Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तळेगाव दंगल प्रकरणातील संशयितांची निर्दोष मुक्तता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर विल्होळी येथे उसळलेल्या दंगलप्रकरणी २१ संशयित आरोपींची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद उमटून जिल्ह्यात काही ठिकाणी दंगल उसळली. विल्होळी येथे सुरेश उमाजी यशवंते यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चातील काही सदस्यांवर जाळपोळीसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. संशयितांच्या वतीने अ‍ॅड. सुजीत बोराडे यांनी युक्तिवाद केला. यशवंते यांनी घराच्या जाळपोळीनंतर पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. तसेच जाळपोळीत पोलिस कर्मचारी अरुण शिर्के यांचा समावेश असल्याचा आरोप यशवंते यांनी केला होता. मात्र, घटनेच्या वेळी शिर्के हे सेवा बजावत असल्याचे तपासात समोर आले. जाळपोळीची माहिती पोलिसांना देण्यास संधी असतानाही यशवंते यांनी दोन दिवस उशिरा तक्रार केली. तसेच, तक्रारीनंतर यशवंते यांचे वर्तन विश्वासपात्र न वाटल्याचा युक्तिवाद करण्यात आला. प्रबळ साक्षी आणि पुरावे नसल्याने या गुन्ह्यातील २१ संशयितांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात नऊ साक्षीदार तपासण्यात आले.

... यांची निर्दोष सुटका

पंढरीनाथ गंगाधर थोरात, अरुण पंढरीनाथ थोरात, कैलास पंढरीनाथ थोरात, सुनील पंढरीनाथ थोरात, बाळू गंगाधर थोरात, सागर चौधरी, अमोल चौधरी, सतीष शिर्के, शंकर शिर्के, यशवंत चौधरी, पिंट्या नरवडे, तानाजी नरवडे, गणेश चौधरी, रोशन चौधरी, गोकुळ थोरात, प्रकाश नवरडे, बंडू नवरडे, योगेश थापेकर यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वराज्याच्या पाया संभाजींनी भक्कम केला

$
0
0

शिवचरित्रकार आबा पाटील यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक जण मराठा आहे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. साडेतीनशे वर्षे झाली तरी महाराष्ट्र आजही गुण्यागोविंद्याने नांदत आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचे बलिदान देऊन स्वराज्याचा भक्कम पाया घातला. शस्त्र व शास्त्र योग्य रितीने अवगत केल्यामुळेच संभाजी महाराज राजसत्ता टिकवून ठेवू शकले, असे प्रतिपादन शिवचरित्रकार आबा पाटील यांनी केले.

नाशिकरोड देवळाली बँक आणि मसाप नाशिकरोड शाखेतर्फे मनपा शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर वसंत व्याख्यानमाला सुरू आहे. पाटील यांनी 'शिवपुत्र संभाजी' या विषयावर आठवे पुष्प गुंफले. आबा पाटील म्हणाले, की साडेतीनशे वर्षे झाली तरी शिवाजी महाराज आपल्याला कळाले नाही तर त्यांचे राजकारण काय कळणार? संभाजी राजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी ५० टक्के आरक्षण दिले. शिवाजी महाराज, जिजामातांच्या पावलावर पाऊल टाकले. बंडखोर मंत्र्यांना सन्मान देण्याचे चातुर्य दाखविले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांविरुद्ध आप्तस्वकीय व मंत्र्यांनी कटकारस्थान रचले. स्वराज्य जिंकण्याची हीच नामी संधी असल्याचे जाणून औरंगजेब स्वतः लाखोंची फौज घेऊन महाराष्ट्रात आला. संभाजी महाराजांनी त्याला चातुर्य आणि पराक्रमाच्या जोरावर कडवी लढत दिली. त्यामुळे नाशिकजवळील रामशेज व स्वराज्यातील अन्य किल्ले औरंगजेबाला अनेक वर्षे झाली तर जिंकता आली नाही. संभाजी महाराजांचे चारित्र्य सूर्यप्रकाशाइतके तेजस्वी आणि तांदळासारखे स्वच्छ होते. इतिहासकारांनी त्याचा इतिहास काही प्रमाणात झाकून ठेवल्याची खंत पाटील यांनी मांडली.

माघार न घेणारा राजा

संभाजी राजांनी नऊ वर्षे राज्यकारभार केला. चौदाव्या वर्षी ग्रंथसंपदा लिहिली. अनेक भाषा, कला अवगत केल्या. शिवाजी महाराजांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या संभाजी राजांनी यशस्वीपणे पार पाडल्या. अनेक मोहिमा जिंकल्या. म्हणून इतिहासकारांनी त्यांचा इतिहास शास्त्रोक्त पद्धतीने सांगितला पाहिजे. शूर-वीर संभाजी महाराजांनी १२० पेक्षा जास्त लढाया लढल्या. पण एकाही लढाईत माघार घेतली नाही. औरंगजेबाला महाराष्ट्रात हरवण्याची किमया त्यांनी साधली. पोर्तुगीज आणि इंग्रज या शत्रूंशीही संभाजी महाराजांनी लढा दिला. लढाईत जखमी झालेल्या किंवा मृत्यू झालेल्या सैनिकांच्या मुलांची शिक्षण आणि निवासाची व्यवस्था संभाजी महाराजांनी केल्याचीही माहिती पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाच्या झळा; तापमान ३५ अंशांवर

