Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हरभरा क्षेत्रात वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

यंदा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामात शेती उत्पादन चांगले आल्याने आता शेतकरी रब्बीच्या तयारीला लागले आहेत. रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांच्या लागवडीलादेखील सुरुवात झाली आहे. कृषी विभागाने रब्बीसाठी ८ हजार ५१० हेक्टरवर पेरणी उद्दिष्ट ठेवले असून, आतापर्यंत नऊ टक्के पेरणीची कामे आटोपली आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गोकुळ आहिरे यांनी दिली.

तालुक्यात यंदा सरासरीच्या ९१ टक्के पाऊस झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. त्यामुळे बाजार समितीत मक्याची आवकदेखील वाढली आहे. खरिपातील पीक काढणीची कामे अखेरच्या टप्प्यात असल्याने आता शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. हरभरा, गहू पेरणीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. रब्बी हंगामात तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याचे असून, त्या खालोखाल गहू आणि मका आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात सर्वाधिक उत्पादन होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत ८०६ हेक्टरवर पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हरभरा पिकाच्या लागवडीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. डिसेंबरअखेर रब्बीची पेरणी सुरू होणार असल्याने निर्धारित क्षेत्रात हरभरा पिकाची पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज आहे. थंडीचा कडाका वाढला असून हरभरा, गहू व कांद्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे.

कांद्याच्या क्षेत्रातही वाढ

कांदा हे शेतकऱ्यांसाठी कधी हसू तर कधी आसू आणणारे पीक आहे. खरीप हंगामात कांदा लागवडीत वाढ झाली आहे. सप्टेंबरअखेर आठ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली होती, तर रब्बी हंगामातदेखील डिसेंबरअखेर दोन हजार हेक्टरवर कांदा लागवड होईल. त्यामुळे तालुक्यात गेल्या काही वर्षांतील कांदा लागवडीतील ही लक्षणीय वाढ म्हणता येईल.

रब्बी पीक पेरणी

पीक सर्वसाधारण क्षेत्र (हेक्टर) - प्रत्यक्ष पेरणी (हेक्टर) : गहू ३५०० - ३५४, मका ५००- ५, हरभरा ३८००- ४४०, एकूण ८५१०- ८०६
(आकडेवारी ७ नोव्हेंबरपर्यंतची)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तलाठी, ग्रामसेवकांचे धरणे

$
0
0

विविध मागण्यांसाठी जिल्हाभरात एकदिवसीय आंदोलन

टीम मटा

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामसेवक व तलाठी संघटनांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. शासनाने आपल्या मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सिन्नरमध्ये इशारा

सातबारा संगणकीकरण व ई फेरफारमधील सॉफ्टवेअर, सर्व्हर, नेट कनेक्टीव्हिटीमध्ये सुधारणा कराव्या यांसह आदी मागण्यांसाठी सिन्नर तालुका तलाठी संघाच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने मागण्या मान्य न केल्यास १६ नोव्हेंबरपासून राज्यातील तलाठी मंडल अधिकारी व तलाठी सेवावर्गातील अव्वल कारकून हे बेमुदत सामूहिक रजेवर जातील, असा इशारा देण्यात्र आला आहे.

सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला तलाठी संघाचे जिल्हा खजिनदार संजय गाडे, तालुकाध्यक्ष जितेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ करण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मनोज खैरनार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की सिन्नर तालुका २२ फेब्रुवारीपासून ऑनलाइन करण्यात आला. मात्र त्यामध्ये अनेक त्रूटी असल्याने तलाठ्यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते. त्यामुळे सातबारा संगणीकरण व ई फेरफारमधील सॉफ्टवेअर, सर्व्हर, नेट कनेक्‍टीव्हिटी इत्यादींमध्ये सुधारणा कराव्यात. शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाइन वेळेत मिळावा, नागरिकांच्या फेरफार नोंदी मुदतीत होण्यासाठी सॉफ्टवेअरमधील त्रूटी दूर कराव्यात, ऑनलाइनसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या चकरा कमी करण्यासाठी तांत्रिक सुधारणा कराव्यात यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य न केल्यास १६ नोव्हेंबरपासून राज्यातील तलाठी मंडल अधिकारी व तलाठी सेवावर्गातील अव्वल कारकून हे बेमुदत सामूहिक रजेवर जातील, असा इशारा देण्यात्र आला आहे.

यावेळी विष्णू गोसावी, आर. टी. पाटील, एस. पी. सोनवणे, के. डी. गांगुर्डे, शीतल पाटील, एस. जी. गाडे, राहुल देशमुख, स्वरूप गोराणे, आकाश हांडे, पांडुरंग गोळेसर, माणिक गाडे, लक्ष्मण हरणे यांच्यासह अन्य तलाठी, मंडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वरमध्ये धरणे

त्र्यंबकेश्वरमध्ये सोमवारचा दिवस हा आंदोलनाचा दिवस ठरला. पंचायत समिती प्रांगणात ग्रामसेवकांनी, तर तहसील कार्यालयात तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले.

ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर सागर यांनी हे राज्यव्यापी आंदोलन असून, ही सुरुवात असल्याचे सांगितले. जिल्हा आणि विभागीय आंदोलनानंतर दि. १७ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवाकाळ तत्काळ निय‌मित करणे, सोलापूर जिल्ह्यात २३९ ग्रामसेवकांवर झालेली चुकीची कारवाई रद्द करणे, दरमहा ३००० रुपये प्रवासभत्ता मंजूर करणे, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा निर्मित करणे, या सोबतच आणखी १५ मागण्या ग्रामसेवकांच्या आहेत.तलाठ्यांनीदेखील संगणीकृत सातबारा फेरफार नोंदीबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करणे, अवैध गौण खनिज वसुली कामातून तलाठीवर्गास वगळणे आदींसह आणखी सात मागण्यांचे निवेदन दिले. याबाबत मंडलाधिकारी हेमंत कुलकर्णी यांनी माहिती दिली.

कळवणलाही आंदोलन

ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित व न्यायप्रश्नांची सोडवणूक न झाल्याने ग्रामसेवक संघटनेतर्फे कळवण पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ग्रामसेवक युनियन शाखा कळवण तालुका सहभागी होत असल्याची माहिती ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष पांडुरंग खिल्लारी, सचिव विजय देवरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली. यावेळी गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सहायक गटविकास अधिकारी शिवाजी जाधव, विस्तार अधिकारी बाबा सूर्यवंशी, आर. बी. आहिरे, ग्रामसेवक मीना जगताप, जे. बी. जाधव, के. पी. सूर्यवंशी, रुपाली सोनवणे, आसिफ शेख, भास्कर बागूल, एम. बी. पवार, रवी ठाकरे, आशा गोराणे आदींसह ग्रामसेवक उपस्थित होते.

