Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तलाठी परीक्षेच्या हरकतींसाठी आजची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तलाठी आणि वाहनचालक पदांसाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या परीक्षेच्या उत्तर तालिका जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेत विचारलेले प्रश्न तसेच आदर्श उत्तरतालिकेतील उत्तरांबाबतच्या हरकती आज (१४ सप्टेंबर) जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हा निवड समितीने केले आहे. हरकती नोंदविण्यासाठी उमेदवारांना एवढा अल्पावधी का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
जिल्ह्यातील महसूल विभागातील उपविभागीय कार्यालयांमधील तलाठी पदाच्या ४१ तर वाहनचालक पदाच्या एका जागेसाठी रविवारी (दि. ११) सप्टेंबरला परीक्षा घेण्यात आली. तलाठी पदासाठी पेसा आणि पेसा क्षेत्राबाहेरील अशा वर्गवारीत अर्ज मागविण्यात आले होते. ४१ पैकी ११ पदे पेसासाठी तर ३० पदे पेसा क्षेत्राबाहेरील उमेदवारांकरीत आहेत. तलाठी पदासाठी पेसा क्षेत्राबाहेरील २० हजार ३०३ अर्ज तर पेसा क्षेत्रातून ३ हजार २२१ अर्ज प्राप्त झाले होते. तर वाहन चालक पदासाठी सरळसेवा पध्दतीने ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे जिल्ह्यातील हजारो उमेदवार या परीक्षेला सामोरे गेले. एकूण १९ हजार ८९२ परिक्षार्थींनी ही परीक्षा दिली. ६१ केंद्रांवरील ९८२ वर्गखोल्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. वाहनचालकाच्या एका जागेसाठी ९०८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६८० अर्जदार परीक्षेला सामोरे गेले. वाहनचालक पदासाठी १०० गुणांची तर तलाठी पदासाठी २०० गुणांची बहुपर्यायी पध्दतीने ही परीक्षा घेण्यात आली.
तलाठी पदासाठीच्या परीक्षेसाठी ए, बी, सी, डी असे प्रश्नपत्रिकेचे चार संच करण्यात आले होते. काही प्रश्नांचा स्तर कठीण होता असा आक्षेप परीक्षेनंतर काही उमेदवारांनी घेतला. या सर्व पार्श्वभूमीवर आदर्श उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रश्न तसेच त्यांची उत्तरे यांबाबत हरकती असल्यास त्या बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात आणि पुराव्यांसह नोंदविता येणार आहेत.

