Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रिक्त जागांसाठी विशेष कॅप राऊंड घ्यावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

इंजनीअरिंगसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या डिप्लोमा व डिग्रीच्या बहुतांश जागा कॅप राऊंड पार पडल्यानंतरही रिक्त आहेत. या रिक्त जागा आणखी काही काळ अशाच प्रलंबित राहील्या तर हजारो विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. ही बाब लक्षात घेऊन या रिक्त जागांसाठी विशेष कॅप राऊंड घोषणा शिक्षण विभागाने करावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार देवयानी फरांदे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठविले आहे.

कॅप राऊंडची प्रक्रिया पार पडल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेशांपासून वंचित आहेत. यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही फेरपरीक्षा घेण्यात आली होती. यापरीक्षेच्या आधाराने अनेक विद्यार्थ्यांनी वाया जाणारे वर्ष प्रयत्नपूर्वक वाचविले आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचाही प्रश्न काही प्रमाणात उभा आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कॉलेजेसना शासनाने सूचना दिल्यानंतरही डीटीईची नवी लिंक अपडेट झालेली नाही. परिणामी हे सर्व विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा पूर्ण केला असून डिप्लोमानंतर द्वितीय वर्ष डिग्रीसाठी प्रवेशाला ज्या कॉलेजचा प्राधान्यक्रम दिला. मात्र, त्यांचा नंबर प्रवेशाकरिता लागलेला नाही अशाही विद्यार्थ्यांचे वर्ष धोक्यात आहे. या विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंट कोटाही यंदा बंद करण्यात आला होता. परिणामी त्यांची प्रवेशाची संधी हुकली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करून शासनाने या विद्यार्थ्यांसाठी विशेष कॅप राऊंड घेऊन त्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कॅप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. दुसरीकडे बारावीची फेरपरीक्षा आदी कारणांमुळे अनेक विद्यार्थी प्रवेशांपासून वंचित आहेत. हा विरोधाभास मिटविण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी विशेष कॅप राऊंडची घोषणा करण्याची अपेक्षा आहे.

- देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीसीटीव्हीचे काम चार महिन्यांत करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील सीसीटीव्हीच्या कामाची कार्यवाही चार महिन्यांत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांना दिले. तसेच, सीसीटीव्ही बसविताना त्या त्या ठिकाणच्या नागरिकांना विश्वासात घेण्याच्या सूचनाही महाजन यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.

महाजन यांनी बुधवारी सकाळी सरकारी विश्रामगृहावर शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, अपर आयुक्त अनिल चव्हाण, पोलिस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते. महाजन म्हणाले, शहरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असले तरी त्यांच्या जागा निश्चित करताना नागरिकांची मते लक्षात घ्यावीत. गुन्हेगारी कमी करण्यासाठी नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. अवैध धंद्यांवर तसेच जिल्ह्यातील गुंडगिरी नष्ट करण्यासाठी कठोर कारवाई करा, असे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावात टंचाई, बाहेर मात्र उधळपट्टी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक शहरात सध्या 'गावाबाहेर दिवाळी आणि गावात अंधार' अशी परिस्थिती अनुभवास येत आहे. एकिकडे शहरात गणेशोत्सव संपन्न होत असतांना पथदीप बंद अवस्थेत आढळतात. तर जव्हार रस्त्यावर मात्र सिंहस्थात लावलेले सोडियम व्हेपर दिमाखात लखलखत आहेत. वीज बचत करण्यासाठी विविध प्रयत्न होत असताना येथे मात्र सोडियम व्हेपर आणि हायमास्ट यांची रोषणाई होत आहे.

शहरात काही भागात एलइडी बसविण्यात आले आहेत. तर मग या सोडियम व्हेपरला पर्याय का नको, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहराच्या बाहेरून जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सोड‌िअम व्हेपरचे वीजबील अखेर नागरिकांनी कर रुपाने भरलेल्या पैशातूनच भरावे लागणार आहे. शहरात गल्ली बोळात अंधार असतो त्याच सोबत येथील नीलपर्वत पूर्णतः अंधारात बुडालेला दिसून येतो. चार्तुमास तशात गणेशोत्सव आदी कारनांनी नागरिक रात्री उश‌िरापर्यंत नीलपर्वत येथे पायी फिरण्यासाठी असतात. दररोज सायंकाळी व्यायाम करण्यासाठी देखील नागरिक नीलपर्वतावर जातात. त्यांना परत फिरण्यास उशीर झाल्यास अंधारात यावे लागते. याबाबत पालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे. बंद असलेले पथदीप तातडीने सुरू करतानाच हजारो वॅट नाहक खर्च करणारे हायमास्ट आणि सोडीअम दिवे बंद करून तेथे एलइडी बसविल्यास अनावश्यक खर्च टाळल्यास अधिक योग्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपकडूनच गोमातेचे हाल

