Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आता येणार ई-चलन!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet: @ArvindJadhavMT
बेशिस्त पार्क होणाऱ्या वाहनांना आवर घालण्यासाठी शहर पोलिस लवकरच ‘ई-चलन’पध्दतीचा अवलंब करणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दंड वसुली होणार असून, पोलिसांच्या नोट‌िशीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनमालकास थेट कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी नुकतीच दंडाच्या रकमेत भरघोस वाढ केली आहे. नवीन रकमेनुसार दंड वसुलीचे काम सुरू झाले असताना आता शहर पोलिसांनी आपला मोर्चा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवला आहे. ‘ई-चलन’हा त्याचाच भाग असून, पुढील काही दिवसांतच ही प्रक्रिया राबवली जाईल, असे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. ई-चलन पध्दतीचा वापर सध्या मर्यादीत होणार आहे. विशेषतः पार्किंग नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे ई-चलन फाडले जाईल.
ई-चलनाची गरज
आजमितीस बेशिस्त पध्दतीने वाहने उचलणाऱ्या वाहनांवर पोलिस जागेवर दंडात्मक कारवाई करतात. किंवा ही वाहने उचलून शरणपूर रोडवरील वाहतूक विभागाच्या कार्यालयात जमा केली जातात. यामुळे वाहनांचे नुकसान होणे तसेच आर्थिक गैरप्रकार होणे याविषयी तक्रारी येतात. विशेषतः चारचाकी वाहनमालकांकडून ही ओरड नेहमीच होते. या पार्श्वभूमीवर ई-चलन ही पध्दत फायदेशीर ठरू शकते.
अशी असेल पध्दत
ई-चलन पध्दतीचा वापर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने काही सुधारणा केली जाईल. रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्क असल्यास वाहतूक पोलिस सदर वाहनाचा फोटो काढून घेईल. त्यापूर्वी वाहनावर कारवाईबाबतचे स्ट‌िकर लावले जाईल. हा फोटो लागलीच वाहतूक शाखेतील यंत्रणेला पाठवण्यात येईल. तेथे वाहन क्रमांकाच्या मदतीने वाहनाच्या मूळ मालकाचे नाव आणि पत्ता शोधून काढला जाईल. या पत्त्यावर सदर वाहनाचा फोटो, दंडाची रक्कम व इतर माहिती नोटिशीद्वारे धाडली जाईल. नोटीस मिळाल्यानंतर सात ते आठ दिवसांच्या आत वाहनचालकाने वाहतूक शाखेत दंडाची रक्कम भरली नाही, तर हे प्रकरण कोर्टात पाठवले जाईल. कोर्टात सुनावणीनंतर दंडाची रक्कम भरण्यासह शिक्षाही होऊ शकते. अनेकदा वाहनचालक जुनी वाहने खरेदी करतात. मात्र, त्या वाहनांचे हस्तांतरण केले जात नाही. ई-चलन पध्दतीमुळे वाहतूक पोलिसांची नोटीस थेट मूळ मालकालाच मिळेल. मूळ मालकाची जबाबदारीदेखील यामुळे वाढणार आहे. तसेच अवैध पध्दतीने होणाऱ्या वाहन खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेलाही चाप बसेल.

ई चलन सुरू करण्यासाठी नुकतीच एक बैठक पार पडली. आगामी काही दिवसांत या पध्दतीने दंड वसुलीस सुरुवात होईल. यामुळे वाहनचालकास दंड भरणे किंवा कोर्टात हजर होणे एवढ्याच दोन पर्यायांना समोरे जावे लागेल. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
-विजय पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेट्रोलपंपांवरून तूर्त कॅश नाही

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर बँकांमधील गर्दी कमी होत नसल्यामुळे केंद्र सरकारने आता पेट्रोलपंपांमध्ये डेबिट कार्डधारकांना दोन हजार रुपये काढता येणार असल्याची घोषणा केली. पण, ही सुविधा तूर्त नाशिक जिल्ह्यातील ८०० हून अधिक असलेल्या पेट्रोलपंपांवर मिळणार नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. जिल्ह्यात एकाही पेट्रोलपंपावर स्टेट बँकेचे स्वाइप मशिन नाही. त्यामुळे इतर खासगी बँकांचे स्वाइप मशिन असणाऱ्या या पेट्रोलपंपांवर ही सुविधा मायक्रो स्वाइप मशिन बसवल्यानंतर मिळणार आहे. त्यासाठी तीन दिवसांचा अवधी सांगितला असला, तरी त्याला वेळ लागणार आहे.

जिल्ह्यात भारत व इंडियन आॅइल या दोन्ही पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या पेट्रोलपंपांवर एचडीएफसीचे स्वाइप मशिन आहे, तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपावर आयसीआयसी बँकेचे स्वाइप कार्ड आहे. या दोन्ही बँकांनी दिलेल्या या मशिन कॅश काढण्यासाठी उपयोगी नाहीत. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या मशिन पेट्रोलपंपांवर द्याव्या लागणार असून, त्यानंतर या पंपांवर ही सुविधा मिळणार आहे. स्टेट बँकेच्या स्वाइप मशिन असलेल्या देशभरातील २५०० पेट्रोलपंपांवर ही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे या पेट्रोलपंपांवरून शुक्रवारपासून दोन हजार रुपये काढता येत आहेत.

कॅशचा प्रश्न

पेट्रोलपंपांवर पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना सुट्या नोटांची मोठी टंचाई जाणवू लागली आहे. दोनशे रुपयांचे पेट्रोल घेणाऱ्यांना तीनशे रुपयांचे सुटे पैसे आल्यानंतर ते दिले जात आहेत. त्यामुळे डेबिट कार्डचा वापर करणाऱ्या या पेट्रोलपंपांवर सुट्या पैशांचा प्रश्न कायमच राहणार आहे.

बँक कॅश देईल, पण केव्हा?

सध्या बँकांतील गर्दीमुळे पेट्रोलपंपधारकांना आपला भरणा करण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे बँकेने कॅश दिली, तर त्यासाठी किती वेळ पेट्रोलपंपधारक रांगेत उभे राहील, हा प्रश्न आहे. त्यासाठी स्वतंत्र काही उपाययोजना केली गेली, तरच पेट्रोलपंपधारक ही मागणी पूर्ण करू शकेल.

---

जिल्ह्यातील भारत, हिंदुस्थान व इंडियन आॅइलच्या पेट्रोलपंपावर स्टेट बँकेचे स्वाइप मशिन नाही. या सर्व पंपांवर एचडीएफसी व आयसीआयसीचे स्वाइप मशिन आहे. त्यामुळे मायक्रो स्वाइप मशिन दिल्यानंतरच पेट्रोलपंपांवर ही सुविधा मिळणार आहेत.

-नितीन धात्रक, पेट्रोलपंपचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्या जिवांवर उपासमारीची वेळ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे एकीकडे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत असतानाच या निर्णयाचा फटका मुक्या प्राण्यांनादेखील बसल्याचे दिसून येत आहे. शहरातील आजारी असलेली मोकाट जनावरे, तसेच पाळीव जनावरांचा सांभाळ करणाऱ्या शेल्टर हाउसला भेडसावणाऱ्या आर्थिक चणचणीमुळे येथील मुक्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयामु‍ळे ‘आवास’सारख्या मुक्या प्राण्यांचे आश्रयस्थान असलेल्या व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. येथील बैल, घोडे, कुत्रे, मांजर, वानर यांसारख्या प्राण्यांना दररोज चारा, तांदूळ, डॉग फूड आदी प्रकारचे खाद्य लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संस्थेला सुट्या पैशांची चणचण भासत असल्याने आणि कोणी उधारदेखील देत नसल्याने या मुक्या प्राण्यांना एक वेळचे जेवण पुरविणेदेखील अवघड बनले आहे. नोटाबंदीच्या गडबडीत दात्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती गंभीर बनली असल्याची माहिती ‘आवास’ या प्राणी शेल्टरच्या भारती जाधव यांनी ‘मटा’ला दिली. त्यामुळे अशा संस्थाना कुठेतरी दिलासा दिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांच्या रांगा घटल्या, एटीएमच्या वाढल्या!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर बँकेत पैसे भरण्यासाठी तसेच बदलण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या रांगा शुक्रवारी कमी झाल्या असल्या तरी एटीएमसमोरील रांगा मात्र वाढल्या आहेत.

औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना असलेल्या साप्ताहिक सुटीमुळे आज पुन्हा बँकांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नोटा रद्द झाल्यानंतर बँकांची सेवा एका दिवसाच्या विश्रांतीनंतर अव्याहत सुरूच आहे. पैसे भरणे, काढणे व नोटा बदलून देणे, याव्यतिरिक्त बँकेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. या नऊ दिवसांत शनिवार, रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या, तर सोमवारी मात्र एका दिवसाची सुट्टी मिळाली. त्यानंतर मात्र बँका सलग सुरू आहेत. आता या रविवारी बँका सुरू राहतील की नाही, याबाबत कोणतीही घोषणा नसल्यामुळे शनिवारी या गर्दीत वाढ होणार आहे.

जिल्ह्यातील बँकांची एटीएमची एकत्रित माहिती नसल्यामुळे ६५०हून अधिक एटीएम असल्याचे बोलले जात होते. पण आता बँकांच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सर्व बँकांकडून माहिती घेतल्यानंतर हा आकडा ९०३ असल्याचे समोर आले आहे. यातील काही एटीएमवर आता दोन हजारांच्या नोटा मिळू लागल्यामुळे बँकांवरील भार कमी होणार आहे.
कॅश उपलब्ध
सुरुवातीला नोटांच्या कमी उपलब्धतेमुळे अनेक बँकांना त्रास सहन करावा लागला. वाढलेली गर्दी व कमी कर्मचारी संख्या यामुळे बँकांसमोर अडचणी असताना कॅश शॉर्टेजच्या प्रॉब्लेममुळे ग्राहकांशी हुज्जत व वादही सुरू झाले होते. पण आता कॅश प्रॉब्लेम बऱ्यापैकी सुटल्यामुळे बँकांना दिलासा मिळाला आहे. स्टेट बँकेकडे ३१७ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत, तर इतर बँकांकडे पैसे आले आहेत.
दोन हजार मर्यादेचा गर्दीवर परिणाम
नोटा बदलण्यासाठी होणारी गर्दी व त्यातून गैरफायदा घेण्याचे प्रकार यामुळे बँकाना होणारा त्रास शुक्रवारी कमी झाला. नोटा बदलीसाठी येणाऱ्या ग्राहकांना दोन हजार रुपयेच मिळणार असल्यामुळे त्याचाही गर्दीवर परिणाम झाला, तर दुसरीकडे शाईमुळेही गर्दी ओसरलेली जाणवली.

स्टेट बँकेत ४१ कोटी

स्टेट बँकेच्या ग्रामीण ३५ शाखांमध्ये ४१ कोटी ९८ लाख रुपये जमा झालेत. तर एक कोटी ५८ लाखांच्या नोटा बदलून देण्यात आल्या. विशेष म्हणजे ३० कोटी २० लाखांचे पेमेंटही करण्यात आले. त्याचप्रमाणे एटीएमवरुन दोन कोटी २६ लाख रुपये ग्राहकांनी काढले. या बँकेचे ६२ एटीएम असून त्यातील ६० एटीएम सुरू झाले आहेत. त्यातील १७ एटीएमवर दोन हजारांच्या नोटा काढण्याची व्यवस्था सुरू झाली आहे. तर ४३ एटीएमवर अद्याप शंभरच्या नोटांचा भरणा करण्यात येत आहे. अशीच स्थिती थोड्या-अधिक फरकाने इतर बँकांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा जाळल्याची थेट करा तक्रार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात कचरा बिनदिक्कतपणे कचरा जाळण्याचे प्रकार घडत असल्याची बाब महापालिका आयुक्तांनी गांभिर्याने घेतली आहे. त्यामुळेच कचरा जाळण्याची तक्रार थेट महापालिकेच्या वेबसाइटवर, मोबाइल अॅपवर किंवा ७०३०३००३०० या व्हॉटसअॅप क्रमांकावर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. यामुळे पालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येण्याची चिन्हे आहेत.

शहर परिसरात महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी सर्रास कचरा जाळत असल्याची तक्रार यापूर्वीच महापालिका प्रशासनाकडे आली आहे. तसेच, सामान्य नागरिकही थेट कचरा जाळत आहेत. हे प्रकार शहराच्या विविध भागात सर्रास केले जातात. मात्र, राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी सर्वच प्रकारचा कचरा, पाला-पाचोळा, प्लॅस्ट‌िक कचरा, रबर इत्यादीच्या जाळण्याबाबत प्रतिबंध केला आहे. तरीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये रोख दंड आकारण्याचे निर्देशही लवादाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी महापालिकेने करण्याचे निश्चित केले आहे. तशी घोषणा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. तरीही कचरा जाळण्याचे प्रकार घडत असल्याची दखल घेत आयुक्तांनी आता तक्रारीसाठी तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यात महापालिका वेबसाइट, विभागीय कार्यालये, मोबाइल अॅप आणि व्हॉटसअॅप हेल्पलाइनचा समावेश आहे. तक्रारीसाठी थेट पर्याय उपलब्ध झाल्याने पालिकेकडे तक्रारी येण्याबरोबरच कचरा जाळण्याच्या प्रकारालाही आळा बसणार आहे.

असा असेल दंड

पालापाचोळा जाळणे तसेच कचरा जाळण्याच्या प्रथम गुन्ह्याच्या वेळेस पाच हजार रुपये रोख दंड आकारण्यात येईल. मात्र, अशीच घटना संबंधितांकडून दुसऱ्यांदा घडल्यास दंडाची आकारणीबरोबरच कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. कचरा जाळण्याच्या घटनेत महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग राहिल्यास त्याच्याविरुद्ध प्रथम वेळेस पाच हजार रुपये रोख दंड वसुली करण्यात येईल. आणि दुसऱ्या घटनेनंतर त्यांच्याकडून पाच हजार रुपयांच्या दंड वसुलीबरोबरच त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्न तडीस लावणार

$
0
0

मनमाड येथे प्रचारसभेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गरिबांचे सरकार आहे. विकासाची गंगा तळागाळापर्यंत नेण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ देत मनमाड पालिकेत भाजपचे उमेदवार निवडून द्या. मनमाड शहराला स्मार्ट सिटी बनविल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मनमाडचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भाजप हाच सक्षम पयार्य असल्याचे प्रतिपादन राज्याच्या बालविकास व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

