Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

टवाळखोरांमुळे नागरिक हैराण

$
0
0

नाशिक : कृषी नगर येथील दत्त मंदिरातील उद्यान हे टवाळखोरांचा, प्रेमी युगुलांचा अड्डा बनले आहे. उद्यानाजवळच कॉलेज असल्याने दुपारी कॉलेज सुटल्यावर आणि संध्याकाळच्या वेळी तरुण मुले, प्रेमी युगुल उद्यानात येऊन बसतात. कृषी नगर परिसरात ठिकठिकाणी तरुणांचे घोळक्याने उभे राहत असल्याने गोंगाट, भरधाव वेगाने वाहने चालवणे, स्टंटबाजी करणे यामुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. त्यांच्या अशा स्टंटबाजीमुळे संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना रस्तावरून चालणेही अवघड होते. उद्यानातील आवारात दत्त मंदिर आणि श्री संत ज्ञानेश्वर वाचनालय आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची सतत ये-जा चालू असते. परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा या मुलांना समजविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ते ऐकत नसून, यातून गैरकृत्य होण्याचा धोका निर्माण झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांधीजींच्या मदतीने क्रांतिवीर नाईक ठरले निर्दोष

$
0
0

साडेपाच लाखांचा सरकारी खजिना लुटल्याच्या आरोपातून मुक्ती

\B

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendratarte@MT

नाशिक : 'स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाच्या कारणाने तुरुंगवास भोगलेल्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांना पुन्हा १९४२ च्या सुमाराला साडेपाच लाखांचा सरकारी खजिना लुटल्याच्या आरोपात ब्रिटीश सरकारने गोवण्याचा कट केला होता. ब्रिटीशांनी ताब्यात घेतल्यानंतर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याने याप्रश्नी आता आपणच लक्ष घालावे, अशी विनंती क्रांतिवीरांनी थेट महात्मा गांधी यांना पत्राव्दारे केली. यावर गांधींनी क्रांतिवीरांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देत खटल्यातून निर्दोष सोडविले होते', असे मोलाचे ऐतिहासिक संदर्भ ज्येष्ठ कामगार नेते बळवंत आव्हाड यांनी क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या ५० व्या पुण्यस्मरणानिमित्त 'मटा' सोबत बोलताना मांडले.

\B

जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील मनमाड येथे जन्मलेल्या आणि स्वातंत्र्यचळवळीत विशेष योगदान देणाऱ्या क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या नावे सामाजिक सहभागाच्या जोरावर शिक्षणसंस्था चालविली गेली किंवा मनमाडमध्ये पुतळाही उभारला गेला; तरीही त्यांच्या देशासाठीच्या योगदानाची सरकारने अधिकृत नोंद त्यांच्या पश्चातच्या ५० वर्षांनंतरही अद्याप घेतलेली नाही, अशी खंतही मनमाड येथील ज्येष्ठ कामगार नेते आव्हाड यांनी व्यक्त केली. इतक्या वर्षांमध्ये सरकारे आली अन् गेली. पण स्वातंत्र्यलढ्यात जीवनभर स्वत:ला झोकून देणाऱ्या या क्रांतीकारकाचे कार्य शासनाच्या नोंदींच्या यादीत दुर्लक्षितच राहीले आहे. आगामी काळात तरी ही चूक शासनाने दुरुस्त करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शैक्षणिक जीवनातच स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून देणाऱ्या क्रांतिवीर वसंतराव नाईक यांचा जन्म १३ डिसेंबर १९१२ रोजी झाला होता. त्यांची १०६ वी जयंतीही गुरुवारी साजरी झाली. तर त्यांची ५० वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने कामगार नेते आव्हाड यांच्याकडील दस्ताऐवजांच्या संदर्भांनुसार सधन घरात जन्मल्यानंतर क्रांतिवीर नाईक यांनी शिक्षण सुरू असताना ब्रिटीशकालीन राजवटीतील सायमन कमिशनला त्यांनी विरोध दर्शविला. मीठाच्या सत्याग्रहातील सहभाग, ब्रिटीशांविरोधात तरुणांचे संघटीकरण, चलेजाव घोषणांमधील सहभाग अशा देशकार्यातील सहभागांमुळे ब्रिटिशांनी त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतरही ब्रिटीशांनी त्यांना सरकारी खजिना लुटल्याच्या आरोपावरून शोध सुरू केला होता. त्यावेळी क्रांतिवीरांनी महात्मा गांधींना पत्र लिहून या खटल्यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. यावर महात्मा गांधी यांनी बॅ. मुन्शी, बॅ. धीरूभाई देसाई यांच्यावर खटल्याची जबाबदारी सोपविली. नाशिकमध्येच चालविण्यात आलेल्या या खटल्यातून पुढे क्रांतिवीर नाईक निर्दोष सुटले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात मनमाडच्या नगराध्यक्ष पदापासून तर कायदेमंडळावर आमदार पदापर्यंत जाऊनही राजकीय चढाओढीत त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली होती, असेही आव्हाड यांनी सांगितले.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांचे देशकार्यातील योगदान अतिशय मोठे आहे. सरकारने आजवर त्यांच्या कार्याची नोंद शासकीय दप्तरात करणे आवश्यक होते. आज त्यांचे ५० वे पुण्यस्मरण आहे. नागरीकांनी जशी त्यांची स्मृती जपली आहे तशीच शासनानेही त्यांच्या कार्याची नोंद करून स्मृती जपावी, अशी कळकळीची अपेक्षा आहे.

