Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‌द‌िल्ली परेडसाठी ऋषिकेश पवारची निवड

$
0
0

नाशिक : डी. डी. बिटको बॉइज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी ऋषिकेश पवार याची एनसीसीच्या पथकातून (राष्ट्रीय छात्रसेना) दिल्ली येथील प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी निवड झाली आहे. एनसीसीच्या ज्युनिअर डिव्हिजनच्या ७ महाराष्ट्र बटालियनमधून त्याची निवड झाली आहे. तो नवी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करील. कॅप्टन हेमंत बरकले, कर्नल के. सी. उपाध्ये यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

दिल्ली परेडसाठी निवड होणे एनसीसीत सर्वांत प्रतिष्ठेचे आणि आव्हानात्मक मानले जाते. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वैशंपायन, उपाध्यक्ष प्रकाश वैशंपायन, रोहित वैशंपायन, रेखा काळे, मुख्याध्यापिका रेखा ठाणगे यांनी त्याचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बैठका होत नसल्याने उपसभापतींची नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनधी, पंचवटी

नाशिक महापालिकेच्या शिक्षण मंडळाला अस्तित्वात येवून सहा महिने उलटले, उपसभापतिपदी निवड झाली तरी अद्याप समितीची एकही सभा झाली. कोणताही अधिकार नसलेले पद असल्याची खंत वाटत असल्याने मनसेचे नगरसेवक आणि शिक्षण मंडळ उपसभापती गणेश चव्हाण यांनी जाहीर मत व्यक्त केले आहे.

न्यायालयाच्या आणि सरकारच्या प्रदीर्घ लढा दिल्यानंतर नाशिक महापालिकेचे शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. शिक्षण समितीच्या सभापतिपदी अपक्ष संजय चव्हाण तर उपसभापती म्हणून मनसेचे गणेश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, या सहा महिन्यात समितीची एकही बैठक झाली नाही. शिवाय सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त करून महापलिकेच्या अखत्यारीत शिक्षण समित्या गठीत करण्याचा निर्णय घेतला. तरी सुद्धा शिक्षण समिती कामकाजाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांचे अधिकार देखील समितीला नाहीत, समितीसाठी अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नाही. अशा परिस्थितीत असे शोभेचे पद मिरविण्यात अर्थ नाही, अशी नाराजी चव्हाण यांनी मांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी घरकुल योजनांचा सविस्तर अहवाल द्या

$
0
0

आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी बांधवांना विविध योजनांच्या माध्यमातून हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी राज्य सरकारने निधीही वितरित केला आहे. तरीही प्रत्यक्षात अशी घरकुले आकारास येत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. अशा योजनांबाबत तत्काळ आढावा बैठक घेऊन लाभार्थी, प्रत्यक्षात झालेली कामे, मंजूर आणि प्राप्त निधी, प्रत्यक्षात वापरात आलेला निधी याबाबतची सविस्तर माहिती आकडेवारीसह सादर करा, असे आदेश आदिवासी विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी शुक्रवारी दिले.

आदिवासी उपयोजनांतर्गत जिल्हास्तरीय योजनांचा २०१६-१७ चा वार्षिक प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी देवरा यांनी आदिवासी विभागाशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार यांसह आदिवासी विकास विभाग, महावितरण, जलसंपदा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी बांधवांना स्वत:च्या हक्काचे घरकुल मिळावे यासाठी राज्य सरकारकडून इंदिरा आवास योजनेसह शबरी आदिवासी घरकुल योजना, रमाई आवास यांसारख्या योजना राबविण्यात येतात. त्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी देते. मात्र, अजूनही या योजना प्रत्यक्षात अंमलात आल्याचे आणि आदिवासी बांधव पक्क्या घरांमध्ये राहावयास गेल्याचे पहावयास मिळत नाही. लाभार्थी निश्चित असताना आणि ‌निधी मंजूर असतानाही कामे का होत नाहीत, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी आदिवासी विभागाला केला आहे. त्याबाबत लवकरच आढावा बैठकही होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात संबंधित योजनांच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती आकडेवारीसह सादर करा, असे आदेश देवरा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सोलर होम लायटींग, स्ट्रीट लाईट्स आणि सोलर पंप्सच्या माध्यमातून आदिवासी भाग उजळविण्याचे प्रयत्न राज्य सरकारने सुरू केले आहेत. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात प्रथमच महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाद्वारे (मेडा) सौर यंत्रणेबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. ठेकेदारांना त्यासाठीचा निधी सरसकट दिला की अशा कामांची वाताहात होते. त्यांची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे ठेकेदारांना सरसकट ९० ते ९५ टक्के निधी न देता तो टप्प्याटप्प्याने दिला जावा, अशा सूचना देवरा यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. आदिवासी उपयोजनांसाठी स्वतंत्र नियोजन विभाग

गडचिरोली, पालघर सारख्या काही आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण उपयोजनांपेक्षाही आदिवासी उपयोजनांसाठी मोठी तरतूद असते. तेथे कामाचा व्यापही प्रचंड असतो. मात्र, या कामासाठी वर्ग दोन आणि तीनचा एकदोघांची नियुक्ती केली आहे. कामाचा व्याप पहाता तेथे अधिक मनुष्यबळ आवश्यक असल्याचे प्रशासनाने देवरा यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबतचा कायदा विधीमंडळात लवकरच संमत होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र नियोजन विभाग (प्लॅनिंग सेल) कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती देवरा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११७४ फलक, बोर्ड महापालिकेकडून जप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने २६ जानेवारीपर्यंत शहर होर्डिगमुक्त करण्यासाठी मोहीम उघडली आहे. गेल्या पाच दिवसात शहरातील ११७४ फलक आणि बोर्ड काढण्यात आले आहे. उर्वरित तीन दिवसात शहरातील पूर्ण होर्डिंग व बोर्ड काढण्यात येतील, अशी माहिती उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली आहे.