निफाडमध्ये निवेदन

विविध मागण्यांसाठी निफाड तालुका तलाठी संघाने निफाड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तालुक्यातील सर्व तलाठी या आंदोलनात सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शांताराम पवार यांना देण्यात आले. या आंदोलनात अध्यक्ष दौलत नागरे, उपाध्यक्ष बाळासाहेब निफाडे, सरचिटणीस महेश हिरे, सहचिटणीस चंद्रकांत पंडित, एस. एस. गंगोडे, महेश गायकवाड, के. एम. पवार, पी. पी. देशमुख, मंडळ अधिकारी नगरकर सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उद्योग’ फाइल चौकशी फेऱ्यात

$
0
0

फाइल गहाळप्रकरणी तपासाला वेग; एमआयडीसीतील अधिकाऱ्यांची चौकशी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक विकास महामंडळाच्या नाशिक विभागाच्या प्रादेशिक कार्यालयातून कोट्यवधी रुपयांची शासनाची थकबाकी असलेल्या फाइलची कागदपत्रे गहाळ झाल्याचा प्रकार ‘मटा’ने उघडकीस आणला होता. यानंतर पोलिस यंत्रणेनेदेखील उद्योग भवनात जाऊन संबंधित फाइल व अधिकाऱ्यांना सातपूर पोलिस स्टेशनला हजर होण्याचे आदेश देत तपासाला वेग दिला आहे. सोमवारी पोलिसांनी फाइलशी संबंधित एमआयडीसीतील अधिकाऱ्यांची चौकशी केली.

नाशिक विभागातील उद्योगांसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने उद्योग भवनाची निर्मिती करण्यात आली. परंतु, उद्योग भवनातील अनेक कार्यालयात गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. यात शासनाचे कोट्यवधी रुपये बुडविण्यासाठी एका उद्योजकाने एमआयडीसीतील काही लोकांना हाताशी धरून फाइलचे कागदपत्र गहाळ करण्याचा प्रकार केला होता. याबाबत ‘मटा’ने प्रकाशझोत टाकल्यावर फाईलची कागदपत्रे गहाळ झाल्याचे उघडकीस आले होते. यानंतर एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी सातपूर पोलिसात तक्रारअर्ज सादर केला होता. पोलिसांनी पाटील यांच्या तक्रारअर्जाची दखल घेत उद्योग भवनातील कार्यालयात जाऊन माहिती घेतली. यानंतर गहाळ झालेल्या कागदपत्रांची फाइल व संबंधित अधिकारी यांनी पोलिस स्टेशनला हजर राहावे, असे आदेशाचे पत्र एमआयडीसीला दिले होते. दरम्यान, सातपूर पोलिसांनी मात्र संबंधित उद्योजक व दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्योगवर्गांतून केली जात आहे. संबंधित उद्योजकाच्या फाइलीचे कागदपत्र गहाळ झाली आहेत, तो उद्योजकच पोलिस स्टेशनला हजेरी लावत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश सोनवणे यांना भेटले. यामुळे पोलिस कागदपत्रे गहाळ प्रकरणात पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अर्थकारणातून कागदपत्रे गहाळ!

पोलिसांचा अर्ज प्राप्त झाल्यावर एमआयडीसीच्या एरिया मॅनेजर संध्या घोडके यांनी पोलिस स्टेशला हजेरी लावत माहिती दिली. फाइलची कागदपत्रे गहाळ झालेल्या उद्योजकाविरोधात एमआयडीसीत अनेक तक्रारीदेखील उद्योजकांनी केल्या आहेत. परंतु, अर्थकारणातून फाइलीतील कागदपत्रे गहाळ करण्यात आल्याची चर्चा उद्योग भवनात रंगत आहे. त्यातच संबंधित उद्योजक हा एमआयडीसीमधील अनेक अधिकाऱ्यांना मॅनेज करीत असल्यानेच त्याचे फावते असेही नाव न घेता अधिकारी सांगतात. यामुळे या उद्योग फाइलमुळे उद्योग भवनातील कारभार चव्हाट्यावर येणार आहे. यामुळे या प्रकरणी अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग रचनेवर अनेकांचा आक्षेप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या ३२ हरकतींवर सोमवारी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. या सुनावणीत ३२ पैकी ३१ हरकतदारांनी हजेरी लावून आपली मते पुराव्यानिशी सादर केली. अनेकांनी प्रभाग रचनेवर आक्षेप घेतले. सर्वाधिक तक्रारी या प्रभागांच्या तोडफोडीच्या असल्याने आयोगाने सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानुसार ते आपला अहवाल १९ तारखेला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर ३२ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची नियुक्ती केली होती. कपूर यांनी सोमवारी या हरकतींवर सुनावणी घेत तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले. या सुनावणीला आयुक्त अभिषेक कृष्णा, विभागीय उपायुक्त खिल्लारे, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, प्रशासन उपायुक्त विजय पगार, आकाश बागूल आदी उपस्थित होते. प्रभाग रचनेवर एकून ३२ हरकती दाखल होत्या. त्यापैकी ३१ जणांनीच आपल्या हरकती नोंदवल्या. सर्वाधिक तक्रारी या प्रभागांच्या तोडफोडीच्या होत्या. अनेक हरकतदारांनी वकिलांच्या उपस्थितीत आपल्या हरकती दाखल केल्या. कपूर यांनी सर्व हरकतींवर म्हणणे ऐकून घेत महापालिकेकडून या हरकतींवर अभिप्राय घेतला आहे. त्यानंतर ते आपला अहवाल येत्या १९ नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.

भोगेंचा हायकोर्टात जाण्याचा इशारा

भगवान भोगे यांनी संपूर्ण प्रभाग रचनेवरच आक्षेप घेत ही रचना भाजपच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप कपूर यांच्याकडे केला. त्यावरून उपस्थित अधिकारी व भोगे यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या. भोगे यांनी प्रभाग रचना जाहीर होण्याआधीच ती फुटल्याचा आरोप करीत मी केलेले आरोप व जाहीर केलेली प्रभाग रचना एकच असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच प्रभाग रचना करताना ब्लॉक न दाखवल्याबद्दल आक्षेप घेतले. त्यामुळे आम्ही हरकत कशावर घ्यायची असा सवाल उपस्थित करीत आपण हायकोर्टात जाणार असल्याचा दावा भोगे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचा निर्णय प्रदेश पातळीवरच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेसाठी काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला पक्षातून विरोध वाढत आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सारवासारव करीत राष्ट्रवादीसोबत आघाडीचे निर्णय हे प्रदेश पातळीवरील नेतेच घेणार असल्याचे स्पष्टीकरण शहराध्यक्ष शरद आहेर यांनी दिले आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांसाठी अर्ज विक्री सुरू केली आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, हा निर्णय काँग्रेसने स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच केल्याचा आरोप काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकारी करीत असून, त्यांनी थेट प्रदेश पातळीवरच तक्रार दाखल केल्या आहेत. काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद मिटविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही दोन पावले मागे येत आघाडीचा निर्णय अंतिम झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन शहराध्यक्ष शरद आहेर यांनी आघाडी संदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय हा प्रदेश पातळीवरच घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आघाडीचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आठ दिवसांत पक्षाचे निरीक्षक भाई जगताप व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आघाडी करायची, की नाही याबाबतची घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जायचे, की नाही याबाबत काँग्रेसमध्ये अजूनही गोंधळाची स्थिती आहे. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, गटनेते शाहू खैरे, उद्धव निमसे, उद्धव पवार उपस्थित होते.

