचा वापर हागणदारीसाठी करीत असल्याचेही निदर्शनास येत असल्याने एचएएलच्या सुरक्षेचा बागूलबुवा फुकाचाच असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला २७ पासून राज्य एअर वेपन स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नेमबाजी क्रीडा संघटना, नाशिक व महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे २७ ते ३१ जुलैदरम्यान महाराष्ट्र एअर वेपन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सातपूर एमआयडीसीतील त्र्यंबक रोडवरील एक्स-एल टार्गेट शूटर्स असोसिएशनच्या शूटिंग रेंजवर होणार आहे.

स्पर्धेत राज्यभरातून ४५० ते ५०० नेमबाज सहभागी होणार असल्याचा अंदाज संघटनेच्या स्पर्धा संयोजकांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र एअर वेपन स्पर्धेतून राष्ट्रीय शालेय नेमबाजी स्पर्धेसाठी, तसेच जी. व्ही. मावळणकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा व वेस्ट झोन राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी नेमबाज पात्र ठरू शकतील. एअर रायफल, एअर पिस्तूल अशा दोन्ही क्रीडा प्रकारांतील २६ प्रकारांमध्ये ही स्पर्धा होईल. आयएसएसएफ आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटना व एनआर राष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या नियमांनुसार ही स्पर्धा होणार आहे. आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे आणि अपूर्व हिरे यांचे स्पर्धेला सहकार्य लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोणी पद्धत नकोच; जिल्हाभरात संताप

$
0
0

टीम मटा

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला कांदा खरेदीचा तिढा सोमवारी सुटलेला दिसत असतानाच शेतकऱ्यांनी गोणीतून कांदा खरेदीला विरोध केला. कळवण, देवळा, उमराणा, मनमाड, निफाड येथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी गोणीचा खर्च वाढतो, असे कारण पुढे करून लिलाव बंद पाडले.

उमराण्यात रास्तारोको उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरू होताच गोणी पद्दत रद्द करून जुन्या प्रचलित पद्दतीनेच कांदा लिलाव घेण्यात यावेत, अशी मागणी करून संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. मंगळवारी सकाळी ९ वाजता मुंबई-आग्रा रस्त्यावर उमराणा येथे उतरून तब्बल पाऊण तास रास्ता रोको आंदोलन छेडले.

सरकारच्या ५ जुलै २०१६ च्या अध्यादेशानुसार व्यापाऱ्यांच्या आडमुठेधोरणामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद होत्या. मात्र २४ जुलै रोजी मनमाड येथे झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीतील निर्णयानुसार २६ रोजी सकाळी ९ वाजता गोणी पद्धतीने लिलाव सुरू होताच शेतकऱ्यांनी त्यास विरोध दर्शविला. जुन्या प्रचलित पद्धतीनेच लिलाव घेण्यात यावेत, अशी करीत लिलाव बंद पाडून मुंबई-आग्रा रस्त्यावर उमराणा येथे रास्तारोको आंदोलन छेडले. यावेळी आंदोलन कर्त्यांच्यावतीने बाजार समितीचे सचिव नितीन जाधव यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे, रमेश देवरे, सुधाकर जाधव, भगवान देवरे, उमेश देवरे, भारत देवरे, विकास देवरे, अविनाश देवरे आदींसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.



देवळा लिलावही बंद देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू झालेले गोणी पद्धतीचे लिलाव रद्द करून जुन्या प्रचलित पद्धतीनेच कांदा लिलाव घेण्यात यावेत, अशी मागणी करून शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. बाजार समितीच्या कार्यालयात सचिव दौलत शिंदे, तहसीलदार कैलास पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, संचालक जगदीश पवार, सुनील पवार, काशिनाथ पवार, जिभाऊ पवार, कडू पवार, महादू पवार, रमेश पवार, उमेश पवार, विनायक पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

कळवणला आज रास्तारोको कळवण : गोणीतून विक्रीस आलेला कांद्याचा सुरू असलेला लिलाव भाजप वगळता सर्वपक्षीय शेतकरी प्रतिनिधींनी बंद पाडला. ही पद्धत शेतकऱ्याला परवडणारी नसून, खुल्या पद्धतीने विनाअडत कांदा खरेदी करावा. अन्यथा कळवण तालुका बंदचा इशारा देण्यात आला. बुधवारी कळवण बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती संतप्त शेतकरी नेत्यांनी दिली.

सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आलेला लिलाव २०० गोणी खरेदी पर्यंत आला असता मार्केटमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी जमा झाले. त्यांनी गोणी खरेदीस विरोध करत लिलाव बंद पाडला. जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा केली. बाजार समिती संचालक व कांदा व्यापारी हेमंत बोरसे यांनी व्यापारी संघटनांची भूमिका स्पष्ट केली. शेतकरी व सर्वपक्षीय पदधिकाऱ्यांनी या विरोधात बुधवारी सकाळी ११ वाजता कळवण बस स्थानकासमोर रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना नेते कारभारी आहेर, स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, माकप सरचिटणीस हेमंत पाळेकर, काँग्रेसचे शैलेश पवार, प्रभाकर पाटील, संभाजी पवार आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

मनमाडला विरोध; पण खरेदी सुरू मनमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी लिलावाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात समाधान पसरले असताना दुसरीकडे मात्र गोणी पद्धत खर्चिक असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी काही काळ कांद्याचे लिलाव बंद पाडले. मनमाड बाजार समितीत तब्बल १७ दिवसानंतर मंगळवारी लिलावाला सुरू झाला. शेतकऱ्यांना गोणी पद्धतीचा फटका बसत असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण होते. आडत बंद झाली पण गोणी पद्धत लावल्याने खर्च वाढला आहे. तो न परवडणारा असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी मनमाड बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले. काही वेळाने लिलाव पूर्ववत सुरू झाले. मंगळवारी कांद्याला कमीतकमी ३०० तर जास्तीत जास्त ९०० व सरासरी ७२० भाव होता हा भाव समाधानकारक नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

तीस वर्षांनंतर गोणीतून कांदा लिलाव निफाड : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १९८५ नंतर व्यापारीवर्गाच्या मागणीमुळे प्रथमच गोणीसह कांदा लिलाव मंगळवारपासून सुरू झाला. यावेळी बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या हस्ते कांदा गोण्यांचे पूजन करण्यात आले. बाजार समितीत शेतकऱ्यांनी वाहनातून १७८६ गोणीत कांदा आणला होता. कांद्याला जास्तीजास्त ९५२ रुपये, सरासरी ८४४ रुपये तर कमीतकमी ४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गोणी पद्धतीने कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च अडीचपट वाढणार आहे. क्विंटलमागे ९० ते १०० रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे. त्यामुळे गोणी पद्धत रद्द करावी, अशी मागणी सभापती जयदत्त होळकर यांनी केली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फोटोकॉपी शुल्क कमी करावे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

उत्तर महाराष्ट्र विदापीठ अंतर्गत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी फोटोकॉपी व चॅलेंज प्रक्रियेचे शुल्क कमी करावे, ही प्रक्रिया १५ ते ३० दिवसांत पूर्ण करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या निवेदनात म्हटले आहे की, फोटोकॉपीचे सध्याचे शुल्क विद्यार्थ्यांना परवडण्यासारखे नाही. या प्रक्रियेत विद्यार्थी उत्तीर्ण झाला, तरी त्याला शुल्क परत केले जात नाही. दुष्काळी परिस्थितीत हे शुल्क कमी करावे. फोटोकॉपी व चॅलेंजची प्रक्रिया १५ ते ३० दिवसांची करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यशवर्धन कदमबांडे, सचिन आखाडे, कपिल वाडिले, सुयोग मोरे, सनी मोरे, जितेंद्र देवरे, गणेश चौधरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सैराट रायडर्सला पोलिसांचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

कॉलेजरोडवर सुसाट वेगाने धावणाऱ्या तब्बल ७५ रायडर्सला पोलिसांनी बुधवारी दणका देत दंडात्मक कारवाई केली. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह वरिष्ठ निरीक्षकांनी कारवाई केली.

पोलिसांनी चार ठिकाणी चेक पाईंट लावत सुसाट वेगाने धावणारे बाइकस्वारांना अलगद पकडले. त्यांच्यावर दंडात्मक कडक कारवाई करुन समज देण्यात आली.

कॉलेजरोडवरील एका कॉलेजमधील प्राध्यापकास सुसाट वेगाने धावणाऱ्या बाइकस्वाराने धडक दिली होती. त्या घटनेत संबंधित प्राध्यापकाचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमिवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे.

मुबंईनाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ यांनी भोसला सैनिकी शाळेजवळ चेक पॉईंटवर सुमारे ७५ बाइकस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे नऊ हजार रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, मुंबई नाका परिसरात नाकाबंदी करत अनेक वाहनांची तपासणी करत दोषी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानांचा लिलाव अखेर सुरळीत

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

आडत खरेदीदारांकडूनच वसूल करण्यात यावी, असा राज्य सरकारचा आदेश असतानाही मागील आठवड्यात पानांच्या खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आडत देण्यास नकार दिला. त्यामुळे लिलाव ठप्प झाले होते. पानमळेवाल्यांकडूनच आडत वसूल केली. मात्र, व्यापाऱ्यांना सरकारचा आदेश पाळावा लागेल, अशी तंबी बाजार समितीने दिल्यानंतर पान खरेदीदार व्यापारी आडत देण्यास राजी झाले आणि बुधवारी पानांचे व्यवहार सुरळीत झाले.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फक्त बुधवारीच पानांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. या पानांच्या टोपल्या सातारा, सांगली भागातून येतात. इतर भाजीपाला आणि पानांची खरेदी-विक्री यात फरक आहे. भाजीपाल्याचे नियम पानासाठी लागू करू नये, अशी भूमिका पान खरेदीदार व्यापाऱ्यांनी बाजार समितीसमोर मांडली. मात्र, सरकारचे आदेश पाळावेच लागतील, असे सचिव अरुण काळे यांनी पान व्यापारी आणि अडतदार यांची बैठक घेऊन सांगितले. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. पानांचे लिलाव सायंकाळी पाचला होतात. ही वेळ अडचणी आहे. त्यासाठी बाजार समितीचा पानांसाठीचा सेल हॉल लवकर खाली करून मिळाला तर दुपारी तीन वाजताच लिलाव व्हावेत, अशी मागणी अडतदारांनी केली. बाजार समितीने हॉल खाली करून देण्याचे आश्वासन दिले.

