Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ढग आले व्हाट्स अॅपवर!

$
0
0
सोशल नेटवर्किंगचं जाळं इतकं घट्ट व्हायला लागलंय, की परवाकडे या जाळ्यात आपल्या शहरावर रेंगाळणाऱ्या रिकामटेकड्या ढगांनीही व्हाट्सअॅपवर आपला ग्रुप सुरू केला !

मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरला आग

$
0
0
मुंबई- नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात गुरुवारी सकाळी नाशिककडे जाणाऱ्या कंटेनरच्या इंजिन ऑइलला शॉटसर्किटमुळे भीषण आग लागल्याने महामार्गावरील वाहतूक साधारण एक तास बंद होती.

'त्या' रेशनकार्डची गोष्ट

$
0
0
रेशनकार्ड घेण्याकरिता नेहमीच अनेकांना खेट्या माराव्या लागतात हे विदारक चित्र. त्यातही भोळ्या भाबड्या व अडाणी माणसासाठी तर मोठी कसरत. येवला तालुक्यातील भारम येथील महिलेच्या बाबत असेच घडले. तब्बल आठ महिने या महिलेला रेशनकार्डसाठी वाट पहावी लागली.

टोल वसुलीला मुभा कुणाची?

$
0
0
राज्य सरकारने अर्थसंकल्प अधिवेशनावेळी राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचे जाहीर केले होते. तसेच हे टोल नाके १ जुलैपासून बंद होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच आदेश दिले. मात्र तरीही धुळे-सूरत बायपास मार्गावरील टोलनाक्यावरील वसुली बंद करण्यात यावी, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने न दिल्याने येथील वसुली राजरोसपणे सुरुच आहे

शिवसेनेला हवा पश्चिम मतदारसंघ

$
0
0
लोकसभेतील युतीच्या विजयानंतर आता शिवसेनेने आपली विस्तार मोहिम तीव्र केली असून पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनाला सोडण्याची मागणी लावून धरली जाणार असल्याचे संकेत शिवसेना सच‌िव व खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत.

जलशुध्द‌ीकरण केंद्र बनले जुगार अड्डा

$
0
0
पंचवटी परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्द‌ीकरण केंद्रात जुगाऱ्यांनी व दारुड्यांनी थैमान घातले असून, जलशुध्द‌ीकरण केंद्र म्हणजे जुगार अड्डा बनले आहे.

मेरिटने वाढले टेन्शन

$
0
0
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाने संस्थेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून अकरावी प्रवेशासाठी यंदा ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे ठरवले खरे मात्र, गुरुवारी संस्थेच्या वेबसाईटवर दुपारी चार वाजता लागणारी मेरीट लिस्ट सव्वा तास उशिराने लागल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

बजेटमधून पंतप्रधान, खासदार बेपत्ता

$
0
0
महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी उद्या (दि. ५) विशेष महासभा होणार आहे. अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा होण्यापूर्वीच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांसह प्रशासनला लक्ष केले जात आहे.

१० बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा

$
0
0
पूर्व आणि पंचवटी प्रभागात डेंग्यू आजाराचे पेशंट आढळून आल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अस्वच्छता करणाऱ्या १० बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या असून २२ हजार १८९ ठिकाणी अळीनाशक फवारणी व ठिकठिकाणी स्वच्छता करण्यास सुरुवात केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्तपदी कासार?

$
0
0
महापालिकेचे तत्त्कालीन उपायुक्त दीपक कासार यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावास हिरवा कंदील दर्शवल्यास पुढील दोन दिवसात कासार हजर होऊ शकतात, अशी माहिती पुढे येत आहे.

‘सावाना’ सभेत धुमशान

$
0
0
सार्वजनिक वाचनालयाची वर्गणी वाढवावी की, नाही या मुद्द्यावरून सभासद, विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जुंपत वाकयुध्द चांगलेच रंगले. तिघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार नसल्याने सावानाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तब्बल तासभर हमरीतुमरी व धुमशान रंगले.

देवळालीकरांची गैरसोय

$
0
0
देवळाली कॅम्प येथील बंद एटीएममुळे देवळाली कॅम्प येथील रहिवासींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील काही एटीएम काल बंद होती. काही ठिकाणी एटीएममधील पैसे संपले होते.

परीक्षेचा गोंधळ

$
0
0
कारागृह विभाग आणि महिला व बालविकास खात्यांकडून लि‌पिक व तत्सम पदांसाठी रविवारी, ६ जुलैला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, एकाच दिवशी या दोन्ही परीक्षा होणार असल्याने उमेदवारांची निराशा झाली आहे. परीक्षेच्या माध्यमातून मिळणारी संधी हुकल्याचे शल्य उमेदवारांना अधिक बोचणारे ठरणार आहे.

एसटीचे प्रश्न सुटणार

$
0
0
‘एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची थकबाकी व कराराची थकबाकी लवकरात लवकर देऊ. तसेच त्यांचे अन्य प्रश्नही लवकरच मार्गी लावले जातील’ असे आश्वासन परिवहन मंत्री मधुकर चव्हाण यांनी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

व्यावसायिकांना दणका

$
0
0
लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) बाबतचे विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापारी उद्योजकांना १० जुलैपासून महापालिका नोट‌िसा बजावणार असल्याची माहिती उपायुक्त हरीभाऊ फडोळ यांनी दिली. आजपर्यंत प्रत्यक्षात ६ हजार ५७५ तर ऑनलाइन पध्दतीने ५ हजार ४५४ विवरणपत्र एलबीटी विभागाकडे जमा झाले आहेत.

दोघांचा अपघाती मृत्यू

$
0
0
नाशिक शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांत एक महिलेसह दोघांचा बळी गेला.

हिरे बंधू भाजपमध्ये

$
0
0
लोकसभा निवडणुकीपासून प्रतीक्षेत असलेल्या आमदार डॉ. अपूर्व हिरे व अव्दय हिरे यांना गुरुवारी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे मालेगाव तालुक्यात तसेच नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. हिरे बंधूंनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.

डॉक्टरांचे आंदोलन चिघळणार

$
0
0
सरकार आणि मॅग्म यांच्यातील बोलणी फिस्कटली असून, त्यामुळे डॉक्टरांचे आंदोलन चिघळण्याच‌ी शक्यता निर्माण झाली आहे.

स्टॅण्डिंगमधील अंडरस्टॅण्डिंग

$
0
0
स्थायी समिती सभापती निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मनसेने सर्व ताकद पणाला लावत वर्चस्व कायम ठेवले. निवडणुकीनंतर मनसेतील दुफळी, भाजपा-मनसेचा वाद, सेना-भाजपाचे संबध आणि विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची ‘खेळी’ समोर आली. तसेच भविष्यातील बदलू शकणाऱ्या राजकारणाची एक झलक पाहण्यास मिळाली.

पावसासाठी देवाचा धावा

$
0
0
मान्सूनने तब्बल महिन्याभराचा उशीर केला असून आद्रा नक्षत्राने देखील हुलकावणी दिल्याने पावसासाठी आता देवचा धावा सुरू झाला आहे. बारा ज्योतिर्लींगापैकी एक महत्वाचे स्थान असलेल्या आद्य ज्योतिर्लींग त्र्यंबकेश्वरास अहोरात्र जलाभिषेक करण्यात येत आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images