Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्ह्यात वृक्षवल्ली बहरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चालू वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीला बऱ्यापैकी यश आल्याने पुढील तीन वर्षांत जिल्ह्यात तब्बल दीड कोटींहून अधिक वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले. पहिल्या टप्प्यांत २०१७ मध्ये १५ लाख ५३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

पर्यावरण प्रदूषणामुळे होणारा धोका दूर करण्यासाठी वृक्ष लागवड हाच सर्वात्तम पर्याय आहे. म्हणूनच सरकारने वृक्ष लागवडीवर भर दिला आहे. जुलैमध्ये सरकारने राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. तब्बल २९ लाख वृक्ष लागवड करून नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला होता. यापैकी ९३ टक्के रोपे जगल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आता पुन्हा सरकारने पुढील तीन वर्षांसाठी जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी याबाबतची बैठक घेतली. राज्य सरकारच्या ३३ विभागांच्या १०० कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापैकी बहुतांश विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. मोकळे सरकारी भुखंड, गायरान यांसारख्या जमिनी वृक्ष लागवडीसाठी या विभागांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला वृक्ष लागवडीची आणि संवर्धनाबाबतचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, प्रत्येकाला जबाबदारी निश्चित करून देण्यात येणार असल्याची माहिती राधाकृष्णन यांनी दिली. त्या त्या तालुक्यांमध्ये प्रांत आणि तहसीलदारांवर वृक्ष लागवड नियोजनाची आणि संवर्धनाची जबाबदारी असणार आहे. लागवडीसाठी कोणत्या विभागाला कोणत्या प्रकारची किती रोपे लागतील याची माहिती या महिनाअखेरपर्यंत सादर करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना दिले आहेत.

चालू वर्षात जुलैमध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेत नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर राह‌िला. पुढील तीन वर्षात एक कोटी ५३ लाख ११ रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्टे आहे. दरवर्षी १५ जून ते जुलै या कालावधीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची जबाबदारी निश्चित करून दिली जाणार आहे.-
-राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये रविवारी साहित्य संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साहेब बहुउद्देशीय सामाजिक मंच आणि धीरज पगारे वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २५ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर चौक, उपनगर येथे जिल्हास्तरीय फुले शाहू आंबेडकर विचार दुसरे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी १०.३० वाजता ग्रंथपूजन व साहित्यपूजन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद‌्घाटन होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. नीलकांत चव्हाण, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. भास्कर म्हरसाळे, स्वागताध्यक्ष नगरसेवक राहूल दिवे आणि प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब भालेराव, प्रदूषण विभागाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, उमेश गायधनी यांची उपस्थिती राहणार आहे.

रघुनाथ राठोड यांना नाशिक भूषण पुरस्कार पुरस्कार, शंकर साबणे यांना बी. आर. आंबेडकर रत्न पुरस्कार, माजी मंत्री बबन घोलप यांना शाहीर आण्णा भाऊ साठे, मोहन अढांगळे यांना धम्मभूषण पुरस्कार, पी. कुमार धनविजय यांना समाजरत्न, संजय काळे यांना कर्मवीर भाऊराव पाटील, तर सुनील ढगे यांना नाट्यकला भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी पहिलवान सावळीराम दोंदे यांना शंकर गायकवाड पुरस्कार तर भारत पुजारी, रामचंद्र खोब्रागडे, विलासराज गायकवाड, बाळासाहेब आव्हाड, डॉ. कैलास गोठुळे, प्रवीण काळोखे, अविनाश आहेर यांना साहित्यिक बाबुराव बागूल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शारदा दोंदे यांना मुक्ताबाई साळवे, कवी विलास गोडसे यांना राजर्षी शाहू महाराज, विजय जाधव यांना कामगार भूषण पुरस्कार तर संजय चव्हाण व मंगला चव्हाण यांना राष्ट्रसंत गाडगे महाराज पुरस्कार देण्यात येणार आहे. छत्रपती शिवराय पुरस्कार शिवदास मोगल, सावित्रीबाई फुले पुरस्कार अलका पवार यांना तर लोककवी वामदादा कर्डक पुरस्कार नवनाथ आव्हाड यांना, लावणीसम्राज्ञी पुरस्कार मनिषा नागपुरे यांना देण्यात येणार आहे.

या संमेलनात दोन परिसंवाद होणार असून ‘फुले शाहू आंबेडकर विचार काळाची गरज’ या परिसंवादाचे सूत्रसंचालन अशोक भालेराव करतील. अध्यक्षस्थानी रघुनाथ राठोड राहतील. प्राचार्य के.मा.मोरे, प्रा. जावेद शेख आणि समाजसेविका नीलिमा साठे यांचा सहभाग राहिल. ‘आरक्षण मोर्चे, प्रतिमोर्चे का निघतात’ या परिसंवादाचे सूत्रसंचालन ब्रीज परिहार करणार असून अध्यक्षस्थानी डॉ. शंकर बोऱ्हाडे राहतील. डॉ. गोरखनाथ वाकळे, अनिल मनोहर, पुंजाजी मालुंजकर व उध्दव गांगुर्डे यांचा त्यात सहभाग राहिल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाणेनिधीच्या नावे फसवे ई-मेल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सायबर क्राइमचे प्रमाण वाढतेच असून, फसवणुकीच्या केसेस दिवसागणिक उघड होत आहेत. त्यात आता चलनबदलामुळे अनेक जण धास्तावले असून, बहुतांश नागरिक आता ऑनलाइन व्यवहार करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यात अनेकांनी विविध प्रकारचे मेल आयडी निर्माण करून व्यवहार करणे सुरू केले आहे. असे असताना ई-मेलद्वारे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथील वॉशिंग्टन शहरात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) नावाचा गैरवापर करीत ई-मेलधारकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत.