मनमाड पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार कुसूम दराडे व विविध प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. आयुडीपी भागात झालेल्या या जाहीर सभेत व्यासपीठावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, निवडणूक प्रभारी अद्वय हिरे, जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, उपाध्यक्ष नितीन पांडे, बापूसाहेब पाटील, नारायण पवार, माजी आमदार संजय पवार, कामगार आघाडीचे राजाभाऊ पवार, उमाकांत रॉय, नारायण फुलवाणी, शहराध्यक्ष जय फुलवाणी, नगरसेवक सचिन दराडे, नगराध्यक्ष उमेदवार कुसूम दराडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पंकजा मुंडे पुढे यांनी मोदी सरकारच्या कार्याचा गौरव करीत स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले. मोदींनी काळ्या धनावर टाच आणली. गरीब माणसाला श्रीमंतांच्या रांगेत नेऊन बसवले. या निर्णयामुळे थोडा त्रास होईल, पण सहन करा. देश बदलतोय, आपणही बदलले पाहिजे, असा मूलमंत्र देत स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला निवडून परिवर्तन घडवा, असे आवाहन केले. यावेळी भाजपचे निवडणूक प्रभारी अद्वय हिरे, दादाजी जाधव, बापूसाहेब पाटील, नितीन पांडे, पंकज खताळ यांची भाषणे झाली. यावेळी पंकजा मुंडे यांच्या हस्ते भाजप निवडणूक जाहिरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. अंकुश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मोदींचा झटका

आता पैशाला पाहून नव्हे माणसांना पाहून लोक मतदान करतील. कारण निवडणुकीत भ्रष्टमार्गाने जाणाऱ्यांच्या हातात लोकांना वाटण्यासाठी मोदींनी पैसाच ठेवला नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

पाणीप्रश्न सोडवणार

मनमाडचा पाणीप्रश्न गंभीर आहे. भाजपचा थेट नगराध्यक्ष व उमेदवार निवडून द्या, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाण्याची योजना आम्ही पूर्ण करणार आणि नारळ फोडायला मनमाडला मीच येणार, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नांदगावमध्ये परिवर्तन घडवा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात विकास योजनांची लाट आलेली असताना नांदगावसारखी गावे आजही बकाल आणि उपेक्षित आहेत. या गावात सुधारणा आणण्यासाठी व भकासपणाचे हे चित्र बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पालिकेत पाठवा. नांदगावचा पाणीप्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदगाव येथे दिली.

नांदगाव नगरपालिकेचे थेट नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार संजय सानप व नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नांदगाव येथे गांधी चौकात झालेल्या जाहीरसभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार संजय पवार, जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, राजाभाऊ बनकर, भाऊराव निकम, दत्तराज छाजेड आदींची भाषणे झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेनेला दूर सारून भाजपला संधी द्या. नांदगाव पालिकेत परिवर्तन घडवा, असा सूर विविध वक्त्यांनी व्यक्त केला.

नाराजीचे सूर

पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात करताना भाजपच्या जिल्हा व तालुक्यातील उपस्थित पदाधिकाऱ्यांची नावे घेतली. पण त्यांच्या भाषणात तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांचे नाव न आल्याने काही कार्यकर्त्यांनी सभा सुरू असतानाच पंकजा मुंडे यांच्याकडे आक्षेप नोंदवला. यावेळी मला जी नावे देण्यात आली ती मी घेतली. मला सर्वांबद्दल आदर आहे, असे त्या म्हणाल्या. मात्र तालुकाध्यक्षांचे नाव दिले गेले नाही हे काही योग्य नव्हे असेही त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी गँगचा २४ रोजी फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील परदेशी गँगवर मोक्का कलमानुसार कारवाई होणार की नाही, याबाबत २४ नोव्हेंबर रोजी विशेष कोर्ट आपला फैसला सुनावणार आहे. हनुमानवाडी परिसरातील भेळविक्रेता सुनील वाघ खून प्रकरणात परदेशी गँगमधील संशयितांना अटक करण्यात आली असून, राज्याचे अपर पोलिस महासंचालक एस. पी. यादव यांनी संशयितावर मोक्का कलमानुसार कारवाई होऊ नये, असा अभिप्राय दिला आहे. यामागे राजकीय व्यक्तीच्या माध्यामतून मोठे अर्थकारण झाल्याची तक्रार मृत सुनीलच्या भाऊ व आईने विशेष मोक्का न्यायालयात केली होती.

फिर्यांदीच्या अर्जावर शनिवारी विशेष कोर्टात युक्तिवाद झाला. सदर तक्रार अर्जाबाबत येत्या २४ नोव्हेंबर रोजी कोर्ट आपला निर्णय देणार आहे. परदेशी गँगने सुनील वाघची हत्या केल्यानंतर फिर्यादी मंदाकिनी वाघ यांनी सुरुवातीस चार आरोपींची नावे सांगितली होती. तर या घटनेतील गंभीर जखमी हेमंत वाघच्या जबाबानंतर पोलिसांनी अठरा आरोपी केले. तसेच पोलिसांनी आरोपींची ओळखपरेड घेतली नाही, असा ठपका ठेवत यादव यांनी संशयितावर मोक्का कलमानुसार चार्जशीट दाखल करण्यास परवानगी नाकरली. यानंतर, वाघ मायलेकाने विशेष न्यायालयात तक्रार करून हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठविण्याची विनंती केली होती.

या अर्जावर आज विशेष कोर्टात युक्तिवाद झाला. जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, अ‍ॅड. देशपांडे व संशयितातर्फे अॅड. मंदार भानोसे, राहुल कासलीवाल व यतीन वाघ यांनी युक्तिवाद केला. अपर पोलिस महासंचालकांनी संशयितावर मोक्का कलमानुसार कारवाई करण्यास मंजुरी नाकारली असून, तो प्रस्ताव पुन्हा फेरविचारासाठी पोलिस महासंचालकांकडे पाठविण्याचा अधिकार विशेष कोर्टाला नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. सरकारी वकिलांनी हा मुद्दा खोडून काढत कोर्टात आलेल्या तक्रारीची दखल घेण्याचे अधिकारी कोटाला असल्याचे सांगितले.

मोक्का का नाही?

परदेशी व सिडकोतील टिप्पर गँगवर झालेल्या कारवाईची रूपरेखा जवळपास सारखी आहे. मात्र, तरीही टिप्पर गँगमधील जवळपास सहा जणांना मोक्का लागू झाला. तर, परदेशी गँगवरील एकाही सदस्यावर मोक्का कलमचा वापर करता येणार नाही, असा विरोधाभास पुढे आला. पोलिसांनी तपासात त्रुटी का ठेवल्या, टिप्परप्रमाणे या गुन्ह्याला मंजुरी का मिळाली नाही, पैशांच्या आरोपांचे काय असे प्रश्नदेखील समोर आले आहेत. सदर गुन्ह्यानंतर राजकीय व आर्थिक मदतीचा मोठा वापर झाल्याचा आरोप होत असून, २४ नोव्हेंबर रोजी काय निकाल येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतुकीचा उडाला फज्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बहुजन महामोर्चाला किती गर्दी होईल, याबाबतचा प्रशासनाचा अंदाज साफ चुकला. यामुळे सकाळी ११ वाजेनंतरच शहरातील बहुतांश रस्ते वाहनांनी तुडंब भरले. द्वारका, मुंबई नाका, इंदिरानगर अंडरपास, लेखानगर चौफुली यांसह मुख्य शहरातील वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला. नियोजनच कोलमडल्याने सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले.

अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करू नये, कोपर्डीतील बलात्काऱ्यांना फाशी द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाचे स्वरूप नक्की कसे असेल याचा अंदाजच पोलिसांसह जिल्हा प्रशासनाला बांधता आला नाही. परिणामी सकाळपासूनच वाहतुकीची समस्या सतावू लागली. दुपारच्या वेळी तर वाहतूक कोंडीने उग्र रूप धारण केले. कोणत्या रस्त्यावर वाहतूक बंद आहे, पर्यायी रस्ता कोणता याचा अंदाजच वाहनचालकांना नसल्याने सर्वांचा गोंधळ उडाला. यामुळे बसव्यवस्थाही कोलमोडून पडली. अनेक बस वेळेत धावू शकल्या नाही. यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. दुर्दैवाने त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. संध्याकाळपर्यंत मोर्चेकऱ्यांची गर्दी होती. त्यातच शाळा सुटल्याने विद्यार्थ्यांना हालअपेष्ठ सहन कराव्या लागल्या. विशेषतः शालिमार, सीबीएस, एमजीरोड या परिसरातील विद्यार्थ्यांना पायपीट करीत घरी पोहोचावे लागले. वाहतूक कोंडीची सर्वांत जास्त झळ द्वारका ते लेखानगर या दरम्यान जाणवली. मुंबई नाक्याकडे येणारी वाहतूक सर्व्हिसरोड, तसेच हायवेने इंदिरानगरकडे काढण्यात आली होती. या वाहनांनी इंदिरानगर अंडरपास, तसेच लेखानगर जंक्शन येथून पलिकडे जाण्याचा प्रयत्न केला. यात छोट्या-मोठ्या वाहनांसह बसेसही होत्या. टर्निंग रेडिअस उपलब्ध नसल्याने मोठी वाहने अडकून पडली. त्यामुळे सुरू झालेली वाहतूक कोंडी कित्येक तास कायम होती. अगदी पोलिसांनादेखील आपले वाहन पुढे घेऊन जाताना त्रास सहन करावा लागला.

वाहनचालकांची नाराजी

मोर्चाला किती मोर्चेकरी येणार याचा अंदाज बांधून पोलिसांनी पर्यायी व्यवस्था उभी केली असती, तर नाशिककरांचा त्रास कमी झाला असता. दुर्दैवाने पोलिसांनी वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याची भावना वाहतूक कोंडीत सापडलेल्या वाहनचालकांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ महिलेचा खून की अपघात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील जेहान सर्कल येथे मृतदेह आढळून आलेल्या महिलेच्या मृत्युबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या अहवालानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरी प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे समोर येत आहे. सध्या तपास सुरू असून, ठोस पुरावे समोर आल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी सांगितले.

डिसुझा कॉलनी येथील दप्तरी हाऊस येथे राहणाऱ्या सुधा दिनकर दप्तरी (७६) यांचा मृतदेह शुक्रवारी (१८ नोव्हे.) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिटी बँकेसमोरील डिव्हायडरमध्ये आढळून आला होता. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालानुसार, दप्तरी यांच्या गळ्यावर व डोक्यावर वार करण्यात आल्याच्या जखमा असून, त्या अपघातानंतर होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा अहवाल पोलिसांना देण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे प्राथमिक चौकशीनंतर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याचे समोर येत आहे.

सकाळी सहा वाजेच्या सुमारास अंधार होता. यात काहीतरी मोठा आवाज झाल्याचे परिसरातील एक वॉचमनसह महिलेने ऐकले. त्यांचा जबाब पोलिसांनी घेतला. अपघातस्थळाजवळच दप्तरी यांचे बुट आढळून आले आहे.

या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत असल्याचे पीआय कुटे यांनी स्पष्ट केले. पोलिसांचा तपास दोन्ही शक्यतांवर सुरू असून, समोर येणाऱ्या पुराव्यांआधारेच दप्तरी यांचा मृत्यू अपघातात झाला असावा असे पोलिस निरीक्षक कुटे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२६ नोव्हेंबरपर्यंत करता येणार प्रचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नगरपालिका निवडणूक २७ नोव्हेंबरला होत असून, तत्पूर्वी एक दिवस आधी रात्री दहापर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. रात्री दहानंतर ध्वन‌िक्षेपक वापरण्यास मज्जाव असून या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्या, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

नगरपालिका निवडणुकांचा जाहीर प्रचार केव्हा संपुष्ठात येईल, अशी विचारणा क्षेत्रीय स्तरावरून तसेच विविध कार्यालयांकडून राज्य निवडणूक आयोगाकडे होत होती. त्याबाबतचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने शनिवारी केले. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम २३ मधील तरतुदीनुसार निवडणुकीच्या दिवशी जाहीर सभा घेण्यास मनाई आहे. तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी (दि. २६ नोव्हेंबर) रोजी रात्री दहानंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही असे आयोगाने स्पष्ट केले आहे. २६ नोव्हेंबरला रात्री दहानंतर जाहीर प्रचारही करता येणार नाही. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्या असे आदेश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन्स क्लबतर्फे मोफत कृत्रिम प्रत्यारोपण शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लायन्स क्लब नाशिक पंचवटीतर्फे प्रथमच मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) चे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लायन्स क्लब नाशिक पंचवटी, लायन्स क्लब व नाशिक ओर्थोपेडिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी लायन्स क्लब हॉल, नवीन पंडित कॉलनी येथे सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गरजू व्यक्तींना कृत्रिम पाय (जयपूर फूट) त्यांच्या मापानुसार बनवून त्वरित तयार करून देणार आहेत.

अपघातात किंवा काही अन्य कारणांमुळे पाय काढावे लागतात, अशा व्यक्तींना जयपूर फूट म्हणजे कृत्रिम पाय बसवून पुन्हा रोजचे आयुष्य व्यवस्थितपणे जगता येते. अशा स्वरुपाचे पाय हे एक वरदान असून, त्याची किंमत ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी लायन्स क्लबच्या साहाय्याने पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच विविध आजारांमुळे काही व्यक्तींना कुबड्या, काठी, पोलियो क्लीपर्स, सर्जिकल बूट, निकॅपची आवश्यकता आहे त्यांनाही त्यांच्या गरजेनुसार बूट, काठी व गरजू व्यक्तींना कंबरेचा पट्टाही देण्यात येणार आहे. शिबिरात आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांच्या आजाराप्रमाणे त्याला गरज असलेल्या गोष्टी त्या व्यक्तीच्या मापानुसार बनवून लगेचच दिल्या जाणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वैद्य विक्रांत जाधव व माजी प्रांतपाल विनोद कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ओर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत सोनवणे, सचिव डॉ. हर्षद आढाव, अहमदाबाद येथील राजस्थान हॉस्पिटल यांचे सहकार्य या शिबिरासाठी लाभले आहे. लायन्स क्लब नाशिक पंचवटीचे जयपूर फूट चेअरमन रणकुमार चौधरी यांनी गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवप्रकाश योजनेला ‌दिली मुदतवाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महावितरणच्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदार वीज ग्राहकांसाठी महावितरणने सुरू केलेल्या नवप्रकाश योजनेअंतर्गत थकबाकीत ५ टक्के सूट मिळविण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत भरणा केंद्रांवर स्वीकारल्या जाणार असल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंड‌ित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने नवप्रकाश योजना सुरू केली आहे. नाशिक परिमंडळातील तीन लाखाच्यावर असलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे. गेल्या ३१ मार्चपर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंड‌ित असलेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांसाठी महावितरणने १ नोव्हेंबरपासून नवप्रकाश योजना सुरु केली आहे.

सूट मिळण्याच्या मुदतीत वाढ

या योजनेचा लाभ घेणाऱ्या थकबाकीदार वीज ग्राहकांनी येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत थकबाकी भरल्यास मूळ थकबाकीच्या ५ टक्के सूट मिळणार होती. याशिवाय व्याज व विलंब आकाराची रक्कमही १०० टक्के माफ केली जाणार होती. तसेच १ नोव्हेंबर २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची रक्कम १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत मूळ थकाबाकीसोबत २५ टक्के व्याजाच्या रक्कमेचा भरणा करावा लागणार आहे. तर ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब शुल्कही माफ होणार आहे.

