Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राममंदिर निर्मितीसाठी संत मंडळावर जोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीर्घकाळापासून चर्चेत असणाऱ्या अयोध्येतील राममंदिर उभारणीकरिता आता अखिल भारतीय स्तरावरही संतांचे मंडळ स्थापन करून सातत्याने हे मंडळ केंद्र सरकारच्या संपर्कात राहील. मंदिर निर्माणाच्या वाटेवरील अडथळे दूर सारण्यासाठी हे मंडळ कार्यरत राहील, असा ठराव विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित संत संमेलनात मंजूर करण्यात आला.

यावेळी सामाजिक समरसता, जनगनणा आणि गोहत्याबंदी या विषयांवरील ठरावही मंजूर करण्यात आले. जनगणनेसंदर्भात मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार देशातील राज्य आणि केंद्र सरकारला आवाहन करण्यात येणार आहे. यानुसार सर्वच समाजांसाठी देशभरात राष्ट्रीय समान जनसंख्या नितीच्या निर्मितीवर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. गो रक्षाविषयक ठरावही यावेळी मंजूर झाला. यानुसार गोवंश मांस निर्यातबंदी, कत्तलखान्यांना मिळणारे शासकीय अनुदान बंद करावे, देशात गो अभयारण्यांची निर्मिती, राज्य व केंद्र स्तरावर गोवंश संरक्षण संवर्धन मंत्रालयांची स्थापना, गोवंश हत्याबंदी कायद्याची निर्मिती या मुद्द्यांची अंमलबजावणी सरकारने करावी. सामाजिक समरसतेविषयीच्या प्रस्तावात सर्व समाजांसाठी मंदिरांची दारे खुले ठेवावीत, गावामध्ये पाणवठा, स्मशान ही ठिकाणी कुणासाठीही प्रतिबंधित नको, सर्व महापुरुषांचे उत्सव साजरे करण्यात यावेत, असे ठराव मंजूर करण्यात आले.

‍राममंदिरासाठी स्वतंत्र कायदा हवा

भाजप सत्तेत आल्यानंतर अयोध्येत राममंदिर उभारणीची अपेक्षा सरकारकडून आहेच. मात्र त्यासाठी स्वतंत्र कायद्याच्या निर्मितीची आवश्यकता वाटते, असेही प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिर निर्माणाच्या रस्त्याप्रमाणे कायदा निर्मितीसाठी केंद्राला प्रस्ताव पाठविण्याचे पुढचे पाऊल असेल, असेही ते म्हणाले.

कृषिक्षेत्रावर भर हवा

विकासाच्या दृष्टीने विचार करता स्वस्त आणि समान शिक्षणाचा पर्याय प्रत्येकासाठी आजमितीला उपलब्ध नाही. या पर्यायापर्यंत पोहचण्यासाठी केवळ त्यावरील तरतूद वाढविणे हे सरकारच्या हाती आहे. बेरोजगारीच्या प्रश्नावरील उपाय शोधताना सरकारला शेतीच्या विकसनावर लक्ष केंद्रित

करावे लागेल. या क्षेत्रात अद्याप ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सरकारकडून होणे अपेक्षित आहे. कुंभाच्या नियोजनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

... तो तर औरंगजेबच!

कुंभादरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील काही विकासकामे साकारताना अधिकाऱ्यांनी या शहरांमध्ये काही मंदिरांना धक्का लावला होता. या संदर्भात टिप्पणी करताना संबंधित नियंत्रक अधिकाऱ्याला तोगडिया यांनी औरंगजेबाची उपमा दिली. सांस्कृतिकदृष्टया नाशिक व त्र्यंबक सारखी शहरे कळसस्थानी असल्याने मंदिरांचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनयभंगप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

मोबाइल गहाळ झाल्याबाबत विचारणा करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. शरणपूर रोडवरील वसंत मार्केट परिसरात ही घटना घडली. शुक्रवारी (दि. ४) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. जमिन व्यवहाराच्या कामासाठी ही महिला पतीसमवेत आली होती. त्यावेळी तिचा मोबाइल गहाळ झाला. महिलेने दोघांकडे मोबाइलबाबत विचारणा केली. त्यावेळी दोघांनी तिचा विनयभंग केला. यावेळी झालेल्या झटापटीत तिचे मंगळसूत्र गहाळ झाले. महिलेने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकावर प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व जेष्ठ साहित्यिक कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू असतांनाच अशाच प्रकारची घटना बागलाण तालुक्यातील जायेखडा येथे सोमपूर शिवारात घडली. पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दगा तुळशिराम ठाकरे (वय ६७) या जेष्ठ नागरिकांवर अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने प्राणघात हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. दगा ठाकरे नाशिक येथील खासगी रुग्‍णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. जायखेडा पोलिसांनी सदरचा प्रकार मोटर अपघात म्हणून दाखल केला असताना प्रत्यक्षात दि. ६ रोजी दुपारी ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दगा तुळशिराम ठाकरे हे आपल्या पत्नी समवेत जायखेडा येथे शेती व्यवसाय करतात. त्यांना तीन मुली असून, तिघे बाहेरगावी असतात. दि. ३ ऑगस्ट गुरुवार रोजी पहाटे ५ ते ५. ३० वाजेच्या सुमारास नित्यनियमाप्रमाणे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. जायखेडा-सोमपूर रोडवर अज्ञात व्यक्तीने पाठीमागाहून येत दगा ठाकरे याच्या डोक्यावर, पाठीवर सपासप वारून करून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ते गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध अवस्थेत जागीच पडले. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने मालेगाव येथील खासगी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. ते मृत्युशी झुंज देत असताना जायखेडा पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांनी या घटनेची सखोल चौकशी न करता थेट मोटर अपघात दाखल करून प्रकरण दाबण्याच्या प्रयत्न केला असल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर दगा ठाकरे यांच्या कन्या जयश्री नितीन कंरबळकर (वय ३४ रा. कल्याण जि. ठाणे) यांनी या झालेल्या प्रकाराची माहिती घेत दगा ठाकरे यांच्यावर प्राणघात हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आणून देत रविवार दि. ६ रोजी दुपारी ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र होळकर करित आहेत.