$
0
0

माजी केंद्रीय मंत्री महादेवसिंह खंडेला यांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

गोरक्षणाच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाकडूनच गोमातेचे हाल होत आहे. तसेच, राम मंदिराच्या नावाखालीही हिंदू बांधवांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री महादेवसिंह खंडेला यांनी केला आहे. ते नाशिक येथील राजस्थान समाज बांधवांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

शेतकरी आणि गरीब जनतेची सरकारने पिळवणूक केली अशा विविध मुद्द्यावरून खंडेला यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका केली. त्यांचा सत्कार जाँगिड ब्राह्मण समाज सेवा समितीतर्फे आयोजित करण्यात आला होता.

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असताना गोशालांसाठी प्रत्येक गायीला आणि लहान बछड्याला महिन्याला चाऱ्यासाठी अनुदान दिले जात होते. मात्र काँग्रेस सरकार जाताच सध्याच्या भाजप सरकारने हे अनुदान बंद केले. त्यामुळे हजारो गायी आज चाऱ्याअभावी मृत्यूमुखी पडत आहेत. एक बाजूला गोमातेची सेवेसाठी मोठ्या घोषणा करायच्या. गायीला राष्ट्रीय माता म्हणून घोषित करावे, गोहत्या करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे, अशा प्रकारची मागणी करायची. आणि त्यांच्याच पक्षाचे सरकार असलेल्या प्रदेशात चाऱ्याअभावी गायींचे हाल होत आहे, याला गोसेवा म्हणायचे का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

या सरकारने राममंदिराच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत अनेक वर्ष उलटूनही हे सरकार राममंदिर उभं करू शकले नाही. उलट या मुद्द्यांवर त्यांच्याकडूनच राजकारण केले जात आहे, असा आरोपही त्यांनी लावला. राजस्थानमध्ये वसुंधरा सरकारने ४ महिन्यांपूर्वी ३७० मंदिर पाडली. त्यामुळे हे सत्ताधारी हिंदूत्वाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करत आहे, असा थेट आरोपही खंडेला यांनी केला. आज जर निवडणुका झाल्या तर निश्चितच काँग्रेस पक्षाचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश चिटणीस हेमलता पाटील, राजकुमार जेफ, ज्ञानेश्वर पवार, पार्वतीदेवी खण्डेला, प्रेमचंद चौधरी उपस्थित होते.

प्रभू रामचंद्राच्या भूमीबद्दल विशेष स्नेह

राजस्थानी बांधव नेहमी प्रामाणिकपणे व जिद्दीने काम करतात. त्यांच्या या स्वभावामुळे इतर कोणालाही त्रास होत नाही. नाशिकच्या प्रभू रामचंद्राच्या भूमीबद्दल विशेष स्नेह आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री महादेवसिंह खंडेला सत्काराला उत्तर देताना केले. महादेवसिंह खंडेला हे तीनदिवसीय नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांचा राजस्थानी समाज बांधवांकडून सत्कार ब्राह्मण समाज सभागृह येथे आयोजित केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठी परीक्षेत मोबाइलचा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तलाठी पदासाठी रविवारी, ११ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत मोबाइलसह दूरसंचार साहित्याचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित परीक्षार्थीवर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र महाजन बहुरे (वय २६, रा. औरंगाबाद) असे त्या संशयित परीक्षार्थीचे नाव आहे. नाशिकच्या महसूल विभागाच्या वतीने रविवारी तलाठी पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. ४१ जागांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेला १९ हजारांहून अधिक परीक्षार्थी सामोरे गेले. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परीक्षेवर ९८० समवेक्षक, २७५ पर्यवेक्षक, १३० लिपिक, २५० शिपाई यांच्यासह १९०० अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून होते. परीक्षा केंद्रात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उमेदवारांची तपासणी करून त्यांना परीक्षा खोलीमध्ये सोडण्यात आले. कोणतेही दूरसंचार साहित्य जवळ बाळगू नका, अशा सूचना सर्व परीक्षार्थींना वाचून दाखविण्यात आल्या. मात्र, तरीही संशयिताने डिजीटल डायरी, पेजर, मोबाइल व ब्ल्यू ट्यूथ डिवाईस असे दूरसंचार साहित्य जवळ बाळगले. मराठा हायस्कूलच्या वाघ गुरूजी शाळेत हा प्रकार उघडकीस आला. पर्यवेक्षक अशोक खंडेराव मुंढे यांच्या तक्रारीवरून बहुरेवर गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणरायावर जलाभिषेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरासह जिल्ह्यात गणरायाला निरोप देण्यात आला. विसर्जनप्रसंगी वरुणराजाने हजेरी लावल्याने गणपतीला जलाभिषेक होऊन भक्तांचा उत्साह दुणावला. रात्री १२ वाजता वाद्ये बंद ठेवून किमान दीड वाजेपर्यंत मिरवणूक सुरू होती. देवपूर परिसरातून पोलिसांनी मोठ्या संख्येने डीजे जप्त केले. घरगुती गणेशमूर्ती देवपुरातील हत्ती डोळ, नकाणे तलाव, गोंदूर तलाव या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या. पांझरा नदीपात्रातही विसर्जन केले गेले. जुने धुळे परिसरातील मानाचा खुनी गणपतीची मिरवणूक खुनी मशीद येथून जात असताना मुस्लिम समाजातील मौलवींनी गपणतीचे दर्शन घेऊन आरती केली. जिल्हा पेालिस अधीक्षक चैतन्य. एस, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह सामजिक व राजकीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे तालुक्यातील निमडाळे येथे दोन गणेशभक्तांचा तलावात बुडून मृत्यू झाला. हे दोघेही तरुण गणपती विसर्जनासाठी निमडाळे तलाव परिसरात गेले होते. सायंकाळी अंधारात तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने विजय आत्माराम पाटील (वय ३७), रमेश भिला पवार (वय १८) हे पाण्यात बुडून मरण पावले.

