Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सराफ व्यावसायिकाला लुटले

$
0
0
कारागिरासह चाललेल्या सराफ व्यावसायिकाच्या वाहनाला धडक देऊन त्यांना जखमी करीत चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने हिसकावून नेले. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये हा जबरी चोरीचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसीतील वृक्षतोडीची चौकशी

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीतील सी-४१ या भूखंडावर शनिवारी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाल्याने महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून चौकशी होणार आहे. तसेच, याप्रकरणी उद्योग मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडेही तक्रार केली जाणार आहे.

श‌िक्षण संघर्ष या‌‌त्रा बुधवारी नाश‌‌कात

$
0
0
सर्वांसाठी श‌िक्षणाचा अध‌िकार पुनर्स्थापित करण्यासाठी अख‌िल भारत श‌िक्षा अध‌िकार मंच या संघटनेच्या वतीने देशभरात संघर्षयात्रेला सुरुवात झाली आहे. बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी ही यात्रा नाश‌िक शहरात येणार आहे.

नाशिकरोडचा बदलावा चेहरामोहरा

$
0
0
शहराचा महत्वाचा भाग झालेल्या नाशिकरोडचा चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे. आमदारांनी त्यासाठी पाठपुरावा करण्याची अपेक्षा आहे. नाशिकरोडचा काही भाग नाशिक पूर्व मतदारसंघात तर बराचसा भाग देवळाली मतदारसंघात येतो.

ग्रामपंचायतींच्या अर्जांची आज छाननी

$
0
0
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवारी (१० नोव्हेंबर) होणार आहे. जिल्ह्यातील ७२ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तर ८८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

सोनई हत्याकांडाची आज सुनावणी

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे २०१३ मध्ये घडलेल्या बहुचर्चित तिहेरी हत्याकांडांची सुनावणी आजपासून येथील जलदगती न्यायालयात सुरू होणार असल्याचे समजते. जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडावरून राज्यभर रान उठले असताना या सुनावणीकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

वनभरतीचा आज शेवटचा दिवस

$
0
0
नाशिक वनविभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या वनरक्षक भरती अंतर्गत उमेदवारांच्या धावण्याच्या परीक्षेत रविवारी ५५१ उमेदवारांनी सहभाग घेतला. गेल्या दोन दिवसात १०४५ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

गोंदे-भिवंडी प्रवास बनला खडतर

$
0
0
देशातील तिसऱ्या क्रमांकाचा आणि नुकताच चौपदरी झालेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील गोंदे ते भिवंडी हा प्रवास अत्यंत खडतर बनला आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक हैराण झाले असून, राष्ट्रीय हायवे प्राधिकारणाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

केंद्राच्या सौर योजनेत नाशिक

$
0
0
केंद्र सरकारने देशातील एकूण २७ शहरांमधून २६ मेगावॅट सौर विजेची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, या योजनेत राज्यातील नाशिक, नागपूर आणि पुणे या तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. दिवसा विजेचा अधिक उपयोग करणाऱ्या संस्था तसेच उद्योगांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.

महापौरांना हवी ‘साजेशी’ कार

$
0
0
नूतन महापौर अशोक मुर्तडक यांना ‘साजेशी’ कार विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी १६ लाख रूपये खर्चून महापौरांसाठी विकत घेण्यात आलेली कार उपमहापौरांसाठी राखीव करण्यात येणार असून महापौरांसाठी ‘इनोव्हा व्हीएक्स’ खरेदी करण्याबाबतचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

पोलिस असल्याचे भासवून लुटल्याच्या दोन घटना

$
0
0
पोलिस असल्याची बतावणी करून लुटल्याच्या दोन घटना पंचवटी आणि अंबड पोलिस स्टेशनच्या हद्द‌िमध्ये घडल्या. एका पाठोपाठ घडलेल्या या घटनांप्रकरणी पोलिसांकडून संशयितांची रेखाचित्रे तयार केली जात आहेत.

अत‌िरिक्त शिक्षकांचा प्रश्न कायम

$
0
0
राज्यभरातील अत‌िरिक्त श‌िक्षकांवर गंडांतर येऊ देणार नाही, अशी भूम‌िका नवन‌िर्वाचीत उच्च व श‌िक्षणमंत्री व‌िनोद तावडे घेत असले तरीही प्रत्यक्षात मात्र प्रशासनाने या अत‌िरीक्त पदांच्या समायोजनाचे आदेश द‌िले आहेत.

भाजपच्या आमदारांची नैतिकता गेली कुठे ?

$
0
0
जळगाव महापालिकेतील नगरसेवक आणि नव्याने आमदार म्हणून निवडून आलेल्या भाजपच्या सुरेश भोळे आणि शिवसेनेच्या प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी विधानसभेची पायरी चढताच आपल्या नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहेत.

फेसबुकप्रकरणी मालेगावात गुन्हा दाखल

$
0
0
राष्ट्रपुरुषांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दप्रयोग करून छायाचित्राची विटंबना केल्याप्रकरणी राजेश शर्मा गौतवाली नामक अज्ञात व्यक्तिविरुध्द मालेगाव कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढकांबे, सप्तशृंग गड टोलनाका बंद करा

$
0
0
ढकांबे व सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दोन टोल नाक्यावर सर्रासपणे बेकायदेशीर पावत्या देऊन सामान्य जनतेची लूट होत आहे. ही लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी दिंडोरीच्या सरपंच छबूबाई वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिंडोरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

वणी-सापुतारा रस्त्याची दुरवस्था

$
0
0
वणी-सापुतारा रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी अवस्‍था झाली आहे. वाहनधारकांनी वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. वणी व सापुतारा येथे पर्यटकांची कायम वर्दळ असते.

मोकळ्या भूखंडांवर अस्वच्छतेचा कळस

$
0
0
शहरातील नववसाहत परिसरातील पाठक मैदान, शिवनेरी नगरी, शिवाजी नगर, गणपत नगर, या भागातील मोकळ्या भूखंडावर अस्वच्छता पसरली आहे. यामुळे डेंग्यूसारख्या आजारांना आमंत्रण मिळत आहे.

नुकसानग्रस्त भात‌शेतीचे त्वरित पंचनामे करा

$
0
0
परतीचा पाऊस पुरेसा न झाल्याने तसेच, रोगराईमुळे इगतपुरी - त्र्यंबकेश्वर या आदिवासी मतदारसंघातील भात शेती पूर्णता नष्ट झाली आहे. अशा परीस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित पंचनामे करून भरपाई द्या, अशी मागणी आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

लासलगाव येथे कडकडीत बंद

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषधार्थ सोमवारी लासलगाव येथे स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला. लासलगाव येथील जातीय अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शहरातील वैद्यकीयसेवा वगळता सर्वच घटकांनी प्रतिसाद दिला.

जवखेडे हत्याकांडाच्या निषेधार्थ आंदोलन

$
0
0
तालुक्यातील अंदरसूल येथे जवखेडे येथील दलित कुटुंबीयांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले. हत्याकांडाचा निषेध करीत सोमवारी सकाळी १० वाजता सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते नाशिक-औरंगाबाद महामार्गावर उतरले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images