- \Bबळवंत आव्हाड, ज्येष्ठ कामगार नेते, मनमाड \B

..

लोगो : वसंतराव नाईक पुण्यतिथी विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिमा वादाने अधिकारी पेचात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'नामको'चे माजी चेअरमन कै. हुकूमचंद बागमार यांच्या प्रतिमेवरून राजकारण तापले असतांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणात हात झटकले आहे. प्रगती पॅनलने बागमार यांच्या प्रतिमेचा वापर प्रचारात केल्याने त्याबाबत त्यांचे पुत्र अजित बागमार यांनी आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. पण, या तक्रारीवरून काय कारवाई करावी, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

यापूर्वी अजित बागमार यांनी फौजदारी दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. तर हे प्रकरण पोलिस स्थानकात जाणार असल्याचे बोलले जात आहे. प्रगती पॅनलचे सर्व माजी संचालकांनी यापूर्वी हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या असल्याने त्यांनी प्रचाराच्या पत्रक व पोस्टरवर प्रतिमेचा वापर केला आहे. तर दुसरीकडे नम्रता पॅनलनेही बागमार यांचीच प्रतिमा वापरली आहे. त्यामुळे हा वाद निवडणुकीत पेटण्याची शक्यता आहे.

'नामको'च्या निवडणुकीत प्रचाराने रंगत आलेली असतांना प्रतिमेचा वाद सुरू झाला आहे. याअगोदर अजित बागमार यांनी नम्रता पॅनलची निर्मिती करून माजी संचालकांची कोंडी केली. त्यानंतर या माजी संचालकांनी प्रगती पॅनल नाव पॅनलला दिले. आता प्रतिमेचा वादानेही त्यांच्या अडचणी वाढल्या आहे.

..

लोगो : नामको निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परगावची वाहने ‘टार्गेट’

$
0
0

परगावची वाहने 'टार्गेट' (फोटो)

-------

त्रस्त वाहनचालकांकडून नाराजी

---------

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

सातपूर परिसरातील पपया नर्सरी येथे इतर जिल्ह्यांतील तथा राज्यांतील वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून 'टार्गेट' केले जात आहे. त्यामुळे अशा त्रस्त वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे रविवारी सुटीच्या दिवशी पपया नर्सरी भागातील जाधव संकुल पोलिस चौकी अर्थात, अंबड टी पॉइंट येथे तब्बल एकाच वेळी सहा वाहतूक पोलिस कसे, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. खरोखरच अशा प्रकारे एकाच ठिकाणी सहा वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली असावी का, असा सवालही उपस्थित होत आहे.

पपया नर्सरी भागात वाहतूक पोलिसांबाबत अनेकांनी याआधी तक्रारी मांडल्या आहेत. मात्र, तरीही येथील समस्या सुटताना दिसत नाही. आता पुन्हा तेथेच वाहतूक पोलिसांचा जाच इतर जिल्ह्यांतून, राज्यांतून येणाऱ्या वाहनचालकांना सहन कराव लागत आहे. कारवाईवेळी दोन वाहतूक पोलिस अशी वाहने बाजूला घेण्यास सांगतात. त्यानंतर 'भीक नको, पण कुत्रे आवर' असे म्हणत वाहनचालक काही पैसे देत निघण्यास पसंती देतात. परंतु, अशा प्रकारामुळे नाशिकचेच नाव बदनाम होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. याप्रश्नी पोलिस आयुक्तांनी लक्ष घालत कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

---

नाशिकचे नाव धार्मिक स्थळांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु, त्याच नाशिक शहरात इतर जिल्ह्यांतून, राज्यांतून येणाऱ्या वाहनचालकांना पपया नर्सरी भागात टार्गेट केले जाते. येथे एकाच वेळी सहा वाहतूक पोलिस कसे, असाही प्रश्न पडतो.