तलावात बुडालेल्या दोघांपैकी रमेश पवार याचा मृतदेह सापडला असून, विजयच्या मृतदेहाचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुढील गणेशोत्सवपासून नदी व तलावाजवळ धोक्याचे इशारे देणारे फलक पोलिसांनी लावावेत, अशी सूचना नागरिकांमधून पुढे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृह कारभाराच्या चौकशीसाठी निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

विद्यार्थ्यांना बिगारी कामावर जुंपणाऱ्या श्री छत्रपती अग्रसेन शैक्षणिक ट्रस्ट संचालित डॉ. राममनोहर लोहिया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाच्या कारभाराची चौकशी करून संस्थाचालक व वसतिगृह अधीक्षक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे यांना निवेदन देण्यात आले असून, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

धुळे शहरातील साक्री रोड परिसरात श्री छत्रपती अग्रसेन शैक्षणिक ट्रस्ट संचालित डॉ. राममनोहर लोहिया मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे. वसतिगृहातील मुलांना दगड, विटा व वाळू वाहून नेण्याच्या कामावर जुंपण्यात आल्याचा प्रकार या भागातील काही जागरूक रहिवाशांमुळे गुरुवारी उघडकीस आला. या प्रकरणी सखोल चौकशी करून संस्थाचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना प्रेरित युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज गोरे, संदीप मुळीक, हरिष माळी, जितेंद्र पाटील, स्वप्नील सोनवणे, अमोल पटवारी, आकाश शिंदे आदींनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नंदुरबार

निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत मतदारयाद्यांचा विशेष कार्यक्रम १६ सप्टेंबर २०१६ ते ५ जानेवारी २०१७ पर्यंत राबविण्याचे घोषित केले आहे. १ जानेवारी २०१७ रोजी ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाले आहे अशा व्यक्तींना या कार्यक्रमांतर्गत मतदारयादीत आपले नाव नोंदविता येईल.

या कार्यक्रमांतर्गत १६ सप्टेंबरला प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर १४ ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती स्विकारल्या जाणार आहेत. त्यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी यादीचा संबंधित भाग, ग्रामसभा, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये वाचन करून, त्यातील नावांची खातरजमा करण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त झालेले दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत डाटाबेसचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे. ५ जानेवारी, २०१७ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
१ जानेवारी २०१७ रोजी ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाले आहे अशा व्यक्तींना नाव नोंदविता येईल. त्यासाठी वयाचा दाखला, रहिवास पुरावा आणि दोन छायाचित्रे (फोटो) सादर करावे लागतील. मतदार नोंदणीसाठी सर्व प्रकारचे अर्ज संबंधित बीएलओ किंवा तहसील कार्यालयात मोफत मिळतील. अर्ज क्रमांक सहा हा मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी (नवीन नाव नोंदणीसाठी), अर्ज क्रमांक ६ अ हा मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदाराने करावयाचा अर्ज, अर्ज क्रमांक सात हा मतदारयादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी, अर्ज क्रमांक ८ हा मतदारयादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी, व अर्ज क्रमांक ८ अ हा मतदारयादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी आहे. विहीत नमुन्यातील आपले अर्ज व हरकती सर्व मतदार मदत केंद्र व अतिरिक्त मतदार मदत केंद्र म्हणून निर्देशित केलेल्या मतदान केंद्रावर स्वीकारले जातील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कृपया www.nvsp.in ला भेट द्यावी. प्रारूप मतदार यादी, वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या नावांची यादी व मतदार मदत केंद्राची यादी पाहण्यासाठी व इतर माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी, २०१७ रोजी वय १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा व नोंदणी झालेल्या मतदारांना २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवशी निवडणूक ओळखपत्र वितरीत करण्यात येतील.

