Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘नाशिक’चे ब्रँडिंग जगभर करणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

‘मेक इन महाराष्ट्रा’बरोबरच जगभर ‘मेक इन नाशिक’चे ब्रँडिंग करून आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे उद्योग नाशिकला व्हावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील कार्यक्रमात केली. या वेळी त्यांनी मुंबई, पुणे येथे उद्योगांची गर्दी वाढल्याने तेथे जागा नाही. त्यामुळे नाशिकला मोठी संधी आहे. या उद्योगामध्ये विमानबांधणी व संरक्षण साहित्य, कृषीप्रक्रिया उद्योग, पर्यटन व वेलनेस हे महत्त्वाचे उद्योग असून, त्यात नाशिकला संधी आहे. उद्योजकांनी या उद्योगांवर फोकस करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

जगभरातील मोठ्या उद्योगांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करावी, यासाठी मुंबई येथील नेहरू सेंटर हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, की जोपर्यंत आपल्या ब्रँडचे आपण मार्केटिंग करीत नाही, तोपर्यंत तो किती चांगला असला तरी तो विकत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही गोष्ट ओळखून जगभरातील गुंतवणूक भारतात वाढवली. देशभर झालेल्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र अग्रेसर असून, ६८ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. त्यानंतर दिल्ली, कर्नाटक, गुजरातसह इतर राज्ये आहेत. महाराष्ट्रातही सर्वाधिक गुंतवणूक पुण्यात झाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे मुंबईसारखीच स्थिती पुण्याची झाली आहे. जागेचा प्रश्नही आता येथे उपस्थित होत आहे. त्यामुळे नाशिकला मोठी संधी असल्याचेही ते म्हणाले.

‘मेक इन नाशिक’चा दोन दिवसांचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यावर बैठक घेऊ व त्यावर चर्चा करून आगामी दोन वर्षांचा प्लॅन तयार करू, असे सांगत नाशिकला मोठ्या प्रमाणात उद्योग आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली. हा विषय केवळ चर्चेपुरता असणार नाही तर तो प्रत्यक्षात उतरेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, ‘आयमा’चे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमजार राहुल आहेर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांच्यासह निमा व क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.

एचएएलमार्फत कॉन्फरन्स

विमानबांधणी व संरक्षण साहित्य उद्योगाबाबत नाशिकमध्ये एचएएलमार्फत कॉन्फरन्स घेऊन या उद्योगांना कशी चालना मिळेल, यासाठी राज्य सरकारतर्फे प्रयत्न केले जात आहेत. या उद्योगांमुळे वेंडरलाही फायदा होईल. हा उद्योग सध्या भरारीवर असून, यात मोठी गुंतवणूक होत आहे.

अॅग्रो प्रोसेसिंग डेव्हलप करा

कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग नाशिकमध्ये व्हावेत, यासाठी राज्य सरकार पुढील काळात फोकस करणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर आज चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यात नाशिकमध्ये काही कृषी उद्योगांकडे जास्त लक्ष दिले जाते; पण येत्या काळात फ्रूट अँड व्हेजिटेबल बास्केटसाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टुरिझम अँड वेलनेस

नाशिकमध्ये पर्यटन व आरोग्य क्षेत्राला महत्त्व आहे. ते वाढविण्यासाठी सरकार आराखडा तयार करून इन्फ्रा स्ट्रक्चर उभे करेल. या सर्व्हिस सेक्टरमध्ये चांगला पैसा आहे. या शहरात अंतर्भूत क्षमता आहे. हे क्षेत्र महत्त्वाचे स्थान असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संपाआधी भाजीपाल्याची आवक वाढली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

येत्या १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. या संपात शेतकरी भाजीपाला, दूध, फळे आदी शेतमाल विक्रीसाठी आणणार नाहीत. संपाला दोन दिवस बाकी असल्यामुळे मंगळवारी बाजार समितीच्या आवारात सोमवारच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. भाजीपाल्याची आवक अचानक वाढल्यामुळे बाजारभावात घसरण झाली. दोन दिवस उशिरा तयार होणाऱ्या भाजीपाल्याचीही काढणी करून तो भाजीपाला बाजारात आणण्यावर सर्वच शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्यामुळे ही आवक वाढली आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याचा काही दिवसांसाठी स्टॉक करण्याच्या उद्देशाने भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. व्यापारी तसेच स्थानिक भाजीबाजारातील विक्रेतेही जास्त प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यावर भर देत आहेत. असे असले तरी भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजारभावात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी घसरण झाली. नाशिकमधून मुंबईसारख्या शहरात भाजीपाला पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात भरून पाठविला आहे. हा भाजीपाला संप सुरू होण्याच्या अगोदर मोठ्या शहरात पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे दिसले.
संपामुळे शेतकरी भाजीपाला विक्रीस आणणार नाहीच, तरीही काही शेतकऱ्यांनी विरोधात जाऊन भाजीपाला आणण्याचा विचार केला तरी आपल्या वाहनाची तोडफोड होण्याच्या भीतीने असल्यामुळे वाहनधारकच शेतमालाची संपाच्या कालावधीत वाहतूक करण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे मंगळवारी बाजार समितीच्या आवारात भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. बाजार समितीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर वाहतूक ठप्प होत होती. मोठ्या आवारात वाहनांना जागा अपुरी पडत होती. दुपारचे लिलाव साधरणतः तीन ते साडेतीन वाजेपर्यंत आटोपतात. ते लिलाव मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. बुधवार हा नाशिकच्या बाजाराचा दिवस आहे. तसेच संप सुरू होण्यासाठी एकच दिवस बाकी असल्यामुळे उद्या (बुधवारीही) भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक पुलांबाबत बांधकाम विभाग गाफील

$
0
0

नाशिक : जिल्ह्यातील कमकुवत पुलांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल वर्षभरानंतरही सादर केली नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या अध्यक्ष हे जिल्हाधिकारीच असून, त्यांच्याकडे माहिती न दिल्याने अखेर बांधकाम विभागाला १५ जूनचा अल्टिमेटम जिल्हा प्रशासनाने दिला आहे. विशेष म्हणजे, बांधकाम विभागाला स्मरणपत्र देण्याची नामुष्कीही जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे. जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडल्यावर या विभागाला जाग येणार का, असा सवाल उपस्थ‌ित होऊ लागला आहे.
महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळला त्या दुर्घटनेच्या वेदना अजूनही ठसठसत आहेत. या दुर्घटनेनंतरच राज्यातील कमकुवत पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा दिले होते. वर्षभराच्या काळात सावित्री नदीवरील पुलासह काही जिल्ह्यांतही धोकादायक पूल पाडून त्या जागी नवीन पूल तयार झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व सुरक्षा कालावधी संपलेल्या पुलांचा मुद्दाही या घटनेनंतर चर्चेत आला. धोकादायक पुलांवरील वाहतूक बंद करा, अशी मागणी होऊ लागली. जिल्ह्यातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम हाती घेण्यात आले. अशा धोकादायक पुलांची माहिती सादर करा, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गेल्या वर्षी दिले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप ही माहिती सादर केली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे आपत्ती निर्माण करू शकतील असे किती आणि कोणते धोकादायक पूल शहरात आणि जिल्ह्यात आहेत, याची अचूक आणि इत्थंभूत माहितीच जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीकडे उपलब्ध नसल्याची खेदजनक बाब पुढे आली आहे.

