Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रमजान काळात ‌प्रशासकीय विभागांनी समन्वय राखावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

रमजान महिन्याच्या काळात मालेगाव शहरातील मुस्लिम बांधवांचे अनेक धार्मिक विधी संपन्न होतात. त्या अनुषंगाने या काळात वीज मंडळाकडून भारनियम करू नये. वीज पुरवठा खंडित करण्यासंबंधी पूर्वसूचना द्याव्यात तसेच शहरातील सर्व प्रशासकीय विभागांनी मनपाच्या २४ तास कार्यान्वित असणाऱ्या आपत्ती नियंत्रण कक्षाशी समन्वय राखावा, अशा सूचना प्रांताधिकारी अजय मोरे यांनी दिल्या. ते रमजान पर्वाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

शहरातील शासकीय विश्रामगूहात नुकतीच ही बैठक पार पडली. या बैठकीत मनपा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वीजवितरण, शहर वाहतूक व पोलिस, अग्निशामक दल आदि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रांताधिकारी मोरे यांनी सर्व विभागांनी शहरातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी दक्ष राहावे, अशा सूचना दिल्या.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी रमजान काळात शहर वाहतूक तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तर मनपा उपायुक्त राजेंद्र फातले यांनी शहर स्वच्छता कामांचा आढावा घेतला.

या पवित्र रमजान काळात शहरातील अग्निशामक दलदेखील तत्पर राहील, असे अधीक्षक संजय पवार यांनी यावेळी संगितले. बैठकीस तहसीलदार सुरेश कोळी, आरटीओ नानासाहेब बच्छाव, सुभाष गीते, राहुल पाटील तसेच अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूषित पाणीपुरवठा; अतिसाराची लागण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे पिण्याच्या पाण्याच्या दूषित पुरवठ्यामुळे शेकडो ग्रामस्थांना अतिसाराचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबात वेळीच खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने उश‌िरा का होईना याकडे लक्ष देत परिस्थिती नियत्रंणात आली आहे. यावर खबरदारी म्हणून विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत.
जायखेडा येथे नुकतेच हरणबारी धरणातील पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. या पाण्याबरोबरच नदीत टाकलेला केरकचरा, मेलेली जनावरे व इतर घाणीमुळे हे पाणी दूषित झाले. तसेच सार्वजनिक विहीर नदीकाठी असल्याने हे दूषित पाणी विहिरीत मुरले, असा अंदाज व्यक्त होत आहे. यावर ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेता हे पाणी गावात पिण्यासाठी सोडले. त्याचाच विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन अतिसाराचा त्रास झाला. गावातील असंख्य रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत सूचना केल्यात. यावेळी जिल्हा परिषदेचे सुरेश जाधव, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, डॉ. साखरे उपस्थित होते.
दीर्घकालीन योजनेची मागणी

आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात १३९ रुग्णांवर उपचार केले असून अनेकजण खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. सबंधित यंत्रणेने वेळीच खबरदारी घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे. पावसाळा लक्षात घेता पुढील अनर्थ टाळण्यासाठी दीर्घकालीन अशी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळेगाव एमआयडीसीचा पाण्यासाठी टाहो

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

माळेगाव औद्योगिक वसाहतीत १०० टक्के पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे अनेक उद्योग बंद पडत आहेत. त्यामुळे उत्पादनाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले आहे. उद्योगात करोडोंचे नुकसान होत असून उद्योगासाठी नव्हे तर पिण्यासाठी तरी पाणी द्यावे, अशी मागणी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाण्याअभावी फूड, फार्मा, डेअरीसारखे नाशवंत पदार्थांचे करोडोंचे नुकसान होत असून ५० उद्योगांनी पाण्याअभावी उत्पादन कमी केले आहे. यात एमआयडीसीतील ७० उद्योगांचे उत्पादन बंद होण्याच्या मार्गावर आहे. येथील नागरिकांसाठी किमान १६ दलघफू रोज पाण्याची आवश्यकता असून किमान तेवढे पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. एमआयडीसीकडून पिण्याचे पाणी दिले जात नसल्याने उद्योजकांना टँकरद्वारे व्यवस्था करावी लागत आहे. परंतु या पाण्याने कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

उद्योगांना पिण्यासाठी पाणी न दिल्यास नाशिक-पुणे महामार्ग रोखण्याबरोबरच जलकुंभाला टाळे लावण्याचा इशारा उद्योजकांनी या निवेदनात दिला आहे. निवेदन देतेवळी निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष अरुण चव्हाणके, आशिष नहार, सुधीर बडगुजर, किरण खाबिया, संदीप भदाणे, योगेश मोरे, एम. जी. कुलकर्णी आदी उद्योजक सहभागी झाले होते.