पदवीधर मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारी

नंदुरबार : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आह. या निवडणुकीसाठी सद्यस्थितीत तालुकानिहाय अक्कलकुवा १ हजार ७, अक्राणी ४४५, तळोदा १ हजार ३०२, शहादा ४ हजार ४०९, नंदुरबार ५ हजार ६४९ व नवापूर १ हजार ७९० मतदार आहेत. निरंतर नोंदणी प्रक्रियेत १ हजार ११ अर्ज प्राप्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हिस रोडवरील पथदीपांचा विसर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

मुंबई-आग्रा रोडवरील कोणार्क नगर पासून के. के. वाघ कॉलेजपर्यंत सर्व्हिस रोडवर एकाबाजूने पथदीप बसवण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. तर रस्त्याच्या समोरच्या बाजूला असलेले अनेक पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी या भागात अनेक अपघात घडत आहेत. याचा प्रशासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली.

या समस्येकडे स्थानिक नगरसेवक, महापालिका प्रशासन यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. महामार्गाचे लोकार्पण होऊन चार वर्ष होऊन गेले. या रोडच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. एक बाजूला टोल कंपनीची टोल वसुलीदेखील सुरू आहे. पण तरीही परिसरातील सर्व्हिस रोडवर पथदीप बसवण्यात आलेले नाहीत. अनेक वेळा याबाबत पाठपुरावा करूनदेखील त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

रात्रीच्या वेळी सोनसाखळी चोऱ्या, टवाळखोरांचा याठिकाणी मोठा त्रास होतो. शिवाय अंधारात कॉलनीतून येणारी वाहने अचानक रस्त्यावर येतात त्यामुळे अपघात होतात याची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी.

- गणेश मंडलिक, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षसंवर्धनाबाबत बेफिक‌िरी

$
0
0

चेहेडीतील दारणेच्या काठावरील वृक्ष अर्धमेली

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कामाच्या ठेक्यासाठी कोट्यावधीचे उड्डाने पालिकेतून झेपावत आहेत. तर दुसरीकडे पालिकेच्या हद्दीत असलेल्या कित्येक झाडांचे जीव प्रशासनाच्या आटलेल्या वृक्षप्रेमामुळे कासाविस झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वृक्ष लागवडीसाठीच्या खर्चाच्या बाता कोटीत हाणणाऱ्या पालिका प्रशासनाची वृक्षसंवर्धनाबाबतची बेफिकीरीची वृती चेहेडी येथील दारणा नदीच्या किनारी असलेल्या झाडांच्या जीवावरच उठल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात वृक्ष लागवडीसाठी कोटींची उड्डाण्‍ाे पालिका प्रशासन घेत आहे. परंतु आहे त्याच झाडांच्या संवर्धनाबाबत पालिका प्रशासन किती असंवेदनशील आहे. याची प्रचिती चेहेडीच्या दारणा नदीच्या काठावर असलेल्या झाडांची अर्धमेली अवस्था बघून वृक्षप्रेमीला आल्याशिवाय राहणार नाही. याकडे प्रशासनाने कोणतेही लक्ष दिलेले नाही.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी व दारणेला महापूर आला होता. या पुरामुळे चेहेडी येथे दारणा नदीच्या काठावरील कित्येक हिरवी झाडे उन्मळून पडली होती. तर काही झाडे पुराच्या पाण्यात वाहून गेली. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहून आलेला कचरा आजही दारणा नदीच्या काठावर उन्मळून पडलेल्या झाडांवर पडून आहे. मात्र या कचऱ्याचा फास येथील शेकडो झाडांभोवती आवळला गेलेला आहे. दारणा नदीच्या दोन्हीही बाजुच्या काठावर हे चित्र आहे.

बेकायदेशीर वाळू उपशाचा दुष्परिणाम

गेल्या काही वर्षांपासून चेहेडी गावालगत दारणा पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे वाळू उपसा केला गेला आहे. महसूल प्रशासनांच्या मेहरबानीमुळे वाळू माफिया बोटीच्या सहाय्याने वाळुचा उपसा करित असतात. त्यामुळेच दारणेला आलेल्या पुरात काठावरील माती वाहून गेल्याने शेकडो वृक्ष उन्मळून पडले आहेत.