एकाच दिवसाचा अवधी?
तलाठी आणि वाहनचालक पदासाठीच्या परीक्षेला जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी बसले. त्यांना प्रश्न तसेच उत्तरांबाबत हरकती घेण्यासाठी अवघा दोन अवधी मिळाला आहे. त्यापैकी सोमवार आणि मंगळवार गेला. मंगळवारीही बकरी ईदची सरकारी सुटी होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहणार होते. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंतच हरकती नोंदविण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हा निवड समितीने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅथलेटिक्समध्ये आदिवासींचा ठसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेतर्फे जळगाव येथे ११ सप्टेंबर रोजी झालेल्या १६ व १८ वर्षांखालील विभागीय अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचा १७ खेळाडूंचा संघ सहभागी झाला होता. या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय अॅथलेटिक्समध्ये शंभर टक्के यश मिळविणारा आदिवासी प्रबोधिनीचा एकमेव संघ ठरला आहे. या खेळाडूंना प्रबोधिनीचे क्रीडा मार्गदर्शक व राष्ट्रीय धावपटू दत्ता बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. १८ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धा सांगली येथे १७ व १८ सप्टेंबर रोजी, तर १६ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धा २३ व २४ सप्टेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे.
जळगाव येथे झालेल्या या स्पर्धेत जळगावसह धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते. नाशिकमधून आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचा संघही मैदानात उतरला होता. २००० मीटर शर्यतीत प्रबोधिनीचा पवन राखे, ८०० मीटरमध्ये प्रवीण भील, वनिता काटकरी, ४०० मीटरमध्ये उमा मडावी, तर भालाफेकमध्ये सरदार वसावे याने प्रथम क्रमांक मिळविला. याशिवाय कमलेश कनोजा याने १०० मीटरमध्ये तृतीय, २०० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत दुहेरी यशाला गवसणी घातली.
प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचे यश (कंसात वेळ)
१६ वर्षांखालील वयोगट ः
२००० मीटर शर्यत ः प्रथम ः पवन राखे (६.४५ मिनिटे), द्वितीय ः कृष्णा खुरकुटे (६.४५), तृतीय ः नवीन वळवी (६.४६)
८०० मीटर ः प्रथम ः प्रवीण भील (२ः२३ः०९ मिनिटे), द्वितीय ः राजू भोये (२ः३०ः०५).
मुली ः प्रथम ः वनिता काटकरी (२ः४० मिनिटे)
४०० मीटर ः तृतीय ः विष्णू तांबडा (१ः०८ मिनिटे), मुली ः प्रथम ः उमा मडावी (१ः१४ मिनिटे)
१०० मीटर ः तृतीय ः कमलेश कनोजा (१२ः०९ सेकंद).
२०० मीटर ः द्वितीय ः कमलेश कनोजा (२८.०१ सेकंद), तृतीय ः राहुल माढा (२८.०९).
लांब उडी ः द्वितीय ः प्रवीण खरपडे (५.४४ मीटर), तृतीय ः सुनील पावरा (५.४०).
थाळीफेक ः द्वितीय ः धर्मेंद्र बागतलवार (२१ः५० मीटर), तृतीय ः समीर राबड (२०.४०)
भालाफेक ः प्रथम ः सरदार वसावे
१८ वर्षांखालील वयोगट ः
३००० मीटर ः तृतीय ः धर्मेंद्र परतेती (११ः४० मिनिटे).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरती विथ सेलिब्रेटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाने वातावरण चैतन्यमय झाले. या दहा दिवसात बाप्पांची मनोभावे सेवा करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला आहे. तुमच्या या आनंदात भर घालण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' एक अनोखी संधी घेऊन आला आहे. 'आरती विथ सेलिब्रेटी' या उपक्रमाच्या माध्यमातून तुमच्या घरातील किंवा मंडळाच्या बाप्पाची आरती सेलिब्रेटींच्या हस्ते करता येणार आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही विचारलेल्या एक प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. यामध्ये एक भाग्यवान मंडळ आणि एक घरगुती गणपती अशी निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदा अभिनेते किरण भालेराव म्हणजेच भ्राता नंदी यांच्या हस्ते आरती करण्याची संधी मिळणार आहे. तर मग सहभागी व्हा आणि शेवटच्या दिवसाची आरती सेलिब्रेटींसोबत करा.

प्रश्नः थेऊरच्या गणपतीचे नाव काय?

A) चिंतामणी B) वरदविनायक

C) मोरेश्वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुबईत शुक्रवारी भरणार वाचक मेळावा

$
0
0

'ग्रंथ तुमच्या दारी'कडून आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'ग्रंथ तुमच्या दारी, दुबई' व 'आमी परिवार' यांच्या संयुक्त विद्यमाने भारताबाहेर होणारा पहिलाच वाचक मेळावा दुबई येथे शुक्रवारी, (दि. १६) होत आहे. दुबईत २०१६ हे वाचन वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. समाजात वाचनाची गोडी वाढावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या 'ग्रंथ तुमच्या दारी'या उपक्रमांतर्गत पुस्तक वाचक चळवळीने साता समुद्रापार झेप घेतली. विनायक रानडे यांची संकल्पना असलेली ही चळवळ वाचक चळवळीचा मानबिंदू ठरली आहे.