उद्योगांना घरघर

माळेगाव औद्योगिक वसाहतीत एक हजार उद्योग असून त्यापैकी २०० उद्योग पूर्ण पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या ५० उद्योगांनी पाण्याअभावी उत्पादन कमी केले असून ७० उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच या औद्योगिक वसाहतीतील कामगार, अधिकाऱ्यांची तहान केवळ ४० टँकरवर कशी भागणार, हाही प्रश्न आहे. काही उद्योजकांना पाणीच मिळत नाही, तर खासगी टँकरसाठी रोज तीन ते चार हजार रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने हा खर्च उद्योगांना परवडणारा नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीबाबतचा फैसला १६ जूनला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतल्या दुसऱ्या टप्प्यासाठी २५ जूनपर्यंत नाशिक महापालिकेला प्रस्ताव सादर करायचा आहे. त्यासाठी नव्याने प्रस्ताव सादर करावा लागणार असून या प्रस्तावाला महासभेची मान्यता आवश्यक आहे. विशेषतः एसपीव्हीच्या अटीशर्ती या अजूनही सत्ताधाऱ्यांना जाचक वाटत असल्याने स्मार्टच्या प्रस्तावाला अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीसोबतच हॉकर्स झोन, खुल्या मैदानांच्या धोरणावरही निर्णय घेतला जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश हुकल्यानंतर पालिकेने आता दुसऱ्या टप्प्यात नाशिकच्या निवडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या प्रस्तावात अनेक बदल करण्यात आले असून गोदावरी रिव्हर फ्रंट योजनेचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रस्ताव येत्या २५ जूनपूर्वी सादर करायचा आहे. त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. नव्याने प्रस्ताव दाखल करण्यासाठी महासभेची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने पुन्हा प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्यासाठी १६ जून रोजी महासभा आयोज‌ित करण्यात आली आहे. एसपीव्हीचे अध्यक्षपद हे आयुक्तांऐवजी सचिवांकडे जाणार आहे. मात्र, अध्यक्ष हा महापौर असावा अशी लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे. त्यामुळे एसपीव्हीच्या मुद्द्यावर पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा फैसला आता महासभेच्या हाती आहे. या प्रस्तावासोबतच हॉकर्सझोन आणि खुल्या मैदानांच्या धोरणात्मक विषयांवरही निर्णय होणार आहे.

घंटागाडी निव‌िदा आज उघडणार

सुप्रीम कोर्टाच्या वकिलांच्या सल्ल्यानंतर महापालिकेने घंटागाडीच्या निविदा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी निविदा उघड केल्या जाणार आहेत. त्यामुळे घंटागाडीचे ठेकेदार कोण आहेत, याची स्पष्टता होणार आहे. घंटागाडीसाठी २७ ठेकेदार पात्र ठरले आहेत. परंतु, काळ्या यादीतील ठेकेदारांवरून गेल्या दोन महिन्यापासून ही प्रक्रिया रखडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डवलेंनी राखले चौकशीपासून अंतर

$
0
0


vinod.patil@timesgroup.com

नाशिक : आदिवासी विकास विभागातील कोट्यवधीच्या भ्रष्टाचारामुळे वादग्रस्त ठरलेल्या नोकरभरती प्रकरणाच्या चौकशीपासून आता विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी अंतर राखले आहे. विभागातील दुष्काळाच्या स्थितीमुळे वेळ नसल्याचे कारण देत डवले यांनी आपण चौकशी करणार नसल्याचे पत्रच आदिवासी सचिवांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे तीनशे कोटीच्या घोटाळ्याची वादग्रस्त भरती प्रकरणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

आदिवासी विकास महामंडळ व शबरी वित्त विकास महामंडाळात नोकरभरती करताना जवळपास तीनशे कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचेच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला होता. तर मुख्यमंत्र्यांची भेट घेवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यानी आदिवासी विभागाला चौकशीचे दिले होते. त्यानुसार २७ एप्र‌िल रोजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी विभागीय आयुक्तांमार्फत तीन महिन्यात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील आदेशही आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांनी काढले होते.

सचिवांच्या या आदेशाला आता एक महिना लोटला आहे; परंतु अद्यापही डवले यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली नाही. दुष्काळाचे कारण दाखवत त्यांनी आता थेट चौकशीलाच नकार दिला आहे. या भरतीप्रकरणात आतापर्यंत पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलबंन झाले आहे. त्यामुळे वाद नको म्हणून डवलेंनी अंतर राखले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बड्या माशांमुळे अंतर

या भरतीशी संबधीत एका महाव्यवस्थापकासह तब्बल पाच अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. तर व्यवस्थापकीय संचालक बाज‌ीराव जाधव यांची बदली झाली असून, लोकप्रतिनिधींचाही यात सहभाग आहे. या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी असून चौकशीला अधिक वेळ लागणार आहे. या घोटाळ्यात बडे मासे असल्याने वाद ओढावून घेण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला अधिकार पुढे येत नसल्याची चर्चा विभागात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’चे वस्तुसंग्रहालय घडविते नाशिकदर्शन!

$
0
0

नाशिकच्या सांस्कृतिक जडणघडणीच्या प्रवासातील मैलाचा दगड म्हणजे सार्वजनिक वाचनालय. सुमारे पावणे दोनशे वर्षांचा इतिहास असलेली 'सावाना' ही संस्था वाचकांची ज्ञानरूपी तहान भागविण्यात नेहमीच अग्रेसर असते. पण 'सावाना'चा हा प्रयत्न येथेच थांबलेला नाही, तर 'सावाना'चे ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय या शहराचा इतिहास केवळ उलगडतच नाही तर नाशिकदर्शनही घडविते. 'महाराष्ट्र टाइम्स' नाशिक आवृत्तीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त नाशिककरांसाठी हेरिटेज वॉकच्या माध्यमातून शुक्रवारी, (दि. १०) सायंकाळी ६ वाजता सावानाच्या वस्तुसंग्रहालयाची भेट आयोजित केली आहे.

