Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिन्नरला बाउंसरकडून कामगारांची अडवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वत्र शांततेत मतदान झाले असून सुमारे ७०. ८६ टक्के मतदान झाल्याचे समजते. सायंकाळी उशिरा एकूण झालेले मतदान मोजण्याचे काम सुरू होते. शहरात मतदान केंद्रावर किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले.

सिन्नरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी जाऊ न देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिंदाल या एका कंपनीवर तैनात करण्यात आलेले दहा बाउंसर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांच्या मदतीने सुमारे २५० कामगारांना मतदानासाठी मुक्त करण्यात आले. या प्रकरणी कोणत्या पक्षाच्या उमेदवारासाठी सदरचे बाउंसर काम करीत होते, याची चौकशी पोलिस करीत आहे. तर दुसऱ्या घटनेत दुपारी दीड वाजता मोबाइलवरून ‘चाणक्य’ या नावाने एक्झीट पोलचा मेसेज सर्वत्र पाठवण्यात आला. यामध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार २००० हून अधिक मतांनी पुढे तर इतर २३ नगरसेवक भाजपचे, शिवसेना ४ अपक्ष १ असा मेसेज होता. या प्रकरणी शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली असून सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरपालिका निवडणुकीची आज मतमोजण्‍ाी

$
0
0

टीम मटा

जिल्ह्यात सहा नगरपालिकांसाठीचे रविवारी (दि. २७) मतदान उत्साहात पार पडले. मतदारांनी थंडीमुळे सकाळी काहीसा निरूत्साह दाखविला. मात्र दुपारनंतर त्यांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा केलेल्या दिसून आले. सटाण्यात ऐतिहासिक ७५.४५ टक्के मतदानाची नोंद केली गेली. तर सर्वात कमी मतदान हे मनमाड नगरपालिकेसाठी ६८.०६ इतके झाले आहे. आज मतमोजणी असून अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. जिलह्यातील नागरिकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

मनमाड : मनमाड व नांदगाव नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी उत्साहात मतदान झाले. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले नांदगाव येथे ६९.३३ तर मनमाडमध्ये सरासरी ७० टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनमाडमध्ये थेट नगराध्यक्षसह ३१ नगरसेवकपदासाठी असलेल्या १६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले रविवारी मतमोजणी असल्याने सर्वाना निकालाची उत्सुकता लागली आहे.

प्रारंभी संथ सुरुवात

मनमाडमध्ये मतदानाला सकाळी प्रारंभ झाल्यानंतर मतदारात सुरुवातीला निरुत्साह दिसून आला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत अवघे वीस टक्के तर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान झाले. मात्र दुपारी चार वाजेनंतर मतदानाने वेग घेतला व बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. मनमाडमधील

सेंट झेवियर हायस्कुल इंडियन हायस्कुल या मतदान केंद्रांवर साडेपाच वाजता मतदारांची गर्दी असल्याने त्यांना चिठ्ठ्या देऊन मतदान केंद्रात प्रवेश देण्यात आला व त्यांचे मतदान घेण्यात आले.सायंकाळी साडेसात पर्यंत या केंद्रावर मतदान सुरू होते. इंडियन हायस्कूल गुरुगोविंद सिंग विद्यालय, उर्दू हायस्कूल या मतदान केंद्रांवर स्त्री-पुरुष मतदारांची गर्दी दिसून आली. सेंट झेवियर्स येथे रिपाई उमेदवार व अपक्ष उमेदवार यांच्या समर्थकात वादाचे प्रकार घडले. मात्र त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

नांदगावला ६९ टक्के मतदान

नांदगाव येथे थेट नगराध्यक्षसह ८ प्रभागाच्या १७ नगरसेवकपदासाठी शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात मतदान झाले तसेच कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. ६९.३३ टक्के मतदान झाल्याचे व सर्वात जास्त ८० टक्के मतदान प्रभाग क्रमांक १ मध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदगाव मध्ये सकाळी विविध मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. दुपारी साडेचार वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान झाले. नंतर ते ७० टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचले. सकाळी १० वाजता मतमोजणी होणार असून मतमोजणी तयारी पूर्ण झाल्याचे प्रांत भीमराज दराडे यांनी सांगितले.

पोलिस बंदोबस्तात मतदान

गेल्या आठवड्यात झालेल्या हाणामारीतील संशयित व नगरसेवक पदाचे उमेदवार याना मालेगाव येथून पोलिस बंदोबस्तात मनमाड येथे मतदानासाठी आणण्यात आले त्यांनी जयश्री थिएटर नजीक मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत अजय मोरे, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी मतमोजणी तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली.

नावे नसल्याने निराशा

मनमाड येथील रहिवासी असणारे व सध्या नाशिक ला असणारे अभियंता पराग पाटोदकर व त्यांच्या पत्नी गीता पाटोदकर हे दाम्पत्य नाशिकहून खास मतदान करण्यासाठी शनिवारीच मनमाडला आले. मात्र रविवारी ते मतदानाला गेले असता त्यांची नावे मतदार यादीतच नसल्याने त्यांना धक्का बसला. आपली नावे कोणी व का वगळली असा प्रश्न त्यांना पडला. याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहादा नगरपालिकेत नगराध्यक्ष भाजपचा; काँग्रेसला जास्त जागा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेत दिवंगत पी. के. आण्णा पाटील यांच्या हयातीत सतत विरोधात राहूनही कधी विजय न मिळविलेल्या मोतीलाल पाटीलांना मात्र यावेळी जनतेने न्याय दिला. परिणामी शहादा पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले आहेत. नगरपालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले असले तरी नगराध्यक्षपदी भाजपचे मोतीलाल पाटील असणार आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच एमआयएमने आपले खाते उघडले आहे.

शहादा नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी दहा उमेदवार रिंगणात असले तरी मोतीलाल पाटील यांची खरी लढत दिली ती अपक्षाने. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, लोकभारती या कुठल्याही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला भाजपचे पाटील यांना जवळपासही फिरकता आले नाही. या निवडणुकीत भाजपचे मोतीलाल पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शेख जहीर शेख मुसीर यांना ७३० मतांनी पराभव करीत विजय मिळविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोंडाईचात परिवर्तन; पटेलांनी गड राखला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील दोंडाईचा व शिरपूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल अखेर अपेक्षितच लागला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे पर्यटनविकास मंत्री यांनी या निवडणुकीत पक्षाला प्रचंड यश मिळवून दिले. गेल्या दहा वर्षांपासून नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या ताब्यात होती ती त्यांनी खेचून आणली आहे.

मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल या प्रचंड मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. भाजपने एकूण २४ पैकी २० जागा जिंकल्या असून माजीमंत्री डॉ. हेमंत देखमुख यांना जोरदार धक्का देत काँग्रेसला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

तर शिरपूर नगरपालिकेत अमरिश पटेल यांची सत्ता अबाधित राहिली आहे. काँग्रेसच्या जयश्रीबेन पटेल या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या तर काँग्रेसने तीसपैकी एकवीस जागा मिळविल्या आहेत. जिल्ह्यातील शिरपूर आणि दोंडाईचा निवडणुकीत प्रस्थापितांनी आपापले गड शाबूत राखल्याचे या निकालावरून दिसून आले.