शहर २६ जानेवारीपर्यंत होर्डिंगमुक्त करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहे. त्यानुसार महापालिकेने १८ जानेवारीपासून शहरातील होर्डिंग व बॅनर्सची साफसफाई सुरू केली आहे. १८ ते २१ जानेवारीदरम्यान महापालिकेने शहरातील राजकीय पक्षांचे ३२ फलक व ११४२ पक्षांच्या शाखांचे बोर्ड, व्यावसायिक फलक काढले आहेत. महापालिकेची कारवाई ही २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. तीन दिवसात शहर अधिक स्वच्छ केले जाईल, असा दावा महापालिकेने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा-कामगार विभाग आमनेसामने

$
0
0

कामगार उपआयुक्तांवर पक्षपातपणाचा आरोप; प्रधान सचिवांकडे तक्रार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या कंत्राटी कामगारांचा परवाना रद्द ठरविण्याच्या कामगार उपायुक्तांच्या कारवाईवर महापालिकेने आता आक्षेप घेतला आहे. महापालिकेची बाजू ऐकून न घेता केवळ परस्पर कामगारांच्या मुलाखती घेवून कामगार विभागाने केलेली कारवाई अयोग्य आहे. त्यामुळे कामगार विभागाच्या या पक्षपाती कारवाई विरोधात महापालिकेने कामगार विभागाच्या प्रधान सचिवांकडेच तक्रार नोंदवली आहे. कामगार विभाग नैसर्गिक न्यायाच्या विरोधात भूमिका घेत आहे, असा आरोप महापालिकेने केल्याने आता महापालिका आणि कामगार विभाग आमने-सामने आला आहे.

सन २०१३ मध्ये कामगार विभागाने महापालिकेच्या ८३ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेत, सुविधांसंदर्भात विचारपूस केली. त्यात कंत्राटदारांने सुविधा दिल्या नसल्याचे कामगारांनी सांगीतले. या मुलाखतींच्या आधारावर कामगार विभागाने महापालिकेच्या कंत्राटी कामांचा नोंदणी परवाना रद्द केला. त्यामुळे महापालिकेच्या कंत्राटी सुविधा या अडचणीत आल्या आहेत. परंतु, कामगार उपायुक्तांच्या या आदेशावरच आता महापालिकेने आक्षेप घेत ही कारवाईचा नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असल्याचा दावा केला आहे. कामगार विभागाने महापालिकेचा परवाना रद्द करतांना महापालिकेला विश्वासात घेतले नाही. महापालिकेच्या विरोधात तक्रार असतांनाही, महापालिकेला कारवाई करण्यापूर्वी साधी विचारपूसही कामगार विभागाने केलेली नाही. केवळ कामगारांच्या मुलाखतीच्या आधारे मूळमालक असलेल्या महापालिकेवर कारवाई करण्याचा कामगार विभागाचा आदेश हा नैसर्गिक न्यायाला धरून नाही. महापालिकेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, कामगार विभागाने पक्षपातीपणे कारवाई केल्याचा महापालिकेचा आरोप आहे.

आरोपांची माहितीही दिली नाही

कामगार विभागाच्या एकतर्फी कारवाईच्या विरोधात महापालिकेने थेट कामगार विभागाच्या प्रधान सचिवांकडेच दाद मागितली आहे. कामगार विभागाने केलेली कारवाई ही कोणत्या आरोपांच्या आधारे केलेली आहे. त्याची साधी माहिती सुद्धा कामगार विभागाने महापालिकेला दिली नसल्याचा आरोप प्रशासनाने प्रधान सचिवांकडे केला आहे.

नैसर्गिक न्याय नाकारला

एक सरकारी विभाग दुसऱ्या सरकारी विभागालाच नैसर्गिक न्यायाची संधी देत नसल्याने हा पक्षापीतपणा कितपत योग्य असा सवाल महापालिकेने प्रधान सचिवांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. त्यामुळे महापालिका आणि कामगार उपआयुक्त कार्यालयामंधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून दोन्ही विभाग आता आमने सामने आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गो. बा. पाटलांवर गुन्हा दाखल होणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या उद्यान विभागातील वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत आलेले महापालिकेचे उद्यान अधीक्षक गो. बा. पाटील यांच्यावर कामातील अनियमितता आणि भ्रष्टाचारप्रकरणी महापालिका आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याचीही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पाटील यांच्या फाईल्स नव्याने उघडत, त्यांचे अधिकार काढून घेत त्यांची नव्याने चौकशी सुरू केली होती. चौकशीत तथ्य आढळल्याने अखेर डॉ. गेडाम यांनी शुक्रवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढून भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला. महापालिकेत यापूर्वी विद्युत विभागातील तीन अभियंत्यावर त्यांनी कारवाई केली. परंतु, बड्या अधिकाऱ्यांवर प्रथमच भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई डॉ. गेडाम यांनी केल्याने महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पुढील नंबर कोणाचा अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

..

गुन्हा दाखल होणार?