-बंडू आहेर, वाहनचालक

००००००००००००००००००००थोडक्यात००००००००००००००००००००

'एचएएल'तर्फे स्वच्छतेबाबत रामकुंड भागात प्रबोधन (फोटो)

पंचवटी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत एचएएल, ओझर आणि घनकचरा विभाग पंचवटीतर्फे रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण परिसरात स्वच्छतेबाबत रॅली काढून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. या परिसरात स्वच्छताही करण्यात आली. या मोहिमेत 'एचएएल'चे अपर महाप्रबंधक एच. एल. सूर्यप्रकाश, उपमहाप्रबंधक एस चंदेल, जितेंद्र मोरे, प्रबंधक, विठ्ठल बनसोड, युनियन पदाधिकारी अशोक गावंडे, एस. पी. आहेर, नितीन पाटील, मन्सूर शेख, दीपक तावरे आदी सहभागी झाले होते. महापालिकेचे संजय दराडे, किरण मारू आदींसह कर्मचाऱ्यांनी मोहिमोप्रसंगी सहकार्य केले.

---

छायाचित्र प्रदर्शन

गंगापूररोड : ज्येष्ठ तत्त्वज्ञ, विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांचे निवडक साहित्य आणि छायाचित्रांचे प्रदर्शन आज, शुक्रवार (दि. १४)पासून १६ डिसेंबरपर्यंत कुसुमाग्रज स्मारकात आयोजित करण्यात आले आहे. आज सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत खुल्या राहणाऱ्या या प्रदर्शनाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णमूर्ती अभ्यास मंडळाने केले आहे.

--

बॅरिकेडिंग निरुपयोगी

नाशिक : शहरातील अत्यंत वर्दळीच्या कॉलेजरोडवरील बीवायके कॉलेजसमोर लावलेले बॅरिकेडिंग काही तरुण हाताने बाजूला सारून त्यातून दुचाकी नेत असल्याने निरुपयोगी ठरत आहेत. परिणामी वाहतूकही विस्कळीत होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याप्रश्नी त्वरित लक्ष घालून योग्य कार्यवाही करण्याची अपेक्षा त्रस्त वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

--

बोगद्याजवळ कोंडी

इंदिरानगर : गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाणारा बोगदा 'वन वे' आहे. पण, ज्यावेळी येथे वाहतूक पोलिस नसतात त्यावेळी असंख्य नागरिक नियम पाळत नाहीत. त्यामुळे या बोगद्याजवळ अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात दोन दरोडे; लाखोंची रोकड लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील देवपूरमधील आनंद नगर भागात बोरसे ब्रदर्स यांच्या कार्यालयात चोरट्यांनी धाडसी चोरी करून दहा लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिस त्याआधारे तपास करीत आहेत. या घटनेत चावीने कार्यालयातील तिजोरी उघडण्यात आल्याने ओळखीच्याच व्यक्तीने ही चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. सुमीत सुधाकर बोरसे यांचे देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरात आनंद नगर प्लॉट क्र. २३ ‘ब’ येथे बोरसे ब्रदर्स नावाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शनची कामे होतात. नेहमी प्रमाणे बुधवारी नेहमीप्रमाणे रात्री कर्मचाऱ्यांनी कार्यालय बंद केले. यानंतर मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास तीन चोरटे मोटरसायकलने तेथे आले. त्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कार्यालयातील तिजोरी चावीने उघडून त्यातील अंदाजे दहा लाख रुपयांची रोकड चोरली, अशी माहिती बोरसे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तसेच श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दुकानाजवळील व आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे आल्याचे आणि त्यांनी तिजोरी उघडल्याचे चित्रीकरण झाले आहे.

दुसऱ्या घटनेत शहरातील साक्रीरोडवरील जयभवानी ट्रेडर्स दुकान मालकाच्या घरी गुरुवारी पहाटे दरोडा पडला. चार दरोडेखोरांनी वॉचमनला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवत घरातून लाखोंचा ऐवज लंपास केला असून पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी करीत वॉचमनकडून माहिती जाणून घेतली. मात्र घरमालक बाहेर गावाला गेले असल्याने नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नाही. ओम अग्रवाल यांचे साक्रीरोडवरील सुरेंद्र दुध डेअरीजवळ जयभवानी ट्रेडर्स नावाने दुकान आहे. दुकानाला लागूनच अग्रवाल यांचे घरही आहे. अग्रवाल हे कुटुंबीयांसोबत जालना येथे गेलेले होते. यामुळे अग्रवाल यांनी वॉचमन हिंमतसिंग पावरा याला घरासह दुकानावर पहारा देण्यासाठी ठेवले होते. त्यात गुरुवारी पहाटे पावरा हा अग्रवाल यांच्या घराच्या आवारात झोपलेला असताना अचानक चार दरोडेखोरांनी येवून पावराला मारहाण केली. शिवाय, त्याला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले. यानंतर दरोडेखोरांनी अग्रवाल यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत घरातील कपाट फोडून लाखोंचा ऐवज लुटून नेला. अग्रवाल हे बाहेरगावाला गेलेले असल्याने नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला हे समजू शकलेले नाही. वॉचमन पावरा हा कमालीचा भेदरलेला होता. त्याने दरोडेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु, दरोडेखोरांनी त्यांच्यावरच हल्ला चढविल्याने तो हतबल झाला. या वेळी वॉचमनने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली असून, या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन निरीक्षकांसह एकाच
लाच स्वीकारताना अटक
धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथे प्रादेशिक परिवहन विभागाचा तपासणी नाका आहे. या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षकांसह खासगी पंटरमार्फत तपासणी नाक्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांकडून लाच मागितली जात असल्याची तक्रार एका ट्रक चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केला होता. या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षकासह खासगी पंटरला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या मधोमध सीमा तपासणी नाका असून या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक सचिन शिवाजी पाटील आणि गणेश सजन पिंगळे यांच्यासह एक खासगी पंटर हे बुधवारी (दि. १२) रात्रीच्या सुमारास ट्रक चालकांकडून पाचशे रुपयांची लाच मागत असल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी संबंधित ट्रक चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मोटार वाहन निरीक्षकासह खाजगी पंटराची तक्रार केल्याने पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून मोटार वाहन निरीक्षक अधिकारी सचिन पाटील, गणेश पिंगळे व खासगी पंटर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.