या ई-मेलद्वारे ग्राहकांची माहिती काढून घेण्यात येत आहे. तुमच्या फंडाची रक्कम प्रचंड रक्कम प्रमाणात असून सुरक्षा कारणांमुळे रिझर्व्ह बँक फंड व्यवहार यांच्यात शंभर टक्के गोपन‌ियता ठेवण्यात आली आहे. आपली माहिती सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. अशा फसव्या इमेलद्वारे आपल्या बँकेच्या खात्यांची माहिती मिळवत आपल्या खात्यातून पैशांचा अपहार करण्यात येत आहे. claim.un33@gmail.com

या ई-मेलद्वारे आपले संपूर्ण नाव, पत्ता, लिंग, वय, वार्षिक उत्पन्न, राज्य, मोबाइल नंबर, व्यवसाय, स्थिती, खाते नाव, खाते क्रमांक, बँकेचे नाव व आयएफसी कोडची मागणी करण्यात येते व आपल्या खात्यातून सरळ व्यवहार केले जातात. अशी कुठलीही माहिती मागविल्यास त्याला रिप्लाय करू नये, असा सल्ला अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. आयएमएफ ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणाऱ्या अर्थशास्त्रीय धोरणांवर पाठपुरावा करावयास लावून जागत‌िक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तिचा प्रत्यक्ष नागरिकांशी काहीही संबंध नसतो.

तसेच या मेलद्वारे येणाऱ्या पत्रावर थेट इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या संचालक मंडळातील सदस्या मीना पटेल यांचे नाव असून, असे कुठले अधिकारी कार्यरत आहेत की नाही याबाबतही साशंकता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. २०१६ या वर्षाच्या सुरुवातीलाही असेच बनावट मेल आरबीआयच्या नावे अनेकांना आले होते. त्या धर्तीवर रिझर्व बँकेऐवजी आता इंटरनॅशनल मॉनेटरी फंड या संस्थेच्या नावाचा गैरवापर केला

जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन संचालकांचे पद रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेवरील कारभारी गांगुर्डे आणि भीमराज काळे या दोन संचालकांचे पद जिल्हा उपनिबंधकांनी रद्द केले आहे. परिणामी, संचालक मंडळ अल्पमतात आले आहे. या मंडळावर प्रशासक नेमला जाणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

टीडीएफ पॅनलचे अपात्र ठरलेले पतसंस्थेचे माजी चेअरमन आर. डी. निकम यांचे समर्थक प्रवीण पवार आणि समीर जाधव यांनी गांगुर्डे आणि काळे यांच्या विरोधात उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती. या दोन्हीही संचालकांचे सभासदत्व दोन ठिकाणी असण्यावर त्यांनी आक्षेप नोंदविला होता. उपनिबंधकांनी या तक्रारीची दखल घेत कारवाई केल्याने आता नऊ संचालक राहिले आहे. परिणामी, संचालक मंडळावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक नेमला जाणार असल्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकुचित राष्ट्रावादाविरुद्ध लढा हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवाद या संकल्पनेचा अत्यंत संकुचित पद्धतीने विचार केला जातो आहे. देशात देशप्रेम न रुजता राष्ट्रद्रोह उफाळून आला असून, या राष्ट्रवादाला उघडे पाडण्यासाठी जनआंदोलन होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नर्मदा आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी केले. परशुराम साईखेडकर वाचनालयात नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनियनतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. गुरुवारी आयोजित केलेल्या व्याखानाचे हे ३६ वे पुष्प होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ लेखिका सुलभा ब्रह्मे, अनुभव मिश्रा, कामगार नेते एस. आर. कुलकर्णी यांना आदरांजली वाहण्यात आली. पाटकर म्हणाल्या, की राष्ट्रवाद या संकल्पनेचा अत्यंत संकुचित पद्धतीने विचार केला जातो आहे. त्या पलीकडचा विचार होण्याची आवश्यकता आहे. सत्तेवर असलेले राजकारणी या बाबींना जबाबदार असून, त्यांनीच वाद चिघळवत ठेवण्याचे काम केले आहे. राष्ट्रात जातिवादाचे निर्मूलन होणे आवश्यक असून, सर्वधर्मसमभाव रुजणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भेदभाव कमी होऊन समता आणि बंधुता रुजली तरच देशाची प्रगती होईल. सध्याचे राजकारणी गैरमार्गाने शासन करत असून, घटनेची पायमल्ली करण्याचे काम होत आहे. लोकशाहीचा अवलंब न करता तिचा गळा घोटण्याचे काम सध्या सुरू असून, नोटशाही महत्त्वाची ठरते आहे. घटना पायी तुडवणाऱ्यांची संख्या वाढत असून, धर्माच्या नावाचे जंजाळ उभे करत हिंसक प्रकारांना खतपाणी घालण्याचे काम शासनकर्त्यांकडून होते आहे. हिंसक कारवायांमुळे आज देश अधोगतीला चालला आहे. सध्या तर दलितांच्या अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जातीयवादाचे डोंब उसळवण्याचे काम सुरू आहे. जाती आणि धर्माच्या जोरावर वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रकार सध्या जास्त प्रमाणात रुजतो आहे. सध्याचे सरकार शिक्षणापेक्षा युद्धावर जास्त प्रमाणात खर्च करते आहे. राष्ट्रापुढे आव्हाने फार आहेत; परंतु त्यावर विचार करण्यास कुणाला वेळ नाही. या राष्ट्रवादाला उघडे पाडण्यासाठी जनआंदोलन होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हॉकर्स युनियनचे जावेदभाई शेख यांनी संस्थेचा परिचय करून दिला. या वेळी सुनील संधानशिव व शांताराम चव्हाण उपस्थित होते. सचिन मालेगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाकडूनच हेळसांड

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com
@jitendratartemt

नाशिक : केवळ एकट्या नाशिक जिल्ह्यातील लोकसंख्येचा आलेखच जवळपास पाऊण कोटींवर पोहोचला आहे. किमान इतक्या मोठ्या जनसंख्येच्या आरोग्य सुविधांचा अभ्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून होत नसल्याची नाराजी शहरातील मान्यवर तज्ज्ञ आणि जनतेच्या विविध स्तरातून व्यक्त होते आहे.