गोविंद पाटील यांनी केलेल्या कारनाम्यांची फाईल्स आयुक्तांनी पोलिस आयुक्तांकडे सादर केली आहे. पोलिसांकडून या फाईल्सची चौकशी केली जात असून लवकरच पाटील यांच्यावर या अनियमितता प्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याचीही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या डॉ. गेडाम यांनी महापालिकेतही कारवाईचा धडाका लावला आहे. आयुक्तांच्या रडारवर अजून महापालिकेतील एक बडा अधिकारी रडारवर असून त्यांच्यावरील कारवाईकडे आता लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी निविदा कायदेशीरच

$
0
0

कंत्राटी परवानासंबंधी महापालिकेचे स्पष्टीकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचा ठेकेदारीने काम करण्याचे नोंदणीपत्र रद्द केल्यामुळे घंटागाडीची निविदा बेकायदेशीर असल्याचा कामगार उपायुक्त कार्यालयाचा दावा महापालिकेने फेटाळला आहे. कामगार उपायुक्तांच्या आदेशाला हायकोर्टानेच स्थगिती दिली असून अपीलासाठी कामगार उपायुक्ताकडे दाद मागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घंटागाडीची निविदा कायदेशीर असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

महापालिकेचा कंत्राटी कामगारासांठी देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र कामगार आयुक्तालयाने रद्द केले आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारांना सुविधा दिली नसल्याचे सांगत, परवाना रद्द केला होता. महापालिकेला विश्वासात न घेताच कामगार उपायुक्तांनी केलेल्या कारवाई विरोधात महापालिका हायकोर्टात गेली होती. हायकोर्टाने कामगार उपायुक्तांच्या आदेशाला स्थगिती देत नोंदणीपत्रासाठी पुन्हा कामगार उपायुक्ताकडे अपील करण्याचे आदेश १४ जानेवारी रोजी हायकोर्टाने महापालिकेला दिले होते. तसेच कामगार उपायुक्तांनी अपील फेटाळले तरी त्याला १५ दिवसांची स्थगिती असेल, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. परंतु, असे असतांनाही कामगार उपायुक्तांनी महापालिकेने घंटागाडीची काढलेली निविदा बेकायदा असल्याचा दावा केला होता. हायकोर्टानेही स्थगिती आदेश दिला असतांनाही कामगार विभागाची महापालिकेच्या कंत्राटी परवाना संदर्भातील हस्तक्षेपावर महापालिकेनेच आश्चर्य व्यक्त केले आहे. कंत्राटी नोंदणी पत्र रद्दची कारवाईला स्थगिती असल्याने ही प्रक्रिया कायदेशीर असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराला ऐतिहासिक वारसा असून, जिल्ह्यात ६५ शिवलकालीन गडकिल्ले आहेत. नाशिकचे अल्हादायक वातावरण पर्यटनाला अतिशय पोषक आहे. या सर्व बाबींचा विचार करुन नाशिकला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्याचे सूतोवाच पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखील लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिकमधील पर्यटकांना योग्य मार्गदर्शन व्हावे अधिकाधिक पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटता यावा, यासाठी ट्रॅव्हल एजंट असोसिएशनतर्फे (तान) गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे हॉलिडे कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उदघाटनप्रसंगी राम शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, की नाशिकला वेगळी ओळख आहे. ६५ शिवकालीन गडकिल्ल्यांचा ठेवा आहे. दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरत असल्याने विश्वाचे लक्ष लागून असते. नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्याचे चोख नियोजन करण्यात राज्य सरकार यशस्वी झाले आहे.

मांगीतुंगीचा करणार विकास

जिल्ह्यात असलेल्या मांगीतुंगीचा विकास करण्यासाठी राज्याने पावले उचलली आहेत. त्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. यातील २० कोटी रुपये एमटीडीसी खर्च करणार असून, उर्वरित २० कोटी रुपये इतर विभांगामार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठीचा पहिला १० कोटीचा हप्ता राज्य सरकारकडून प्रशासनाला सुपूर्द करण्यात आला आहे, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अज्ञात वाहनाच्या धडकेने मुलगा ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत १५ वर्षांचा मुलगा ठार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी पाऊणे नऊ वाजेच्या सुमारास बोरगडरोडवरील श्रीहरी सोसायटीसमोर घडली.

राजन बैजनाथ गुप्ता असे मृत मुलाचे नाव असून, तो बोरगड परिसरातील आदर्शननगर येथील वास्तूकला बंगला येथील रहिवाशी होता. घटनेच्या दिवशी सकाळी राजन दुचाकीने (एमएच १५ डीआर ०९९४) जात असताना भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या राजनला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना राजनची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी बैजनाथ हरिहरदास गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गंगापूररोडलाा स्नॅचिंग

गंगापूररोडवरील गुप्ता गार्डन परिसरात एका महिलेची ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी तोडून पोबारा केला. गंगापूररोड भागात वांरवांर स्नॅचिंगचे प्रकार घडत असून, महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाइपलाइन रोडवरील गणेशनगर परिसरातील गौरव दर्शन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वृषाली विनय शिरसाठ (वय ३२) या गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गुप्ता गार्डन जवळील रोडवरून जात असताना मोटरसायकलीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पोबारा केला. शिरसाठ यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चोरट्याने भरधाव वेगात धूम ठोकली होती. या प्रकरणी वृषाली शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पल्सरची चोरी

पेठरोडवरील तवली फाटा येथे उभी केलेली पल्सर (एमएच १५ ईएफ ३३५७) चोरट्यांनी लंपास केली. ही घटना १३ ते १५ जानेवारीदरम्यान घडली. या प्रकरणी जितेंद्र दत्ता धुपारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये अशा रेसर बाईकचा सर्रास वापर होत असल्याचे चोरटे देखील याच वाहनांना पसंती देतात.