दोंडाईचा नगरपालिकेत भाजपच्या आजी-माजी मंत्र्यांमधील अटीतटीच्या लढतीत परिवर्तन घडले. यात भाजपला सत्ता काबीज करण्यात यश मिळाले आहे. नगरपालिकेच्या २४ पैकी भाजपला २०, मनसेला १, तर काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नयनकुंवर रावल या १७ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांची दोंडाईचा पालिकेवरील सत्ता रावल गटाने काबीज केली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण ३० जागांपैकी २१ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर उर्वरित नऊ जागांमध्ये भाजपला ५, भाजप पुरस्कृत ४ आणि २ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी १९ हजार मतांनी विजय मिळविला आहे. शिरपुरला परंपरेप्रमाणे काँग्रेसने नगरपालिकेवर पकड कायम ठेवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये शिवशक्ती-‌भीमशक्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना-रिपाई युतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत ३१ पैकी २० जागांवर विजय मिळवला. तसेच मनमाड थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मावती धात्रक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पगारे यांचा तब्बल ३१४६ मतांनी पराभव करून थेट नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवला. भारतीय जनता पक्षाला तिसऱ्या तर काँग्रेसला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मनमाडच्या काही प्रभागात धक्कादायक निकाल लागले असून, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजाभाऊ पगारे, योगेश पाटील, शिवसेना गटनेते संतोष बळीद या दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. मनमाड पालिकेत ३१ जागांपैकी सेना-रिपाई युतीला २० त्यात सेना १८ रिपाई २, काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. तर डॉ. अर्चना जाधव या एकमेव अपक्ष उमेदवार निवडून आल्या. मनमाड पालिकेत एकूणच शिवसेनेची लाट आल्याचे दिसून आले. तर भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष यांना एकही जागा मिळाली नाही.

विजयी उमेदवार व पराभूत उमेदवार

प्रभाग १ अ

कविता कोटकर

(सेना पुरस्कृत अपक्ष) १४३०

सुमनबाई गोसावी (राष्ट्रवादी काँग्रेस) ७५०

प्रभाग १ ब

दिलीप भाबड (शिवसेना) १०९६

योगेश पाटील (राष्ट्रवादी) १०८५

प्रभाग २ अ

कैलास पाटील (राष्ट्रवादी) ८८९

प्रवीण नागरे (शिवसेना) ७५८

प्र. २ ब

शाहीन शेख (शिवसेना) ८२५

शबाना पठाण (राष्ट्रवादी) ७२२

३ अ

मिलिंद उबाळे (काँग्रेस) ९६१

कैलास आहिरे (राष्ट्रवादी) ७९०

प्र. ३ ब

तबस्सुम शेख कुरेशी (काँग्रेस) १००५

आशालता आव्हाड (राष्ट्रवादी) ७२७

प्र. ४ अ

नूतन पगारे (रिपाइ) ९९४

मीरा बच्छाव (राष्ट्रवादी) ३४५

प्र. ४ ब

विनय आहेर (शिवसेना) ६९३

राजेंद्र चोरडिया (अपक्ष) ४७६

प्र. ५ अ

कल्पना खोटरे (शिवसेना) १९६९

दीपाली कोरडे (राष्ट्रवादी) ६९४

प्र. ५ ब

गणेश धात्रक (शिवसेना) १५४५

विजय सगळे (राष्ट्रवादी) ७१७

प्र. ६ अ

महेंद्र शिरसाठ (शिवसेना) १३१७

अनिल सूर्यवंशी (अपक्ष) ६११

प्र. ६ ब

उषा तेजवानी (शिवसेना) १२५१

कविता बहोत (अपक्ष) ६०८

प्र. ७ अ

शेख यास्मिन (राष्ट्रवादी) १२२४

मैराजबी अली अपक्ष ११३१

प्र. ७ ब

अमजद पठाण (राष्ट्रवादी)१७६०

संतोष बळीद (शिवसेना) ११७४

प्र. ८ अ

रवींद्र घोडेस्वार काँग्रेस १२५०

सुरज गायकवाड शिवसेना ८६०

प्र. ८ ब

राणी मिश्रा (शिवसेना) ११८६

रीजवाना शेख (काँग्रेस) १०७७

प्र. ९ अ

प्रवीण नाईक (शिवसेना) १८७८

रहेमान शहा (काँग्रेस) ४८९

प्र. ९ ब

संगीता मगर (शिवसेना) १०७८

प्रियंका बोथरा (भाजप) ६४५

प्र. १० अ

सुरेखा मोरे (शिवसेना) ११२७

शैला गायकवाड (राष्ट्रवादी) ७३३

प्र. १० ब

कैलास हिरणवाळे (शिवसेना) १०८०

राजेंद्र पगारे (राष्ट्रवादी) १०६७

प्र. ११ अ

रुपाली पगारे (राष्ट्रवादी) ११५८

काजल पवार (भाजप) ११२४

प्र. ११ ब

प्रमोद पाचोरकर शिवसेना १०२८

नरेश फुलवाणी (भाजप) ७९०

प्र. १२अ

विनोद ठाकरे (शिवसेना) ८६४

संतोष सोनवणे (राष्ट्रवादी) ४९९

प्र. १२ ब

सविता गिडगे (शिवसेना) ९४0

शोभा नरवडे (अपक्ष) ६४३

प्र. १३ अ

राजेंद्र आहिरे (रिपाइ) ११९६

योगेश निकाळे (अपक्ष) ३८२

प्र. १3 ब

सीमा निकम (काँग्रेस) ७०१

मंदाबाई भोसले (अपक्ष) ४७४

प्र. १४ अ

संतोष आहिरे (काँग्रेस) १०८१

रुपेश अहिरे (रिपाई) ५९०

प्र. १४ ब

मेरी थॉमस (राष्ट्रवादी) ८०४

परवीन शेख (काँग्रेस) ६६४

प्र. १५अ

डॉ. अर्चना जाधव (अपक्ष १०३७

रेश्मा बनसोडे (भाजप)७९६

प्र. १५ ब

किरण शिंदे (शिवसेना) १७३६

सविता वडजे (भाजप) ७६९

प्र. १५ क

लियाकत शेख (शिवसेना) ९७६

सचिन दराडे (भाजप) ८९८

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मिळालेली मते

पद्मावती धात्रक (शिवसेना) १४११४

रुपाली पगारे (राष्ट्रवादी काँग्रेस) १०९६८

कुसुम दराडे (भाजप) ७१७८

हिना शेख (काँग्रेस) ५५६५

सुषमा तिवारी (मनमाड बचाव समिती) ८८६

सुजाता शिनगारे (बहुजन समाज पक्ष) ४८२

वैशाली दहिवले (अपक्ष) २२०
0000

लक्षवेधी घडामोडी

मनमाडमध्ये डॉ. अर्चना जाधव या एकमेव अपक्ष महिला उमेदवार विजयी.

थेट नगराध्यक्षसह प्रथमच १५ नवीन चेहरे

मनमाड पालिकेत प्रस्थापितांना धक्का

पाच विद्यमान नगरसेवकांचा पराभव

मनमाड पालिकेत १२ नगरसेवकांना पुन्हा संधी

मनमाडमध्ये डॉ. विनोद ठाकरे व डॉ. अर्चना जाधव हे दोघे डॉक्टर विजयी

माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे अवघ्या १३ मतांनी पराभूत

काका कैलास पाटील विजयी, पुतण्या माजी नगराध्यक्ष बबलू पाटील पराभूत

माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांचा विजय

शिवसेनेचे प्रवीण नाईक यांचा माजी नगराध्यक्ष रहेमान शाह यांच्यावर १३८९ विक्रमी मतांनी विजय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूरमध्ये शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा मुसंडी मारत सत्ता स्थापन केली. नगराध्यपदी शिवसेनेच्या अनिता करंजकर यांनी विजय मिळत या पदावर तिसऱ्यांदा विराजमान झाल्या.