तहसीलदार करणार कार्यवाही

गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने येथील पायाभूत सुविधांची वास्तवता चव्हाट्यावर आली. शहरात आणि जिल्ह्यात अनेक पूल पाण्याखाली गेले. सायखेडा आणि त्यापुढील ३२ गावांना नाशिक शहराशी जोडणाऱ्या चांदोरी-सायखेडा पुलाचाही त्यामध्ये समावेश होता. यंदाही अशी आपत्कालीन परिस्थ‌िती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद राहतील, यासाठी तहसीलदारांनी आपल्या स्तरावर योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह

घोटी येथे दारणा नदीवरील धोकादायक पूलही गेल्या वर्षी बांधकाम विभागाच्या सूचनेवरून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर या विभागाने स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात केली. हे काम प्रगतिपथावर असले तरी अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती डिसेंबरमध्ये नाशिक दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त न झाल्यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑडिटच पूर्ण झाले नाही तर पुलांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी केव्हा होणार, असा सवाल उपस्थ‌ित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस नगरसेवकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेची निवडणुकीचा धुराळा नुकताच शांत झाला. सध्याच्या नगरसेवकांची मुदत १४ जूनपर्यंत असल्याने १५ जून रोजी महापौर पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ८४ नगरसेवक पालिकेच्या सभागृहात पाहोचले आहेत. मात्र या नगरसेवकांपैकी तब्बल ३० नगरसेवक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यापैकी १२ नगरसेवकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

असोसिएशन फॉर डेमॉक्रेटी‌क रिफोर्मस (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांनी नवनिर्वाचित ८४ पैकी ७९ नगरसेवकांच्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यंदाच्या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ५४ उमेदवारांना सर्वपक्षांनी उमेदवारी दिली होती. त्यापैकी तीस नगरसेवकांनी निवडणुकीत यश मिळवून सभागृह गाठले आहे. या तीस नगरसेवकांपैकी १२ नगरसेवकांवर तर खून, अपहरण, बलात्कार अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

१५ नगरसेवक कोट्यधीश

गुन्हेगारी पार्श्वभूमीसह काही नगरसेवक हे कोट्यधीश असल्याचेही या संस्थांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्यादेखील मनपाचे नवनिर्वाचित शिलेदार श्रीमंत आहेत. १५ नगरसेवक कोट्यधीश असून सरासरी प्रत्येक नगरसेवक ६३ लाखाचा धनी आहे. कोट्यधीश नगरसेवकांमध्ये सर्वाधिक शिवसेनेचे ६ नगरसेवक आहेत. प्रभाग १४ क मधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमद अहमद्दुला नबी हे सर्वात श्रीमंत नगरसेवक ठरले असून त्यांची संपत्ती ६ कोटीहून अधिक आहे. १५ नगरसेवकांची संपत्ती तीन लाखांपेक्षा कमी आहे. शिवसेनेच्या कविता किशोर बच्छाव यांची संपत्ती केवळ ७९ हजार ५०० रुपये इतकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. डेकाटेंना माघारी पाठविण्याच्या हालचाली!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या घंटागाडी सेवेमुळे वादग्रस्त ठरलेले पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना त्यांच्या मूळ सेवेत परत पाठविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. वांरवार सूचना व नोट‌सिा देवूनही डॉ. डेकाटे यांच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने प्रशासनाने आता त्यांच्या परतीची तयारी सुरू केली आहे. डॉ. डेकाटे यांच्यावर ठेकेदारांना पाठ‌शिी घालण्याचा ठपका ठेवण्यात आला असून, त्याचा पालिकेतील कार्यकालही पूर्ण झाला आहे. त्यामुळे पालिकेने त्यांना शासनाच्या आरोग्य विभागात परत पाठवण्यासंदर्भातील पत्रव्यवहार सुरू केला आहे.

महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांचा पालिकेतील कारभार चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. डेकाटे प्रतिनियुक्तीवर पालिकेच्या सेवेत आले आहेत. शहराच्या स्वच्छतेऐवजी ठेकेदारांची भलामण करत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे. घंटागाडी ठेक्याचा आकडा फुगवणे आणि या ठेक्याची अंमलबजावणी न करण्याचा ठपका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी त्यांच्यावर ठेवून नोटीस बजावली होती. घंटागाडी ठेक्यात ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे बंधनकारक असतांनाही, डॉ. डेकाटे यांनी ठेकेदारांना अभय दिले. महापौरांनी केलेल्या पाहणीत ही बाब उघडकीस आली होती. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याबाबत त्यांनी आयुक्तांना सादर केलेल्या खुलाशात समाधानकारक उत्तर नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. डॉ. डेकाटे यांनी यापूर्वीही तीन ते चार वेळा कारभारात सुधारणा करण्यासंदर्भात नोटीसा बजावलल्या आहेत. परंतु त्यांचीही डॉ. डेकाटे यांनी समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत.

डॉ. डेकाटे यांच्याकडे आरोग्य विभागासह वैद्यकीय विभागाचाही पदभार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला ते न्याय देत नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. वारंवार नोटीस व समज देवूनही डॉ. डेकाटे यांच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने व त्यांचा पालिकेतील कार्यकाल समाप्त झाल्याने त्यांच्या परतीची कारवाई सुरू केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून त्यांची पालिकेतील प्रतिनियुक्ती रद्द करण्याची शिफारस पालिकेकडून केली जाणार आहे. त्यासंदर्भातील

फाईल तयार झाली असून, शासनाला त्यांच्या परतीची विनंती केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तर उद्याने दत्तक घेऊ!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील उद्यानांवरून महासभेत शिवसेनेला कोंडीत पकडणाऱ्या सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यावर शिवसेनेने पलटवार केला असून, उद्यान साभाळण्यास भाजप हलबल असल्याचे पाटील यांनी जाहीर केल्यास उद्याने दत्तक घेवू, असा टोला विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.