विनापरवाना व्यापाऱ्यांचा भरणा बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या पानाच्या व्यवहारात २५ ते ३० व्यापारी असून त्यांच्यापैकी अनेकांकडे परवानाच नाही. परवाना नसतांनाही अनेक व्यापारी व्यवहार करतात. त्यात नवरात्र आणि गणेशोत्सव काळात पानांची वाढती मागणी लक्षात घेऊन नियमित व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना खरेदीसाठी पान उपलब्ध होत नाही. त्यामुळे लायसन्स नसलेल्या व्यापाऱ्यांना पानाची खरेदी करता येणार नाही असा अडतदारांनी नियम करावा, असे काळे यांनी बैठकीत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाणामारीप्रकरणी ११ विद्यार्थ्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोडच्या आरंभ कॉलेज परिसरात मंगळवारी (दि. २६) दुपारी युवकांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी उपनगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवून ११ विद्यार्थ्यांना अटक केली. यातील बहुतांश १८ वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या विद्यार्थ्यांसह कॉलेज प्रतिनिधी, पालकांशी पोलिसांनी चर्चा केली. विशेष म्हणजे यावेळी तपासणीत एका विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये चाकू सापडला.

आरंभ कॉलेजजवळ मंगळवारी युवकांच्या दोन गटात कोयते, चाकू, काठ्यांच्या सहाय्याने हाणामारी झाली. त्यामध्ये दोन युवक जखमी झाले. या घटनेने परिसरात दहशत पसरली होती. या युवकांमध्ये आरंभ, बिटको आणि मेहता कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

'त्यांची' करा हकालपट्टी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, उपनिरीक्षक पवार, सोनवणे आदींनी ११ विद्यार्थ्यांना अटक केली. त्यांच्या पालकांना आरंभ कॉलेजमध्ये बोलावून प्राचार्यांसमवेत चर्चा केली. मुलांना कडक समजही देण्यात आली. कॉलेजने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी सूचना पोलिसांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचाऱ्यांसाठी सिग्नल!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये कर्नाटकमधील बेंगळुरू शहराच्या धर्तीवर पादचाऱ्यांसाठी सिग्नल्सवरील सायरन बसविणे आणि शहरातील आवश्यक चौकांना तातडीने सिग्नल व्यवस्था उपलब्ध करण्याचा निर्णय मोबिलिटी सेलच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे.

वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी २० वर्षांचा स्वतंत्र मोबिलिटी प्लॅन तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील पार्किंग, सिग्नल व्यवस्था व पादचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेत स्वंतत्र मोबिलिटी सेल स्थापन करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पदभार घेताच सर्वप्रथम शहरातील वाहतुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शहराच्या वाहतूक आराखड्यासाठी महापालिकेत सर्व विभागांचा एक स्वतंत्र मोबिलिटी सेल स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आयुक्त कृष्णा यांनी महापालिकेत स्वतंत्र सेल स्थापन केली. त्याची पहिली बैठक बुधवारी आयुक्तांच्याच अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, शहर अभियंता सुनील खुने, प्रादेशिक परिवहन विभागाचे मुख्य अधिकारी भरत कळसकर, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त, एस. टी. महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, तसेच आयटीडीपी व नाशिक फस्ट या सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधीसह नाशिक महापालिकेचे विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीमध्ये नाशिक महापालिकेने वाहतूक विषयक अभ्यास करण्यासाठी नेमलेले तज्ज्ञ सल्लागार यूएमटीसी यांनी सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या कामाबाबत माहिती सादर केली. त्यात मोबिलिटी सेलसंदर्भात माहिती देण्यात आली. सदर मोबिलिटी सेलमध्ये नाशिक महापालिका, शहर वाहतूक पोलिस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, एस. टी. महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, बीएसएनएल, वाहतुकीसंबंधित सेवाभावी संस्था यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. या विभागांची नियमित बैठक होऊन वाहतूक आराखड्यावर काम केले जाणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा आराखडा तयार केला जाणार आहे.