विहितगाव येथील माऊली मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. मतमोजणी दरम्यान पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसेनेच्या नगराध्यक्ष उमेदवार अनिता करंजकर यांना ५४२०, आघाडीच्या प्रेरणा बलकवडे २०३५ मते तर भाजपच्या शोभा भागवत यांना १०३८ मते मिळाले. अनिता करंजकर यांनी तब्बल ३३८५ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदाची हॅट्रिकही साधली. नगरसेवकांमध्ये १७ पैकी १६ जागांवर शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणूक प्रक्रियेत एकूण ३०४ नागरिकांनी नोटाचा वापर केला.

मतमोजणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी राहूल पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी जयश्री अहिरराव, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता नांदुरीकर, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे आदींच्या उपस्थितीत होते. मतमोजणी पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी जाहीर करून विजयी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

निकालाचा कल जाहीर होताच भगूरमधील करंजकर गल्लीतून शिवाजी चौकापर्यंत विजयी रॅली काढण्यात आली. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी विजयाचा संदेश देतांना सांगितले की, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिता करंजकर यांनी भगूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. विजयी उमेदवारांनी आपापल्या प्रभागात फटाक्याची आतषबाजी करत आभार फेरी काढली. यावेळी आमदार योगेश घोलप, जगनराव आगळे पोरजे आदी उपस्थित होते.

नगरसेवकांना मिळालेली मते

प्रभाग १ अ

स्वाती झूटे, शिवसेना ७७०

कविता जाधव, भाजप ३७९

प्रभाग १ ब

भाऊसाहेब गायकवाड, शिवसेना ७३९

शांताराम शेटे, भाजप ३०८

प्रभाग २ अ

आश्विनी साळवे, शिवसेना ६८७

सुवर्णा पगारे, भाजप ४४२

प्रभाग २ ब

विजय करंजकर, शिवसेना ७४९

प्रसाद आडके, भाजप ४०८

प्रभाग ३ अ

उत्तम आहेर, शिवसेना ७२६

सुनील जाधव, भाजप ३५७

प्रभाग ३ ब

जयश्री देशमुख, शिवसेना ८७९

सुलभा देशमुख, भाजप २३२

प्रभाग ४ अ

सुदेश वालझाडे, शिवसेना ६२५

मधुकर कापसे, भाजप २४७

प्रभाग ४ ब

शकुंतला कुंडारिया, शिवसेना ५३९

लता इंदारखे, भाजप १४३

प्रभाग ५ अ

संगीता पिंपळे, शिवसेना ४२२

प्रियंका पवार, भाजप २७१

प्रभाग ५ ब

मोहन करंजकर, काँग्रेस ५०६

संतोष ओहोळ, शिवसेना २५८

प्रभाग ६ अ

मनीषा कस्तुरे, शिवसेना ६२९

प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादी ५५४

प्रभाग ६ ब

दीपक बलकवडे, शिवसेना ४१४

दत्ता कुंवर, अपक्ष २६३

प्रभाग ७ अ

कविता यादव, शिवसेना ६३८

मीना आडके, भाजप १५८

प्रभाग ७ ब

संजय शिंदे, शिवसेना ५७९

विलास कुलकर्णी, भाजप १९२

प्रभाग ८ अ

आर. डी. साळवे, शिवसेना ६८०

गौतम पगारे, भाजप ३५४

प्रभाग ८ ब आणि क

प्रतिभा घुमरे, शिवसेना ७४८

सुजाता शिरसाठ, भाजप ४६७

अनिता ढगे, शिवसेना ६६२

विमल कासार, भाजप ३८२


नगराध्यक्ष करंजकरच
जनतेतून थेट नगराध्यक्ष होण्याचा पहिला मान पां. भा. करंजकर, दुसरा मान विजय करंजकर तर तिसरा मान अनिता करंजकर यांनी मिळवून करंजकरांची नगराध्यक्ष पदाची देखील हॅट्रिक साधली. तसेच व्यक्तीशः त्या स्वतः देखील तिसऱ्यांदा नगराध्यक्ष पदावर विराजमान होत आहेत.


भगूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला

भगूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि राहील हे या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. काँगेस, राष्ट्रवादी आघाडी आणि केंद्र तसेच राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपने देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची करून सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र या सर्वांना पराभवाची धूळ चाखावी लागली. काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहन करंजकर यांनी स्वतःच्या व्यक्तिगत हितसंबंधावर या निवडणुकीत अनपेक्षित बाजी मारीत काँग्रेसचे अस्तित्व दर्शविले मात्र भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. भाजप-सेना युतीची घोषणा केली होती. मात्र भगूरमध्ये ती युती न झाल्यामुळे स्वबळाची भाषा भाजपवरच उलटली आहे.


देशमुख यांना मताधिक्य तर पिंगळ सर्वात कमी

नगरापलिका निवडणुकीच्या तोंडावर येथील मनसेचे शहराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रभागात सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने त्यांनी आपल्या पत्नी जयश्री देशमुख यांचा सेनेत प्रवेश घडवून आणला आणि सेनेकडून उमेदवारी निश्चित केली. मतदारांनीदेखील आपला कौल त्यांच्या पारड्यात टाकला. संपूर्ण निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये सर्वाधिक ६४७ मतांचे मताधिक्य मिळविण्याचा मान पटकाविला. तर सर्वात कमी (१९) मते शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल पिंगळ यांचे चिरंजीव आणि अपक्ष उमेदवार विलास पिंगळ यांना मिळाली. दोनदा नगराध्यक्षपद भूषविणाऱ्या भारती साळवे यांनाही अवघी ३७ मते मिळाली.


नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची मते

अनिता करंकजर, शिवसेना ५४२०

प्रेरणा बलकवडे (आघाडी) २०३५

शोभा भगवत भाजप १०३८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात ‘शविआ’चा दणका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकालांची परंपरा कायम रहात सटाणा शहर विकास आघाडीच्या सुनील दोधा मोरे यांनी तब्बल ३६७६ मतांची घसघशीत आघाडी राखत सर्वच उमदेवारांना चारी मुंड्यां चित केले आहे.

नगरसेवकपदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसून, शहरविकास आघाडी ६, भाजप ६, राष्ट्रवादी कॉग्रेस ५, कॉग्रेस २, अपक्ष २ सदस्य विजयी झाले आहे.

येथील नवीन प्रशासकीय इमारतीत सकाळी १० वाजेच्या सुमारास निवडणुक निर्णय अधिकारी प्रवीण महाजन यांनी मतमोजणीस प्रारंभ केला. पहिल्या फेरीपासूनच थेट नगराध्यक्ष पदाचे शहरविकास आघाडीचे उमेदवार सुनील मोरे यांनी आघाडी तब्बल एक हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत आपल्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्यात प्रभाग क्र. १ मधील शहरविकास आघाडीच्या दोघेही विजयी उमेदवारांनी विजयाचा श्रीगणेशा केला.