उन्हाळ्यात चेहेडी गावालगत दारणा पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे वाळुचा उपसा झाल्याने दारणेचे पात्रही रुंदावले. त्यामुळे काही वृक्ष कचऱ्यात गेल्याने ती अर्धमेली झाली आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.

-पांडुरंग गुरव, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्या डीपी; वीजकंपनी गेली झोपी

$
0
0

विंध्यवासिनी सोयायटी परिसरात डीपी धोकादायक

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जेलरोड भागात अनेक ठिकाणी रहिवासी क्षेत्रात असलेल्या विद्युत डीपींची झाकणे गायब झाली आहे. यामुळे त्या डीपी धोकादायक बनल्या आहेत. कलानगर परिसरातील विंध्यवासिनी सोसायटीलगत असलेल्या विद्युत डीपीचा स्फोट होऊन शेजारच्या रस्त्याने जाणारे संजय भालेराव हे स्थानिक नागरिक जखमी होऊन रस्त्यातच कोसळण्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. त्यामुळे परिसरातील अशा धोकादायक डीपी वीज मंडळाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.

जेलरोड भागातील विविध उपनगरांत वीज पुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी वीज मंडळाच्या डीपी आहेत. काही वर्षांपूर्वी या डीपी रहिवासी सोसायट्यांपासून दूर होत्या. परंतु झपाट्याने शहरीकरण झाल्याने आता या डीपींना इमारतींचा विळखा पडला आहे. यापैकी कित्येक डीपींची झाकणेही गायब झालेली आहेत. त्यामुळे या डीपी नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत. या शाळा, रुग्णालये, शॉपिंग सेंटर्सच्या अगदी लागूनच असल्याने अशा डीपींचा धोका कित्येकपटीने वाढला आहे.

कलानगर येथील विद्युत डीपीचा आतापर्यंत अनेकदा स्फोट झालेला आहे. स्पार्किंग तर वारंवार होत असते. विद्युत विभागाचे कर्मचारी या डीपीची वारंवार जुजबी दुरुस्ती करत असतात. परंतु योग्य ती कायमस्वरुपी दुरुस्ती होत नसल्याने स्थानिक रहिवाशांची चिंता वाढली आहे.

मिनी डीपीही उघड्याच

पालिकेच्या विद्युत विभागाच्या मिनीडीपीही शहरभर उघड्याच आहेत.त्यामुळेही वीजेचा शॉक लागण्याची शक्यता वाढली आहे.उघड्या मिनी डीपींची संख्या जास्त असुन खासकरुन फुटपाथच्या कडेला असणाऱ्या सर्वच लहान डीपी झाकणाविना असल्याचे दिसून येते.

येथे यापुर्वीही विद्युत डीपीचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मंडळ मात्र याकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. या त्यामुळे डीपी स्थलांतरीत करणे अत्यावश्यक आहे.

-विजय बिडवे, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपोवनात झोपड्यांचे पुन्हा अतिक्रमण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरक्षित असलेल्या महापालिकेच्या जागेत अचानक झोपड्यांची संख्या वाढली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तिन्ही शाही स्नान पर्वणीनंतर साधुग्रामची ही जागा मोकळी झाली होती. या जागेवर लगेचच काही झोपड्यांचे अतिक्रमण झाले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या हे लक्षात येताच येथील अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्या झोपड्या पुन्हा वसल्या होत्या. आता मात्र चार झोपड्यांची जागा चाळीसपेक्षा जास्त झोपड्यांनी व्यापली आहे. या वाढत्या झोपड्यांमुळे येथील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

प्रत्येक गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहर परिसरात ज्यांच्याकडे शौचालये नाहीत त्यांना अनुदान देऊन शौचालये उभारण्यासाठी मदत केली जात आहे. दुसरीकडे अशा प्रकारच्या अनाधिकृत झोपड्या वाढत आहेत. यामध्ये राहणारे लोक उघड्यावर शौचास बसतात, त्यांच्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होतो. या जागेवर अतिक्रमण होऊ नये. अतिक्रमण विभागाने हे अतिक्रमण त्वरित काढावे, अशी मागणी होत आहे.

मोर्चाविरोधात डाव

येत्या २४ सप्टेंबरला या जागेवरून मराठा क्रांती मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मोर्चासाठी येणाऱ्यांना पुरेशी जागा उपलब्ध होऊ नये म्हणून मुद्दाम या झोपड्या वसविण्याचा डाव आखण्यात आलेला तर नसावा ना, अशी शंका काही नागरिकांनी उपस्थित केली.

