Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाच नगरसेवकांवरील कारवाई टळली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या निवडणुकीत राखीव जागांवर उमेदवारी करून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांनी अखेर निवडणूक विभागाकडे जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टळली आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांमध्ये भाजपचे उद्धव निमसे, मिर्झा शाहीन सलीम बेग, शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, काँग्रेसच्या समिना मेमन, मनसेचे योगेश शेवरे यांचा समावेश आहे.
महापालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. महापालिकेची निवडणूक २३ फेब्रुवारीला झाली. त्यामुळे २३ ऑगस्ट रोजी निवडणुकीला सहा महिने पूर्ण होत असल्याने आरक्षित जागेवरून निवडून आलेल्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. परंतु, भाजपचे उद्धव निमसे, मिर्झा शाहीन सलीम बेग, शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, काँग्रेसच्या समिना मेमन, मनसेचे योगेश शेवरे यांनी ते जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी निवडणूक विभागाने या नगरसेवकांसह जातपडताळणी समितीला पत्र देऊन तातडीने जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची विनंती केली होती.
निवडणूक विभागाच्या नोटिसीमुळे या पाचही नगरसेवकांची धावपळ उडाली. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली. अखेरीस मंगळवारी या पाचही नगरसेवकांनी ‘ओबीसी’चे जातपडताळणी प्रमाणपत्र महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे सादर केले. त्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई आता टळली आहे. उद्धव निमसे यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल अनंत सूर्यवंशी यांनी आक्षेप घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन हॅकिंग; अॅडमिशनच रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पुणे येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये घेतलेले अॅडमिशन पासवर्ड आणि लॉगीन आयडीच्या आधारे रद्द करणाऱ्या संशयिताच्या आयपी अॅड्रेसचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. संशयित परजिल्ह्यातील असून, याच पध्दतीने त्याने नागपूर येथील एका गुणवंत विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द केल्याचे समजते. अचानक प्रवेशच रद्द झाल्याने तिचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे.
नाशिकरोड येथील सायली संजयकुमार थोरात या विद्यार्थिनीने सायबर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सायलीला इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेलिकम्युनिकेशन या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी प्रवेश घ्यायचा होता. यासाठी तिने ९ जुलै रोजी dtemaharashtra.org या वेबसाइटवरून अर्ज केला. त्यानंतर सायलीला लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळाला. तसेच ओबीसी प्रवर्गातून ती महाराष्ट्रात प्रथम आली. ही अॅडमिशन प्रकिया तीन राउंडमध्ये पार पडते. पहिल्या कॅप राउंडमध्ये तिने प्रथम क्रमांकावर पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजची निवड केली. २९ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या ऑनलाइन यादीत सायलीचे सदर कॉलेजचे अॅडमिशन निश्चित झाले. यामुळे तिने लागलीच पाच हजार रुपये ऑनलाइन भरले. तसेच सामनगाव येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन कॉलेज कन्फर्म केले. दरम्यान, दुसऱ्या राउंडच्या निवड यादीतही सायलीचे नाव त्याच कॉलेजमध्ये होते. मात्र, ११ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीने सायलीचा पासवर्ड आणि लॉगीन आयडी वापरून अॅडमिशनच रद्द करून टाकली. यामुळे तिसऱ्या यादीत तिचे नाव आपोआपच वगळले गेले. सायलीची मैत्रिण कोमल पंडित गायकवाड हिच्याबाबतही असाच प्रकार घडला. या दोघींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथील अन्य एका विद्यार्थिनीचे अकाउंट हॅक करून अॅडमिशन रद्द ठरवण्यात आले. या प्रकारामुळे सायलीचे शैक्षणिक वर्षच वाया गेले आहे.

ऑनलाइन अॅडमिशन प्रक्रिया आव्हानच!
राज्यातील बहुतांश शैक्षणिक व्यवस्था ऑनलाइनकडे वळली आहे. विशेषतः अॅडमिशन प्रक्रिया ऑनलाइन राबवण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांसह शैक्षणिक संस्थांचा वेळ, पैसा वाचतो. मात्र, समाजकंटकांच्या उपद्वापाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता या घटनेमुळे समोर आली आहे. शिक्षण विभागाने सदर घटनेतून बोध घेऊन ऑनलाइन अॅडमिशन प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कॉम्प्युटरचा आयपी अॅड्रेस शोधण्यात आला आहे. सदर काम परजिल्ह्यातून झाले आहे. या मुलींचे अॅडमिशन रद्द झाल्याचा फायदा प्रतीक्षा यादीतील कोणाला तरी झाला असावा. सर्व शक्यता पडताळून लवकरच संशयितास जेरबंद केले जाईल.
- अनिल पवार, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षासह चार दुचाकींची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर परिसरातून चार दुचाकींसह एक रिक्षा चोरट्यांनी हातोहात लांबवली. या प्रकरणी विविध पोलिस स्टेशनमध्ये वाहनचोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शहरात वाढलेल्या वाहनचोरींच्या घटनांना पोलिसांनी पायबंद घालण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.
अशोका मार्गावरील कल्पतरूनगर भागातील दीपिका तुषार पाटील यांची सुझुकी अ‍ॅक्सेस (एमएच ३९ ३९६९) मंगळवारी रात्री त्यांच्या कल्पतरू पॅलेस सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास हवालदार क्षिरसागर करीत आहेत.
दुचाकीचोरीची दुसरी घटना हिरावाडीत घडली. तांबोळीनगर भागात राहणारे राजेंद्र बाळकृष्ण बच्छाव (रा.निळकंठ अर्पा.) यांची स्प्लेंडर (एमएच ४१, ६४०८) शनिवारी रात्री त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरट्यांनी लांबवली. घटनेचा अधिक तपास पंचवटी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सरोदे करीत आहेत. यानंतर, किशोर सूर्यवंशी मार्ग परिसरातील नंदू बाबुराव घुगे (सरगंगा सोसा.) आणि त्यांचा मित्र योगेश कस्तुरी यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ एफए ६७६३) शुक्रवारी रात्री चोरी करण्यात आली. ही दोन्ही वाहने सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क करण्यात आली होती. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत. दरम्यान, जेलरोड येथील ढिकलेनगर भागात राहणारे मनोज बरसाती यादव यांची ९० हजार रुपयांची बुलेट (एमएच १५ एफडब्ल्यू ३५१७) गुरूवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरी झाली. सदर गुन्ह्याची उपनगर पोलिसांनी नोंद केली.