प्रभाग क्र. १ अ

बाळू बागुल, शविआ ५८४

कांतीलाल चव्हाण, राष्ट्रवादी ३९६

प्रभाग क्र.१ ब

सुनीता मोरकर, शविआ ६७३

प्रमिला वाघ, राष्ट्रवादी ५७४

प्रभाग क्र. २ अ

महेश देवरे, भाजप ७३७

दत्तु सोनवणे, राष्ट्रवादी ४४३

प्रभाग २ ब

पुष्पा सूर्यवंशी, भाजप ६४३

सुशीला रौंदळ, राष्ट्रवादी ५०९

प्रभाग क्र. ३ अ

राहुल पाटील, काँग्रेस ७४८

साहेबराव सोनवणे, भाजप ३६२

प्रभाग ३ ब

सोनाली बैताडे, शविआ ९१६

अ‍ॅड. सरोज चंद्रात्रे, भाजप ४९२

प्रभाग क्र. ४ अ

निर्मला भदाणे, भाजप ६८१

सुमनबाई सोनवणे, राष्ट्रवादी ४६०

प्रभाग ४ ब

मुन्ना कासम, भाजप ७४३

रामदास सोनवणे, काँग्रेस ३८६

प्रभाग क्र ५ अ

लता सोनवणे, भाजप ८३७

नर्मदा सोनवणे, शविआ ५९९

प्रभाग क्र. ५ ब

दिनकर सोनवणे, काँग्रेस ६५३

पांडूरंग सोनवणे, राष्ट्रवादी ३७८

प्रभाग क्र. ६ अ

संदीप सोनवणे, शविआ ६३२

अनिल सोनवणे, शिवसेना ४८२

प्रभाग क्र. ६ ब

संगिता देवरे, अपक्ष ७२९

कुसूमबाई सोनवणे, राष्ट्रवादी ४५१

प्रभाग क्र. ७ अ

भारती सूर्यवंशी, शविआ १०५२

स्मिता खैरणार, राष्ट्रवादी ५५१

प्रभाग क्र. ७ ब

राकेश खैरनार, शविआ १०६८

चेतन मोरे, राष्ट्रवादी (पु) ७५०

प्रभाग क्र. ८ अ

सुवर्णा नंदाळे, अपक्ष ११३२

माधुरी अहिरे, भाजप ६४४

प्रभाग क्र. ८ ब

दीपक पाकळे, भाजपा ७७५

भारत काटके, राष्ट्रवादी ४०३

प्रभाग क्र. ९ अ

सुरेखा बच्छाव, राष्ट्रवादी १७१८

द‌िलीप सोनवणे, भाजप ७०१

प्रभाग क्र. ९ ब

शमा मन्सुरी, राष्ट्रवादी १७१६

तब्बसुम सईद मुल्ला, कॉग्रेस ११४६

प्रभाग क्र. ९ क

शमिम शपिक मुल्ला, राष्ट्रवादी १५०६

रखमाबाई पवार, भाजप ८२६

प्रभाग क्र. १० अ

सुलोचना चव्हाण, राष्ट्रवादी ९७२

लता पवार, भाजप ९५१

प्रभाग १० ब

नितीन सोनवणे, राष्ट्रवादी १२७१

अमर पाटील, भाजप ८३५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावात परिवर्तन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नांदगाव

नांदगाव नगरपालिकेत १७ पैकी ११ जागा मिळवून शिवसेनेने बहुमत मिळवले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेश कवडे यांनी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष अरुण पाटील यांचा ४३३२ मतांनी पराभव करत परिवर्तन घडवले. शिवसेनेला ११ तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या ४ तर काँग्रेसला निव्वळ २ जागांवर समाधान मानावे लागले. मनमाडसह नांदगावमध्ये शिवसेनेने सत्ता संपादन करून नांदगाव तालुक्यात भगवे वादळ आले असल्याची नांदी दिली.

नांदगाव नगरपरिषद निवडणूक –

प्रभाग १ अ

संगीता जगताप, काँग्रेस ६१८

कांचन काकळीज, शिवसेना ४९४

प्रभाग १ ब

वाल्मिक टिळेकर, राष्ट्रवादी ५९०

नरेंद्र पाटील, अपक्ष ५२३

प्रभाग २ अ

अभिषेक सोनवणे, शिवसेना ७४०

सुरेश गायकवाड, राष्ट्रवादी ५२१

प्रभाग २ ब

नंदा कासलीवाल, काँगेस ६१३

राखी भरत मोकळ, शिवसेना ४०६

प्रभाग ३ अ

कामिनी साळवे, शिवसेना ८५५

करुणा जाधव, काँग्रेस ४३१

प्रभाग ३ ब

कारभारी शिंदे, शिवसेना ७४३

सचिन देवकाते, राष्ट्रवादी ७२९

प्रभाग ४ अ

चांदणी खरोटे, शिवसेना १०२२

प्रगती निकम, भाजप ७२४

प्रभाग ४ ब

शोभा कासलीवाल, शिवसेना ६९४

प्रशांत संत, भाजप ५०९

प्रभाग ५ अ

किरण देवरे, शिवसेना १०५१

संजीव वाघ, भाजप १३५

प्रभाग ५ ब

वंदना कवडे, शिवसेना ११९३

अक्का सोनवणे, काँग्रेस ७८

प्रभाग ६ अ

शारदा चव्हाण, काँग्रेस ५५६

सविता शेवरे, शिवसेना ९९६

प्रभाग ६ ब

मनीषा काकळीज, शिवसेना ९८१

सुरज पाटील, काँग्रेस ६०९

प्रभाग ७ अ

वनिता पाटील, राष्ट्रवादी ८१६

सरस्वती गीते, शिवसेना ५९१

प्रभाग ७ ब

संतोष भोसले, अपक्ष ५१८

बालेमिया शेख, राष्ट्रवादी ६४८

प्रभाग ८ अ

नितीन जाधव, शिवसेना ७७५

काका सोळसे, राष्ट्रवादी ७४५

प्रभाग ८ ब

सीमा राजुळे, राष्ट्रवादी ७१६

सुनंदा पवार, शिवसेना ९९६

प्रभाग ८ क

योगिता गुप्ता, राष्ट्रवादी ९७६

परिघाबाई शिंदे, शिवसेना ६०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककरांनाही मिळणार पाचशेची नोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बहुप्रतीक्षित पाचशेच्या नव्या नोटा बुधवारपासून नाशिककरांच्या हाती पडणार आहेत. रिझर्व्ह बँकेकडून जिल्ह्यासाठी मंगळवारी चलन उपलब्ध होणार असून, या चलनामध्ये नव्या पाचशेच्या नोटांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून रद्द ठरविण्यात आल्याने सध्या सर्वत्र सुट्या पैशांची चणचण निर्माण झाली आहे. एटीएम सेंटर्समधूनही दोन हजारांची नोटच हाती पडू लागल्याने ती वटविताना नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते आहे. शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस बँका बंद होत्या. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.

दोन हजार आणि पाचशे रुपयांची नवीन नोट चलनात आणण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असली तरी अद्याप नाशिककरांना तिचे दर्शन होऊ शकलेले नाही. नाशिकमधील करन्सी नोट प्रेसमध्येच पाचशेच्या लाखो नवीन नोटांची छपाई झाली. मात्र, या सर्व नोटा देशातील विविध भागांत पाठविण्यात आल्या. नाशिककर मात्र या नोटांपासून वंचित होते.