हल्ला झालेले दगा तुळशिराम ठाकरे हे अद्यापही बेशद्ध अवस्थेत असल्याने माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत मोटार अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, चौकशीनंतर जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- राजेंद्र होळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब! राज्य नाट्यस्पर्धेसाठी २५० एन्ट्रीज

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

नाशिक : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिकहून तब्बल २५० एन्ट्रीज गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षापर्यंत १५ पेक्षा जास्त एन्ट्रीज न मिळालेल्या केंद्रासाठी अचानक २५० एन्ट्रीज कशा गेल्या हे गणित न समजणार आहे. नाशिक केंद्र वाचविण्यासाठी हे गौडबंगाल करण्यात आले की काय, असा संशय येतो आहे. या एन्ट्रीज डमी असल्याची शक्यता एका ज्येष्ठ रंगकर्मीनेही व्यक्त केली आहे.

राज्य नाट्यस्पर्धेसाठी इतक्या एन्ट्री आल्या कोठून हा मोठा संशोधनाचा भाग आहे. यापैकी निम्म्या एन्ट्रीज व्हॅलिड धरल्या गेल्या, तर त्याचा पुढील नाट्यस्पर्धांवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. कारण जून-जुलै महिन्यात एन्ट्रीज येण्याची प्रोसेस सुरू होते. नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा आटोपतात. त्यानंतर निकाल व इतर बाबींना काही महिने लागतात. आता २५० एन्ट्रीज आल्या असतील व त्यातील निम्म्या सादर करण्याची परवानगी देण्यात आली तर त्यासाठी जानेवारी उजाडण्याची चिन्हे आहेत. राज्य नाट्य स्पर्धेचे पारंपरिक रूपडे आमूलाग्र बदलून ही स्पर्धा अधिकाधिक प्रेक्षकाभिमुख करण्यासाठी सांस्कृतिक संचलनालयाने मध्यंतरी काही दणकेबाज निर्णय घेतले. राज्यनाट्य स्पर्धा म्हणजे केवळ उपचार असा प्रत्यय गेल्या काही वर्षांपासून येत असताना संचालनालयाने समन्वयकाला काही विशेष अधिकार दिले. स्पर्धेतील पारदर्शकता वाढावी यासाठी रंगकर्मींना गुणाची वर्गवारी समजण्याची पध्दत रूढ करण्यात आली. तिन्ही क्रमांकाच्या पारितोषिकांत भरघोस वाढही करण्यात आली. जुनी संहिता वापरण्याची परवानगी देण्यात आल्याने ज्येष्ठ रंगकर्मींचा सहभाग अचानक वाढून गेला. त्यांचे मार्गदशनही तरूण कलावंतांना मिळत आहे. स्पर्धा प्रेक्षकाभिमुख करताना नाटकाचे तिकिट विकण्यासाठी संस्थांना प्रोत्साहन दिले जात असल्याने नाट्यगृहात गर्दी तर होतेच; सोबतच तिकिटाचा परतावा वाढवून दिल्यामुळे संस्थाही भरभरून काम करताना दिसत आहे. या सर्वांचा फायदा व पारितोषिकाची वाढलेली रक्कम पाहून अनेक संस्थांनी एन्ट्रीज दिल्याची शक्यता नाकारता येत नाही.

डमी एन्ट्रीजलाही तितकाच वेळ

स्पर्धेसाठी २५० एन्ट्रीज आल्या असल्याने त्यांची छाननी करणे, वेगवेगळी कागदपत्रे जोडणी करणे, अर्ज तपासून फाईल तयार करणे यासाठी तितकाच वेळ लागणार आहे. सगळे अर्ज तपासणे हे सांस्कृतिक संचलनालयाच्या नाट्य विभागाला भलतेच जड जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस कमी झाल्याने रानभाज्या दुर्मीळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्रावण महिना सुरू झाला की विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारात दाखल होतात. यावर्षी पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे श्रावण महिना अर्धा संपत असताना अत्यल्प प्रमाणात रानभाज्यांचे आगमन होताना दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यामधील बाजारात काही प्रमाणात रानभाज्या विक्रीसाठी यायला सुरुवात झाली आहे. या रानभाज्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने व रासायनिक विद्राव्यापासून मुक्त असणाऱ्या या रानभाज्या असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यंदा हरसूल, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, वणी, नांदुरी व सापुतारा या परिसरातून रानभाज्या विक्रीसाठी आलेल्या आहेत.

पावसाळा सुरू झाला की, नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागातील डोंगरकपारी व घनदाट जंगलात राहणारा आदिवासी समाज आपल्या परिसरातील निरनिराळ्या रानभाज्या विक्रीसाठी शहरी भागात व तालुक्याच्या ठिकाणी घेऊन येत असतो. या भाज्यांमध्ये कर्टोली, शेवळा, जाईचा मोहोर, कोळीची भाजी, करडई, खुरासनीची भाजी व टाकळा, लाल माठ, चाकवत, तांदुळका आदी रानभाज्यांचा प्रामुख्याने समावेश असतो. यामध्ये सर्वाधिक मागणी कर्टोली, जाईचा मोहोर व खुरासनीची भाजीला असते. सध्या कर्टोली ही १६० रुपये किलोने विकण्यात येत आहे. व बाकीच्या भाज्या ह्या वाट्याने दिल्या जातात.