$
0
0

नाशिक : नाशिककरांना उन्हाच्या चटक्याने त्रस्त केले असून, बुधवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. या आठवड्यात हे तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने नोंदविला आहे. त्यामुळे नाशिककरांना उन्हाच्या झळांपासून बचावासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. गत आठवड्याच्या तुलनेत यंदा कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. गत आठवड्यात आणि त्यापूर्वी ४२ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले हे तापमान ३५ अंशांवर स्थिरावले आहे. किमान तापमानही २२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मात्र, या तापमानात येत्या आठवडाभरात वाढ होऊन ते ३८ अंशांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांजरवर्गातील प्राण्यांना जन्मस्थळांचे आकर्षण

$
0
0

सुनील वाडेकर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

बिबट्या मानवी वस्तीत अन्न आणि पाणी यांच्या शोधासाठी येत असतो. बिबट्या, वाघ, सिंह आदी प्राणी मांजर कुळातील सदस्य आहे, त्यांचा गुणधर्म असा आहे की, त्यांना जन्म ठिकाणीची ओढ असते, त्यांना कुठेही सोडले तरी ते जन्मस्थळी आकृष्ट होतात. त्यामुळे बिबट्यांना कुठेही सोडले तरी ते परत त्याच ठिकाणी येतात, असे प्रतिपादन रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुनील वाडेकर यांनी केले.

९८ व्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत बुधवारी माधवराव काळे स्मृती व्याख्यानात 'मानव आणि वन्यप्राणी संघर्ष' या विषयावर ते बोलत होते. गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगण येथे झालेल्या व्याख्यानप्रसंगी मंडलेश्वर काळे, चंद्रशेखर शाह, धनंजय काळे, संगीता बाफना उपस्थित होते. वाडेकर म्हणाले, की नाशिक आणि बिबट्या हे समीकरण आहे. नाशिकच्या दक्षिणेला आर्मीचे संरक्षीत प्रतिबंध क्षेत्रात वनसंपत्ती पूर्वेला एचएएल, एअरफोर्स यांच्या प्रतिबंधित क्षेत्रात वनजीवांचा वावर आहे. हे प्राणी पाणी आणि भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत येतात तेव्हा संघर्ष होतो. बिबट्या हा अतिशय हुशार प्राणी आहे. तो परिस्थितीशी जुळून घेतो. तो पाली, बेडूक, मासे देखील खातो. बिबट्याचा मानवी वस्तीजवळ अधिवास वाढत आहे. सध्या सिंचन वाढल्याने उसाच्या शेतात यांचा अधिवास वाढला आहे. सुरक्षित जागा वाटत असल्याने बिबट्या उसात राहतो. तो त्याच्या डोळ्यांच्या समांतर आणि खालच्या बाजुच्या छोट्या पाळीव प्राण्यांवर पाळीव जीव कोंबड्या, बकरी, वासरू, कुत्रा यांच्यावर हल्ला करतो. बिबट्या माणसाला घाबरतो. त्याच्यापासून तो दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचा डोळ्यांच्या समांतर वाकून शेतात काम करणारे, लहान मुले यांच्यावर तो हल्ला करतो, अशी माहिती वाडेकर यांनी दिली. आनंद बोरा यांनी परिचय करून दिला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले.

भरपाई देणारे महाराष्ट्र पहिले राज्य

वन्यजीवांचे अनुसूची तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार त्याची हत्या करणाऱ्यांवर दंड आणि कारावासाची शिक्षा ठरविण्यात आलेली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मानवाचा जीव गमवला तर त्या व्यक्तीच्या वारसास १५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. पाळीव प्राणी हल्ल्यात पाळीव प्राणी दगवल्यास त्या प्राण्यांच्या बाजारभावाच्या किमतीच्या ७५ टक्के नुकसान भरपाई दिली जाते. भरपायीचा उद्देश हा वन्यजीव जगावे, वाढले असा आहे, अशी मोठ्या प्रमाणात भरपाई देणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे, असे वाडेकर यांनी सांगितले. वाडेकर यांनी चित्रफितींच्या माध्यमातून वन्यजीवांची माहिती दिली.

..

आजचे व्याख्यान

विषय : कर्करोग - समज गैरसमज

वक्ते : डॉ. राज नगरकर

स्थळ : यशवंतराव महाराज पटांगण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीष्मराज स्मृती व्याख्यान रविवारी

$
0
0

भीष्मराज स्मृती व्याख्यान रविवारी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माजी पोलिस महासंचालक आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक भीष्मराज बाम यांच्या पुण्य स्मरणार्थ 'उत्तमाचा ध्यास' या विषयावर व्याख्यान बाम परिवारातर्फे आयोजित केले जाते. प्रसिद्ध मानसरोगतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे 'ध्यास उत्तमाचा' या विषयावर व्याख्यान होणार आहे. बाम यांच्या स्मृतीदिनी (१२ मे) संध्याकाळी ६.३० वाजता कुसुमाग्रज स्मारकात हा कार्यक्रम होणार आहे. उत्तमाची उपासना करण्याची गरज आणि मार्ग डॉ. नाडकर्णी श्रोत्यांपुढे उलगडून दाखवतील. हा कार्यक्रम सर्वाना खुला असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाम परिवारातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्रतपासणी शिबीर