अर्ज विक्रीला सुरुवात

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांना मंगळवारपासून अर्ज विक्रीला सुरुवात केली आहे. अनुसूचित जमाती व जातीच्या उमेदवारांसाठी अर्जाची किमत एक हजार रुपये, तर खुल्या गटासाठी अर्जाची किंमत दोन हजार रुपये असणार आहे. इच्छुकांनी अर्ज भरून दिल्यानंतर आठ दिवसांत उमेदवारीबाबत वरिष्ठ पातळीवर नेते या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे आहेर यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचनाच्या पाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्यावर्षी दुष्काळाचे सावट व धरणात पाण्याचा साठा कमी असल्याने शेतीसाठी पाणी देताना अनेक अडथळे होते. मात्र यावेळेस सर्वच धरणे जवळपास भरल्यामुळे आता पाटबंधारे खाते यावर्षी शेतीला पाणीपुरवठा करणार आहे. त्यासाठी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील गंगापूर डावा तट कालवा, गोदावरी उजवा, गोदावरी डावा तट कालवा, आळंदी कालवा, भोजापूर कालवा, कडक कालवा या ठिकाणावरून प्रवाही उपसा सिंचनाचे पाणी घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज मागवण्यात आले आहे. हे अर्ज गुरूवारी (दि. १०) सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत दाखल केल्यानंतर पाणीपुरवठा केला जाणार आहे.

प्रकल्पात उपलब्ध पाणी विचारात घेऊन काही ठराविक क्षेत्रात नमूना नंबर ७ प्रवर्गातील रब्बी हंगामात संरक्षित सिंचनाकरिता विहिरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या सर्व प्रकारच्या हंगामी भुसार, फळबाग आणि बारमाही पिकांसाठी पाणी देण्याचे प्रस्तावित आहे.

पिकांना रब्बी हंगामाअखेर पाणी पुरवठा सुलभ व्हावा यादृष्टीने मंजूर क्षेत्रातील पिकांसाठी काटकसरीने पाणी घ्यावे. तसे न केल्यास पाणी पुरवठ्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीची जबाबदारी ही शेतकऱ्याची राहील. त्यासाठी सरकारकडून भरपाई मिळणार नाही. तसेच शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा उतारा जोडणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून कृषि उत्पादन वाढवावे, असे आवाहनही कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळाबाजार रोखण्यासाठी अन्न सप्ताह

$
0
0

विभागाकडून तहसीलदारांना सूचना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिधापत्रिका लाभार्थींना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य दरमहा मिळते की नाही याची तपासणी आता पुरवठा निरीक्षकांपासून प्रांताधिकाऱ्यांपर्यंत सर्वच करणार आहेत. पुरवठा विभागाने ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत अन्न सप्ताहाचे आयोजन केले असून ही संकल्पना दरमहा राबविण्यात येणार आहे. धान्याची उचल करूनही ते वितरित न करणाऱ्या रेशन दुकानदारांवर चाप बसविणे यामुळे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे धान्याची उचल होताच तसे एसएमएस त्या-त्या गावातील १०० लोकांना मिळतील, याची व्यवस्थाही पुरवठा विभागाने केली आहे.

जिल्ह्यातील सुरगाणा येथील रेशन धान्य घोटाळ्यामुळे राज्यात नाशिकची बदनामी झाली. बाजारात पाच कोटी रूपये किंमत असलेल्या सुमारे ३ हजार मेट्रिक टन रेशनच्या धान्याचा अपहार झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. एकीकडे धान्य मिळत नसल्याची सामान्यांची ओरड असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याने त्यावेळी पुरवठा अधिकाऱ्यांसह आठ तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, गोदामपालावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अशा भ्रष्टाचारी प्रवृत्तींनी रेशन व्यवस्था पोखरून काढल्याने पारदर्शकता आणण्यासाठी अन्न व पुरवठा विभागाकडून अनेक प्रयत्न होत आहेत. प्रत्येक महिन्याच्या २० तारखेच्या आत धान्य उचल न केल्यास अर्धी किंवा पूर्ण अनामत रक्कम जप्ती, परवाना रद्दसारखी कारवाई संबंधितांवर केली जाणार आहे. प्रत्येक महिन्याची सात तारीख अन्नदिन म्हणून तर ७ ते १४ तारीख हा अन्नदिन सप्ताह म्हणून संपन्न करा, असे आदेश राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने दिले आहेत.

यांतर्गत पुरवठा निरीक्षक, तहसीलदार, इतकेच नव्हे तर प्रांतांधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेशन दुकानांमध्ये जाऊन तेथे उपलब्ध धान्य तसेच वितरण व्यवस्थेची तपासणी करावी, असे या आदेशात म्हटले आहे. याबाबतची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी सोमवारी (दि. ७) दिली. यामुळे गरजू लाभार्थी शोधण्यासही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य मिळते की नाही याची तपासणी या सप्ताहात केली जाणार आहे. त्याबाबतच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. धान्याची उचल करूनही त्याचे वितरण केले जात नसेल तर संबंधित दुकानदारांवर नियमानुसार कारवाई होईल.