कर्टोली ही भाजी चढ्या भावाने विकली जात असली तरी या भाजीला सर्वाधिक मागणी आहे. कर्टोली ही भाजी सध्या अनेक बागांमध्ये पिकवली जाते पण आदिवासी भागात दऱ्याखोऱ्यात पिकवलेल्या कर्टोली या भाजीला फार मोठी मागणी आहे. या सर्व भाज्या औषधी असल्यामुळे नागरिकांचा सर्वाधिक कल या भाज्या खरेदी करण्याकडे असतो. या परिसरातल्या आठवडा बाजारातही या भाज्या मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात.

पावसाळ्यात पोटाचे अनेक त्रास संभवतात. पालेभाज्या या आजारांमध्ये भर टाकणाऱ्या असतात. त्यामुळे रानभाज्या खाल्ल्या तर त्या शरीरासाठी अत्यंत उत्तम असतात. पावसाळ्यात इतर पालेभाज्या मिळत नाही अशावेळी या रानभाज्या गरज भागवू शकतात. या भाज्या उष्ण नसतात, त्यामुळे वात पित्तासारखे विकार होत नाहीत तसेच त्या तात्काळ शक्ती देणाऱ्या असतात. फक्त या भाज्यांमध्ये शेंगदाणे टाकून खाऊ नयेत कारण मग त्या पचायला जड होतात. त्याऐवजी तीळाचा कुट, खोबरे टाकावे

- वैद्य विक्रांत जाधव

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी रानभाज्या पहावयास मिळत आहेत. श्रावण महिना संपत आला असूनही अजूनही हव्या त्या प्रमाणात भाज्या विकायला आलेल्या नाहीत. आदिवासी पाड्यांमधून आतापर्यंत या भाज्या यायला हव्या होत्या परंतु, पाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने या भाज्या येऊ शकलेल्या नसाव्यात.

-रमेश सूर्यवंशी, भाजीविक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामुळे दह‌ीहंडी रितीच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दुष्काळ, सिंहस्थ कुंभमेळा आणि स्वाईन फ्ल्यूची साथ याचा परिणाम शहरातील दहीहंडी उत्सवावरही जाणवला. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक दहीहंडी मंडळांनी मोठ्या दही हंड्या रद्द केल्याने नागरिकांच्या उत्सवावर पाणी फेरले. मात्र, मंदिरांमध्ये पारंपारिक पध्दतीने कृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

ऐरवी दहिहंडीच्या उत्साहात आनंद लुटणारी तरुणाई शहरात आज दिसत नाही. शहरातील अनेक मंडळांनी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने दहीहंड्यांचे आयोजन झाले नाही. अनेक वर्षापासून ऊर्जा प्रतिष्ठानतर्फे शहरात दहीहंडी उत्सव सादरा केला जातो. मुंबईतील अनेक गोविंदा पथके यात सहभागी होत असल्याने नाशिककरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला होता; मात्र सध्या शहरात सिंहस्थाचा माहौल आहे. पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असल्यामुळे ऊर्जा प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रविवार कारंजा, भद्रकाली, पंचवटी विभागात लहान मोठ्या अनेक दहीहंड्या फोडल्या जातात; परंतु सिंहस्थातील गर्दी लक्षात घेता व वाहतुकीचे नियोजन पहाता यंदा मंडळांनी दहीहंडीचे आयोजन रद्द केले. ओझर येथील रावसाहेब कदम हेल्थ क्लबच्या वतीने होणारी जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी यंदा होणार असल्याची माहिती यतीन कदम यांनी दिली आहे. सार्वजनिक मंडळांच्या दहीहंडी उत्सवावर परिणाम झाला असला तरीही मंदिरांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कापड बाजारातील मुरलीधर मंदिरात तसेच द्वारका येथील इस्कॉन मंदिरात उत्साहात दहीहंडी महोत्सव सादरा करण्यात आला.

सिंधी कॉलनीत कार्यक्रम

जेलरोड येथील सिंधी कॉलनीत कृष्णा जयंतीचा कार्यक्रम झाला. नगरसेविका सविता दलवानी अध्यक्षस्थानी होत्या. राजन दलवानी यांनी स्वागत केले. स्मिता अमेसर, बीना अमेसर, ज्योती गारानी, राजन दलवानी, शंकर लखवानी, लालचंद बोजवानी, शंकर देवानी आदींची उपस्थिती होती. लक्ष्य थावरानी व अन्य मुलांनी कृष्णा-राधाची वेशभूषा केली. रात्री बाराला कृष्णाची आरती करण्यात आली व प्रसाद वाटप झाले.

कडक धोरणांचा परिणाम

राज्य सरकारने दहीहंडी पथकांना परवानगी देताना कडक धोरण स्वीकारल्याने मुंबईतील पथकांमध्येही घट झाली आहे. त्यामुळे मुंबईतील पथके दडीहंडी फोडण्याकरता इतर शहरात जाण्यास उत्सूक नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू संख्यावाढीचा विहिंपचा अजेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदू धर्मियांच्या घटत्या लोकसंख्येच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी ज्या हिंदू जोडप्यांना अपत्य होण्यास अडचणी आहेत, त्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी रविवारी तपोवनातील संत संमेलनात ते बोलत होते. या उपक्रमासाठी विहिंप खास वैद्यकीय हेल्पलाइन तयार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घरवापसी सारखे मुद्दे हिंदूहिताच्या नावाखाली अजेंड्यावर ठेवले होते. भाजप सत्तेत आल्यानंतर संघपरिवारातील संघटनांनी कार्यविस्ताराच्या मोहिमेला गती दिली आहे. आता संघ परिवारातील एक प्रमुख संघटना असलेल्या विहिंपने हिंदू जोडप्यांना अपत्य प्राप्तीसाठी वैद्यकीय मदतीचा मुद्दा जाहीर करून नव्या अजेंड्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