$
0
0

नेत्रतपासणी शिबीर

नाशिकरोड : सुशील आय हॉस्पिटल आणि निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. या माध्यमातून डोळ्यांचा तिरळेपणा असलेल्या गरीब रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराच्या पोस्टरचे प्रकाशन मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर लासुरे यांच्याहस्ते झाला. यावेळी निर्मला संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे, डॉ. अमित विसपुते. डॉ. लियाकत नामोले, डॉ. कौसर तांबोळी, डॉ. शिल्पा बोथरा आदी उपस्थित होते. शिबिरात १४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. २३ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे असल्याची माहिती अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना जिल्हाप्रमुखांवर हल्ला

$
0
0

महापौरांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील जुने परिसरात मंगळवारी (दि. ७) मध्यरात्रीच्या सुमारास जुने धुळे भागात दोन गट परस्परांना भिडल्याने वाद झाला. परिसरातील एका कुटूंबात असलेल्या हळदीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलेले दोन परंपरागत शत्रू एकमेकांना भिडल्याने हा प्रकार घडला. या वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्यावर हल्ला करण्यात आला. सुदैवाने या घटनेची पूर्वसूचना मिळाल्याने वेळीच पोलिस घटनास्थळी धावल्याने मोठा अनर्थ टळला.

याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी पोलिसात तक्रार केली असून, भाजपचे महापौर, नगरसेवकांसह आठ जणांवर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी आणि महापौर चंद्रकांत सोनार यांच्यात जुने राजकीय वाद आहेत. जुने धुळ्यातील चिंचेच्या झाडाजवळ राहणाऱ्या चव्हाण परिवारात सागर यांच्या लग्नानिमित्त मंगळवारी हळदीचा कार्यक्रम असल्याने रात्री ११.३० च्या सुमारास हिलाल माळी हे कार्यक्रमाला गेले होते. त्याठिकाणी दहा मिनीटे थांबून ते पुन्हा चिंचेच्या झाडाजवळ असलेल्या सायकल दुकानाजवळ येऊन थांबले. यावेळी केशव येडू माळी, दिनेश कोळेकर हे कार्यकर्ते हिलाल माळी यांच्याशी चर्चा करीत होते. याच हळदीच्या कार्यक्रमासाठी भाजपचे नगरसेवक देवा सोनारही आले होते. त्यांनी दिनेश कोळेकर याला आवाज देऊन बोलावून घेतले. शिवाय ‘तु त्याच्यासोबत का राहतो?’ असे म्हणत त्याला निघून जाण्यास सांगितले. यानंतर देवा सोनार यांनी काही जणांसह हिलाल माळी यांच्याजवळ येऊन त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. ही माहिती आझादनगर पोलिसांना मिळाल्याने कर्मचारी घटनास्थळी धावले. या वेळी जमाव हिलाल माळी यांना जमिनीवर पाडून मारहाण करीत असल्याचे दिसले. परंतु, वेळीच पोलिसांनी खाली पडलेल्या हिलाल माळी यांना उचलून घेतल्याने हल्ला टळला. त्यांनी याप्रकरणी रितसर पोलिसात तक्रार केली. बुधवारी (दि. ८) पहाटे ४.३० च्या सुमारास या तक्रारीची नोंद घेत महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक देवा सोनार, भूषण सोनार, भैय्या ऊर्फ नरेंद्र सोनार, चंदू सोनार यांचे दोघे पुतणे, टिंक्या बडगुजर, शुभम बडगुजर, किरण वराडे यांच्यासह अन्य ९ ते १० जणांवर भादंवि ३९५,३९७ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकांनी बांधले पाच बंधारे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाचा दाह नागरिकांना अस्वस्थ करीत असताना आगामी काळात जलस्रोतांचे नवे पर्याय उपलब्ध व्हावेत, या दिशेने नांदगावमध्ये प्रयत्न सुरू आहेत. येथील युवा फाउंडेशनने पाणी अडविण्यासाठी तालुक्यातील जतपुरासह वनखात्याच्या परिसरात श्रमदानातून पाच दगडी बंधारे बांधले आहेत. ५७ हजार लिटर पाणी साठवता येईल, या क्षमतेचे हे बांध दुष्काळाने होरपळलेल्या नांदगावकरांना आगामी काळात नक्कीच सुखाचे व आनंदाचे दिवस घेऊन येतील आणि पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना मार्गी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

संस्थेचे पदाधिकारी सुमित सोनवणे, कृष्णा खैरे, संदीप पाटील, सिद्धेश सोनवणे, रवी सोनवणे, ईश्वर शिंदे, बंटी राऊत, करण भावसार, संग्राम कवडे, सचिन बोरसे, पप्पू देशमुख, अरुण राऊत, अथर्व सोनवणे, निलेश्वर पाटील, सचिन बोरसे, स्वप्नील गायकवाड, सुमित दाभाडे, कृष्णा खैरनार यांनी श्रमदानात सहभाग घेतला. ‘वॉटर कप’चे अतुल निकम यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभल्याचे युवा फाउंडेशनचे सुमित सोनवणे यांनी सांगितले

पाऊस एकतर कमी पडतो. दुष्काळाने तालुका हवालदिल झाला आहे. या परिस्थितीत पावसाचे पाणी साठविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

- सुमित सोनवणे, अध्यक्ष, युवा फाउंडेशन नांदगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मटा वृत्तसेवा नाशिकरोड