'सावाना'च्या वस्तुसंग्रहालयातील अमुल्य खजिना नाशिककरांना नेहमीच भुरळ घालतो. काळ्या पाषाणातील अच्युताची चतुर्भुज मूर्ती, चक्र, शंख घेतलेला विष्णू व चित्र, शिल्प, शस्त्र, लेखन साहित्य व ऐतिहासिक वस्तूंनी भरलेले हे दालन पाहताना थक्क होते. नाशिकमधील चित्रकारांच्या कुंचल्यांमधून साकारलेले नाशिकचे दर्शनही चित्रांच्या गॅलरीतून घेता येते. पेशवाईतील नाशिक रागमाला नावाने प्रसिद्ध असलेली चित्रमालाही पहायला मिळते. काचचित्रे, शस्त्र, नाणी अन् विविध प्रकारच्या मूर्ती हा तर वस्तुसंग्रहालयाची जान आहे. ३३ प्रकारच्या गणपतीच्या ३३ मूर्तींचा एक अनोखा सोहळा बापट दालनात अनुभवायला मिळतो.

'सावाना' वाचकांचा नव्हे तर इतिहासप्रेमी व संशोधकांचीही तहान भागवित आहे. असे समृद्ध वस्तुसंग्रहालय इतर कुठेही नाही. येथे दुर्मिळ पोथ्यांचेही संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात. हे वस्तुसंग्रहालय पाहणे हा वेगळा सोहळा असतो. - जयप्रकाश जातेगावकर, सचिव, सावाना वस्तुसंग्रहालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे महापालिकेवर बरखास्तीची तलवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

धुळे महानगरपालिकेतील नगसेवकांचे भोगवटा प्रमाणपत्र, अतिक्रमण, काही वर्षांपूर्वी झालेल्या बोगस कामांच्या रेकॉर्डची तपासणी पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रांचे दप्तर घेवून आयुक्त डॉ. नामदेव भोसले मुंबईला रवाना झाले आहेत. ते तपासणीचा अहवाल नगरविकास विभागाकडे सादर करणार असून, या सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर मनपा बरखास्त होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्यावर अविश्वासचा ठराव आणला आहे. हा ठराव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतरही आयुक्तांनी मागे न हटता स्फूर्तीने काम सुरू केले आणि नगरसेवकांना अडचणीत आणण्यासाठी जुन्या प्रलंबित प्रकरणी चौकशी करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून उपायुक्त, सहायक आयुक्त, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांनी गेल्या काही वर्षांतील बोगस कामांच्या कागदपत्रांची तपासणी केली. नगरसेवकांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रात दिलेला पत्ता, त्यांच्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र आहे किंवा नाही तसेच मनपाच्या नोटिसांवर केलेले खुलासे, बोगस कामांची पूर्वी निघालेली बिले, क्षेत्रसभा व अन्य वादग्रस्त प्रकरणांची माहिती संकलित करण्यात आली.

या कागदपत्रांचे दप्तर घेऊन आयुक्त डॉ. भोसले नुकतेच मुंबईला रवाना झाले आहेत. ते नगरविकास विभागाकडे कागदपत्रे तपासणीचा अहवाल सादर करणार असून, मनपा बरखास्त करण्याची शिफारस केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस प्रवासात दागिन्यांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहर बसमधून प्रवास करत असलेल्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना जुना आडगाव नाका भागात घडली. पर्समध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे ७१ हजार रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी ओमकारनगर येथील सागरमल रो हाऊस येथे राहणाऱ्या जयश्री गोरक्षनाथ देशमुख (४६) यांनी पंचवटी पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलिसांनी चार महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी देशमुख बाहेरगावी गेल्या होत्या. परत येत असताना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या सीबीएस आडगाव-बसमधून प्रवास करीत असताना ही घटना घडली. जुना आडगाव नाका येथे बसमधून उतरत असताना दरवाजात बसलेल्या चार अज्ञात महिलांपैकी कोणीतरी त्यांच्या हातातील पिशवीतून पर्स चोरून नेली. अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.
डीजेची चोरी पंचवटी महाविद्यालय परिसरात पार्क केलेल्या वाहनातील डीजे चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अमरधाम रोडवरील बाबा चौकात राहणाऱ्या सुयोग कमलाकर भुसे बुधवारी सायंकाळी कार्यक्रम आटोपून परतले होते. त्यांनी आपल्या ताब्यातील डीजे वाहन पंचवटी कॉलेज परिसरातील नारायण गुरूद्वाराजवळ पार्क केले. काही कामानिमित्त दुसरीकडे गेले असता चोरट्यांनी वाहनातील दोन स्पिकर, अॅम्प्लिफायर, फोनिक मिक्सर व लॅपटॉप असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रोकड लांबवली बँकेतून सुट्टे पैसे घेऊन जाणाऱ्या भविष्य निर्वाह निधी विभाग कर्मचाऱ्यांच्या हातातील पिशवी पल्सरस्वार भामट्यांनी पळविल्याची घटना उंटवाडी परिसरात घडली. या पिशवीत ३० हजार रुपयांची रोकड होती. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको परिसरातील त्रिमुर्ती चौक येथे राहणारे प्रमोद दत्तात्रेय सोनार पीएफ कार्यालयात काम करतात. सोनार बुधवारी सुट्टे घेण्यासाठी सीबीएस येथील स्टेट बँकेत गेले होते. सुट्टे घेऊन सहकारी मोहन ठोसर यांच्या दुचाकीने ते पुन्हा कार्यालयाकडे येत असताना चोरीची घटना घडली. उंटवाडीतील बीएसएनएल कार्यालयामार्गे हनुमान मंदिराकडून दोघे कर्मचारी दुचाकीवर प्रवास करीत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पल्सर मोटारसायकलवरील दोघांपैकी एकाने सोनार यांच्या हातातील पिशवी हिसकावून पोबारा केला. अधिक तपास पोलिस नाईक क्षीरसागर करीत आहेत.
स्टोव्हचा भडक्याने मृत्यू स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका होऊन गंभीर भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सरला चंदूलाल जाजू (५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. नाशिकरोड भागातील दत्तमंदिर परिसरातील शिवरथ रेस‌िडेन्सी येथे राहणाऱ्या सरला जाजू या बुधवारी रात्री आपल्या घरात स्टोव्हवर स्वयंपाक करीत होत्या. मात्र, स्टोव्हचा भडका उडाल्याने त्या ८० टक्के भाजल्या. कुटुंबियांनी त्यांना तत्काळ नज‌ीकच्या सिटीकेअर हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास जमादार एच. ए. शेख करीत आहेत.
युवती बेपत्ता महाविद्यालयात निकाल घेण्यासाठी गेलेली १९ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची तक्रार इंदिरानगर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. पूजा गौतम दोंदे असे तिचे नाव आहे. पाथर्डी गाव परिसरात राहणारी पूजा मंगळवारी बारावीचा निकाल घेण्यासाठी कॉलेजमध्ये गेली होती. मात्र, अद्याप ती परत आलेली नाही. या घटनेचा अधिक तपास पाठक करीत आहेत.
चाकूधारी गजाआड चाकूच्या सहाय्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकास पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्वप्नील निवृत्ती रणमाळे (२३) असे संशय‌िताचे नाव आहे. पंचवटीतील दत्तनगर परिसरात तो चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंदिरानगरात बँक व्यवहार ठप्प