उद्यानांच्या देखभालीबाबत मनसे हतबल झाल्यानेच आम्ही ते दत्तक घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे भाजपनेही आता उद्याने सांभाळू शकत नाहीत असे जाहीर केल्यास आमची तयारी असल्याचे सांगत, पाटील यांनी बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी सारखे वागू नये असा टोमणा बोरस्ते यांनी लगावला आहे. त्यामुळे सेना भाजपमधील संघर्ष अधिक वाढणार आहे.

सोमवारी झालेल्या महासभेत सभागृह नेते दिनकर पाटील यांनी उद्यानांच्या प्रश्नांवर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेने उद्याने दत्तक घेण्याची घोषणेचे पुढे काय झाले, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावरून बोरस्ते यांनी पाटील यांना पुन्हा आव्हान दिले आहे. मनसे अध्यक्षांनी नाशिक गार्डन सिटी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात उद्यानांसाठी मनसेने काहीच केले नव्हते. त्यामुळे उद्याने वाचवण्यासाठी शिवसेनेने उद्याने दत्तक घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यांसदर्भात आयुक्तांनाही पत्र लिहले होते. परंतु राजकीय पक्षांना उद्याने दत्तक देण्यास आयुक्तांनी विरोध केला होता. तसेच त्यावेळेस उद्यानांची निविदा प्रक्रिया सुरू झाली होती. शिवसेनेची दत्तक घेण्याची त्यावेळेसही तयारी होती, असा दावा बोरस्ते यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतल्यानंतरही भाजपच्या पाटील यांच्यासह ६६ नगरसेवकांनी आम्ही उद्याने सांभाळण्यास सक्षम नसल्याचे जाहीर केल्यास शिवसेना उद्याने सांभाळण्यास तयार असल्याचे आव्हान बोरस्ते यांनी दिले आहे. शिवसेना दत्तक घेण्याची केवळ घोषणा करत नाही, तर प्रत्यक्ष कृती करते याचा नागरिकांना अनुभव आहे. मुख्यमंत्र्यांसारखे आम्ही केवळ आश्वासनांची बोळवण करत नसल्याचा टोलाही बोरस्ते यांनी लगावला आहे. नाशिककरांनी तुमच्यावर विश्वास टाकला तो तरी सार्थ करून दाखवा, टोला त्यांनी लगावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोशिंदा आंदोलनासाठी सज्ज

$
0
0

टीम मटा

सततची नापिकी, अवकाळीचा फटका, पाचवीला पुजलेला दुष्काळ, कर्जाचा वाढता डोंगर आणि सरकारने केलेले दुर्लक्ष यामुळे मेटाकुटीस आलेला जगाचा पोशिंदा उद्यापासून (१ जून) संपावर जाणार आहे. भाजीपाला, दूध, धान्य आदी प्रकारचा कोणताच शेतमाल बाजारात पाठविला जाणार नाही. विविध मागण्यांसाठी बळीराजाने सुरू केलेल्या या बंडाची तयारी पूर्ण झाली असून, संपूर्ण राज्यभर या संपाची हाक देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस गप्प का?

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतकऱ्यांचा शेतमाल मातीमोलाने विकला जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकार या समस्यांकडे डोळझाक करीत आहे. विरोधी पक्षात असताना आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घसा कोरडा होईपर्यंत ओरडून सांगत होते, की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. शेतकरी आत्महत्या झाल्यावर महाराष्ट्र शासनावर ३०२ खुनाचा गुन्हा दाखल करा, तेच फडणवीस आज गप्प का, असा सवाल शेतकरी संघटना नेते संतु पाटील झांबरे यांनी केला.

ते पाटोदा येथील शेतकरी संपाबाबतच्या जागृती बैठकीत बोलत होते.

विरोधपक्षात असलेले देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री झाल्यावर त्यांची भाषा कशी बदलली? हे त्यांच्या दौऱ्यात सिद्ध झाले, असेही पाटील म्हणाले.

आतापर्यंत शेतकऱ्यांची प्रत्येक शासनाने कशी लूट केली. धुणीभांडी करणाऱ्यांपासून ते थेट सनदी अधिकारी वर्गाची संघटना संप करून आपल्या मागण्या मान्य करून घेतात. मग शेतकरी संप का करू शकत नाही? असा प्रश्न बैठकीतील शेतकऱ्यांनी उपस्थित केला. भाजीपाला, दूध, फळ शहरात जाऊ द्यायचे नाही. आपल्याला पुरते पिकवायचे. मात्र शेतमाल विक्रीला न्यायचा नाही. आपल्या गावातील शेतमजूर आणि समाज यांना सहकार्य करायचे. शहरात स्वेच्छेने माल पाठवू नका. शहरातील लोकांना बोंबा मारू द्या. त्यांनी आरडाओरड केली की शासन खडबडून जागे होईल. त्यामुळे सर्वांनी संघटीत होऊन पक्ष भेद विसरून शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव, संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत थांबायच नाही, असा निर्णय पाटोदा येथील झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत संध्या पगारे, जाफरभाई पठाण, योगेश सोमवंशी, प्रभाकर भोसले, बाळासाहेब गायकवाड, बापू पगारे यानी संपाची भूमिका मांडली. जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब पिंपरकर, सूर्यभान नाईकवाडी, साहेबराव आहेर, रतन बोरणारे, प्रभाकर बोरणारे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी संपाची गरज असल्याचे सांगत पाटोदा पंचक्रोशीतील सर्व शेतकरी संपात सहभागी होणार असल्याची ग्वाही दिली.

नांगर, पांभर अडगळीतच

येवला : एरवी दरवर्षी मे महिनाच्या अखेरीस शेतशिवारात पांभर, वखर, नांगर, ट्रॅक्टरसह शेतकरी खरिपाच्या तयारीला लागलेला असतो. मात्र यंदा संपाची तयारी असल्याने ही औजारे सध्या तशीच शेतशिवारात अन् खळ्यात अडगळीला पडली आहेत. मान्सूनपूर्व रोहिणी नक्षत्राचे मळभ गेल्या काही दिवसात तालुक्यात अधून मधून दाटून येत असले मशागतीकडे कानाडोळा करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या तयारीऐवजी १ जूनपासून सुरू होणाऱ्या शेतकरी संपासाठी विचारांची पेरणी सुरू केली आहे. या संपामुळे दूध, भाजीपाला, कांद्यासह सर्वच शेतमालाची विक्री

थांबवणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवारातील वर्दळ कमी होऊन गावातील मंदिर, ग्रामपंचायत सभागृहात शेतकरी चर्चा करताना दिसत आहेत.
शेतकरी संपाला ‘नाडा’चाही पाठिंबा

पंचवटी ः येत्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या शेतकरी संपाला नाशिक अग्रो डिलर्स असोसिएशन (नाडा ९७) यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांचे हित पाहिले जात नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालास बाजारात उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. द्राक्ष, कांदा आदी पिकांचे नुकसान होत आहे. २०१७ च्या खरिप हंगामासाठी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे बियाणे, खते, औषधे घेण्यासाठी पैसे नाही, बँका कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. अशा परिस्थितीतीमुळे शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ आली आहे. शेमतकऱ्यांच्या या संपाला पाठिंबा असल्याचे ‘नाडा’चे अध्यक्ष विजय पाटील यांनी कळविले आहे.
वाहनांवर झळकले संपाचे स्टीकर

पंचवटी : शेतकरी संपाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना संपाची माहिती होण्यासाठी फलक, बॅनर्स, होर्डिंग, स्टीकर, पत्रके यांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या प्रत्येक वाहनाला शेतकरी संपाचे स्टीकर लावण्यात येत होते.

या संपात सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना तसेच शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाधारकांकडून करण्यात येत आहे. गावपातळीवरच गावातून वाहने शहराकडे येणार नाहीत याची काळजी त्या-त्या गावाने घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे खेड्यातून शहरात येणारी रसद पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी ठरविले आहे.

या संपाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. तसेच बाजार समितीच्या कार्यालयात सचिव अशोक काळे यांना किसान क्रांती मोर्चाच्यावतीने निवेदन देऊन बाजार समिती बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आदिवासी विकास’ न्याय देण्यात अपयशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील आदिवासी विकास विभाग आदिवासींना न्याय देण्यात अपयशी ठरला. या सरकराने आदिवासींना दुर्लक्षित केले आहे. तीन वर्षांत आदिवासी विभाग हा मृतावस्थेत गेल्याचा आरोप माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केला आहे. विभागाच्या अनास्थेबाबत येत्या ५ जून रोजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आदिवासी नेते राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेवून आदिवासींच्या कारभाराचा पाढा वाचणार आहेत. या भेटीत राज्यपाल यांनीच विभागाचा कारभार चालवावा अशी मागणी करणार असल्याचा दावा पिचड यांनी केला. दरम्यान, आदिवासींच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणारे माजी मंत्री विजयकुमार गावित आणि बबनराव पाचपुते हे भाजपात वाल्मिकी झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत पिचड बोलत होते. पिचड म्हणाले की, आदिवासी विभागाचा कारभार भरकटला असून, भाजपच्या सत्ताकाळात आदिवासींना विभागाचा फायदाच होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आदिवासींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी व त्यांच्या प्रश्नाबाबत राज्यपालांकडे वेळ मागण्यात आली होती. त्यानुसार ५ जून रोजी माजी मंत्री शिवाजी मोघे, प्रा. वसंतराव पुरके, पद्दमाकर वळवी, शिवराम झोले यांसह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. भेटीत, आदिवासीत धनगरांना राजकीय दडपणापोटी आरक्षण देऊ नये, पेसा कायद्याची अमंलबजावणी करावी, खोट्या आदिवासींना सरंक्षण देऊ नये, पंड‌ति दिनद्याल उपाध्यय स्वंयम योजना तत्काळ बंद करावी, केळकर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात आदिवासी संशोधन संस्थेला स्वायतत्ता देण्याचा निर्णय झाला असून, त्यांची अंमलबजावणी करावी, आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी घेऊ नये हा कायदा रद्द करू नये, आदिवासी आश्रमशाळांची अपुरी व्यवस्था सुधरावी, मंजूर केलेल्या पदांची भरती करावी आदी मागण्या यावेळी केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विभागातील सुरू असलेला गैरकारभार, घोटाळ्यांवरही राज्यपालांचे लक्ष वेधणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.

नोकरभरती चौकशीचे काय?

आदिवासी विकास महामंडळातील नोकर भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांची समिती स्थापन केली होती. या समितीने चौकशी करून त्या संदर्भातील चौकशी अहवाल आदिवासी विभागाकडे सोपवला आहे. परंतु चौकशी होवून तीन महिने लोटले तरी, हा अहवाल जाहीर करण्यात आला नाही. हा अहवाल जाहीर करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव खुर्द या गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. कोयत्याने आणि कुऱ्हाडीने वार करून तिघांची हत्या करण्यात आली आहे.

कोकणगाव खुर्द गावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. एका टोळक्याने हा प्रकार केला असून दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. यासंदर्भात तपास सुरू झाला आहे. हादरवणाऱ्या या घटनेची दिंडोरी तालुक्यात चर्चा सुरू आहे. तर गावात तणावाचं वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्य, उद्योजकता मेळावा उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर, ग्रामीण पोलिस आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांच्यातर्फे कौशल्य, उद्योजकता व रोजगार मेळावा २ जून रोजी गंगापूररोडवरील शहर पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९ ते ५ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात शहर तसेच नाशिक परिक्षेत्रातील किमान १८५ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यरत आणि माजी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी सरकारचे विविध महामंडळामार्फत कर्जसुविधा उपलब्ध करणे आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या पात्र उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मेळावा होत असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले.

मेळाव्यासाठी सरकारमान्य कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध शासकीय महामंडळे यांच्यासह रोठे एरडे इंडिया, इनोव्हा रबर प्रा. लि. इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा. लि. नेटवीन सिस्टिम सोल्युशन, रिलाएबल अॅटोटेक, ग्लॅक्सो स्मिथ लाईन फार्मा. केप्रीहेन्स इंडिया, व्हीआयपी इंड्रस्ट्रीज लि. अशा विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. राज्य सरकारच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ब्युटी कल्चर अॅण्ड हेअर ड्रेसिंग, गारमेंट, अॅग्री कल्चर, बिझेनस-कॉमर्स, रिटेल, अॅटोमेटिव्ह, प्लास्टिक प्रोसेसिंग, बँकिंग अकाउंटिंग, मेडिकल-नर्सिंग, प्रॉडक्शन-मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, ट्रॅव्हल-टूरिझम, आयटीबाबत प्रशिक्षणासाठी नोंदणी केली जाणार आहे.