चलन कोंडी फोडण्यासाठी तातडीने पाचशेच्या नवीन नोटा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सातत्याने होत होती. रिझर्व्ह बँकेने राज्यात आतापर्यंत मुंबई- पुण्यासह शेजारील ठाणे जिल्ह्यात पाचशे रुपयांच्या नवीन नोटा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता बुधवारपासून नाशिकमध्येही या नोटा उपलब्ध होणार आहेत. चेस्ट बँकांना या नोटा उपलब्ध झाल्यानंतर बुधवारपासून बँका आणि एटीएममध्ये त्या उपलब्ध होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात ‘युती’ची सत्ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेत गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तारूढ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ह्यावेळच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठा झटका बसला. ‘युती’ने जोरदार मुसंडी मारल्याने पालिकेवर युतीचा ‘भगवा’ रोवला गेला आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या लक्षवेधी चुरशीच्या लढतीत भाजप-शिवसेना युतीच्या बंडू अंबादास क्षिरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उषाताई माणिकराव शिंदे यांचा ७६७ मताधिक्क्याने पराभव केला. नगरसेवकपदाच्या ५ जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली असून, त्यात शिवसेनेच्या दोन, तर राष्ट्रवादीच्या एका विजयी बंडखोराचा समावेश आहे.

नगराध्यक्षपदासाठी थेट झालेल्या निवडणुकीत युतीचे बंडू क्षीरसागर व राष्ट्रवादीच्या उषाताई शिंदे यांच्यात चुरशीची निवडणूक झाली. पालिकेच्या सभागृहात सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

प्रभाग क्रमांक- १ अ

दयानंद जावळे शिवसेना ११२६

प्रदीप सोनवणे, राष्ट्रवादी ८४९

प्रभाग क्र. १ ब

पुष्पा गायकवाड, भाजप ९७९

नील‌िमा पवार, राष्ट्रवादी ५७१

प्रभाग क्रमांक २ अ

परवीनबानो शेख, राष्ट्रवादी १२६८

नसीमाबी शेख, शिवसेना ४८०

प्रभाग क्र. २ ब

सफिक शेख, अपक्ष ७९३

युनुस शेख, राष्ट्रवादी ६२९ मते

प्रभाग ३ अ

तहेसिन शेख, राष्ट्रवादी १२६७

सना गाझी, अपक्ष ५१४

प्रभाग क्र. ३ ब

निसार शेख राष्ट्रवादी ८२४

एजाज शेख काँग्रेस ६९०

प्रभाग क्र. ४ अ

सबिया मोमीन, राष्ट्रवादी ८०३

नसिमाबानो अन्सारी, अपक्ष ४८३

प्रभाग क्र. ४ ब

डॉ. संकेत शिंदे, राष्ट्रवादी ७५१

यासीन मोमीन, अपक्ष ३६६

प्रभाग क्र. ५ अ

रइसाबानो शेख, राष्ट्रवादी १५६२

तेहसिन शेख, काँग्रेस ६८७

प्रभाग क्र. ५ ब

अमजत शेख, अपक्ष १०४०

सैय्यद इम्राहिम रहिम, अपक्ष ७१३

प्रभाग क्र. ६

नीता परदेशी, राष्ट्रवादी १३२४

माया परदेशी, शिवसेना ६०१

प्रभाग क्र. ६ब

रुपेश लोणारी, अपक्ष ८५९

कुणाल परदेशी, भाजप ८३५

प्रभाग क्र. ७ अ

छायाबाई देसाई, शिवसेना ११७६

चंदा दुगड, राष्ट्रवादी ८७६

प्रभाग क्र. ७ ब

सुरज पटणी, शिवसेना १६७४

रवींद्र जगताप, राष्ट्रवादी ५२८

प्रभाग क्र. ८ अ

किरणबाई जावळे, शिवसेना ११०३

निर्मला थोरात, राष्ट्रवादी ९४३

प्रभाग ८ ब

सचिन शिंदे, राष्ट्रवादी ८७४

भोलानाथ लोणारी, शिवसेना ७०८

प्रभाग क्र. ९ अ

प्रवीण बनकर, राष्ट्रवादी १०५४

सागर लोणारी, शिवसेना ७३९

प्रभाग क्र. ९ ब

शितल शिंदे, राष्ट्रवादी ९३८

उषा पाटील, शिवसेना ६१८

प्रभाग क्र. १० अ

सरोजनी वखारे, शिवसेना १९२६

राजश्री पहिलवान, राष्ट्रवादी ७१०

प्रभाग क्र. १० ब

प्रमोद सस्कर, भाजप १०६७

संजय कुक्कर, अपक्ष १०४५

प्रभाग क्र. ११ अ

पद्मा शिंदे, राष्ट्रवादी १७६५

सुनिता वाळुंज, शिवसेना ८७०

प्रभाग क्र. ११ ब

गणेश शिंदे, भाजप १७७३

संदेश पाटील, अपक्ष ४७३

प्रभाग क्र. १२ अ

छाया क्षीरसागर भाजप ७२१

प्राजक्ता पवार, राष्ट्रवादी ६५५

प्रभाग क्र. १२ ब

सचिन मोरे, अपक्ष ६५९

सुभाष गांगुर्डे, राष्ट्रवादी ५६१


नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची मते

बंडू क्षीरसागर, भाजप १२,७९४

उषाताई शिंदे, राष्ट्रवादी १२,०२७

शेख एजाज शेख रियाज, काँग्रेस १२०६

दीपक लाठे, भारिप बहुजन महासंघ ४१९

शेख अ.वहाब फकीर मोहंमद, अपक्ष १६४

सैयद अजहरअली अलताफ अली, अपक्ष १५३


सेना-भाजपची सत्ता; राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक

येवला पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १२ प्रभागांमधील २४ नगरसेवकपदांच्या जागांपैकी राष्ट्रवादीचे १० नगरसेवक पालिकेच्या सभागृहात पोहचले आहेत. शिवसेनेचे ५, भाजपाचे ४ तर अपक्ष ५ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्षांमध्ये शिवसेनेच्या दोघा बंडखोर उमेदवारांचा समावेश आहे.


काँग्रेसला भोपळाच

येवला नगरपालिका निवडणुकीत यावेळेस स्वतंत्र मैदानात उतरणाऱ्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसह नगरसेवकपदांच्या जागांवर काँग्रेसचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. निवडणुकीत काँग्रेसचा पूर्ण सफाया झाल्याचे पाहायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराला दंड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला आरोग्य विभागाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डेंग्यूला कारणीभूत ठरण्यासह कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यात व वेळेत वेतन देण्यात ठेकेदार अपयशी ठरल्याने महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला होता. त्या वेळी ठेकेदाराला नोटीस बजावली होती. मात्र, ठेकेदाराने योग्य खुलासा केला नव्हता. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशान्वये आरोग्याधिकाऱ्यांनी पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला लाखाचा दंड करून मोठा दणका दिला आहे. महापालिकेत प्रथमच ठेकेदाराला एवढा मोठा दंड ठोठावला असून, या कारवाईने ठेकेदाराचे धाबे दणाणले आहे. महासभेपाठोपाठ स्थायी समितीनेही संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली होती. यावर ठेकेदाराने खुलासा सादर केला होता. त्याने कर्मचाऱ्यांना दिलेल्या सुविधांमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले असून, खुलासाही समाधानकारक नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेची मुंसडी, राष्ट्रवादीची पीछेहाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सहापैकी चार नगरपालिकांवर एकहाती सत्ता मिळवताना शिवसेनेने जिल्ह्यात जोरदार मुसंडी घेत पकड अधिक घट्ट केली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला असून, येवल्याबरोबरच सटाणा, मनमाड, नांदगाव नगरपालिकाही गमवावी लागल्याने मोठी पीछेहाट झाली आहे. काँग्रेसचा सुपडासाफ झाला असून, भाजपलाही केवळ एका नगराध्यक्षपदावर समाधान मानावे लागल आहे. सहा नगरपालिकांमधील १३८ जागापैंकी सर्वाधिक ६८ जागांवर शिवसेनेला यश मिळाले आहे.