$
0
0



आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक, गो इंटरनेटवर अवलंबून असतांनाही भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ढिसाळ कारभारामुळे सिडको व इंदिरानगर भागातील बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. बँकांमधून पैसे काढणे किंवा अन्य व्यवहार करणे अत्यंत अवघड झाले असून, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे बँकांचे कर्मचारीसुद्धा हताश झाले असल्याचे दिसून आले.

सिडको व इंदिरानगर भागाचा वाढता विकास लक्षात घेऊन या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकाबरोबरच सहकारी बँकासुद्धा कार्यरत आहेत. सध्या बँकांचे व्यवहार हे इंटरनेटच्या माध्यमातूनच होत असतात. मात्र, दोन दिवसांपासून इंदिरानगर परिसरात 'बीएसएनएल'च्या केबल तुटल्याने सर्वच भागातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली होती. तसेच इंटरनेट सेवासुद्धा बंद झाली. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. परिसरात असलेल्या विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी झाली होती. परंतु, इंटरनेट सेवा ठप्प असल्याने बहुतांश बँक शाखांमध्ये मॅन्युअली काम करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली.

तसेच परिसरातील एटीएमसेवा सुद्धा ठप्प झालेली होती. सोमवारी रात्रीपासून हा प्रकार सुरू असून अद्यापही याबाबतचे काम सुरूच असल्याचे 'बीएसएनएल' च्या वतीने सांगण्यात आले. हे काम सुरळीत होत नाही तोपर्यंत दूरध्वनी आणि पर्यायाने इंटरनेट सेवा सुरूच होवू शकत नसल्याचे 'बीएसएनएल'कडून सांगण्यात आले. मात्र, 'बीएसएनएल'च्या केबल तुटल्यामुळे निर्माण झालेल्या या समस्येमुळे बॅंकांमध्ये येणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

आता स्वीकारणार का जबाबदारी? बिल वेळेत भरले नाही तर थेट दूरध्वनी बंद करणारे 'बीएसएनएल' आता नागरिकांच्या या गैरसोयीची जबाबदारी स्वीकारणार की नाही? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. दोन दिवस उलटल्यानंतरही केबल जोडणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. केबल जोडणी होऊन दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पूर्ववत होऊन बँकांचे कामकाज कधी सुरळीत होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

उड्डाणपुलाखालील केबल उंदरांकडून कुरतडल्या गेल्या आहेत. सोमवारी रात्री हा प्रकार झाल्याचे समजल्यानंतर तातडीने काम सुरू करण्यात आले. उड्डाणपुलाखाली जेसीबीने काम करता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून काम सुरू आहे. - पी. बी. विसपुते, डीजीएम, बीएसएनएल

बँकांचे व्यवहार पूर्णतः इंटरनेटवर अवलंबून आहेत. त्यासाठी बँकांनी सुद्धा पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. इंटरनेट सेवा खंडित झाल्यानंतर 'बीएसएनएल'ने स्वतंत्र डोंगल बँकांना दिले पाहिजे. - सुयोग ताडे, रहिवाशी