$
0
0

ऐंशी हजाराची घरफोडी

नाशिकरोड : जेलरोडच्या हनुमाननगरमध्ये भर दुपारी ८० हजार रुपयांची घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. भिका शिवमन राजभोज (वय ६०) रा. सिद्धी अपार्टमेंट राजारामनगर, दसक यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवडाभरात घडलेल्या घरफोडीच्या घटनांतील एकाही संशयितांपर्यंत पोलिस पोहचू शकलेले नाहीत. सुट्टयांचा कालावधी असल्याने परगावी गेलेल्या नागरिकांची बंद घरे चोरट्यांकडून लक्ष्य केली जात आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टरोडच्या उंचीने पावसाळी पाण्याचा धोका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संथ गतीने सुरू असलेल्या स्मार्टरोडची उंची परिसरातील नागरिक व व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. बांधकामांच्या प्लिंथ लेव्हलपासून हा रस्ता उंच असून, यामुळे पावसाळ्यातील पाणी आजुबाजुच्या दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये घुसण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा रस्ता स्मार्टरोड योजनेतंर्गत तयार केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील या रस्त्याच्या कडेला व्यावसायिक अस्थापनांची संख्या मोठी असली तरी काही घरांची संख्या देखील कमी नाही. स्मार्टरोड संकल्पनेनुसार हा रस्ता क्राँकटीकरणाचा असून भूमिगत पाईपलाईन व इतर काही सुविधा येथे पुरविण्यात येणार आहे. मुळातच रस्त्याच्या कामास बराच उशिर झाला असून, अजूनही ४० टक्क्याहून अधिक काम बाकीच आहे. हा रस्ता तयार करण्याचे नियोजन आखताना रस्त्याच्या उंचीकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार पुढे येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुची बांधकामे जुनी असून, दर काही वर्षांनी पडणाऱ्या थरांमुळे रस्त्यांची उंची वाढते आहे. आजमितीस हा रस्ता खोदून तयार करण्यात आला असला तरी पूर्वीपेक्षा रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. यामुळे दोन्ही बाजुंच्या बांधकामांची प्लिंथ लेव्हर रस्त्याच्या खाली पोहचली आहे. पाणी जिरण्याचा कोणताच मार्ग नसल्याने पावसाचे पाणी आजुबाजुच्या दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये घुसण्याची शक्यता दिसून येते आहे.

याबाबत स्थानिक रहिवाशी आणि इंजिनीअर दिलीप ओढेकर यांनी सांगितले, की याबाबत खूप आधीच मी हरकत नोंदवली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत अधिकाऱ्यांनी रस्त्याची उंची वाढवली. यामुळे पावसाचे पाणी दुकाने व घरांमध्ये घुसण्याचा मोठा धोका आहे. पूर्वीच्या बांधकामाकडे सपशेल दुर्लक्ष करून रस्ता बांधण्याचा घाट घालण्यात आला असून, ही गंभीर चूक करणाऱ्यांना शासन होणे आवश्यक आहे. या रस्त्याच्या उंचीमुळे एम. जी. रोड, शालिमार, अशोकस्तंभ अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी व्यापक समस्या निर्माण होणार असून, याबाबत महापालिका प्रशासनाने गंभीर विचार करणे आवश्यक असल्याचे ओढेकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सरबाबत समाजात बाऊ

$
0
0

डॉ. राज नगरकर यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आज समाजात कॅन्सरचा मोठ्या प्रमाणात बाऊ करण्यात आला आहे. परंतु तसे काहीही नसून कॅन्सर पूर्णपणे बरा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पैकी काही उदाहरणे नाशिकची व आसपासचीदेखील आहेत, असे प्रतिपादन डॉ. राज नगरकर यांनी केले.

वसंत व्याख्यानमाला नाशिक संस्थेच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेच्या सत्रात ते बोलत होते. गुरूवारी 'कर्करोग-समज गैरसमज' या विषयावरील नववे पुष्प त्यांनी गुंफले. हे पुष्प सदुभाऊ भोरे यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट येथे ही व्याख्यानमाला सुरू आहे.

डॉ. नगरकर पुढे म्हणाले की, कॅन्सरबद्दल समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. परंतु त्याचे पूर्ण ज्ञान घेऊनच त्याविषयी बोलण्याची आवश्यकता आहे. आपल्या घरात जोपर्यंत अडचण येत नाही तोपर्यंत आपण आजाराविषयी ऐकून घ्यायलाही तयार नसतो. असे न करता माहिती ठेवावी. चीनच्या तुलनेत भारतात कॅन्सरचे प्रमाण बहुतांशी कमी आहे. आपल्याकडे एक लाख लोकांमागे दीडशे लोकांना कॅन्सर होतो. चायनामध्ये हे प्रमाण बरेच जास्त आहे, अमेरिकेतदेखील कॅन्सरचे प्रमाण मोठे आहे. भारतात तरुणांची संख्या जास्त असल्याने येथे कॅन्सरचे प्रमाण कमी आहे, इतर देशांमध्ये वयोमर्यादा अधिक असल्याने या आजाराचे प्रमाण जास्त आढळते. परंतु भारतात वयोमर्यादा जसजशी वाढत जाणार आहे तस तशी कॅन्सरची त्सुनामीच येणार आहे, त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे असेही डॉ. नगरकर म्हणाले. त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून कॅन्सरविषयी माहिती दिली. अनेक पेशंटसचा कॅन्सर बरा झाल्याचे उदाहरण त्यांनी यावेळी दाखवले.