तोगडिया म्हणाले, की भारतामध्ये समूहनिहाय लोकसंख्येचा समतोल साधण्यासाठी हिंदू हिताच्या दृष्टिकोनातून या प्रकारच्या हिंदू कुटुंबाना वैद्यकीय मदत देण्याचा विहिंपचा दृष्टिकोन आहे. हिंदू कुटुंबांना विहिंपने गरजेनुसार मदतीचे धोरण ठेवले असल्याचे तोगडिया यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न मार्गी लावा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यातील गृहनिर्माण संस्थांचे प्रलंबित प्रश्न सामोपचाराने आठवडाभरात मार्गी लावावेत, अशी सूचना राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केली. मालेगाव तालुक्यातील गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाबाबत शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. सहकार विभागाचे उपनिबंधक जी. जी. बलसाणे, महाराष्ट्र राज्य सहकारी गृह वित्त महामंडळाचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक इ. एस. शिरसाठ, विभागीय वसुली अधिकारी आर. बी. साखला, विशेष वसुली अधिकारी मनोज पाटील, महेश मेखे, सहकार अधिकारी भाऊसाहेब अहिरे, योगेश्वर गृहनिर्माण संस्थेचे अवसायक मिलिंद पगारे आदी उपस्थित होते.

ना. भुसे म्हणाले, नागरिक मोठ्या कष्टाने घर घेतात. घराबाबत त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न तातडीने मार्गी लावले पाहिजे. त्यासाठी आवश्यक कार्यवाही निर्धारीत वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. गृहवित्त महामंडळाच्या थकबाकीप्रकरणी सामोपचाराने मार्ग काढावा. त्यासाठी संबंधितांच्या उपस्थितीत पुन्हा एक बैठक घेत सविस्तर अहवाल सादर करावा. गृहवित्त महामंडळाच्या कर्जाची परतफेड केल्यानंतरही सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद असेल, तर ती नोंद कमी करण्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवावी. यावेळी शहर व तालुक्यातील विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याचे सूक्ष्म नियोजन करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यात टंचाईसदृश परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक गावाच्या पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. मालेगाव येथे आयोजित ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांची कार्यशाळा व दुष्काळ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, अप्‍पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, तहसीलदार दीपक पाटील, चंदनपुरीच्या सरपंच योगिता आहेर आदी उपस्थित होते.

ना. भुसे म्हणाले की, पाऊस कमी झाल्याने भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सर्व गावांचे सरंपच, ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे. तलाठी, ग्रामसेवक, महावितरण, कृषी आदी सर्व विभागांच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील चार दिवस गावात राहून गावकरी व शेतकऱ्यांचे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. येणाऱ्या काळात शासनाकडून जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी आदींनी पाण्याचा एकही थेंब वाया जाणार नाही असे प्रयत्न करताना प्रत्येक गावात 'एक गाव एक गणपती' उपक्रम हाती घ्यावा. पाणी वाया जाऊ नये यासाठी नळांना तोठ्या बसवाव्यात, असे आवाहनही ना. भुसे यांनी केले. मालेगावातील शिक्षकांनी स्वनिधीतून सुरू केलेल्या डिजिटल शाळा उपक्रमाचे भुसे यांनी कौतुक केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, अप्‍पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, प्रा. सी. जी. अहिरे यांनी उपस्थित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटींचे चेअरमन, पदाधिकारी यांना अधिकार व कर्तव्य, व्यावसायिक दृष्टिकोन याबाबत प्राथमिक माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीहंडी उत्सवातून दुष्काळग्रस्तांना मदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात गोकुळ जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात झाला. बारा बंगला परिसरातील मालेगाव युवा संघटनेतर्फे आयोजित दहीहंडी तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून समर्पित करण्यात आल्याने वेगळी ठरली. यावेळी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून ५१ हजारांची आर्थिक मदत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना दिली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष देवा पाटील यांनी दिली. तसेच आगमी गणेश उत्सवात देखील अशा स्वरूपाची मदत उभी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मालेगाव युवा संघटनेतर्फे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, सध्या तालुक्यात असलेली दुष्काळ परिस्थिती पाहता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या उत्सवाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून दहीहंडी उत्सवाच्या उलाढालीतून आणि नागरिकांना आवाहन करून ५१ हजाराचा निधी जमवण्यात आला. यावेळी दोन दहीहंडी उभारण्यात आल्या होत्या. यापैकी छोटी दहीहंडी ही भायगाव येथील अनाथ आश्रमाला आर्थिक मदत करण्यासाठी होती. याच आश्रमातील मुलांनीच ही दहीहंडी फोडली व संघटनेतर्फे ११ हजार देणगी देण्यात आली. मोठी दहीहंडी फोडण्याचा मान जय बजरंग मंडळ दरेगाव यांनी पटकावला. यावेळी उपस्थित जनसमुदायाने दुष्काळग्रस्तांना सढळ हाताने मदत केली. या उत्सवासाठी अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, पोलिस उपअधीक्षक महेश सवाई, पोलिस निरीक्षक राम भलसिंग, मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले आदी मान्यवरांसह शहारवासीय मोठ्या स्ंख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांनी घेतली टंचाई आढावा बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

पावसाअभावी येवला मतदारसंघात निर्माण झालेली तीव्र टंचाई परिस्थिती, गावोगावी उभं राहिलेलं पिण्याच्या पाण्याचं भयाण संकट, खरिपाच्या पिकांची लागलेली वाट अन् जनावरांच्या चाऱ्याचा अनेक ठिकाणी निर्माण झालेला मोठा प्रश्न लक्षात घेता राज्याचे माजी मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सोमवारी दुपारी येवला तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली.

शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध संस्थांचे प्रतिनिधी यांच्या या संयुक्त आढावा बैठकीत मतदारसंघातील भीषण दुष्काळाच्या दाहकतेवर सखोल चर्चा करताना विविध सूचना करण्यात आल्या. येवला तालुक्यात निर्माण झालेली पाणीटंचाई बघता येवला नगरपालिकेच्या मालकीची सध्या बंद असलेली कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली. या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनास प्रखर विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील धामणगाव, बेलगाव तऱ्हाळे व गंभीरवाडी येथील २२९ हेक्टर सुपीक व बागायती जमीन संपादित करण्यासाठी लष्कराने हालचाली सुरू केल्या आहेत. या भूसंपादनास शेतकऱ्यांकडून प्रखर विरोध होत आहे. या गावातील शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे व आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन भूसंपादनास विरोध केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही ‌दिले.

तालुक्यात आजपर्यंत लष्कर, धरणे, महामार्ग, रेल्वे, पेट्रोल लाइन, औद्योगिक वसाहत या कारणांसाठी हजारो हेक्टर जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. सध्या देवळाली आर्टीलरी सेंटर येथील लष्कराच्या मैदानी सरावासाठी धामणगाव, बेलगाव तऱ्हाळे व गंभीरवाडी येथील जमिनीची लष्कराने मागणी करून भूसंपादन प्रक्रिया सुरू केल्याने या गावातील गरीब शेतकरी भयभीत झाले आहेत. त्यांच्या बागायती जमिनी संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याने महिनाभरापासून या गावांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. खासदार हेमंत गोडसे व आमदार राजाभाऊ वाजे यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर मार्गाने लढाई करून एक इंचही जमीन न देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याने आज या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेतली व आपल्या व्यथा मांडल्या.

वरील तिन्ही गावे आदिवासी अधिसुचित असल्याने भूसंपादन करण्यासाठी कलम ४१ नुसार ग्रामसभेचा ठराव करणे महत्त्वाचा आहे. मात्र, या तीनही गावांनी ग्रामसभेत स्पष्टपणे लष्कराच्या भूसंपादनास विरोध करून तसा ठराव केला आहे. त्या ठरावाची प्रतही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. या शिष्टमंडळात पंचायत समिती उपसभापती पांडूरंग वारुंगसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील वाजे, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब गाढवे, पांडूरंग गाढवे, पुंजाराम गाढवे, सरपंच दत्ता बांबळे, नंदुभाऊ गाढवे, रामचंद्र गाढवे, त्र्यंबक बरतड, भरत घुमरे, विष्णू वारुंगसे, विजय कर्डक, बाळकृष्ण वारुंगसे, पंढरीनाथ वारुंगसे, सोमनाथ वारुंगसे, योगेश वारुंगसे, संतोष वारुंगसे, सखाराम तातळे, किशोर हेमके, विलास गाढवे, तानाजी गाढवे आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम आरक्षणासाठी अल्पसंख्यांक रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे यासाठी जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आरक्षणाची मागणी राज्य सरकारने मान्य केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

काँग्रेस कार्यकर्ते दुपारी बारा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित जमले. त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 'हम है हिंदुस्थानी, नही चलेगी तुम्हारी मनमानी', 'लेके रहेंगे लेके रहेंगे, हमारा मुस्लिम आरक्षण लेके रहेंगे' यासारख्या घोषणा करण्यात आल्या. राज्यातील मुस्लिम समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि स्थिती अत्यंत हलाखीची आणि बिकट आहे. केद्र सरकारने न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने संपूर्ण देशाचा दौरा करून मुस्लिम समाजाच्या विद्यमान परिस्थितीचा अभ्यास केला. समाजातील कमकुवत घटकांना आरक्षण आवश्यक असल्याचे मत त्यावेळी मांडण्यात आले. उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजासाठी काही बाबतीत आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरविला. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या युती सरकारने मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. युती सरकार जातीभेदाचे आणि सुडबुध्दीचे राजकारण करीत असल्याचा आरोप यावेळी अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनीफ बशीर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, समिना मेमन, रईस शेख, जावेद इब्राहिम, सैय्यद शफिक, अख्तर कोकणी, इसाक कुरेशी, मारुक कुरेशी आदी या आंदोलनामध्ये सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या मागणीसाठी बँकेसमोर साखळी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

गंगापूर-गोवर्धन गावातील सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था या बँकेला शेतकऱ्यांसह कर्ज पुरवठा करणाऱ्या सेंट्रल बँक आँफ इंडिया टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी सोमवारी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी सेंट्रल गोदावरी बँकेचे सर्व संचालक शेतकऱ्यांसह उपोषणात सहभाग घेतला.

सेंट्रल गोदावरीचे संचालक नगरसेवक दिनकर पाटील यांनी सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसांपूर्वी निवेदन देत शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवठा करण्याची मागणी देखील केली होती. परंतु, सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज देण्याबाबत टाळाटाळ केल्याचा आरोप करीत सोमवारी शेतकऱ्यांसह संचालक मंडळाने सातपूर एमआयडीसीत असलेल्या सेंट्रल बँकेसमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. सेंट्रल बँकेला दिलेल्या निवेदनात २५ वर्षांपासून सेंट्रल गोदावरी बँकेतील सभासद असलेल्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा वेळवर भरणा केले असल्याचे म्हटले आहे. तसेच एकही शेतकऱ्याने बँकेचे कर्ज बुडविले नसून दुष्काळ असल्याने तत्काळ कर्ज पुरवठा व्हावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूर-नानेगांव रस्ता दुरुस्तीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