पेट्राल पंपाजवळून रिक्षा लंपास
वडाळागावातील जिनतनगर भागातील अर्शद आमिर खान हे रिक्षाचालक ३० मे रोजी प्रवासी वाहतूक करण्यासाठी इंद्रकुड भागात गेले होते. पेट्रोल पंपाजवळ लावलेली त्यांची अ‍ॅटोरिक्षा (एमएच १५ एके ५८४५) चोरट्यानी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ जुगाऱ्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकरोड, उपनगर आणि पंचवटी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २५ जुगारींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गांधीनगर येथील एका जुन्या इमारत परिसरात जुगार खेळला जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सोमवारी (दि. २१) सायंकाळी कारवाई केली. या ठिकाणी सुनील चौधरी व त्याचे चार साथीदार पत्यांवर जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून सहा हजार ४०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत. दुसरी कारवाई पवारवाडीतील सुभाषरोडवर झाली. याठिकाणी प्रकाश रणधीर व त्याचे सहा साथीदार अंक आकड्यावर मटका जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून ६३ हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

घरामध्ये जुगार अड्डा!
दरम्यान, पंचवटीतील तेलंगवाडीत टाकलेल्या छाप्यात पुरूषोत्तम दास व त्याच्या १२ साथीदारांना पत्यांच्या कॅटवर जुगार खेळतांना मिळून आले. तेलंगवाडीतील वसंत भोर यांच्या घरात हा जुगार अड्डा सुरू होता. या कारवाईत रोख रक्कम, टेबल खुर्च्या व जुगाराचे साहित्य असा सुमारे २५ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार गवळी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोळक्याकडून तरुणावर चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणावर चौघांच्या टोळक्याने मारहाण करीत चाकू हल्ला केला. ही घटना देवळाली गावातील सोमवार बाजार भागात घडली. यानंतर पोलिसांनी एका संशयितास जेरबंद केले असून, उर्वरीत तिघांचा शोध घेतला जात आहे.
इलियास गुलाब शेख असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. शेखचे साथिदार दीपक कसबे, योगेश झारखंडे आणि गोरख लोंढे (सर्व रा. देवळालीगाव) यांनी मिळून मोहन मंगल खैरवाल (रा. सोमवार बाजार, कोळीवाडा) याच्यावर हल्ला केला. खैरवालच्या शनिवारी (दि. १९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सोमवार बाजार परिसरातून पायी जात असताना ही घटना घडली. संशयितांनी मोहनचा रस्ता अडवून त्यास शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देत धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर व हातावर वार केले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार कुंदे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगाव शिवारात भरदिवसा घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आडगाव शिवारातील स्वामी समर्थनगर येथे भरदिवसा झालेल्या वेगवेगळ्या दोन घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखभर रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यात सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
चंद्रभान बाबुराव कंठाळे (रा. मीनाचंद्र अपार्ट. बीएसएनएलसमोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंठाळे व त्यांच्या शेजारी राहणारे प्रितेश पवार यांच्या घरात ही धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी एकाच इमारतीतील दोन्ही बंद फ्लॅट फोडून सुमारे ९९ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. सोमवारी (दि. २१) दुपारी दोन्ही कुटुंबातील सदस्य कामानिमित्त घराबाहेर पडले असता हा प्रकार घडला. चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटांमध्ये ठेवलेले दागिने चोरून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक सदाफुले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांचा महिलावर हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर
सिन्नर शहराजवळील गंगावेस भागात मनोहर शेलार यांच्या घरात दरोखोरांनी भर दुपारी दरोड्याचा प्रयत्न केला. परंतु, शेलार यांच्या पत्नीने प्रखर विरोध केला. संतापलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करीत पलायन केले. जखमी शेलार यांच्यावर नाशिकमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समजते.
देवळाली व्यापारी बँकेत कार्यरत असलेल्या नीलिमा शेलार या दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी जेवणासाठी आल्या. त्यांच्या पाठोपाठ तीन तरुणांनी घरात प्रवेश केला. तरुणांनी नीलिमा यांच्या गळ्यातील पोत आणि कानातील झुमके ओरबाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नीलिमा यांनी प्रखर विरोध केला आणि मदतीसाठी जोरात पुकारा केला. ओरडाओरड झाल्याने भांबावलेल्या तरुणांनी नीलिमा यांच्या मान, पाठ आणि पोटावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करीत घरातील मागील दरवाजाने पलायन केले. नीलिमा यांनी घरासमोर रहाणाऱ्या आरोटे यांच्या घराकडे तातडीने धाव घेतली. गंभीर जखमी झाल्याने शेलार यांना अगोदर सिन्नरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये आणि नंतर नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, दरोडेखोरांनी घटनास्थळी एक दुचाकी सोडून पळ काढला. ती दुचाकीही चोरीची असून कळवण येथील असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत खात्यामधून १५ हजार रुपये वर्ग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव
ऑनलाइन बँकिंग, नेट बँकिंग व मोबाइल बँकिंग सारखी कुठलीही सुविधांचा वापर नसताना दोन वेळा बचत खात्यातून १५ हजार रुपये परस्पर वर्ग करण्यात आले आहे. बँक पासबुक अपडेट केल्यांनतर आपली फसवणूक झाल्याचे संगीता हिंगे यांना लक्षात आले. त्यांनी शहर सायबर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
‘मविप्र’च्या सातपूर येथील जनता विद्यालयात शिक्षिका असलेल्या संगीता हिंगे यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पंचवटी शाखेत खाते आहे. या खात्यातून २३ जून २०१७ आणि ७ जुलै २०१७ रोजी अचानक ऑनलाइनद्वारे १५ हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. पासबुक अपडेट केल्यानंतर हिंगे यांच्या हे लक्षात आले. हिंगे यांची ऑनलाइन बँकिंग, नेट बँकिंग वा मोबाइल बँकिंग यासारखी कुठलीही सुविधा कार्यान्वित नसताना १५ हजार रुपयांची रक्कम अचानक कशी काढली गेली, असा प्रश्न त्यांना पडला आहे. कम्युनिकेशन एल कंपनीच्या खात्यावर पेटीएमद्वारे पैसे ट्रान्सफर झाल्याचे हिंगे यांनी सांगितले. हिंगे यांनी ५ ऑगस्ट रोजी सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पण १५ दिवस झाल्यानंतरही तपासाला गती मिळत नसल्याची खंत त्यांची व्यक्त केली.