आगामी काळात जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून सहा नगरपालिका निवडणुकांकडे पाहिले जात होते. त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपने आपली शक्ती पणाला लावली होती. सहापैकी चार नगरपालिकांवर यापूर्वी राष्ट्रवादीचा झेंडा होता. छगन भुजबळांच्या अनुपस्थितीत प्रथमच या निवडणुका होत होत्या. त्यामुळे निकालाकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. आज जाहीर झालेल्या निकालात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीला मोठा झटका बसला असून, शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. जिल्ह्यातील सहापैकी भगूर, नांदगाव, मनमाड व सिन्नर या चार ठिकाणी नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. भगूरमध्ये अनिता करंजकर, सिन्नरमध्ये किरण डगळे, मनमाडमध्ये पद्मावती धात्रक, तर नांदगावमध्ये राजशे कवडे विजयी झाले आहेत.

जिल्ह्यात सर्वांत मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात प्रथमच कमळ फुलले असून, भाजपचे बंडू क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या उषा शिंदे यांच्यावर निसटता विजय मिळवला आहे. येवल्यात राष्ट्रवादीचे १० नगरसेवक निवडून आले असले तरी भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्याने राष्ट्रवादीची मोठीच नाचक्की झाली आहे. सटाणा नगरपालिकाही राष्ट्रवादीने गमावली असून, भुजबळ समर्थक असलेल्या समता परिषदेचे सुनील मोरे यांनी नगराध्यक्षपद मिळवले आहे. भुजबळ यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांच्या मतदारसंघातील नांदगाव, मनमाड या दोन्ही नगरपालिका राष्ट्रवादीने गमावल्या आहेत. सहा नगरपालिकांमध्ये त्यांचे केवळ २५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला हा मोठा झटका मानला जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, केवळ ९ जागा मिळाल्याने काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न निष्फळ

जिल्ह्यात भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. त्यासाठी सिन्नर, मनमाडमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनीही सभा घेतल्या होत्या. भाजपने जिल्ह्यात मोठी फौज उतरवली असतानाही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. सिन्नर, मनमाड, सटाणा, भगूर येथे भाजपला यश मिळेल अशी आशा होती. सिन्नरमध्ये माजी आमदार माणिकराव कोकाटेंच्या नेतृत्वाखाली पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी भाजपला मोठी ताकद लावावी लागणार आहे.

जिल्ह्यातील स्थिती
एकूण सदस्य ः १३८
शिवसेना ः ६८
राष्ट्रवादी काँग्रेस ः २५
भाजप ः २०
काँग्रेस ः ०९
अपक्ष ः १६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लब सदस्यांसाठी आज ‘गेट-टूगेदर’

$
0
0

‘बॉलिवूड हिट्स’चे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोजच्या त्याच त्या रुटिनपासून थोडा विरंगुळा मिळावा, कल्चर क्लब सदस्यांची एकमेकांशी ओळख व्हावी, यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे ‘गेट-टूगेदर’चे आयोजन करण्यात आले आहे. कल्चर क्लबला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कल्चर क्लब मेंबर्ससाठी हे गेट-टूगेदर होणार आहे. तिडके कॉलनीतील ऋग्वेद मंगल कार्यालयात आज (दि. २९) दुपारी ४ वाजता या विशेष कार्यक्रमाची मेजवानी कल्चर क्लबच्या मेंबर्ससाठी आयोजित करण्यात आली आहे.

कल्चर क्लबला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. याचे सेलिब्रेशन अशा कार्यक्रमांद्वारे होत असून यापुढेही विविध कार्यक्रमांची मेजवानी मेंबर्ससाठी कल्चर क्लब घेऊन येणार आहे. आज होणाऱ्या गेट टुगेदरमध्ये प्रसिद्ध गायिका गीता माळी आणि सहकारी यांचा ‘बॉलिवूड हिट्स’ हा बहारदार संगीताचा कार्यक्रम होणार आहे. रेखा, शर्मिला टागोर, हेमा मालिनी अशा अनेक दिग्गज नायिकांच्या प्रत्येकाच्या मनात स्थान मिळविलेल्या प्रसिद्ध गाण्यांचे सादरीकरण यावेळी होणार आहे. त्याबरोबरच विविध गेम्स, बक्षिसं, अंताक्षरी, अल्पोपहार यांचाही समावेश या कार्यक्रमात असणार आहे. एका कल्चर क्लब कार्डवर दोन व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे.

ज्या व्यक्ती कल्चर क्लबचे मेंबर नाहीत व त्यांनाही या गेट टुगेदरमध्ये सहभागी व्हायचे असेल तर थेट कार्यक्रमस्थळी कल्चर क्लबची मेंबरशिप घेता येणार आहे. तसेच कार्ड रिन्यूअलदेखील यावेळी करता येणार आहे. त्यासाठी येताना २९९ रुपयांचा चेक सोबत आणून जमा करायचा आहे.

भरपूर कार्यक्रमांची मेजवानी

कल्चर क्लब मेंबर्ससाठी गेट टुगेदरनंतर २ डिसेंबरला झुम्बा वर्कशॉप, ९ डिसेंबरला महिलांसाठी खास किटी पार्टी, ११ डिसेंबरला तीन पायांची शर्यत हे नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हेरिटेज टूर, एकदिवसीय सहल, संगीत महोत्सव, कुकींग वर्कशॉप, रांगोळी स्पर्धा, प्रसिद्ध तारे तारकांना भेटण्याची संधी, राहुल देशपांडे यांचे सांगितिक कार्यक्रम यासारखे अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम आगामी काळात होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदानाविषयी कार्यशाळेतून जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 'अवयवदान' या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. 'द्या म्हणजे कोणीतरी वाचेल' असे या कार्यशाळेचे ब्रीदवाक्य होते. ही कार्यशाळा नॅशनल ऑरगन अॅन्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (एनओटीटीओ) च्या अंतर्गत घेण्यात आली.