राज्यात इतर विभागांमध्ये भौगोलिक वातावरणाचा स्थानिक जनतेच्या आरोग्यावर होणारा परिणाम त्या विभागातील काही संस्था अभ्यासतात. मात्र, जनतेच्या आरोग्य रक्षणाचा विडा उचलणारे विद्यापीठ या प्रतिज्ञेकडे पाठ फिरवत असल्याचा आरोप आहे. देश- विदेशात आरोग्य शिक्षणाचे धडे देणाऱ्या आरोग्य विद्यापीठाकडून स्थानिक जनतेच्याही विशेष अपेक्षा आहेत. जीवनशैलीशी निगडित आजारांना आता कुठलेही शहर अपवाद नसले तरीही स्थानिक भौगोलिक कारणांमुळे उद््भवणाऱ्या आरोग्यविषयक आव्हानांचा अभ्यास अन् विश्लेषण आरोग्य विद्यापीठाने करावे ही जनतेची अपेक्षाही रास्तच आहे. स्थानिक जनतेच्या आरोग्यविषयक सूक्ष्म नोंदीही सरकारला वेळोवेळी पुरविल्या जाणे अपेक्षित आहे. मात्र, पंचवार्षिक बृहद आराखड्यात केवळ जनसंख्या आणि डॉक्टरांच्या संख्येचे गुणोत्तर मांडण्यापुरताच विद्यापीठ मर्यादेत राहत असल्याचा तज्ज्ञांचा आक्षेप आहे.

थिंक टँक पुन्हा हरवला

सन २०१२-१३ ते २०१६-१७ दरम्यानच्या बृहद आराखड्यात या विद्यापीठाने ‘थिंक टँक’ची पुनर्स्थापना केली होती. मात्र, पंचवार्षिक योजना बदलूनही या संकल्पनेच्या उत्पादकतेबाबत जनता अद्याप अनभिज्ञ आहे. केवळ सरकारी अजेंड्याच्या अंमलबजावणीपलीकडे विद्यापीठ जाऊ शकलेले नाही. या थिंक टँकअंतर्गत सामाजिक आरोग्याशी निगडित माहितीचे संकलन, विश्लेषण आणि जनप्रबोधन होणे अपेक्षित होते; पण जनमानसात अपवादानेच विद्यापीठ मिसळू शकल्याचे वास्तव आहे.

उपलब्ध तज्ज्ञांची मोट बांधावी

शहरात आरोग्यसेवेतील ख्यातनाम तज्ज्ञ कार्यरत आहेत. अनेकांची या सेवेत हयातही गेली आहे. अनेक तज्ज्ञांची आरोग्यविषयक व्याख्याने आणि शोधनिबंध इंटरनॅशनल मेडिकल जर्नलमध्ये नियमित प्रसिद्ध होतात. जनआरोग्यासाठी उपयुक्त कंटेंटचे संकलन विद्यापीठाकडून व्हावे. त्यांच्या आशयाच्या पुस्तिका किंवा ई-माहितीचा प्रचार-प्रसार जनतेसाठी व्हावा. त्यांचे परिसंवाद अन् व्याख्यानेही विद्यापीठाने वजनदार वलयाचा उपयोग करून आयोजित करावीत, अशी मागणी आहे.

सादर व्हावा नाशिकच्या आरोग्याचा अभ्यास

आरोग्य विषयक अभ्यासाची एक दिशा पकडून स्थानिक जनतेच्या आरोग्याचा अभ्यास विद्यापीठाकडून होण्याची अपेक्षा जनतेत आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचना बघता येथे संमिश्र लोकसंख्या आहे. पायाभूत सुविधा अन् भौगोलिक कारणांमुळे स्थलांतर करणारे आदिवासी, निमशहरी आणि शहरी असणारा लोकसंख्येचा एक हिस्सा आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना वर्षानुवर्षे करणारा जिल्ह्याचा भाग दृष्टिक्षेपात आहे. या स्तराचा आरोग्य आलेख सरकारदरबारी मांडला गेल्यास नवी धोरणेही अमलात आणता येणे शक्य आहे. त्यासाठी आरोग्य विद्यापीठाने गती घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्तन, पूर्वचारित्र्य पडताळणी ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर नागरिकांना सरकारी कामकाजाकरिता लागणारे विविध प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले आहेत. त्यात प्रामुख्याने वर्तन व पूर्वचारित्र्य पडताळणी या पोलिस विभागाशी संबंधित असलेल्या सुविधेचा अंतर्भाव आहे. वर्तन व पूर्वचारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे सरकारी- निमसरकारी, तसेच खासगी क्षेत्रात सक्तीचे करण्यात आलेले आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वर्तन व पूर्वचारित्र्य पडताळणीसाठी प्रथम आडगाव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात येऊन कागदपत्रे जमा करावी लागत असे. यानंतर संबंधित पोलिस स्टेशनकडून अर्जदाराची पडताळणी होईल. या खटाटोपानंतर वर्तन व पूर्वचारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र नागरिकांना मिळत असे. या प्रक्रियेसाठी सामान्य नागरिकांना होणारा त्रास व लागणारा अवधी या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना http://aaplesarkar.maharashtra.gov.in तसेच http://pcs.mahaonline.gov.in या वेबसाइटवर लॉगइन करून अर्ज सादर करावयाचा आहे.

या सुविधेचा प्रारंभ नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जलसंपदा व लाभक्षेत्र विकास महामंडळ तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे, अशोक मुर्तडक, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आदी उपस्थित होते.

