Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निर्भयपणे करा मतदान!

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उद्यावर येऊन ठेपला आहे. निवडणुक प्रक्र‌िया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून अनुचित प्रकार घडला तर अवघ्या पाचच मिनिटांत पोलिसांचा फौजफाटा शहरातील कुठल्याही बुथवर पोहोचू शकतो, अशी तयारी केली आहे.

कामगारांना पगारी सुटी

$
0
0
मतदानाच्या दिवशी म्हणजे येत्या बुधवारी कामगारांना भरपगारी सुटी देण्याचे आदेश कामगार उपायुक्तांनी काढले आहेत. हा आदेश उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे.

सटाण्यात अडीच लाख मतदार ठरविणार भवितव्य

$
0
0
बागलाण विधानसभा मतदारसंघातील तब्बल ११ उमेदवारांचे आज मतपेटीत भवितव्य बंद होत असुन, १९ ऑक्टोबर रोजी येथील भाक्षीरोडवरील गुरूप्रसाद मंगल कार्यालयात मतमोजणी होवून विजयाचे शिल्पकार कोण हे ठरणार आहे. तालुक्यातील तब्बल अडीच लाख मतदार बागलाणचा भाग्यविधाता ठरविणार आहेत.

अवैध मद्य विक्रीचे २३२ गुन्हे

$
0
0
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जोरदार कारवाया सुरू आहेत. अवैध मद्यविक्री व वाहतुकीवर आळा घालताना गेल्या महिनाभरात तब्बल २३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये १७२ जणांना अटक करण्यात आली असून २४ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

५१ हजार विद्यार्थ्यांचा वृक्षतोडीला विरोध

$
0
0
शहरातील २०१४ झाडे तोडू नयेत यासाठी विद्यार्थी पुढे आले आहेत. ५१ हजार विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात विरोध केला असून नागरिकांनीही कायदेशीर हरकती नोंदवाव्यात असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे. ही मोहिमेतून शहरात जनजागृती घडविण्याचाही मानस असल्याचे संघटनांनी सांगितले.

अडीच मह‌िन्यापासून फोटोकॉपीची प्रत‌ीक्षा

$
0
0
अभ‌ियांत्र‌िकी शाखेतील मेकॅन‌िकल व‌िभागातील व‌िद्यार्थ्यांनी साव‌ित्रीबाई फुले पुणे व‌िद्यापीठाकडे सुमारे अडीच मह‌िन्यांपासून पाठपुरावा सुरू ठेवला असला तरीही अद्याप त्यांना फोटोकॉपी देण्यात आलेली नाही. पुढच्या सेम‌िस्टरची परीक्षा आता २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

नाशिकला वर्षभरानंतर मिळाला धर्मदाय उपायुक्त

$
0
0
वर्षभरापासून रिक्त असलेल्या नाशिकच्या धर्मादाय उपायुक्तपदी आर. जी. मामू यांची तर सहाय्यक आयुक्तपदी ए. आर. भळगट आणि डी. बी. डोमाळे यांची नियुक्ती विधी व न्याय विभागाने केली आहे.

पोलीस मतदानापासून वंचित

$
0
0
निवडणुकीतील संभाव्य धुडगूस रोखण्यासाठी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे बहुतांश पोलिसच मतदानापासून वंचित राहणार आहेत. मात्र ही कैफियत त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार या न्यायाप्रमाणे स्वीकारावी लागणार आहे.

बोनससाठी महापालिकेत ठिय्या

$
0
0
दिवाळी​पूर्वी सानुग्रह अनुदानाची (बोनस) रक्कम महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा १६ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा म्युन्सिपल कर्मचारी-कामगार सेनेने दिला आहे. मंगळवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लेखाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

शहरात होणार मतदानाची खातरजमा

$
0
0
आपण ज्या उमेदवाराला मत दिले ते त्यालाच गेले की नाही, याबाबत असलेली साशंकता यंदा दूर होणार आहे. त्यासाठी व्हीव्हीपॅट हे यंत्र प्रथमच मतदान यंत्राशेजारी ठेवले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच नाशिक शहरातील मध्य, पश्चिम आणि पूर्व या तीन मतदारसंघात हे यंत्र लावले जाणार असल्याने नाशिककरांना त्यांच्या मतदानाची खातरजमा करता येणार आहे.