डॉ. नगरकर म्हणाले की, वैद्यकीय भाषेमध्ये टक्केवारीमध्ये रुग्णांचे वाचण्याचे प्रमाण सांगितले जाते. मूळात कोणतीही पुस्तके वाचून कुणाचे आयुष्य किती आहे हे सांगणे तितकेच अवघड आहे, ते अद्याप कुणालाही शक्य झालेले नाही असेही ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर प्रतिभा भोरे, रत्नाकर भोरे, राजेंद्र भोरे, अजय भोरे, अॅड. भोरे, गणेश भोरे यांची उपस्थिती होती. सदुभाऊ भोरे यांच्या स्मृतींना हिरालाल परदेशी यांनी उजाळा दिला. प्रमुख वक्त्यांचा परिचय अॅड. अजय निकम यांनी करून दिला. सूत्रसंचालन श्रीकांत बेणी यांनी केले.

---

आजचे व्याख्यान

वक्ता : मुकुंद दीक्षित

विषय : म. गांधी विचारांची आजच्या काळात उपयुक्तता

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनावर संशयाची सुई!

$
0
0

डॉ. गेडामांच्या प्रतिज्ञापत्रात दराचा उल्लेखच नाही; प्रशासन मात्र अडीच टक्क्यांवर ठाम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई उच्च न्यायालयाचा संदर्भ देत शहरातील महापालिकेच्या मालकीच्या मिळकती जप्त करण्याची कारवाई आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे अडीच टक्के दर आकारणी केली जात असल्याचा दावा आयुक्त राधाकृष्ण गमेंनी केला होता. परंतु, आता हा दावाच फोल निघाला असून, डॉ. गेडाम यांच्या प्रतिज्ञापत्रात असा कोणताही उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे, तर गेडाम यांनी शहरातील मिळकतींचा वापर हा सामाजिक कामांसाठी केला जात असल्याचा दावा प्रतिज्ञापत्रात केल्याने आता प्रशासन नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मिळकती ताब्यात घेण्यासाठी हा बनाव रचल्याची चर्चा विरोधकांमध्ये सुरू झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी ६६७ मिळकतींच्या गैरवापराबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारत थेट आयुक्तांना ३ जून रोजी उपस्थित राहण्याचे फर्मान काढले होते. त्यामुळे आयुक्तांनी शहरातील विनाकरारनामा असलेल्या ४०० मिळकतींसह एकूण ९०३ मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केली. जवळपास तीनशे मिळकती सील केल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. त्यामुळे नागरिक आणि नगरसेवकांचा दबाव वाढताच महापौर रंजना भानसी यांनी आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांच्यासह विरोधी पक्षातील प्रमुखांची आयुक्तांसमवेत बैठक बुधवारी घेतली. त्यात आयुक्त गमे यांनी सील केलेल्या मिळकतींवर रेडीरेकनरच्या अडीच टक्‍क्‍याने दर आकारणार असल्याचे सांगितले. त्यासाठी माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेण्यात आला. या मिळकतधारकांना मिळकत ताब्यात ठेवायची असेल तर अडीच टक्के रेडीरेकनर दराने करारनामा करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना दिले असून, अधिकारी या संस्थाना त्याद्वारे करार करण्याचे सांगत आहे. आयुक्तांनी अडीच टक्के दर सांगितल्यानंतरच भाजपने त्यावर ०.५ टक्के दराचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता आयुक्तांनी डॉ. गेडाम यांच्या प्रतिज्ञापत्राचा दावा केला आहे, त्यात अडीच टक्के दराचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी डॉ. गेडाम यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे कागदपत्रे सादर केली असून, त्यात दराचा कुठलाच उल्लेख नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनासह शहरातील तीनही आमदार तोंडघशी पडले आहेत. त्यामुळे हा सगळा मिळकती ताब्यात घेण्यासाठीचा प्रशासनाचाच बनाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कारवाईचा धडाका सुरूच

आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या मिळकतींवरच कारवाई होईल असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात गुरुवारी पंचवटी विभागात मोठ्या प्रमाणात मिळकती सील करण्यात आल्या. स्थानिकांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यांनतर विभागीय अधिकाऱ्यांनी मिळकत वापरकर्त्यांकडून पुर्नकरार करण्याचे अर्ज लिहून घेतले. तसेच, दोन महिन्यांचे भाडे भरून देण्याचे आदेशही दिले. अर्ज दिल्यानंतर पुन्हा या मिळकती खुल्या करून देण्यात आल्या. त्यामुळे कारवाई सुरू नसल्याचा देखावा प्रशासनाने करीत आहे.

प्रशासनाची पलटी

डॉ. गेडाम यांच्या प्रतिज्ञापत्रात अडीच टक्के दराचा उल्लेख नसल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाने पुन्हा पलटी खाल्ली आहे. दोन दिवसांपासून या प्रतिज्ञापत्राचे नाव घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी अचानक घुमजाव करीत सदरचा आदेश आता तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी काढल्याचा दावा केला आहे. आपली चूक लक्षात आल्याचे समजात प्रशासनाने आता या प्रकरणातही सारवासारव सुरू केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच आता शंका उपस्थित केल्या जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज होणार केंद्रांचा फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र महापालिकेने सील केली असून, महापालिकेमध्ये उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेमध्ये काहीही निष्पन्न झाले नसल्याने आज, शुक्रवार १० मे रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेत यासंदर्भात होणाऱ्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सेवेकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करीत महापालिकेकडून आपल्या मिळकती ताब्यात घेण्याच्या कारवाईचा धडाका सुरू आहे. यात शहरातील वेगवेगळ्या भागात वर्षानुवर्षे सुरू असलेले श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रही लक्ष्य करण्यात आली आहेत. या आध्यात्मिक विकास केंद्रांना सील केल्याने सेवेकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, त्वरित निर्णय घेऊन केंद्र उघडून द्यावीत, असा पवित्रा सेवेकऱ्यांनी घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेत गुरुवारी बैठक घेण्यात आली. परंतु, त्यात ठोस तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आज, पुन्हा या विषयावर बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती सेनेतर्फे पाण्याचे शंभर टँकर

$
0
0

दुष्काळग्रस्त भागासाठी मोहीम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू असताना आता सामाजिक संस्थाही याकामी पुढाकार घेत आहेत. छत्रपती सेनेनेही पुढाकार घेत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाण्याचे टँकर देण्याची तयारी दाखविली आहे.