वाहनातील मुद्देमाल साफ

पेठरोडवरील दत्तनगर परिसरातील प्रमोद हौसिंग सोसायटीत पार्क केलेल्या वाहनातून चोरट्यांनी २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ४ ते ५ जानेवारीदरम्यान घडली. दिंडोरीरोडवरील तुळशीदर्शन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सतीश ज्ञानेश्वर वाव्हळ यांनी या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी वाव्हळ यांच्या चालकाने हे वाहन (एमएच १५ ईबी ७५०९) सोसायटीत पार्क केले होते. यानंतर चोरट्यांनी वाहनातील खताचे पा‌कीट, अॅसिड व इन्शुरन्स पेपर असा २५ हजार रुपयांचा

मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.

सीटीबसमध्ये चोरी

सीटीबसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील पाच हजार रुपये चोरट्याने काढून घेतले. जेलरोड परिसरातील सायट्रीक बस स्टॉप ते सीबीएस या दरम्यान प्रवास करणाऱ्या मीरा लक्ष्मण डोळस (वय ३९) या महिलेच्या पर्समधील रोख पैसे चोरट्यांनी लंपास केले. ही घटना १३ जानेवारी रोजी सांयकाळी साडेचार ते सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली. चोरीची घटना शालिमार ते सीबीएस या परिसरात घडल्याचे डोळस यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

बसचालकास दमदाटी

साईड का दिली नाही, अशी कुरापत काढून दुचाकी चालकाने बसचालकास दमदाटी करण्याची घटना २० जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे हायवेवरील बंगाली बाबा दर्गा जवळ घडली. या प्रकरणी सिन्नर डेपोचे चालक रामेश्वर गोपीनाथ कुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी दुचाकी चालकाविरोधात (एमएच १५ इएस ४४२३) गुन्हा दाखल केला.

जखमी महिलेचा मृत्यू

स्वयंपाक करीत असताना गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोनिका सुनील दिघे (वय २५) असे या महिलेचे नाव आहे. पाथर्डी फाटा परिसरातील नरहरीनगर परिसरातील सिध्दीविनायक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दिघे २७ डिसेंबररोजी घरात स्वयंपाक करीत असताना झालेल्या दुर्घटनेत गंभीररित्या भाजल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

युवकाचा मृत्यू

जेलरोड येथे एका प्रेमविराने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वप्निल दोंदे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यामागे आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे.

गेल्या शनिवारी जेलरोड येथील भीमनगर शेजारील संघमित्र हौसिंग सोसायटीजवळ नंदादीप जाधव, सुमेध गुंजाळ व स्वप्निल दोंदे हे ‌तिघे उभे होते. मुख्य संशयित विठ्ठल आव्हाड एका मुलीशी प्रेसच्या भिंतीजवळ बोलत उभा होता. दोंदे व नागरिकांनी आव्हाडला तेथून जाण्यास सांगितले. यानंतर आव्हाड हा आशिष पगारे, व काळू पगारे यांच्यासह दुचाकीवर आला. नंदादीप जाधव यांना त्यांनी शिवीगाळ करून लोखंडी पाइपने मारहाण केली. योगेश धुमाळ मध्यस्थीसाठी गेला असताना त्याच्यावरही हल्ला केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांची सर्रास लूट

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : शहरातील अनेक कॉलेजेसने परीक्षा फीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची लूट करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रवेशावेळी फी अदा केल्यानंतरही विद्यार्थ्यांकडून एन्व्हार्मेंट सायन्स आणि अंतर्गत परीक्षेची फी पुन्हा घेतल्याचे निदर्शनास येत आहे. याद्वारे कॉलेजेस विद्यार्थ्यांची जाणिवपूर्वक आर्थिक लूट करीत आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या शाखांच्या परीक्षांसाठी सध्या ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. त्याची प्रक्रिया शहरातील सर्व कॉलेजेसमध्ये सुरू आहे. विद्यार्थी हे अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रिंट काढतात आणि ती कॉलेजेसमध्ये सूपूर्द करतात.

याचबरोबर परीक्षा फी विद्यार्थ्यांनी जमा करणे आवश्यक असते. आर्टस आणि कॉमर्स शाखेत पदवीच्या द्वितीय वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ९९० तर सायन्ससाठी ११०० रुपये फी असल्याचे विद्यापीठाच्या वेबसाइटवरील ऑनलाइन अर्जात दिसून येते. त्यामुळे हाच अर्ज प्रिंट करून विद्यार्थी कॉलेजेसमध्ये फी जमा करीत आहेत.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये प्रवेश घेतानाच एन्व्हार्मेंट सायन्स आणि अंतर्गत परीक्षा फी भरली आहे. कॉलेजेसच्या प्रवेश फीच्या रिसीटमध्येच त्याचा उल्लेख आहे. मात्र, आता परीक्षा फी भरताना पुन्हा याच दोन विषयांसाठीची फी आकारण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून पुन्हा फी वसूल करतानाच त्यांच्या पॉकेटमनीवर कॉलेजेस डल्ला मारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

असा आहे गोंधळ

ऑनलाइन परीक्षा फीच्या अर्जात एन्व्हायर्नमेंट सायन्स आणि अंतर्गत परीक्षेची फी याचा उल्लेख केला आहे. पण, ज्या कॉलेजेसनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशावेळी या दोन्ही बाबींची फी घेतली असेल तर त्यांनी ती आता परीक्षा अर्ज करतेवेळी घेणे योग्य नाही. नेमकी हीच बाब हेरत कॉलेजेसनी सरसकट एकाच कारणासाठी दोनदा फी उकळण्याचा उद्योग सुरू केला आहे.