‘त्या’ फरार नगरसेवकास
पोलिस कोठडी

चाळीसगाव : शाळेतील विद्यार्थिनीला मोबाइलमधील अश्लील चित्रफीत दाखविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नगरसेवक, शिक्षक तथा पालिकेतील शिक्षण सभापती बंटी उर्फ सूर्यकांत ठाकूर अखेर पोलिसांना शरण आला आहे. उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वाच्च न्यायालयानेही त्याचा जामिन अर्ज नाकारल्याने बुधवारी (दि. १२) तो ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करीत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. येथील नगरपालिकेचे नगरसेवक व शिक्षण सभापती तथा वाघळी येथील हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले शिक्षक सूर्यकांत ऊर्फ बंटी ठाकुर याच्याविरोधात विनयभंग तसेच पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमविवाहामुळे बहिणीचा भावाकडून खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

बहिणीने चोरून प्रेमविवाह केल्याच्या रागातून सख्ख्या भावानेच बहिणीचा खून केल्याची घटना देवळा तालुक्यातील दहीवड येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दहीवड (भौरी मळा, ता. देवळा) येथील निंबा खंडू सोनवणे यांची मुलगी प्रियांका (वय १९) हिने घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ डिसेंबर रोजी घडली होती. मात्र पोलिसांना शंका आल्याने त्यांनी तपास केला असता, प्रियांकाने नात्यातीलच कळवण येथील अमोल आहेर याच्याशी सहा महिन्यांपूर्वी नाशिक येथे नोंदणी पद्धतीने विवाह केल्याचे निदर्शनास आले. आपली प्रतिष्ठा जाईल या भीतीपोटी प्रियांकाचा सख्खा भाऊ रोशन सोनवणे याने प्रियांकाच्या गळ्याला साडीच्या काठाने आवळून ठार मारून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र देवळ्याचे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांना संशय आल्याने त्यांनी प्रियांकाच्या भावाची कसून चौकशी केली असता, त्याने कबुलीजबाब दिला. त्यावरून देवळा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित रोशनला ताब्यात घेण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलीस अकादमीत पोलिसाच्या १२ लाखांवर डल्ला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमीत आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागद पत्रांच्या आधारे आरोपीने प्रशिक्षण घेत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या सुमारे 12 लाख रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत केशवराव हूंबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 28 फेब्रुवारी 2014 ते 8 ऑगस्ट 2016 या कालावधीत हा प्रकार घडला.

एमपीएतील किंवा आयडीबीआय बँकेशी संबंधित अज्ञात व्यक्तीने पीएसआय दृष्यत पाटील यांच्या नावाने बँकेत वेगवेगळ्या तारखेला धनादेश टाकले. बनावट कागदपत्र्यांच्या आधारे प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकात बदल करण्यात आले. यामुळे आरोपीस एकाच खात्यातून डेबिट कार्डच्या मदतीने पैसे काढता आले. या पद्धतीने आरोपीने तब्बल 11 लाख 90 हजार ३६५ रुपये काढले. फसवणुकीचा हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली असून गंगापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रकारची चौकशी करीत आहेत. दरम्यान, सायबर सिक्युरिटी आणि तंत्रज्ञान याबाबत राज्यातील पोलिस अधिकाऱ्याना प्रशिक्षण देण्याऱ्या मातृ संस्थेत हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येते आहे. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या एमपीएवर काही दिवसांपूर्वीच एका अज्ञात ड्रोनने चित्रीकरण केल्याचा प्रकार घडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड तालुक्यात शेतकरी आत्महत्या

$
0
0

नाशिक : निफाड तालुक्यातील रसलपूर येथे शेतकरी कुटुंबातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणाच्या वडिलांच्या नावे शेती असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अमित अहमदखा पठाण (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. १२ डिसेंबर रोजी त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यामुळे जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १०६ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नर्मदा परिक्रमास गेलेल्या पोलिस मित्राचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

देवळालीगावचे रहिवासी, पोलिस मित्र व माजी प्रेस कामगार तानाजी पुंडलिक खेलुकर (वय ६८) यांचा नर्मदा परिक्रमासाठी जात असताना वाटेतच अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खेलुकर यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे.