ग्राहक थकबाकीमुक्त

नवप्रकाश योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत नाशिक परिमंडळातील १०७५ वीज थकबाकीदार ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यांनी ६२ लाख ७४ हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्यापैकी ३४५ वीज ग्राहक नाशिक शहर मंडळातील, १४९ मालेगाव ग्रामीण मंडळातील तर ५८१ वीज ग्राहक नगर मंडळातील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रूढी परंपरेत अडकलेले ‘३०२ प्रश्नचिन्ह’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कितीही पूरक, सकारात्मक घटना घडल्या तरी समाजातील रूढी परंपरा काही केल्या नष्ट होणार नाहीत. तसेच नकारात्मक घटना घडल्यावर मात्र त्याची तत्काळ दखल घेत त्यावर जातपंचायत बसवून निर्णय दिला जाईल. त्यामुळे कुणाचे आयुष्याचे नुकसान झाले तरी त्याची पर्वा समाज करीत नाही ही वस्तुस्थिती मांडणारे ‘३०२ प्रश्नचिन्ह’ हे नाटक शनिवारी सादर झाले.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित ५६ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मयूर थोरात लिखित ‘३०२ प्रश्नचिन्ह’ हे नाटक सादर झाले. हे नाटक रंगकर्मी थिएटर्स संस्थेच्यावतीने प्रस्तूत करण्यात आले होते. ‘३०२ प्रश्नचिन्ह’ हे सामाजिक विषयावर भाष्य करणारे नाटक होते. गावाच्या भल्याचा विचार करणारे गुरूजी आपण बाप होणार या आनंदात असतात. मात्र त्यांचा आनंद पत्नीच्या निधनाने मावळून जातो. तरी मुलीची जबाबदारी ते पार पाडतात. एका आयाकडे मुलगी सांभाळण्यासाठी देतात. दिवसांमागून दिवस जातात. मुलगी मोठी होते. कॉलेजला जाते. परंतु, तिला बाप कधी वेळ देत नाही. यामुळे ती नेहमी नाराज असते. त्यात तिचे एका मुलावर प्रेम जडते. मुलगा जातीचा नसल्याने गुरूजींशी तिचे भांडण होते. त्यातून तोल जाऊन ती पडते व तिचा मृत्यू होतो. तिच्या मृत्यूला स्वत:ला कारणीभूत मानून गुरूजी जेलमध्ये जातात. पुढे त्यांचा न झालेला जावई त्यांची केस लढतो व न्यायालयाला त्यांची माफी मागावयास भाग पाडतो. पुन्हा एका मुलीची किंकाळी येते, पुन्हा जातपंचायत, पुन्हा रूढी परंपरा.

या नाटकात ऋचा वैद्य, तेजस बिल्दीकर, रेणुका पोतदार, जयदीप लखलानी, सुप्रिया अमृतकर, अभिजीत धारणे, सागर शिंदे, वैदेही जोशी, उत्तम लबडे, निशिगंधा उपासनी, सौरभ अमृतकर, जयश्री साळुंके, केतन औसकर, वैभव उगले, काव्या धारणे, तनिष्का धारणे यांनी भूमिका केल्या. नेपथ्य निवेदिता कस्तुरे, भूषण क्षिरे यांचे होते. प्रकाशयोजना जयदीप पवार यांची होती. संगीत अभिजीत धारणे यांचे, तर संगीत संयोजन रोहित सरोदे यांचे होते. वेशभूषा प्रथमेश कपोते, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. दिग्दर्शन मयूर थोरात यांनी केले होते. रंगमंच सहाय्य पंकज बिल्दीकर, शामली देवरे यांचे होते.

आजचे नाटक

पराग घोंगे लिखित ‘वाळुचे घर’परशुराम साईखेडकर नाट्यगृह, सायंकाळी ७ वाजता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुजन एकवटले...

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दलितांच्या संरक्षणार्थ असलेला अॅट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करावा यासह विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला लाखोंच्या जनसमुदायाने शनिवारी नाशिककरांचे लक्ष वेधले. डोक्यावर निळी टोपी, गळ्यात निळे पट्टे आणि ठिकठिकाणी लावलेले निळे झेंडे यामुळे अवघे शहर निळेमय झाल्याचे नाशिक‌करांनी अनुभवले. ‘मी भारतीय प्रथमत: आणि अंतिमत:’ असा एकात्मतेचा संदेश देतानाच जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. तब्बल तीन ते चार तासांनी या महामाेर्चाची गोल्फ क्लब मैदानावर सांगता झाली.

सकाळी दहापासूनच गोल्फ क्लब मैदानावर मोर्चेकरी जमण्यास सुरुवात झाली होती. नाशिकमधूनच नव्हे, तर धुळे, अहमदनगर, मुंबईपासून बौद्ध, तसेच अन्य समाजबांधव या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी भल्या सकाळीच नाशिकनगरीत दाखल झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्ररथासह वाजतगाजत अबालवृद्धांचे घोळके शहराच्या विविध भागांतून गोल्फ क्लब मैदानावर पोहोचत होते. बसेस, रिक्षा, जीप, ट्रक अशा अनेक प्रकारच्या वाहनांमधून मोर्चेकरी शहरात दाखल होत होते. वाहनांतळांवरून पायीच ते गोल्फ क्लब मैदानाकडे निघाल्याने शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोर्चेकऱ्यांची गर्दी होती.

महामोर्चा सकाळी अकराला सुरू होईल असे सांगण्यात आले असले, तरी दुपारी साडेबाराला महामोर्चाला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चित्ररथ, पाठोपाठ भगवी वस्त्रे प‌रिधान केलेली आणि हाती विविधरंगी छत्री असलेले भन्ते, पाठोपाठ सफेद शर्ट, खाकी पॅन्ट आणि निळी टोपी परिधान केलेले स्वयंसेवक, त्यामागोमाग महिला आणि युवती, अन्य नागरिक आणि सर्वांत शेवटी विविध समाजांतील मान्यवर प्रतिनिधी या क्रमाने मोर्चेकरी मार्गस्थ झाले. मोर्चेकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मात्र, त्याच वेळी शांतता, शिस्त, संयम आणि एकात्मतेचे दर्शन मोर्चेकऱ्यांकडून घडविले जात होते. मोर्चात बौद्ध, एस.सी.-एस.टी., व्ही.जे.एन.टी, ओबीसी, अल्पसंख्याक, ख्रिस्ती, मुस्लिम आणि अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘मी भारतीय प्रथमत: आणि अंतिमत:’ या घोषवाक्यासह विविध मागण्या असलेले झेंडे हाती घेऊन मोर्चेकऱ्यांची पावले जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होत होती. वाटेत काही ठिकाणी मोर्चेकऱ्यांसाठी अल्पोपाहार आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

गर्दीमुळे मोर्चाच्या मार्गात बदल होऊ शकतो असे संयोजकांकडून सांगण्यात आले होते, तरी ठरल्याप्रमाणे गडकरी चौक, सारडा सर्कल, गंजमाळ, शालिमार, रेड क्रॉस सिग्नल, एम.जी.रोडमार्गे दुपारी दोनच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. तेथे दुपारी सव्वादोनच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

रस्त्यांवर तोबा गर्दी

मोर्चामध्ये लाखो बांधव सहभागी झाल्याने मोर्चाचा मार्ग, तसेच अन्य रस्ते मोर्चेकऱ्यांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. एम. जी.रोडवरील रेड क्रॉस सिग्नल ते त्र्यंबक नाक्याच्या सिग्नलपर्यंत नजर पोहोचेल तेथे मोर्चेकरीच पाहावयास मिळत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोर्चा मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे ५०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरविण्यात आले होते. मोर्चा मार्गावर वाहनांना मज्जाव करण्यात आल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती.