कुठल्याही स्वरुपाची लेखी तक्रार विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. त्याचे निवारण करणे कॉलेजेसला बंधनकारक आहे. - डॉ. रावसाहेब शिंदे, समन्वयक, विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृध्द आयुष्यासाठी अंतर्मनाचं ऐका!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुठलंही क्षेत्र निवडलं तरी तुमचा विवेक, अंतर्मन काय सांगतंय याकडे लक्ष द्या. अंतर्मनाचं, विवेकाचं ऐकलं तर तुम्ही व्यावहारिक दृष्ट्या कदाचित श्रीमंत होणार नाहीत मात्र, तुमचे आयुष्य समृध्द झाल्याशिवाय राहणार नाही, असे विवेकवादी आवाहन मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कॅनडाच्या एडीआय रिसर्च अॅण्ड कन्सल्टिंग सर्व्हिसेसच्या शैक्षणिक नियोजनाचे सल्लागार प्रा. डॉ. वास्तुपाल पारीख यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २२ व्या पदवीदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होत. शुक्रवारी विद्यापीठाच्या मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे होते. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, व्यवस्थापन मंडळ सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य व नियोजन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.डॉ. पारीख पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून तुम्ही आदर्शवादी, उत्साही, आतूर आणि ध्येयवेडे आहात. तुमच्यात एक विलक्षण शक्ती आहे. लोकांच्या आयुष्यात, तुमच्या समाजाच्या भवितव्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे.अपयशाशिवाय प्रगती होत नाही. अपयश तुम्हाला निग्रही आणि शिस्तबध्द बनवतं, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी शिक्षण म्हणजे नेमके काय हे ही समजावून सांगितले.

विद्यापीठाचा अहवाल सादर करताना डॉ. साळुंखे म्हणाले की, एकाच वेळी १८७ शिक्षणक्रम उपलब्ध करून देणारे, स्वत:च्या गरजांप्रमाणे अभ्यासक्रमांच्या निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देणारे हे एकमेव विद्यापीठ आहे. पुणे येथे कम्युनिटी कॉलेज सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. विद्यापीठाने मोबाईल अॅपद्वारे पूर्वतयारीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुविधा प्रायोगिक तत्त्वावर दिली. मोबाइल टॅबरेडी, संवादपत्रिका ऑनलाइन असे अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे व विशेष उपस्थितांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सनई व तुताऱ्यांचा नाद करण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून प्रमुख पाहुण्यांनी अभिवादन केले. यानंतर विद्वत परिषदेची दिंडी सभा मंडपात आली. मिरवणूक व्यासप‌ीठावर आल्यावर 'ज्ञानगंगा घरोघरी' या विद्यापीठाच्या बोधवाक्याची धून वाजविण्यात आली. त्यानंतर विद्यापीठ गीत सादर करण्यात आले.

२८ हजार पदविका प्रदान

या पदवीदान सोहळ्यात शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये विविध शिक्षणक्रमाच्या १ लाख ९ हजार ८७० विद्यार्थ्यांनी पदवी, २८ हजार ३५१ विद्यार्थ्यांनी पदविका, ३२१ विद्यार्थ्यांनी पदव्युतर पदविका, ९५ विद्यार्थ्यांनी एम.फील., ४ हजार ८७३ विद्यार्थ्यांनी पदव्युतर पदवी शिक्षणक्रमाची तर ३० विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी ग्रहण केली. पीएच. डी. मिळविलेल्या विद्यार्थ्यांत शैक्षणिक सेवा विभागाचे ९, शैक्षणिक सेवा विभागाचे ८, मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेचे ११, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे १ आणि कृषिविज्ञान विद्याशाखेच्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला तीन पारितोषिके

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या रंगकर्मींनी ५५ व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी नाट्यस्पर्धेत तीन पारितोषिके पटकावली. ही तिन्ही पारितोषिके लोकहितवादी मंडळाच्या 'या ही वळणावर' या नाटकातील सहभागी कलावंतांना मिळाली. माणिक कानडे यांना रंगभूषेसाठी तृतीय, उत्कृष्ट अभिनयासाठी मिलिंद भणगे यांना तर अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रांमध्ये रसिका पुंड यांचा समावेश आहे.

दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक सुनील हरिश्चंद्र (असूरवेद), द्वितीय दयानंद नाईक (वृंदावन) तर दिग्दर्शनाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक हेमंत कुलकर्णी (नाना भोळे १२ शनिपेठ, जळगाव) यांना जाहीर झाले. नेपथ्य प्रथम वैभव देशमुख, द्वितीय सचिन कदम, तृतीय प्रदीप पाटील यांना पारितोषिक जाहीर झाले आहे. प्रकाशयोजना प्रथम राजेश पंडीत, द्वितीय शशांक लिमये तर तृतीय पारितोषिक संजय तोडणकर यांना मिळाले आहे. रंगभूषेत प्रथम कविता दिवेकर, द्वितीय प्रदीप पेडणेकर तर तृतीय पारितोषिक नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या 'या ही वळणावर' या नाटकासाठी माणिक कानडे यांना जाहीर झाले. संगीत दिग्दर्शनाचे प्रथम नंदलाल रेळे, द्वितीय विशाल गोळे तर तृतीय चंद्रकांत जाधव यांना जाहीर करण्यात आले आहे.

