Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अधिकारांचे विकेंद्रीकरण करणार

$
0
0
आदिवासी विभागातील कारभार सुधरविण्यासाठी लवकरच विभागाचे विकेंद्रीकरण करणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी दिली. नाशिक विभागातील अधिकाऱ्यांसमवेत पिचड यांची नुकतीच बैठक झाली. त्यात ही माहिती देण्यात आली.

हॉटेलचे वादग्रस्त अतिक्रमण हटवले

$
0
0
मुंबईनाक्याजवळील 'हॉटेल छान'चे अतिक्रमण संबंधित व्यावसायिकाने काढून घेतले आहे. अतिक्रमण विभागाचे अधिकारी हॉटेलवर कारवाईसाठी गेले असता त्याआधीच हे अतिक्रमण काढून घेण्यात आले.

खोदा पहाड....!

$
0
0
माणसाच्या स्वभावाचे अनेकविध तरंग अत्यंत तरलपणे टिपून पु.ल.देशपांडे यांनी अनेक वल्लींचं दर्शन महाराष्ट्राला घडवलं. पुलंच्या कथानकातल्या नसल्या तरीही सामाजिक जीवनात त्या अंगाने जाणाऱ्या वल्ली आजही कुठे ना कुठे भेटत राहतात.

ऊस डोंगा परि... रस नोहे डोंगा

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द गावातील अखंड हरिनाम सप्ताहात गायलेले एकनाथी भारूड व त्यामुळे १३ वारकऱ्यांना झालेली अटक, त्यानंतर पंढरपूरच्या वाऱ्या सोडून कराव्या लागणाऱ्या कोर्टकचेरीच्या वाऱ्या, या वारकऱ्यांसाठी अत्यंत क्लेशदायी ठरत असून संतवाङमय गायन हा आमचा गुन्हा आहे काय? असा प्रश्न त्यांच्या अनुभवी नजरा विचारत आहेत.

कुंभमेळ्यातील पर्यावरणाची धुरा शिक्षणक्षेत्राच्या खांद्यावर

$
0
0
आगामी कुंभमेळ्यादरम्यान शहरात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेत आपला वाटा असल्याची जबाबदारी लक्षात घेता ‘केअर नाशिक -ग्रीन कॉल’ हा कार्यक्रम निर्माण करण्यात आला असून ‌त्याची धुरा स्थानिक शिक्षणक्षेत्राकडे सोपविण्यात येणार आहे.

बाजार समित्यांकडून हरकती कशासाठी?

$
0
0
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सचिवाची नेमणूक न करता पणन मंडळाने बाजार समित्यांकडून हरकती मागविल्याने बाजार समिती आक्रमक झाली आहे. यासंदर्भात आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

नाशिकचे यात्रेकरू परतीच्या मार्गावर

$
0
0
उत्तराखंडमधील अडकलेले नाशिकचे पर्यटक परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेत अडकलेल्या हजारो पर्यटकांमध्ये जिल्ह्यातील २१८ पर्यटकांचा समावेश असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष या सर्वांच्या संपर्कात आहे.

निवडणूक समितीचे म्हणणे मांडा

$
0
0
नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीसंदर्भात दाखल केलेल्या दाव्यावर बुधवारी सुनावणी झाली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हा दावा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही करण्यासाठी निवडणूक समितीने आपले म्हणणे गुरूवारपर्यंत मांडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

आर्किटेक्चर कॉलेजची मान्यता काढली

$
0
0
आर्किटेक्ट कायदा १९७२मधील निकषांचे किमान पूर्तताही न केल्याचे कारण दाखवित दिल्लीस्थित कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने मविप्रच्या आर्किटेक्ट कॉलेजची मान्यता रद्द करत असल्याचे घोषित केले आहे. प्रवेशाच्या लगबगीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये या माहितीमुळे खळबळ उडाली आहे.

‘संदेसे आते नहीं’

$
0
0
टपाल सेवा विस्कळीत झाल्याने सामाजिक जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात परंतु त्याचे कोणतेही सोयरेसुतक प्रशासनाला नसून नाशिकरोडच्या अनेक भागात टपालसेवा विस्कळीत झाली आहे.

पंतप्रधान रोजगार योजना पुन्हा सुरु

$
0
0
ग्रामीण व शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करतानाच उद्योजकांना चालना देणारा पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) पुन्हा सुरु करण्यात आला आहे. गेल्यावर्षी ही योजना बंद झाली होती.

भंगार बाजार अखेर शहराबाहेर

$
0
0
सातपूर-अंबड लिंक रोडच्या चुंचाळे शिवारातील भंगार बाजार तीन महिन्यात शहराबाहेर हटवण्याचा महत्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाने बुधवारी दिला. भंगार बाजाराविरोधात १९९५ पासून सुरू झालेल्या कोर्ट प्रकरणाला अनेकदा कलाटणी मिळाली असून या निकालामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

राजकीय पक्षांची चमकोगिरी

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत लागलेले राजकीय पक्ष चमकोगिरीची एकही संधी सोडत नाहीत. सध्या सुरू असलेल्या अॅडमिशन प्रक्रियेतील अॅटेस्टेशन (साक्षांकन) मोहिमेतून त्याची प्रचिती दिसून येत आहे.

किटी पार्टी‌त बक्षिसांची खैरात

$
0
0
मजेदार खेळ, रेसिपीजचे मार्गदर्शन याबरोबरच भरघोस बक्षिसांच्या खैरातीने 'महाराष्ट्र टाइम्स'च्या महिला वाचकांनी किटी पार्टीची मजा लुटली. नाशिकरोडच्या बिग बझारमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांनी नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

धरणसाठा 'जैसे थे'

$
0
0
नाशिक जिल्ह्यात यंदा जून महिन्यातील पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक असले तरी जिल्ह्यातील धरणसाठा 'जैसे थे'च आहे. जिल्ह्यात गेल्या २० दिवसात १७९.९६ मिमी पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा साठा सहा टक्के इतकाच आहे.

हायवेलगत पाचशे मीटरवर परमीट रुम!

$
0
0
नाशिक शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत महापालिका क्षेत्रामध्ये चक्क पाचशे मीटर अंतरावर एक या प्रमाणात परमीट रुम असल्याचे बाब पुढे आली आहे. महापालिका क्षेत्रात असलेल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर परमीट रुमचे मोठे जाळे असल्याने दारू पिऊन वाहन चालविण्याचे 'उद्योगा'मुळे अपघात वाढले आहेत.

प्रतीक्षा अवयवदात्यांची

$
0
0
अवयव प्रत्यारोपण आणि देहदान यासाठी दात्यांच्या प्रतिसादाबाबत नाशिककरांकडून उदासिनता दाखविली जाते आहे. सुमारे १६ लाख लोकसंख्या असलेल्या नाशिकसारख्या बड्या शहरातून वर्षाकाठी स्वेच्छेने अवघे १६ देहदान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

'भोसला'त अवतरणार शिवराय

$
0
0
मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या अमृत महोत्सव सांगता समारोहानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सार्व‌जनिक वाहतूक मजबूत करा

$
0
0
नाशिकरोडचे एसटी स्टॅँड समस्यांचे आगार बनले असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एसटी स्टँड नाशिकचे प्रवेशद्वार समजले जाते.

'बीएड'ची घसरण

$
0
0
डिग्री मिळूनही नोकरीची शाश्वती नसल्याने बॅचलर ऑफ एज्युकेशन अर्थात बीएडच्या अभ्यासक्रमाकडे दरवर्षीच विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images