भगूर-नानेगांव रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे खासदार निधीतून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नानेगांव शिवसेना शाखेने खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भगूरहून नानेगांवकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्याने शाळेतील विद्यार्थी, कामगार वर्ग तसेच शेतकरी शहराकडे येतात. कधी रस्त्याच्या कडेच्या पथदीप देखील बंद असतात. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे चुकवित जीव मुठीत धरून वाहनचालकांना प्रवास करावा लागतो. भविष्यात याठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांना या जीवघेण्या समस्येपासून मुक्त करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी माजी सोसायटी चेअरमन विलास आडके, माजी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, प्रमोद आडके, नवनाथ शिंदे, सचिन भोर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आनंदोत्सवात विघ्न आणण्याचे उद्योग

$
0
0

महंत बिंदू महाराज यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थावर परिणाम होण्याच्या हेतूने साध्वी शिवानी दुर्गा सारख्या धर्माचार्यांबाबत अंधश्रध्दा निर्मूलन चर्चा घडवत आहे. यामागे हिंदू धर्माच्या विरोधी शक्ती कार्यान्वित झाल्या असून, हिंदुधर्माचा हा विश्वव्यापी मेळा यशस्वी होऊ नये म्हणून काही लोकांचे प्रयत्न सुरू असल्याचे जाणवत आहे, असे मत महंत डॉ. बिंदुजी महाराज यांनी व्यक्त केले.

श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील भेद त्यांनी प्रथम स्पष्ट केला पाहिजे. हिंदू धर्मातील वेदपुराण शास्त्र यांच्यातील तंत्रमंत्र, औषधी विद्या यांना खोटे ठरविण्याचा नाहक अट्टाहास करू नये. अंधश्रध्दा केवळ हिंदुधर्मातच आहे आणि इतरत्र नाही असा समज असेल तर तो दूर करावा आणि डोळसपणे या थोर परंपरेचा अभ्यास करावा, असे आवाहन बिंदू महाराज यांनी केले. त्र्यंबक येथे कुंभमेळा भरला आहे. बारा वर्षांनी एकदा हा योग आला आहे. येथे विश्वातून थोर साधना करणारे साधक, साधू-महंत आलेले आहेत. त्यांच्या ज्ञानाचा लाभ घ्यावा. धर्मचर्चा घडावी आदी अपेक्षित असताना नको त्या विषयाला महत्त्व दिले जात आहे. येथील कुंभमेळ्यास बाधा आणण्याचा उद्योग होत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

साध्वी शिवानी दुर्गा काही अनुष्ठान साधना करणार असेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेने काही फायदा होणार असेल तर त्यात गैर काहीच नाही. त्याबद्दल त्यांनी काही आर्थिक मागणी केली नाही की काही शोषण केलेले नाही. वेदशास्त्रातील आयुर्वेद मान्य आहे. त्यातील औषधी प्रमाण सिध्द झाले आहे. मग, त्याच वेदातील मंत्र खोटे कसे असा सवाल त्यांनी केला आहे.

धर्माच्या पवित्र ग्रंथांच्या ज्ञानाला उगीचच कमी लेखण्याचे कारण नाही. ध्यानधारणा, साधना, योग मंत्रतंत्र ही उपासनेची विविध अंगे आहेत. त्यांना अंधश्रध्देच्या नावाने दूर ठेवल्यास संस्कृतीचे, परंपरेचे मोठे नुकसान होणार आहे याची दखल घ्यावी, असे देखील त्यांनी नमूद केले. सिंहस्थ कुंभपर्वाच्या या आनंदोत्सवात मिठाचा खडा टाकण्याचे उद्योग पूर्वीपासून होत आहेत, असे देखील ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक दर्शन’च्या सिंहस्थातही गटांगळ्या!

$
0
0

महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे प्रवासी लांबच

नाशिक : सिंहस्थासारख्या वैश्विक सोहळ्च्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वर मध्ये दररोज शेकडो भाविक, पर्यटक येत असले तरी परिवहन महामंडळाच्या नाशिक दर्शन बसला प्रवासी मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. महामंडळाचाच नाकर्तेपणा यास कारणीभूत ठरत असून, योग्य प्रचार आणि प्रसाराअभावी सिंहस्थातही मोजकेच प्रवासी नाशिक दर्शन करीत असल्याचे वास्तव आहे.

दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण १० हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा प्रकारच्या या महाकाय संधींचे सोने करण्यासाठी सर्व पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, शाही पर्वणीच्या दिवशी प्रवाशांच्या सेवेचा विडा उचलून तब्बल तीन हजार बसचे नियोजन करणाऱ्या राज्य परिवहन मंडळाला मात्र सिंहस्थाच्या संधीचे सोने करण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील महत्त्वाच्या ठिकाणांचे पर्यटक व भाविकांना दर्शन घडविणारी नाशिक दर्शन बससेवा महामंडळाकडून चालविली जाते. गेल्या काही वर्षांपासून ही सेवा मोठ्या गटांगळ्या खात आहे. सिंहस्थानिमित्ताने ही सेवा वेग घेईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. सिंहस्थाची पहिली शाही पर्वणी उलटून गेल्यावरही नाशिक दर्शनची बससेवा अवघे काही प्रवासीच घेत असल्याचे दिसून येत आहे. एरवी रडत खडत असणारी ही सेवा सिंहस्थात दररोज तीन ते चार बसद्वारे दिली जाईल, अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात या सेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असला तरी महामंडळाने मूग गिळून बसणेच पसंत केले आहे.

असा येतो अनुभव

नाशिक दर्शन बससेवेबाबत नवीन सीबीएसच्या ठिकाणी चौकशीसाठी गेलेल्या प्रवाशांना जुन्या बसस्थानकाची वाट दाखविली जाते. मात्र, तेथे गेल्यानंतर या बसचे बुकिंग करण्यासाठी नवीन सीबीएसला जाण्याचे सूचविले जाते. बुकिंग नवीन सीबीएसला आणि गाडी जुन्या सीबीएसवरून सुटत असल्याने महामंडळानेही या नियोजनात गोंधळच आहे.