सरिता नरके, जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिकॉफ’साठी विशेष सभेचे आयोजन

$
0
0

सभासदांचे मत घेतल्यानंतर बाजू मांडणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिकॉफ (एसएसआय फ्लॅटेड सहकारी संस्था) ही औद्योगिक संस्था अवसायनात निघाल्यानंतर आता सिकॉफने सभासदांची विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन गुरूवारी (दि. १०) ११ वाजता केले आहे. या सभेत सभासदांचे मत जाणून घेतल्यानंतर संस्थेची बाजू उपनिबंधकाकडे मांडण्यात येणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व सहकारी संस्थेच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांनी ही कारवाई केली होती. सातपूर येथील या संस्थेवर अवसायकाची नेमणूक केल्यामुळे उद्योगक्षेत्रात खळबळ उडाली होती. संस्था नोंदणी करतेवेळी मंजूर केलेला आराखडा आणि अस्तित्वात असलेल्या इमारतीचा प्लॅन यात मोठी तफावत असल्यामुळे ही कारवाई केल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

या संस्थेवर आता अवसायनाचे कामकाज पाहण्यासाठी सहकार अधिकारी आर. सी. गजरे यांची अवसायक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या बैठकीत आता सभासद काय भूमिका घेतात व त्यावर सहकार विभागाकडे संस्था काही युक्तिवाद करते त्यावर पुढील निर्णय होणार आहे. तूर्त या संस्थेवर मध्यंतरीय आदेश काढून अवसायक नेमल्यामुळे संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. या संस्थेवर अध्यक्ष म्हणून नंदलाल शिंदे तर सचिव म्हणून पोपट भामरे हे काम बघत आहेत. त्यांनी या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डावा कालवा परिसरात पाणीटंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

यंदा समाधानकारक पाऊस पडला असता तरी बऱ्याच भागातील भूगर्भातील पाणीपातळी आताच खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. विशेषतः गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याच्या सिंचन क्षेत्रात ही टंचाई विहिरी आणि बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने जाणवू लागली आहे. धरणातून या कालव्याचे आवर्तन सुटल्यानंतरच रब्बी हंगामाच्या पेरण्या कराव्या लागणार असल्याने या परिसरातील रब्बीचा हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे सरासरी प्रमाण गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत चांगले राहिले आहे. तरीही पावसाळ्यात अधूनमधून पावसाने जास्त काळ उघडीप दिली होती. त्यावेळी हलक्या मुरबाड जमिनीतील खरिप हंगामाच्या पिकांसाठी सिंचनाद्वारे पाणी द्यावे लागत होते.

परतीच्या पावसानंतर खरिपाच्या काढणीच्या अगोदर भुईमूग, मका यासारख्या पिकांना आणि भाजीपाल्यास पाणी द्यावे लागले. याच काळात विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खाली गेल्याचे दिसू लागले. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आवश्यक पाण्याचा साठा नसल्याने कालव्याच्या पाण्यावरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतच करते वीजचोरी

$
0
0

मळगाव खुर्द येथील प्रकार; व‌ीजवितरण, ग्रामसेवकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दीपक महाजन, कळवण

एकीकडे वीजवितरण कंपनी वीज चोरीबाबत गंभीरता बाळगते. चोरी रोखण्यासाठी तत्काळ वीज जोडणी करण्यास महावितरण पावले उचलते. असे असताना दस्तूरखुद्द जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील मळगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयातच वीजचोरी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका शासकीय कार्यालयाचे नुकसान ग्रामीण शासनव्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या ग्रामपंचायतीमार्फत होत आहे. यामुळे वीजवितरण आणि ग्रामसेवकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

वीज वितरण कंपनी मार्फत सिंगलफेज कनेक्शन २४ तासांच्या आत (सर्व पूर्तता झाल्यावर) देण्यात येते. ज्या ठिकाणी वीजपुरवठ्याबाबत विद्युत पोल अथवा अन्य सुविधा आवश्यक असतील त्याही महिनाभराच्या आत देण्यासाठी महावितरण कार्यतत्पर असल्याचे सांगण्यात येते. वीजग्राहकाच्या सेवेला महत्त्व न देणाऱ्या संबंधित घटकावर महावितरण दंडात्मक कार्यवाही करू शकते, असा लिखित नियम महावितरणचा आहे. तेव्हा मळगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांमार्फत जोडणीचा अर्ज देऊनही तीन महिन्यांचा कालावधी कसा लागला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याची उत्तरे द्या

वीजवितरण कार्यालय दोषपात्र आहे की ग्रामसेवकाने पाठपुरावा केला नाही?

नियमावली जनतेला बंधनकारक करताना ग्रामपंचायतीकडून हे घडते कसे?

ग्रामपंचायतीला वीजपुरवठ्याबाबत तीन महिन्यांचा उशीर झालाच कसा?

वीजचोरी करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई होणार?

काय आहे प्रकरण?

तालुक्यातील मळगाव खुर्द येथे दिवसाढवळ्या वीजचोरी होत आहे. चक्क ग्रामपंचायत कार्यालयामार्फत दिवसाढवळ्या राजरोसपणे ही वीजचोरी होत आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप आता ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत काही सुजाण नागरिकांकडून हा प्रश्न काही ग्रामसभेत विचारण्यात आला. मात्र त्यावेळेस समाधानकारक तर सोडा मात्र उडवाउडवीची उत्तरे ग्रामसेवक बहिरम यांनी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कंपनीकडे वीज जोडणीसाठी ग्रामपंचायतमार्फत अर्ज केला आहे पण तीन महिने उलटूनसुद्धा जोडणी झालेली नाही. जुने ग्रामपंचायत कार्यालय हे गळत असल्यामुळे जून महिन्यात स्थलांतरीत झाले आहे. तेव्हापासून आजतागायत ही वीजचोरी सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, यावरून प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

तीन महिने उलटून गेल्यावर जर महावितरण कंपनी वीजजोडणी करू शकत नसेल तर हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर न्यावे. आम्ही ग्रामसभेत प्रश्न केला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

- राम गवळी, ग्रामस्थ

सिंगल फेज योजना ग्राहकाला तत्काळ वीजजोडणी उपलब्ध करून देते. विभागाकडे प्रलंबित प्रकरणे सहसा राहातच नाहीत. दंडात्मक कारवाईमुळे आमच्या विभागाकडून कोणतीही चूक होणार नाही.

- ऋषिकेश खैरनार, उप कार्यकारी अभियंता, महावितरण, कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेससोबत युतीचा प्रश्नच नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी मनसे काँग्रेससोबत युती करण्यासंदर्भांत कोणतीही चर्चा काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत केली नसल्याचा खुलासा मनसे गटनेते अनिल मटाले यांनी केला आहे. काँग्रेससोबत युतीचा प्रश्नच नसून, तशी मानसिकता व इच्छा मनसेची नसल्याचे सांगून महापालिका निवडणुका या स्वबळावरच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच डॉ. हेमलता पाटील यांना मनसेवर बोलण्याचा अधिकार नसल्याचा टोलाही मटाले यांनी लगावला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती व आघाडीतील घटक पक्षांमध्ये आता आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेस पक्ष मनसेसोबत कधीच युती करणार नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी केले होते. त्याला मंगळवारी मनसेने प्रतिव्युत्तर दिले. काँग्रेससोबत युती करण्यासाठी कोणत्याही पदाधिकाऱ्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली नाही. त्यामुळे युतीची चर्चा आली कुठून असा सवाल मटाले यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचे पदाधिकारी हे परस्पर युतीसंदर्भात बोलून आपली शोभा करून घेत असल्याचा टोला त्यांनी लगावला. काँग्रेससोबत