येथे करा नोंदणी

मेळाव्यात नोंदणी होणार असून, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, आधार/इलेक्शन कार्ड, रहिवाशी दाखला, रेशनकार्ड, अनुभव दाखला, व्यवसायासाठी जागा उपलब्धता, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. मेळाव्यासाठी इच्छूक उमेदवारांनी किमान पाच प्रतीत बायोटाडा, फोटो, आधारकार्ड, सेवायोजन नोंदणीसह हजर राहावे. सेवा योजना नोंदणी नसल्यास http://rojgar.mahaswayam.in या वेबसाइटवर नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक संपत चाटे यांनी केले आहे. जून महिन्यात अशाच पध्दतीने मोठा मेळावरा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी संबंधित विभाग किंवा शहर पोलिसांच्या प्रशासन विभागाशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करिअर गाइडन्स सेमिनार्सचा फेस्ट

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

बारावीपाठोपाठ आता दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याने पुढील शिक्षणासाठी नेमकी कोणती शाखा निवडावी यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची पळापळ सुरू होणार आहे. करिअर निवडतांना विद्यार्थ्यांसमोर असलेला संभ्रम महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस उपक्रमांतर्गत बाजूला सारत आहे. या उपक्रमातंर्गत महात्मा गांधी विद्यामंदिरच्या पंचवटी कॉलेजमध्ये २ व ३ जून तर एचपीटी व आरवायके कॉलेजमध्ये ५ जून रोजी करिअर गाइडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्सतर्फे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी प्लॅनेट कॅम्पस उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत नाशिकमधील पंचवटी, एचपीटी, सीएमसीएस कॉलेजमध्ये २६ व २७ मे २०१७ रोजी विविध विषयांवर करिअर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. नाशिकमधील अनेक भागांतून विद्यार्थी व पालक या सेमिनारसाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत विषयतज्ञांच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत केले जात आहे. विशेष म्हणजे, सायन्स, कॉमर्स, आर्टस व्यतिरिक्त इतरही अनेक शाखांमध्ये करिअरच्या उत्तुंग संधी असल्याने ते ऑप्शन विद्यार्थ्यांसमोर मांडले जात आहेत. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात पंचवटी कॉलेजमध्ये २ व ३ जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट, अॅग्रीकल्चर, मॅनेजमेंट, फाइन आर्टस या विषयांवर विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच दहावीनंतर अकरावी प्रवेशावेळी कोणत्या निकषांच्या आधारे फॅकल्टी निवडावी याबाबतचे मार्गदर्शन ५ जून रोजी एचपीटी आरवायके कॉलेजमध्ये देण्यात येणार आहे. एचपीटी कॉलेजच्या मानसशास्र विभागाकडून हे मार्गदर्शन होणार आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या अकरावीत प्रवेश घेतांना कोणते निकष तपासावे यासोबतच समुपदेशन यावर मार्गदर्शन करण्यात येईल. पंचवटी कॉलेजमध्ये प्रत्येक विषयाचे विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांना करिअरच्या नामी संधी, हाय प्रोफेशन तसेच बिझनेसबाबतच्या अनेक दिशा विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात येणार आहे. पालक व विद्यार्थ्यांसाठी हे सेमिनार मोफत असणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना सेमिनारमध्ये करिअर बाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.

२ जून :
करिअर इन हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी
सकाळी १० ते ११ : पंचवटी कॉलेज

२ जून :
अॅग्रीकल्चर आणि हॉल्टीकल्चर
सकाळी ११ ते १२ : पंचवटी कॉलेज

२ जून :
बारावीनंतर मॅनेजमेंटमधील करिअर संधी
दुपारी १२ ते १ : पंचवटी कॉलेज

३ जून :
करिअर इन म्युझिक, ड्रामा, डान्स
सकाळी १० ते ११ : पंचवटी कॉलेज

५ जून :
कोणत्या निकषांवर अकरावीत शाखा निवडावी?
सकाळी ११ ते १ : एचपीटी-आरवायके कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन नाशिक’मध्ये रंगल्या सक्सेस स्टोरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

‘मेक इन नाशिक’च्या समारोपाचा दिवस सक्सेस स्टोरी, विविध चर्चासत्राने रंगला. मंगळवारी उद्‍घाटन सोहळा आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला रंगत आली. त्यानंतर बुधवारी या कार्यक्रमात हजेरी लावत कार्यक्रमास मार्गदर्शन केले.

समारोपाच्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात सस्केस स्टोरीने झाली. यात सुला वाईनचे डॉ. नीरज अग्रवाल यांनी सहभाग घेतला. यात त्यांनी सुला वाईन उद्योगाची निर्मिती कशी झाली याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी स्थानिकांना रोजगार व जिल्ह्यात असलेल्या द्राक्षांना कसा फायदा होईल. यावर आम्ही दर दिला, सुला वाईनची निर्मिती झाली पण ती लोकांपर्यंत कशी पोहचवावी व ती आरोग्यासाठी कशी उपयोगी आहे हे आव्हान आमच्यासमोर होते. त्यातून मार्ग काढल्यामुळे देशभर सुला वाईन फेस्टिव्हल प्रसिद्ध झाल्याचे ते म्हटले.

‘नाशिकच्या उद्योजकांचा हातभार’ या विषयावर विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण महत्त्वाचा असून त्यात नाशिकला मोठी संधी असल्याचे नमूद केले. जगातला हा दुसरा ट्रॅगल असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. या चर्चासत्रात ‘एससीटी’चे हासिफ काजी यांनी नाशिकमध्ये आम्ही विविध प्रकारची गंतवणूक केल्याचे सांगितले. यातून महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली.

राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची

‘बदलते नाशिक’ हे दिवसभरातल्या कार्यक्रमात लक्षवेधी ठरले. यात तापडिया उद्योगाचे जयप्रकाश तापडिया, ‘मटा’चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, पर्यटक विकास महामंडळाचे आशुतोष राठोड, ‘एमटीसी’चे संजय गुप्ता, टिजिंट टेक्नॉलॉजीचे प्रवीण तांबे यांनी सहभाग घेतला. यावेळी आशुतोष राठोड यांनी नाशिकच्या पर्यटन विकासाचा मॅप तयार झाला असून डेव्हलमेंट वेलनेस हब होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. ‘नाशिकची कनेक्टिव्हिटी पुढील काळात फिजिकल व मेन्टलीसुद्धा वाढवले गरजेचे असल्याचे ते म्हणाले. शैलेंद्र तनपुरे यांनी १९६२ पासून औद्योगिक वसाहत कशी विकसित झाली, त्यासाठी त्यावेळच्या उद्योजकांनी कसे प्रयत्न केले याचा इतिहास मांडला. विमानसेवा का सुरू होत नाही? त्यासाठी दोन वर्षे कसे लागतात? महिंद्रा कंपनीचा प्रकल्प केवळ महापालिकेच्या करामुळे चाकणमध्ये स्थलांतरीत होतो आणि राजकीय नेते त्याबाबत उदासीन राहतात असे अनेक दाखले देत राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे त्यांनी नूमद केले. यावेळी त्यांनी सर्वांनी एकत्र येत नाशिकला पुढे नेण्याचे आवाहनही केले.