प्रचार, प्रसाराचा अभाव

सिंहस्थात येणाऱ्या भाविक व पर्यटकांनी नाशिक दर्शन बससेवेचा लाभ घ्यावा यासाठी महामंडळाच्यावतीने कुठल्याही प्रकारच्या प्रचार आणि प्रसार केलेला नाही. त्यामुळे नाशकात आलेल्या भाविक व पर्यटकांनाही या बसबाबत फारशी माहिती नाही. परिणामी, सेवेला अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्यांचा प्रशासनाला अल्टिमेटम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

पहिल्या शाहीस्नानावेळी कुशावर्तावर साधू आणि भाविकांना दिलेल्या वागणुकीची पुनरावृत्ती होणार नाही, याची प्रशासनाने १२ सप्टेंबरपर्यंत लेखी हमी द्यावी, अन्यथा त्या दिवशी सर्व आखाड्यांची बैठक घेऊन कुशावर्तात देवतांना विधीवत स्नान घालून सर्व आखाड्याचे साधू त्र्यंबक येथून प्रस्थान करतील, असा इशारा आखाडा परिषदेने प्रशासनाला दिला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे जुना आखाडा निलपर्वतावर आखाडा परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज होते. महामंत्री हरीगिरी महाराज, स्वामी सागरानंद सरस्वती, महंत रामानंद पुरी, महंत गोविंदानंद ब्रह्मचारी, महंत उदयगिरी महाराज, महंत रमेशपुरी महाराज, महंत सत्येंद्रगिरी महाराज, महंत शंकरानंद महाराज, महंत प्रेमानंद महाराज, धनराजगिरी महाराज, आशिषगिरी महाराज, महंत प्रेमगिरी महाराज, महंत जगतारमुनी महाराज, महंत राजेंद्रसिंह महाराज आदींसह सर्व आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्व आखाड्यांच्या संमतीने काही ठराव करण्यात आले. यामध्ये कुशावर्तावर स्नानासाठी अवघा ३० मिनिटांचा कालावधी देण्यात येतो तो सन १८३२ पासून तसाच आहे. वास्तविक पाहता दोनशे वर्षांत साधू व भाविक यांची संख्या वाढलेली असताना हा वेळ दुप्पट केला पाहिजे. कुशावर्त घाटापासून किमान ५० फूट अंतरापर्यंत पोलिस उभे करण्यात येऊ नयेत आदी महत्त्वपूर्ण ठराव झाले. कावनईप्रमाणे विविध ठिकाणी स्नान होत आहे, त्यास शासनाने पर्वस्नान म्हणावे. शाहीस्नान असा उल्लेख करण्यात येऊ नये. शाहीस्नान केवळ कुशावर्त आणि रामघाट येथे होते व ते निश्चित मुहूर्तावरच आहे. तसेच, विविध आश्रमात ध्वजा उभारल्या आहेत. त्यांना आखाड्यांची धर्मध्वजा म्हणून मान्यता नाही व अशा कार्यक्रमांना आखाडे उपस्थित नसतात, याची दखल घेण्यात यावी असे महत्त्वाचे ठराव संमत झाले. त्याचप्रमाणे उदयगिरी महाराज यांनी अंजनेरी येथील श्री गणेश व कार्तिकमुनी यांच्या मूर्ती पुर्नस्थापित केल्या पाहिजे, अशी मागणी केली. साधूंनी कुशावर्त तीर्थ हरिद्वारप्रमाणे अधिक मोठे करावे, परिसर वाढवावा त्याकरिता बाधीत होतील अशा नागरिकांना भरपाई देण्यात यावी, अशी चर्चा झाली.

दिनांक २८ऑगस्ट रोजी शासनाने बैठक घेऊन आश्वासन दिले होते मात्र ते पाळले नाही म्हणून येत्या चार दिवसात शासनाने बैठक घ्यावी. दि. १२ सप्टेंबरपर्यंत वरील बाबतीत लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा दुसऱ्या म्हणजेच १३ तारखेच्या मुख्य शाहीस्नानात आखाडे सहभागी होणार नाहीत. फक्त देवताना स्नान घातले जाईल. यानंतर साधू-महंत प्रस्थान करतील, असा इशारा देण्यात आला.

बैठकीनंतर महामंत्री हरीगिरी महाराज यांनी नाशिक येथे जंगलीदास महाराज आणि वैष्णव आखाडे यांच्यात झालेला संघर्ष खेदजनक असल्याचे मत व्यक्त केले. सनातन साधूंनी हिंदुंच्या कोणत्याही मिरवणुकीचे स्वागतच केले पाहिजे, तशी आपली परंपरा आहे असे सांगितले.

शासन सध्या जाहिरातीत ग्यानदास यांच्या छायाचित्राचा वापर करीत आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. त्याऐवजी नागासाधूंचे स्नान, पेशवाई व शाही मिरवणुका यांचे छायाचित्र वापरावे. सिंहस्थ कुंभमेळा कोणा एका व्यक्तीशी केंद्रित करू नका. तसेच सिंहस्‍थाचा त्र्यंबक-नाशिक असा उल्लेख केला पाहिजे, अन्यथा याच्या परिणामास शासन सर्वस्वी जबाबदार राहील.

- श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोदावरी नदीला मातेसमान माना’

$
0
0

नाशिक : नाशिकमधील गोदावरी तटाचा आणि पंचवटी क्षेत्राचा उल्लेख रामायणासारख्या पूजनीय ग्रंथात आढळून येतो. प्राचीन काळापासून उपकारक मानली गेलेल्या या गोदेच्या शुध्दीकरणाची व सुरक्षेची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. गोदा रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे व पुढाकार घ्यावा, असे आवाहन रामायण कथाकार मोरारी बापू यांनी केले.