दुबईच्या पेट्यांचे प्रायोजक कुसुमाग्रज प्रतिष्ठान, प्रमुख देणगीदार विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर, नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे, पुणे व मनीषा कारेगावकर हे आहेत. 'ग्रंथ तुमच्या दारी, दुबई' व 'आमी परिवार' आयोजित दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हा वाचक मेळावा शुक्रवारी बिल्डींग एम २७, मेडिकल कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ शारजा, येथे आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रा. प्रवीण दवणे व प्रमुख अतिथी म्हणून विनायक रानडे व विश्वास ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी 'ग्रंथ तुमच्या दारी, दुबई' चे शिल्पकार डॉ. संदीप कडवे यांच्या 'विश्व पांथस्थ' मासिकाचे प्रकाशन, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२०१४ मध्ये डॉ. संदीप कडवे व स्वाती कडवे यांनी ही योजना दुबईत नेण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून आज घीसीस दुबई, बर दुबई, बर दुबई सिल्वर सँड्स, इंटरनॅशनल सिटी दुबई, डिस्कव्हरी गार्डन दुबई, अल मझाज शारजा, अबू शगारा शारजा, अल खान शारजा, कासिमिया शारजा, रस अल खेमा, फुजेरा, अबू धाबी, अजमान वाचक मंडळ, बहरीन वाचक मंडळ, अल खोबर सौदी अरेबिया, सोहार ओमा येथे एकूण १६ पेट्या आहेत. यानिमित्ताने आणखी ४ पेट्या देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांती, त्यागाचा संदेश देणारा सण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण बकरी ईद मालेगाव शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील पोलिस कवायत मैदानावर मुस्लिम बांधवांनी प्रमुख मौलवींच्या उपस्थित सामुदायिक नमाजपठण केले. यावेळी शहरातील लाखो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. येथे मौलाना इनतियाज इक्बाल यांनी दुआँ पठण केले. बकरी ईद म्हणजे शांती, त्यागाचा संदेश देणारा सण असून शहरातील शांतता सलोखा कायम राहील अशा प्रकारे हा सण साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शहरातील एकूण १३ वेगवेगळ्या इदगाह मैदान आणि सुमारे १०० मशिदींमध्येदेखील नमाजपठण व अन्य कार्यक्रम संपन्न झाले. यानंतर शहरात विविध ठिकाणी कुर्बानीचे कार्यक्रम संपन्न झालेत. यासाठी मनपाकडून कायमस्वरूपीचे १२ व तात्पुरता १ असे १३ कत्तलखान्यांची व्यवस्था करण्यात आली होती. गोवंश हत्या बंदी कायद्याची अमलबजावणी होत असल्याने मुस्लिम धर्मगुरूंनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करीत कुर्बानी करण्याचे आवाहन केले होते. पुढील तीन दिवस कुर्बानी बकरी ईद आणि गणेश विसर्जन जोडून आल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सिन्नरला नमाजपठण

सिन्नर : बकरी ईदच्या निमित्ताने सिन्नर येथे देवी रोडवरील इदगाह मैदानावर मंगळवारी, नमाजपठन करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे यांनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, इलियास खतीब, माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, धर्मगुरू मौलाना तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निफाड, लासलगावला परंपरा जोपासली

निफाड : लासलगाव शहरात व परिसरातील गावांमध्ये ईद-उल-अजहा बकरी ईद मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. येथील इदगाह मैदानावर मौलाना रिझवान रझा यांनी तर नुरानी मस्जिद येथे मौलाना मंजूर मिल्ली सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाजपठण केले. या वेळी लासलगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी ईदच्या शुभेच्छा देवून गावातील सर्वधर्मीय एकोपा कायम राखण्याची परंपरा टिकून ठेवण्याचे आवाहन केले. पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी लासलगाव दफनभूमीतील रस्ता काँक्रिटीकरण करून देण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी केल्याची माहिती दिली. शिवसेना नेते बाळासाहेब जगताप, विलास खैरनार यांनीही शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानव कल्याणासाठी दुआँ

$
0
0

जिल्ह्यात ईद-उल-अज्हा उत्साहात, ईदगाहवर मुस्लिम बांधवांचा मेळा

म. टा. वृत्तसेवा, जुने नाशिक

इस्लामची मानवतावादी शिकवण आचरणात आणून अल्लाहताअलाला अभिप्रेत असलेली कुर्बानी देत जीवन जगण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन मुस्लिम धर्मगुरुंनी ईद-उल-अज्हाचे धार्मिक महत्त्व विशद करीत मुस्लिम बांधवांना संबोधित करताना केले. मंगळवारी (दि. १३) ईद-उल-अज्हानिमित्त शहरातील ऐतिहासिक शाहजहाँनी ईदगाहवर हजारोच्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिमबांधवांनी शहराचे खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतीब यांच्या नेतृत्वाखाली (इमामत) सामूहिक नमाजपठण केले.