युती करण्याची मनसेची मानसिकता व इच्छाही नाही, तर मनसेवर बोलण्याचा कोणताही अधिकार डॉ. हेमलता पाटील यांनाही नाही, असा टोला त्यांनी लगावला. आगामी महापालिका निवडणुका या मनसे स्वबळावर लढणार असून, त्यासाठी सक्षम कार्यकर्ते व पदाधिकारी मनसेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पादनाने मारले; थंड हवामानाने तारले

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

यंदाचा समाधानकारक पाऊस, लागवडीखालील वाढलेले क्षेत्र, चांगले हवामान यामुळे यंदा टोमॅटोचे जादा उत्पादन झाले आहे. मागणीपेक्षा जास्त आवक, बाजारात घटलेली मागणी यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली नाही. मात्र, थंड हवामानामुळे टोमॅटो काही काळ टिकू शकत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत टोमॅटोचे बाजारपेठेतील दर कोसळले नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून चांगल्या टोमॅटोस १०० ते १५० रुपये प्रति क्रेट दर मिळत आहे. एक क्रेटमध्ये २० किलो टोमॅटो असल्याने त्यांचे पाच ते सात रुपये किलो अशा भावात विकला जात आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दहा एकर जागेत होणाऱ्या टोमॅटोच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी मुख्य हंगामात केवळ २० हजार क्रेट टोमॅटोची आवक होते. त्यातुलनेत पिंपळगाव बसवंतच्या खास टोमॅटोसाठी उभारण्यात आलेल्या शंभर एकर जागेत दीड ते पावणे दोन लाख क्रेट टोमॅटोची रोज आवक होत असते. पिंपळगाव बसवंत येथून देशाच्या विविध राज्यांमध्ये टोमॅटो पाठविला जातो. तसेच पाकिस्तानमध्येही टोमॅटो निर्यात होतो. सध्या १०० ट्रकपर्यंत टोमॅटो पाकिस्तानला पाठविला जात आहे. गेल्या महिन्यात भारत-पाक सीमेवर झालेल्या चकमकीमुळे टोमॅटोची निर्यात थांबली होती. ती आता सुरळीत सुरू आहे.

नाशिक आणि पिंपळगाव बसवंत येथून पाठविण्यात येणारा टोमॅटो ज्या गुजरातसह उत्तर भारतातील भागात पाठविला जातो. त्या भागात स्थानिक टोमॅटो यंदा चांगला पिकला आहे. त्यामुळे तेथे नाशिकच्या टोमॅटोला असलेली मागणी घटली आहे. त्याचा परिणाम यंदाच्या टोमॅटोच्या दरावर झाला आहे. पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत वाढणारे टोमॅटो क्रेटचे भाव यंदा १५० रुपयांच्यावर जास्त मिळाले नाहीत. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांच्या मनसुब्यावर यंदा पाणी फिरल्याचे दिसत आहे.

---

तरीही हंगाम निराशादायीच

प्रक्रियांसाठी लागणारा टोमॅटोच्या मागणीत चांगली वाढ होत आहे. मात्र, त्यासाठीचा टोमॅटो वेगळ्या दर्जाचा आहे. द्राक्ष पिकाच्या खालोखाल नगदी पीक म्हणून टोमॅटोकडे बघितले जाते. निर्यात होत असताना टोमॅटोला मिळणारे चढे दर यंदा जास्त उत्पादनामुळे वाढले नसल्याने टोमॅटो उत्पादकांना यंदाचा हंगाम फारसा लाभदायक ठरणार नाही असे दिसते.

---

पिंपळगाव बसवंत येथे टोमॅटोच्या खरेदी-विक्रीचा मोठी बाजारपेठ आहे. येथून विविध राज्यांप्रमाणेच पाकिस्तानमध्येही टोमॅटो निर्यात होत असतो. सध्या शंभर ट्रकपर्यंत टोमॅटो पाकिस्तानला पाठविला जात आहे. गेल्या महिन्यात भारत-पाक सीमेवर युद्धजन्य परिस्थितीमुळे टोमॅटोची निर्यात थांबली होती. ती आता सुरळीत सुरू आहे.

- सोमनाथ निमसे, टोमॅटो निर्यातदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालनाट्य महोत्सवात प्रेक्षक अंतर्मुख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने आयोजित बालनाट्य महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दामोदर प्रॉडक्शन व श्री नाट्य चंद्रशाला बाल रंगभूमीच्यावतीने मंगळवारी चार नाटके सादर करण्यात आली. कालिदास कलामंदिरात झालेल्या या महोत्सवाला बालरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. पहिल्या दिवशी प्रथम सत्रात एकूण तीन नाटके सादर झाली. बालकलाकारांनी ‘निबोणीच्या झाडामागे’ हे पहिले नाटक सादर केले. आज काल मुलांना टी.व्ही आणि मोबाइलचे वेड लागले आहे. आई बाबा मोबाइल देत नसल्याने मुले सारखी टी.व्ही. पाहत असतात. मुलांना त्यातील जाहिराती खूप आवडत असतात. या नाटकातील नंदनला जाहिरातीमधील आई खूप आवडते. ती किती छान दिसते, किती प्रमाने वागते, छान छान खायला देते. आपली आई मात्र फक्त रागावत असते. एकदा त्याला एका जाहिरातीत काम करण्याची संधी मिळते, तेव्हा आपली खरी आईच आपल्यावर किती प्रेम करते हे त्याला कळते.

‘गणेश साम्राज्य’ हे दुसरे नाटक सादर झाले. सुटीमध्ये मुले खूप खेळत असतात, पण मुली विशेषतः गॉसिपच जास्त करतात. आपल्या घरातील व्यक्तींबरोबर शाळेतील शिक्षकांबरोबर त्यांना आदर असतो. त्याचबरोबर तक्रारीचा पाढादेखील असतो. आपल्या मनातील भावना त्या कोर्टाच्या प्रसंगात सादर करतात. आपणच आई-वडील, शिक्षक, चेटकीन, देव यांच्या भूमिकेत शिरून त्यांचे मत कोर्टात मांडतात. देवाच्या साक्षीतून आपले कुठे चुकते हे त्यांना कळते. आपल्या मुलांना काय हवे आहे हे पालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आहे. या नाटकात रेणुका कोठारकर, अमिषा डावरे, वृषिता घरटे, शाल्वी देशपांडे, मैथिली वाघ, अंकिता बाविस्कर फाल्गुनी परदेशी यांनी भूमिका केल्या.