बँकेचे कानावर हात
संगिता हिंगे यांनी आपल्या बचत खात्यातून आपल्या परवानगीविना २३ जून २०१७ आणि ७ जुलै २०१७ रोजी १५ हजार रुपये काढले गेले. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पंचवटी शाखेत चौकशी करण्यासाठी हिंगे केल्या. मात्र, बँक कर्मचाऱ्यांनी या विषयाशी आपला कोणताही संबंध नाही असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट सिटीच्या इमल्यांना टेकू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजनेला आता जागतिक बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेचा टेकू देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी नाशिकसह राज्यातील स्मार्ट सिटी योजनेत निवड झालेल्या शहरांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या शहरांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या शहरांमधील मोठ्या प्रकल्पासांठी वर्ल्ड बँकेच्या अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केल्याने स्मार्ट सिटीचे इमले आता वर्ल्ड बँकेच्या भरवशावर उभे राहणार आहेत.

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निवड झालेल्या नाशिकसह राज्यातील सर्व शहरांची बुधवारी मुंबईत वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत स्मार्ट सिटी योजनेत सुरू असलेल्या कामांचे प्रेझेंटेशन या अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. या अधिकाऱ्यांनी एसपीव्हीचे कामकाज, आतापर्यंत राबविण्यात आलेले प्रकल्प, संभाव्य मोठे प्रकल्प, प्रकल्पांची मुदत काय, याची माहिती वर्ल्ड बँकेला सादर केली. स्मार्ट योजनेसाठी केंद्राचा ५० टक्के, तर राज्य व महापालिकेचा २५-२५ टक्के वाटा असणार आहे. स्मार्ट सिटीतून मोठे प्रकल्प उभारण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. परंतु, काही महापालिकांची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने अशा पालिकांमधील प्रकल्पांना वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यामुळे वर्ल्ड बँकेने या प्रकल्पांची चाचपणी सुरू केली असून, बुधवारी महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे स्मार्ट सिटीतील प्रकल्पांचा विकासही आता वर्ल्ड बँकेच्या अर्थसहाय्यावर होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांकडून ३० ला आढावा

देशभरातील स्मार्ट सिटींच्या विकासकामांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी घेतला जाणार होता. परंतु, काही कारणास्तव हा आढावा पुढे ढकलण्यात आला आहे. आता येत्या ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा आढावा घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी विचारला पोलिसांना जाब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत, निफाड

रेशनचा काळाबाजार करताना रंगेहात पकडलेले वाहन पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता सोडून दिल्यामुळे बेहेड येथील आदिवासी महिलांनी पिंपळगाव बसवंत पोल‌िस ठाण्यावर बुधवारी मोठा मोर्चा काढला. संबंधित वाहन का सोडले, याप्रकरणाचा मुख्या सुत्रधार कोण, संबंधितावर कारवाई का नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत या महिलांनी तीन तास ठिय्या मांडला. यामुळे पोलिस ठाण्यात काही वेळासाठी ताणावाचे वातावरण झाले होते.