ही संस्था राष्ट्रीय दर्जाची असून भारत सरकारच्या सामान्य आरोग्य सेवा आणि आरोग्य व कुटुंबकल्याण विभागांतर्गत कार्यान्वित असून भारतामध्ये ऑरगन अॅन्ड टिश्यू ट्रान्सप्लांट मध्ये सर्वोच्च केंद्र मानले जाते. एनओटीटीओ संघटनेसाठी डॉ. विमल भंडारी यांनी मोठे योगदान दिलेले आहे. कार्यशाळेच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना प्रश्नावली देण्यात आली. एमबीबीएसच्या विद्यार्थिनी प्राची आणि आर्या पवार यांनी अवयवदानाबद्दल प्रास्ताविक करून ‘अवयवदानाची गरज व गैरसमज’ यावर सविस्तर माहिती दिली. तसेच अवयवदानावर आधारित भावनाप्रधान लघुनाटिका सादर करण्यात आली. या लघुनाटिकेला प्रेक्षकांकडून उस्फूर्त प्रतिसाद लाभला. तृतीय वर्ष एमबीबीएसचे विद्यार्थी अनिश मैनी व संदीप भोर यांनी ‘अवयवदान - एक गरज’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांमधील एका विद्यार्थिनीने केवळ अवयव न मिळाल्याने आपल्या बहिणीला जीव गमवावा लागला होता, असे सांगुन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी अवयवदानावर काम करीत असलेल्या विद्यार्थ्यांना व कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांना शुभेच्छा दिल्या. डॉ वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचा हा उपक्रम अवयवदानाबाद्दलचा दृष्टीकोन हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. एनओटीटीओचे प्राधिकृत अधिकारी डॉ. मेजर जितेंद्रसिंग यांनी कार्यक्रमाच्या शेवटी अवयवदानाबद्दल संक्षिप्त माहिती दिली व उपस्थितांना सर्वसामान्य जनतेला अवयव दानाविषयी प्रवृत्त करण्यास सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किल्ल्यांवरील मंदिरांचे व्हावे सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सह्याद्रीच्या पूर्वेकडील सातमाळा-चांदवड-अजिंठा रांगेत कळवण तालुक्यातील जोडदूर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांचन मांचन किल्ल्यावर दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानची ३७ सावी श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला गेल्यानंतर लक्षात आलेल्या गोष्टींवरून जिल्ह्यातील किल्ल्यांवरील मंदिरांचे व्हावे सर्वेक्षण व्हावे, असे आवाहन दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

कांचन-मांचन या किल्ल्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी कुठेही दिशादर्शक फलक नाही की पायवाटदेखील नाही. किल्ल्याचा अंदाज घेत चढाई करावी लागते. किल्ल्यावर चढताना प्राचीन हेमांडपंथी नारायण मंदिर नजरेस पडते. प्राचीनकालीन दगडी मंदिर असून अनेक शिल्प या ठिकाणी विखुरलेले आहेत. जिल्ह्यात सत्तर गडकिल्ले असून याठिकाणी शेकडो प्राचीन मंदिरे आहेत. दुर्ग संवर्धनच्या या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, भीमराव राजोळे, किरण बेलेकर, वसंत वडनेरे, आशिष बनकर, आकाश जाधव, अजित जगताप आदींसह पुरी गावातील ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आय-गेन’ची अंतिम फेरी गुरुवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोखले एज्युकेशन सोसायटी २०१८ मध्ये शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून या निमित्ताने ‘आय-गेन’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी संस्थेच्या विविध कॉलेजांकडून अनेक शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्युनिअर कॉलेजांसाठी याचे आयोजन केले जाणार आहे.

संस्थेच्या केंद्रीय समन्वय समितीतर्फे २०१५ पासून संस्था पातळीवर सुगम संगीत, वक्तृत्व व काव्यवाचन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेज स्तरावर या स्पर्धांची प्राथमिक फेरी ऑक्टोबर महिन्यात पार पडली. तसेच आंतरमहाविद्यालयीन द्वितीय फेरी नोव्हेंबर महिन्यात त्या-त्या विभागांनुसार घेण्यात आली. या स्पर्धांची अंतिम फेरी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये १ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेत संस्था पातळीवर मुंबई, पालघर, व नाशिक विभागातून यशस्वी ठरलेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा जूनमध्ये; प्रवेश आताच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नर्सरीचे प्रवेश एप्रिल-मे महिन्यानंतर शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसारच देणे सुरू करावे, अशा सूचना असतानाही शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रवेशाच्या जाहिराती झळकवणे सुरू केले आहे. दरवर्षी गाजत असलेल्या प्रवेशप्रक्रियेच्या या मुद्द्यावर अद्यापही ठोस उपाय निघत नसल्याने पालकवर्ग नाहक या प्रक्रियेत भरडला जात आहे. नियमबाह्य प्रवेशप्रक्रिया राबविणाऱ्या या शाळांना कारवाईचीही भीती वाटत नसल्याने व्यवस्थेवर शंका उपस्थित केली जात आहे.

पूर्वप्राथमिक म्हणजेच नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजीमध्ये प्रवेश घ्यायचा म्हटला तरी पालकांना घाम फुटतो. अवाढव्य फी, कागदपत्रांसाठी करावी लागणारी धावपळ, रात्रंदिवस रांगांमध्ये उभे राहून प्रवेश मिळविण्याची धडपड अशा अनेक कारणांमुळे पाल्याचा प्रवेश शाळेत करणे हे पालकांना एका मोठ्या आव्हानासमान झाले आहे. त्यातच शाळांनी शासनाचे सर्व नियम, अटी धाब्यावर बसवलेले असताना कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा, या चिंतेने पालकांना सध्या ग्रासले आहे. यंदाच्या वर्षीही अशीच परिस्थिती असून जून २०१७ साठी शाळांनी जाहिराती झळकवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीही प्रवेशप्रक्रियेची अशाच प्रकारे घाई शाळांनी केल्याची उदाहरणे असून विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होईपर्यंतचा मनस्ताप पालकांना सहन करावा लागला होता. यंदाही त्याचप्रकारे प्रवेशप्रक्रिया राबविली जात असल्याने पालकांचा गोंधळ उडाला आहे. एकीकडे प्रवेश मिळेल की नाही याची चिंता तर दुसरीकडे शाळांची मुजोरी, नियमांची पायमल्ली करणारे प्रशासन या गर्तेत पालक अडकले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी प्रवेशांचे वेळापत्रक मिळत नाही तोपर्यंत प्रक्रिया सुरू न करण्याचे आवाहन शाळांना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ २३६ वृक्षांवर कुऱ्हाड?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीतील नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेले २३६ वृक्ष तोडणे आवश्यक असल्याचा अहवाल उद्यान अधीक्षकांनी दिला आहे. शक्य त‌ितक्या वृक्षांचे पुनर्रोपण आणि तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात नॅशनल हायवे ऑफ अॅथॉरिटीकडून (न्हाई) एकास दहा वृक्ष लावण्याची सक्ती करण्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरणाआड येणाऱ्या सर्वच्या सर्व २३६ वृक्षांची तोड होण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. ३०) होणाऱ्या वृक्ष प्राध‌िकरणाच्या बैठकीत या झाडांसदर्भातील निर्णय घेतला जाणार असून, या बैठकीकडे वृक्षप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.

नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण केले जात असून, यात महापालिकेच्या हद्दीत सिन्नर फाटा ते मनपा हद्दीपर्यंत २३६ वृक्ष रुंदीकरणाच्या आड येत आहे. नॅशनल हायवे ऑफ अॅथॉरिटीने पालिकडे ही झाडे तोडण्याची परवानगी माग‌ितली होती. त्यामुळे गेल्या वेळेस झालेल्या वृक्ष प्राध‌िकरणाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळेस अध्यक्ष व आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी उद्यान अधीक्षक महेश तिवारी यांना ‘न्हाई’च्या मदतीने पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. तिवारी यांनी अधिकाऱ्यांसोबत या झाडांची पाहणी केली असून, त्यांसदर्भातील अहवाल आयुक्तांना सादर केला आहे.