सरकारच्या दुष्काळ निवाराणार्थ कामात सहभाग घेण्याची इच्छा छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देत व्यक्त केली. या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यांमध्ये १०० टँकर पुरविले जाणार आहेत. जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर इगतपुरी, घोटी, कळवण या आदिवासी भागांसह नांदगांव व चांदवड या दुष्काळी तालुक्यांमध्ये हे टँकर देण्यात येणार आहेत. येत्या रविवारपासून (दि.१२) सुरगाण्यातील लाडगांव, जांभूळमाथा, खोकरी, मुठीचा पाडा, पांगरणे या भागात पाण्याचे टँकर पोहचविण्यात येतील. याशिवाय प्रत्येक रविवारी किमान १० टँकर हे विविध तालुक्यांमध्ये दिले जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात भेट घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, नीलेश शेलार, राज्याच्या कोअर टिमचे अध्यक्ष तुषार गवळी, उपाध्यक्ष राजेश पवार, सागर आहेर, संदीप निगळ, सागर पवार, सुनील देशमुख, नितीन काकुस्ते आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळावरून कानटोचणी

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांचा 'अॅक्शन प्लॅन'; वास्तवतेवर भर देण्याच्या सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बोलावलेल्या बैठकीत 'अॅक्शन प्लॅन' तयार करण्यात आला. या बैठकीत पाणी, चारा, रोजगार व आलेल्या तक्रारीवर फोकस करण्याचे निर्देश देण्यात आले. मांढरे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच दुष्काळासंबंधी बैठक घेत त्यात सौम्य शब्दात अधिकाऱ्यांचे कान टोचले. तसेच त्यांनी कागदाच्या आकडेवारीपेक्षा वास्तविकतेकडे लक्ष देण्याच्या सूचनाही केल्या. जिल्ह्यात जुलैपर्यंत पाणी व चाराची उपलब्धता असली तरी ती असमान आहे. त्यामुळे ती सर्वत्र उपलब्धत करण्यासाठी समन्वय राखण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे यांनी टँकरवर जीपीएस सिस्टीम बसवली असून त्याचे सर्व अधिकाऱ्यांनी ट्रॅकिंग करून त्याचे स्क्रिन शॉट पाठवण्याचे निर्देश दिले. तसेच ज्या ठिकाणी टँकरचे पाणी विहिरीत टाकण्यात येते ते पाण्याच्या टाकीत टाकावे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणर नाही व पाणी उपसण्याची गरजही भासणार नाही. ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या नसतील तेथे १४ व्या वित्त आयोगातून त्या ग्रामसेवकांनी घ्याव्या असेही त्यांनी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातील धरणातील पाण्याचा आढावा विभागनिहाय घेण्यात आला. जलसंपदा विभागाचे चारही अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागातील माहिती देवून जुलैपर्यंत हे पाणी पुरेल असे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या ठिकाणी आवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्याबद्दही माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कालव्यातून पाणी सोडतांना त्याची चोरी होणार नाही. याची विशेष काळजी घेण्याच्या सुचना दिल्या. त्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवून त्यावर नजर ठेवण्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विहीर अधिग्रहीत केलेल्या ठिकाणी सुद्धा लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. छोट्या धरणावर प्रातांनी नियोजन करण्याचे यावेळी सांगण्यात आले.

पाणीटंचाईच्या बैठकीनंतर चारा टंचाईचा विषय घेण्यात आला. त्यात अधिकाऱ्यांनी एकूण चाऱ्याची उपलब्धता व जनावरांची संख्या सांगून त्याचे नियोजन सांगितले. काही ठिकाणी चारा मुबलक असला तरी काही ठिकाणी चाराटंचाई निर्माण होऊ शकते, असे सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी मांढरे यांनी वास्तविकता तपासून मुबलक चारा जेथे उपलब्ध असेल तेथून गरज असेल तेथे चारा देण्याचे नियोजन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

कडक कारवाईचा इशारा

बैठकीत नियोजनाला छेद देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. टँकर जात नसेल, फेऱ्या होत नसेल अशा ठिकाणी कारवाई करण्याचेही निर्देश दिले. वेळ मारुन नेणे, धातूर मातूर उत्तर चालणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. चारा किती, पाणी किती, रोजगार हमीची कामे यासाठी एका जणांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

