Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कर्म चांगले करा फळही चांगलेच मिळेल

0
0
‘देवा वरच्या विश्वास इतकाच विश्वास आपल्या कर्मावर ठेवावा. कर्म चांगले असेल तर फळ निश्च‌ित चांगले मिळते यासाठी चांगल्या कर्माची कास धरा. देवाची पारायणे करताना किती केली यापेक्षा ती कशी केली याला जास्त महत्त्व आहे.’

शिखरेवाडी परिसराला पाणी टंचाईच्या झळा

0
0
नाशिकरोडच्या शिखरेवाडी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. महापालिकेने उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईमुळे एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता.

डॉक्टरसाहेब जरा ऐका ना!

0
0
आपण स्वत: झळ सोसत एखाद्या माणसाची कणव करावी अन् त्याने आपल्याला सहजासहजी ठगवावे. ठगव‌िल्यानंतरचा पश्चताप त्याच्या ध्यानी मनीही नसावा. मग आपली फज‌िती कुणाला सांगण्याचाही धर्म राहत नाही. या धर्तीवरचा अनुभव एका डॉक्टरमहाशयांनी घेतला. रात्रीच्या सुमाराला एका आरोग्य केंद्रासमोर एक व्यक्ती मदतीसाठी याचना करू लागली.

नाशिकरोड परिसरात धार्मिक देखाव्यांवर भर

0
0
नाशिकरोड-उपनगर परिसरात लहान-मोठ्या दिडशेवर सार्वजनिक मंडळांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली असून यंदा मंडळांनी धार्मिक, समाजप्रबोधनात्मक देखाव्यांवर भर दिला आहे. देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

ओझोन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
0
जागतिक ओझोन दिनाचे (१६ सप्टेंबर) निमित्त साधून विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विजय गोळेसर यांनी विविध शाळांमध्ये ओझन स्तराबाबत व्याख्याने देऊन विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती केली.

शहराची शान टांगणीला

0
0
जुनं ते सोनं या उक्तीला अनुसरून शहरातीची जुनी ओळख अभिमानास्पदच असते. त्याच्यासाठी त्या शहरानेही ती ओळख मिरवली पाहिजे. नाशिकचं शिवाजी उद्यानही असंच खास आहे.

कॅम्पस इलेक्शनवर राष्ट्रवादीची पकड

0
0
वेळोवेळी विद्यार्थी ह‌िताचे मुद्दे मांडत लक्ष वेधणाऱ्या मनव‌िसेवर ऐनवेळी रणन‌ितीतून वर्चस्व राष्ट्रव‌ादी विद्यार्थी कॉँग्रेस यशस्वी ठरली आहे. शहरातील सुमारे २५ कॉलेजपैकी ११ ठ‌िकाणी राष्ट्रवादीचा ‘जीएस’ निवडला गेल्याचा दावा संघटनेने केला तर, मनव‌िसे आण‌ि भाव‌िसे यांनी केलेल्या दाव्यानुसार प्रत्येकी सात कॉलेजेसमध्ये त्यांच्या वाट्याला ‘जीएस’च्या माध्यमातून सत्ता हाती लागली आहे.

समकक्षतेकडे कॉलेजेसचे दुर्लक्ष

0
0
अन्य विद्यापीठातून पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे समकक्षता अर्ज भरुन घेण्यात कॉलेजेस दुर्लक्ष करत आहे. या अर्जांअभावी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नुकसानाला कॉलेजेसच जबाबदार राहतील असा इशारा विद्यापीठामार्फत देण्यात आला आहे.

एकोणीस वर्षांपासून प्रत‌िक्षा उद्‌घाटनाची

0
0
महापालिकेने गोरेवाडीत बांधलेले हॉस्प‌िटल नामांतराच्या वादात अडकल्याने गेली एकोणीस वर्षांपासून हॉस्प‌िटलची वास्तू खितपत पडली आहे. महापालिकेनीही हा वाद मिटविण्याचा प्रयत्न न केल्याने गोरेवाडीतील नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी दूरवर जावे लागते.