हा रस्ता ६० मीटर रुंदीचा असल्याने कोणताही वृक्ष वाचत नसल्याचे अहवालात म्हंटले आहे. जेवढ्या वृक्षांचे पुनर्रोपण करणे शक्य आहे, त्या वृक्षांचे एक किलोमीटर क्षेत्रात पुनर्रोपण करावे व एका वृक्षाची तोड केल्यानंतर त्याच्या बदल्यास एक किलोमीटर क्षेत्रात दहा वृक्षांची लागवड करावी, असा अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरणाच्या आड येणारी सर्व वृक्ष काढावी लागणार आहेत. त्यामुळे या वृक्षांवर कुऱ्हाड चालण्याची शक्यता अधिक आहे. बुधवारी होणाऱ्या वृक्ष प्राध‌िकरणाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


चार सदस्यांचा फैसला

वृक्षप्राध‌िकरण समितीमध्ये सामाजिक संस्थांचे प्रतिन‌िधी म्हणून चार सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. परंतु या सदस्यांकडे सामाजिक वणीकरण विभागाचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांची नियुक्ती रखडली होती. या सदस्यांनी आता वणीकरणाचे प्रमाणपत्र मिळवले असून, ते समितीला सादर केले आहे. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत या चार सदस्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’त अडकल्या घंटागाड्या

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने कचरा संकलन करण्यासाठी घरोघरी पोहोचण्यासाठी घंटागाडीची अभिनव योजना राबविली आहे. यातील नवीन घंटागाड्यांचे नुकतेच उद््घाटन झाले. मात्र, उद््घाटन होऊनदेखील त्या कचरा संकलनासाठी उपलब्ध नसल्याचे आढळल्याने अधिक माहिती घेतली असता संबंधित घंटागाड्या ‘आरटीओ’च्या पासिंगमध्येच अडकल्या असल्याचे समोर आले आहे. पासिंगच नसताना घंटागाड्यांच्या उद््घाटनाची सत्ताधारी मनसेला एवढी घाई का झाली, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यातच जुन्या घंटागाड्यांची दुरुस्ती होत नसल्याने किरकोळ दुरुस्तीअभावी त्या पडून असल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याची स्थिती आहे. खासगी ठेकेदाराकडून पडून असलेल्या जुन्या घंटागाड्यांची दुरुस्ती आरोग्य विभागाने करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

माजी महापौर प्रकाश मते यांच्या संकल्पनेतून घंटागाडी योजना महापालिकेने सुरू केली होती. त्यानंतर महापालिकेने स्वमालकीच्या शंभराहून अधिक घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. परंतु, घंटागाड्यांचे कंत्राट खासगी ठेकेदाराला दिल्याने महापालिकेच्या घंटागाड्यांद्वारे ठेकेदाराकडून कचरा संकलनाचे काम केले जात आहे. मात्र, अशा महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या अनेक घंटागाड्यांची दुरुस्तीच ठेकेदाराने केली नसल्याने अनेक घंटागाड्या किरकोळ दुरुस्तीअभावी वापराविना पडून आहेत. याताल अनेक घंटागाड्यांचे पार्टही चोरीला गेल्याचे समोर आले आहे. त्यातच महापालिकेने नुकतेच नवीन घंटागाड्यांचे उद्घाटन गोल्फ क्लब मैदानावर करण्याची मोठी घाई केली. मात्र, उद्घाटन करण्यात आलेल्या घंटागाड्यांचे ‘आरटीओ’ने पासिंगच केले नसल्याने उद्घाटन होऊनही त्या केवळ शोभेच्याच वस्तू म्हणून आजही विल्होळीच्या एका गोडाऊनमध्ये उभ्या आहेत. याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलणे टाळत मोबाइलच उचलणे नापसंत केले. घंटागाड्यांचे पासिंगच झालेले नसताना त्यांच्या उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली, असा सवालही त्यामुळे उपस्थित केला जात आहे. या घंटागाड्यांचे पासिंग नसल्यानेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्घाटनासाठी न येणे पसंत केल्याचे एका बड्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

जुन्यांची दुरुस्ती रखडली

जुन्या घंटागाड्यांची दुरुस्ती महापालिका ठेकेदाराकडून का करून घेत नाही? यात ठेकदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे काही आर्थिक हितसंबंध आहेत का? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी सर्वसामान्य शहरवासीयांनी केली असून, तातडीने उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोखले कॅम्पसमध्ये बेकायदा वृक्षतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेजरोड परिसरातील गोखले कॅम्पस एज्युकेशन सोसायटीच्या आवारातील सुमारे पाच वृक्षांची बेकायदा छाटणी आणि वृक्षतोड केल्याच्या तक्रारी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, कॅम्पसच्या आवारात संस्थेच्या वतीने कुठलीही वृक्षतोड झाली नसल्याचा दावा प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी केला आहे.

‍शहरातील सर्वात जुन्या एज्युकेशनल कॅम्पसमध्ये गोखले कॅम्पसची गणना होते. या कॅम्पसचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वडासारख्या दुर्मीळ अन् जुन्या महाकाय वृक्षांनी हा कॅम्पस नटला आहे. कॅम्पसमधीलच एसएमआरके कॉलेज गेटकडील बाजूने आत आल्यानंतर उजव्या हाताला लागणाऱ्या कॉलेज कॅन्टीनच्या मागील बाजूस वृक्षतोडीचा प्रकार घडल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त झाली आहे. कॅम्पसच्या आवारात गाड्यांच्या पार्किंगची समस्याही डोकेदुखी ठरत आहे. यावर उतारा म्हणून हा सोसायटीने हा मार्ग अवलंबल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. कुठलेही झाड छाटायचे किंवा तोडायचे असल्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अशी कुठलीही परवानगी संस्थेने घेतली नसल्याची माहिती उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांनी दिली. या संदर्भात तीन तक्रारीही महापालिकेकडे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मात्र तोडलेल्या वृक्षांच्या जागेवर शेकोट्या पेटवून त्या राखेवर मुरूम अन् पालापाचोळा टाकून घटनास्थळी दृश्य ‘जैसे थे’ करण्याचा प्रयत्नही येथे करण्यात आल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात संस्थेला मनपातर्फे नोटीस बजाविण्यात येणार आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेता गोखले कॅम्पसमधील पाच वृक्ष तोडण्यात आल्याप्रकरणी पंचनाम्यादरम्यान निदर्शनास आले आहे. याबाबत मनपातर्फे संस्थेला नोटीस पाठविण्यात येणार आहे.

- राजेंद्र पांडे, उद्यान निरीक्षक, महापालिका

मंगळवारी नेहमीप्रमाणे कॉलेजमध्येच होतो. दुपारी चार वाजेपर्यंत वृक्षतोडीसंदर्भात कुठलाही विषय माझ्यासमोर आला नाही. माझ्यासमोर वृक्षतोड झालेली नाही. तरीही, या संदर्भात अधिक माहिती घेऊन शहानिशा करू.

- व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य, एचपीटी अॅण्ड आरवायके कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images