उत्कृष्ट अभिनयासाठी पुरूष कलाकारांमध्ये आरावसू, नाना (नाना भोळे १२ शनिपेठ, जळगाव), विनोद राऊत, श्रीकांत भिडे, वैजनाथ गमे, किशोर पुराणिक, सुशील इनामदार, संतोष साळुंखे, मिलिंद भणगे (नाशिक), ओमकार पाटील यांना पारितोषिके जाहीर झाली आहेत. स्त्री कलाकारांमध्ये किरण पावसे, नूतन पवने, सोनल आव्हाड, अपूर्वा कुलकर्णी (नाना भोळे १२ शनिपेठ, जळगाव), सोनल शिंदे, मृणाल वरणकर, संस्कृती रांगणेकर, वैभवी सबनिस, कविता गडकरी व धनश्री गाडगीळ यांना पारितोषिक जाहीर झाले.

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे पुढील रंगकर्मींना जाहीर झाली

आहेत. श्रृती कुलकर्णी, प्राजक्ता दशपुत्रे (नाना भोळे १२ शनिपेठ, जळगाव), प्रिती जाटे, रसिका पुंड (नाशिक), श्रृती कुलकर्णी, सुरेश जाधव, अनंत अभ्यंकर, सुरेश पवार, यशोधन गडकरी व नारायण खराडे यांना जाहीर झाली आहेत. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे २ ते २१ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या या अंतिम फेरीत एकूण १९ नाट्यप्रयोग सादर झाले. परीक्षक म्हणून दत्त भगत, बाबा पार्सेकर, विजयकुमार नाईक, अनिल गवस, सुरेंद्र केतकर यांनी काम पाहिले. ना‌िशकमधील कानडे, भणगे व पुंड या तीनही विजेत्यांचे रंगकर्मींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


असूरवेद नाटकाला प्रथम पा‌रितोषिक

अंतिम स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई संस्थेच्या 'असूरवेद' नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. या नाटकासाठी तीन लाखाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. द्वितीय क्रमांक सांगली येथील अॅक्टिव्ह ग्रुपच्या 'वृंदावन' नाटकाला जाहीर झाला. हे पारितोषिक दोन लाखाचे आहे. तर, जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालय संस्थेच्या 'नाना भोळे १२ शनिपेठ' या नाटकाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून, एका लाखाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रारूप आराखडा ४६४ कोटींचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हास्तरीय योजनांचा २०१६-१७ चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ४६४.७२ कोटींच्या प्रारूप आराखड्याला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी मान्यता दिली.

जिल्हा नियोजन भवनात यासंदर्भांत बैठक झाली. आदिवासी विकास सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, प्रकल्प अधिकारी मंजू लक्ष्मी, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त अशोक लोखंडे आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्याच्या आराखड्यांतर्गत आदिवासी विकास उपयोजनांसाठी ३९६.९० कोटी (टीएसपी), बिगर आदिवासी उपयोजनांसाठी (ओटीएसपी) ५४.८१ कोटी आणि माडा व मिनीमाडासाठी १३ कोटी नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला. यात मागासवर्गीय कल्याण १८५.९३ कोटी, रस्ते विकास ४६.४८ कोटी, लघुपाटबंधारे (० ते १०० हेक्टर) ४६.९६ कोटी, आरोग्य ३८.९१ कोटी या विकासयोजनांचा समावेश आहे.

आदिवासी मंत्र्यांच्या सूचना

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करा, असे आदेश ना. सावरा यांनी दिले. दुसऱ्या टप्प्यांतर्गत अंगणवाडी बालकांना अंडी व केळी देण्याचे नियोजन त्या तरतुदीतून करण्यात यावे. यावर्षी विकासकामांसाठीचा निधी वेळेवर खर्च होईल याचे नियोजन करा. दुर्गम भागात सोलर प्रणालीवर चालणाऱ्या लहान नळपाणी पुरवठा योजना उपयुक्त ठरणार असल्याने त्या प्रस्तावित कराव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या क्षमता ओळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे निराश झालेला शेतकरीवर्ग आत्महत्येला जवळ करीत असल्याचे भयावह चित्र सध्या देशात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्यातील क्षमतांची ओळख करून देण्याची गरज सध्या निर्माण झाली असल्याचे यावरून दिसून येते. ही गरज कृषी महोत्सवासारख्या प्रदर्शनातून होऊ शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र सरकारचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या 'जागतिक कृषी महोत्सव २०१६'चे डोंगरे वसतिगृहावर आयोजन करण्यात आले आहे. या सहा दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी अण्णासाहेब मोरे व श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी नाईक बोलत होते.

नाईक पुढे म्हणाले की, परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या करण्याची नकारात्मक भावना निर्माण होत आहे, ती टाळण्यासाठी मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. राज्य ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांनी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली. शेतीबरोबरच वनौषधी वनस्पतींचे जतन करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही यावेळी केले.

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांची मानसिकता सक्षम करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी समर्थ अॅग्रो विभाग, आयुष विभाग, आदिवासी विभाग, कृषी विभाग (शासन), पशुधन विभाग, बारा बलुतेदार विभाग या मुख्य कमानींचे उदघाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब तसेच दुष्काळग्रस्त आणि गरजू शेतकऱ्यांना यावेळी शेती उपयोगी साहित्य व शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले.यावेळी पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे, खासदार राजू शेट्टी, श्रीरंग बारणे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आदी मान्यवर उपस्थित होते.