इस्लाम धर्म हा मुस्लिमांपुरताच मर्यादित नसून पृथ्वीवरील समस्त मानवजातीच्या कल्याणसाठीच अवतरला आहे. इस्लामला भेदभाव मान्य नसून सर्व समान असल्याची भावना समाजात रुजवितो. देशप्रेम, देशभक्ती, मानवता, गोरगरिबांबद्दल आपुलकी व कणव याची शिकवण

इस्लाम देतो, असेही यावेळी महत्त्व सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजता शहरातील ऐतिहासिक शहाजहाँनी ईदगाहवर ईद-उल-अज्हाचे मुख्य सामूहिक नमाजपठणाचे आयोजन केले होते. सुंगधीत इत्तर, डोळ्यात सुरमा, डोक्यावर खास इस्लामी टोपी, कुर्ता पायजामा घालत 'अल्लाहो अकबर...' चा खास जप करत मुस्लिमबांधव शाहजहाँनी ईदगाहवर पोहचले. तत्पूर्वी शहरातील मशिदीत आठच्या सुमारास सामूहिक नमाजपठण झाले.

ऐतिहासिक शाहजहाँनी ईदगाहवर ईद-उल-अज्हाचे मुख्य सामूहिक नमाजपठणात हजारो मुस्लिमबांधव सहभागी झाले होते. सुत्रसंचालन सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी केले. यावेळी ईदचा खुतबा, दरुद व सलामचे मुख्य धार्मिक कार्यक्रम झाले. याप्रसंगी देशावरील संकटे नष्ट होऊन देशाच्या प्रगतीची, सर्वत्र हिंदू-मुस्लिम एकता व सलोख्याचे माहोल व अमनसाठी विशेष दुआँ पठण झाले.

नमाजपठण संपताच मुस्लिमबांधवांनी एकमेकांना अलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाहवरून घरी परतणाऱ्या मुस्लिमबांधवांनी गोरगरीबांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक दान करत शहरातील दरगाह शरीफ व कब्रस्तानात जाऊन दुआँ पठण केले.

पोलिस प्रशासनाची गर्दी

ईदगाह मैदानावर हिंदू बांधवांसह पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, उपायुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, उपमहापौर गुरुमित बग्गा, परवेझ कोकणी यांनी मुस्लिमबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांची दांडी

यंदा महापौर, आमदार, खासदार, नगरसेवकांनी ईदगाहवर दांडी मारली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी आपल्या प्रभागातच उपस्थित राहत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

देवळालीत उत्साह

देवळाली कॅम्प : मानवतेला त्याग व समर्पणवृत्तीची शिकवण देणारा सण बकरी ईदला देवळालीत शांतता व बंधूभावासाठी प्रार्थना करण्यात आली.

येथील मुस्लिमबांधवांनी वडनेर रोडवरील इदगाह मैदानावर बकरी ईदनिमित्त मौलाना सादिक अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली तर भगूर येथे मौलाना हाफिज इकबाल दाउद यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत नमाजपठण केले. यानंतर मुस्लिमबांधवानी एकमेकांना तर सर्व धर्मियांनी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. हिंदू धर्माच्या दिनदर्शिकेत दर तीन वर्षांनी अधिक महिना असतो. त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या एक महिना अगोदर आल्याने गतवर्षांपासून गणेशोत्सवात बकरी ईद असून २०१८ साली बकरी ईद श्रावण महिन्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅथलेटिक्समध्ये आदिवासी प्रबोधिनीचा ठसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेतर्फे जळगाव येथे ११ सप्टेंबर रोजी झालेल्या १६ व १८ वर्षांखालील विभागीय अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचा १७ खेळाडूंचा संघ सहभागी झाला होता. या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय अॅथलेटिक्समध्ये शंभर टक्के यश मिळविणारा आदिवासी प्रबोधिनीचा एकमेव संघ ठरला आहे. या खेळाडूंना प्रबोधिनीचे क्रीडा मार्गदर्शक व राष्ट्रीय धावपटू दत्ता बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. १८ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धा सांगली येथे १७ व १८ सप्टेंबर रोजी, तर १६ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धा २३ व २४ सप्टेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे.