२० वर्षांचा आराखडा शहरामध्ये प्रथम टप्प्यात पार्किंग, सिग्नल व्यवस्था व पादचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करण्याबाबत व त्या संबंधित समस्या प्राधान्याने सोडविणेबाबत आदेश देण्यात आले. तसेच शहरातील वाहतुकीचे नियोजन तीन टप्प्यात करून पाच ते १० वर्षांमधील मध्य टप्प्यातील वाहतुकीचे नियोजन व अंतिम टप्प्यात पुढील २० वर्षांच्या कालावधीतील वाहतुकीच्या नियोजन करणेबाबत सूचित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठ्या उद्योगाला अध्यक्षपदाची संधी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या नूतन अध्यक्षपदी मोठ्या उद्योगातील कार्यकारी कमिटी सदस्याला संधी मिळणार आहे. यामध्ये इप्कॉसचे हरिशंकर बॅनर्जी व सिमेन्स कंपनीचे दीपक कुलकर्णी यांच्यापैकी एका नावावर लवकरच शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती 'निमा'चे विद्यमान अध्यक्ष संजीव नारंग यांनी 'मटा'ला दिली.

येत्या रविवारी (दि. ३१) 'निमा'च्या सर्वसाधारण सभेत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा होणार आहे. त्यानंतर निवड आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 'निमा'च्या नवीन अध्यक्षपदाची नावे जाहीर केली जाणार आहे, असे विद्यमान अध्यक्ष संजीव नारंग यांनी सांगितले. 'निमा'ची निवडणूक बिनविरोध झाल्याने आता अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यांची उद्योजकांसह कामगारांनाही उत्सुकता लागलेली आहे.

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच सरकारी व निमसरकारी कार्यालयाकडे पाठपुरावा 'निमा' या औद्योगिक संघटनेकडून होत असतो. तसेच उद्योजकांच्या अडचणींबाबत 'निमा'कडून तक्रारींचे निवारण देखील करण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांची हक्काची संघटना म्हणून 'निमा'कडे पाहिले जाते. दरम्यान, 'निमा' निवडणुकीत अनेक चढउतार आल्यानंतर माजी अध्यक्षांच्या मध्यस्तीने बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र, 'निमा'चे अध्यक्ष व उपाध्यक्षपद रिक्त राहिल्याने उद्योजकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते. बिनविरोध करण्यात आलेल्या निवडणुकीत इप्कॉसचे बॅनर्जी व सिमेन्सचे कुलकर्णी यांची मोठे उद्योगातील कार्यकारी कमिटी मेंबरपदी निवड जाहीर करण्यात आली. यामुळे पुढील महिन्यात कमिटी मेंबरच्या बैठकीत बॅनर्जी किंवा कुलकर्णी यांच्यापैकी एकास 'निमा'चे अध्यक्षपद दिले जाणार आहे. तर मोठ्या उद्योगातील उपाध्यक्षपदही दोघांपैकी एकाला मिळणार असल्याचे नारंग यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी सरकारचे मोबाइल अॅप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्याधुनिकतेची कास धरत आता खड्ड्यांचया तक्रारीसाठी मोबाइल अॅप उपलब्ध करुन दिले आहे. 'महाराष्ट्र पीडब्ल्यूडी सिटीझन कनेक्ट'या अॅपवर रस्त्यातील खड्ड्यांची तक्रार करता येणार आहे. नाशिक शहरात स्मार्ट सिटी अॅपद्वारे सर्वसामान्यांना नागरी समस्यांची तक्रार करण्याची सुविधा मिळाली आहे. मात्र, जिल्ह्यातील रस्त्यांची तक्रार कोणाकडे करावी व प्रशासनाचे लक्ष कसे वेधावे हा प्रश्नही नेहमीच सर्वसामान्यांना पडतो. याची दखल घेत बांधकाम विभागाने आता स्मार्टफोनधारकांसाठी अॅप उपलब्ध करुन दिले आहे. हे अॅप आता सर्वांना उपयोगी पडणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली आहेत तर उर्वरीत ग्रामीण भागाचे रस्ते आता जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याची पावसाळी कामात सर्व रस्त्यांची डागडुजी केल्याचा दावा केला होता. तरीही अनेक तक्रारी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत्या. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग फारसे गांभीर्याने घेत नव्हते. पण या नव्या अॅपमुळे सर्व सामान्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या अॅपमुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढणार असून त्यांचा खोटारडेपणाही उघड होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या अॅपची माहिती वर्षभरापूर्वीच विकसित केले आहे. मात्र, त्याचा प्रचार प्रसार झाला नाही. हे अॅप आतापर्यंत केवळ ५० जणांनीच डाऊनलोड केल्याचे गुगल प्ले स्टोअरवर दिसून येते. या अॅपबाबत सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी या अॅपबाबत जाहिरात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक मंत्री चंद्रकांत पाटील यांना अखेर जाहीर करावे लागले आहे. काय आहे अॅप 'खड्डेमुक्त महाराष्ट्र' नावाने असलेला हा अॅप प्ले स्टोअर मधून अपलोड केल्यानंतर त्यावर आपल्याला खड्ड्यांबद्दल तक्रार करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिवचन असेही या अॅपमध्ये लिहिल्यामुळे आता तक्रार केल्यानंतर त्याता कसा साद-प्रतिसाद मिळतो हे कळणार आहे. खड्ड्याचा फोटो काढल्यानंतर तो या अॅपवर सहज पाठवता येईल. त्याशिवाय जीपीएसद्वारे हा खड्डा रस्त्यात नक्की कुठे आहे, याची निश्चितीही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकर्स दराबाबत पुनर्विचार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहर फेरीवाला धोरणासंदर्भात महासभेचा ठराव प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यात लॉटरी पद्धतीने साडेनऊ हजार फेरीवाल्यांना जागांचे वाटप करण्यासह शहरातील भाजी विक्रेत्यांचे स्वतंत्र पुनर्वसन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच फेरीवाला संघटनांनी हॉकर्स दराबाबत घेतलेला आक्षेप समितीने मान्य केला असून, दराबाबत पुनर्रचनेचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना दिलासा मिळणार आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला धोरण समितीची बैठक झाली. त्यात उपायुक्त दत्तात्रय गोत‌िसे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. महासभेने नुकतीच शहर फेरीवाला धोरणाला मंजुरी दिली आहे. शहरात १६५ फेरीवाला क्षेत्रे, तर ८३ प्रतिबंध‌ित फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. या सर्वांना पालिकेच्या वतीने बसण्यासाठी स्वतंत्र जागा दिली जाणार आहे. त्याचे दरही निश्चित करण्यात आले असून, पुणे पालिकेने ठरविलेल्या दरापेक्षा निम्मे दर आकारण्यात आले आहेत. त्यात क्षेत्रनिहाय १०० रु., ५० रु.,१५ रु.,५ रुपये असे प्रतिदिन दर आकारण्यात आले आहेत. परंतु, फेरीवाल्यांनी या दरावरच आक्षेप घेत ते कमी करण्याची मागणी केली आहे. फेरिवाला धोरण समितीच्या बैठकीत प्रथम महासभेचा ठराव प्राप्त होताच फेरीवाल्यांना लॉटरी पद्धतीने त्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेरीवाल्यांचे प्रबोधन करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच विस्कळीत स्वरूपात असलेल्या भाजी विक्रेत्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. सोबतच फेरीवाल्यांच्या दरासंदर्भातील अप‌िल मान्य करण्यात आले आहे. दर कमी करण्याबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी सदस्यांना दिले. तसेच पहिल्या टप्प्यात प्रतिबंधित फेरीवाला क्षेत्रे रिकामी केली जाणार आहेत. त्यामुळे फेरीवाला धोरणामागील शुक्लकाष्ट संपण्याची चिन्हे असून, धोरण मार्गी लागल्यास वाहतुकीचा प्रश्नही निकाली निघणार आहे. संघटनांचे निवेदन शहरात मेनरोड परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे अनेक हॉकर्सचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मेनरोड परिसरात व्यावसायिकांवर गदा येत आहे. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमण काढण्यापूर्वी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना हॉकर्स यूनियनचे महानगर प्रमुख नीलेश कुसमोडे यांच्या नेतृत्वाखाली व्यावसायिकांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मेनरोड परिसरात २५० कुटुंबे छोटे व्यवसाय करत असून, या अतिक्रमण मोह‌िमेमुळे रस्त्यावर येणार आहोत, असे त्यात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओझरहून आता औषधांची निर्यात