इंटरनेट व फोन बंद असल्याने बँकांचे कोणतेही व्यवहार होत नाहीत. ग्राहकांचे हाल होत असल्याचे आमच्याही लक्षात आले आहे, याबाबत 'बीएसएनएल'कडे तक्रारही करण्यात आली. त्यांनी केबल तुटल्याचे सांगितले आहे. - डी. डी. लोखंड, शाखाधिकारी, युनियन बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६९५ रिक्षाचालकांना कायद्याचा हिसका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या ६९५ रिक्षाचालकांना गुरूवारी पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवला. अनेक दिवसांपासून येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिसांना मोठी अडचण येते. रिक्षाचालकांची मुजोरी हा विषय गंभीर असून पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला की संघटना पुढे येऊन बेशिस्त रिक्षाचालकांचा बचाव करतात. गुरूवारी सकाळपासून पोलिसांनी थेट कारवाई केली. शहरातील सर्वच भागात पोलिसांनी चौकाचौकात रिक्षांची तपासणी केली. फ्रंट सीट प्रवासी बसवणे, स्टॅण्ड सोडून रिक्षा उभी करणे, गणवेश परिधान न करणे, वाहनाची कागदपत्रे तसेच परवाना नसणे अशा अनेक कारणांवरून पोलिसांनी तब्बल ६९५ रिक्षा चालकांवर कारवाई केली. मुंबई नाका, सरकारवाडा, म्हसरूळ, गंगापूर, नाशिकरोड या ठिकाणी सर्वाधिक कारवाई करण्यात आली. बेशिस्त रिक्षा चालकांच्या तक्रारी कमी झाल्या नाही तर यापेक्षा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐश्वर्याला मिळाला ‍स्मार्ट फोन

$
0
0

वाहतूक नियमांची आपल्याकडे होत असलेली पायमल्ली हा अतिशय गंभीर विषय आहे. हातात मोबाइल आल्यापासून वाहन चालविताना मोबाइलवर बोलण्याचे प्रमाणही वाढले आहे. याच समस्येवर प्रकाश टाकणारी ऐश्वर्या राजे बेस्ट सिटीझन रिपोर्टर ऑफ द मन्थ ठरली. स्मार्ट फोन देऊन तिचा गौरव करण्यात आला.

ठिकठिकाणी दिसणाऱ्या समस्या, अडी-अडचणी आणि बातम्या पाठविण्याची संधी टाइम्स ग्रुपने मटा सिटीझन रिपोर्टर अॅपद्वारे सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. विनाशुल्क असलेल्या या अॅपद्वारे अडचणी पाठविल्यानंतर त्याचे निराकरण होत असल्याचा अनुभव अनेक सिटीझन रिपोर्टरला येत आहे. दर आठवड्याला ४ बेस्ट सिटीझन रिपोर्टरचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जात आहे. तसेच आता बेस्ट सिटीझन रिपोर्टर ऑफ द मन्थचाही गौरव करण्यात येत आहे. भारतात वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे अनेक सर्वेक्षणांमधून दिसून आले आहे. यामुळेच अपघात होत असतात. सध्याचे युग हे मोबाइल आणि स्मार्टफोनचे आहे. त्यामुळेच वाहन चालविताना सर्रास मोबाइलवर बोलण्याचे प्रकार घडत आहेत. याच प्रकाराला ऐश्वर्या राजे या युवतीने मटा सिटीझन रिपोर्टरद्वारे वाचा फोडली. पायाची घडी करून आणि मोबाइलवर बोलणारा वाहनचालक असा फोटो तिने पाठविला होता.

या बातमी आणि समस्येचे गांभिर्य लक्षात घेत तो प्रसिद्ध करण्यात आला. तसेच, तिची बेस्ट सिटीझन रिपोर्टर ऑफ द मन्थ म्हणून निवड करण्यात आली. 'मटा'च्या वर्दापनदिनानिमित्त आयोजित मटा संवाद या कार्यक्रमात ऐश्वर्याला क्रीडा मानसतज्ज्ञ भिष्मराज बाम यांच्या हस्ते स्मार्ट फोन देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभोणा उपकेंद्राची हेळसांड

$
0
0

आरोग्य केंद्राकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष; छावा संघटनेकडून निवेदन

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील अभोण्याच्या शास्त्रीनगर येथील उपकेंद्राचा सार्वजनिक शौचालय व मद्यप्राशन करण्यासाठी वापर केला जात आहे. एकीकडे देशभर स्वच्छता अभियान राबवल्याचे चित्र दिसते. तर अभोणा परिसरातील हे उपकेंद्राचा गैरवापर सर्रास सुरू आहे. यामुळे याकडे प्रशासनाने लवकर लक्ष घालून हे उपकेंद्र दुसरीकडे हलवावे अथवा याठिकाणी सोयी पुरवाव्यात अशी मागणीचे निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेकडून देण्यात आले.

अभोणा परिसरात रोजंदारी करून उदरनिर्वाह करणारे आदिवासी लोकांची वस्ती आहे. परिसरातील आदिवासी व इतर रहिवाशांना उपकेंद्राचा खरा फायदा झाला असता. मात्र याचीच दयनीय अवस्था असल्याने आदिवासींनी आता कुठे जायचे असा प्रश्न पडला आहे.

दुसरीकडे परिसरातील गरोदर मातांच्या वेळोवेळी होणाऱ्या तपासण्या व प्रथमोपचारासाठी स्वतंत्रपणे आरोग्य उपकेंद्र बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध केली आहे. या जागेवर दोन वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. मात्र तेथील काम निकृष्ट दर्जाचे असून उपकेंद्रातील दरवाजे, इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेले आहे. तेथील कामकाजाबाबत ठेकेदारांची चौकशी करून गरजूंना उपचारासाठी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्थादेखील करण्यात आलेली नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे जनावरांची आणि दुसरीकडे जनतेची आरोग्याची दैना अशी परिस्थिती अभोण्यात निर्माण झाली आहे.