ठक्कर डोम मैदानावर रामकथा ज्ञानयज्ञात त्यांनी भाविकांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, की रामायणासारख्या प्राचीन काळापासून ज्या नद्यांच्या कुशीत भारतीय संस्कृती समृध्द झाली. त्यापैकी गोदावरीही एक आहे. यामुळे भारतातील पवित्र नद्यांपैकी एक उल्लेखनीय असलेल्या गोदेच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या प्रतिकुल काळात आपण जपायला हवी. 'मानस गोदावरी' हा विषय त्यांनी यावेळी मांडला. ते म्हणाले, की रामायण ग्रंथात गोदा तट आणि पंचवटीचा उल्लेख तीन वेळा करण्यात आला आहे. अयोध्याकांड आणि अरण्यकांड या विभागांमध्ये हा उल्लेख आढळतो. लक्ष्मणाने भगवान श्रीरामांना एका टप्प्यावर पाच प्रश्न विचारले होते. या प्रश्नांच्या उत्तरादाखल भगवंतांनी दिलेल्या संदर्भात पंचवटी आणि गोदेचा उल्लेख येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीत झाला जन्म-मृत्यूचा खेळ!

$
0
0

खान नजमुल इस्लाम, जुने नाशिक

सिंहस्थाचे पहिले शाहीस्नान. पर्वणी निमित्ताने पोलिसांनी बॅरिकेडिंग करून बंद केलेले रस्ते. तर दुसरीकडे या बंद रस्त्यांवर भाविकांच्या सुविधेसाठी तैनात रुग्णवाहिका अन् डॉक्टर. बंद रस्त्यातून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्राही जाऊ शकली नाही. मात्र, त्याच वेळी असह्य प्रसव वेदना सहन करणाऱ्या विवा‌हितेला चुटकीसरशी मदत मिळाली. तिचा जीव तर वाचलाच, नव्या चिमुकल्या जिवाचे सुखरुप आगमनही झाले.

सिंहस्थ पर्वणीच्या दिवशी (दि. २९ ऑगस्ट) द्वारका परिसरात संत कबीरनगर येथे राहणाऱ्या ६० वर्षीय सुमन लोखंडे यांचे निधन झाले. अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यास जाण्यासाठी लोखंडे कुटुंबीयांनी पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, अमरधाम रोड हा आपात्कालीन मार्ग म्हणून जाहर करण्यात आलेला असल्याने तसेच अमरधाम स्मशानभूमीत पर्वणीकाळात अंत्यसंस्कार करण्यास बंदी असल्याचे कारण देत पोलिसांनी नकार दिला आणि त्यांना अन्यत्र अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. परंतु, काही जणांनी अमरधाम येथेच अंत्यसंस्कार करण्याचा हट्ट धरला आणि पोलिसांना न जुमानता अमरधाम या प्रतिबंधित मार्गावर वैकुंठ रथामध्ये मृतदेह ठेवून अंत्ययात्रा नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोडे अंतर गेल्यावर पोलिसांकडून अंत्ययात्रा थांबविण्यात आली. यावेळी पोलिस व नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. लोकप्रतिनिधींकडून पोलिसांना फोन करण्यात आले. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने बंद मार्गावरून अंत्ययात्रा घेऊन जाण्यास नकार दर्शविल्यानंतर पोलिस बंदोबस्तातच प्रेतयात्रा माघारी पाठविण्यात आली. तणावपूर्ण वातावरणात मृत्यूनंतरही झालेली अवेहलना अपस्थितांच्या मनात घर करून गेली. मृतदेहावर अन्यत्र अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत्यूची घटना घडली त्यापासूनच काही अंतरावर रामघाट येथून स्नान करून कन्नमवार पुलावरून द्वारकेच्या दिशेने परतणारी हिरावाडी येथील २२ वर्षीय वर्षा रमाकांत पाटील ही तरुणी अचानक चक्कर येऊन भर रस्त्यात कोसळली. यावेळी पुण्याचे डॉक्टर शिवानंद स्वामी व त्यांचे सहकारी तुषार इंदलकर हे १०८ रुग्णवाहिका घेऊन तत्काळ घटनास्थळी पोचले. पोलिसांनीही मार्ग मोकळा केला. तरुणीची तपासणी केली असता त्या तरुणीला पोटात असह्य प्रसुती कळा येऊ लागल्या. डॉ. स्वामी यांनी क्षणाचाही विलंब न करता तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि पुढील अवघ्या पाच ते सात मिनिटांत त्या तरुणीची प्रसुती झाली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

सुरक्षेसाठी प्रसंगी कठोर होणाऱ्या पोलिस आणि प्रशासनाने गर्भवती महिलेसाठी ति‌तकीच संवेदनशीलता दाखविली. त्यामुळे गर्भवती महिलेची सुरक्षितपणे प्रसूती होऊ शकली. मात्र, अशीच संवेदनशिलता अं‌त्यविधी करण्यासाठी नेल्या जात असलेल्या मृतदेहाबाबत दाखविणे अपेक्षित होते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

परस्परविरोधी अनुभव

पर्वणीच्या दिवशी एकाच वेळी जन्म आणि मृत्यूचे वेगवेगळे अनभुव देणाऱ्या दोन परस्पर विरोधी घटना घडल्या. एका घटनेमध्ये मृत्यूनंतरचाही प्रवास बिकट होऊन अखेरच्या क्षणी उपेक्षा पदरी पडली तर दुसऱ्या घटनेत योग्य क्षणी सर्व सुविधा मिळाल्याने एका नव्या जीवाला सुखद आणि सुखरुप पाऊल ठेवता आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images