Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

साडेसहा कोटींचा एलबीटी जमा

$
0
0
महापालिका हद्दीत २२ मे रोजी लागू करण्यात आलेल्या एलबीटी कराच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेला साडेसहा कोटी रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एलबीटी लागू झाल्यापासून ३१ मे पर्यंत आयात झालेल्या मालावरील हा महसूल आहे.

११७ खडी क्रशरबाबत आज निर्णय

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील ११७ खडी क्रशरला परवानगी देण्याबाबत मंगळवारी निर्णय होणार आहे. या क्रशरला परवानगी मिळाल्यास जिल्ह्यातील अनेक विकास कामांना दिलासा लाभणार आहे. मात्र, मंजुरी न मिळाल्यास खडी, क्रशरचा प्रश्न अत्यंत गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

शाळेच्या सुरक्षिततेचे तीन तेरा

$
0
0
जूनचा पहिला पंधरवडा म्हणजे शाळा सुरू होण्याची लगबग. जवळपास दोन महिने बंद असलेल्या शाळा १५ जूनच्या आसपास सुरू होतात. ऐन पावसाळ्यात सुरू होणा-या या शाळांच्या इमारती विद्यार्थ्यांना धोकादायक ठरण्याची शक्यता दरवर्षीच असते. महापालिकेच्या शाळांबाबतीत ही समस्या प्रामुख्याने भेडसावते.

आमच्या पाल्यांचाही विचार करा

$
0
0
रासबिहारी शाळेने सरकारी सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे दाखले दिल्याने शिक्षण विभागाने शाळेला मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

मान्सुनकाळात विभागांमध्ये समन्वय हवा

$
0
0
मान्सुन काळात संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन नाशिक विभागातील सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा अशा सुचना विभागीय आयुक्त रविंद्र जाधव यांनी दिल्या. आयुक्तालयात आयोजित केलेल्या मान्सुन-२०१३ पूर्व तयारी आढावा बैठकीत विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

मॅनेजमेंट शिका मुळापासूनच

$
0
0
ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मॅनेजमेंटच्या शिक्षणाच्या वाटा शोधण्यास सुरुवात करण्याऐवजी त्या विषयातील पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या एकत्रित कोर्सला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिली आहे.

'महावितरण'तर्फे तक्रार निवारण केंद्र सुरु

$
0
0
पावसाळ्यात विजेच्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी ग्राहकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले असून महावितरणने ग्राहकांसाठी तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित केले आहे.

ब्रेडची कथा

$
0
0
शहरात सगळीकडेच पावसाने हाल झाले असून मान्सुनमुळे झालेली परिस्थिती पूर्ववत आणताना महापालिका आणि महावितरण यादोन्ही विभागांना नाकीनऊ आले. सगळ्या विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमही देण्यात आला.

नाशिकमध्ये टर्मिनल मार्केट

$
0
0
कृषी मालाला चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्यात नाशिकसह मुंबई आणि नागपूर येथे अद्यावत टमिर्नल मार्केट उभारण्यात येणार आहे. मुंबईसाठी बाबगाव येथील ९२ एकर जागा पणन मंडळाने ताब्यात घेतली असून नाशिकमध्ये देखील पुढील कार्यवाहीची सुरूवात लवकरच केली जाणार आहे.

'अशोका'ने नाकारला प्रवेश

$
0
0
पालकांनी बेकायदेशीर वर्तणूक केल्याचे कारण देऊन विद्यार्थ्यांचे दाखले पाठवून दिलेल्या अशोका युनिव्हर्सल स्कूलने संबंधित विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

बाजार समित्यांनी विश्वास गमावला

$
0
0
शेतक-यांना व्यापारासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितींची सुरूवात करण्यात आली होती. मात्र, भ्रष्ट संचालक मंडळ आणि त्यांची पाठराखण करणा-या सरकारी अधिका-यांमुळे कृउबा समितीचा गाभा असलेला शेतकरीच बाजूला पडला आहे.

'यशस्विनी'तून व्हा स्वामिनी - खा.सुळे

$
0
0
'महिला कधीही हतबल किंवा बिचारी नसते. जेव्हा वेळ येते त्यावेळी ती पदर खोचून परिस्थितीशी दोन हात करते' असे सांगत 'यशस्विनी सामाजिक अभियाना'द्वारे आयुष्यातील यशाला गवसणी घाला' असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

मॅनेजमेंट कोटा म्हणजे डोनेशन घेण्याची परवानगी नाही !

$
0
0
'राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजेससह उच्च शिक्षण संस्थांमध्ये सरकारने ठरवून दिलेला १५ ते २० जागांचा 'मॅनेजमेंट कोटा' म्हणजे 'डोनेशन' घेण्याची परवानगी नाही' असे परखड मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

सायन्स प्रवेशासाठी विद्यार्थ्यांत चुरस

$
0
0
गुणवत्ता यादीच्या पद्धतीला फाटा देऊन काही वर्षांपासून राज्य माध्यमिक महामंडळाने गुणांची चुरस कमी केली. मात्र ज्युनिअर कॉलेजमध्ये सायन्स शाखेसाठी अॅडमिशन मिळविताना चुरस होणार आहे.

थकबाकीदारांची उद्या जाहिरात

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टॉप मोस्ट थकबाकीदारांची नावे गुरुवारी घोषित करण्याचा निर्णय बँकेचे प्रशासक ज्ञानेश्वर मुकणे यांनी घेतला आहे. यासंदर्भात थकबाकीदारांना पत्र देण्यात येत असून यामुळे थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

...तर नाशिकला बाजार समिती

$
0
0
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुटीचे प्रमाण चिंताजनक असून संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. यापार्श्वभूमीवर नाशिकला पुण्याच्या धर्तीवर प्रादेशिक बाजार समिती सुरू करण्याची शक्यता कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

गोदावरीत प्रदूषण सुरूच

$
0
0
गोदावरीच्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत मुंबई हायकोर्टाने प्रदूषण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असले तरी या आदेशाला महापालिका आणि पोलिसांनी थेट केराची टोपली दाखविली आहे.

गहाण खतावर एलबीटी नाही

$
0
0
बँकेकडून किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेताना करण्यात येणा-या गहाण खतावर स्थानिक संस्था कर (एलबीटी) न लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

'आरोप होतच असतात': सुळे

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर बोलताना 'आरोप व गॉसिप होतच असतात आम्ही त्याकडे दुर्लक्ष करुन कामावर लक्ष देतो' असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचारांच्या आरोपांना केराची टोपली दाखलवी.

सेफ्टी पण, महागली लेडीज होस्टल

$
0
0
शहरातील व्यावसायिक कॉलेजेसची संख्या जसजशी वाढत गेली तशी शहराबाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. बाहेरुन येणाऱ्या विद्यार्थीनींच्या सुरक्षेच्यादृष्टिने व‌िविध शिक्षण संस्थांनी लेडीज होस्टल्स उभारली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images