पोलिसांतर्फे मार्गदर्शन

वर्तन व पूर्वचारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे सरकारी- निमसरकारी, तसेच खासगी क्षेत्रात सक्तीचे करण्यात आले असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना हे प्रमाणपत्र, क्लीअरन्स सर्टिफिकेट अब्रोड या सेवा ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर उपलब्ध झाल्या आहेत. या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे आणि नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी वर्तन व पूर्वचारित्र्य पडताळणी ऑनलाइन सुविधेबाबत मार्गदर्शन करून नागरिकांनी या प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सामूहिक’ करंट खात्यामुळे नोटा तस्करी!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet: @ArvindJadhav

नोटांची टक्केवारीनुसार अदलाबदल करणारे एजंट करंट खात्यांचा खुबीने वापर करीत आहेत. करंट खात्यातून आठवड्यातून ५० हजार रुपये काढता येत असल्याचा फायदा घेत काही व्यावसायिकांनी सामूहिक पद्धतीने नवीन चलनी नोटांचा मोठा स्टॉक केला. काळा पैसाही करंट खात्यातून जिरवला जातो आहे. इन्कम टॅक्स व पोलिस विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सर्वसामान्यांना पैशांची कमतरता भासत असताना नोटांची तस्करी करणाऱ्यांकडे मात्र लाखो रुपये सापडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या संबंधित काम करणाऱ्या विभागाच्या एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले, की काही व्यावसायिक सामूहिक पद्धतीने करंट खात्याचा खुबीने वापर करीत आहेत. करंट खात्याचा वापर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने त्याद्वारे आठवड्याला ५० हजार रुपये काढण्याची अनुमती सरकारने दिली होती. यामुळे तस्करीसाठी काम करणाऱ्या सात ते आठ जणांना मिळून आठवड्याला किमान चार लाख रुपये काढणे शक्य होते. एका व्यापाऱ्याचे वेगवेगळ्या बँकांमध्ये दोन ते तीन करंट खाते असू शकतात. यात हातउसने वा इतर मार्गाने आलेले पैसे मिळवून जुन्या नोटा बदलून देण्याचा उद्योग केला जातो आहे. जुन्या नोटा बदलून देण्यासाठी २० ते २५ टक्के कमिशन घेऊन नंतर त्याचे वाटप केले जाते.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोव्हेंबर महिन्यातील सुरुवातीचे काही दिवस वगळता बऱ्याच ठिकाणी व्यवहार सुरळीत झाले. मात्र, जुन्या नोटा बदलून देणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट झाल्याने पैशांचा ओघ त्यांच्याकडे वळला. करंट खात्यासह पोस्ट ऑफिस कार्यालयातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेण्याचे काम सुरू झाल्याने पैशांचा तुटवडा भासू लागला. शहरातील काही सराफ, भद्रकालीतील काही व्यावसायिक, याशिवाय बांधकाम व्यावसायिक या पद्धतीने काम करीत असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला.

दरम्यान, करंट किंवा बचत खात्यात पाच हजारांपेक्षा जास्त जुन्या नोटांचा भरणा होणार नाही, तसेच या पैशांचेही स्पष्टीकरण देण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले असून, त्यामुळे तस्करीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

मोठी उलाढाल उघडकीस

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ३० लाखांची रोकड बाळगणाऱ्या चौघांना रविवारी पोलिसांनी अटक केली. मात्र, दुर्दैवाने त्याच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी शहरात मोठ्या रकमेची उलाढाल झाली असून, ही माहिती आता समोर येत आहे. याविषयी अधिक बोलण्यास संबंधित अधिकाऱ्याने असमर्थता दर्शवली असली तरी तपास मात्र सुरू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घसा सुकला, सूरही विरले, पण पालकमंत्री येईनात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गाणी म्हणून विद्यार्थ्यांचा घसा सुकला. तबला वादकाचा हात दुखू लागला. संवादिनीचे सूरही नरमले. चारोळ्यांद्वारे आदर्श शिक्षकांबद्दलचे गुणगाणही गाऊन झाले, तरीही पालकमंत्री येईनात...! इतकेच नव्हे, तर पुरस्कार मिळण्यापूर्वीच गुणवंत शिक्षकांनी आपले मनोगतही उरकून घेतले. मात्र पालकमंत्र्यांचे दर्शन काही घडेना. महाजनसाहेब, आपण कधीतरीच नाशिकमध्ये येता. कार्यक्रमांनाही तेवढे वेळेवर पोहोचता आले तर बघा अशी भावना कालिदास कलामंदिरात व्यक्त न झाली तर नवलच.

पालकमंत्री गिरीश महाजन फारसा वेळ देत नाहीत अशी तमाम नाशिककरांची रास्त तक्रार आहे. मात्र मंगळवारचा दिवस महाजन साहेबांनी नाशिकसाठी राखून ठेवल्याने नाशिककर खूश झाले. गेल्यावर्षी पालकमंत्र्यांची वेळ मिळाली नाही म्हणून महापालिकेच्या शिक्षण मंडळाने गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळाच पुढे ढकलण्याचा ‘आदर्श’ प्रस्थापित केला. अखेर तो सोनियाचा दिनु आला. पालकमंत्र्यांकडून कौतुकाची थाप मिळणार असल्याने पुरस्कारार्थी खूश होते. कुटुंबीय आणि स्नेहीजनांसह दुपारी दीडपासूनच त्यांनी कालिदास कलामंदिरात जागा पटकावली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या प्रतीक्षेत लोकांमध्ये चुळबुळ सुरू झाल्याने निवेदकांनी मग पुरस्कारार्थी शिक्षकांना मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर निमंत्रित केले. मनोगते संपलयांनतर मग विद्यार्थ्यांना व्यासपीठावर उभे केले. बिचारी मुले अर्धा पाऊण तास ताटकळत थांबली. शिक्षकांवरील चारोळ्या सादर करण्याची शक्कल लढविली. पालकमंत्री नियोजित वेळेपेक्षा तब्बल सव्वातीन तास उशिराने कार्यक्रम स्थळी पोहोचले. तोपर्यंत पुरस्कारार्थींचा उत्साह मावळला होता अन् कपड्यांची कडक इस्तरीही कौतुकाची थाप पाठीवर पडण्यापूर्वीच चुरगळली होती.

