Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महापालिका प्रशासनाला आली जाग

$
0
0

दत्त मंदिर चौकातील खड्ड्यांची दुरुस्ती सुरू; डांबरीकरणानंतर नागरिक समाधानी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोडच्या दत्त मंदिर चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले होते. मागील आठवड्यात एकाच दिवशी याठिकाणी दहा ते बारा दुचाकीस्वार घसरून जखमी झाले होते. त्यामुळे नागरिकांनी डांबरीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. चौकात डांबरीकरण करून सपाटीकरणाचे कामही सुरू झाले आहे.

नाशिक-पुणे रोडवर असलेल्या दत्त मंदिर चौकात दररोज वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी खड्डे झाल्याने महापालिकेच्यावतीने या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले. परंतु हे पेव्हर ब्लॉक निकृष्ठ दर्जाचे बसवल्याने पूर्वीपेक्षा जास्त खड्डे झालेत. त्यामुळे अपघाताच्या संख्येत दुपटीने वाढ झाली.

या ठिकाणी नाशिकरोडहून नाशिककडे येताना बिझनेस बँकेसमोर मोठा खड्डा पडला असून त्याठिकाणी दुचाकी स्वार घसरून जखमी होत आहेत. तसेच देवळाली गावातून नाशिककडे येत असताना चिडे सायकल मार्टसमोर मातीचा ढिगारा असल्याने येथेही दुचाकीस्वार पडत आहेत. मागील आठवड्यात याच ठिकाणी एका दिवशी दहा ते बारा दुचाकीस्वार पडून जखमी झाले होते.

या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केल्यावर महापालिका नॅशनल हायवेकडे बोट दाखवते तर नॅशनल हायवेकडे तक्रार केल्यास ते महापालिकेकडे बोट दाखवते. यामुळे सर्व त्रास हा नागरिकांनाच होत आहे. या चौकात असलेल्या डिव्हायडर्सला रेडियम लावलेले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना ते दिसत नाही. त्यामुळे यावर आदळून वाहनचालक जखमी होतात. पेव्हरब्लॉक खालीवर झाल्याने या ठिकाणी गाड्या पंक्चर होण्याचे देखील प्रकार होता आहेत. या रस्त्यावर मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. एकीकडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहराचे प्रशासन खड्डे विरहीत रस्ते देऊ शकत नसतील. तर स्मार्टसिटीकडे वाटचाल कशी होणार, असाही सवाल नागरिक विचारत आहेत.

दत्त मंदिर चौकात मीदेखील गाडीवरून घसरून पडलो आहे. मला सहा टाके पडले आहेत. हा रस्ता चांगला करावा यासाठी अनेकदा विनंती केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता.

- तुषार शहाणे, नागरिक

उशिरा सुचलेले शहाणपण

नाशिकरोड : नाशिक-पुणे मार्गावरील दत्तमंदिर चौकातील खड्डे बुजून डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने प्रवासी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. म. टा. ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच मनसेचे नेते विक्रम कदम यांनीही पाठपुरावा केला होता. नाशिकहून बिटकोच्या दिशेने जाताना आणि बिटकोहून नाशिककडे जाताना दत्त मंदिर चौकात मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे सिग्नल गाठताना वेगात असलेल्या वाहनांना हादरे बसत होते. याठिकाणी मनपा प्रशासनाने डांबरीकरणाऐवजी पेव्हरब्लॉकचे तुकडे टाकून चालढकल केली होती. मात्र आता डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुक्त विद्यापीठाच्या परदेशी देणग्या रोखल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुदतीमध्ये परवाना नूतनीकरणाचा अर्ज सादर करण्यामध्ये हलगर्जीपणा दाखविणाऱ्या राज्यातील एक हजारहून अधिक सरकारी व बिगरसरकारी स्वयंसेवी संस्थांची परकीय देणगी नियम कायद्याखालील नोंदणी रद्द करण्याची कारवाई केंद्रीय गृहमंत्रालयाने केली असून, त्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा समावेश आहे.

मुक्त विद्यापीठाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, परदेशी देणग्या रोखणे हा कुलगुरू गेल्यानंतरचा सर्वांत मोठा फटका मानला जात आहे. या कारवाईमुळे या संस्थांच्या परदेशी दात्यांच्या देणग्या पुढील पाच वर्षांसाठी रोखल्या गेल्या आहेत.

परकीय देणग्यांची वार्षिक विवरणपत्रे तीन वर्षांपासून सादर न करणाऱ्या राज्यातील एक हजारहून अधिक स्वयंसेवी संस्थांची नोंदणी गृहमंत्रालयाने गेल्या वर्षी रद्द केली होती. त्यामध्ये भारती, तसेच डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि प्रख्यात ‘व्हीजेटीआय’सह अनेक मोठ्या संस्थांचा समावेश होता. त्यातून काहीही बोध न घेतलेल्या संस्थांकडून परवाना नूतनीकरणात टाळाटाळ झाली. परिणामी, देशातील एकूण ११ हजार ३१९ संस्थांचे परवाने गृहमंत्रालयाने ३१ ऑक्टोबर रोजी रद्द केले. त्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा समावेश आहे. या परदेशी देणग्या रोखल्यामुळे मुक्त विद्यापीठाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विद्यापीठात नव्याने करण्यात येणाऱ्या गोष्टींना यामुळे फटका बसणार आहे.

कारवाई झालेल्या संस्थांची यादी पाहिली तर त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक संस्थांचा समावेश असल्याचे दिसते. या संस्थांच्या नोंदणीची वैधता ३० सप्टेंबरला संपत होती. त्यामुळे त्यांना नूतनीकरणासाठी ३० जूनची मुदत दिली होती. तत्पूर्वी, ती दोनदा वाढविलीही होती, तसेच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, या हेतूने नोंदणीची वैधता ३० सप्टेंबरवरून ३१ ऑक्टोबपर्यंत वाढविली होती. मात्र, त्यानंतरही बेफिकिरी दाखविणाऱ्यांवर अखेर कारवाईच करण्यात आली आहे.

मुक्त विद्यापीठाला परदेशी देणग्या नव्हत्याच. फार पूर्वी कधी तरी त्यासाठी नोंदणी केलेली होती. त्या साइटला प्रॉब्लेम आल्याने नूतनीकरण होऊ शकत नव्हते. आज मात्र ते नूतनीकरण करून घेतलेले आहे. अर्ज भरला आहे.
- डॉ. दिनेश भोंडे, कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकत सर्वेक्षणाचे शुक्लकाष्ट संपेना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणामागे लागलेले शुक्लकाष्ट संपत नसल्याचे चित्र आहे. विविध अडचणींमुळे दोन वर्षांपासून कात्रीत सापडलेल्या मिळकत सर्वेक्षणाला स्थायी समितीने हिरवा कंदील दाखवला होता. खडखडाट झालेल्या महापालिकेच्या तिजोरीला संजीवनी देणाऱ्या या मिळकत सर्वेक्षणाचा विषय प्रशासनानेही तातडीने मार्गी लावला होता. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी मतदारयाद्या फोडण्यासाठी करसंकलन विभागाचे सर्व कर्मचारी निवडणूक शाखेने पळविल्याने आता पुन्हा हे सर्वेक्षण लटकले आहे. निवडणुकीच्या कामांमुळे अगोदरच वसुलीला ओहोटी लागली असताना आता पुन्हा कर्मचारी पळविल्याने वसुलीची प्रक्रिया ठप्प होणार आहे.