जळगाव येथे झालेल्या या स्पर्धेत जळगावसह धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते. नाशिकमधून आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचा संघही मैदानात उतरला होता. २००० मीटर शर्यतीत प्रबोधिनीचा पवन राखे, ८०० मीटरमध्ये प्रवीण भील, वनिता काटकरी, ४०० मीटरमध्ये उमा मडावी, तर भालाफेकमध्ये सरदार वसावे याने प्रथम क्रमांक मिळविला. याशिवाय कमलेश कनोजा याने १०० मीटरमध्ये तृतीय, २०० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत दुहेरी यशाला गवसणी घातली.

१६ वर्षांखालील वयोगट ः

२००० मीटर शर्यत ः
प्रथम ः पवन राखे (६.४५ मिनिटे), द्वितीय ः कृष्णा खुरकुटे (६.४५), तृतीय ः नवीन वळवी (६.४६)

८०० मीटर ः
प्रथम ः प्रवीण भील (२ः२३ः०९ मिनिटे), द्वितीय ः राजू भोये (२ः३०ः०५).

मुली ः
प्रथम ः वनिता काटकरी (२ः४० मिनिटे)

४०० मीटर ः
तृतीय ः विष्णू तांबडा (१ः०८ मिनिटे)

मुली ः
प्रथम ः उमा मडावी (१ः१४ मिनिटे)

१०० मीटर ः
तृतीय ः कमलेश कनोजा (१२ः०९ सेकंद).

२०० मीटर ः
द्वितीय ः कमलेश कनोजा (२८.०१ सेकंद), तृतीय ः राहुल माढा (२८.०९).

लांब उडी ः
द्वितीय ः प्रवीण खरपडे (५.४४ मीटर), तृतीय ः सुनील पावरा (५.४०).

थाळीफेक ः
द्वितीय ः धर्मेंद्र बागतलवार (२१ः५० मीटर), तृतीय ः समीर राबड (२०.४०)

भालाफेक ः
प्रथम ः सरदार वसावे

१८ वर्षांखालील वयोगट ः

३००० मीटर ः
तृतीय ः धर्मेंद्र परतेती (११ः४० मिनिटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी मंत्र्याकडून ‘त्या’ अधिकाऱ्याचे ‘कल्याण’!

$
0
0

vinod.patil@timesgroup.com
tweet-VinodPatilMT

नाशिकः आदिवासी विभागातील वादग्रस्त अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे धोरण आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही सुरूच ठेवले आहे. आदिवासी महामंडळातील वादग्रस्त नोकरभरतीसह अनुंकपा भरती प्रकरणात निलंबित करण्यात आलेले महामंडळाचे महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांना चौकशीपूर्वीच पुन्हा सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सावरांनीच निलबंनाचे आदेश दिले होते. मात्र, सावरा यांनी आता पलटी खात त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव तपासून नव्याने सादर करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत. विभागीय आयुक्तांकडून नोकरभरती प्रकरणाची चौकशी सुरू असून, खातेनिहाय चौकशीही प्रलंबित आहे. त्यापूर्वीच मांदळेंचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया मंत्र्यांनी सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मांदळेंवरील मंत्र्यांच्या या विशेष मायेमागे दडलंय काय, याची चर्चा सुरू झाली आहे.

आदिवासी विकास महामंडळात झालेल्या नोकरभरतीत तीनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचेच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला होता. चव्हाण यांनी तत्कालीन एमडी बाजीराव जाधव यांच्यासह महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळेंवर थेट आरोप केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची चौकशी सध्या विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडून सुरू आहे. राजकीय व माध्यमांचा दबाव आल्यानंतर मांदळेंसह इतर तीन अधिकाऱ्यांना अनुकंपा नोकरभरतीत गैरव्यवहार केला म्हणून जूनमध्ये निलंबित करण्यात आले होते.