दिलीप प्रभावळकर यांची कलाकृती असलेल्या तिसऱ्या नाटकाने धूम केली. मुलांच्या रंगमंचाची सुरुवात घरापासून होते. आई घरात नसताना एकत्र येऊन जी नाटके केली जातात त्यातून त्यांचे कलागुण दिसून येतात. आजकालच्या मुलांना थ्रील अनुभवायला आवडते. हे थ्रील मोबाइलमधील गेम्समधून ते अनुभवीत असतात. नाटक बसविण्याचे थ्रील आजकालच्या मुलांना अनुभवायला मिळत नाही. तीच संधी ‘फू बाई फू’ या नाटकात मुलांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नाटकात सौरभी शिंदे, सारंग कुमठेकर, मोहक शहा, यश शर्मा, वृषिता घरटे, अनुराग पाटील, अंकिता बाविस्कर, शाल्वि देशपांडे यांनी विविध भूमिका साकारल्या. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले साने गुरुजी यांच्या जीवनावर असलेले शामची आई हे नाटक सादर झाले. शामला आपल्या आईकडून मिळालेल्या संस्कारातून त्याचे आयुष्य घडत गेले. शामची आई खूपच प्रेमळ होती. वेळेप्रसंगी ती कठोरही होती. रोजच्या घडणाऱ्या प्रसंगातून ती शामला चांगल्या गोष्टींची शिकवण देत असे. मुक्या कळ्या तोडू नये. कुणाबद्दल आकस ठेवू नये. चोरी करू नये. कोणत्याही चांगल्या गोष्टीला घाबरू नये. भावंडांवर प्रेम करावे, अशा गोष्टी या नाटकातून सांगण्यात आल्या. या नाटकात शामची भूमिका सोहन जोशी याने केली. आई-अमिषा डावरे, आजी-रेणुका कोठारकर, भाऊराव यश शर्मा, फडके काका-यश शर्मा यांनी भूमिका साकारल्या. महोत्सवाच्या नाटकाची प्रकाशयोजना निखील नरोडे आणि सुयोग देशपांडे यांनी केली, तर दिग्दर्शन डॉ. प्रशात वाघ यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुकामेव्याची वाढली मागणी

$
0
0


नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा

कडाक्याच्या थंडीचे नाशिकमध्ये आगमन होत असतांनाच सुकामेव्याच्या पदार्थांनी बाजारपेठ सजण्या सुरुवात झाली आहे. नागरिकांकडूनही सुकामेव्याच्या मागणी केली जात आहे.

नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकमध्ये थंडीचे आगमन झाले. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाच्या पाऱ्याची थेट ११ ते १२ अंशापर्यंत घसरण झाली. जिल्ह्याच्या काही भागात तर पारा १० अंशाच्याही खाली गेला. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य संवर्धनासाठी उबदार कपड्यांबरोबरच सुकामेवा खरेदी करण्यासही प्रारंभ केला आहे.

नाशिकच्या बाजारपेठेत सुकामेवा विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.खास करुन डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सुकामेव्यास नाशिकमध्ये मोठी मागणी असते. सुकामेव्याच्या खरेदीला विशेषत: डिसेंबरमध्ये प्रतिसाद मिळतो. परंतु, यंदा डिसेंबरमध्ये जाणवणाऱ्या थंडीचे आगमन नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात झाले आहे. सुकामेव्याला आरोग्यसंवर्धासाठी विषेश महत्त्व आहे.

..

मागणी अधिक वाढणार

सध्या नाशिकच्या बाजारपेठेत अंजिर, पिवळी खारीक, काळी खारीक, बदाम, काजू, पिस्ता, डिंक, काळे किसमिस, नाशिक किसमिस असा सुकामेवा मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. नागरिकांची सुकामेव्याला येत्या आठवडाभरात मोठी मागणी असणार असल्याने व्यावसायिकांनी विविध प्रकारचा सुकामेवा बाजारात विक्रीसाठी तयार ठेवला आहे.

..

अरेबियन मालास पसंती

नाशिकच्या बाजारपेठेत अरेबियन सुकामेव्याची आवक जास्त असते. मुंबई, दिल्ली येथून हा माल नाशिकमध्ये येतो. दर्जानुसार विविध दरांत एकाच प्रकारचा सुकामेवा सध्या बाजारात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. स्थानिक मार्केटमध्ये काही प्रमाणात काजू व कच्चे अंजिर उपलब्ध होते. परंतु, त्याचे प्रमाण मागणीच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. परिणामी अरब देशांमधून खजूर, मणुके यांची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते.

..

सुकामेव्याचे दर (प्रतिकिलो)

सुकामेवा प्रकार किमान दर कमाल दर

- किसमिस काळा (मनुका) ३६० ५००

- नाशिक किसमिस (बेदाणा) १५० २५०

- बदाम ६८० ९२०

- काजू ८८० १२००

- अंजिर ६०० १०००

- काळी खारीक १०० ३००

- पिवळी खारीक ८० १५०

- डिंक १८० ३००

- खोबरे १२० १२०

- पिस्ता ८८० १२००

- जर्दाळू १००० १२००

- आक्रोड (फोडलेले) ८०० १५००

- आक्रोड (विनाफोडलेले) ६०० ८००

- खजूर (काळी) १०० ३००



शहरात थंडीचा जोर वाढल्याने अजुन सुकामेवा विक्रीत वाढ होण्यास वेळ आहे. नागरिकांकडून विचारणा केली जात आहे. मात्र, दिवाळी इतक्याच झाल्याने सुकामेव्याच्या बाजारात अजून शांतता आहे.

- हरीश रामचंदाणी, सुकामेवा व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पला वाहतुकीचा बोजवारा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील वाहतुकीच्या बाबतीत कॅन्टोन्मेंट बोर्ड व पोलिस प्रशासनाकडून कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाल्याची स्थिती दिसून येत आहे. अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे रस्त्याने नक्की कसे चालावे, असा संभ्रम सामान्य नागरिकांना पडत आहे. भगूर येथेही बसस्थानकाच्या आवारात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