प्रतीक्षेमुळे सभागृहही देईना दाद

थोड्याच वेळात पालकमंत्री महोदय कार्यक्रमस्थळी येतील, हे एक दोन वेळा ऐकताना सर्वांनाच छान वाटले. परंतु प्रत्येक १५ मिनिटे, अर्धा तासाने अशी उदघोषणा कानी पडू लागल्याने सारेच बुचकळ्यात पडले. चुळबुळ सुरू झाली. विद्यार्थ्यांनी जीवा शिवाची बैल जोडंपासून जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतोपर्यंतची अनेक गाणी म्हणून झाली. एका शिक्षिकेने मग माय भवानी तुझे लेकरू कुशीत...या गीतातून भावना व्यक्त केल्या. मात्र पालकमंत्र्यांच्या प्रतीक्षेमुळे कंटाळलेले सभागृहही दाद देईनासे झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षेच्या कारणास्तव बारा कैद्यांचे स्थलांतर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

कैद्यांकडे मोबाइल सापडल्यामुळे चर्चेत आलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव १२ बंदिवानांना मंगळवारी पुण्यातील येरवडा व रायगडमधील तळोजा मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरीत करण्यात आले. यातील बहुतांश बंदिवान हे खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा झालेले आहेत.

सुमारे ३१९० एवढी क्षमता असलेले नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह आगोदरच कैद्यांमुळे ओव्हर फ्लो झाले आहे. त्यातच या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेतील काही मनुष्यबळ राज्यातील इतर कारागृहांच्या सुरक्षेसाठीही पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड ताण होता. त्यातच या वर्षात या कारागृहात बंदिवानांत झालेल्या हाणामाऱ्या, खून, मोबाइल आढळून येणे यासारख्या गुन्हेगारी घटनांनी या कारागृहाची सुरक्षा यंत्रणा व प्रशासन बेजार झालेले आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी या कारागृहातील १२ बंदिवानांचे इतर कारागृहात स्थलांतर करण्यात आले. या बंदिवानांचे कनेक्शन डिसकनेक्ट करण्यासाठीही हा निर्णय घेतला गेल्याची शक्यता आहे. कारण मोबाइलद्वारे कुणाशी तरी संपर्क करणारा बंदिवान कारागृहात आढळून आल्यानंतर काही तासांतच हा निर्णय घेण्यात आला.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील १२ बंदिवान सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा व येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहेत. यातील बहुतांश बंदिवान खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा झालेले आहेत.

- रमेश कांबळे, कारागृह अधीक्षक, ना.रोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या नोटांचा तपास इन्कम टॅक्सकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२० ते २५ टक्के कमिशन घेऊन चलनातून बंद झालेल्या नोटा बदलून देणाऱ्या चार जणांचा तपशील पोलिसांनी इन्कम टॅक्स (आयटी) विभागाला दिला आहे. संशयितांकडे हे पैसे कसे आणि कुठून आले, याचा तपास आता आयटी विभागच करणार आहे.

शहर पोलिसांनी रविवारी दिवसभरात दोन ठिकाणी सापळे रचून चार संशयितांना अटक केली होती. पोलिसांनी या चौघांकडून १,५०० नोटा (एकूण ३० लाख रुपये) जप्त केल्या. २० ते २५ टक्के कमिशन घेऊन हे संशयित जुन्या नोटा बदलून देण्याचा उद्योग करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर क्राइम ब्रँचच्या युनिट एकने ही कारवाई केली होती. यातील असद जाकीर सय्यद या ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकाला वडाळागाव येथील मुस्तफानगरातून ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्याकडून १७ लाख रुपये जप्त केले. यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डन परिसरात सापळा रचून पोलिसांनी रोशन घनश्याम वालेचा (वय २६, लक्ष्मणरेखा अपार्टमेंट, सेवाकुंज, पंचवटी), गोरख महादू गोफणे (४६, डाऊच खुर्द, कोपरगाव, अहमदनगर) आणि सयाजद अब्दुलरहेमान मोटवाणी (३५, मदिना लॉन्सजवळ, वडाळा रोड, नाशिक) या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या तिघांकडून नवीन दोन हजार रुपयांच्या ६५० नोटा (१३ लाख रुपये) जप्त केल्या. या प्रकरणी संशयितांविरुद्ध सीआरपीसी १०२ प्रमाणे कारवाई करीत त्यांना कोर्टात हजर केले.

युनिट एकचे पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी सांगितले, की संशयितांना कोर्टात हजर केले असता त्यांनी ही रक्कम आपलीच असून, पोलिसांनी जप्त केली असल्याचे सांगितले. कबुलीजबाब झाल्यानंतर कोर्टाने पुढील कार्यवाहीचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार आयटी विभागाला सविस्तर अहवाल पाठवण्यात आला असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. आयटी विभाग संशयितांची चौकशी करेल. त्यात संशयितांनी ही रक्कम वैध असल्याचे सिद्ध केल्यास त्यांना कोर्टाच्या आदेशाने पैसे परत करण्यात येतील. मात्र, त्यांनी या पैशांचा स्रोत सिद्ध केला नाही तर आयटी विभाग पुढील कार्यवाही करणार आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेले पैसे इंदिरानगर आणि सरकारवाडा पोलिसांच्या कस्टडीत पाठवण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला लवकरच मिळणार मेडिकल कॉलेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