रुग्णवाहिकांसाठी केला रस्ता मोकळा

मोर्चाच्या मार्गावर वाहतुकीला बंदी होती. मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी एकही वाहन या मार्गावर येऊ दिले नाही. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केले असले, तरी रुग्णवाहिका, पोलिसांच्या वाहनांना ये-जा करण्यास मुभा होती. दुपारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला, त्याचवेळी काही रुग्णवाहिका सीबीएसकडून अशोकस्तंभाकडे चालल्या होत्या. बाजूला होत मोर्चेकऱ्यांनी या रुग्णवाहिकांसाठी रस्ता मोकळा करून दिला.

महापुरुषांना अभिवादन

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाल्यानंतर जिल्हा परिषदेजवळ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शालिमार येथे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला, शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला, तर सीबीएस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला संयोजकांच्या वतीने दीपछंद दोंदे, नानासाहेब भालेराव, अण्णासाहेब कटारे, सुरेश मारू, गुलाम शेख, सुरेश दलोड, रवी जाधव आदींनी अभिवादन केले.

आनंद शिंदेंचाही सहभाग

गायक आनंद शिंदे हेदेखील आंदोलकांचा उत्साह वाढविण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी झाले. मोर्चा संयोजकांच्या वतीने गोल्फ क्लब मैदान येथे व्यासपीठ उभारण्यात आले होते. मात्र, या व्यासपाठीवर केवळ मुलींनाच प्रवेश देण्यात आला. मोर्चाचे संयोजक, तसेच अन्य कुणीही व्यासपीठावर गेले नाही.

उपस्थितीबाबतचे दावे...

या महामोर्चाला १० लाख बांधवांची उपस्थिती असल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला, तर पोलिस प्रशासनाकडून सुमारे सव्वादोन लाख बांधव मोर्चात सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.

---
उपनगरांतून प्रतिसाद

शहरातील सिडको, सातपूर, देवळाली कॅम्प, जुने नाशिक आदी उपनगरांतून महामोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सिडको व इंदिरानगर परिसरातून मोठ्याप्रमाणावर कार्यकर्ते व नागरिकांना सकाळपासूनच मोर्चासाठी जाताना दिसून आले. अचानकपणे नागरिकांच्या गर्दीमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती. महामोर्चात सातपूरमधील बहुजनांचाही मोठा सहभाग दिसून आला. सातपूर राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तरुणांसह महिलादेखील मोर्चात सहभागी झाल्या. देवळाली कॅम्प परिसरासह ग्रामीण भागातून हजारो युवकांसह महिला, पुरुष व बालगोपाळांनी 'नाशिक जिल्हा- भीमाचा किल्ला' यासह अनेक घोषणा देत रॅलीद्वारे महामोर्चामध्ये सहभाग नोंदवला. जुने नाशिक परिसरातून ममहमोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. परिसरातील रस्ते बंद केल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा ओळंबा झाल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एटीएमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष पडले महाग

$
0
0



Gautam.Sancheti@timesgroup.com

एटीएममधून स्वाइप केल्यानंतरही पैसे न मिळाल्यामुळे ग्राहकाने केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या युनियन बँकेला जिल्हा ग्राहक न्यायमंचाने १०० रुपये रोज याप्रमाणे ३७० दिवसांचा ३७ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या निर्णयात रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाचा आधार घेण्यात आला असून, त्यामुळे बँकेला ग्राहकाच्या तक्रारीकडे केलेल दुर्लक्ष महागात पडले आहे. या दंडाबरोबरच न्यायमंचाने मानसिक त्रासापोटी पाच हजार व अर्जाचा खर्च दोन हजार असे सात हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक येथील काॅलेजरोडवर राहणारे संजय विठ्ठल देवरे यांनी याबाबत जिल्हा ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी माझे युनियन बँकेत खाते असून, मी मालेगाव येथे एटीएममधून १५ हजार रुपये काढण्यासाठी कार्ड स्वाइप केले. पण, एटीएममधूून रक्कम निघाली नाही. मात्र, मला एसएमएस प्राप्त झाला व त्यात माझी रक्कम माझ्या बॅलन्समधून वजा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा स्वाइप केले, पण पैसे निघाले नाहीत. त्यामुळे युनियन बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर त्याची तक्रार केली. त्यानंतर ही रक्कम जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मला तीस हजार रुपये मिळालेले नसतानादेखील खात्यातून ही रक्कम डेबिट झाली. मात्र, तक्रार करूनही पैसे न मिळाल्यामुळे मी लेखी अर्ज करून सीसीटीव्ही व फुटेजची तपासणी करून रक्कम मिळावी, अशी मागणी केली. त्यानंतर बँकेने पंधरा हजार रुपये जमा केले व उर्वरित रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली. नंतर मी पुन्हा पत्र देऊन पंधरा हजार रुपये व रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाप्रमाणे १०० रुपये नुकसानीची रक्कम मिळावी, असे सांगितले. या तक्रारीनंतर युनियन बँकेतर्फे युक्तिवाद करताना सांगण्यात आले, की फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा केली आहे. पण, नंतर कोणतेही ट्रान्झॅक्शन फेल झालेले नसल्यामुळे नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी नाही.

दुर्लक्षाची किंमत ४४ हजार!

जिल्हा न्यायमंचाने निकाल देताना सांगितले, की रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने वेळोेवेळी डायरेक्शन्स दिलेले आहेत. याची जाणीव असतानादेखील बँकेने विवादित ट्रान्झॅक्शनची दखल न घेता रक्कम देण्यास नकार दिला व ग्राहकास वेठीस धरल्याची बाब अतिशय गंभीर असून, ही सेवेतील कमतरता आहे. २५ जानेवारी २०१५ रोजी तक्रार केल्यानंतर रक्कम ७ एप्रिल २०१६ रोजी जमा केली आहे. त्यामुळे या काळातील ३७० दिवसांचे दररोज १०० रुपयाप्रमाणे ग्राहक ३७,००० रुपये मिळण्यास पात्र आहे. त्यामुळे त्यांना ही रक्कम अदा करावी, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे या दंडाबरोबरच न्यायमंचाने मानसिक त्रासापोटी पाच हजार व अर्जाचा खर्च दोन हजार असे सात हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेला तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याची किंमत ४४ हजार रुपये पडली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी व कारभारी जाधव यांनी दिला.

०००

काही ठिकाणी गैरसोय

काही बँकांनी ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग न केल्यामुळे अनेकांना ज्येष्ठ खातेदारांना डिपाॅझिट व पैसे काढण्याच्या रांगेतच उभे राहावे लागले. त्यामुळे ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली. बँकेत आलेल्या ज्येष्ठांना दोन हजारांच्या नोटा देऊन शाई लावली जात असल्यामुळे फक्त दोन हजारांच्या नोटा कशा बदलून देता, असा प्रश्न अनेकांनी विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांची रांगांतून सुटका!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी शनिवारी बँकांमध्ये केवळ खातेदार, तसेच ज्येष्ठांसाठीच कामकाज झाले. इंडियन बँक्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे बँकांत ज्येष्ठ नागरिकांना सुलभतेने नोटा बदलून घेणे शक्य होऊन त्यांची भल्या मोठ्या रांगांतून सुटका झाल्याचे दिसून आले. पैसे डिपाॅझिट करणे व खात्यावरून काढण्यासाठी मात्र सर्वत्र रांगा होत्या. त्यामुळे बँकांतील गर्दी नवव्या दिवशीही कायम होती.