कोल्डमिक्स वापराविनाच

0
0
सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावरील खड्डे भरणे शक्य नसल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर कोल्डमिक्सचा वापर करण्याचे ठरवले. मात्र, वराती मागून घोडे दामटण्याची सवय असलेल्या महापालिकेने नेहमीप्रमाणे पावसाने उसंत दिल्यानंतरच कोल्डमिक्स खरेदी केले.

आता चालक डेचे आयोजन

0
0
फ्रेंडशिप डे, व्हॅलेनटाईन डे असे डेज साजरे करण्याची चढाओढ सर्वत्र दिसून येते. या डे संकल्पना समाजात चांगल्या भिनल्या असून खासगी वाहन चालकांच्या सन्मानार्थ नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने ‘चालक डे’चे आयोजन केले आहे.

देहविक्री करायला लावणारे ४ अटकेत

0
0
नेपाळमधील तरूणीला शहरात आणून तिच्याकडून अवैध व्यवसाय करून घेणाऱ्या चौघाजणांना क्राईम ब्रँचने छापा मारून अटक केली. पोलिस आयुक्तालयाजवळील प्रेरणा बंगला येथे हा व्यवसाय सुरू होता.

वळीव पावसाचा तडाखा

0
0
वळीव पावसाने रविवारी संध्याकाळी नाशिकच्या ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले. गंगापाडळी परिसरात नाला पार करीत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात तीन महिला आणि एक लहान मूल वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.

महापालिकेचा भुर्दंड नागरिकांना

0
0
नाशिक शहरातील मोकाट कुत्र्यांचा शहरवासियांना होऊ नये म्हणून महापालिकेतर्फे या कुत्र्यांना शहराबाहेर सोडले जाते. मात्र या कुत्र्यांना ज्या परिसरात सोडले जाते त्याठिकाणी त्यांनी उच्छाद मांडला असून त्यातून शेतकऱ्यांची जनावरे फस्त करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

सरदवाडी धरण भरल्याचा वाहनांना फटका

0
0
सिन्नरजवळील शिवनदीला पूर आल्याने घोटी-सिन्नर हायवे रविवारी रात्री बंद होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळपर्यंत ठप्प होती.रविवारच्या जोरदार पावसाने सरदवाडी धरण भरल्यामुळे येथील शिवनदीला पूर आला.

शेरास सव्वाशेर

0
0
नाशिकरोडला विभागीय महसूल कार्यालय असल्याने अनेक लोक आपल्या कामासाठी पाच जिल्ह्यातून तेथे येत असतात. यात नाशिक बरोबरच, धुळे. जळगाव, नगर, नंदुरबार या जिल्ह्यातील नागरिकांचा प्रामुख्याने समावेश असतो.

गोदेला पुनर्वेभव प्राप्त होईल?

0
0
दक्षिणेची गंगा म्हणून प्रसिध्द असलेली गोदावरी ही नाशिककरांसाठी जीवनदायिनी‌ आहे. ती लोकांना जीवन देते; त्याबदल्यात लोक तिला काय देतात? चहुबाजुने प्रदुषण. कुणी धुणे धुते, कुणी भांडी घासते, कुणी गाड्या धुते तर कुणी अंघोळ करते.

सबलीकरण धोरण लांबणीवर

0
0
‘युजीसी’च्या सुचनेनुसार पुणे विद्यापीठाने पुणे, नाशिक व अहमदनगर या तिन्ही जिल्ह्यांमधील विद्यार्थीनींसाठी महिला सबलीकरण अभियानाचे आयोजन केले होते.

डीपी सादर

0
0
शहर विकास आराखड्यासंबंधी सोमवारी झालेल्या महासभेदरम्यान, प्रारूप विकास आराखडा सादर करण्यात आला. विकास आराखडा फुटीसंदर्भात चौकशी करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

‘महिला कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या’

0
0
शहरातील एमआयडीसीत घडणाऱ्या गुन्हेगारी घटना पाहता महिला कामगारांच्या सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत कामगार आयुक्तालयाने त्याची दखल घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images