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावर या उपकेंद्राच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ठेकेदारांची चौकशी केली जाईल. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेऊन उपकेंद्र आभोणा सुरू करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांना देण्यात आले. सोबतच उपकेंद्राचे फोटो जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे निवेदनासह अहवाल सादर करून लवकरच या बाबतीत दखल घेऊन ठेकेदारांची चौकशी करू, असेही आश्वासन सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचा धडक मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहर काँग्रेस कमिटीतर्फे गुरूवारी, (दि. ९) रोजी शहरात केंद्र सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. यामध्ये पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द करावी, कांद्याला हमी भाव द्यावा तसेच शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावी यासह विविध मागण्यांसाठी हा धडक मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

शहर काँग्रेस कमिटीच्या या आंदोलनात केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रातील भाजप व मित्रपक्षांचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याची टीका करत तसेच सरकारविरुद्ध नारे देत (दि. ९) रोजी सकाळी शहरातून धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते, महिला आघाडी सदस्य यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या वेळी अनिल आहेर, अफजल शेख, अॅड. प्रकाश गवळी, सुरेश बारसे, रहेमान शाह, अशोक व्यवहारे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरुद्ध कडाडून टीका केली. शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या, शैक्षणिक शुल्क माफ करा, कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव द्या आदी आग्रही मागण्या केल्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी नगरसेवक बाळासाहेब पाटील, रवींद्र घोडेस्वार, डॉ. राजेंद्र शेजवळ, संतोष आहिरे, संजय निकम, इलियास पठाण, अॅड. शशिकांत व्यवहारे, सुनील गवांदे, सुभाष नहार, भीमराव जेजुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी पळविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

सरकारने, मराठवाड्यातील ऊस कारखान्यांसाठी, दारूच्या कंपन्यांसाठी पाणी नेले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केला.

इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिरसाठे जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच वैतरणानगर येथे घेण्यात आला. त्यावेळी अॅड. पगार बोलत होते. जिल्ह्यात गेल्या बारा दिवसात १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, ही खेदाची बाब आहे. यावर अॅड. पगार यांनी 'शेतकऱ्यांचं मरण हेच मोदी सरकारच धोरण' असा टोलाही रवींद्र पगार यांनी लगावला. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष गोरख बोडके, उदय जाधव, सचिन पिंगळे, प्रेरणा बलकवडे, आदींची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरमध्यमेश्वरला सापडल्या पुरातन विहिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात धरण पूर्ण कोरडे पडले असताना धरणात पाण्याने पूर्ण भरलेल्या दोन विहिरी सापडल्या आहेत. या विहिरी दीडशे वर्षांपूर्वीच्या असून आणखी तीन विहिरी असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पूर्वी धरणामध्ये मांजरगाव आणि चापडगाव ही दोन गावे होती. नंतर ती स्थलांतरीत करण्यात आली. पण त्या गावांच्या गावठाण भागात धरणाच्या अगदी मधोमध गावकऱ्यांनी जेसीबी लावून माती बाजूला केली असता चक्क दोन पाण्याने भरलेल्या विहिरी आढळून आल्या. या विहिरी सागाची लाकडे वापरून तयार केल्याचे दिसून आले. इतकी वर्ष हे लाकूड पाण्यात राहूनही नाश पावले नाही, हेदेखील विशेषच म्हणावे लागेल. या विहिरी दीडशे वर्षांपेक्षा जास्त जुन्या असून, आता गावातील लोकांनी विहिरींच्या हक्कावरून वाद सुरू केले आहेत. वन विभागाने त्वरित हस्तक्षेप करून या विहिरी ताब्यात घेऊन त्या पाण्याचा उपयोग येथील पक्ष्यांसाठी करावा, अशी मागणी नाशिकच्या नेचर क्लब ऑफ नाशिकने केली आहे. धरणात एक थेंबदेखील पाणी नसल्याने या विहिरींचा उपयोग करून धरणात खड्डे करून छोटी तळी बनवून त्यामध्ये पाणी सोडले तर पक्ष्यांना पाण्याची तात्पुरती व्यवस्था करता येऊ शकेल. नाशिकमधील नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे वन्य जीव संरक्षक रामाराव यांना निवेदन देण्यात आले असून, यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, वनपाल पंडित आगळे, येथील गाईड अमोल दराडे, गंगाधर आघाव, शंकर लोखंडे, पांडुरंग आहेर, अमोल डोंगरे, विलास गोडगे, दर्शन घुगे, धनंजय बागड, सागर बनकर, आशिष बनकर, भीमराव राजोळे आदी उपस्थित होते.

२१ पायऱ्यांचा घाट

चापडगाव गावठाण परिसरातील गोदावरी नदीच्या पात्रात २१ पायऱ्यांचा घाट सापडला आहे. आत्तापर्यंत हा घाट कुणीच बघितला नव्हता. हा घाट या गावात येणारे प्रवेशद्वार होते की काय, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा अभ्यास केला तर येथील इतिहास समोर येऊन अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूसंपादनाची भरपाई मिळाली नसल्याची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

तपोवनातील जुना सायखेडारोडवरील पवार मळ्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला कुंभमेळा काळातील भूसंपादनाचे पैसे अद्याप मिळाले नसल्याची तक्रार केली आहे.