नोकरभरती व अनुंकपा भरतीची चौकशी सुरू असतानाच मांदळे यांनी पुन्हा सेवेत घेण्याचा अर्ज मंत्री विष्णू सावरांकडे केला. महामंडळाच्या ढीगभर फाइल्स उघडूनही न पाहणाऱ्या सावरांनी तत्परता दाखवत मांदळेंच्या अर्जावर तत्काळ त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तपासून नव्याने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांच्या या आदेशामुळे व्यवस्थापकीय संचालकही संभ्रमात सापडले असून, चौकशीपूर्वीच कसा प्रस्ताव ठेवावा, असा पेच त्यांना पडला आहे. मांदळे यांना घेतले तर अन्य निलंबित कर्मचाऱ्यांच्या अर्जाचाही विचार करावा लागणार असल्याने त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. मुळात चौकशी पूर्ण झालेली नसून केवळ मंत्र्यांच्या आदेशानेच कामावर घेतले, तर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनीही या आदेशापासून अंतर राखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कल्याणात दडलंय काय?

आदिवासी विभागातील अनेक निर्णय हे खुद्द सावरांनाही माहीत नसतात. त्याचा प्रत्यय स्वेटर खरेदी प्रकरणात आला आहे. मंत्र्यांच्या अवतीभवती असणारे अधिकारीच अनेकांची भ्रष्टाचारापासून मुक्तता करून स्वतःसह त्या अधिकाऱ्यांचेही कल्याण करत असल्याची चर्चा मंत्रालयापासून प्रकल्प कार्यालयामध्ये आहे. अशा अधिकाऱ्यांवर सावराही माया दाखवत असल्याने त्यातून अनेकांचे कल्याण होत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मंत्र्यांच्या अशा वागणुकीमुळे आदिवासी संघटनांनी हा वाद आता हायकोर्टात नेण्याची तयारी दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजीचा खून करणाऱ्या नातवाचा ‘धिंगाणा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजीचा निर्घृण खून करून स्वतःला पेटवून घेणाऱ्या जखमी संशयिताने मंगळवारी सिव्ह‌िल हॉस्पिटल परिसरात चांगलाच गोंधळ घातला. उपचार करून घेण्यास नकार देणाऱ्या संशयिताने हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरच अ‍ॅम्ब्युलन्सच्या काचा फोडून एकास चावा घेतला. सुरक्षारक्षकांनी बळाचा वापर करीत त्याला दोरीने बांधले. त्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार करण्यात आले.
कैलास भगवान भोये (२२ रा. कोथंबी ता. त्र्यंबकेश्वर) असे संशय‌िताचे नाव आहे. कैलासने सोमवारी मध्यरात्री आपली आई चिम‌िबाई तसेच आईची आई (आजी) या दोघी मायलेकींना बेदम मारहाण केली. कुऱ्हाडीने केलेल्या मारहाणीत आई चिम‌िबाई गंभीर जखमी होऊन बेशुध्द पडली. तर वयोवृध्द आजीवर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दोघीही मायलेकींचा मृत्यू झाल्याचे समजून घाबरलेल्या कैलासने सकाळी स्वतःस पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याच्या घरातून आरडाओरडीसह धुराचा लोट निघू लागल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यास विझविले. यानंतर ही माहिती तत्काळ हरसूल पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ
गाठून जखमी कैलास व त्याची आई चिम‌िबाई यांना उपचारार्थ सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये हलविले. दुपारी तीनच्या सुमारास त्याला पोलिस बंदोबस्तात सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याने हा गोंधळ घातला. प्रवेशद्वारावर थांबलेल्या अ‍ॅम्ब्युलन्समधून डोक्यास गंभीर दुखापत झालेल्या चिम‌िबाईस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, कैलासने उपचार घेण्यास नकार दिला. अ‍ॅम्ब्युलन्स चालक आणि सोबत आलेल्या हरसूल पोलिसांनी त्याला विनंती करूनही तो जुमानत नव्हता. पोलिसांनी त्याला स्ट्रेचरवर बसण्यास सांगितले असता संशयिताने आरडाओरड करीत अ‍ॅम्ब्युलन्समधील सलाइन स्टॅण्ड उचलून वाहनाची तोडफोड केली.
लोखंडी स्टॅण्ड भिरकवल्याने बघ्यांचीही पळापळ झाली.
या घटनेत अ‍ॅम्ब्युलन्सचे मोठे नुकसान झाले. पोलिस चौकीतील पोलिसांनीही त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. या गडबडीत कैलासने अॅम्ब्युलन्स चालकाला चावाही घेतला. पोलिसांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने बळाचा वापर करून त्याचे हात पाय बांधून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तब्बल अर्धा तास हा गोंधळ चालला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला कुत्र्यांचा सात जणांना चावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडमधील जयभवानी रोड परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. जयभवानी रोड आणि जेलरोड येथे प्रत्येकी तीन, तर आरंभ कॉलेजजवळ एक असे एकूण सात जण मंगळवारी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. यापैकी एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर बिटको हास्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आरंभ कॉलेजजवळ कैलास सुतार (वय ४०, साने गुरुजीनगर, जेल रोड) सकाळी अकराच्या सुमारास किराणा दुकानात जात असताना अचानक पांढरे कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात सुतार खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुत्र्याने त्यांच्या तोंडाला, पोटाला, बोटांना व हातांना चावा घेतला. ते गंभीर जखमी झाले असून, बिटको रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर जेलरोडवरील तनिष्क पार्क येथे पाच वर्षीय मुलीला, तसेच वॉचमनचा कुत्र्याने चावा घेतला.