तपोवनातील महापालिकेच्या जागेवर झोपड्यांचे अतिक्रमण कुणाच्या वरदहस्तामुळे होत आहे. याचा महापालिकेने तपास लावला पाहिजे. या अतिक्रमणाला त्वरित आळा बसविला नाही तर हा प्रश्न गंभीर होऊ शकतो.

उद्धव निमसे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्ती संकलनासाठी संस्थांचा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रबोधन करत गणेश विसर्जनाच्या काळात सामाजिक संस्थांनी समाजासमोर नवा आदर्श उभा केला. मूर्ती दानाचे महत्त्व पटवून देत त्यांनी हजारो मूर्तीचे त्याबरोबरच कित्येक टन निर्माल्याचे संकलन करून पर्यावरण संवर्धनास प्रेरणा दिली. शहरातील शेकडो संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.

गणेशमूर्तींचे नदीत होणारे विसर्जन व त्यातून उद्भवणारी जलप्रदूषणाच्या समस्या पाहता यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक संस्थांनी सक्रिय पुढाकार घेतला होता. अधिकाधिक मूर्तींचे संकलन करून जलप्रदूषण होण्यास आळा बसावा, या उद्देशाने या संस्था पुढे आल्या होत्या. विशेषतः तरुणांचा पुढाकार या उपक्रमात मोठा सहभाग असल्याने या पिढीत पर्यावरण संवर्धनासाठी असलेली बांधिलकी दिसून आली. शहरातील वेगवेगळ्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी या संस्थांशी जोडून घेत मूर्ती संकलनाचे काम केले. संस्थांनी यामागील काम पटवून दिल्याने जनजागृती होण्यासही मदत झाली. गुरुवारी या उपक्रमातील मूर्ती महापालिकेला सुपूर्द करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकासाठी स्वतंत्र जलकुंभ

$
0
0

नगरसेविका थोरात व मराठे यांच्या हस्ते भूमिपुजन

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेने प्रभाग क्रमांक ३० मध्ये २० दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या नवीन जलकुंभ बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. नगरसेविका अर्चना चंद्रकांत थोरात व सचिन मराठे याच्या उपस्थितीत तीन कोटी खर्चून तयार होणाऱ्या जलकुंभाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या जलकुंभामुळे द्वारका भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असून काठे गल्लीसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी राहणार आहे.

प्रभाग क्रमांक ३०, तपोवन व द्वारकामधील काही भागात रविंद्र शाळेजवळील १४ लाख लिटर्सच्या जलकुंभावरून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु द्वारका परिसर व काठेगल्लीचा संपूर्ण पाणीपुरवठा एकाच जलकुंभावरून होत असल्याने या भागात पाणीपुरवठ्याच्या अडचणी येऊन पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. त्यामुळे नगरसेविका अर्चना थोरात यांचे नवीन पाण्याच्या टाकीसाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी २ कोटी ९९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. शुक्रवारी (दि. १६) नगरसेविका अर्चना थोरात, नगरसेवक सचिन मराठे, पाणीपुरवठा अभियंता यु. बी. पवार, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत थोरात यांच्या उपस्थितीत नवीन टाकीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. वर्षभरात या टाकीचे काम पूर्ण होणार असून या जलकुंभामुळे द्वारका परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन् नळाला आले स्वच्छ पाणी !

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

गंगापूर रोडवर असणाऱ्या पोलिस वसाहतीत गेल्या महिन्याभरापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. या पाण्याच्या पुरवठ्यामुळे रहिवाशांमध्ये साथीचे आजार पसरले होते. पोलिस वसाहतीत दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित करण्यात आले होते. सदर बातमीची महानगरपालिकेकडून दखल घेण्यात आली आहे. 'मटा'च्या या बातमीचा इम्पॅक्ट दिसून आला.'

गंगापूर रोडवरील पोलिस हेडक्वॉर्टर येथे पुरवठा होत असलेले गढूळ पाणी बंद झाले आहे. शुक्रवारी (दि. १६) सकाळी सव्वापाच वाजता आलेले पाणी शुद्ध असल्याचे रहिवाशांनी सांगितले आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा झाल्याने वसाहतीतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गढूळ पाण्यामुळे साथीचे आजार अनेकांना झाले होते. नगरपालिकेकडे त्यांनी याची तक्रार केली होती. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. एखादा मोठा आजार होऊ नये म्हणून रहिवाशांनी 'मटा'सोबत सदर वृत्त सांगितले होते. या बातमीमुळे आता पोलिस वसाहतीत शुद्ध पाणी आले आहे. रहिवाशांना शुद्ध पाणी मिळाल्यामुळे त्यांची समस्या दूर झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजात प्रतिनिधीच नाही!