शहरातील अनेक मिळकतींची नोंद महापालिकेकडे झालेली नाही, तर अनेक मिळकतींची नोंदणी निवासीसाठी असताना त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात आहे. त्यामुळे शहरातील सर्व मिळकतींचा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या. मात्र, स्पेक वीक या कंपनीने संबंधित काम अर्ध्यावर सोडले. त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. निविदाप्रक्रियेला प्रतिसादच मिळाला नव्हता. त्यामुळे तीनदा निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर आता दिल्लीतल्या जीओ इन्फोसिस या कंपनीला मिळकत विभागाचे काम देण्यात आले. त्यासाठी चार कोटींची तरतूदही करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास दोन वर्षांचा कालावधी गेल्यानंतर आता कुठे या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, या सर्वेक्षणाला पुन्हा महापालिका निवडणुकीचा फटका बसला आहे. मिळकत सर्वेक्षणासाठी कंपनीतर्फे १५० पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात करसंकलन विभागाचा एक कर्मचारी असणार आहे. करसंकलन विभागाकडे ११९ कर्मचारी असून, त्यांना या सर्वेक्षणासाठी मदत घेतली जाणार होती. मात्र, निवडणूक शाखेने या सर्व कर्मचाऱ्यांना आता मनपा मतदार याद्या फोडण्याचे काम सोपविल्याने हे मिळकत सर्वेक्षण पुन्हा लटकले आहे. अगोदरच जानेवारीपासून हे कर्मचारी मतदार याद्या तयार करण्याचे काम करीत होते. पुन्हा त्यांना त्याच कामासाठी लावल्याने आता सर्वेक्षणाचे काम पुन्हा तीन ते चार महिन्यांसाठी लटकले आहे.

वसुलीत मोठी घट

चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत घरपट्टी वसुली ५३ कोटी झाली होती. मात्र, चालू वर्षी ही वसुली ४७ कोटी झाली असून, गेल्या वर्षीपेक्षा हा घाटा सहा कोटी दहा लाखांचा झाला आहे. गेल्या वर्षी पाणीपट्टीतून पालिकेला १८ कोटी रुपये मिळाले होते. चालू वर्षी नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम ११ कोटींपर्यंतच वसूल झाली आहे. पुढील तीन ते चार महिने निवडणुकीच्या कामामुळे वसुली होणे शक्य नाही.

तिजोरीत खडखडाट

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसह विकासकामांसाठी सर्वाधिक हातभार हा घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीतून येणार आहे. मात्र, आता ही वसुलीच ठप्प झाल्याने त्याचा थेट परिणाम विकासकामांसह स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांवर होणार आहे. तिजोरीत वसुलीत पैसेच येणार नसल्याने तिजोरीत खडखडाट राहणार आहे, तसेच प्रशासनाचा कारभार हाकण्यासाठी लागणारा निधी याच वसुलीतून येतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावरही त्याचा परिणाम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे शहरात सराफ बाजार बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बंदच्या निर्णयामुळे धुळ्यातही अचानक सोन्याचे दर वधारले. त्यामुळे शहरातील छोटे-मोठे, असे शंभराहून अधिक सराफ व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. नागरिकांनी सोने-चांदी खरेदीतून पाचशे व हजाराच्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र, तो अयशस्वी ठरला. जोपर्यत शंभराच्या नोटा चलनात पुरेशा येत नाहीत आणि सर्व प्रक्रिया सुरळीत होत नाही तोपर्यत मोठी सराफ दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. लहान विक्रेत्यांची दुकाने सुरू राहणार असल्याचे सराफ व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

मुंबई-आग्रा महामार्गावर टोल केंद्रात वाद

पाचशे व हजाराच्या नोटा बंदमुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे जिल्ह्यातील शिरपूर, सोनगीर, अवधान टोल नाक्यांवर वाहनधारकांची गर्दी झाली होती. वाहनधारकांनी टोक नाक्यांवर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा देऊन पावती घेण्याचा आग्रह केला. मात्र टोल प्रशासनाकडे होते तेवढे सुटे पैसे वाहनधारकांना देण्यात आले. सुटे पैसे संपल्यानंतर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांबरोबर वाहनधारकांचा वाद झाला. काही वाहनधारकांनी सुटे पैशांच्या अडवणुकीचे धोरण अवलंबिल्याने तीनही टोल नाक्यावर वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या लांबपर्यत रांगा लागल्या होत्या.

पेट्रोल पंपावर तणाव

मंगळवारी मध्यरात्रीपासून पाचशे व हजाराच्या चलनी नोटा व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय झाल्याने त्या नोटा फक्त पेट्रोलपंपावर स्वीकारण्यात येत होत्या, मात्र वाहनधारकांनी पाचशे किंवा हजाराची नोट दिली, तर सर्व पैशांचे पेट्रोल टाकण्याची अट पेट्रोल पंपचालकांकडून वाहनधारकांना करण्यात आली. त्यामुळे काही वाहनधारकांनी संप्तत होवून वाद घातला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ बाजारात दिवसभर शुकशुकाट

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोदी सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घातल्यानंतर सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होईल, अशी चर्चा होती. परंतु, शहरातील सराफांनी या दोन्ही किमतीच्या नोटा न स्वीकारता पारदर्शी व्यवहार केल्याने सराफ बाजारात शांतता दिसून आली. मात्र, मंगळवारी (दि. ८) रात्री उशिरापर्यंत काही सराफी पेढ्यांमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदीची घोषणा झाल्यानंतर शहरातील काही कंपन्याच्या सराफी पेढ्यांवर अचानक गर्दी उसळली. मोठ्या रकमा असलेल्या काही ग्राहकांनी लाखो रुपयाचे सोने खरेदी केले. शहरातील काही सराफी पेढ्या रात्री दोन वाजेपर्यंत उघड्या असल्याची चर्चा शहरात होती. शहरातील सराफ बाजार मंगळवारी बंद असल्याने इतर सराफ व्यावसायिकांना अशा प्रकारचे व्यवहार केले नाही. एका अर्थाने ते बचावले. सराफ बाजारात बुधवारी मोठी उलाढाल होऊन सोन्या-चांदीची खरेदी होईल, या आशेने सकाळपासूनच सराफ व्यावसायिकांकडे खेरदीसाठी विचारणा होऊ लागली. मात्र, कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार न करता शहरातील सराफ व्यावसायिकांनी चेक अथवा शंभर, पन्नासच्या रकमेने सोने विक्री केले. अनेक सराफांना अमिषे दाखवण्यात आली; मात्र त्याला व्यावसायिक बधले नाहीत. सराफांनी पाचशे आणि शंभरच्या नोटा स्वीकारल्यास त्यांनाही त्या बॅँकेत भराव्याच लागणार; तेव्हा अडचण निर्माण होईल. सराफ व्यावसायिक ठाम असल्याने त्यांची निराशा झाली.