या कंपन्यांचे आले प्रस्ताव

चर्चासत्रात तापडिया यांनी नाशिकचे महत्त्व सांगून नाशिक-मुंबई बुलेट ट्रेन सुरू झाल्यास मुंबईचा सर्व ओघ नाशिकला येईल, असे सांगत कनेक्टिव्हिटी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी ‘एसटीपी’चे संजय गुप्ता यांनी प्रेझेन्टेशन सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानार्जनाने नाशिककर तृप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वसंत व्याख्यानमालेचा महिनाभरापासून सुरू झालेल्या ज्ञानयज्ञाचा बुधवारी समारोप झाला. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर ही व्याख्यामाला आयोजित केली. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते १ मे रोजी व्याख्यानमालेचे उद्‍घाटन झाले होते. या व्याख्यानमालेतून वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान नाशिककरांना ग्रहण करता आले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, विज्ञान, पर्यटन, सुलेखन अशा वेगवेगळ्या विषयांचा लेखाजोखा नाशिककरांना जाणून घेता आला.

पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या उत्तर प्रदेश निवडणुकीचा अन्वयार्थ या विषयावरील यंदाच्या व्याख्यानमालेला सुरुवात झाली. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे पाक-चीनचा दहशतवाद आणि सामान्य माणसापुढील आव्हाने या विषयावरील, पुणे येथील वेद वासुदेव प्रतिष्ठानचे संस्थापक अजित कृष्ण तुकदेव यांचे आध्यात्मिक राष्ट्रवाद, डॉ. प्राची पवार यांचे आरोग्य प्रश्नमंजुषा, ब्रह्मकुमार डॉ. श्रीमंत कुमार यांचे अलविदा डायबेटीस, गिरीश लाड यांचे स्त्रीभ्रूण हत्या थांबवायची कशी?, नर्मदा परिक्रमा अंतर्यात्राच्या लेखिका भारती ठाकूर यांचे भगिनी निवेदिता विषयावर तर अॅड. अजय तोष्णीवाल यांचे रेरा-नवीन गृहनिर्माण कायदा आणि सदनिकाधारकाचे अधिकार या विषयावर व्याख्यान पार पडले. ९ मे रोजी प्रा. श्रावण माने यांचे संत बसवेश्वर मार्ग-काल, आज आणि उद्या, ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे नाम फाउंडेशन आणि सामाजिक भान, पद्मश्री डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचे स्वामी विवेकानंद अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर माधव जोशी यांचे साखर, चहा, कापूस, लोणचे, पापडी, बेकरी उत्पादन आदी सेवनाचे दुष्परिणाम, ज्येष्ठ छायाचित्रकार संदेश भंडारे यांचे लोककलांचा दृष्यानुभव, डॉ. अजित आपटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन, डॉ. हेमंत ओस्तवाल निरामय आरोग्य, नमिता कोहोक यांचे सकारात्मक दृष्टीकोन, डॉ. रवींद्रकुमार सिंगल कायदा सुव्यवस्था रक्षण आणि जनतेचा सहभाग, प्रा. मिलिंद मुरुगकर नोटाबंदीचा फायदा आर्थिक क‌ी फक्त राजकीय, विजया रहाटकर महिलांवरील अत्याचार आणि समाजाची मानसिकता, डॉ. राजीव शारंगपाणी तणावमुक्त आनंदी जीवन, प्रसाद पवार यांचे फोटोग्राफी कशी कराल, ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांचे उजळू द्या रान सारे, प्रा. डॉ. अविराज तायडे यांचा कृष्णसुतपर किरपा करा हा बंदिशीवर आधारित कार्यक्रम, दत्ता भालेराव यांचे नाशिकमधील पर्यटनाच्या संधी विषयावर, डॉ. दिनेश शिरुडे यांचे सत्यपिता गांधी विषयावर व्याख्यान पार पडले. त्यानंतर व्याख्यानमालेच्या अखेरच्या आठवड्यात २६ मे रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रकट मुलाखत, कॅलिग्राफर नंदू गवांदे यांचे अक्षरलेखन संवादाचा दुवा, प्रा. हेमंत मथुरा विश्वनाथ यांचे गांधी-सावरकर-आंबेडकर गुंफण की गुंता?, राधा बोर्डे यांचे दृष्टीबाधित महिलांच्या समस्या आणि पुनर्वसन, तृप्ती देसाई यांचे स्त्री-पुरुष समानता व्याख्यान पार पडले. शेवटच्या दिवशी, बुधारी डॉ. मुकुंदराज महाराज यांच्याकडून नाशिकरांना शक्ती उपासनेचे मर्म हा विषय जाणून घेता आला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनात परमत्त्वाची जाणीव होण्याची गरज

$
0
0



पंचवटी : माणसाने अंतरात्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यास अनुभूती मिळते. त्यावेळी माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. जीवनात अनुभूतीची, परमत्त्वाची जाणीव होण्याची गरज असते, असे प्रतिपादन धुळे येथील आनंदवन संस्थान सोनगीरचे मठाधिपती डॉ. मुकुंदराज यांनी केले. नाशिक वसंत व्याख्यांनमालेच्या समारोपप्रसंगी ते ‘शक्ती उपासनेचे मर्म’ या विषयावर बोलत होते. व्याख्यानमालेच्या समारोपात व्याख्यानमालेच्या उपक्रमात सहभागी व्यक्तीचा, महापालिका प्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ठ श्रोता म्हणून सुधाकर चव्हाण, तरुण श्रोता म्हणून अदैत गोसावी, महिला श्रोता म्हणून पुष्पां कुलकर्णी, विशेष श्रोता म्हणून नारायण करमासे यांचा सत्कार करण्यात आला. परमत्त्वाची जाणीव प्रत्येकाला वेगवेगळ्या वयात येते. तसेच तो अनुभव वेगळ्या प्रकारातून येतो. तुमच्या आत काही वेगळे आहे याची जाणीव व्हायला हवी. माजी आरोग्य मंत्री डॉ. शोभा बच्छाव, अॅड. अशोक खुंटाडे, श्रीकांत बेनी, चंद्रशेखर शाह, संगीता बाफना आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक महिलेने चोरले दुकानातून दागिने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्राहक म्हणून आलेल्या महिलेने व्यावसाय‌कि महिलेच्या पर्समधील एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या व तीन हजार रुपयांची रोकड लांबविल्याची तक्रार भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. एक लाख तीन हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