$
0
0

bhavesh.brahmankar @timesgroup.com

नाशिक ः ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणाहून बकऱ्यांची आखातात यशस्वी निर्यात झाल्यानंतर आता औषधांची निर्यात होणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. ही निर्यात येत्या एक ते दीड महिन्यात होण्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नाशिक शहरालगत हिन्दुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) जागेत नाशिक विमानतळ साकारण्यात आले आहे. याच ठिकाणी कॉनकॉर आणि एचएएल यांच्या संयुक्त विद्यमाने हॅलकॉन या कंपनीद्वारे कार्गो सेवा विकसित करण्यात आली आहे. २०११पासून ही सेवा कार्यरत आहे. ओझरहून थेट विमानाद्वारे निर्यात करण्यात अनेक अडचणी असल्याने ओझरच्या कार्गो कॉम्प्लेक्समधून निर्यातीचे सर्व सोपस्कार पार पाडले जातात. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या ठिकाणाहून देशासह परदेशात मालवाहतूक केली जाते. हॅलकॉनने गेल्या दोन वर्षांत ६५० टन कृषीमालाची निर्यात मुंबईहून केली आहे. तसेच, गेल्या वर्षभरात ३५०० कंटनेर औद्योगिक उत्पादनांची निर्यात केली आहे. आता ओझर येथून कार्गो विमानाद्वारे बकऱ्यांची थेट शारजाह येथे निर्यात करण्यात आली आहे. दोन कार्गो विमानाद्वारे एकूण ३३२६ बकऱ्यांची निर्यात झाली आहे. येत्या ऑगस्टअखेरपर्यंत आणखी ९ कार्गो विमानांद्वारे बकऱ्यांची निर्यात केली जाणार आहे. थेट परदेशात सुरू झालेली ही निर्यात ओझरच्या कार्गो कॉम्प्लेक्सला नवसंजीवनी देणारी ठरली आहे. त्यामुळेच निर्यातदारांचे लक्ष ओझरकडे वळत आहे. परिणामी, हॅलकॉनच्या ओझर येथील ऑफिसमध्ये विविध प्रकारच्या चौकशी सुरु झाल्या आहेत. बकऱ्यांनंतर आता ओझरहून औषधांची निर्यात होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सिन्नर येथे मायलॅन ही बहुराष्ट्रीय औषध उत्पादक कंपनी आहे. या कंपनीची सर्व उत्पादने परदेशात विक्री होतात. मुंबईहून ही उत्पादने जगाच्या विविध भागात निर्यात केली जातात. सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेली ग्लॅक्सो स्मिथक्लाइन हीसुद्धा बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीची उत्पादने देशाच्या विविध भागांसह आशिया खंडातील अनेक देशांमध्ये निर्यात होतात. त्याशिवाय नाशिक शहर परिसरात ब्ल्यू क्रॉस, ग्लेनमार्क, लिगा फार्मा, मेगा फाइन, कॉक्स रिसर्च, मेगा फॉर्च्युन, रॅँक फार्मा, बिनी लॅबोरेटरीज, डाबर, सेम केअर फार्मा, मृणालिनी हर्बल्स आदी कंपन्या आहेत. लहान-मोठ्या १०० च्या आसपास औषधी कंपन्या नाशिक शहर परिसरात आहेत. या कंपन्यांची नानाविध उत्पादने देशांतर्गत आणि परदेशी बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. यातीलच काही उत्पादने ओझरहून निर्यात होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात काही कंपन्यांनी विचारणा केली असून त्यासंदर्भातील पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांचा यंदा दिलासा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने मूर्तीकारांकडे कामाची लगबग सुरू झाली आहे. यंदा मूर्तींचे भाव वाढणार नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे काम वर्षभर सुरू असते. मात्र, कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती डिसेंबर- जानेवारीपासूनच. याच कालावधीत मिळालेल्या ऑर्डरनुसार कामाला सुरुवात होते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांनंतर दसऱ्यापर्यंत मूर्तिकारांच्या कामाला विश्रांती असते. त्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर हत्यारांचे व मातीचे पूजन करुन गणेश मूर्ती आकाराला येतात. सुरुवातीला मागील वर्षीच्या मूर्तींचा आढावा घेऊन यंदाच्या वर्षात कोणत्या डिझाइन्स तयार करता येतील, याचा प्रथम विचार केला जातो. मागील वर्षीच्या मूर्तींमध्ये बदल करुन व ग्राहकांची आवडनिवड लक्षात घेता कच्चे ड्रॉइंग तयार केले जाते. त्यानंतर मातीची मूर्ती साकारुन त्यावर साचे तयार केले जातात व त्यापासून असंख्य मूर्ती आकाराला येतात. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राह‌िले आहेत. ५ सप्टेंबरला गणपती बसणार आहेत. अनेक ग्राहकांनी आपल्या ऑर्डर आधीच बुक करुन ठेवल्या आहेत. मूर्तीकारांनी काम हातावेगळे केले असून रंगकामाला सुरुवात केली आहे. यावर चढवला जाणारा सोनेरी व चांदीचा रंग मात्र दोन ते तीन दिवस आधी दिला जातो. त्यावर अभ्रक असल्याने ते उडून जाते म्हणून ही प्रक्रीया उशिरा सुरू होते. दरम्यान, अनेक मूर्तिकारांनी मूर्तीला कुठलेही ओंगाळवाणे रुप न देता पारंपरिक शैलीतील मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. राजस्थानातून येणाऱ्या मूर्ती विच‌ित्र असल्याने ग्राहकांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली आहे.

यंदा हा ट्रेंड यंदा संगीत गणपती, व्हॉयोल‌िन वाजवणारा गणपती, नगारा वाजवणारा गणपती, उंदरावर आरुढ असलेला गणपती, सत्यविनायक, लक्ष्मी कुबेर (कमळात बसलेला) पेण पद्मासन, दगडूशेठ, टिटवाळा, पगडी फेटा, वेलिग मास्तर गणपती, शास्त्रानुसार गणपती आदी प्रकारच्या मूर्ती तयार आहेत.

यंदा पाऊस चांगला झाल्याने मूर्तींच्या किमती आटोक्यात आहेत. नेहमीपेक्षा चांगल्या डिझाइन्स तयार केल्या असून, शास्त्रोक्त मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. - शांताराम मोरे, मूर्तिकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा लिलाव ठप्प; शेतकरी रस्त्यावर

$
0
0

गोणीत कांदा आणण्यास शेतकऱ्यांचा विरोध; बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

टीम मटा

नियमनमुक्ती धोरणामुळे निर्माण झालेला कांदा लिलावाचा तिढा चिघळतच चालला आहे. त्यातच कांदा गोणीत आणावा, अशी आडमुठी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर शेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे बुधवारी नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, येवला, झोडगे, मुंगसे, उमराणे बाजार समितीत लिलाव सुरळीत होऊ शकले नाहीत. गोणी पद्धतीने कांदा लिलाव नको, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. यामुळे शेतकरी-व्यापारी असा संघर्ष निर्माण झाला आहे.