रात्रीच उलाढाल
शहरातील काही बड्या कंपन्याच्या सराफी दुकानात रात्री उशिरापर्यंत व्यवहार सुरू होते. या शोरुम्समध्ये जमा झालेल्या नोटा बॅँकेत भरायच्या कशा, याची चिंता नसल्याने अनेक कंपन्यांनी रात्री अकरा वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवले. या काळात कोट्यवधी रुपयाचे व्यवहार झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. यामुळे पाचशे आणि हजाराच्या नोटांपासून मुक्ती मिळाल्याचीही कबुली त्यांनी गप्पांमधून दिली.

भावामध्ये वाढ
मोदींच्या घोषणेचा शेअर मार्केटप्रमाणेच सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम झाला. मंगळवारी (दि. ८) सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ३० हजार ६०० इतका होता. बुधवारी त्यात १ हजाराची वाढ होऊन ३१ हजार ६०० इतका झाला. बुधवारी शहरात २२ कॅरेटसाठी ३१ हजार ७००, २४ कॅरेटसाठी ३२ हजार तर चांदीचा भाव ४४ हजार रुपये किलो इतका होता. सरकारच्या निर्णयानंतर सोने, चांदीच्या मागणीत वाढल्याचे मानले जात आहे.

पाचशे आणि एक हजार रुपये नोटेच्या बंदीचा शहरातील बाजारपेठेवर काहीही परिणाम झाला नाही. शहरातील सर्व सराफ व्यावसायिकांनी कोणत्याही आडमार्गाचा व्यवहार न करता कायदेशीर मार्गाने व्यवहार केले. भाव ४० हजारावर गेले वगैरे या सगळ्या अफवा होत्या. आजही मुंबई बाजारभावाने व्यवहार सुरू आहेत.
- गिरीश टकले, सराफ व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नगररचनाकडून विकासाची अडवणूक’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कपाट, टीडीआर धोरणाबाबत राज्य सरकारकडून नाशिककरांची अडवणूक सुरू असतानाच, आता नगररचना विभागानेही शहरवासीयांची अडवणूक सुरू केल्याचा आरोप शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. जुन्या टीडीआर प्रकरणांबाबत आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट निर्देश देऊनही नगररचना विभाग या प्रकरणांना मार्गी लावण्याऐवजी अडवणुकीत स्वारस्य घेत असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. शहराला आता कुणी पालकच राहिला नसून भाजपच्या लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावे, असा टोला बोरस्ते यांनी लगावला आहे.

आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नुकतेच टीडीआर धोरण येण्याअगोदर दाखल केलेल्या जुन्या अडीचशे प्रकरणे मार्गी लावण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले होते. राज्य सरकारने या प्रकरणामध्ये टीडीआर लोड करण्याची संमती दिली. महापालिकेच्या वकिलांनाही तसा अभिप्राय दिल्यानंतर आयुक्तांनी ही प्रकरणे सोडविण्याचे आदेश दिलेत. परंतु या आदेशाला पंधरा दिवस लोटले तरी, नगररचना विभागाने अद्याप कारवाई सुरू केलेली नाही, असा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून ही प्रकरणे मार्गी लावण्याची डिसेंबर अखेरची मुदत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमिशन एजंट्सना आले सुगीचे दिवस!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोदी सरकारच्या स्ट्रोकमुळे बडे व्यवहार करणाऱ्या भांडवलदारांचे धाबेच दणाणले. करचुकविण्यासह विविध उद्देशाने दडवून ठेवलेला काळा पैसा पुन्हा ‘व्हाईट मनी’ म्हणून चलनात आणण्यासाठी कायद्यापासून पळवाटा सोडत अशा घटकांना आता कमिशन एजंट्सव्दारे आपले काम साधून घ्यावे लागेल, अशी चर्चा आहे.

अनेकांनी वरच्यावर साठविलेला पैसाही हाताशी आहे. या स्थितीत सरकारच्या निर्णयाने नवाच पेच उभा राहिल्याने आता हाताशी असलेला पैसा पचवावा कसा, असा प्रश्न अनेक भांडवलदारांना पडला आहे. यावर उपाय शोधताना अनेकांनी आर्थिक सल्लागारांशी संपर्क साधलाच. तसेच काही विश्वासातल्या बँक खातेधारकांच्या नावे बड्या नोटा जमा करून त्या पैशाचे ‘व्हाईट मनी’मध्ये रुपांतर करण्याचे नियोजन केल्याच्याही कूजबूज बुधवारी दिवसभर रंगली.

पैशांची अनियमित साठवणूक करणाऱ्या अनेकांना स्वत: भोवतालच्या नेटवर्कच्या नावे विभाजित करून ही रक्कम भरल्यास मोठ्या कर भरण्यापासून सुटण्याचा मार्ग मिळू शकतो, असा तर्क काहींनी बांधला आहे. तर, काही बँक खातेधारकांच्या नावे विशिष्ट रक्कम टाकून त्यातील काही टक्क्यांच्या कमिशनचा वादा त्या खातेधारकाला करून अर्थाचे अर्थकारण टिकविण्याची शक्कलही काही लढवत असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तत्त्वज्ञान उलगडून सांगणार ‘मोगुल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५६ व्या राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी दीपक मंडळ सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘मोगुल’ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाच्या प्रयोग परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झाला.

‘मोगुल’ हे नाटक एका विक्षिप्त आणि हळव्या असलेल्या युवकावर आधारित आहे. नाटकाची कथा विनोदी पद्धतीने सुरू होते. दुसऱ्या अंकापर्यंत नाटक अधिक गंभीर होत जाते आणि पुन्हा हसत खेळत नाटकाचा पुन्हा पडदा उघडतो. नाटकाचे कथानक अत्यंत साधे असले तरी गंमतीजमतीतून ते खुलत जाणारे होते. ‘मोगुल’ याचा अर्थ महत्वाचा माणूस तो त्याचे महत्व इतरांना पटवून देण्यासाठी तो जे प्रयत्न करतो ते प्रयत्न नाटकाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दिसतात. ‘मोगुल’ लहान असताना त्याच्या आईचा व वडिलांचा काडीमोड होतो. त्याचवेळी त्याचे भाऊ आणि बहिण त्याच्यापासून दुरावतात. कालांतराने मोगुल मोठा झाल्यावर त्याच्या आईचे निधन होते. बहिणी सोबत राहणारे वडील तिच्याशी भांडत असल्याने ती देखील वडिलांना सोडून मोगुलकडे येऊन राहते.

गेल्या काही वर्षांपासून भाऊ-बहिणीच्या नात्याला दुरावलेले दोघ जण एकमेकांच्या जवळ येतात. याचवेळी मोगुलने पेईंगगेस्ट ठेवलेला वल्लभ साठे अंकिताचा प्रियकर असतो. या तिघांचे एकत्र असणे नाटकात अत्यंत रंजकतेने मांडले आहे. या नाटकांत भांडण आहे, गैरसमज आहेत. मोगुलला असलेली नात्याची भूक दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. या नाटकात जगण्याचं तत्त्वज्ञान उलगडून सांगण्यात आले आहे.

