Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आकाश चांदण्याचे केले तुझ्या हवाली !

$
0
0
एकापेक्षा एक गझलांच्या सादरीकरणातून गौरव कुमार आठवलेंनी रसिकांची दाद मिळवली. निमित्त होते शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ‘कवितेवर बोलू काही’ या कार्यक्रमाचे. कार्यक्रमाचे आठवे पुष्प गुंफताना गौरवकुमार आठवले यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

उंच उंच इमल्यांना क्रेनची ओढ

$
0
0
कधीकाळी शहरात पाच-सहा मजली इमारत उभारायची म्हटलं तरी नुसता सांगाडा उभा करण्यात वर्ष निघून जायचं. मात्र आठ-दहा मजल्याच्या इमारतीही काही महिन्यात उभ्या राहत आहेत.

लाईटचा गोंधळ

$
0
0
शहरात राज्यनाट्य स्पर्धा दिमाखात झाल्या. या स्पर्धेत अनेक तरुण कलावंतानी सहभाग घेतला. त्यातील काही कलावंतांनी चांगल्या प्रकारे तयारी केली तर काहींनी फक्त स्टेजवर दिखावा केला.

घडी मेरी ट्रेंडी

$
0
0
किती वाजले असं विचारल्यानंतर घड्याळ्यात पाहणारे फार कमी लोक तुम्हाला आता सापडतील. मोबाइलमध्ये वेळ पाहणाऱ्यांचीच संख्या आता वाढली आहे. पण, घड्याळाची क्रेझ मात्र कमी झालेली नाही.

तारांगण हाऊसफुल्ल !

$
0
0
विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेले महापालिकेचे यशवंतराव चव्हाण तारांगण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत १६ शाळांमधील तब्बल २ हजार ८०० विद्यार्थ्यांनी अवकाश यात्रेचा अनुभव घेतला आहे. तारांगणात ब्रम्हांडाची माहिती मराठीत दिली जात असल्याने दिवसभरातील चारही शो सध्या हाऊसफुल्ल आहेत.

सुरांच्या साक्षीने उजळली गोदामाई

$
0
0
‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘स्वामी कृपा कधी करणार’, ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’, अशा अभंग अन् भक्तिगीतांनी गोदाघाट मंत्रमुग्ध झाला होता. निमित्त होते स्वामी मित्र मेळा प्रतिष्ठानतर्फे रामकुंडावर आयोजित सहस्त्रदीप सोहळ्याचे.

विकासकामांच्या फलकांवरून काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त

$
0
0
सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये केलेल्या विकासकामांच्या डिजिटल फलकांवर सार्वजनिक बांधकाम खात्याने आमदार माणिकराव कोकाटे व काँग्रेसचा नामोल्लेख केला नाही. हा 'प्रोटोकॉल'चा भंग असून, कोकाटे व कॉँग्रेस नेत्यांचा सन्मान न ठेवल्यास या फलकांना काळे फासण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‌दिला आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेने पोलिस हवालदार ठार

$
0
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत सिन्नर पोलिस स्टेशनचे हवालदार शरद सुखलाल चौधरी (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील सह्याद्री हॉटेलजवळ ही घटना घडली. आज सकाळी कंपनीत कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला.

गाववेशीच्या उरल्या फक्त खुणा

$
0
0
कधी काळी गावाचे वैभव व आर्थिक सुबत्ता त्या गावाच्या वेशीवरून ओळखले जायची. मात्र, बदलत्या काळानुसार वेस व तिच्या खाणाखुणा नामशेष होत चालल्या आहेत. गावाच्या संस्कृतीची ओळखही त्यामुळे पुसट होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

सटाणा ते कळवण रस्ता झाला ‌दिशाहीन

$
0
0
कळवण ते सटाणा राज्य महामार्ग सतरावरील दिशादर्शक, वळण दर्शक, गाव किलोमीटर दर्शक फलक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पाच ते सहा महिन्यांपासून उन्मळून पडले आहेत. मात्र, संबधीत विभागाला याचे काहीही सोयरसूतक नाही.

‘कळवणला सिलिंडर पुरवठा सुरळीत करा’

$
0
0
कळवण तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून इंडियन गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. ग्राहकांनी तहसीलदार अनिल पुरे यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचत गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

तलाठी, मंडळ अधिका-यांचा संगणकीय कामावर बहिष्कार

$
0
0
राज्यातील तेरा हजार तलाठी व मंडळ अधिका-यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. संगणकीय कामकाज तसेच पुरवठा विभागाच्याकामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. तसेच, निवडणुकीचे कामकाज वगळता महसूलेतर कामावरही बहिष्कार टाकण्यात आला आहे.

रस्त्यांच्या कामामुळे विकासाला चालना मिळेल

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २६५ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली होती. या मंजुरीमुळे शहरातील अनेक रखडलेले रस्ते मार्गी लागणार आहे. औद्योगिक तसेच रहिवाशी भागातील रस्ते झाल्याने शहराच्या विकासाला चालना मिळेल.

भांडणे नको म्हणून प्रभाग सभा आवरली

$
0
0
वर्षाच्या पहिल्या दिवशी अधिकारी आणि नगरसेवक यांच्यात भांडणे नको म्हणून नाशिकरोडची प्रभाग सभा बुधवारी आवरती घेण्यात आली. पाच-दहा मिनीटात आटोपलेल्या सभेत २५ लाखांच्या कामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली.

दुस-या मजल्यासाठी FSI ची शोधाशोध

$
0
0
कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधील वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम एफएसआयच्या शोधात अडकले आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार महापालिका प्रशासनाने हे काम हाती घेतले आहे.

अखेर कारसाठी हालचाली सुरू

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाकर्तेपणामुळे २२ लाख रुपयांची बॅटरी कार धुळ खात पडल्याचे वृत्त ‘मटा’त प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग आली आहे. त्यामुळेच ही कार कृषी पर्यटनासाठी वापरण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

सिल्व्हर ओकवर शिक्षण विभागाचा दबाव?

$
0
0
फी वसुलीच्या मुद्द्यावरून च‌िघळलेल्या आंदोलनामुळे व‌िद्यार्थ्यांची सुटलेली शाळा त्यांना पुन्हा म‌िळवून देण्यासाठी स‌िल्व्हर ओकच्या प्रशासनावर दबाव टाकण्याचे आश्वासन श‌िक्षण अध‌िकाऱ्यांनी द‌िले आहे.

भालेकर शाळेच्या बचावासाठी उद्या आंदोलन

$
0
0
शहरातील जुन्या श‌िक्षणसंस्थांपैकी असणारी बी.डी.भालेकर शाळा सुरू रहावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बचाव सम‌ितीतर्फे संघर्षाचे स्वरूप तीव्र करण्यात आले आहे.

नगरसेविकेच्या मुलासह ४१ जणांवर कारवाई

$
0
0
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या १५ लोकांवर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई केली असून त्यामध्ये एका नगरसेविकेच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती नाशिकरोड पोलिस स्टेशनचे निरीक्षक मौला सय्यद यांनी दिली.

गंगापूर रोडला रेडीरेकनरमध्ये सर्वाधिक वाढ

$
0
0
नववर्षाला प्रारंभ होताच रेडीरेकनरचे दरही जाहीर झाले असून सर्वाधिक वाढ गंगापूर रोड परिसरात झाली आहे. याठिकाणी जागेचे दर ४१ हजार प्रति चौरस मीटरवरून ४९ हजार २०० एवढे करण्यात आले आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images