वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (एनईईटी) सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी रद्द केली. ही परीक्षा लागू करण्यास नाशिकमधील पालकांनीही विरोध करीत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला तरी विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागले आहे.
↧