यातील शौनक गायधनी (वल्लभ साठे), केतकी कुलकर्णी (कमु), मनिषा एकबोटे (आजी), मानसी पाठक ( राधिका), सई आपटे (अंकिता), निशिगंधा घाणेकर ( मवशी), प्रतीक शर्मा ( मोगुल) यांनी भूमिका साकारल्या. नाटकाचे लेखन आदिल नुर शेख, दिग्दर्शन- अमित शिंगणे, नेपथ्य- कुंतक गायधनी, प्रकाश योजना-स्वरुप बागुल, संगीत-ज्युईली सातभाई, वेशभुषा-निखील पारखी, रंगभूषा- माणिक कानडे, निर्मीती विजय शिगणे यांची होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकांमध्ये आज उसळणार गर्दी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करून केंद्र सरकारने बुधवारी बँक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गुरुवारी (दि. १०) सर्व बँकातंमध्ये प्रचंड गर्दी होणार आहे. त्यामुळे ग्राहकांची उसळणाऱ्या या गर्दीवर नियंत्रणात ठेवायचे कसे, असा प्रश्न सर्व बँकेपुढे आहे. त्यासंदर्भात बुधवारी सर्वत्र नियोजन सुरू होते.

बँकेच्या खात्यात रद्द नोटा जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत असली तरी सर्वच खातेदार एकाच वेळी गर्दी करेल, अशी धास्तीही बँकेला आहे. त्याचप्रमाणे दोन दिवस एटीएम बंद असल्यामुळे पैसे एक्सचेंज करण्यासाठी बँकेतच गर्दी होणार आहे. त्यातून वादावादीची शक्यता लक्षात घेवून खासगी सुरक्षारक्षकांसह पोलिस बंदोबस्ताचीही तयारी काही बँकांनी ठेवली आहे.

एटीएम बंद असल्यामुळे पैसे बदलण्यासाठी गर्दीही मोठी असणार आहे. बँका बुधवारी बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी बँकेचे अंर्तगत काम दिवसभर सुरू होते. त्यात गुरुवारची तयारी करण्यात येत होती. विशेष म्हणजे बँकेत अनेक खातेदारांचे माहितीसाठी फोन येत होते. काही जण बँकेच्या कर्मचाऱ्यांनाच आमीष देण्याच्या ऑफरही देत होत्या. अशा नागरिकांची समजूत काढण्याचे दिव्य बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पार पाडावे लागले.

फॉर्म भरून द्यावा लागणार
जनधन योजनेंतर्गत खाते असणाऱ्या खातेधारकांना जुन्या नोटा जमा करून त्याबदल्यात नव्या नोटा मिळतील. पाचशे व हजाराच्या नोटा रिझर्व्ह बँकेची सर्व कार्यालये, बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बदलून मिळणार आहे. त्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड सोबत लागणार आहे.

एटीएममध्ये होणार बदल
एटीएममध्ये पैसे भरण्याबरोबरच नव्या नोटामुळे काही सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागणार आहे. त्यामुळे नवीन प्रणाली अपडेट करण्यामध्ये दोन दिवस जाणार आहेत.

पैसे भरण्यास नो लिमिट
खात्यात पैसे भरण्यासाठी कोणतीच मर्यादा नसल्यामुळे बँकेत त्यातूनही प्रचंड कॅश जमा होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्याचा ताणही बँकेवर येणार आहे. असे पैसे भरतांना आयडी कार्ड लागणार आहे. पैसे जमा करतांना रोख व्यवहारासोबत मोबाइल बँकिंग, फंड ट्रान्सफर, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांचा वापरही करता येऊ शकणार आहे.

जमा रक्कम मिळणार
जमा केलेल्या रक्कमेच्या मोबदल्यात सर्व रक्कम जशास तशी मिळणार असल्यामुळे ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे बँक व्यवस्थापनांनी स्पष्ट केले आहे. शिवाय जमा केलेल्या रकमेतून कोणताही तोटा होणार नाही. सुरुवातीला प्रति व्यक्ती केवळ ४ हजार रुपये काढता येणार आहे.

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्यामुळे बँकेत गुरुवारी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच बँकांनी तयारी केली आहे. गर्दी वाढल्यास बंदोबस्तासाठी पोलिसांची मदत घेतली जाऊ शकते. नेहमीपेक्षा एक तास जास्त बँका सुरू राहणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त ग्राहकांना सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- अशोक चव्हाण, अध्यक्ष, लीड बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातही व्यवहार ठप्प

$
0
0

पेट्रोलपंप, एटीएम, रेल्वेस्थानकावर गर्दी; सुट्टे पैसे नसल्याने नागरिकांची दमछा‌क

टीम मटा

हजार व पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर बुधवारी (दि. ९) सर्वच ठिकाणी तारांबळ उडाली. या निर्णयाचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. जिल्हाभरात शेतमालापासून ते अनेक छोटे -मोठे व्यवहार ठप्प झाले. पेट्रालेपंप, एसटी बस, छोटी-मोठी दुकाने याठिकाणी नागरिकांचे सुट्टे करताना संबंधितांशी खटके उडत असल्याचे चित्र दिसून येत होते. या निर्णयाने त्र्यंबकेश्वर, मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, निफाड, सटाणा या तालुक्यांतील नागरिकांची गैरसोय झाली. बऱ्याच ठिकाणी हजार व पाचशेच्या नोटांचे सुट्टे पैसे मिळवताना अनेकांची दमछाक झाली.


मनमाडला रेल्वेस्थानकात वाद

मनमाड : बुधवारी (दि. ९) सकाळपासूनच मनमाडसह नांदगाव व चांदवडमध्ये नोटा बंद इफेक्ट जाणवू लागल्याचे चित्र होते. मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात तिकीट बुकिंग खिडकीवर प्रत्येकजण हातात पाचशेची नोट काढून तिकीट मागताना दिसत होता. या प्रवाशांना काही रुपयांच्या तिकिटाच्या मोबदल्यात पाचशेचे सुट्टे देणे बुकिंगवाल्यांची कसोटी पाहणारे ठरत होते. चाळीस,पन्नास रुपयांसाठी पाचशेच्या नोटा का काढू, असे वारंवार सांगण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. शेवटी वादविवाद टाळण्यासाठी अखेर ‘कृपया पाचशे च्या नोटा देऊ नका सुट्टे पैसे द्या’ असा फलक रेल्वे बुकिंग खिडकीवर लावण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आल्याचे वाणिज्य निरीक्षक अनिल बागले यांनी सांगितले

हॉटेल मध्येही बोर्ड

दरम्यान पाचशे आणि हजारच्या नोटांनी हॉटेल व्यावसायिकांना ही भंडावून सोडले. आपल्याकडची पाचशेची नोट जावी यासाठी सर्वत्र लोकांचा अट्टाहास दिसून आला. मनमाडमधील काही हॉटेलमध्ये ‘पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाही’ असा फलक पहावयास मिळाला. प्रवासात असलेल्या अनेकांना या नव्या निर्णयाचा फटका बसला शिर्डीला जाण्यासाठी मनमाड येथे आलेल्या साई भक्तांना पाचशेच्या नोटीबाबतचा निर्णय माहित नव्हता. त्यांना शिर्डीसाठी खासगी वाहन करताना अडचणी आल्या.