बहेड गावातील महिलांनी रविवार रात्री रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस आणला. तसेच संबंधित वाहन धान्यासह प‌िंपळगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी हे वाहन सोडून दिल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पुन्हा वातावरणत तापले. सदर वाहन पुरवठा अधिकारी ए. एम. शेख याच्या पत्रावरून सोडून दिल्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले स्पष्ट केले. तर पुरवठा अधिकारी शेख यांनी गाडी सोडण्यात यावी असे कुठलेही पत्र दिलेले नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी सरीता नरके यांनी मंगळवारी तहसीलदार विनोद भामरे यांना तातडीने पिंपळगाव बसवंत पोल‌िस ठाण्यात पाठव‌िले होते. तहसीलदारांच्या म्हणण्यानुसार सदरचे वाहन माझ्या पत्राशिवाय सुटू शकत नाही. मग पोल‌िसांनी ते सोडलेच कसे? यामुळे पिंपळगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणामुळे बुधवारी बेहेड गावातून सकाळी अकरा वाजता हजारो आदिवासी महिला पिंपळगाव बसवंत पोल‌िस ठाण्यावर येवून धडकल्या. सदर गाडी का सोडली असा जाब विचारत पुरवठा अधिकारी निलंबित करा, रेशन दुकानदारावर त्वरित गुन्हा दाखल करा आदी मागण्यांसाठी या महिलांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले. नायब तहसीलदार संघमित्रा बाव‌िस्कर यांनी चौकशी सुरू केली जाईल. दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात मीराबाई भवर, मंदा गायकवाड, विजाबाई दिवे, कुसुम दिवे, मनिषा वाघ आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्प परिसरात चालिहा व्रताची सांगता

$
0
0

सिंधी बांधवांकडून बहेराणा अन् मटकी विसर्जन

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

पावसाच्या हलक्या सरींमध्ये चिंब भिजत सिंधच्या शहनाई वादनात आणि भगवान झुलेलाल यांच्या जयघोषात संसरीच्या दारणा नदीपात्रात पवित्र बहराणा ज्योत व मटकीचे विसर्जन करीत देवळालीतील सिंधी समाजातील महत्त्वाचे मानले जाणारे पूज्य चालिहा साहिब जो मेलो (श्रावणव्रत ) या व्रताची सांगता धार्मिक वातावरणात करण्यात आली.

गेले चाळीस दिवस हे व्रत मनोभावे करणाऱ्या सिंधी बांधवांनी हातात बांधलेले रक्षासूत्र व गळ्यात घातलेले जान्हवे देवळालीच्या झुलेलाल मंदिरात पुजारी घनश्याम महाराज शर्मा यांनी विधियुक्त मार्गाने काढीत व्रतस्थ असलेल्या भाविकांना व्रताच्या आचरणातून मुक्त करीत आशीर्वाद दिला. पूज्य दर्याशाह संगत ट्रस्टच्या वतीने सकाळी १० ते ४ वाजेदरम्यान व्रताचे उर्वरित विधी-भजन पार पडले.

मिरवणुकीत वर्किंग कमिटीचे अध्यक्ष देवनदास रोहरा, मोहन सचदेव, जयप्रकाश चावला, नगरसेवक भगवान कटारिया, विजय हेमनानी, विनोद चावला, जगदीश सचदेव, मनू माखिजा, सिंधी पंचायतीचे सदस्य आदींसह सर्व सदस्य तर सिंधी सखी संगतच्या महिला यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्त आहात, तर शिस्त पाळा

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

शहर पोलिसांकडून गणेशोत्सवात अनेक जनजागृतिपर उपक्रम राबविले जात असून, ‘उत्सव मांगल्याचा नाशिकच्या अभिमानाचा’ ही संकल्पना यंदा शहरात रुजविली जात आहे. या संकल्पनेंतर्गत इको फ्रेंडली व पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी थेट बाप्पांमार्फतच भक्तांशी संवाद साधला जात आहे.

‘भक्त असाल, तर शिस्त पाळा’ असे म्हणत व्हिडीओरुपातून गणपती बाप्पा आपल्या मागण्या नाशिककरांपुढे मांडत आहेत. असा समाजप्रबोधनपर व्हिडीओ नाशिक पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व इको फ्रेंडली साजरा करण्यावर पोलिस यंत्रणेने भर दिला आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. नाशिकच्या इको फ्रेंडली गणेशोत्सवाच्या जनजागृतीसाठी नाशिक पोलिस व जनस्थान संस्थेने हा व्हिडीओ तयार केला आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या व्हिडीओद्वारे गणपती बाप्पा भक्तांना सूचना करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या व्हिडीओची शहरात चर्चा असून, नाशिककर इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी सरसावत असल्याचे दिसून येत आहे.

व्हिडीओच्या शेवटी पोलिस आयुक्तांचा गणेशोत्सवासंदर्भातील प्रबोधनपर संदेश जोडण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. या व्हिडीओसाठी दिग्दर्शन सचिन शिंदे, लेखन सदानंद जोशी, संकलन लक्ष्मण कोकणे, लोगो डिझाइन नंदू गवांदे, संगीत धनंजय धुमाळ, गीत मिलिंद गांधी, गायन आनंद अत्रे यांचे सहकार्य लाभले आहे. व्हिडीओतील बाप्पा साहिल आम्रपाली हे असून, निवदेन कैवल्य जोशी यांनी केले आहे. या व्हिडीओसाठी संयोजन अभय ओझरकर यांनी केले आहे.


