Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चोरी करण्याचे लायसन्स द्या!

$
0
0
राजकीय पक्षांकडून आंदोलन करताना रास्ता रोको, रेल रोको, चक्का जाम, धरणे, बंद या आक्रमक पर्यायांसह गांधिगिरी पध्दतीचा वापर करणे नवीन नाही. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या महागाईचा उपहासात्मक पध्दतीने निषेध करण्यासाठी सिन्नरच्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट चोरी करण्याची परवानगी मागितली आहे.

हे नाही, ते सुश‌िलकुमार

$
0
0
दोन व्यक्तिंच्या नामसाधर्म्यावरून अनेकदा गोंधळ उडू शकतो. संबंधित व्यक्ती जर नावाजलेल्या असतील तर मग विचारायलाच नको. अशी नावे उच्चारणाऱ्या त‌िसऱ्या द‌िग्गजाची कधी-कधी गल्लत होते.

नाशिकमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

$
0
0
नाशिकमधील कळवण, पाळे आणि दळवट भागामध्ये मंगळवारी साडे आठच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. ५ ते ७ सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते.

केंद्रात खिचडी सरकार येण्याची शक्यता

$
0
0
‘सोळाव्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला अथवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे सध्या तरी नाहीत. केंद्रात खिचडी सरकार येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची शेवटची संधी आहे’, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी केले.

सातपूर-अंबड लिंकरोड चौपदरीकरण आवश्यक

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतींचा विस्तार दिवसागणिक वाढत चालला असल्याने सातपूर अंबडलिंकरोडच्या चौपदरीकरणाची आवश्यकता असल्याची मागणी नगरसेवक सचिन भोर यांनी केली आहे. या मार्गावरील वाहतुकीमध्ये वाढ झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे.

अमळनेर पोलिस ठाण्यात दिवसभर ‘महिलाराज’

$
0
0
पोलिस निरीक्षक महिला..सहाय्यक पोलिस निरीक्षक महिला...पोलिस उपनिरीक्षकही महिला...ठाणे अमलदारही महिलाच...एवढेच नव्हे तर पोलिस डायरी सांभाळणाऱ्याही महिलाच...‌येथील पोलिस ठाण्यात सगळीकडे महिलाराज होते.

बागलाणचा वीजप्रश्न सुटणार

$
0
0
बागलाण तालुक्यातील विजेशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता के. व्ही. अजनाळकर यांनी दिले आहे.

रेसिडेन्शियल स्कूलचा मार्ग झाला मोकळा

$
0
0
बागलाण तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सटाणा शहरा लगतच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल उभारणीसाठी नुकतेच 20 एकर शासकीय जमीन हस्तांतरीत करण्याचे आदेश महसूल खात्याने दिले. त्यामुळे स्कूल बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विद्यार्थ्यांना वेळेत मिळणार शूज आणि सॉक्स

$
0
0
महापालिका शाळेमधील विद्यार्थ्यांना वेळेत शालेय साहित्य मिळावे म्हणून महापालिका शिक्षण मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वीच्या चुकांमधून बोध घेऊन महापालिकेने पुढील वर्षी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बुट तसेच सॉक्सची खरेदी प्रक्रिया याच वर्षी सुरू केली आहे.

एसपीसीएची ‘परीक्षा’

$
0
0
श्वान नि‌र्बिजीकरणाचा ठेका मिळालेल्या उदगिर येथील ‘सोसायटी फॉर द पीपल्स क्रुएल्टी टू अॅनिमल’ (एसपीसीए) या संस्थेने १ जानेवारीपासून आपल्या कामाला सुरुवात केली होती.

महावितरणची २ हजार ७०० जणांची भरती

$
0
0
महावितरण कंपनीने २००५ पासून तब्बल २६ हजार जणांना रोजगार उपलब्ध करून दिला असून यावर्षी आणखी २ हजार ७०० नवीन पदे भरली जाणार आहेत. भरलेल्या पदांमध्ये विद्युत सहाय्यकांपासून मुख्य अभियंत्यांपर्यंतच्या पदांचा समावेश आहे.

रोहयो समिती महिनाअखेरीस नाशकात

$
0
0
राज्यस्तरीय रोजगार हमी योजना समिती या महिनाअखेरीस नाशिक दौऱ्यावर येणार असून जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासह काही कामांची थेट पाहणी ही समिती करणार आहे.

सातपूरमध्ये १३ गाळे सीलबंद

$
0
0
महापालिका बाजार संकुलांमधील थकबाकीधारकांविरोधात प्रशासनाने मोहीम उघडली आहे. वसुली पथकाने पहिल्याच दिवशी सातपूर विभागातील १३ गाळ्यांना सील ठोकले. तसेच इतर गाळाधारकांकडून १७ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली.

‘विद्यार्थी राष्ट्रवादी’त असंतोषाची लाट

$
0
0
गटातटात विखुरलेल्या नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतोषाचा आणखी एक नमुना मंगळवारी समोर आला. विद्यार्थ्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पक्षाच्या विद्यार्थी आघाडीतील असंतोष उफाळून आला असून थेट शहराध्यक्षांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेत संघटनेच्या ४८ पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सोपविला आहे.

अॅम्ब्युलन्स चालकांचा संप मागे

$
0
0
महापा‌लिकेच्या अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केलेल्या जनसेवा अॅम्ब्युलन्स सेवा संस्थेतर्फे करण्यात आलेला संप मागे घेण्यात आला आहे. संस्थेच्या सदस्यांना टपरीवजा कार्यालयात जागा मिळाल्याने हा संप मागे घेण्यात आला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलबाहेरील जनसेवा अॅम्ब्युलन्स सेवा संस्थेचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले होते.

डोण्या खूनप्रकरणी दोघे ताब्यात

$
0
0
सराईत गुन्हेगार सचिन रावसाहेब मोकळ उर्फ डोण्या (३२) याच्या खूनप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. योगेश गांगुर्डे आणि प्रीतम चांगले अशी त्यांची नावे आहेत.

फसवणूक, जातिवाचक शिवीगाळीची तक्रार

$
0
0
ठरलेल्या फ्लॅटच्या व्यवहारात ऐनवेळी दुप्पट रक्कमेची मागणी केल्याचा तसेच खरेदीदारास जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार भगूरमध्ये घडला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरणारेजवळ अपघातात चौघे ठार

$
0
0
भरधाव कार आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चौघे ठार तर तिघे जण जबर जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास गिरणारे परिसरातील दुगाव शिवाराजवळ हा अपघात झाला.

भूसंपादनाविरोधात शेतकरी हायकोर्टात

$
0
0
सिन्नरजवळील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी इंडियाबुल्सतर्फे तयार करण्यात येणाऱ्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचा वाद हायकोर्टात पोहोचला आहे. वाहतुकीच्या सोयीसाठी इंडियाबुल्सतर्फे हा रेल्वेमार्ग बांधण्यात येत असून त्यासाठी भूसंपादन सुरू आहे.

ध्रुवनगरमध्ये दोन गटांत जुंपली

$
0
0
गुन्ह्यातील साक्षीदाराने साक्ष मागे घ्यावी, या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग झाल्याचा तसेच जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images