मालेगावात धावपळ

मालेगाव : शहरात बुधवारी (दि. ९) या निर्णयाचे परिणाम शहर व तालुक्यात पाहायला मिळाले. शहरातील नागरिकांनी मंगळवारी, निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेचच विविध एटीएमवर गर्दी केली होती. खासकरून आपल्याकडील पाचशे व हजारच्या नोटा कमी व्हाव्यात यासाठी अनेकांनी पेट्रोलपंपावर मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत एटीएम केंद्रांवर लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. त्यात पुढील दोन दिवस बँक आणि एटीएम बंद राहणार असल्याने आर्थिक व्यवहारात धावपळ व्हायला नको म्हणून खात्यावरून शंभरच्या नोटा घेण्यासाठी सर्वच एटीएम मशीन्सवर रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. ग्रामीण भागात एटीएममधून रात्रीच अनेकांनी शंभरच्या नोटा मिळवण्यासाठी रांगा लावल्या होत्या.


शंभर, पन्नासच्या नोटांचे टेन्शन

त्र्यंबकेश्वर : या नोटाबंदीने त्र्यंबकेश्वरलाही चांगलाच गोंधळ उडाला आहे. किरकोळ चहा, नाश्ताकरीता पन्नास, शंभर रुपये आणायचे कुठून, अशी समस्या निर्माण झाली आहे. दुकानदार पाचशे रुपयांची नोट स्वीकारतात मात्र सुटे देण्यास तयार नाहीत. तशात एटीएम मशीन बंद असल्याने करायचे काय, अशी समस्या निर्माण झाली. बहुसंख्य भाविक एटीएमच्या भरवशावर असतात आणि विधीसाठी प्रवासासाठी बाहेर पडताना हजार, पाचशेच्याच नोटा बाळगतात त्यामुळे त्यांचेही हाल झाले.तीर्थक्षेत्र आणि धार्मिक विधी यावर येथील आर्थिक उलाढाल आहे. साहजिक येथील चलनात हजार आणि पाचशेच्या नोटांचे प्रमाण अधिक आहे.


पेट्रोलपंपावर पाचशेचे पेट्रोल

पेट्रोल पंपावर स्कूटर घेऊन येणारे सुटया नोटांच्या अभावी पाचशेचे पेट्रोल खरेदी करत होते. स्कूटरची क्षमता जास्तीत जास्त तीनशे रुपयांचे पेट्रोल इतकी असते त्यामुळे उर्वरित रकमेचे पेट्रोल ग्राहक बाटल्यांमधून भरत होते.


बसचा प्रवास कटकटींचा

दहा, वीस रुपयांच्या तिकीटासाठी प्रवासी चक्क हजार पाचशेची नोट पुढे करत असल्याने कंडक्टर वैतागून गेले होते. ग्रामीण भागातून सकाळी येणाऱ्या बसला आता पाचशे रुपये बंद होणार म्हटल्यावर ग्रामस्थ या नोटा कटवण्याच्या मागे आहेत. दिवसभर बस प्रवासात वादंग निर्माण होताना आढळत होते.


सटाण्यात नागरिकांची गैरसोय

सटाणा : सटाण्यातही या अनपेक्षित निर्णयामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने सर्वसामान्यांची गैरसोय झाली. बुधवारी (दि. ९) सकाळपासूनच अनेकांनी आपल्याकडील पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा तत्काळ बाजारात आणल्या. भारत संचार निगम च्या कार्यालयातील दूरध्वनी बील भरणा केंद्र बंद ठेवण्यात आले होते. तर पोस्ट कार्यालयातदेखील कोणत्याही प्रकारचा भरणा घेतला जात नसल्याने या ठिकाणी बराच वेळ ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडलेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोट्या नोटांना मोठा भाव!

$
0
0

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मध्यरात्रीतून बाद ठरविल्याने बुधवारी शहरातही दैनंदिन आर्थिक व्यवहार मंदावले. बँका-एटीएम बंद असल्याने हाती असलेल्या पैशांचा विनियोग अत्यंत जपून करण्यास प्राधान्य देण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देताना अनावश्यक खर्च टाळण्यावर नाशिककरांचा भर राहिला. १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांना अधिक महत्त्व आले. दरम्यान, पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारताना ठिकठिकाणी अडवणूक होऊ लागल्याने नागरिकांसह, पर्यटक, रुग्णांचे अतोनात हाल झाले.

देशाच्या आर्थिक घडामोडींमध्ये बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धक्कातंत्र मध्यरात्रीपासून अंमलात आले. बुधवारी एटीएम तसेच बँका बंद राहतील हे मंगळवारी रात्रीच स्पष्ट झाल्याने अनेकांनी त्याच क्षणापासून पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा लावल्या. अनेक एटीएममधील शंभराच्या नोटा संपल्याने नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. खिशामध्ये उपलब्ध पैशांवरच पुढील किती दिवस काढावे लागणार याबाबत अनिश्चितता असल्याने नागरिकांनी केवळ अत्यावश्यक खर्चालाच प्राधान्य दिले. तातडीचे नसलेले व्यवहार जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यात आल्याने बाजारपेठेत आज निरुत्साहाचे वातावरण होते.

प्लास्टिक करन्सीला प्राधान्य
अगदी दहापासून शंभर रुपयांपर्यंतच्या नोटाही नागरिक अगदी जपून वापरत असल्याचे पहावयास मिळाले. दुधवाला, भाजीवाला इतकेच काय तर प्रत्येक ठिकाणी केवळ शंभर रुपयांपर्यंतच्याच नोटांचा आग्रह धरण्यात येत होता. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार असल्या तरी त्या स्वीकारण्यास कुणीच तयार नसल्याचे चित्र सर्वत्र होते. त्यामुळे शक्य असेल तेथे नागरिकांनी क्रेडीट तसेच डेबीट कार्ड यासारख्या प्लास्टिक करन्सीद्वारे खरेदी विक्रीचे व्यवहार उरकले.

‘सॉरी, नो चेंज प्लीज’
मेडिकल स्टोअर्स, पेट्रोलपंप, सरकारी हॉस्पिटल्स, इतकेच नव्हे तर शहर बसेसमध्येही काही ना काही निमित्त साधून पाचशे आणि हजारांच्या नोटा सुटे करवून घेण्यास नागरिक प्राधान्य देत असल्याचे चित्र होते. मात्र, अशा सर्वच ठिकाणांवर सुटे पैसे देण्याबाबत असमर्थता दर्शविली जात असल्याने व्यवहार मंदावले.

मोठ्या रकमांमुळे डोकेदुखी
मोदी सरकारचे आदेश असूनही नाशिकमध्ये मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल्स इतकेच नव्हे तर पेट्रोलपंप सारख्या ठिकाणी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला जात होता. या मोठ्या रकमेच्या नोटा वटवितांना नागरिकांची ठिकठिकाणी अडवणूक केली जात होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उदभवले. मोठ्या नोटा स्वीकारण्यात येणार नाहीत, असे फलक अनेक ठिकाणी लावण्यात आल्याचे पहावयास मिळाले.