हे आहे बाप्पांचे सांगणे

‘मला नमस्कार करण्यापूर्वी काही गोष्टींत सुधारणा करा. तुम्ही केलेल्या या सुधारणाच माझा नमस्कार असणार आहे. माझी मूर्ती शाडू मातीचीच वापरा. पीओपीने आपल्या पर्यावरणाला हानी पोहोचते. शिवाय केमिकलच्या रंगांमुळे आपलेच आरोग्य धोक्यात येते. माझी मूर्ती पुठ्ठा, कागद, फुले यातून साकारा. माझ्या मूर्तीची आरास करताना थर्माकोल वापरू नका. पर्यावरणरक्षणासाठी भक्तांनो आता सजग व्हा. माझ्या मिरवणुकीला डीजे वाजवू नका. डीजेच्या मोठ्या आवाजाचा मलाही त्रास होतो. माझ्या दहा दिवसांच्या उत्सवात आपली सर्वांची रक्षा करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करा. गणेश मंडळांचे देखावे बघायला गेल्यावर वाहने पार्किंग व्यवस्थित करा. माझ्या मिरवणुकीत गुलाल वापरू नका. फुलांनी मिरवणुकीत रंग भरा. जमा झालेले निर्माल्य पालिकेच्या निर्माल्य कलशातच टाका. मला विसर्जित करून गोदामाईला प्रदूषित करू नका. यापेक्षा मला पालिका, पोलिस प्रशासन यांच्या सहकारी संस्थांकडे दान करा. माझे भक्त असाल, तर या शिस्त पाळा!’ असा संदेश या व्हिडीओतून खुद्द बाप्पांमार्फतच देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक सिटी बससेवेला लागणार कायमचा ब्रेक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ना‌शिकमध्ये सिटी बससेवा ताब्यात घेण्यावरून एस. टी. महामंडळ व महापालिकेत संघर्ष सुरू आहे. वाढत्या तोट्यामुळे परिवहन मंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी नाशिकसह सहा शहरांची बससेवा बंद करण्याचे ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले आहे. ही सेवा महापालिकांनी ताब्यात घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तोट्यात चाललेल्या या बससेवेमुळे महामंडळाला सहा शहरांतून १२५ कोटींचा वार्षिक तोटा होत आहे. नाशिक शहर बस वाहतुकीसाठी १७० बसेस असताना तूर्त फक्त १२० बसेस धावत आहेत.

त्यातही तांत्रिक बिघाडाचे कारण देत ३५ ते ५० बसेस डेपोत उभ्या आहेत. यामुळे अनेक मार्गांवर बस बंद झाल्या आहेत. या बस पूर्ववत सुरू कराव्या, अशी नागरिकांची मागणी असताना एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष रावते यांनी ही सेवा बंद करण्याचे सांगत महापालिकेकडे चेंडू टोलवल्यामुळे येत्या काळात हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

सहा शहरांचा समावेश

नाशिक, औरंगाबाद, सांगली, वसई, विरार, नांदेड येथे एसटी ही सिटी बससेवा चालवते. या सर्व सेवा बंद करणार असल्याचाही त्यांनी सांगितले. ही बससेवा ताब्यात घेण्यासाठी औरंगाबाद महापालिकेप्रमाणे नाशिक महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा असेही रावते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंडे, भोये यांची पुण्यासाठी निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२० ते २४ सप्टेंबर दरम्यान पुणे येथे होणाऱ्या १४ व्या राष्ट्रीय एमटीबी अजिंक्यपद स्पर्धेसाठी खुल्या पुरुष गटात नाशिकच्या गोपीनाथ मुंडे आणि अरुण भोये तसेच युथ गटात निसर्ग भामरे यांची निवड झाली आहे. दुडगाव, महिरावणी, नाशिक येथे पार पडलेल्या चाचणी स्पर्धेतून त्यांची निवड झाली. महिलांच्या खुल्या गटात नाशिकची अनुजा उगले तर सब ज्युनिअर गटात रिशिका लालवाणी यांची निवड झाली.

प्रथमच नाशिकमध्ये झालेल्या या स्पर्धा अतिशय अटीतटीच्या झाल्या असल्याने निवड समितीने निकाल दोन दिवसांसाठी राखून ठेवला होता. जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या संघाची निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनने सक्रीय सहभाग घेत स्पर्धेसाठी लागणाऱ्या सुविधा पुरवत सहकार्य केले. १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील, १८ वर्षाखालील आणि खुला अशा मुले व मुलींच्या आठ गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा २० जणांचा संघ पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आला आहे.

खुल्या पुरुष व महिला गटातून २० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. संजय साठे, मीनाक्षी ठाकूर आणि नितीन नागरे यांची त्रिसदस्यीय निवड समिती खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करत संघ निवडला आहे. नाशिकची स्टार स्विमर सायकलीस्ट अनुजा उगले हिने अपेक्षेप्रमाणे यश मिळवत महिलांच्या खुल्या गटात १३ मिनिट ८ सेकंदात अंतर पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवत संघात स्थान पक्के केले. बालेवाडी, पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या अनुजा उगले हिने कांस्य पदक मिळवले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एशियन गेम्स साठीच्या प्रशिक्षण शिबिरासाठी तिची निवड झाली आहे.