तब्बल दीड तपापासून आस लावून बसलेल्या नाशिकच्या पदरी लवकरच मेडिकल कॉलेज पडणार आहे. नाशिक आणि जळगाव या दोन्ही शहरांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला दोन मेडिकल कॉलेज नव्याने मिळणार आहेत. याबाबतच्या मंजुरीच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, याबाबत अधिकृत घोषणा आगामी १५ दिवसांत करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. या विषयासंदर्भात आरोग्य विद्यापीठाच्या सोहळ्याचे औचित्य साधत मंगळवारी (२० डिसेंबर) ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने ‘सोळा वर्षांनंतरही मेडिकल कॉलेजची प्रतीक्षा’ या शीर्षकाखाली वृत्तमालिकेचा पहिला भाग प्रसिध्द केला होता. या विषयासंदर्भात पालकमंत्र्यांनी कारभार हाती घेताना दिलेल्या आश्वासनाची आठवण त्यांना करून देण्यात आली होती. नाशिकसाठी मेडिकल कॉलेजच्या मागणीस प्रतिसाद देत त्यांनी याबाबतची मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठाच्या स्थापनेपासून मेडिकल कॉलेजची आशा निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर या दिशेने महापालिका, आरोग्य विज्ञान विद्यापीठ यासारख्या सस्थांकडून झालेले प्रयत्नही काही मंडळींच्या जहांगिऱ्या अबाधित राखण्याच्या नीतिमुळे वांझोटेच ठरत होते. राज्यात चंद्रपूरसह विविध दुर्गम भागात गव्हर्नर्मेंट मेडिकल कॉलेज दिले गेले. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी नाशिकच्या पदरी आजवर उपेक्षाच येत आली.

पंधरा दिवसांत होणार घोषणा!

नाशिकमधील सिव्हिल, सुपर स्पेशालिटी, महापालिकेची हॉस्पिटल्स आणि इएसआयसी हॉस्पिटल्स, नर्सिंग कॉलेजेस, विविध फार्मसी कॉलेजेस या संस्थांची युनिट अन् त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर जमेस धरल्यास नाशिकमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज उभारणे अशक्य नाही, अशी भूमिका ‘मटा’ ने मांडली होती. यावर पालकमंत्र्यांच्या सूतोवाचामुळे आता नाशिकच्या शिरपेचात उशिराने का होईना पण आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. पंधरा दिवसांत करण्यात येईल, याबाबत घोषण्यात करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरपूर बंदची हाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिरपूर शहरात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मंगळवारी दोन जणांनी दरोडा टाकून बँकेतील दहा लाख २६ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे सांगत माजी शिक्षणमंत्री अमरिश पटेल, आमदार काशिराम पावरा व नराध्यक्ष भूपेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. २२) शहर बंद ठेवून मोर्चा काढण्यात येणार आहे. बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, व्यपारी संकूल आदींनी बंद पाळण्याचे ठरविले आहे.

शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. शिरपूर शहर हे महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमारेषेपर्यत विखुरले आहे. त्यामुळे या ठिकाणी अवैध व बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांचे मोठे जाळे पसरले आहे. या सर्व घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी संपूर्ण दिवसभर शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी विजयस्तंभ ते प्रातांधिकारी कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात येणार आहे. दरोड्याच्या घटनेनंतर बुधवारी बँकेचे कॅशकाऊंटर बंद ठेवण्यात आले होते. या घटनेनंतर वरझडी रस्त्यावर मध्य प्रदेशातील संशयास्पद दुचाकी (एम. पी. ४६ एम.एच.३०१९) आढळली आहे. ही दुचाकी चोरीची असल्याचा अंदाज आहे.

बँकेतील कर्मचारी घाबरले

करवंद नाक्याजवळील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. दोघांपैकी एका दरोडेखोराने बँकेच्या अधिकाऱ्यांना धमकावून रोकड लुटून नेली. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र, या दोघांनी डोक्यावर हेल्मेट परिधान केले होते. त्यामुळे पोलिसांना तपासात अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. हा अनुभव सांगताना बँकेतील कर्मचारी खूप घाबरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबदलीसाठी दलाल पुन्हा सक्रीय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रिझर्व्ह बँकेने पुन्हा पाच हजारांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय बदलल्यामुळे शहरात दलालांचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने ३० डिसेंबरपर्यंत फक्त एकाच वेळी पाच हजार भरण्याचा निर्णय घोष‌ित केल्यानंतर दलालांचे धाबे दणाणले होते. बदलून दिलेल्या नोटांच्या बदल्यात घेतलेल्या पाचशेच्या नोटांचे करायचे काय, असा प्रश्नही त्यांना पडला होता. पण आता या दलालांना पुन्हा नऊ दिवसांची संधी मिळणार आहे. पण या दलालांना रोज बदलणाऱ्या निर्णयांची धडकीसुध्दा आहे. त्यामुळे मोठे व्यवहार करण्यापेक्षा छोटे व्यवहार करण्याकडे त्याचा कल आहे.
शहरात गेल्या काही दिवसांत नोटा बदलून दिल्याचे अनेक प्रकार समोर आले. त्याबरोबरच अहमदाबाद, सुरत व इतर ठिकाणीही नाशिकचे कनेक्शन समोर आले. त्यामुळे पोलिस व आयकर विभाग सक्र‌िय झाले असताना रिझर्व्ह बँकेने सोमवारी पाच हजार रुपये भरण्यास मर्यादा टाकली. त्यामुळे या विभागाला थोडी उसंत मिळाली होती. पण रिझर्व्ह बँकेने बुधवारी काढलेल्या परिपत्रकात केवायसी असलेल्या खातेदाराला जुन्या नोटा खात्यात भरण्यासाठी कोणतीही विचारपूस केली जाणार नसल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे इतर अटीसुध्दा शिथ‌िल केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा आयकर विभाग व पोलिसांचे काम वाढले आहे. आता नऊ दिवसांत बँकांत जुन्या नोटा भरण्यासाठी गर्दी होणार आहे.
गेल्या काही दिवसांत जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देण्यासाठी २० टक्के कमिशन घेतले जात असल्यामुळे अनेक काळ्या पैशावाल्यांनी हे पैसे बदलून घेतले. आता नऊ दिवसांत मोठी उलाढाल होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकेची डोकेदुखीसुध्दा कमी झाली आहे. गेले दोन दिवस बँक कर्मचारी व खातेदारांमध्ये जुन्या नोटा बदलण्यावरुन वाद सुरू होते. त्यात काही बँका वेगवेगळे नियम सांगत होत्या. त्यामुळे बँकांनाही याचा त्रास सहन करावा लागला.