शांताबाई लहानू दाते (रा. सदगुरू कॉलनी, इंदिरानगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचे काठेगल्लीतील बरखा सोसायटीत साडीविक्रीचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी एक महिला ग्राहक आली. तिने साड्या बघण्याचा बहाणा करून दाते यांच्या पर्समधील सोन्याच्या ४१ ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या, तीन हजार रुपये रोख व महत्त्वाचे कागदपत्रे असा सुमारे एक लाख तीन हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कापड दुकानात चोरी

बंद कापड दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रकमेसह महागड्या साड्या व ड्रेस मटेरियल असा सुमारे ३५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पियूश रमन‌किलाल थानकी (रा. प्रभातनगर, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे मखमलाबाद लिंकरोडवरील चाणक्य सोसायटीत दुकान आहे. चोरट्यांनी शुक्रवारी रात्री दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ही चोरी केली. शटर वाकवून चोरटे दुकानात शिरले. गल्ल्यातील पाच हजार ५०० रुपयांसह २७ साड्या व ड्रेस मटेरियल असा सुमारे ३५ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोघांना अटक

राजरोसपणे बेकायदेशीररित्या अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या प्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील नामदेव धनगरे (रा. चिंचओहळ, ता. त्र्यंबक) आणि मंगेश रमेश शेलार (रा. तलावाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी संशय‌तिांना पोलिसांनी गजाआड केले. व्हिडीओ गल्लीतील कोपऱ्यावर दोघे ओली भांग विक्री करीत होते. पोलिसांनी छापा टाकला असता दोघे आढळले. या कारवाईत १ हजार ११० रुपये किमतीची २९० ग्रॅम ओली भाग व ४१० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूर्ववैमनस्यातून हत्येची शक्यता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी तालुक्यातील कोकणगांव खुर्द गावातील शेळके कुटुंबीयात आई, वडील व मुलगा यांचा धारदार शस्त्राने मंगळवारी रात्री (दि. ३०) खून झाल्याची घटना घडली आहे.

शेळके यांचा दुसरा मुलगा सोमनाथ घरी परतला तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता. घरातील लाइट सुरू होते. टीव्हीचा आवाज जोरात सुरू होता. सोमनाथने घरात प्रवेश केला तर कुणीच दिसेना म्हणून तो स्वयंपाक खोलीकडे निघाला. तेव्हा खोलीच्या दाराच्या उंबऱ्यावर हर्षद (२०) पडलेला अवस्थेत दिसला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. सोमनाथने त्यास हलविले असता तो हालचाल करीत नव्हता. सोमनाथने शेजारी राहत असलेले चुलते व चुलत भाऊ यांना घटनेची माहिती दिली. ते सर्वच कुटुंब धावत घरात आले. चुलत भाऊ सचिनने काका जगन्नाथ शेळके यांना मोबाइल लावला तर स्वयंपाक खोलीतून मोबाइलच्या रिंगला आवाज आला. सर्व आवाजाच्या दिशेने धावत आत गेले असता त्या खोलीतील पाईप अस्ताव्यस्त पडलेले होते. सोमनाथचे वडील जगन्नाथ (४५) जमिनीवर पडलेले होते. त्यांच्याही डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होता. दुसऱ्या खोलीच्या कोपऱ्यात आई शोभा (४२) ही पडलेली दिसली. तिच्या डोक्यातूनही रक्त वाहात होते.

तिघांचीही हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने घटनेची कोकणगावातील पोल‌सि पाटलांना तातडीने माहिती देण्यात आली. त्यांनी वणी पोल‌सिांना कळविले. त्यानंतर दाखल झालेल्या पोलिसांनी चौकशी सुरू करीत त‌न्हिी मृतदेह विच्छेदनासाठी नाशिक येथे हलविले. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ५ ते रात्री १० दरम्यान काय घडले असेल, हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून घडला याचा तपासासाठी ग्रामीण पोलिसांची पथक गावात तळ ठोकून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा कर्मचाऱ्याचा रामवाडीमध्ये खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

खून प्रकरणांनी पंचवटी परिसर हादरून गेलेला असताना रामवाडी परिसरात पुन्हा एका तरुणाची हत्या झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. रामवाडी येथील कोशिरे मळ्याजवळ गोदावरी नदीपात्रात ३५ ते ४० वर्षीय तरुणाचा डोक्यात, पाठीवर आणि पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याचे समोर आले आहे.

अरुण अशोक बर्वे (रा. स्नेहल पार्क, उदय कॉलनी, बच्छाव हॉस्पिटलजवळ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून पश्चिम विभागात कार्यरत आहे. त्याचे द्वारका परिसरात चटकदार या नावाचे हॉटेल असल्याचे समजते. त्याच्या हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पंचवटी परिसरातील रामवाडी येथील कोशिरे मळा परिसरात गोदावरी नदीपात्रात तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचा फोन पंचवटी पोलिसांना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. तरुणाच्या पोटात, डाव्या हातावर, डोक्यात आणि पाठीवर तीक्ष्ण हत्याराने अनेक घाव घालून हत्या केल्याचे निदर्शनास आले. डाव्या हाताच्या बगलेतील त्वचा जळाल्यासारखी दिसून आली. तसेच घटनास्थळी अर्धवट जळालेला चष्मा, मोबाइल कव्हर, की-पॅड, रक्ताचे डाग दिसून आले आहे. विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, निरीक्षक आनंद वाघ, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड आदींसह पंचवटी, सरकारवाडा, म्हसरूळ आदी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोथ पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

शहरावर दहशतीचे सावट

पंचवटी परिसरात एकापाठोपाठ एक हत्यांचे सत्र सुरू आहे. एका हत्येचा तपास पूर्ण होतो नाही तोच तोच आणखी एखादी हत्या झाल्याचे उघड येत असल्याने पोलिस प्रशासन अडचणीत आले आहे. सामान्य नागरिकांकडूनही पोलिस प्रशासनाच्या अशा कामाच्या पद्धतीचा नाराजी व्यक्त केली जात आहे. या हत्यासत्रांमुळे नाशिक दहशतीच्या सावटाखाली आल्याचे चित्र दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’ला पुस्तिकेतूनही होणार विरोध

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविणाऱ्या ‘समृद्धी कुणाची? शेतकऱ्यांची की सरकारची?’ या पुस्त‌किेचे प्रकाशन गुरूवारी (दि. १) करण्यात येणार आहे. शेतकरी संपाचे औचित्य साधून सीबीएस येथील हुतात्मा स्मारकात दुपारी १२ वाजता पुस्त‌किेचे प्रकाशन होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