सेवेकऱ्यांचे कुंभस्नान

राज्याचे ग्रामविकास, वित्त व नियोजन मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शेतकरी व सेवेकऱ्यांचे कुंभस्नान शुक्रवारी सकाळी रामकुंडावर पार पडले. गंगापूजनही करण्यात आले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींच्या शिक्षणाला गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

आदिवासी खेड्या-पाड्यांवरील मुलांना शिक्षणासाठी दररोज किमान तीन ते पाच कि.मी. पर्यंत पायी प्रवास करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेत नाशिकच्या रोटरी क्लबने गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्याचे निश्चित केले आहे. येत्या रविवारी (२४ जानेवारी) सुमारे ४० विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण केले जाणार आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोजच पायपीट करावी लागते. ही बाब हेरून रोटरी क्लबने साम‌ाजिक बांधिलकी जपण्याच्या इराद्याने या विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा स्तुत्य निर्णय घेतला. सायकलच्या सहाय्याने मुले शाळेपर्यंत पोहचतील व शाळेची उपस्थिती वाढीस लागणार आहे. त्रिंगलवाडी येथील दोड्याची वाडी येथे रविवार २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाता रोटरी क्लब ऑफ नाशिक ही सायकलची भेट गरजू विद्यार्थ्यांना देणार आहे. नाशिकच्या विजडम इंटरनॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून आपण वापरत असलेल्या सायकली या आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे सांगून रोटरीच्या माध्यमातून मदत करीत चाळीसपेक्षा अधिक सायकल दिल्या आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष रामकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकल वाटप केले जाणार आहे. रोटरी क्लबच्या वतीने अध्यक्ष विवेक जायखेडकर, कम्युनिटी सर्विस डायरेक्टर विजय दिनानी, आश्विन अलई आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

पंक्चरचे नो टेन्शन!

सायकल टायर ट्यूबलेस आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना वारंवार सायकल पंक्चर होण्याच्या त्रासापासून सुटका मिळणार असून पंक्चरचा खर्चही वाचणार आहे.

आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांची होणारी पायपीट या सायकलमुळे थांबेल. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची शाळेतील हजेरी वाढेल अन् त्यांच्या विकासालाही गती मिळले.

- विजय दिनानी, कम्युनिटी सर्विस डायरेक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वच्छतेचे सैनिक’मधून विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेत तर देवळाली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 'स्वच्छतेचे सैनिक' या पथनाट्यातून जनजागृती करीत शिंगवे बहुला येथे स्वच्छता करीत जनजागृती केली.

नगरसेवक बाबुराव मोजाड यांनी केलेल्या स्वच्छतेच्या आवाहनाला गावातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला यांनी हाती झाडू घेत अंबडवाडी, सोनेवाडी संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवली. प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी रहिवाशांना गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी उपाध्यक्ष सचिन ठाकरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, प्रभावती धिवरे, तानाजी करंजकर, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे, संतोष मेढे, चंद्रप्रीति मोरे, प्रकाश गोसावी यांनी हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विभागात अनागोंदी कारभार

$
0
0

vinod.patil@ timesgroup.com

नाशिक : एखाद्या विभागाचा कारभार हा त्या विभागाचा मंत्री किंवा प्रधान सचिव चालवतो हा समजच आदिवासी विकास विभागाने खोटा ठरवला आहे. या विभागातील वादग्रस्त ३१ कोटींच्या स्वेटर खरेदी प्रकरणात चक्क आदिवासी मंत्री व प्रधान सचिव यांना अंधारात ठेवून थेट कंत्राटदारांना कामाचे आदेश देण्यात आल्याचे उघड झाले आहे. स्वेटर खरेदीच्या कार्यादेशाबद्दल मंत्री विष्णु सावरा आणि सचिव राजगोपाल देवरा यांनी अनभिज्ञता दर्शवून संपूर्ण खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेमधील मुलांसाठी ३१ कोटींचे वूलनचे स्वेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, निविदा प्रकरणातील वादामुळे हिवाळा संपत आला तरी खरेदी झालेली नाही. महत्त्वाचे म्हणजे आदिवासी आयुक्तालयातर्फे स्वेटर खरेदीचा प्रस्तावच पाठविण्यात आला नव्हता. रेनकोट खरेदीचा प्रस्ताव असतांना स्वेटरची खरेदी केल्याचे आणि निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे `मटा`ने उघडकीस आणल होते. शुक्रवारी नाशिकमध्ये आदिवासी उपयोजनांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या सावरांना पत्रकारांनी या प्रकरणातील वस्तुस्थिती विचारल्यानंतर गंभीर प्रकार समोर आला. खरेदीला यापूर्वीच स्थगिती दिल्याचे सावरा यांनी सांगितले. परंतु, उपसचिव सु. ना. शिंदे यांनी ४ जानेवारीला प्रेस्टीज गारमेन्ट कंपनीला काम देण्याचे कार्यारंभ आदेश दिल्याचे पत्रकारांनी सांगितल्यानंतर मंत्री व सचिवांची बोबडी वळाली. मंत्र्यांनी व सचिवांनी असा खरेदी कार्यारंभ दिलाच नसल्याचा दावा करीत ३१ कोटींच्या कामांचे आदेश निघालेच कसे, असा उलटसवाल करण्यात आला. मंत्री अन् सचिवांनाही विषय माहिती नसतील तर या विभागाचा कारभार अन्य कुणी चालवतो का, हाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोंढेच्या विवाहाचा बार उडालाच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दुहेरी हत्याकांडात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करणाऱ्या भूषण लोंढे याला हायकोर्टाने ऐन लग्नाच्या दिवशी दिलासा दिला. दुपारच्या सुमारास भूषणचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने मंजूर केल्याने लोंढे परिवाराच्या दारात संध्याकाळच्या सुमारास सनई चौघडे वाजले. २५ जानेवारी रोजी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे.
दुहेरी हत्याकांडात सहभाग असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवल्यापासून नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण फरार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर असताना बुधवारी प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत नाशिक येथील कोर्टात भूषणच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला. मात्र, तो फेटाळण्यात आला. यानंतर लागलीच लोंढे यांनी हायकोर्टात धाव घेतली. गुरूवारी अर्ज दाखल करण्याची लगबग होती. शुक्रवारी भूषणचा विवाह असल्याने त्याचा अटकपूर्व फेटाळला जाणार की तो मंजूर होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. भूषणच्या अर्जावर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. भूषणच्या वतीने अॅड. अनिकेत निकम, अभिलाष सातपुते यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षातर्फे अॅड. डी. पी. अडसूळ यांनी काम पाहिले. भूषणवर सर्वांत उशिरा गुन्हा दाखल झाला असून, विवाहसारख्या विधिचा विचार करून त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने ४० हजार रूपयांच्या जामिनावर २५ जानेवारीपर्यंत भूषणचा अर्ज मंजूर केला. त्याला नाशिक जिल्हा सोडून भूषणला जाता येणार नाही, अशी अट कोर्टाने घातली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंपग कल्याणाची लोकभावना हवी