कळवणला सर्वपक्षीय रास्ता रोको

कळवण ः गोणी पध्दतीऐवजी बाजार समित्यांमध्ये जुन्याच प्रचलित पध्दतीनेच विना आडत कांद्याचे लिलाव त्वरित सुरू करावेत, अशी स्पष्ट भूमिका घेत सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी कळवण बसस्थानकासमोर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाला कायदेशीर अडचण ठरवत आंदोलनकर्त्या सर्व शेतकऱ्यांना कळवण पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले. दरम्यान, या प्रश्नी आज कळवण बंदची हाक देण्यात आली आहे.

बाजार समितीमध्ये गोणी पद्धतीच्या कांदा खरेदीला मंगळवारी सुरुवात झाली होती. मात्र सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी त्यास विरोध दर्शवत व्यापारी संघटनेचा निषेध नोंदवत बुधवारी सकाळी ११ वाजेपासून कळवण बस स्थानकासमोर तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे कळवण-देवळा व कळवण-नाशिक रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार कैलास चावडे, कळवण बाजार समितीचे सचिव रवींद्र हिरे, सहाय्यक निबंधक प्रकाश देवरे, पोलिस निरीक्षक सुजय घाडगे यांना निवेदन दिले. या आंदोलनासाठी आमदार जे. पी. गावित यांनी हजेरी लावत या गंभीर प्रश्नावर आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत व विधानसभेत हा प्रश्न मांडणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देवीदास पवार, शिवसेनेचे नेते कारभारी आहेर, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राजेंद्र भामरे, हेमंत पाटील, संजय वाघ, शैलेश पवार, प्रभाकर पाटील, भाई दादाजी पाटील, शांताराम जाधव आदींनी मनोगत व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. या आंदोलनाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, रवींद्र देवरे, नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, उपसभापती संजय पवार, सुधाकर पगार, निंबा पगार, मोतीराम पगार, साहेबराव पगार, संभाजी पवार, किशोर पवार, प्रवीण रौंदळ, अतुल पगार, प्रदीप पगार, जितेंद्र पगार, भाऊसाहेब पवार, संतोष देशमुख, भरत शिंदे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

सटाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

सटाणा ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांचे लिलाव पूर्णत: बदं असल्याने कांदा व भुसार मालाचे व्यवहार ठप्प झाले आहेत. कांदा सडू लागल्याने, तसेच गोणी पध्दतीला शेतकऱ्यांचा विरोध असल्याने सटाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कचेरीच्या आवारात मोफत कांदा वाटप करण्यात आला. लवकरात लवकर प्रचलित लिलाव सुरू करावा, या मागणीचे निवेदनदेखील तहसीलदार सुनील सैंदाणे यांना देण्यात आले.

बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुका कार्याध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा कांदा सडू लागल्याने कांदा उत्पादकांच्या माध्यमातून तहसील कचेरीच्या प्रांगणात मोफत कांदा वाटप करण्यात आला. शेतमाल विक्रीची समांतर व्यवस्था उभारून कांदा व भुसार मालाचे विक्री व्यवहार तत्काळ सुरू करावेत, अन्यथा शेतकरी मालाचे ट्रॅक्टर्स भरून तहसील आवारात उभे करतील, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिभाऊ सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडूरंग सोनवणे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी संरपच संजय पवार, गटनेते काका रौंदळ, जे. डी. पवार, काकाजी सोनवणे, सुभाष सोनवणे, केशव सोनवणे, मयूर अहिरे, आप्पा पाटील, प्रसाद दळवी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मुंगसे, उमराणेत लिलाव ठप्प

मालेगाव ः नियमनमुक्ती धोरणामुळे निर्माण झालेला कांदा लिलावाचा तिढा अद्यापदेखील कायम आहे. मालेगाव बाजार समितीच्या झोडगे, मुंगसे कांदा खरेदी केंद्र, तसेच उमराणे बाजार समितीत बुधवारीदेखील लिलाव सुरळीत होऊ शकले नाहीत. गोणी पद्धतीने कांदा लिलाव नको, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. यामुळे बुधवारी बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला.

मंगळवारी उमराणे बाजार समिती आवारात संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता, तर मुंगसे येथे देखील लिलाव बंदच राहिला. बुधवारीदेखील या दोन्ही ठिकाणी कांदा लिलाव सुरळीत होऊ शकला नाही. एरवी दोन ते तीन हजार क्विंटल आवक होणाऱ्या मुंगेस खरेदी विक्री केंद्रात बुधवारी अत्यल्प तीस क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती बाजार समिती सचिव अशोक देसले यांनी दिली.

आमदार चव्हाण यांनी मांडला स्थगन प्रस्ताव

सटाणा ः कांदा गोणीत कांदा आणला तरच लिलावात सहभागी होऊ, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, यावर शासनाने तातडीने तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी आमदार दीपिका चव्हाण यांनी बुधवारी विधीमंडळात स्थगन प्रस्ताव मांडला.