तर मुलींच्या सबज्यूनिअर गटात रीशिका लालवाणी हिने १७ मिनिट ११ सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला. रीशिकानेही जुलै महिन्यात झालेल्या पुणे बारामती सायकल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवत स्पर्धा गाजवली आहे. पुरुष खुल्या गटात एकूण ४ खेळाडूंची निवड करण्यात आली असून आजवर अनेक एमटीबी स्पर्धा गाजवणारे

नाशिकचे गोपीनाथ मुंडे (९ मिनिट ४२ सेकंद) आणि अरुण भोये (१० मिनिट) यांनी अनुक्रमे दुसरा व चौथा क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघात प्रवेश मिळवला. पुण्याचा विठ्ठल भोसले (९ मिनिट २९ सेकंद) याने प्रथम तर भीम रोकाया (९ मिनिट ४५ सेकंद) याने तिसरा क्रमांक पटकावला. अरुण पाठोपाठ भारत सोनवणे यानेही १० मिनिट ५ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. युथ मुलांमध्ये नाशिकच्या निसर्ग भामरेने ११ मिनिट २९ सेकंदात अंतर पूर्ण करत यश मिळवले. या गटात पुणेच्या मंगेश ताकमोगे याने प्रथम क्रमांक पटकावला. या पाठोपाठ युथ मुलींच्या गटात शिया लालवाणी हिने तिसरा क्रमांक मिळवत राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात एमटीबी सारख्या स्पर्धांसाठी लागणाऱ्या सर्वोत्तम वातावरणात झालेल्या या निवड चाचणी स्पर्धेत राज्यभरातून विविध वयोगटातील तब्बल १८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात कोल्हापूर, पुणे, सांगली, नांदेड अशा जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांची संख्या मोठी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारी, समस्यांसाठी फेसबुकद्वारे गांधीगिरी

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक शहरातील आरोग्याच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक परिसरात अस्वच्छतेच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. प्रचंड कचरा व घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, नाशिक महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या तक्रार दाखल करण्यासाठी नाशिककरांनी थेट सोशल मीडियाचा आधार घेतला असून, फेसबुकवर नाशिककरांनी गांधीगिरीच्या मार्गाने पालिकेविरोधात तक्रार मोहीम राबविल्याचे चित्र आहे. 'नाशिकच्या महापौर व आरोग्य अधिकारी यांचे मोबाइल क्रमांक फेसबूकवर अपलोड करण्यात आले होते. शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेला कचरा तसेच आपल्या परिसरातील अस्वच्छता याबाबतची माहिती या क्रमांकावर फोन करून सांगा.' अशी पोस्ट फेसबुकवर अपलोड करण्यात आली होती. शहरातील योगेश कापसे याने ही पोस्ट अपलोड केली होती. या पोस्टवर काही वेळातच अनेक नाशिककरांनी आपल्या समस्या महापौर व आरोग्य अधिकाऱ्यांना फोन करून सांगितल्या. थेट महापौर व संबंधित अधिकारी यांनाच फोनवर तक्रार दाखल करा, हे गांधीगिरी स्टाइलचे आंदोलनाची सोशल मीडियावर बुधवारी दिवसभर चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीर्थक्षेत्र कावनईत हातसफाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. कपिलधारा तीर्थक्षेत्रातील शंकर मंदिरातील तीन लोखंडी दानपेट्या व कामाक्षी मंदिरातील दानपेटी अशा चार दानपेटीतील दीड लाखांची रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याआधीही या मंदिरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान या चोरी प्रकरणातील तीन दानपेट्या कुलूपे तुटलेल्या अवस्थेत मंदिरालगत आढळल्या. मंदिरातील एक पेटी जागीच रिकामी करून त्यातील रक्कमही चोरट्यांनी गायब केली.

डोंगराळ भागात ही मंदिरे असल्यामुळे येथे रात्री फार कुणाची ये-जा नसते. नेकमा याचाच फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला. कपिलधारा तीर्थक्षेत्रातील शंकर मंदिरातील दोन दानपेट्या चोरट्यांनी उचलून नेल्या. एक दानपेटी उचलता न आल्याने तिचे कुलूप तोडून ती जागीच रिकामी केली. तर जवळच असलेल्या कामाक्षी देवी मंदिरातील दानपेटीही चोरट्यांनी उचलून नेऊन रक्कम चोरून नेली. एकाच रात्री दोन मंदिरातील दानपेट्या व त्यातील रक्कम चोरीस गेल्याने खळबळ उडाली.

बुधवारी सकाळी चोरी झाल्याचे उघडीस आले. मंदिराचे पुजारी उडिया महाराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घोटीचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक माळी, पोलिस कर्मचारी संदीप शिंदे, सुहास गोसावी आदींनी घटनास्थळी घाव घेत पंचनामा केला.

पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांनाही पाचारण केले. श्वानाने मंदिर परिसाराचा माग दाखवला. ठसे तज्ज्ञांनी ठशांचे नमूने घेतले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोरटे कैद झाल्याने पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले. तीर्थक्षेत्राचे महंत फलाहारी महाराज, ट्रष्टी कुलदीप चौधरी, दीपक मंगे, भरत पटेल आदींनी याबाबत माहिती घेतली.