$
0
0

याप्रसंगी मंचावर समाज कल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त यशवंत मोरे, संगिता कोचुरे, रोटरीचे माजी प्रांत पाल दादासाहेब देशमुख, डॉ. सुनील सौंदणकर उपस्थित होते. समाजात वावरतांना सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व सेवाभावी लोकांनी लग्न, वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात, तोच पैसा कर्णबधिर अपंगासाठी करावा. कर्णबधिरांसाठी अपंग कल्याणाची लोकभावना निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली. कर्णबधीर, अपंगांसाठी शासकीय मदतीसाठी दारिद्रय रेषेखालील अट देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आमदार कडू यांनी दिली.

समाजातील दुर्लक्षित व्यक्तींवर काम करणाऱ्या संस्थांना सामाजिक भावनेतून इतरांनी मदत करण्याची गरज आहे. सरकार देखील अशा संस्थेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून मदत करीत असल्याचे यशवंत मोरे यांनी सांगितले. तसेच 'पडसाद' सारख्या कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे मत मोरे यांनी मांडले. परिषदेत देशभरातील कर्ण बधिरांसाठी काम करणारे २०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात कान, नाक, घसा तज्ज्ञ, वाचा व उपचार तज्ज्ञ, पुनर्वसन तज्ज्ञ व विशेष शिक्षक, संस्था यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. परिषदेचा समारोप शनिवारी (दि. २३) यशवंतराव मुक्त विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या उपस्थित होईल. परिषद यशस्वीतेसाठी पडसाद संस्थेचे शंतनू सौंदणकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप गोंधळे, सचिव सुनील सौंदणकर, भारती गुळवे, नलिनी काळकर प्रयत्न घेत आहेत.

सुचेता सौंदाणकर यांना पुरस्कार कर्णबधिरांसाठी गेल्या २५ वर्षांपासून काम करीत असलेल्या पडसाद संस्थेच्या प्राचार्या सुचेता सौंदणकर यांनी रोटरीचा श्रवणविकलांग सेवा पुरस्कार आमदार कडू व रोटरीचे माजी प्रांतपाल देखमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कर्णबधिरांची अविरत सेवा करत राहणार असल्याचे सौंदणकर यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोटक्लब खरेदीची सरकार करणार चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गंगापूर धरणाच्या ठिकाणी साकारण्यात आलेल्या बोटक्लबच्या ठिकाणी ८ कोटी रुपये खर्चून विदेशी बोटी आणण्यात आल्या आहेत. विविध प्रकारच्या परवानग्या मिळाल्या नसताना या बोटी खरेदी करण्यात आल्याने या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी केली. `तान`च्यावतीने आयोजित पर्यटन प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
नाशिकमधील वातावरण अल्हाददायक असल्याने पुण्या-मुंबईचे नागरिक नाशिकला येत असतात. गंगापूर धरण परिसरात तयार असलेला बोट क्लब जवळपास गेल्या वर्षभरापासून धुळखात आहे. यासंदर्भात माजी पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच याचा पाठपुरावा केला. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाने हा बोटक्लब चालविण्याबाबत निविदा काढल्या आहेत. येत्या १५ फेब्रुवारीपासून हा बोटक्लब सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, व्हिजीलन्स पथक सतर्क असल्यामुळेच आयसिसमध्ये जाणाऱ्यांना अटकाव होऊ शकला आहे. राज्याच्या सर्व भागातच सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. बीड येथे घडलेल्या घटनेबाबत शिंदे म्हणाले की, या प्रकरणातील चौकशीचे आदेश आधीच देण्यात आले आहेत. बळीराजाला न्याय दिला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images