‌ठिकठिकाणी वादविवादांचे फटाके
एरवी एटीएमद्वारे पैसे काढणे लोकांच्या अंगवळणी पडले असतांना दोन किंवा त्याहूनही अधिक दिवस एटीएम बंद असण्याची शक्यता गृहीत धरून लोकांनी हाती असलेला पैसा सांभाळून वापरण्यास प्राधान्य दिले. बरेचसे आर्थिक व्यवहार, खरेदी उद्यावर ढकलण्यास पसंती दिली. खासगी मेडीकल स्टोअर्सकडून पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याने अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उदभवले. रिटेल व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांचे यामुळे नुकसान झाले.

00
इंधन पंपांवर मुजोरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारल्या जाण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी शहरातील सर्वच इंधन पंपांवर प्रचंड गर्दी उसळली. मोठ्या चलनी नोटा स्वीकारणार नाही, अशी भूमिका काही पंपचालकांनी घेतल्यामुळे अनेक ठिकाणी वादवादी झाली. तर काही पंपचालकांनी पाचशे, हजारांच्या नोटा स्वीकारत आपला व्यवहार सुरळीत ठेवला. तर काही पंपचालकांनी इंधन संपल्याचे फलक उभारत पंप बंद करून टाकले.

सरकारने इंधनपंपावर पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश दिल्यानंतरही काही ठिकाणी इंधनपंपचालकांनी आठमुठेपणाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. जिल्हाभरात ८५० हून अधिक पंप आहेत. तेथे जवळपास असेच चित्र होते. मंगळवार रात्रीपासून पंपावर वाहनचालकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली. दिवसभर गर्दी वाढतच गेली. काही ठिकाणी तर पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाही, असे स्पष्ट सांगण्यात आल्याने अनेकांना माघारी फिरावे लागले.

बड्या वाहनांची अडचण
केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केल्यामुळे परराज्यातून आलेल्या ट्रकचालकांची मोठी अडचण झाली. पण डिझेलसाठी पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात असल्यामुळे त्यांनी अधिक रकमेचे डिझेल भरून घेतले. मात्र, त्यामुळे अन्य खर्चासाठी पैशांची त्यांना चणचण भासली.

सुट्या पैशांसाठी वणवण
मोठ्या चलनी नोटा घेऊन इंधन भरण्यासाठी गेलेल्या वाहनचालकांना सुटे मिळाल्यानंतर पैसे देतो असे सांगत त्यांना ताटकळत ठेवण्यात आल्याच्याही घटना शहरात सर्वत्र घडल्या. हजार व पाचशेच्या नोटा स्वीकारणाऱ्या पंपचालकांकडे सुटे पैसे नसल्याने त्यांच्यासमोरही प्रश्न होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा लिलावात धनादेशाद्वारे व्यवहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर बुधवारी (दि.९) बँका आणि गुरुवारी (दि. १०) बँका बंद असल्याने व्यापारी वर्गाकडे शंभरच्या नोटांची उपलब्धता नसल्याने लासलगाव, निफाड, पिंपळगांव (ब.) येथे कांदा लिलाव उशिरा सुरू करावे लागले. शिवाय शेतकऱ्यांना कांदा लिलावाच्या पैसे उधार ठेवावे लागले किंवा त्यांना धनादेश देण्यात आले. बहुतांश शेतकऱ्यांनी धनादेश घेणे पसंत केले. काहींनी आपली कमी प्रमाणात पाचशे व हजारच्या नोटांच्या रुपात स्वीकारली.

पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कांदा व्यापारी वर्गात बुधवारी होणाऱ्या कांदा लिलावाची चिंता भेडसावू लागली होती. कारण बुधवार आणि गुरुवार बँका बंद आणि शेतकरी लिलावाचे पैसे घेताना पाचशे आणि हजारच्या नोटा घेणार की नाहीत. या शंकेमुळे निफाड येथे बुधवारी १० वाजता सुरू होणारा कांदा लिलाव ११ वाजेपर्यंत सुरू झाला नाही. सव्वा अकाराला निफाडचे कांदा व्यापारी निफाड कांदा मार्केट येथे आले.

सुरुवातीला आलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरीवर्गाशी संवाद साधला. पाचशे किंवा हजारच्या रुपात ज्यांना पैसे घेणे शक्य आहे त्यांनी स्वेच्छेने घ्यावे किंवा शेतकऱ्यांनी कांदा लिलावाचे पैसे उधारीने, धनादेश घ्यावे, असे सुचवले. शेतकऱ्यांनी व्यापारी वर्गाच्या सुचवलेल्या या विनंतीचा मान राखून उधार किंवा धनादेशाने पैसे घेण्यास सहमती दर्शवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीत उधारीत शेतमालाची विक्री

$
0
0

बाजारपेठेत दिसला शुकशुकाट

म. टा. वृत्तसेवा, घोटी

आर्थिक सर्जिकल स्ट्राइकचा परिणाम काहीअंशी ग्रामीण भागात अनुकूल-प्रतिकूल स्थितीत पहावयास मिळाला. भाताची बाजारपेठेत आवक होऊनही नोटांच्या उपलब्धतेऐवजी शेतकऱ्यांना काही प्रमाणात परत जावे लागले. तर काही शेतकऱ्यांना काही दिवसांच्या हवाल्याने भात पीक विकावे लागले. कोट्यवधींची टर्नओव्हर असलेल्या घोटीच्या बाजारपेठेतही नोटांमुळे ग्राहक वर्ग हतबल झाला होता. पेट्रोल पंपावरही हाच वाद कायम राहिल्याने शाब्दिक चकमकी झाल्या.

काळ्या पैशांचा नायनाट करण्यासाठी पाचशे, हजारच्या नोटा बंद करण्याची बातमी व्यापाऱ्यांमध्ये आगी सारखी पसरली. त्यानंतर लगेचच बाजारात ग्राहकांकडून पाचशे-हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला. हजार-पाचशेच्या नोटा खिशात असतानादेखील घोटी बाजारापेठेत दोलायमान परिस्थिती निर्माण झाली आहे. घोटी शहरात बुधवारी बॅंक, तर दोन दिवस एटीएम बंद असल्याने रात्रीपासून गर्दी झाली होती. अचानक निर्णय झाल्याने बँकांमध्ये शंभर, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा मशीनमध्ये उपलब्ध होत्या. मग यातून शंभरच्या नोटा काढण्यासाठी खातेधारकांना चारशे-चारशे रुपयांनी शंभरच्या नोटा मिळविताना मोठी कसरत करावी लागली.

