Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

उड्डाणपुलाच्या उंचीवरून काम पाडले बंद

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गावरील तिसगाव चौफुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्यंत संथगतीने उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, या उड्डाणपुलाची उंची कमी करीत असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी ठेकेदार व इरकॉनच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत काम बंद पाडले.

लांडग्यांनी पाडला काळविटाचा फडशा

$
0
0
येवला तालुक्यातील पूर्व भागात वनक्षेत्र सोडून नागरी वाड्या वस्त्यांकडे धाव घेणाऱ्या हरणांचा कुत्र्यांनी बळी घेण्याच्या घटना ताज्या असतानाच गुरुवारी लांडग्यांनी एका काळविटाचा फडशा पाडल्याची घटना समोर आली.

येवला नगरपालिकेची ८६ टक्के वसुली

$
0
0
गतवर्षी शंभर टक्के वसुली करून विभागात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या येवला नगरपालिकेने यंदाही ८६ टक्के वसुली करून अव्वल स्थान राखले आहे. मार्चअखेर नगरपालिकेने एकूण २ कोटी ९ लाख ८९ हजार ४४० रुपयांची वसुली केली असून करदात्यांच्या विलंबामुळे अतिरिक्त महसूलही प्राप्त झाला आहे.

अमळनेरच्या २० युवकांना मालेगाव येथे अटक

$
0
0
मंदिर वही बनाएंगे हे आक्षेपार्ह गाणे वाजविण्यास पोलिसांनी मनाई केल्याने पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करून पुन्हा गाणे वाजविणाऱ्या अमळनेर येथील २० युवकांना पोलिसांनी अटक केली आहे.

भाविकांच्या गर्दीन फुलला गड परिसर

$
0
0
चैत्रोत्सव यात्रेच्या तिसऱ्या दिवसापाासन भाविकांची गर्दी वाढू लागली आहे गुरुवारी सुमारे साठ हजार भाविकांनी गडावर हजेरी लावत भगवतीचे दर्शन घेतले. आज (दि. ११) शुक्रवारी गडावर लाखावर भाविक दर्शनास हजेरी लावतील, असा अंदाज आहे.

पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

$
0
0
किरकोळ कारणावरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. तालुक्यातील कुसूर येथील दिलीप आहिरे याने पत्नी सुरेखाला मनमाडला सोबत येण्यास सांगितले.

गोदावरीत हजारो मासे मृत्युमुखी

$
0
0
निफाड तालुक्यातील तामसवाडी, तारुखेडले परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात हजारो छोटे मासे मृतावस्थेत पाण्यात तरंगत असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. नदी जवळील परिसरात मृत माशांमुळे दुर्गंधी पसरल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

कांदा भावात सुधारणाा

$
0
0
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (‌दि.१०) उन्हाळ कांदा भावात समाधानकारक वाढ झाली. येथील बाजार आवारावर उन्हाळ कांद्यास कमाल १३८१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

डासांमुळे इगतपुरीकर त्रस्त

$
0
0
इगतपुरी शहर व परिसरातील विविध भागात नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शहरात डास, मच्छर आणि चिलट्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आरोग्य विभागाने फवारणी करावी, अशी मागणी शहरवासियांनी केली आहे.

अजित पवारांना हायकोर्टाची नोटीस

$
0
0
बीड जिल्ह्यातील येथील सिंचन तलावाचे काम थांबवावे, तसेच या तलाव घोटाळ्यात हात असलेल्या संबंधितांची चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करावी, या मागणीसाठी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

तू पुड्याच बांध

$
0
0
सूत्रसंचालक म्हणजे राजा माणूस. त्याच्या मनात असेल तर तो एखाद्या वक्त्याला शिखरावर नेऊन ठेवेल अन् त्याचा मूड नसेल तर वक्ता संपलाच म्हणून समजा. थोडक्यात कार्यक्रम तारणं अन् मारणं त्याच्या हाती असतं. नुकत्याच झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात एक हौशी कार्यकर्ताच सूत्रसंचालक झाला.

महात्मा फुलेंना नाशिकरोड येथे आदरांजली

$
0
0
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोड, जेलरोड, देवळालीगाव आदी ठिकाणी विविध संघटना व पक्षांतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.

विकास आराखडा प्रश्नावर सोमवारी बैठक

$
0
0
नाशिक शहरासाठी नव्याने विकास आराखडा करण्याची तयारी प्रक्रीया सुरू झाली आहे. यासंदर्भात बाधित शेतकरी आणि मिळकतधारक यांचे म्हणणे सरकारदरबारी मांडण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंती-उत्सव जोरात

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांनी सार्वजनिक मंडळांना सढळ हाताने मदत केल्याने येणाऱ्या हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वर्गणीसाठी कार्यकर्त्यांना करावी लागणारी वणवण थांबली आहे.

बोल अंबे की जय...

$
0
0
आदिशक्ती सप्तशृंग देवीच्या दर्शनास शुक्रवारी चैत्रयात्रेच्या चौथ्या दिवशी सुमारे सव्वालाख भाविकांनी दर्शनासाठी गडावर गर्दी केली. यात्रेचा चौथा दिवस व शुक्रवार यामुळे गडावर भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. बोल अंबे की जयचा जयघोष निनादात होता. ३० ते ३५ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.

लिपिकास लाच घेतना रंगेहाथ अटक

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील जांबूटके शिवारातील जमिनीची तत्काळ मोजणी करण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयातील लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिंडोरी कार्यालयात रंगेहाथ पकडले.

पाच संचालकांचे राजीनामे

$
0
0
देवळा तालुक्यातील खालप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यरत असलेल्या एकूण अकरापैकी पाच संचालकांनी संस्थेचे सभापती बाजीराव सूर्यवंशी हे संचालकांना विश्वासत घेऊन कामकाज करीत नाही म्हणून राजीनामे दिले आहेत.

वधूवर मेळाव्यांना पक्षांचा ‘हातभार’

$
0
0
लोकसभा निवडणुका आणि लग्नाचा हंगाम एकत्र आल्याने चाणाक्ष नेत्यांनी वधूवर मेळाव्यांचे आयोजन करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शहरात सध्या वधूवर मेळाव्यांची धूम असून, त्यांच्या पाठिशी राजकीय पक्ष असल्याची जोरदार चर्चा आहे.

मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांची जिल्हास्तरीय बैठक नाशिक येथे झाली. सिन्नर, इगतपुरी, निफाड, त्र्यंबक, दिंडोरी आदी ठिकाणाहून कार्यकर्ते उपस्थित होते.

माळींनी साधला आदिवासींशी संवाद

$
0
0
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार प्रा. ज्ञानेश्वर माळी यांनी मतदार संघातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यांना भेटी देऊन मतदारत्यांशी संवाद साधला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images