तानाजी खेलूकर हे देवळालीगाव व विहितगाव परिसरातील ५० नागरिकांसह नर्मदा परिक्रमासाठी खासगी ट्रॅव्हल्सने गेले होते. गुजरातमधील भरूच येथे एका मंदिरात दर्शनासाठी खेलूकर जात असताना त्यांचा पाय घसरला व ते डोक्यावर पडले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तेथे असलेले त्याचे नातेवाईक व मित्रांना मोठा धक्का बसला. खेलुकर व त्यांच्या नातेवाईकांनी नर्मदा परिक्रमा यात्रा अर्ध्यावर सोडली. खेलुकर यांचा मृतदेह खासगी वाहनाने देवळालीगावी आणण्यात आला. त्यांच्यावर गुरुवारी (दि. १३) रात्री अंत्यसंस्कार करण्यात आला.

खेलुकर हे आठ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. नाशिकरोड परिसरात ते पोलिस मित्र म्हणून परिचित होते. उपनगर व नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक कामात ते मदत करत असे. त्यामुळे पोलिसांमध्येही त्यांची चांगली प्रतिमा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरुजींच्या विनंतीवर ४ जानेवारीला सुनावणी

$
0
0

बचाव पक्षाचा युक्तिवाद संपला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोर्ट सुनावणीला नियमित हजर राहण्याची आवश्यकता नसून, त्यातून सूट मिळावी यासाठी संभाजी भिडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली. कोर्टाने पुढील सुनावणी ४ जानेवारी रोजी ठेवली असून, त्यात याबाबत आदेश होण्याची शक्यता आहे.

'माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरुद्ध महापालिकेने कोर्टात खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी जिल्हा कोर्टात झाली. मागील सुनावणीवेळी हजर राहिलेले भिडे आज सुनावणीला हजर नव्हते. भिडे यांच्या वतीने अॅड. अविनाश भिडे यांनी युक्तिवाद केला. भिडे यांना हजर राहण्यापासून सवलत मिळावी, यासाठी अॅड. भिडे यांनी अर्ज केला असून, त्यावर आज युक्तिवाद पूर्ण झाला. अॅड. भिडे यांनी सांगितले, की सर्व पुरावे कोर्टासमोर असून, भिडे यांनी दर सुनावणीला हजर राहणे आवश्यक नाही. भिडे यांचे वय, त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, त्यांना पुरविण्यात येणारे पोलिस संरक्षण आणि त्यासाठी होणारा वारेमाप खर्च लक्षात घेता कोर्टाने त्यांना सवलत द्यावी, अशी विनंती अॅड. भिडे यांनी कोर्टाकडे केली. भिडे यांच्या वतीने दर तारखेला वकील बाजू मांडतील, तसेच आवश्यकता असेल त्या वेळी भिडे हजर राहतील, अशी हमीही बचाव पक्षाने दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी ४ जानेवारीला ठेवली आहे. या दिवशी कोर्ट आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई, पुणे, ठाणे विजयी

$
0
0

नाशिक : येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या पुरुष आणि महिलांच्या ६९ व्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर या संघांनी आपले सामने जिंकून बाद फेरीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली. महिलांमध्ये मुंबई, नागपूर, मुंबईनेही विजय मिळवत बाद फेरीतील स्थान भक्कम केले. पुरुषांच्या गटात अहमदनगरने यवतमाळचा ३७- २८ असा पराभव केला. बाद फेरीचे सामने शनिवारी होणार असून, १६ डिसेंबर रोजी अंतिम फेरी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढ, नगरसेवक निधीवरतोडगा निघण्याची शक्यता?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात ओसरत असलेली मोदी लाट आणि पाच राज्यातील निवडणुंकामध्ये त्यावर झालेल्या शिक्कामोर्तबाने शहरातील भाजपचे आमदार चांगलेच धास्तावले असून, पालिकेच्या कामकाजात सक्रिय झाले आहेत. माजी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कार्यकाळात आमदारांसह नगरसेवकांच्या कामांची मंदावलेली गती पूर्ववत करण्यासाठी भाजपचे तीनही आमदार आता सरसावले असून, सोमवारी (दि. १७) तीन आमदारांची पालिका आयुक्तांसोबत करवाढ, नगरसेवक निधी, रस्ते आणि आमदारांच्या कामाना एनओसी देण्यासंदर्भातील विषयांवर बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर तोडगा निघड्याची शक्यता आहे.