नोटा रद्द झाल्यानंतर आता ही गर्दी कमी होईल, असे चित्र कोठेच दिसले नाही. सर्वच बँकांत गर्दी कायम असल्यामुळे बँकांनी सेवा दिली असली, तरी सर्वच बँकांना शनिवारी आपल्या खातेदारांना सेवा देण्याचे समाधान लाभले. गेले आठ दिवस कोणत्याही बँकेचे खातेदार बँकेत येत असल्यामुळे आेळख नसलेल्या ग्राहकांशी फारसा संवादही साधता येत नव्हता. पण, शनिवारी मात्र बँकेचे खातेदार असल्यामुळे त्याचा फायदा बँकेला झाला. अनेकांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्याला काय अडचणी झाल्या याची माहिती बँकेच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना सांगत त्यांच्याकडे भावना व्यक्त केेल्या. बँकेनेही आमच्याकडे रिझर्व्ह बँकेचे निर्देश असल्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी अडचण आल्याचे मनमोकळेपणाने सांगितले.

माहितीचा गोंधळ

खातेदारालाच बँकेत पैसे बदलून देण्याचे निर्देश दिल्यानंतरही बहुतांश बँकांला याबाबत माहिती होती. पण, काही बँकांना त्याबाबत माहिती नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. अनेक बँकांनी आपल्या विभागीय कार्यालयाशी संपर्क करून त्याबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत नियम लागू केले.

ग्राहकांनाही नाही पत्ता

सरकार रोजच नियम बदलत असल्यामुळे ग्राहकांना त्याची माहिती नसल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला. कोणत्याही बँकेत पैसे बदलून मिळेल, असे समजून ते बँकेत येत होते. पण, बँकेत तुमचे खाते कोठे आहे, याची विचारपूस केली जात होती. त्यानंतर मात्र त्यांना त्यांच्या बँकेत जाण्याचे सांगण्यात येत होते. अनेक जण रांगेत उभे राहिल्यानंतर नंबर आल्यानंतर त्यांना हा बदल कळला, त्यामुळे त्यांच्या संतापात वाढ झाली.

बँक कर्मचाऱ्यांशी हुज्जत

ज्या बँकेत खाते आहे तेथेच पैसे बदल करून मिळतील, असे जाहीर केल्यानंतर त्याची माहिती सर्वांपर्यंत न पोहोचल्यामुळे अनेकांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यावेळी रोजच नियम कसे बदलतात, असे प्रश्नही त्यांना विचारले गेले. पण, बँक कर्मचाऱ्यांनी, आम्ही काय करणार, वरतून जो आदेश येईल तो आम्हाला पाळावाच लागणार, असे सांगितले.

दोन हजारांचे सुटे

अनेक जणांना बँकेने दोन हजारांच्या नोटा दिल्यामुळे या नोटांचे सुटे पैसे मिळावेत यासाठी काहींनी बँकेत विचारणा केली. बाहेर त्याचे सुटे कोणीच देत नसल्यामुळे या ग्राहाकांनी थेट बँकेतच चकरा मारणे सुरू केेले. त्यामुळे बँकेसमोरही सुट्या नोटांचा प्रश्न कायम होता. काहींनी दोन हजाराच्या नोटा मिळता आहेत म्हणून पैसेच काढले नाहीत.

एक्स्चेंज नोटा नाहीच

खातेदारच मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही बँकांनी एक्स्जेंच नोटा देण्यापेक्षा खातेदारांना पैसे खात्यात जमा करा व पैसे घ्या, असा सल्ला दिला. केवळ ज्येष्ठ नागरिकांना पैसे बदलून दिले. पण, त्यांचे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे एक्स्जेंच नोटांचा त्रास बँकेत कमी होता.

कॅश शाॅर्टेज कायम

सर्वच बँकांना कॅश पुरवठा करण्याचा निर्णय शुक्रवारी सर्व बँकांच्या बैठकीत ठरलेला असताना अनेक बँकांत कॅश शाॅर्टेजचा प्रश्न कायम होता. त्यामुळे अनेकांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही बँकांनी मात्र कॅश संपपर्यंत आपले काउंटर सुरू ठेवले. गेल्या रविवारी काम करावे लागल्यामुळे या रविवारी बँकेला सुटी देण्यात आल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याचा आनंद दिसून आला. गेले अनेक दिवस आम्ही काम करीत असल्यामुळे ही सुटी आनंददायी व टेन्शन फ्री असणार असल्याचे कर्मचारी सांगत होते.

नाशिकरोडला दिलासा

नाशिकरोडच्या राष्ट्रीय बँकांमध्ये शनिवारी फक्त बँकेच्या ग्राहकांचेच कामकाज झाले, तसेच फक्त ज्येष्ठांनाच नोटा बदलून देण्याची सोय करण्यात आली होती. रांगेत फार वेळ उभे राहावे लागत नसल्याने गेल्या काही दिवसांच्या गैरसोयीनंतर ज्येष्ठांना प्रथमच दिलासा मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ धुळे जिल्हा बँक नोटांपायी अडचणीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत दर दिवशी होत असलेल्या वेगवेगळ्या सरकारी निर्णयांचा फटका धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेला बसला आहे. या गोंधळात डिसेंबरअखेर बँकेला अपेक्षित सीआर रेट साधता न आल्यास बँकिंग परवाना धोक्यात येऊ शकतो अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान बाद नोटा स्वीकारण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार १४ नोव्हेंबरपासून या नोटा बँकेत स्वीकारणे बंद करण्यात आले. तीन दिवस पाचशे आणि हजाराच्या नोटा बँकेत स्वीकारण्यात आल्या, त्यावेळी बँकेत ३७ कोटी रूपयांचे व्यवहार झाले. त्यात चार कोटी २९ लाख रुपये गेल्या तीन वर्षांपासूनची कर्जवसुली होती. वीबिल भरण्यापोटी दोन कोटी २० लाख रुपये, ३१ कोटी २५ लाखांचा खातेदारांनी पाचशे व हजाराच्या नोटांचा भरणा केला. या व्यवहारांमुळे बँक सुस्थितीत येणार होती. परंतु बँकेने जुन्या नोटा स्वीकारू नयेत, असे आदेश झाल्याने जिल्हा बँक अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे बँक प्रशासनाचे म्हणणे आहे.

पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकेला केलेले मनाई आदेश अद्यापही कायम असल्याने गेल्या पाच दिवसांपासून बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे डिसेंबर २०१७ अखेर बँकेचा सीआर नऊ टक्के गाठता आला नाही, तर बँकेची परवानगी रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ राज्यातील सर्व जिल्हा बँकांमधून जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश पारित करावेत, असेही चेअरमन कदमबांडे यांनी मटाशी बोलताना सांगितले. चालू वर्षात जिल्हा बँकेने एक लाख २५ हजार सभासदांना २१५ कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आणि गेल्या तीन वर्षापासून कर्जदाराकडे थकीत असलेली रक्कम ३१२ कोटी रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता नव्हे, पार्किंग प्लेस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड हे राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, महामार्ग वाहतूक, व्यापार व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. परंतु, महापालिका व पोलिस प्रशासनाकडून येथील वाहतुकीच्या प्रश्नावर कोणतेही ठोस नियोजन करण्यात आलेले नाही. परिणामी येथील रस्त्यांवर खुलेआम पार्किंग होत असून, रस्ते जणू अनधिकृत पार्किंगला आंदणच दिल्याची स्थिती दिसून येते. त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व वेगवान करण्यासाठी प्रशासनाला नव्याने गृहपाठ करावा लागणार आहे.