$
0
0

यंदा विद्यार्थी सभा नसल्याने कॉलेजियन्स संभ्रमात

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी किंवा कॉलेज स्तरावर उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थी सभा कार्यरत असते. यंदा मात्र शैक्षणिक वर्ष अर्धे उलटून गेले असले तरी राज्यभरातील कोणत्याही कॉलेजमध्ये विद्यार्थी सभेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. राज्य सरकारने काही कारणास्तव या निवडणुका थांबविल्या आहेत. मात्र, यामुळे अनेक कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रतिनिधीच नसल्याचे समोर आले आहे. अनेक कॉलेजियन्सला वेगवेगळ्या अडीअडचणीला समोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचा आवाज उठवण्यासाठी त्यांना प्रतिनिधीच नसल्याने त्यांच्या समस्या तशाच राहत असल्याचे दिसून येत आहे.

कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थी सभे अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येतात. सोबतच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या कोणत्याही अडचणीसाठी किंवा कॉलेजियन्सच्या भूमिकेचं प्रतिनिधित्व विद्यार्थी सभेतील प्रतिनिधी करतात. काही कारणास्तव विद्यार्थी सभेच्या खुल्या निवडणुका बंद करून मेरिट बेसिसवर विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जात आहेत. यालाही विरोध होत असल्याने खुल्या निवडणुका पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने दोन वर्षांपासून सरकार दफ्तरी विधेयक पडून आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सदर विधेयकावर शिक्कामोर्तब करू असे, शिक्षण मंत्र्यांचे म्हणणे आहे.

जुनेच प्रतिनिधी कार्यरत

काही कॉलेजेसमध्ये मागील वर्षीचेच विद्यार्थी प्रतिनिधी व जीएस कार्यरत आहेत. कॉलेज प्रशासनाने त्यांनाच अधिकार देऊन त्यांना कायम केले. मात्र, काही ठिकाणी आपापले वर्ग प्रतिनिधीच विद्यार्थ्यांना माहित नसल्याने त्यांची गोची होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांना पोलिसांचा ‘आधार’

$
0
0

मनोबल वाढविण्यासाठी महिला अधिकारी तक्रारदारांशी संवाद साधणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बलात्कार, छेडछाड, विनयभंग किंवा पोस्को यासारख्या गंभीर गुन्ह्यातील तक्रारदार महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी परिमंडळ दोनमध्ये पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 'ऑपरेशन आधार' ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत महिला अधिकारी थेट तक्रारदारांशी संपर्क साधत संवाद साधणार आहेत. यामध्ये तपासाची माहिती देणे, पीडितेला संशयितांकडून काही त्रास तर होत नाही ना, अशी माहिती घेतली जाणार आहे.

शहरीकरणामुळे छेडछाड विनयभंग, बलात्कार, लहान मुलामुलींचा लैंगिक छळ अशा घटना वाढीस लागल्या आहेत. अनेकदा, तक्रार दाखल झाली की पोलिस आपल्या तर तक्रारदार त्याच्या कामात व्यस्त होतात. त्यातच संशयित आरोपी जामिनावर सुटून उजळ माथ्याने फिरतो. कायदेशीर पण या किचकट प्रक्रियेचा समाजमनावर थेट परिणाम होतो.

याच पार्श्वभूमीवर, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी परिमंडळ दोनमध्ये मशिन आधार नावाची मोहिम हाती घेतली आहे. याबाबत बोलताना उपायुक्त धिवरे यांनी, परिमंडळ दोनमध्ये देवळाली कॅम्प, नाशिक रोड, उपनगर, इंदिरानगर, अंबड आणि सातपूर या पोलिस स्टेशनचा समावेश होतो. २०१६ मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत छेडछाड तसेच विनयभंग केल्याप्रकरणी वरील पोलिस स्टेशनमध्ये २८ गुन्हे दाखल आहेत. लहान मुलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ११, बलात्काराचे आठ, हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत. अनेकदा, जामिनावर सुटलेले संशयित महिलांना त्रास देण्याचे प्रकार करतात. तर कधी पोलिस तपास सुरू असताना त्याबाबत पीडित महिलेला माहिती नसेल तर त्याचाही नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच, या तक्रारदार महिलांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ही योजना हाती घेतल्याचे उपायुक्त धिवरे यांनी स्पष्ट केले.यासाठी पीएसआय वैशाली शिंदे, पीएसआय अश्विनी पाटील, पीएसआय श्वेता बेलेकर, पीएसआय जयश्री सरोदे, पीएसआय सरिता जाधव, तर पीएसआय भीमराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरच्या उमेदवारांचा जीव टांगणीला!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यापूर्वीच ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. सुप्रीम कोर्टाने नव्याने मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिल्याने प्रशासन आणि निवडणूक आयोगाची धांदल उडाली आहे. सोबतच या पूर्वीच्या निवडणुकांमधील मतदार नोंदणीवर डोळा ठेऊन असलेले राजकीय पक्ष अन् उमेदवारांचेही धाबे दणाणले आहे.