कुंभमेळ्यात पवार मळ्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जागा रिंगरोडसाठी घेण्यात आल्या. टाकळीतून हा रिंगरोड तयार करण्यात आला असून, तो औरंगाबाद महामार्गाल जाऊन मिळतो. हा रस्ता तयार झाल्यामुळे कुंभमेळ्यात भाविकांची दसकचा गोदावरी घाट आणि रामकुंडावरील गर्दी कमी करण्यात प्रशासनाला यश आले. सध्या औरंगाबाद मार्गावर किंवा तेथून नाशिक-पुणे मार्गावर जाण्यासाठी हा रिंगरोड अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या मार्गावरील शेतात सध्या या भागात गुलाब, ऊस व अन्य शेती बहरली आहे. येथील शेतकऱ्यांनी कुंभमेळ्यासारख्या धार्मिक बाबीसाठी विरोध न करता प्रशासनाला जमीन दिली. मात्र, अद्याप भरपाई मिळाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही नगरसेवकांनी त्या वेळी मध्यस्थी केल्यामुळे शेतकऱ्यांनी जमीन दिली. आता ते फिरकतही नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. कुंभमेळ्यात रस्त्याच्या कडेला नाल्या करण्याचे आश्वासन देऊनही ते प्रशासनाने पाळले गेले नाही. शेतातच नाल्या केल्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याच्याही तक्रारी आहेत.

कुंभमेळ्यात रिंगरोडसाठी तपोवनातील आमची दहा ते पंधरा फूट शेतीची जागा घेण्यात आली. त्याला वर्ष होत आले, मात्र अद्याप आम्हाला भरपाई मिळालेली नाही. आता कोणीच लक्ष देत नाही. आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे.

-प्रदीप पवार, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वनिप्रदूषणाची करा व्हॉट्स अॅपवर तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी नागरिकांना सहजपणे नोंदवता याव्यात, यासाठी नाशिक जिल्हा ग्रामिण पोलिसांनी व्हॉट्स अॅप क्रमांक, संपर्क क्रमांक व वेबसाइट कार्यान्वित केली आहे. या विविध माध्यमातून नागरिकांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन ग्रामीण पोलिस दलाने केले आहे.

ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी हवेतील गोंगाट मोजून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी हायकोर्टाने पोलिसांवर टाकली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी तातडीने काही गुन्हे दाखल केले आहेत. ग्रामीण पोलिस दलाने सुध्दा आता नागरिकांना तक्रार करता यावी म्हणून व्हॉटस अॅप क्रमांक, दूरध्वनी क्रमांक तसेच वेबसाईटचा पर्याय नागरिकांना उपलब्ध करून दिला आहे.

ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढत असून, त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचा दावा करीत एक जनहीत याचिका २००९ मध्ये मुंबई हायकोर्टत दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणाच नसल्याची बाब हायकोर्टाच्या लक्षात आली. त्यानुसार, हायकोर्टाने शहरी भागात पोलिस आयुक्त, ग्रामीण भागात पोलिस अधीक्षक यांच्यावर ही जबाबदारी टाकली.

एखादा आवाज झाल्यानंतर त्याचा पुरावा सापडत नाही. त्यामुळे पोलिसांकडे डेसिबल मॉनेटरिंग मशिन्स देण्यात आल्या आहेत. डीजे, फटाके, हॉर्न, कारखाने अशा अनेक ठिकाणी पोलिस यंत्राद्वारे ध्वनी प्रदूषाणची पातळी मोजून संबंधितांवर गुन्हे दाखल करू शकतात.

या क्रमांकावर करा तक्रार

जिल्ह्यातील नागरिकांना तक्रारी करायच्या असतील, तर त्यांनी पोलिसांचा व्हॉटस् अॅप क्रमांक- ८३९०८२२३५२, दूरध्वनी क्रमांक-०२५३-२३०९७१५ येथे संपर्क साधावा. तसेच नागरिक www.nashikruralpolice.gov.in या वेबसाईटवरही तक्रार करू शकतात. ध्वनी प्रदूषण नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे हायकोर्टाचे आदेश असून, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांकडे डीजेचालक तसेच इतर घटकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’चे शुक्लकाष्ठ संपेना!

$
0
0

सर्व्हिस टॅक्स न भरल्यामुळे १५ लाखांचा दंड; पदा‌धिका-यांमध्ये सुंदोपसुंदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्व्हिस टॅक्स भरला नसल्याने सार्वजनिक वाचनालय नाशिकला १५ लाख रुपयांचा दंड झाल्याचे पत्रक माजी कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी प्रसिध्दीस दिले आहे. सन २०१२ पासून नियमितपणे रीतसर सर्व्हिस टॅक्स भरला असून, हे प्रकरण ज्यांनी उपस्थित केले आहे, त्यांच्या काळातीलच असल्याचे कार्यवाह मिलिंद जहागीरदार यांचे म्हणणे आहे. वादाच्या या सुंदोपसुंदीमध्ये सावानामागचे गेल्या काही वर्षांपासून लागलेले कोर्ट कचेऱ्यांचे शुक्लकाष्ठ अद्यापही संपले नसल्याचे दिसून येत आहे.

सावानाच्या अखत्यारीत असलेले परशुराम साईखेडकर नाट्यगृह, दस्तूर हॉल, बेसमेंट हॉल पुस्तक प्रदर्शनाकरिता वर्षानुवर्षे भाडेतत्त्वावर देऊन ती रक्कम देणगी या सदराखाली दाखवली आणि केंद्रीय सेवा कर आणि आयकर विभागाची फसवणूक केल्याचे बेणी यांचे म्हणणे आहे. सन २००७ पासून अशा स्वरूपाच्या सेवांवर केंद्र सरकारने सेवा कर लागू केला आहे. मात्र, सावाना देणगी सदराखाली संबंधित रकमा दर्शवून सर्व्हिस टॅक्स बुडवित होती. त्याची शहानिशा करून केंद्रीय उत्पादन सीमाशुल्क तथा सेवाकर विभाग नाशिकचे सहआयुक्त डी. एस. मीना यांनी ही कारवाई केल्याचे पत्रक बेणी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

सन २०१२ पासून सावाना रितसर सर्व्हिस टॅक्स भरते. परंतु, २००९ पासून तो टॅक्स भरावा, असे आदेश सेवाकर विभागाने दिले आहे. परंतु त्यांचे हे आदेश आम्हाला मान्य नाही. कारण आम्ही २०१२ पासून टॅक्स भरलेला आहे. आम्ही जर सर्व्हिस टॅक्स वसूलच केलेला नाही, तर भरणार कसा असा प्रश्न सावानाचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी उपस्थित केला आहे.