बँकांचे काम वाढणार
नोटा रद्द झाल्यानंतर नोटा बदली करण्याची मुदत संपली. त्यानंतर बँकेनंतर केवळ पैसै काढण्यासाठीच गर्दी होती. आता पुन्हा नऊ दिवस पैसे काढण्यासाठी व पैसे डिपाझिट करण्यासाठी गर्दी होणार आहे. त्यात केवायसी बघणे व त्यानुसार जुन्या नोटा खात्यात भरुन घेण्याचे कामही वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा कोसळला; शेतकरी संतापला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

केंद्र व राज्य सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सटाणा बाजार समितीत कांद्याचे दर अचानक कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद पाडून विंचुर-शहादा-प्रकाशा राज्यमहामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडले. यामुळे तब्बल तीन तासांहून अधिक काळ राज्य महामार्गा बंद होता.

दरम्यान, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व बाजार समिती सभापती यांनी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून लिलाव पूर्ववत सुरू करण्यास विनंती केल्याने कांदा लिलाव उशिरा सुरू करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मेडिकल टुरिझम’ची क्षमता, पण इच्छाशक्ती नाही!

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com
@jitendratarteMT
नाशिक : कुंभमेळ्यामुळे जागतिक नकाशावर पोहचलेल्या नाशिक शहराचा वैद्यकीय आयामही तितकाच मजबूत आहे. आंतरराष्ट्रीय वर्तुळ अन् देशातील मेट्रो सिटीजमधून स्वस्त आणि सुरक्षित आरोग्यसेवांसाठी नाशिकसाठी पसंती वाढीला लागत असल्याच्या मुद्द्यास अलिकडील काही तज्ज्ञांचे पाहणी अहवाल साक्षी आहेत. यामुळे मेडिकल टुरिझम प्लेस म्हणूनही उदयाला येण्याची क्षमता या शहरात आहे. मात्र, यासारख्या व्हीजन्ससाठी येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.
बहुतांशी प्रशासकीय कामकाजात अडकलेल्या आरोग्य विद्यापीठाने काही उपक्रम घेऊन जनमानसांत पावले रोवण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात आदर्श आरोग्य चळवळ उभी राहू शकते, असा विश्वास वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होतो आहे. सद्यःस्थितीतील लोकसंख्येच्या आरोग्य गरजा आणि उपलब्ध सेवा यांचे गुणोत्तरही व्यस्तच असल्याचे निष्कर्ष हाती आहेत. ही दरी मिटविण्यासाठी आरोग्य विद्यापीठासारख्या सक्षम संस्थांच्या मध्यस्थीची गरज व्यक्त होत आहे.
मेट्रो शहरांकडूनही पसंती
बाह्य देशांसोबतच देशातील मेट्रो शहरांमधूनही आरोग्य सुविधांच्या उपयोगासाठी नाशिकला प्राधान्य देणारा आलेखही वाढीला लागल्याचे एक पाहणी सांगते. यात मुंबईकडून नाशिकमध्ये विविध शस्त्रक्रियांसाठी येणारे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. कारण, मेट्रो शहरांच्या तुलनेत अद्याप येथील वैद्यकीय सुविधांचे दर तुलनेने कमी आहेत. या उदाहरणांमधील क्षमता लक्षात घेता शहरास मेडिकल टुरिझम प्लेस बनविण्यासाठी आरोग्य विद्यापीठाने उचल घेतल्यास हे ही अशक्य नाही असा आशावाद आहे.
लोकभाषेतून व्हावे जनप्रबोधन
‘महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ’ हे नामाभिधान मराठीतून आहे. तसेच विद्यापीठाकडून आरोग्यदृष्ट्या जनप्रबोधनाचे कामकाजही मराठीतून चालावे, असा एक प्रस्ताव माजी कुलगुरू डॉ. अरूण जामकर यांच्या कारकीर्दीत ‘थिंक टँक’समोर मांडला गेला होता. मात्र, हा प्रस्ताव पुढे बासनात गुंडाळला गेला. स्थानिक जनतेच्या आरोग्यमानाचा आलेख, त्यांचे आरोग्याविषयीचे सामान्य प्रश्न, विविध आजार, उपचार पध्दती, उपचार केंद्र यांबाबतच तपशील, संपर्क क्रमांक, विविध आरोग्य योजना, व्याख्याने, चर्चासत्र, शोधनिबंध, नवसंशोधन आदी आरोग्य साहित्य हे मराठीतून निर्माण व्हावे आणि वेबसाइटसारख्या लोकमाध्यमातून ते जनतेपर्यंत पोहचावे असा तो प्रस्ताव होता. विद्यमान व्यवस्थापनाने यासारखे प्रस्ताव पुनरूज्जीवीत करावे अशीही अपेक्षा नाशिककरांकडून विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीदानानिमित्ताने व्यक्त झाली.
(समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडमध्ये उत्पादकांचा असंतोष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या असंतोषात भर पडली असून, चांदवड येथे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला हमी भाव मिळावा, अशा घोषणा देत मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्याआधी चांदवड बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडून शेतकऱ्यांनी असंतोषाला वाट करून दिली. तब्बल अर्धा तास महामार्ग रोखल्यानंतर आंदोलकांनी प्रशासनाला

निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. चांदवड बाजार समितीत बुधवारी सकाळी साडे दहा वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले. यावेळी लाल कांद्याला केवळ ३०० ते ६०० रुपये भाव असल्याचे

निदर्शनास आले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. चार दिवसांत २०० ते २५० रुपयांनी कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत लिलाव बंद पाडले. त्यानंतर महामार्गावर आंदोलन केले. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे हे आंदोलन केले. यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्ष आता पीठासन अधिकारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवड व स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या सभेस आता जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याऐवजी थेट नगराध्यक्षच आता पीठासीन अधिकारी म्हणून काम बघणार आहेत. याबाबत परिपत्रक राज्य शासनाने काढले असून, त्यात राजपत्रात (गॅजेट) निवडून आलेले नगरसेवक व थेट नगराध्यक्षाचे नाव प्रसिध्द झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत पहिली सभा घेण्याचे अधिकार नगराध्यक्षांना असणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा सहाही नगरपालिकांच्या पहिल्या सभेच्या व उपनराध्यक्ष निवडीच्या तारखा वेगळ्या असण्याची शक्यता आहे.
थेट नगराध्यक्ष यांची नगरसेवक म्हणून गणना करण्यात येणार असल्यामुळे उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत त्याला मतदानाचा अधिकार असणार आहे. पण स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसाठी फारसे काही बदल करण्यात आले नसून, त्यात या सदस्यांची शिफारस पक्ष,गट व आघाडीने सभेपूर्वी २४ तास अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडे करायची आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी हे या अर्जाची छाननी करुन ती नावे पक्ष व नगराध्यक्षांकडे पाठवणार आहेत. त्यामुळे ते नाव घोषीत करणे इतकीच औपचारिकता असणार आहे. जिल्ह्यात सहा नगर पालिकांच्या निवडणुका गेल्या महिन्यात झाल्या. त्यामुळे आता त्याच्या कामकाजास लवकरच सुरुवात होणार आहे. या परिपत्रकात अनेक नियमही दिले असून, त्यात अध्यक्षांना निवड-नियुक्ती नियमानुसारच करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहिमेत देवळाली प्रथम

$
0
0

देवळाली कॅम्प : येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने देवळालीत गेल्या आठवड्यातच स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होत. ‘स्वच्छ देवळाली, सुंदर देवळाली’ चा वसा जपत शहर स्वच्छ ठेवले जात आहे.

तसेच कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी शहरातील आठही वार्डात स्वतंत्र घंटागाड्या नियमित कचरा उचलत असतात. गेल्या पंधरवड्यातच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती त्यात केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल पुणे येथे रक्षा संपदा दिनाच्या कार्यक्रमात दक्षिण विभागाच्या १९ कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात देखील आले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाने लष्करासह शहरातील स्वच्छतेसाठी एकूण १०५ कर्मचारी तर ९० ठेकेदाराचे कर्मचारी कार्यान्वित केलेले आहे. त्यात २७ महिला झाडू मारण्यासाठी तर घंटागाडीवर प्रत्येकी तीन कर्मचारी काम पाहत असतात. या सर्वांवर २ आरोग्य निरीक्षक राजेंद्र ठाकूर व युवराज मगर नियमितपणे नजर ठेऊन कामाची अमंलबजावणी करीत असतात तर आरोग्य अधीक्षक सतीश भातखळे कामाचे नियोजन व नियंत्रण करतात. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार हे स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध असल्याने त्यांनी सलग दुसऱ्यावर्षी यशस्वीपणे राबविलेल्या स्वच्छता अभियान उपक्रमामुळे देवळालीच्या नावलौकिकात भर पडला आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखमोलाच्या ‘माया’ने जिंकली सर्वांची मने

$
0
0

‘पेट टूगेदर’मध्ये सर्वाधिक आकर्षण

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक येथे झालेल्या ‘पेट टूगेदर सिजन-४’ मध्ये नाशिकरोडची माया घोडी मुख्य आकर्षण ठरली. या प्रदर्शनामध्ये अनेक पक्षी-प्राण्यांनी सहभाग घेतला. मात्र सर्वात आकर्षण ठरली ती नाशिकरोडचे उद्योजक राहुल बोराडे यांची माया घोडी. पहिलीच स्पर्धा असतानाही तिने पारितोषिक मिळवले.

माया ही काळ्या रंगाची असून तिची उंची ६४ इंच एवढी आहे. तिची किंमत सुमारे ११ लाख रुपये असून तिचे धावण्यामध्ये विशेष प्राविण्य आहे. तिचा मासिक खर्च एकूण १५ हजार रुपये आहे. मायाचे प्रशिक्षक चेतन गायकवाड व प्रल्हाद पवार यांनी सांगितले की, मायाला आम्ही राजस्थानातून ती पावणे दोन वर्षांची असताना विकत घेतले. मायाला दिवसाआड तेल लाऊन मालीश केली जाते. तिला खाण्यासाठी कुट्टी असते तसेच कॅलशियम व व्हिटॅमिन्सचे लिक्वीड दिले जाते. दिवसाला तीन वेळ खुराक दिला जातो.

पुढील वर्षी सारंगखेड्यात सहभाग

मायाकडून दररोज सकाळ व सायंकाळी रनिंग व अन्य व्यायाम प्रकार करून घेतले जातात. स्पर्धेत वॉकिंग आणि रनिंग कसे करावे याचेही प्रशिक्षण तिला दिले जाते. मायाचा अॅटिट्यूड वेगळा आहे. त्यामुळे ती जिथे जाईल तेथे सर्वांचे लक्ष वेधून घेते. पुढील वर्षापासून मायाला उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध सारंगखेडा यात्रा आणि राजस्थानातील पुष्कर मेळा येथील स्पर्धेतही सहभागी केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images