Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिवसेनेपुढे आव्हान परकीय अन् स्वकियांचेही

$
0
0
प्रचारापेक्षा अपप्रचारावर विश्वास ठेवणारा आणि हवेत उडणाऱ्या नेत्याला जमिनीवर आणणारा निफाड मतदारसंघ राजकीयदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात अत्यंत संवेदनशील मानला जातो.

कसमादे फॅक्टर यंदाही प्रभावहीन?

$
0
0
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे तर लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेपुढे कसमादे, खान्देश कार्ड मागे पडले. आता या निवडणुकीत कोणता फॅक्टर चालणार याविषयी राजकीय गप्पा जोरात रंगू लागल्या आहेत.

आता चर्चा कोकाटेंच्या शिवसेना प्रवेशाची

$
0
0
सिन्नरचे काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे कट्टर समर्थक असलेले पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ यांनी काँग्रेसचा त्याग करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधून घेतले.

मालेगावी हजारावर होर्डिंग, बॅनर हटविले

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे मालेगाव मध्य व बाह्य अशा दोनही मतदारसंघाच्या क्षेत्रातील गत तीन दिवसांत शहरातील राजकीय पक्षांशी निगडीत छोटे फलक, मोठे फलक, होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर व झेंडे हटविण्यात आले आहेत.

पोल‌िस प्रशासनाने फुंकले राजकीय पक्षांचे कान

$
0
0
न‌िवडणुकीसाठी हाती असलेला अत्यल्प कालावधी आण‌ि नज‌िक असणारी प्रचाराची रणधुमाळी या पार्श्वभूमीवर राजकीय पदाध‌िकारी आण‌ि कार्यकर्त्यांनी कायदा आण‌ि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी समन्वय साधावा.

मुस्लिम समाजाला नोकऱ्यांमध्ये ८ टक्के आरक्षण द्या

$
0
0
सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाच्या तरुणांना किमान आठ टक्के जागा राखीव असाव्यात, यासह विविध मागण्या जमात-ए-इस्लामीच्या वतीने आयोजित मुस्लिम समाज मेळाव्यात करण्यात आल्या.

शासकीय यंत्रणेची निवडणूक तयारी सुरू

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक विभागाची पूर्वतयारी सुरू झाली असून, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठकही झाली. बैठकीत येवला विधानसभा निवडणूक अधिकारी वासंती माळी, सहायक निवडणूक अधिकारी शरद मंडलिक यांनी मार्गदर्शन केले.

वाळू माफियांचा धंदा तेजीत

$
0
0
आरम नदीला पूर आल्यानंतर पूर्वी उपसलेले वाळूचे खड्डे पुन्हा भरले आहेत. महसूल यंत्रणा निवडणूक कामात गुंतल्याची संधी साधत वाळू माफियांचा वाळू उपसण्याचा गोरखधंदा तेजीत सुरू झाला आहे. हे काम महसूलच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

सटाण्यात बालिकेला डेंग्यू

$
0
0
सटाणा शहरातील आरोग्ययंत्रणा पुरती कोलमडली असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चौगाव रस्त्यावरील ११ वर्षाच्या बालिकेला डेंग्यूची लागण झाली असून, ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.

पितृपक्षामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले

$
0
0
पितृपक्षात घरोघरी घातल्या जाणाऱ्या श्राद्ध तिथीमुळे बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असली तरी भाव मात्र वाढले आहेत. सटाणा येथे गत आठवड्यापासून वाढलेली मागणी व त्या तुलनेत आवकमध्ये निर्माण झालेली तूट यामुळे भाजीपाला चांगलाच कडाडला आहे.

संतप्त जमावाने मांसाचा ट्रक पेटवला

$
0
0
अवैध्यरित्या जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला संतप्त जमावाने पेटवून दिल्याची घटना विंचूर जवळील म्हसोबा माथा येथे मंगळवारी सकाळी घडली. या घटनेचे विंचूर व लासलगाव येथे तीव्र पडसाद उमटले आहेत.

मनमाडला लवकरच ३ दिवसाआड पाणी

$
0
0
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदरडी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शहराला सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

पाथर्डीफाटा परिसरात गस्त वाढविण्याची मागणी

$
0
0
पाथर्डीफाटा येथील प्रशांतनगर परिसरात चोरी, दुकानफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस चौकीची मागणी होत आहे.

अन् रस्ता मातीत जाता जाता राहिला..!

$
0
0
मखमलाबाद, गिरणारे ते वाघेरेपर्यंत होत असलेल्या रस्त्यावर ठेकेदाराकडून डांबरीकरणासाठी काळी मातीचा वापर होत होता. याबाबत ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.

गांधीनगर मुद्रणालयाला संजिवनी शक्य

$
0
0
गांधीनगरच्या मुद्रणालप्रश्नी नवी दिल्लीतील शहरी विकास मंत्रालयाने सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती प्रेस कामगार युनियनचे अध्यक्ष संजयु घुगे, संयुक्त सचिव समद शेख, अशोक लोळगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

गृहपाल, अधीक्षकांच्या विरोधात आंदोलन

$
0
0
आदिवासी विभागाच्या वणी येथील मुलांमुलींच्या शासकीय वसतिगृहाचे गृहपाल आणि स्री अधीक्षकांवर आदिवासी संघटनांनी असुविधा, आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.

‘छावा मराठा’ लढव‌िणार शंभर जागा

$
0
0
सत्तेत आल्यास राज्य सरकारने घेतलेले न‌िर्णय रद्द करू, अशी भूम‌िका भाजप प्रचारा‌त घेत असल्याने मराठा अन् मुस्लिम समाजाचे आरक्षण संकटात सापडणार आहे.

पूरग्रस्तांसाठी रोटरीतर्फे औषधे

$
0
0
जम्मू व काश्मिरमध्ये मदत कार्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने एअरपोर्टने पाच हजार रुग्णांना उपयोग पडतील, इतकी औषधे पाठविण्यात आली आहेत. ही माहिती रोटरीचे अध्यक्ष डॉ. नितीन सुराणा यांनी दिली.

प्रधान सचिवांच्या उपस्थितीत आज सिंहस्थ आढावा बैठक

$
0
0
नाशिकमध्ये आगामी वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा बुधवारी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत मुख्यत्वेकरून सिंहस्थ कामाना येणाऱ्या आचारसंहितेच्या अडसरावर चर्चा केली जाणार आहे.

पोटनिवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसकडून आनंदोत्सव

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकामंध्ये भाजपची पिछेहाट होवून काँग्रेसला काही जागांवर यश मिळाल्यामुळे नाशिक शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंनदोत्सव साजरा करण्यात आला. एम जी रोडवरील कार्यालयाबाहेर फटाके फोडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हा विजयोत्सव साजरा केला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images