शहरातील बांधकाम परवानग्या ठप्प होणे, अंगणवाड्या बंद होणे, नागरिकांवर भरमसाठ कर लादल्याने भाजपबद्दल नागरिकांमध्ये दिवसेंदिवस नाराजी वाढत चालली आहे. तुकाराम मुंढेंनी आमदारांनी मंजूर करून आणलेली कामेही रोखली होती. वर्षभरापूर्वी भाजपने २५७ कोटींच्या रस्त्यांचा प्रोजेक्ट तयार करून तो मंजूर करून घेतला. परंतु, तुकाराम मुंढेंनी त्रिसूत्री लावून त्यावर काट मारली. त्यातच सध्या ६२ हजार मिळकतधारकांना लाखांच्या घरपट्ट्या हातात पडत असल्याने भाजपविषयी त्याचा असंतोष वाढत चालला आहे. नगरसेवकांचा ७५ लाखांचा निधीही रोखला गेला आहे. त्यामुळे नागरिकांपाठोपाठ नगरसेवकही नाराज आहेत. तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर नागरिकांसह नगरसेवकांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ सुटावे यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील झाले आहेत. महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेवून त्यांना प्रलंबित कामे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु, आयुक्तांनी अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नगरसेवकांची धडधड वाढली आहे. त्यातच पाच राज्यांमध्ये भाजपचे पानीपत झाले असून, मोदींचा करिश्मा ओसरला आहे. त्यामुळे आपलेही पानीपत होवू नये, यासाठी शहरातील भाजपचे तीनही आमदार कामाला लागले आहेत. करवाढ, अंगणवाड्या, बांधकाम परवानग्या, नगरसेवक निधी, आमदारांची कामे याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांची पालिकेत आयुक्तांसमवेत बैठक होणार आहे. महापौरांसह भाजपचे पदाधिकारी या बैठकीला हजर राहणार असून, शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खवय्यांचा आज मेळावा

$
0
0

नाशिक : नाशिक आणि खवय्येगिरी, हे समीकरणचं अगदी खास आहे. नाशिकच्या मृणाल भिडे या तरुणीने, इन्स्टाग्रामवर गेल्या काही महिन्यांपासून 'फूड इज लाइफ शून्य शून्य एक' हा पेज ब्लॉग सुरू केला. या पेजवर नाशिकच्या सर्व चोखंदळांची खवय्येगिरी एकत्र व्हावी, यासाठी शनिवारी, १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नाशिकच्या खवय्यांचा मेळावा होणार आहे. हा मेळावा कॉलेजरोडच्या 'दि हॅपी फिस्ट रेस्टॉरंट'मध्ये होणार असून, मेळाव्यात खवय्ये एकमेकांचा परिचय करुन देत, खाद्यपदार्थांची मेजवानीचा आनंद घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचा सत्कार

$
0
0

विद्यार्थ्यांचा सत्कार

जेलरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड केंद्रातर्फे जे. डी. सी. बिटको हायस्कूल येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. मंचावर विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य एस. एस. दारोळे, प्राचार्य एस. पी. महाले, मीता राय, पर्यवेक्षक व्ही. सी. चौधरी, उपप्राचार्य डॉ. महेस औटी आदी उपस्थित होते. त्यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

नाशिकरोडच्या जेडीसी बिटको इंग्लिश स्कूल तसेच जयरामभाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात चार्टस, मॉडेल्स व प्रोजेक्टस सादर केले होते. संस्थेच्या शतकपूर्ती महोत्सव आणि संस्थेचे सचिव मो. स. गोसावी यांच्या गौरवानिमित्त हे प्रदर्शन झाल्याची माहित प्राचार्य एस. पी. महाले यांनी दिली. आशा भालेराव यांनी सूत्रसंचलन केले. रोहणी पटवाल यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेक चालली सासरी सायकलवरी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

एरवी कुठलेही लग्नकार्य म्हटले की, लग्नानंतर नवरदेव-नवरीसह वऱ्हाडी मंडळी कार अन् इतर वाहनातून घराकडे मार्गस्थ होतात. मात्र येवल्यातील पिंपळगाव जलाल गावात गुरुवारी झालेल्या एका विवाह समारंभानंतर नवदाम्पत्य चक्क एका सायकलवरून नवरदेवघरी पोहचले. 'सायकल चालवा, तंदुरुस्त राहा', 'सायकल चालवा, प्रदूषण टाळा' हा संदेश या नवदाम्पत्याने समाजमनाला दिला. सायकलवरून नवरीसह आपल्या घरी निघालेली नवरदेवाची ही स्वारी सर्वांचेच लक्ष वेधून गेली.

पिंपळगाव जलाल येथील कैलास लक्ष्मण वाघ यांची कन्या ज्योती आणि नजीकच्या तीन किलोमीटर अंतरावरील नांदेसर येथील सुभाष सूर्यभान वाघ यांचा मुलगा प्रशांत यांचा विवाह सोहळा गुरुवारी (दि. १३) दुपारी पिंपळगाव जलाल येथे पार पडला. लग्नानंतर हे नवदाम्पत्य कुठल्याही कार अथवा मोठ्या वाहनातून प्रवास न करता चक्क सायकवरून नांदेसर या गावी सायकलवरून पोहचले. सायकल चालविणारा नवरदेव अन् त्याच्या पाठीमागे बसलेली नवरी हे अनोखे दृश्य यानिमित्ताने पहायला मिळताना तीन किलोमीटरच्या या मार्गावर सर्वांच्याच नजरा वेधल्या गेल्या होत्या.