रेल्वे स्टेशन ते शिवाजी पुतळा, शिवाजी पुतळा ते दत्त मंदिर चौक, बिटको चौक ते नाशिकरोड पोलिस ठाणे, सुभाषरोड, देवळाली कॅम्परोड, बिटको चौक ते दसक आदी सर्वच रस्त्यांवर अनधिकृत पार्क केलेली वाहने दिवसभर आढळून येतात. त्यातच रिक्षांची भर पडत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसते. विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये बरेचसे रिक्षाचालक रिक्षाथांब्याशिवाय भररस्त्यात थांबलेले दिसतात.

पोलिसांचा काणाडोळा

दत्त मंदिर, बिटको चौक व रेल्वे स्टेशन या तीनच ठिकाणी वाहतूक पोलिस नेमणुकीस आहेत. त्यांच्याकडून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न कधीही होताना दिसून येत नाही. रहदारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना साधे हटकण्याचीही तसदी हे वाहतूक पोलिस कर्मचारी घेत नाहीत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचेदेखील हातगाडी व्यावसायिक, फुटपाथवर होणाऱ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती दिसून येत आहे.

व्यावसायिकांचा ताबा

शहरातील व्यावसायिक इमारतींच्या पार्किंगची जागा त्याच इमारतीतील व्यावसायिकांकडून आपल्या व्यवसायासाठी वापरली जात आहे. त्यामुळे या व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांना आपली वाहने नाईलाजास्तव सार्वजनिक रस्त्याच्या कडेला उभी करावी लागत आहेत.

परिसरातील बहुसंख्य बसथांब्यांवर रिक्षाचालकांनी अतिक्रमण केलेले असल्याने असंख्य बसथांबे केवळ नावालाच उरले आहेत. त्यामुळे बसचालक व बस प्रवासीही त्रस्त झालेले आहेत. बसेस तर प्रवाशांची चढ-उतर करण्यासाठी रस्त्याच्या मधोमधच उभ्या राहताना दिसून येतात.

या उपायांाची अपेक्षा...

नाशिकरोड परिसराची वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिसरात रिक्षाथांबे वाढवावेत, अनधिकृत पार्क केलेल्या वाहनधारकांवर नियमित कारवाई व्हावी, गायकवाड मळा ते रेजिमेंटल प्लाझा, मशिद ते शिवाजी पुतळा आदी रस्त्यांवर एकेरी वाहतूक करावी, व्यावसायिक इमारतींच्या पार्किंग जागेवर ऑफ स्ट्रीट पार्किंगची सुविधा करण्यात यावी, सर्व रस्त्यांचे फुटपाथ रिकामे करण्यात येऊन त्यांना लोखंडी बॅरिकेड्स लावावेत, जेलरोडवरील अवजड वाहतूक दिवसा बंद ठेवण्यात यावी, वाहतूक शाखेचे स्वतंत्र पोलिस ठाणे व्हावे, मनुष्यबळ वाढविण्यात यावे, रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरील रिक्षाथांबा अन्यत्र स्थलांतरित करावा, हॉकर्स झोन घोषित करून रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या हातगाडी व भाजीपाला व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवावे, उड्डाणपुलाखालील भाजीबाजार व टेम्पो स्टॅण्ड सिन्नर फाटा येथे स्थलांतरुत करण्यात यावे, सैलानीबाबा चौक, इंगळेनगर, सिन्नर फाटा, देवळालीगाव महात्मा गांधी पुतळा, शिवाजी पुतळा येथे नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यन्वित करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


अवजड वाहनबंदीकडे डोळेझाक

जेलरोडमार्गे अवजड वाहतुकीस बंदी आहे. मात्र, वाहतूक पोलिसांसमोरच यामार्गे अवजड वाहतूक दिवसभर सुरू असते. त्यामुळे या मार्गावर झालेल्या अपघातांत आतापर्यंत शाळकरी मुले, नागरिक, नोकरदार यांचा हकनाक बळीही गेला आहे.

---

पुणे-मुंबई शहरांच्या धर्तीवर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन व्हायला हवे. रिक्षा व दुचाकी वाहनांसाठी एक मार्गिका राखीव ठेवली पाहिजे. रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हायला हवी.

-अहमद शेख

बस व रिक्षाथांबे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होताना दिसत नाही. रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर केली पाहिजेत. शहरात ४५० रिक्षाथांब्यांची गरज असून, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

-शिवाजी भोर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहाच्या पैशांना प्रतिज्ञापत्र!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
विवाह समारंभ असेल त्यांना अड‌ीच लाख रुपये काढता येतील, असे उपसचिव शक्तिकांत दास यांनी जाहीर केल्यानंतर आता त्याचे फॉर्म बँकेला पाठवण्यात आले आहे. त्यात पॅनकार्ड सक्तीचे केले असून त्यात प्रतिज्ञापत्रही द्यावे लागणार आहे.
राष्ट्रीयकृत व खासगी बँकेने बहुतांश खातेदारांचे पॅनकार्ड घेतल्यामुळे त्यांच्या अडचणी कमी होणार असल्या तरी ज्यांच्याकडे नाही त्यांना पॅनकार्ड काढावे लागणार आहे. मुलीच्या विवाहाला स्वत:चेच पैसे काढण्यासाठी हा त्रास आता लग्नाच्या इतर कामबरोबर वाढणार आहे. एकूणच या निर्णयामुळे थोडासा दिलासा मिळाला असला तरी त्याबद्दल नाराजीसुध्दा आहे. या निर्णयात अडीच लाखांची मर्यादा असल्यामुळे त्याबद्दलही अनेकांच्या तक्रारी आहेत.
केंद्र सरकारने विवाहसोहळ्यासाठी अडीच लाख देण्याची घोषणा केल्यानंतर बँकेला कोणतीही लेखी सूचना न पोचल्याने अनेक बँकांमध्ये पैसे काढण्यावरून सुरुवातील एक दोन दिवस वाद झाले. त्यानंतर बँकेला एक फॉर्म देण्यात आला आहे. त्यात नाव, विवाह असलेल्याबरोबरचे नाते, पूर्ण पत्ता, पिनकोड व फोन नंबर, त्याचप्रमाणे पॅन कार्ड नंबर, त्यानंतर कोणत्या अकाऊंटमधून पैसे काढणार त्या खात्याचा नंबर, किती पैसे काढणार त्याचा आकडा ही माहिती भरून प्रतिज्ञापत्र भरायचे आहे.
प्रतिज्ञापत्रात भरावी लागणार ही माहिती
लग्नासाठी पैसे काढतांना प्रतिज्ञापत्रात वरील माहिती खरी आहे असे लिहलेले आहे.त्यानंतर सदर पैसे हे विवाहच्या कारणासाठी काढत आहे. माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या सवलतीचा उपयोग करणार नाही. त्याचप्रमाणे जर मी या सवलतीचा गैरवापर केला तर तर माझ्यावर केंद्र किंवा राज्य शासनाने कारवाई करावी असेही टाइप केले असून त्यावर सही करायची आहे. त्यानंतर ठिकाण व तारीख लिहायची आहे.
शेतकऱ्याची आत्महत्येची धमकी
निफाडच्या एका शेतकऱ्याने तर बँक पैसे देत नसल्यामुळे आत्महत्या करण्याची धमकी शनिवारी दिली होती. त्यानंतर त्याने वरिष्ठांना फोन केले. पण बँकेचे अधिकारी त्याची दखल घेत नव्हते. त्यानंतर हा फॉर्म आल्यानंतर तो देऊन पैसे देण्याचे कबूल केल्यानंतर त्याचा संताप कमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images