कांदाप्रश्नांची दखल घेत आमदार दीपिका चव्हाण यांनी विधीमंडळाच्या स्थगन प्रस्तावाप्रसंगी आपली भूमिका विषद करताना स्पष्ट केले की, शेतीमाल नियमनमुक्त करण्याच्या अध्यादेशाविरुद्ध व्यापाऱ्यांनी महिनाभरापासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

मंत्रालयस्तरावर पणन मंत्र्यांसमवेत बैठका होऊन देखील व्यापाऱ्यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. कांदा गोणीत भरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने शासनाने तातडीने या संदर्भात महत्त्वपूर्ण तोडगा काढण्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनातिकीट रेल्वेप्रवास पडला महागात

$
0
0

रेल्वे प्रशासनाची प्रवाशांवर कारवाई

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वे गाड्यांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांच्या विरोधात रेल्वे प्रशासनाने धडक मोहीम उघडली आहे. मनमाडचे वाणिज्य निरीक्षक अनिल बागले यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तब्बल ४०९ फुकट्यांवर दंडात्मक कारवाई करून एक लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईचे स्वागत होत आहे.

मनमाड-नाशिक दरम्यान पंचवटी व कुर्ला एक्स्प्रेससह पवन एक्स्प्रेसमध्येही कारवाई सुरू असून, या मोहिमेने फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रेल्वेला आर्थिक फटका बसत असल्याचे स्पष्ट झाल्याने भुसावळ मंडळ व मनमाड वाणिज्य विभाग यांच्या वतीने विनातिकीट प्रवासी धडक मोहीम उघडण्यात आली आहे.

वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक सुनील मिश्रा, सहायक निरीक्षक अजयकुमार यांनी याबाबत विशेष दल गठीत केले. मनमाड वाणिज्य निरीक्षक अनिल बागले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक विनातिकीट प्रवाशांचा शोध घेऊन दंडात्मक कारवाई करीत असून, बुधवारपर्यंत एक लाख ३६ हजार रुपयांची दंडवसुली झाली आहे. ही धडक कारवाई चर्चेचा विषय बनली आहे.

फुकट्या प्रवाशांना शोधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू असल्याने रेल्वेने प्रवास करणारे प्रवाशी तिकीट काढण्याबाबत जागरूक होतील, अशी अपेक्षा आहे. आरक्षित डब्यात बसणाऱ्या अनारक्षित प्रवासी वर्गावर ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे रेल्वेचे उत्पन्न चांगले वाढले आहे.

- अनिल बागले, वाणिज्य निरीक्षक, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांनी’ काकडी फेकली थेट घंटागाडीत!

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी दुपारच्या लिलावासाठी आलेल्या काकडीचे भाव कोसळले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी काकडी थेट घंटागाडीत फेकल्याचा प्रकार घडला. काढणीपासून ते बाजारात काकडी आणण्यापर्यंत आलेला खर्चही भरून निघत नसल्याने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी असे पाऊल उचलले. गेल्या आठवड्यात ४०० रुपये प्रती क्रेट अशा भाव असलेली काकडी ४० रुपये प्रती क्रेट भावात विकली गेली. एका क्रेटमध्ये ४० किलो काकडी मावते. म्हणजेच ४० रुपये दराने काकडीला प्रतिकिलो निव्वळ दोन रुपये भाव मिळाला.

नाशिक बाजार समितीत रोज सुमारे ४०० ते ५०० क्रेट काकडीची आवक होते. बुधवारी ही आवक दुपट्टीने वाढली. व्यापाऱ्यांना आडत द्यावी लागत आहे तेव्हापासून भाजीपाल्याच्या लिलाव चढ्या दराने होत नाहीत. बुधवारच्या लिलावात संगमनेर, अकोला येथून काकडीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि अचानक भाव कोसळले. काही शेतकऱ्यांना तर शेतापासून बाजारापर्यंत काकडी आणण्यासाठी आलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे त्यांनी काकडी बाजार समितीमध्ये आणून कोणताही फायदा झालेला नाही. त्यांनी बाजार समितीत आलेल्या घंटागाडी काकडी फेकून दिली.

असा आला खर्च अकोला येथून आलेल्या एका शेतकऱ्याला प्रति क्रेट ३० रुपये वाहतुकीची खर्च, १० रुपये प्रति क्रेट तोडण्याचा खर्च, दोन रुपये हमाली असा खर्च आला. त्याने आणलेल्या सात क्रेटला प्रती क्रेट ४२ रुपये खर्च आला. काकडी विकून प्रती क्रेट ५५ रुपये मिळाले. अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्याने जगायचे कसे, असे म्हणत त्याचे डोळे पाणावले.

काकडीच्या बियाण्यांच्या खरेदीपासून ते बाजारात विक्रीस आणण्यापर्यंत प्रती किलो कमीत कमी १० रुपये खर्च येतो. एक क्रेट २० किलो पेक्षा जास्त वजनाचे असते. म्हणजे क्रेट मागे १०० रुपये खर्च आहे. ती काकडी केवळ ५० रुपये प्रती क्रेट अशी विकली गेली. खर्च जास्त आणि भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांवर काकडी फेकून देण्याची वेळ आली.

- राजाराम तुपे, शेतकरी, सिन्नर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images