देवळालीत लामरोडवरून सिलेक्शन कॉर्नरपासून हौसनरोड हा शहरात प्रवेश करण्यासाठीचा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावरच सुभाष हायस्कूल, पेट्रोलपंप असून, या ठिकाणी प्रशासनाने जरी दुभाजक टाकले असले, तरी लामरोडच्या बाजूला दुभाजक नसल्याने अपघात होत असतात. शिवाय शहरात प्रवेश करण्याकरिता मुख्य मार्ग असल्याकारणाने याच भागातून अवजड वाहनांची ये-जा होत असते. मात्र, अवजड वाहनांस प्रवेश करताना दुपारची वेळ करून द्यावी, जेणेकरून वाहतुकीस अडथळा होणार नाही. पार्किंगसाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागा वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या नसल्याचे वाहनचालक सांगतात. रविवारी हौसनरोडवर आठवडेबाजार भरतो, त्या ठिकणी येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर उभे करावे लागतात. बोर्ड प्रशासनाने नेमून दिलेल्या शाळेच्या जागेत शेतकरी सकाळपासूनच आपली वाहने उभी करतात. त्यामुळे बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यास अडचण निर्माण होते. नेमके याच ठिकाणी रिक्षाचालकदेखील आपल्या रिक्षा उभ्या करून प्रवासी घेण्यासाठी थांबतात. परिणामी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. रविवार बाजारासाठी सतीश कॉम्प्लेक्स ते जुने बसस्थानक यादरम्यान तात्पुरत्या स्वरूपाच्या गेटची व्यवस्था करण्यात येते. मात्र, त्याला कुणीही न जुमानता वाहने थेट आत नेली जातात. सणासुदीच्या काळात लेव्हिट मार्केट परिसरातही सकाळी व सायंकाळी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे या भागात कायमच वाहतूक कोंडी निर्माण होते. लेव्हिट मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडे येणाऱ्या मोठ्या वाहनांचीही कायम वर्दळ असते. वास्तविक पाहता कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु, या विभागाचे काही अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे देवळालीकर सांगतात. महामंडळाच्या बस थांबा सोडून अन्यत्र कुठेही उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांची धावपळ होते ती निराळीच. लामरोडवरील बेलतगव्हाण चौफुली येथे जैन धर्मीयांची मंदिरे असल्यामुळे याही परिसरात खासगी यात्रा कंपन्यांच्या बसेस येत असतात. त्यामुळे तेथेही वाहतुकीचा खोळंबा होतो.

भगूरमध्ये प्रवेश करण्यासाठी रेस्ट कॅम्परोडवरून जाताना भगूर बसस्थानक परिसरात नियमित रिक्षाचालक, बसचालक, दुचाकी व चारचाकीचालकांत संभ्रम निर्माण होतो. ओव्हरटेक करताना वाहनधारक डाव्या बाजूनेदेखील सर्रासपणे ओव्हरटेक करतात त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी नियमितपणे एक वाहतूक पोलिस असावा, त्यामुळे भगूरकरांची समस्या कायमची संपेल, अशी मागणी केली जात आहे.

---


काय करायला हवे?

सर्वांत प्रथम प्रत्येक नागरिकाने स्वतःला शिस्त लावत आपण नेमून दिलेल्या जागी आपले वाहन पार्क करणे गरजेचे आहे. गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिस जरी लक्ष देत असले, तरी काही नागरिक त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करीत रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. रिक्षाचालकांनीही थांब्यांवरच रिक्षा उभ्या करणे गरजेचे आहे. लामरोड भागात येणाऱ्या पर्यटकांच्या बसेस रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जातात. त्या ठिकाणीदेखील प्रशासनासह पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. भगूर बसस्थानकाजवळ असलेल्या रिक्षा पार्किंगला बाजूच्या मोकळ्या जागेत पार्किंग उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही. शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना आनंदरोडमार्गे प्रवेश दिल्यास हौसनरोडवरील कोंडी फुटून वाहतूक सुरळीत होण्यास हातभार लागेल. वाहतूक पोलिसांची संख्याही वाढवायला हवी.

---

शहरात खऱ्या अर्थाने वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड व पोलिस प्रशासनाने एकत्र येत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

- अजिज शेख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थानिकांची कोंडी, कुत्री खेळतात घसरगुंडी!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

चोरी गेलेल्या कुंपणाच्या जाळ्या आणि गोदामाचे दरवाजे, फरशा उखडलेले सभागृह, गायब झालेली पाण्याची टाकी, मोकळीस आलेली खेळणी, घसरगुंडीचा आस्वाद घेणारे कुत्रे, वाढलेल्या गवतावर चरणारी मोकाट जनावरे अशी अवस्था सध्या गणेशवाडी येथे महापालिकेने अडीच एकर जागेत उभारलेल्या उद्यानाची झाली आहे. परिणामी विरंगुळ्यासाठी स्थानिकांची कोंडी होत असून, कुत्री मात्र घसरगुंडी खेळत असल्याचे दिसून येत अाहे. येथील सभागृहाचीही दुरवस्था झाल्याने हा परिसर भकास बनला आहे.

गणेशावाडीतील अमरधाम रस्त्यालगतच्या भागात सुमारे अडीच एकर जागेवर उद्यान उभारण्यात आले आहे. महापालिकेने उभारणीच्या काळात काळजी घेत येथे विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र, त्यानंतर या उद्यानाकडे आणि येथील सभागृहाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची पुरती वाट लागली आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंतच्या सरंक्षक भिंतींच्या जाळ्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या जाळ्यांचे अँगल्स काढताना येथील भिंतींचे दगडही काढून घेण्यात आलेले आहेत. सभागृहाच्या पश्चिमेला असलेल्या खोलीत अंगणवाडी भरविली जाते. त्या अंगणवाडीच्या खिडक्यांची दुरवस्था झाली आहे. शेजारीच असलेल्या गोदामाचा सागवानी लागकडाचा रुंद दरवाजाही चोरीस गेला आहे. जवळच असलेल्या कार्यालयाची आणि प्रसाधनगृहाची मोडतोड झाली आहे.

उद्यानात हिरवळीऐवजी रानगवतच मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या गवतावर शहर परिसरातील मोकाट जनावरे चरताना दिसतात. दक्षिण बाजूला असलेल्या कुंपणाच्या जाळ्याही गायब झालेल्या आहेत. उद्यानात आकर्षकता आणण्यासाठी विद्युत रोषणाई करण्यासाठी झाडांची मोडतोड झाली आहे. पथदीपांचे केवळ गंजलेले खांबच उभे दिसत आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी बसविण्यात आलेली होती, येथे वाढलेल्या गवतामुळे आणि संरक्षक भिंत नसल्यामुळे लहान मुले इकडे फिरकत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून वापराविना पडलेल्या येथील खेळण्यांना गंज चढला आहे. त्यातील काही खेळण्यांची मोडतोड झाली आहे. एकांतात असलेली ही जागा जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे.

---

उद्यानात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पूर्वी लग्न समारंभही होत असत. आता तेही बंद पडले आहे. त्याचा वापर होत नसल्याने या भाग एकदम भकास वाटत आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या उद्यानाचा वापर होत नसल्यामुळे केलेला खर्च वाया गेला आहे.