मनमाडला मुलाचा मृत्यू

मनमाड ः येथील प्राध्यापक कॉलनीनजीक खेळत असताना गेटवरून खाली पडल्याने
तेरा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य भीमराज जाधव असे त्याचे नाव आहे. आदित्य बहिणीसोबत खेळत असताना गेटवरून खाली पडला. गेटचा लोखंडी टोकदार रॉड त्याच्या छातीत घुसल्याने त्याचा जागीच अंत झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आदित्यचे वडील वाद्यवादक असून, गणेशोत्सवात ते बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन वीज कनेक्शन २४ तासांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन वीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाइल अ‍ॅपच्या सहाय्याने केवळ २४ तासांत वीज जोडणी देण्यात येणार आहे. राज्यभरातील महावितरणच्या ३६ मंडलांतर्गत ८८ विभागांच्या निवडक कार्यक्षेत्रांचा यात समावेश आहे.

महावितरणने निर्माण केलेल्या अ‍ॅपद्वारे आता ग्राहकसेवेचा नवा मापदंड निर्माण केला आहे. आतापर्यंत राज्यात जुलै २०१६ पासून १ हजार २२८ ग्राहकांना २४ तासांत वीजजोडणी देण्यात आली आहे. आता या योजनेला गती मिळत असून ग्राहकांकडूनही अधिक प्रतिसाद मिळत आहे. ज्या भागात नवीन वीजजोडणीसाठी अतिरिक्त वीजयंत्रणा उभारण्याची गरज नाही, अशा भागातील तब्बल १५० पेक्षा अधिक उपविभागांच्या कार्यक्षेत्रात महावितरणकडून ग्राहकाला २४ तासांत नवीन जोडणी उपलब्ध होणार आहे. याबाबत संबंधित परिमंडल, मंडल, विभाग व उपविभाग, शाखा कार्यालये यांची नावे महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केलेली आहेत.

घरगुती आणि वाणीज्यिक वर्गवारीच्या सिंगल किंवा थ्री फेजच्या नवीन वीजजोडणीसाठी संबंधित ग्राहकाची थकबाकी नसल्यास व दिलेल्या फर्म कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास २४ तासांत संबंधित ग्राहकाला वीजजोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन जोडणीसाठी इंटरनेटवरील www.mahadiscom.in हे संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅपद्वारेही अर्ज स्वीकारणे सुरू आहे. महावितरणने वीजजोडणी देण्याची अंतर्गत कार्यवाही संपूर्णपणे ऑनलाइन करणे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य केलेले आहे. तसेच नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया थेट वीजजोडणीच्या ठिकाणाहूनच करता यावी यासाठी स्वतंत्र मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज प्राप्त होताच त्याबाबत कार्यालयीन, तांत्रिक व अन्य माहितीची नोंद महावितरणच्या प्रणालीत ऑनलाइन करण्याची सोय अभियंता व कर्मचाऱ्यांना या अ‍ॅपद्वारे शक्य झाले आहे.


ग्राहकांना जास्तीत सुविधा मिळाव्यात यासाठी महावितरणने हे पाऊल उचलले आहे. नाशिक, अहमदनगर, मालेगाव या शहरांमध्ये ही सुविधा तातडीने पुरवण्यात येणार आहे. लोकांकडून चागला प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.