असे होते चर्चेचे मुद्दे

पाण्याचे स्त्रोत सांभाळणे, विंधन विहिरी, पाणी पुरवठा योजना दुरुस्ती यासह आठ तालुके दुष्काळी असल्यामुळे त्याकडे विेशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी चर्चेत होते. २८२ टँकरमधून ७५३ फेऱ्या मंजूर असून प्रत्यक्षात ७१२ फेऱ्या होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच जिल्हातील धरणात १७ टक्के पाणी शिल्लक असून त्याचे नियोजन करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘खासगी सुरक्षेस परवानगी नाहीच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदार संघाचे मतदान पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स व व्हीव्हीपॅट यंत्राटी सुरक्षा करण्यासाठी कोणत्याही उमेदवारास खासगी सुरक्षा व्यवस्था नेमण्यास परवानगी देण्यात आलेली नसल्याची माहिती जिल्हाधिाकारी सूरज मांढरे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

मतदान यंत्रे सुरक्षित ठेवलेल्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी नेमण्यासंदर्भात निवडणूक नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे व उमेदवारांना ती तरतूद अवगत करून त्यांचे प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबत कल्पना देणे ही निवडणूक निर्णय अधिकारी यांची जबाबदारी आहे. तसेच असे प्रतिनिधी हे व्यवसायाने कोण असावेत, स्त्री असावेत की पुरुष असावेत या बाबींचे संदर्भात कोणताही अडसर निवडणूक कायद्यामध्ये नाही व त्याचे पूर्ण स्वातंत्र्य संबंधित उमेदवारास असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी स्ट्राँग रूमची पाहणी त्यांच्या प्रतिनिधींमार्फत करण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ती मान्य करण्यात आलेली आहे. याअगोरच सर्वच उमेदवारांना त्यांचे प्रतिनिधी सुरक्षा कक्षावर वेळोवेळी भेट देण्यासाठी नियुक्त करण्याबाबत पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या. या सुरक्षा कक्षाची निगराणी केंद्र व राज्य सरकारचे १२० हून अधिक सुरक्षारक्षकांकडून केली जात आहे. सतत २४ तास त्याचे व्हिडिओ चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत नाईटव्ह्यू सुविधेसह होत आहे. त्यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधी अटी शर्तींच्या अधीन नेमले गेलेले असताना त्यांचे खासगी सुरक्षारक्षक असे वर्णन चुकीचे केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानात रंगला ‘तीन पैशाचा तमाशा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि सुरभी थिएटर्स यांच्यातर्फे पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या नाटकाचा प्रयोग गुरुवारी परशुराम साइखेडकर नाट्यगृहात सादर करण्यात आला.

थोर जर्मन नाटककार ब्रेश्ट याच्या लेखणीतून साकारलेल्या 'थ्री पेनी ऑपेरा' या नाटकावर रचलेले मराठीतील दर्जेदार नाटक म्हणजे पु. ल. देशपांडे लिखित 'तीन पैशाचा तमाशा'. प्रायोगिक मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाची अजरामर कलाकृती म्हणून या नाटकाकडे आजही पाहिले जाते. 'पुलं'च्या लेखणीचा परिसस्पर्श झालेल्या नाटकाचे शिवधनुष्य रंगमंचावर पेलण्याचे काम नाशिकमधील महिला कलावंतांनी केले. नाटकाच्या सुरुवातील सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी जयप्रकाश जातेगावकर, डॉ. धर्माजी बोडके, अभिजित बगदे यांच्या हस्ते रंगमंचपूजन झाले. त्यांनतर प्रयोगाला सुरुवात झाली. सांगितीक आणि प्रायोगिक पद्धतीने नाटक सादर करण्याचे कसब दिग्दर्शक राजेश शर्मा यांनी लिलया पेलेले. पु. ल. देशपांडे लिखित नाटकाचे दिग्दर्शन राजेश शर्मा यांचे होते. निर्मिती सुरेखा शर्मा यांची होती. सूत्रधार म्हणून शुभम शर्मा यांनी बाजू सांभाळली.

नेपथ्य - शैलेंद्र गौतम, प्रकाश योजना - रवी रहाणे, रंगभूषा - माणिक कानडे, ध्वनी - अमोल काबरा, संगीत - शुभम लांडगे यांचे होते. या नाटकात अपिष्ठा नागरे, धनश्री माळी, योगीराज माळी, कविता आहेर, खुषी पवार, स्वाती माळी, छाया लोहकरे, कीर्ती नागरे, शिल्पा पंडीत, महिता आहेर, वैशाली देव, पल्लवी ओढेकर, अनघा दोडपकर, स्वाती शेळके, गीतांजली घोरपडे, तेजस्विनी गायकवाड, लक्ष्मी पिंपळे, प्रिया तुळजापूरकर यांनी भूमिका साकारल्या. या नाटकात जमेची बाजू होती ती संगीताची. अजय गायकवाड, प्रणव कोंटुरवार, शुभम गांजले, सर्वेश साबळे, चैतन्य गाडवे, चिन्मय कोंटुरवार, अनुपा देवरे यांनी संगीत साथ केली. रंगमंच व्यवस्था चंद्रवदन दीक्षित, मयूर चोपडे, अमोल थोरात यांनी सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळीपूर्व कामांना कसारा घाटामध्ये गती!

$
0
0

भरपावसात हायवे पोलिसांची राहणार गस्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सतत धूक आणि कोसळणाऱ्या पावसांच्या सरींमुळे कसारा घाटात अपघाताची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर हायवे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पावसाळीपूर्व कामांना सुरुवात करण्याबाबत पत्र दिले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुद्धा मागील काही दिवसांपासून वेगवेगळी कामे हाती घेतली आहे.