- सचिन दप्तरे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडात स्वच्छता मोहीम सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रामकुंडात साचलेला कचरा, वाळू, दगडगोटे, चिखल काढण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे मोहीम राबविण्यासाठी मंगळवारी (दि. ८) सुरुवात करण्यात आली. पावसाळ्यात येऊन गेलेल्या महापूरानंतर रामकुंडाच्या पात्रातील पहिल्यांदाच साफसफाई करण्यात येत आहे.

ही साफसफाई करण्यासाठी जेसीबी थेट रामकुंडात उतरविण्यात आला आहे. उन्हाळ्यात कोरडेठाक पडलेल्या रामकुंडात पूराच्या पाण्यानंतर मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे. ती काढण्यासाठी दोन दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

रामकुंडात रोज साचणाऱ्या निर्माल्याची साफसफाईचे रोजच करण्यात येते. मात्र तळात साचणारा घनपदार्थांचा कचरा तसाच शिल्लक राहतो. हा कचरा वजनाने जड असल्याने ते तळाशी साचून पात्रात राहतो. तो काढण्यासाठी पूर्वी आठवड्यातून एकदा रामकुंडातील संपूर्ण पाणी काढून तळाशी साचलेली वाळू, कापड, मातीच्या भांड्याची खापरे, प्लॅस्टिकच्या पिशव्या साचून राहतात. रामकुंडात पावसाळ्यात झालेल्या जोरदार पाऊस आणि आलेले पूर यांच्यामुळे रामकुंडात वाळू आणि दगडगोटे साचून राहिले आहेत. ते काढण्यासाठी बांधकाम विभागातर्फे मोहिम राबविण्यास सुरुवात झाली आहे. मोहिमेसाठी बांधकाम विभागाचे ३० कर्मचारी, दोन ट्रॅक्टर, दोन डंपर, एक जेसीबी यांच्या साहाय्याने रामकुंडाचे पात्र स्वच्छ करण्यात येत आहे. पात्रात साचलेली वाळू आणि चिखल आदी बाहेर काढून टाकण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव मनपावर प्रशासक नेमावा

$
0
0

आम्ही मालेगावकर समितीची मागणी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहराची महापालिका स्थापन होऊन सोळा वर्षे झाली. परंतु मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यास महापालिका प्रशासन असमर्थ ठरले आहे. विकासाच्या नावाने सर्वत्र बोंब आहे. यासाठी मालेगाव महापालिकेवर किमान तीन वर्षांसाठी प्रशासक नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी (दि. ८) निवेदनाद्वारे करण्यात आली.

अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना समितीच्या सदस्यांनी दिलेल्या निवेदनात, शहराच्या विकासाचा कोणताही ठोस अजेंडा आजवर दिला गेलेला नाही. तर महासभेत नगरसेवक आपल्या सोयीचे ठराव मंजूर करून घेता आहेत. शहरातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधांची आजही वानवा आहे. त्यामुळे महापालिका याबाबतीत सपशेल अपयशी ठरली आहे, असा आरोप या निवेदनात समितीने केला आहे.

शहरातील ही सर्व पेंडिंग मूलभूत विकास कामे मार्गी लावण्यासाठी व शासकीय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी किमान तीन वर्षे तरी महापालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी शेवटी यात करण्यात आली आहे. या वेळी निखिल पवार, रवीराज सोनार, यू. आर. पाटील, पुरुषोत्तम काबरा, अन्सारी सलमान, मयूर पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक व्यवस्थापनासाठी मंगळवारी बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यासाठी लोकसहभाग वाढवणे आवश्यक असून, याचसाठी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता, गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात ‘वाहतूक व्यवस्थापन’ या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला लोकप्रतिनिधींसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

शहरातील बहुतांश भागातील वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. विशेषतः गावठाण व त्या परिसराला लागून असलेल्या भागात ही परिस्थिती भयावह आहे. रस्ते रूंद झाले किंवा नवीन रस्ते तयार झाले तरी वाहनांची संख्याही झपाट्याने वाढते आहे. जुने नाशिक किंवा पंचवटी भागात तर रस्त्यांचे रूंदीकरण करणेदेखील शक्य नाही. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय बदल होणे अपेक्षित आहे. याच दृ‌िष्टकोनातून शहर पोलिसांनी १५ नोव्हेंबर रोजी रावसाहेब थोरात सभागृहात बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीस खासदार, आमदार, नगरसेवक असे लोकप्रतिनिधी, मेडिकल असोसिएशन, मार्केट कमिटीचे पदाधिकारी, मनपा, आरटीओ, निमा, हायवे पोलिस, शालेय स्कूल बसचालक, रिक्षा, टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी, लायन्स क्लब व इतर सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, हॉकर्स युनियन, जॉगर्स क्लब सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघटना, प्रवाशी संघटना, लॉन्स असोसिएशन, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, मॅरेथॉन आयोजक आदींना आमंत्रित करण्यात आले आहे. वाहतूक समस्या व उपाययोजना अशा दृष्टीकोनातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, सर्वांच्या सूचनांचा विचार व्हावा हा मागील हेतू आहे. बैठकीला सर्वसामन्यांनी हजर राहावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला पालिका निवडणुकीत चुरस

$
0
0

प्रभागातील दोघांचे तर अध्यक्षपदांसाठीचा एक अर्ज मागे

म. टा. वृत्तसेवा, येवला

नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासह प्रभाग क्रमांक-१० मधील रिंगणातून मंगळवारी (दि. ८) तिघांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शेख तेहसीन शेख आजम यांनी मंगळवारी आपला अर्ज मागे घेत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली.

शहरातील प्रभाग क्रमांक-१० मधील सर्वसाधारण स्त्री राखीव जागेवरील छाया बंडू क्षीरसागर, तर याच प्रभागातील सर्वसाधारण जागेवरील बंडू अंबादास क्षीरसागर यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. पालिकेचे विद्यमान नगरसेवक असलेल्या क्षीरसागर दांपत्यातील बंडू क्षीरसागर यांना यावेळेस ‘भाजपा’ने थेट नगराध्यक्षपदासाठीची,तर त्यांच्या पत्नी छाया क्षीरसागर यांना प्रभाग क्रमांक-१२ मधील सर्वसाधारण स्त्री राखीव जागेवर उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांनी प्रभाग-१० मध्ये दाखल केलेले आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

उमेदवारी अर्ज माघारीसाठी आता अखेरचे तीनच दिवस शिल्लक राहिले असून उमेदवारी अर्ज दाखल झालेल्यांपैकी नगराध्यक्षपदासह कुठल्या प्रभागातून कुणाकुणाची माघार होते याकडे येवला शहरवासीयांच्या नजरा लागलेल्या दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images