राज्य किसान सभेच्या वतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कौन्सिलचे सेक्रेटरी डॉ. भालचंद्र कानगो यांच्या हस्ते पुस्त‌किेचे प्रकाशन होणार आहे. यावेळी समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थ‌ति राहणार आहेत. राज्यातील शेतकरी १ जून रोजी संपावर जात आहेत. संपातील मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात येणार आहेत. किसान सभा आणि समृध्दी बाधित शेतकरी या संपामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, समृध्दी महामार्ग रद्द करावा, शेतकऱ्यांना आठ तास मोफत वीज द्यावी, मोफत ठिबक सिंचन सुविधा पुरवावी, दुधाला ५० रुपये लिटर हमीभाव द्यावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांचे वीजबील माफ करावे, आदी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी किसान सभेचे कार्याध्यक्ष राजू देसले यांच्यासह भास्कर शिंदे, देवीदास भोपळे, सोमनाथ वाघ आदी उपस्थ‌ति राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’विरोधात कोर्टात लढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या विरोधात हायकोर्टात जाण्याचा निर्णय समृद्धी महामार्ग संघर्ष समितीने घेतला आहे. जिल्ह्यातील बाधित शेतकरी कोर्टाची पायरी चढणार असून ५ जून रोजी हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे महामार्गाच्या कामाला विलंब होण्याची शक्यता बळावली आहे.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. परंतु, या महामार्गाला ठिकठिकाणी विरोध होत असून जमिनी देण्यास शेतकरी तयार नाहीत. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा तिढा सोडविला जाईल, शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी देऊनही विरोधाची‌ धार कमी झालेली नाही. खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाला समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला.

राज्यपालांनाही शेतकरी संघर्ष समितीने आपल्या मागण्यंबाबतचे निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांना उद्‍ध्वस्त करणारा समृद्धी महामार्ग नको अशी विनंती त्यामध्ये करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाला सर्वतोपरी विरोध करूनही आणि हरकती नोंदवूनही सरकार दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे कोर्टाची पायरी चढून तेथेच न्याय मागावा, या निर्णयापर्यंत शेतकरी पोहोचले आहेत. मे महिन्यात कोर्टाला सुट्या होत्या. परंतु, आता कोर्टाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले असून पाच जून रोजी समृद्धी महामार्गा विरोधात शेतकरी याचिका दाखल करणार आहेत. शेतकऱ्यांना या जमिनींचा मोबदला देऊन लवकरात महामार्गाचे काम सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, शेतकरी कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याने आता या महामार्गाच्या कामकाजाला वेळ लागण्याची शक्यता बळावली आहे.

औरंगाबादमध्ये वाचणार तक्रारींचा पाढा

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही ‘समृद्धी’च्या लढ्यात उडी घेतल्याने राज्य सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. १२ जून रोजी केवळ समृध्दी महामार्ग या विषयावर औरंगाबाद येथे पवार यांनी बैठक बोलावली आहे. यात समृद्धी शेतकरी संघर्ष समितीच्या दहा जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील समितीचे पदाधिकारीही या बैठकीत सहभागी होणार आहेत. यावेळी अन्य जिल्ह्यातील समृद्धीबाधित गावांमधील शेतकरीही उपस्थ‌ति राहणार आहेत. जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाकडून सुरू असलेल्या अन्यायाचा पाढा या बैठकीत वाचून दाखविण्यात येणार आहे. या महामार्गाबाबत शेतकऱ्यांनी कोणकोणत्या हरकती नोंदविल्या त्याची माहिती असलेली फाईलही या बैठकीत सादर केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन इंडियामुळे अनेक संधी’

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

मेक इन इंडिया या सरकारच्या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू होत आहेत. यातून एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संधींचे मोठे दालन खुले होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात आवर्जून करिअर करावे, असा सल्ला करिअर तज्ज्ञांनी दिला.

भोसला कॉलेजच्या मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये एमबीए आणि एमसीए या शिक्षण क्षेत्रात करिअर करू पहाणाऱ्या विद्यार्थांसाठी कार्यशाळा झाली. यात एमबीए, एमसीए प्रवेशप्रक्रिया, मेक इन इंडियामध्ये एमबीएच्या संधी, एमबीए अभ्यासक्रम, एमबीएनंतर परदेशी नोकरीच्या विविध संधी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुंजे इन्स्टिट्यूटचे डॉ. श्रीराम झाडे, प्रा. नितीन चौधरी, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. अपर्णा हवालदार आदी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

प्रवेशासंबंधी मार्गदर्शन

प्रा. महेश कुलकर्णी यांनी सांगितले, की एमबीए व एमसीए प्रवेशासाठी सीईटी देणे अनिवार्य आहे. एमबीएसाठी होम यूनिर्व्हसिटीमधून पदवी असणे बंधनकारक असते. तसे नसेल तर एमबीए प्रवेशासाठी निश्चिती देता येत नाही. कॅप राउंडद्वारे प्रवेश घेतल्याने विविध शिष्यवृत्ती मिळण्यास फायदा होतो, असे त्यांनी सांगितले. प्रवेश प्रक्रियेतील फ्लोट, फ्रीज व स्लाईडबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

‘एमसीए’साठी कॉम्प्युटर लॅग्वेज महत्त्वाच्या

एमसीए क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थांना कॉम्प्युटरशी निगडीत विविध भाषांचे ज्ञान अनिवार्य असते, असे प्रा. अपर्णा हवालदार यांनी सांगितले. अशा भाषांच्या माध्यमातून आपण परदेशात व्यवसाय करू शकतो. एमसीएच्या माध्यमातून फ्रान्स आणि जर्मनीमध्ये जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच कम्युनिकेशन स्किल्सदेखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन

प्रा. नितीन चौधरी यांनी एमबीएच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती देतांना सांगितले, की या अभ्यासक्रमात काही विषय अनिवार्य तर काही पर्यायी असतात. पर्यायी १६ विषयांमधून कुठल्याही चार विषयांची निवड करता येते. मार्केटिंग, एचआर, टेक्नॉलॉजी, टूरिझम, डिफेंस आणि यासारखे अनेक कोर्स उपलब्ध आहेत. एमबीए अभ्यासक्रमात १० विषय स्किल्स डेव्हपमेंटशी निगडीत असतात. दोन वर्षाच्या या अभ्यासक्रमात एकूण ३८ विषय पास होणे अनिवार्य असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images