पावसळा सुरू झाला की नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह घोटी परिसरातील डोंगर दऱ्या हिरवाईने नटतात. सतत कोसळणारा पाऊस, मध्येच येणारे धुके यामुळे मुंबई आणि नाशिककडील पर्यटक निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी या भागात मोर्चा वळवतात. विशेषत: शनिवारी आणि रविवारी येथील महत्त्वाच्या स्पॉटवर प्रचंड गर्दी होते. यात मद्यपी टवाळखोरांचाही समावेश असतो. पावसळी पर्यटनात दरवर्षी अनेक तरुणांचा मृत्यू देखील होतो. कसारा घाटात मुंबईच्या दिशेने जाताना एका वळणावर धबधबा तयार होतो. हा धबधबा पाहण्यासाठी अनेक वाहने थांबतात. पर्यटक रस्त्यावर उतरतात. मात्र पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांसाठी हे धोक्याचे ठरते. वळण घेतल्याबरोबर समोर वाहने किंवा पर्यटक येतात. यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची भीती असते.

घाटणदेवी मंदिर परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथील कॅमल व्हॅलीतील दृष्य पाहण्यासाठी पर्यटक येतात. स्पीड आणि मद्यपान यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता वाढीस लागते. या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी फलक बसविणे, खड्डे बुजविणे, कलरचे पट्टे मारणे, धुके पडणाऱ्या ठिकाणी फॉग लॅम्प लावणे, सोलर ब्लिंकर्स बसविणे, तुटलेले कठडे दुरुस्त करणे अथवा आवश्यक त्या ठिकाणी नवीन कठडे बसविणे, 'नो पार्किंग'चे फलक लावणे, अशा सूचना हायवे पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणास केल्या आहेत. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाने याबाबतची कामे प्रत्यक्षात सुरू केली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मद्यपींवर लक्ष

मुंबईच्या दिशेने जाताना कसारा घाटात तीव्र उतार आहे. उताराच्या वळणानंतर लागलीच धबधबा पाहण्यासाठी पर्यटक थांबतात. भर पावसात आणि धुक्याच्या वातावरणात पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांसाठी अचानक समोर वाहने दिसतात. यामुळे सदर ठिकाणी वाहने थांबणार नाही. थांबली तर कारवाई करण्याकडे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे हायवे पोलिसांनी स्पष्ट केले. पावसाळी पर्यटनात मद्यपींचा उपद्रव रोखण्यासाठी यंदा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दादांच्या नावाचा पुरस्कार प्रसाद म्हणून स्वीकारतोय!

$
0
0

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नेताजी भोईर कोणत्याही अडचणीला धावून येणार हे ठरलेले यायचे. नाशिक सोडून मी मुंबईत संस्था सुरू केल्यानंतर त्यांनी मला अनेकदा मदत केली. माझ्यावर भरभरून प्रेम केले. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळतोय तो मी प्रसाद समजून स्वीकारतोय, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते यांनी केले.

विजय नाट्य मंडळातर्फे ज्येष्ठ कलामहर्षी नेताजी (दादा) भोईर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रंगसाधना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना दाते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारक येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, के. के. मुखेडकर यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते यांना रंगसाधना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

दाते म्हणाले, की नेताजी भोईर म्हणजेच दादा शेवटच्या श्वासापर्यंत रंगभूमीचाच विचार घेऊन जगले. आगळेवेगळे आणि अष्टपैलू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा, लेखन अशा सर्वच भूमिका त्यांनी उत्तमपणे बजावल्या. ते रंगभूमीवरचे भीष्माचार्यच होते.

आमदार सानप यावेळी म्हणाले, की पंचवटीत होणारे बोहाडे, मेळे, नाटक, गणपती मंडळाचे कार्यक्रम या माध्यमातून त्यांच्याशी नियमित संपर्क असायचा.

महापौर भानसी म्हणाल्या, की दादा आणि आम्ही एकाच गल्लीत रहात असल्याने लहानपणापासूनचे संबंध होते. पंचवटीत पूर्वी मेळा असायचा. दादांचा मेळा म्हटला की आम्ही सर्व भावंडे त्यासाठी आवर्जुन जात असू. लक्ष्मण सावजी म्हणाले, की दादांमुळे मी पहिल्यांदा रंगमंचावर आलो.

या कार्यक्रमात संस्थेसाठी नेहमी मदत करणारे विजया नायक, मुरलीधर तांबट, सतीश सामंत, संजय जरीवाला, के. के. मुखेडकर यांचा सत्कार करण्यात आला. पूनम भोईर, अॅड. प्रेरणा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंगीचे औषध विकणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

नाशिक : मनोविकारावर परिणाम करणाऱ्या औषधांची विक्री करणाऱ्या दोघा युवकांना भद्रकाली पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला. त्यांच्याविरूद्ध 'एनडीपीएस' कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेम सुधाकर पवार (१९, रा. गांधीनगर, नाशिकरोड) आणि शाहरुख सिंकदर शेख (२२, अरिंगळे मळा, नाशिकरोड) अशी संशयितांची नावे आहेत. काठे गल्ली परिसरातील बस स्टॉप येथे दोघे युवक संशयितरित्या थांबले असून, काहीतरी पाकीटमधून देवाण घेवाण करीत असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना समजली होती. बुधवारी सांयकाळी सव्वा चार वाजेची ही घटना असून, या माहितीनुसार भद्रकाली पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक अंचल मुदगुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. दोघा संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे निट्राझेपम १० मिलीग्रॅम या औषधाच्या ३० गोळ्या सापडल्या. कोर्टाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images