मालेगावसाठी प्रशासन सज्ज

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघात आज, बुधवारी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. प्रचार साहित्य वाटप करण्यात आले असून कर्मचारी रवाना करण्यात आले. तसेच पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले.

सेकंदात संपर्क; मिनिटात मदत

$
0
0
विधानसभा निवडणुकीत गोंधळाची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक बूथवरील हवालदाराचा मोबाइल क्रमांक पोलिस आयुक्तालयाकडे नोंदविण्यात आला आहे. कोणताही अनूचित प्रकार घडला तरी संबंधित हवालदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

मतदानावर पोलिसांची करडी नजर

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मंगळवारी पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रांवर इव्हीएम मशीन पोहोच झाले. निवडणूक शांततामय वातावणात पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून निवडणूक प्रक्रियेवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

प्रतिष्ठेच्या लढतींवर ख‌िळल्या नजरा

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागासांठी आज मतदान होत असून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुत्र पंकज, माणिकराव कोकाटे, वंसत ग‌िते, ए. टी. पवार या दिग्गजांसमोर आपला गड राखण्याचे आव्हान आहे. पाचवेळा आमदारकी भुषवणारे पंरतु घोटाळ्याच्या आरोपाखाली शिक्षा झालेले शिवसेनेचे बबनराव घोलप यांचे चिंरजीव योगेश यांच्यापुढे पित्याचा वारसा टिकवण्याचे आव्हान आहे.

सकस आहार मि‍ळेल काय?

$
0
0
ज्या व्यक्ती खेळाच्या माध्यमातून अधिकारी पदावर पोहचल्या आहेत अशा अधिकाऱ्यांनी एका खेळाडूच्या आहाराचा खर्च त्या त्या असोसिएशनकडे दर महिन्याला सुपूर्द केल्यास अथवा एक वर्षाचा खर्च एकरकमी दिल्यास चांगले खेळाडू तयार होण्यास मदत होईल.

‘खाओ जी भरके’

$
0
0
‘सैन्य पोटावर चालतं’, या म्हणीप्रमाणे आपापल्या नेत्याचे बूथ चालव‌िणाऱ्या कार्यकर्त्यांची पोटं सांभाळण्यासाठी सर्वच उमेदवारांना वेळोवेळी लगबग करावी लागली. मतदार यादीतून नावे शोधून देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात भरणा असल्याने त्यांनी घरातील चिल्लीपिल्ली गोळा करून आणलेली होती.

मतमोजणीसाठी आठ नवे निरीक्षक

$
0
0
मतमोजणी रविवारी (दि.१९) होणार असल्याने नाशिक जिल्ह्यात ८ नवे निरीक्षक निवडणूक आयोगाने नियुक्त केले आहेत..

PSI अन् कराटेपटूमध्ये फ्रीस्टाईल

$
0
0
मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या आत वाहन उभे करण्यावरून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान फ्री स्टाईल हाणामारीत झाले. कराट्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या एका महिलेने प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

नाशिकरोड कारागृहात दिवाळी मेळा

$
0
0
दिवाळी आली की अनेक नागरिक स्वस्त आणि चांगल्या प्रतीच्या वस्तू खरेदीसाठी दिवाळी मेळ्याच्या प्रतीक्षेत असतात. यंदाही दिवाळीनिमित्त नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पैसे वाटप तक्रारींचा पाऊस

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष मतदानावेळीही मतदारांना आमिष दाखवितानाच पैसे वाटण्याच्या तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. या तक्रारींची शहानिशा करण्यात आली पण, त्यात कुठलेही तथ्य आढळले नसल्याचे यंत्रणेने सांगितले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images