वर प्रशांत आणि वधू ज्योती यांची पिंपळगाव जलाल येथील लग्नस्थळापासून ते नवरदेव राहत असलेल्या नांदेसर गावाची सफर चर्चेचा विषय ठरतानाच समाजमनाला 'सायकल चालवा, पर्यावरण वाचवा', 'सायकल चालवा, तंदुरुस्त राहा' असाच अनमोल संदेश देणारी ठरली. प्रशांत वाघ (नांदेसर) हे गेल्या पाच वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. पिंपळगाव जलाल गावातील जय तुळजा भवानी मित्र मंडळाने आजवर गेल्या १३ वर्षांत पिंपळगाव ते तुळजापूर काढलेल्या सायकल यात्रेतदेखील त्यांनी सहभाग नोंदवलेला. नांदेसर गावात पोहचलेल्या या नवदाम्पत्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात

$
0
0

थोडक्यात

धुळ्यात सात घरांना आग

धुळेः शॉर्ट सर्किट होऊन पाच घरांना आग लागल्याची घटना शहरातील चाळीसगाव रोडलगत पूर्व हुडको वसाहतीमध्ये घडली. या आगीत परिसरातील सहा ते सात घरे जळून खाक झाली. या घटनेत गरीब मुस्लिम परिवारांचे संसार उघडयावर आले आहेत. यात घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पाच लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरातील चाळीसगाव रोडलगत असलेल्या पूर्व हुडको वसाहतीमधील एका वस्तीला दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक ही आग लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात सात घरांना आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शॉर्ट सर्किट होऊन पाच घरांना आग लागल्याची घटना शहरातील चाळीसगाव रोडलगत पूर्व हुडको वसाहतीमध्ये घडली. या आगीत परिसरातील सहा ते सात घरे जळून खाक झाली. या घटनेत गरीब मुस्लिम परिवारांचे संसार उघडयावर आले आहेत. यात घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पाच लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शहरातील चाळीसगाव रोडलगत असलेल्या पूर्व हुडको वसाहतीमधील एका वस्तीला दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. एका घरात विजेच्या शॉट सर्किटमुळे आग लागल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. या आगीमुळे घरातील सिलेंडरनेदेखील पेट घेतला होता. यामुळे आग पसरुन शेजारील घरांपर्यंत पोहोचली आणि रौद्ररूप धारण केले. यावेळी काही नगारिकांनी तत्काळ महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला फोनवरुन घटनेची माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. काही नागरिकांनीही आग विझविण्यासाठी मदत केली. याबाबत चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन नोंद केली आहे. आगीत फरमान सैयद रज्जाक, अमिनाबी सैयद, मेहजूद सैयद, यास्मीन खाटिक आणि रुबेनाबी मेहमूद शेख यांची घरे खाक झाली. या आगीमुळे सुमारे पाच लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्ग भूसंपादनात गैरव्यवहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदूरबार जिल्ह्यातून सुरत-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ या दोन्हींचे भूसंपादन करताना जमिनीच्या खरेदी-विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या खरेदी-विक्री व्यवहारातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी आता महसूल विभागाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे.

धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व २११ यांच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन करताना प्रामुख्याने आदिवासींच्या जमिनींची सरकारी परवानगीशिवाय झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी हे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. चौकशी पथकाचे अध्यक्ष नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने हे आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, आदिवासी विभागाचे नाशिक येथील अपर आयुक्त, जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर, धुळे व नंदूरबार जिल्हाधिकारी, नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक हे या पथकाचे सदस्य आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील भूसंपादन उपायुक्त हे सदस्य चौकशी पथकाला संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या तसेच शासकीय प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनाच्या अनुषंगाने सखोल चौकशी करुन त्याचा अहवाल साठ दिवसांच्या आत मुख्य सचिवांना सादर करणार आहेत.

विशेष चौकशी पथकाने चौकशीत संबंधित ठिकाणी आढळून आलेल्या दोषी व्यक्तींची नावे, पदनाम व कालावधी याबाबतची माहिती नमूद करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे गैरव्यवहार भविष्यात होणार नाहीत याबाबत उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. या पथकाला महसूल, मुद्रांक व नोंदणी, पोलिस व अन्य संबंधित विभागाचे क्षेत्रीय अधिकारी यांना चौकशीसाठी बोलावण्याची मुभा आहे. तसेच चौकशीसाठी बोलावण्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पथकाला आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन् देणे बंधकारक आहे, असे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.