एका याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने पदवीधरबाबत निवडणूक आयोगाचीही कानउघडणी केली आहे. या निवडणुकीबाबत कालबद्ध कार्यक्रम आखून देतानाच पदवीधरसाठी प्रत्येकवेळी नव्यानेच मतदार नोंदणी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून मतदार नोंदणीसाठी प्रचार अभियान राबविण्याचेही कोर्टाने बजावले आहे. या आदेशामुळे विभागीय आयुक्तालयातील यंत्रणेचा सुस्त कारभारही चव्हाट्यावर आला आहे. या यंत्रणेने सुरुवातीपासूनच मतदार नोंदणीबाबत नेमकी स्पष्टता तसेच त्यासाठी आवश्यक प्रमाणात जनजागृती केली नसल्याचा आरोप होत होता. आता जेमतेम महिनाभरात नव्याने मतदारांची नोंदणी करावी लागणार असल्याने यंत्रणा धास्तावली आहे. महिनाभरात नोंदणीचे शिवधनुष्य कसे पेलायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

राजकीय पक्ष आणि त्यांच्या मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी धावपळ करावी लागणार असल्याने त्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. भाजपने सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. शिवसेना व मनसेने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाही, डाव्या पक्षांकडून राजू देसले रिंगणात उतरलेले आहेत. संवर्धन संस्थेचे सचिन चव्हाण हे अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत.

कोर्ट म्हणते....

- निवडणुकीसाठी प्रत्येकवेळी नव्यानेच मतदार नोंदणी करण्यात यावी.

- ७ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणीसाठी आवाहन करून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून घ्यावी.

- नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करावा. विविध माध्यमांतून जनजागृती करावी.

- शैक्षणिक संस्थांसह विविध संस्थांच्या प्रमुखांना पत्र देऊन नोंदणी करण्यासाठी सहकार्य घ्यावे.


पदवीधरच्या यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्येही घटनेची पायमल्ली झाल्याचे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने आता मतदार नोंदणीबाबत स्पष्टता करून संभ्रम दूर करावा. कोर्टाच्या निर्देशाप्रमाणेच निवडणूक व्हायला हवी.

सचिन चव्हाण, अध्यक्ष, संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलानगरमध्ये डेंग्यूची दहशत

$
0
0

विहिरींची स्वच्छता करण्याची मागणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडच्या श्री कला नगरसारख्या उच्चभ्रू वस्तीतील जुन्या विहिरीतील अस्वच्छ पाण्यामुळे डेंग्यूची दहशत निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर उपयायोजना करीत प्रशासनाने तातडीने परिसरातील विहिरींची व परिसर स्वच्छता करावी, धुराळणी, फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

जेलरोडवरील सेंट अण्णा चर्चसमोर श्री कलानगर असून येथे ब्रिट‌िशकालीन विहीर आहे. नागरिकांनी श्रमदान करून तिची स्वच्छता केली होती. आता त्यात पालापाचोळा, कचरा पडला असून पाणी खूपच घाण झाले आहे. त्यात किडे, डेंग्यूच्या आळयांची पैदास झाली आहे. डेंग्यू प्रतिबंधक फवारणी करणाऱ्यांनीही विहिरीत व परिसरातील अस्वच्छतेमुळे डेंग्यूच्या डासांची पैदास वाढल्याचे सांगितले. ही विहीर पूर्ण स्वच्छ करून तिच्या पाण्याचा उपयोग करावा, विहिरींवर जाळी बसवावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

कचऱ्याचा प्रश्न

याठिकाणी महापालिकेची खुली जागा असून त्यात काही बिल्डर कचरा, गारबेज टाकत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळेही भागात अस्वच्छता होत आहे. तर गार्डनसाठी असलेल्या महापालिकेच्या दुसऱ्या भूखंडावर शेजारील इमारतीचे नागरिक कचरा टाकत असल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे. मनपाच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना याबाबत सांगितले असता त्यांनी हा पालापाचोळा नेण्यास नकार दिल्याची नागरिकांची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images