दीड लाखांची चोरी?

कपिलधारा तीर्थक्षेत्र परिसरातील तीन दानपेट्यांतून जवळपास एक ते सव्वा लाख रुपये तर कामाक्षी मंदिरातील दानपेटीतून जवळपास वीस पंचवीस हजार रुपये चोरी झाल्याची माहिती महंत फलाहारी महाराज व उडिया महाराज यांनी दिली. श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दोन महिन्यापूर्वी दानपेटी उघडल्या होत्या. त्यानंतर दानपेट्या उघडल्या नसल्यामुळे रकमेचा अंदाज येत नसला तरी सर्व रक्कत दीड लाखांच्या आसपास असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या मंदिरात नेहमीच चोऱ्या होतात. त्यामुळे पोलिसांनी कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी पुजाऱ्यांसह भक्तांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेबसाइटवर चुकीची माहिती

$
0
0

आडगाव पोलिस स्टेशनचा संपर्क क्रमांक चुकीचा

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

शासनाने सर्व पोलिस मुख्यालयाला वेबसाइट बनविण्याचे आदेश दिलेले आहे. त्याचे पालन करीत नाशिक पोलिसांची वेबसाइट तयार केली गेली. मात्र यामध्ये बऱ्याच चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. एका नागरिकाला आडगाव पोलिस स्टेशनचा फोन नंबर लागत असल्याने त्याने वेबसाइटवर चेक केला असता तेथे दिलेला नंबर हा दुसऱ्याच ठिकाणी लागल्याने नागरिकाचा गोंधळ उडाला. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे पोलिस स्टेशनचे नंबर, पत्ता अशी माहिती परिपूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आडगाव परिसरातील एका नागरिकाने पोलिस स्टेशनला फोन करायचा म्हणून गूगलवर आडगाव पोलिस स्टेशन संपर्क क्रमांक शोधला. त्याला 'नाशिक पोलिस डॉट कॉम' या वेबसाइटवरून आडगाव पोलिस स्टेशनच्या पेजवर नंबर मिळाला. मात्र त्याने तो लावल्यावर संबंधित फोन नंबर चुकीचा आढळला. नाशिक पोलिसांच्या वेबसाइटवर आडगाव पोलिस स्टेशनचा संपर्क क्रमांक ०२५३-२६२९८३७ हा दिलेला आहे. मात्र तो चुकीचा असून, अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. परंतु, त्याच्यातही बदल केलेला नाही.

वेळोवेळी अपडेट गरजेचे

सोबतच या वेबसाइटवर शहरातील म्हसरूळ पोलिस स्टेशनची कोणतीही माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. वेबसाइट वेळोवेळी अपडेट असणे गरजेचे आहे पण त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला असून, प्राधान्याने वापर सुरू आहे. त्यामुळेच हायकोर्टाने सर्व शहर, जिल्हा पोलिस मुख्यालयाची वेबसाइट असली पाहिजे. मात्र तरीही वेबसाइटवर फोन नंबर चुकीचे आहेत. तरी वेबसाइट वेळोवेळी अपडेट होतांना दिसत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे वेबसाइट बनवण्याबरोबरच ती वेळोवेळी अपडेट ठेवणेदेखील खूप महत्त्वाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक स्पर्धेत संजीवनीला रौप्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतच्या पावलावर पाऊल टाकत नाशिकच्या संजीवनी जाधवने आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयाची परंपरा कायम राखली आहे. चीनमध्ये तैपई येथे झालेल्या जगातिक स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले.

महिलांच्या दहा हजार मीटर स्पर्धेत संजीवनीने यावेळी ३३ मिनिटे २२ सेकंद अशी सर्वोत्तम वेळही नोंदवली. सुवर्णपदक विजेत्यापेक्षा अवघ्या तीन ३ सेकंदानी ती मागे राहिल्याने तिचे सवुर्णपदक हुकले. दरम्यान, संजीवनीचे पदक जिंकण्याची घोडदौड सुरूच आहे. या अगोदर कविता राऊतनंतर आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी ती नाशिकची दुसरी धावपटू ठरली. आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीन वर्षे पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संजीवनी जाधवने गुंटूर येथे संपलेल्या ५७ व्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पा यंदा बारा दिवस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गणरायांचे आगमन अवघ्या एक दिवसावर आल्याने साऱ्याच गणेशभक्तांची बाप्पांच्या स्वागतासाठी लगबग सुरू आहे. त्यातच बाप्पा यंदा दहा नव्हे, तर तब्बल बारा दिवस मुक्काम ठोकणार असल्याने गणेशभक्तांच्या उत्साहाला आणखी उधाण आले आहे.

पुरोहित महासंघाचे सतीश शुक्ल यांनी सांगितले, की बारा दिवसांच्या गणेशोत्सवाचा योग दुर्मिळ असून, शुभ आहे. दर वर्षी तिथी घटतात किंवा वाढतात. त्यानुसार गणेशोत्सवाचा कालावधी हा कमी-जास्त होत असतो. कधी तो नऊ दिवसांचा असतो, तर कधी दहा दिवसांचा असतो. चतुर्थी ते अनंत चुतर्दशी असा गणेशोत्सव असतो. यंदा तिथी वाढल्यामुळे श्रींचा मुक्काम बारा दिवस राहणार आहे.