सावानामध्ये कोर्ट-कचेरी वाढतच चालली असून, वादाच्या या वातावरणामध्ये 'सावाना'च्या मूळ उद्देशाला तर हरताळ फासला जात नाही याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असल्यांचे जाणकार वाचकांचे मत आहे. सावानामागे कोर्ट कचेऱ्यांचे हे शुक्लकाष्ठ कधी संपणार आणि ही संस्था वाचकाभिमूख कधी होणार असा संतापजनक सवाल वाचकांनी उपस्थित केला आहे.

न्यायालयात अपील

कायदेशीर सल्ला घेऊन याविरोधात नागपूर खंडपीठात अपील केले असल्याचेही जहागीरदार यांनी सांगितले. डिमांडच मान्य नाही, तर पेनल्टीचा प्रश्नच येत नाही असे सांगतानाच २००९ व २०१० चा सर्व्हिस टॅक्स २०१० मध्ये भरण्यात येतो आणि २०१० मध्ये आम्ही सावानाच्या कार्यकारिणीवर नव्हतो तर ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे, त्यांचीच सत्ता त्यावेळी होती, असेही जहागिरदार यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरची फोन सेवा बंदच

$
0
0

भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) सोमवारपासून तुटलेल्या केबल्समुळे इंदिरानगर परिसरातील फोन व इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. यामुळे परिसरातील बँकांसह अन्य व्यवहारांवरही परिणाम झालेला आहे. दरम्यान, इंदिरानगर विकास कृती समितीच्या वतीने 'बीएसएनएल'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दूरध्वनी सेवा खंडित असलेल्या काळातील भाडे आकारले जाऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे.

इंदिरानगर परिसरातील 'बीएसएनएल'चे सर्व फोन व इंटरनेट सुविधा सोमवार (दि. ६) रात्रीपासून ठप्प आहेत. उड्डाणपुलाखाली असलेली केबल तुटल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. या केबल जोडणीचे काम अजुनही सुरूच असल्याने त्यावर अद्यापपर्यंत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे मंगळवारपासून इंदिरानगर भागातील बँकांचे व्यवहारही बंद झाले आहेत. तसेच सध्या अॅडमिशनच्या धावपळीत असलेल्या पालक व विद्यार्थ्यांना खंडीत इंटरनेट सेवेचा सर्वाधिक फटका बसला आहे. शुक्रवारी देखील इंटरनेट व दूरध्वनी सेवा बंद होती. त्यामुळे संतप्त झालेल्या इंदिरानगर विकास कृती समितीच्या अमित पाटील, कर्नल आनंद देशपांडे, नरेंद्र दिंडोरकर व मनीष नाशिककर यांनी 'बीएसएनएल'चे वरिष्ठ अधिकारी सुरेशबाबू प्रजापती यांना निवेदन देण्यात आले. या समस्येमुळे नागरिकांचे हाल होत असून बँका व एटीएमच्या सुविधा बंद आहेत. चार दिवसांपासून सेवा खंडीत असल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे 'बीएसएनएल'ने या चार दिवसांचे ग्राहकांकडून भाडे आकारणी करू नये, अशी मागणी केली आहे. दरम्यान प्रजापती यांनी ही समस्या लवकरच सोडविली जाणार असल्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिशच्या बहाण्याने लांबविले दागिने

$
0
0



नाशिकरोड : आम्ही तांबे, पितळाची भांडी तसेच सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत विश्वास संपादन करीत दोन चोरट्यांनी ७० हजारांचे दागिने लांबविले. पिंपळगाव खांब परिसरात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

सिंधुबाई सरेश जाधव (वय ५०, रा. विघ्नहर्ता गणेश मंदिराजवळ, पिंपळगाव खांब) यांनी उपनगर पोलिसात गुरूवारी (दि. ९) रोजी सायंकाळी फिर्याद दिली. पोलिसांनी दोन संशयि‌तांवर गुन्हा दाखल केला आहे. जाधव या त्यांच्या मुलीसमवेत घराच्या व्हरांड्यात बसल्या होत्या. लाल रंगाच्या पल्सरवर २० ते ३० वयोगटातील दोन तरुण त्यांच्याजवळ आले. आमच्याकडे भांडे घासण्याची पावडर आहे, असे सांगून त्यांनी सिंधुबाईंचा तांब्या चकचकीत करून दाखवला. सोन्या-चांदीचे दागिने घासण्याची पावडरही आपल्याकडे असल्याचे सांगून त्यांनी सिंधुबाईंच्या हातावर नमुना ठेवला. सिंधुबाईंनी विश्वास ठेऊन सोन्याची पोत व त्यांची मुलगी जया नवले हिने चेन पॉलिश करण्यासाठी दिली. जाधव यांना बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. जाधव यांनी दिलेले मंगळसूत्र, पोत व सोन्याची चेन, पॅडल डब्यात ठेवण्याचा बहाणा करून चोरट्यांनी लांबविले. सुमारे ७० हजारांची फसवणूक झाली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images