एजंटांची साखळी

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाबाबत भूसंपादनाविषयी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, तत्कालीन भूसंपादन अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होत. यात शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून काही एजंट सक्रिय झाले होते. ते शेतकऱ्यांकडून टक्केवारी घेऊन प्रशासनाकडून मोबदला मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे तगादा लावत असल्याचे प्रकार घडले होते. आदिवासींच्या जमिनींबाबत गैरव्यवहारदेखील झाले होते. याबाबत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा महामार्ग चौपदीकरणाच्या भूसंपादनात झाला असल्याने याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुडहुडी वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या महासागरातील वादळी वाऱ्यांचा परिणाम शहरातील हवामानावर झाला असल्याने, शहरात शुक्रवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. शहरात दिवसभर हुडहुडी कायम असल्याने, नाशिककरांना ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागला. शहरातील वाऱ्यांचा मंदावलेला वेग पाहता, पुढील काही दिवस गारठा कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

शहरात शुक्रवारी किमान १०.४, तर कमाल २८.०५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. पूर्वेकडून उत्तरेकडे वाहणारे वारे ताशी ४ ते ५ नॉट्स वेगाने वाहू लागल्याने, शहरात दिवसभर गारवा जाणवला. त्यामुळे शहरात आर्द्रताचे प्रमाण पहाटे ७० तर सायंकाळी फक्त ४० टक्के असल्याची नोंद करण्यात आली. बुधवारपासून शहरातील किमान तापमान ९ ते १० अंश सेल्सियसच्या दरम्यान असून, कमाल तापमान २८.०५ इतके आहे. दोन दिवसांपासून समुद्रातील वादळी वाऱ्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे, पूर्वेकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे शहरात दिवसभर थंडीचा कडाका जाणवत असून, येत्या काही दिवसात थंडीचा पारा आणखीन घसरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच थंडीचा जोर कायम असल्याने, दिवसभर नाशिककरांना हुडहुडी भरल्याचे दिसून आले. तसेच संध्याकाळनंतर अनेक ठिकाणी नाशिककरांनी शेकोट्या करत ऊब घेतल्याचेही पहायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंग नसल्याने शाळांसमोर वाहतूक कोंडी

$
0
0

टीम मटा, नाशिक

जेलरोडला शाळा सुटल्यावर रिक्षावाले, व्हॅनवाले काका तसेच पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येतात. त्यांची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. सेंट फिलोमिना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या शाळेचे मोठे मैदान असतानाही वाहनांना आत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ही वाहने रस्त्यावरच उभी असतात. पर्यायाने वाहतूक अर्धा तास खोळंबते.

कोठारी कन्या शाळा, के. एन. केला आणि जेलटाकीवरील महापालिकेच्या तीन शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळीच प्रचंड वाहतूक असते. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडता येत नाही. सेंट फिलोमिना शाळेच्या विद्यार्थ्यांना कोणी वाली नाही. शाळा सुटल्यावर प्रचंड वाहतुकीमुळे विद्यार्थीच नव्हे तर पालकांनाही रस्ता ओलांडता येत नाही. शाळेसमोर दोन्ही बाजूला गतिरोधक टाकले नाही, तर दुर्घटना होण्याची भीती आहे. जेलरोडच्या शाळांसमोर जेथे गरज आहे तेथे त्वरीत गतिरोधक टाकावेत. अवजड वाहनांवर कारवाई करावी.

गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट असतात. शाळा सुटण्यावेळी या शाळांचे खासगी सुरक्षारक्षकच ट्रॅफिक पोलिस बनतात. विद्यार्थी रस्ता ओलांडताना वाहने थांबविणे, पार्किंगबाबत सूचना करणे आदी कामे ते करतात. पण त्यांना कोणी जुमानत नाही. अनेक बळी गेल्यानंतर आणि वारंवार मागणीनंतर जेलरोड टाकीवर सिग्नल बसविण्यात आला. मात्र, तो तोडण्यात वाहनचालक धन्यता मानतात. या चौकात तीन शाळा आहेत. त्या विद्यार्थ्यांचा जीव नेहमीच धोक्यात असतो. बिटको चौकात वाहतूक पोलिसांची चौकी आहे. या पोलिसांनी शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी वाहतूक नियंत्रित करण्याची गरज आहे.

कॉलेजांपुढे समस्या

गोसावी पॉलिटेक्निक व बिटको कॉलेज सुटल्यावर विद्यार्थी दुभाजक ओलांडून बस स्टॉपवर जातात. नाशिक-पुणे मार्ग कायम वर्दळीचा असतो. हे विद्यार्थी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. के. जे. मेहता हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही वेगवान वाहनांचा सामना करावा लागतो. सामनगाव पालिटेक्निक कॉलेज परिसरात वाहने सुसाट धावतात. देवळाली कॅम्प कॉलेज रस्त्यावर आहे. या रस्त्यावर डझनभर गतिरोधक आहेत. तरीही अपघात होतात. शाळांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे जीवही वेगवान वाहनांमुळे धोक्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images