भात खरेदीस आळा

घोटी शहरात या अभूतपूर्व निर्णयामुळे भात खरेदीस आळा बसला आहे. शेतकरी बांधवांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून व्यापारी बांधवसुद्धा हतबल झाले आहेत. त्यामुळे बुधवारी दिवसभर प्रत्येक दुकानात व भात खरेदीमध्ये थंड वातावरणात कमालीचा थंडावा होता. पाचशे व हजारच्या नोटा न स्वीकारण्याच्या धोरणामुळे जवळपास सर्व आर्थिक व्यवहार अत्यंत संथगतीने चालू होते. त्यामुळे घोटी शहरात नेहमीसारखा जोश नव्हता.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. पाकिस्तान, चीन, बांग्लादेशसारख्या देशांकडून बनावट चलन वेगवेगळ्या मार्गाने बाजारात आणले जात असल्याने त्यास आळा बसेल. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दीर्घकाळासाठी निर्णय चांगला आहे.

- विष्णू वारुंगसे, सहकार तज्ज्ञ, घोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरगाणा तालुक्यातील पूल बनला धोकादायक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा तालुक्यातील उंबरदे (प) येथील पूल धोकादायक बनला आहे. तालुक्याच्या गावाला जोडणारा नार नदीवरील हा पूल सुरगाणा तालुक्यातील सर्वात जुना पूल आहे. ही बाब बांधकाम विभागाच्या निदर्शनास आली असूनही या पुलाकडे विभागाचे अधिकारी दुर्लक्ष का करतात, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. तातडीने या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

उंबरदे व हातरूंडी दरम्यान असलेल्या या पुलाचे बांधकाम १९८० ते १९८५ दरम्यान झालेले आहे. पुलाचे बांधकाम दगडी असल्यामुळे सद्यस्थितीत जागोजागी दगड निघाले आहेत. बांधकामाचा भराव असलेली बाजूही पूर्णपणे निखळली आहे. तसेच पुलाचे वरचे संरक्षण कठडे मोठ्या प्रमाणात तुटले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

दुरुस्तीला मुहूर्त केव्हा?

या पुलामुळे परिसरातील पळसन, आमदा, वागण, भवाडा, राक्षसभुवन, खडकी, पळशेत, मेरदाड, कोटबा, गहाले, वाघाडी, बोरपाडा, सुळे, अतिदुर्गम भागातील ही गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाऊ शकतात. तसेच या गावाचे दळणवळण ठप्प होऊ शकते. त्यामुळे आता या पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त लागणे महत्त्वाचे झाले आहे. अशा या महत्त्वाच्या समस्येकडे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी का लक्ष देत नाही, असा प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात सहस्त्रार्जुन महाराज पालखी

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, येवला

सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आद्यपुरुष श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन महाराज जयंतीनिमित्त येवला शहरातून समाजाच्यावतीने भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. भगवे फेटेधारी महिला अन् टोपी परिधान केलेले पुरुष मंडळींमुळे ही मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून गेली.

श्री बालेश्वरी मंदिरापासून या पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. बालेश्वरी मंदिर येथे महाआरतीने मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. श्री सहस्त्रार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या पालखी मिरवणुकीमध्ये समाजाचे अध्यक्ष गोविंदसा वाडेकर, उपाध्यक्ष रवींद्र चौधरी, संजय कुक्कर, सहस्त्रार्जुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन बाकळे, राजश्री पहिलवान, कांचन पहिलवान, विलास पवार, जयप्रकाश कोकणे, अविनाश सांबर, सागर खानपुरे, ललित भांडगे, वामन वाडेकर, प्रवीण पहिलवान, विनोद बाकळे, प्रवीण कुक्कर, श्रीकांत बाकळे, पंकज पहिलवान, संजय फुलपगार, संजय वडे, पांडुरंग भांडगे, दीपक वखारे, बाळासाहेब भांडगे, योगेश सांबर, धनंजय हंडी, शेखर खेरूड, राकेश पेटकर, अमोल चिनगी, प्रतुल खानापुरे, राहुल भांडगे, अनिल हबीब, राजेंद्र वडे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीक्षित दाम्पत्याला 'लोकसेवक' पुरस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महाराष्ट्र गो-विज्ञान समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या 'जमनाबेन लोकसेवक पुरस्कार'ची घोषणा करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यातील लोकसेवक दाम्पत्य मुकुंद व वासंती दीक्षित यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष मोहन सराफ यांनी दिली. दरवर्षी सर्वोदयी स्व. जमनाबेन मनसुख भाई कुटमुटीया यांचे नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे २३ वे वर्ष आहे.

'जमनाबेन लोकसेवक पुरस्कार' हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठेचा पुरस्कार मनाला जातो. गेल्या २३ वर्षांत प्रथमच हा सन्मान जिल्ह्याला मिळाला आहे. पुरस्कार निवड समितीत पद्मविभुषण माजी न्यायमूर्ती धर्माधिकारी, सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष जयवंत मठकर, अखिल भारतीय नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांचा समावेश होता. पुरस्कार विजेत्यांना सुप्रसिद्ध समाजसेवी डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २१ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता हा सोहळा होईल. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे असेल.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव संजय जोशी, कोषाध्यक्ष जितेंद्र कुटमुटीया , विश्वस्त डॉ. यशवंत (बहार) देवरे, विश्वस्त हिरामण जाधव, अपश्चिम बरंठ, जयेष शेलार, नचिकेत कोळपकर यांनी केले आहे.

जीवन आदिवासींसाठी समर्पित

‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’चे मानकरी असलेल्या दीक्षित दाम्पत्याने आपले आयुष्य आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित केले. कविवर्य कुसुमाग्रजांच्या सल्ल्याने ते दिवंगत बाबा आमटेंकडे गेले. त्यांना हेमालकसाच्या युवक बिरादरी प्रकल्पात बाबा आमटे यांनी जबाबदारी सोपवली. येथे त्यांनी आपल्या आयुष्याची १८ वर्षे अत्यंत घनदाट जंगलात राहून तेथील आदिवासी बांधवांना आपलेसे केले. त्यानंतरची १० वर्षे मध्य प्रदेशात विविध क्षेत्रांत काम केले. सध्या ते त्र्यंबकेश्वरच्या पश्चिमेकडील आदिवासींमध्ये गेली १५ वर्षे काम करीत आहेत. त्यांच्या या समर्पित कार्याचा गौरव यानिमित्ताने होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप उमेदवाराची प्रभाग नऊमधून माघार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक नऊमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेवरील भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भूषण भावसार यांनी बुधवारी आपला अर्ज मागे घेतला.