रत्नाकर संत गुरुजी यांनी सांगितले, की तिथीचा ठराविक कालावधी असतो. तिथीक्षयामुळे (सूर्याने पाहिलेली तिथी) गणेशोत्सव कालावधी कमी-जास्त दिवसांचा असू शकतो. यंदा चतुर्थीला राहू काल आहे. परंतु, गणेश स्थापना आणि राहू कालाचा काही संबंध नाही. राहू काल हा फक्त नवीन प्रयाण, सरकारी कामे, प्रवास गाठीभेटी यासाठी वर्ज्य आहे. गणेशमूर्ती स्थापनेसाठी वर्ज्य नाही.

संत गुरुजींनी सांगितले, की गणेशोत्सव काळात घरात बाळ जन्माला आले किंवा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास दुसऱ्याच्या हस्ते त्वरित गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. काही कारणास्तव घरात एखाद्या वर्षी गणेशमूर्तीची स्थापना करता आली नाही, तरी चालते. घरात गर्भवती स्त्री असली, तरी विर्सजन करावे. अशावेळी मूर्ती विसर्जन करू नयेयाला शास्त्राधार नाही.

परंपरा जोपासावी

शुक्ल यांनी सांगितले, की काही जण दीड दिवसाचा, तर काही जण अडीच दिवसांचा गणेशोत्सोव साजरा करतात. यंदा बारा दिवसांचा गणेशोत्सव आल्यामुळे गोंधळून जाण्याचे कारण नाही. आपल्या घराण्यातील रुढी-परंपरेप्रमाणे गणेशोत्सोव साजरा करावा.

प्रतिष्ठापना मुहूर्त असे

शास्त्रानुसार गणेशमूर्ती मातीचीच असावी. मूर्ती स्थापना करताना देवाचे व आपले तोंड दक्षिणेला येणार नाही याची काळजी घ्यावी. गणेशोत्सवास शुक्रवारी (दि. २५) प्रारंभ होत आहे. गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचे मुहूर्त असे ः सकाळी ८ ते ९.३० लाभ मुहूर्त. ९.३० ते ११ अमृत मुहूर्त. दुपारी १२ ते २ शुभ मुहूर्त. विसर्जनाचा कालावधी सूर्यास्तापर्यंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळीचा ठराव केरात

$
0
0

महासभेत विषय मंजुरीनंतरही मंदिराचे सभागृह अद्याप ट्रस्टकडे नाहीच


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मंदिरालगत बांधण्यात आलेले सभागृह ट्रस्टच्या ताब्यात देण्याचा ठराव महापालिकेने केला होता. या ठरावाला अनेक वर्षे लोटली तरी हे सभागृह अद्याप ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. त्यामुळे टाकळी येथे येणाऱ्या भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच, धार्मिक ठिकाण असतानाही या सभागृहात उपद्रवी आणि व्यसनींचा वावर वाढल्याचे चित्र आहे.

नंदिनी नदीला येत असलेल्या पुरामुळे समर्थ रामदास स्वामी मंदिराला धोका निर्माण झाला होता. नदीच्या पाण्यामुळे मंदिरासमोरील मातीचा भाग ढासळत जाऊन मंदिरापासून २० फूट असलेली जमीन फक्त चार फूट राहिल्याने मंदिराला धोका निर्माण झाला. याठिकाणी संरक्षक भिंत बांधणे खर्चाचे काम असल्यामुळे येथील ट्रस्टींनी तत्कालीन महापौर शांताराम बापू वावरे यांना महापालिकेत जाऊन परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी त्यांनी स्वतः लक्ष घालून प्रत्यक्ष पाहणी केली. मनपाच्या महासभेत बंडोपंत जोशी यांनी केलेल्या मागणीनुसार महापौर उत्तमराव ढिकले यांनी संरक्षक भिंत बांधण्यासाठी १० लाख रुपये मंजूर केले. यानंतर महापौर अशोक दिवे यांनी ५४ लाख रुपये बांधकामासाठी मंजूर केले. या सभागृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापौर दशरथ पाटील यांच्या उपस्थितीत या सभागृहाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. दोन सभागृहांपैकी एका सभागृहाला मातोश्री राणुबाई सभागृह व दुसऱ्या सभागृहाला दादासाहेब पोतनीस सभागृह अशी नावे देण्याचेही जाहीर केले.

दोन्ही सभागृहे श्री समर्थ सेवा मंडळास धार्मिक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्यासाठी ताब्यात देण्याचे जाहीर केले. मंडळाकडे बांधकाम सुपूर्द करण्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार झाली. परंतु, मंडळाचा वाद कोर्टात सुरू आहे, अशा काही लोकांनी वावड्या उठवल्याने या कामाला खो बसला. परंतु, या आधीच मंडळाच्या बाजूने कोर्टाचा निकाल लागला होता. २०१२ रोजी हायकोर्ट मुंबई यांनी नवीन आदेशानुसार नवीन घटना करून विश्वस्ताची नेमणूक करण्याचे आदेश दिले. जिल्हा न्यायाधीश हे कायमस्वरूपी अध्यक्ष असून, सात जणांचे विश्वस्त मंडळ कार्यरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images