या प्रभागात शिवसेनेच्या वतीने सागर पांडुरंग लोणारी यांना उमेदवारी देण्यात आलेली असून, सेना-भाजप यांच्यात झालेल्या ‘युती’मध्ये ही जागा सेनेच्या वाट्याला गेली आहे. युतीत ठरल्यानुसार भूषण भावसार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. येवला नगरपालिका निवडणुकीत बुधवार अखेर नगराध्यक्षपदासाठीच्या रिंगणातून दोन, तर नगरसेवकपदासाठीच्या पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. अद्याप नगराध्यक्षपदासाठी १०, तर नगरसेवकपदासाठी विविध प्रभागांतील एकूण १३२ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. उमेदवारी अर्ज माघारीसाठी आता गुरुवार व शुक्रवार, असे शेवटचे दोनच दिवस शिल्लक आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीसह विविध प्रभागातून कुणाकुणाची माघार होते अन् कोण कोण निवडणुकीला सामोरा जातो याकडे येवला शहरवासियांचे लक्ष लागले आहे. माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच नगराध्यक्षपदाच्या महत्त्वपूर्ण मुकाबल्यासह कुठल्या प्रभागात कुणाकुणात कसा सामना रंगतो याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठ्या नोटांनी काढला पोलिसांचा ‘दम’!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक - चलनातील एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्याचा थेट परिणाम शहर वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर झाला आहे. कारवाई व दंड वसुलीत घट झाली असून, नवीन नोटा चलनात येईपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. बंद झालेल्या नोटा स्वीकारायच्या नाहीत, अशा सूचनाच असल्याने वाहतूक पोलिस नियम मोडणाऱ्यांकडून शक्य तितके पैसे काढून पावती फाडण्यास प्राधन्य देत आहेत.

शहर वाहतूक शाखेतर्फे दररोज भरभक्कम दंड वसूल केला जातो. वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांची संख्या कमी नाही. यामुळे वाहतूक विभाग डिसेंबर अखेरीस दोन ते सव्वा दोन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्याची शक्यता आहे. मागील वर्षापर्यंत एकूण दंड वसुलीचा आकडा फारतर एक-दीड कोटी रुपयांपर्यंत स्थिरावत होता. आजमितीस वाहतूक विभागामार्फत दिवसभरात सरासरी ४० ते ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जातो. मात्र मागील आठ दिवसांचा विचार करता यात मोठी तफावत झालेली दिसून आली. विशेषतः सरकारने एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद ठरवल्यानंतर वाहतूक पोलिसांसमोर दंड वसुलीचा यक्षप्रश्न निर्माण झाला. ८ नोव्हेंबर रोजी रात्री सदर नोटा बाद झाल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी दंडात्मक कारवाई करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या पोलिसांना सुट्या पैशांची वानवा जाणवू लागली. बाद झालेल्या नोटा स्वीकारायच्या नाहीत, असे स्पष्ट आदेश होते. त्यामुळे, नियम मोडणारे आणि वाहतूक पोलिस यांच्यातच वाद सुरू झाले. दंड घ्यायचा असेल तर घ्या, अशी भूमिकाच नियम मोडणारे घेऊ लागले. यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. टोईंग करून आणलेली वाहने सोडवतानादेखील असाच गोंधळ उडाला. काही ठिकाणी वाहतूक पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये झालेल्या वादानंतर अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली.


एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर आम्ही शंभर रुपयांच्या किंवा नवीन नोटा स्वीकारण्यास प्राधान्य दिले आहे. वाहतूक नियम पाळणे ही वाहनचालकाची जबाबदारी आहे. नियम मोडून पुन्हा पोलिसांशी वाद घातला तर कारवाई करण्यात येईल. नियमाचे पालन केले तर दंडात्मक कारवाईचा प्रश्नच येणार नाही.

जयंत बजबळे, सहायक पोलिस आयुक्त



मागील आठ दिवसातील दंड वसुली

२ नोव्हेंबर-३२ हजार ४००

३ नोव्हेंबर-४८ हजार २००

४ नोव्हेंबर-४४ हजार ६००

५ नोव्हेंबर-३१ हजार २००

६ नोव्हेंबर-४४ हजार ४००

७ नोव्हेंबर-४६ हजार २००

८ नोव्हेंबर-३४ हजार

९ नोव्हेंबर-२६ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमी अभिलेखमधील तीन लाचखोरांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जमिनीची मोजणी केल्यानंतर त्याचा नकाशा देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सिन्नर भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह दोघांना अॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) जेरबंद केले. यामुळे सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली असून, एक हजार आणि पाचशे रुपयांच्या बंद नोटाही लाचखोर अधिकारी स्वीकारत असल्याने सर्वत्र टिकेची झोड उठत आहे.
पांडुरंग नरहरी सानप (उपअधीक्षक), सुरेश चंद्रकिशोर रगडे (शिरस्तेदार) आणि भगीरथ जीभाऊ चव्हाण (लिप‌िक) असे एसीबीने अटक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सिन्नर शिवारातील गट क्रमांक ७३५ (९९०) या दोन हेक्टर ६३ आर क्षेत्रात तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या नावे १ हेक्टर ९३ आर शेती आहे. सदर क्षेत्राची तक्रारदार यांना विक्री करायची असल्याने त्यांनी सिन्नर तालुका भूमी अभिलेख कार्यालयात फी भरून जम‌िनीची मोजणी करून घेतली. मोजणी केल्याप्रमाणे सदर क्षेत्राचा नकाशा घेण्यासाठी तक्रारदाराने वरील तिघा संशयितांची गाठ घेतली. मात्र, सर्व रितसर असताना वरील संशयित आरोपींनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपये लाचेची रक्कम मागितली. तडजोडीअंती १२ हजार रुपये लाच घेण्यास संशयित आरोपी तयार झाले. तक्रारदाराला लाचेची रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयात संपर्क साधला. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास एसीबीच्या अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराने दिलेली १२ हजारांची रक्कम शिरस्तेदार सुरेश रगडे याने स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रगडेसह उर्वरीत दोघांना अटक केली. यामुळे सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली असून, चलनातून बंद झालेल्या नोटा स्वीकारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची मागणी केली जात आहे. लाचखोरीच्या तक्रारींसाठी क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या नोटांवर शर्विलकांची नजर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद होताच त्या बदलून घेण्यासाठी सर्वसामान्यांची राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. पुढील ५० दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार असून, दररोज गर्दीचे चित्र निर्माण होऊ शकते. या दरम्यान बॅग लिफ्टींग करणारे चोरटे सक्रिय होण्याची शक्यता असून, मोठी रोकड जवळ बाळगणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
शहरातील विविध बँकांमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार पार पडतात. गर्दीचा फायदा घेत चोरटे नवनवीन शक्कल लढवत बँकेत आलेल्या ग्राहकांना फसवतात. आता तर चोरट्यांसाठी ही पर्वणी ठरू शकते. त्यामुळे मोठी रक्कम घेऊन बँकांकडे जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या परीने सावधानता बाळगावी. विशेषतः नोटा बदलण्यासाठी बँकेत जाताना रक्कम जास्त असल्यास भक्कम बॅगेत पैसे व्यवस्थित ठेवावेत. घरून पैसे घेऊन निघाल्यानंतर सरळ बँकेत जावे, अधे-मधे थांबू नये. आपल्यासोबत मदतीसाठी कोणाला तरी घ्यावे. पैशाची बॅग डिक्कीत सुरक्षित ठेवल्याची खात्री करावी. बँकेत कोणी नोटा मोजून देण्याची तयारी दर्शवली किंवा कारण नसताना संभाषण सुरू केले, तर सावध रहावे. नोटा मोजण्याच्या किंवा बदलून देण्याच्या बहाण्याने हे लोक आपली फसवणूक करू शकतात. ज्येष्ठ नागरिक, महिला व अपंगांनी आपल्या मदतीसाठी कोणालातरी सोबत ठेवावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images