- दीपक कुमठेकर, चीफ इंजिनीअर, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीचे व्हिडिओ शूटिंग

$
0
0

धुळे : धुळे शहरासह जिल्ह्यात यंदा ४५० सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांचे विसर्जन आज (दि.१५) होत असून, विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी केली. शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांमध्ये मनपातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी मनपा सहकार्य करणार आहे. मिरवणुकीचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. कोणत्याही भागात भागात कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तालयात दूषित पाणी

$
0
0

महिन्याभरापासून नागरिक त्रस्त

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

गंगापूर रोडवर असणाऱ्या पोलिस मुख्यालयात असलेल्या वसाहतीत पाण्याच्या समस्या उद््भवत आहेत. गेल्या महिन्याभरापासून मुख्यालयाच्या पोलिस वसाहतीत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पिण्याचे पाणीही प्रचंड गढूळ येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पहाटे सव्वा पाच व सायंकाळी पाच वाजता वसाहतीत येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून येत असल्याच दिसून येत आहे.

पोलिस आयुक्तालयाच्या मागे असणाऱ्या पोलिस वसाहतीतील जुन्या दगडी इमारती तसेच चाळींमध्ये ही समस्या भेडसावत आहेत. दूषित पाण्यामुळे अनेकांना साथीच्या आजाराची लागण झाल्याचेही समजते.

गेल्या महिन्याभरापासून महापालिकेच्या पाणी पुरवठ्यात होणाऱ्या या निष्काळजीपणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तुरटी फिरवूनही पाणी स्वच्छ होत नसल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. नगरपालिका प्रशासनाचे यांच्याकडे मात्र साफ दुर्लक्ष होत असून अनेकदा निदर्शनास आणूनही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

स्नेहबंधन पार्क नवीन पोलिस वसाहतीतही गढूळ पाणी येत असल्याची तक्रार केली जात आहे. गेल्या महिन्यापासून अनेकदा पाण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच दोन आठवड्यापासून गढूळ पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफडीएचा दुकानावर छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अन्न औषध प्रशासनाकडे (एफडीए) आलेल्या तक्रारीवरून सातपूरला किरणा दुकानावर छापा टाकत १७८ वनस्पती तुपाची पाकिटे जप्त करण्यात आली. पुनर्परिक्षणासाठी जप्त केलेली ही पाकिटे लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत.

सातपूर गावात राहणाऱ्या एका महिलेला किराणा दुकानातून घेतलेल्या वनस्पती तुपामुळे विषबाधा झाल्याची तक्रार एफडीएकडे करण्यात आली होती. यानंतर सहआयुक्त उदय वंजारी, योगेश बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी भरत इंगळे, उमेश कुंभोजर यांनी सातपूर गावातील किराणा दुकानचालक जयंतीभाई पटेल यांच्या गोडावूनमधून १७८ वनस्पती तुपाची मुदतबाह्य झालेली पाकिटे जप्त केली.

गणपती उत्सवात वनस्पती तुपाची खरेदी एका महिलेने पटेल यांच्या दुकानातून केली होती. यानंतर मुदत संपलेल्या तुपामुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास झाल्याने त्यांनी एफडीएकडे तक्रार दाखल केली. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानावर कारवाई केली असून, जप्त केलेल्या तुपाच्या पाकिटांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आली असल्याचे एफडीएचे अधिकारी इंगळे यांनी मटाशी बोलताना सांगितले.

ब्रेडमध्ये उंदराच्या लेंड्या

नाशिकरोड येथील ओमप्रकाश देवकर यांनी उपनगरच्या बेकरीतून ब्रेड आणले होते. यात बेकरीच्या ब्रेडमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्याने त्यांनी एफडीएकडे तक्रार दाखल केली. सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीसमोरील एका बेकरीत तयार झालेले ब्रेड असल्याचे देवकर यांनी सांगितले. एफडीएने याबाबत तत्काळ दखल घेत संबंधित बेकरी चालकावर कारवाईचा बडगा उगारला. संबंधित बेकरीचालक हा नेहमीच वादग्रस्त असल्याचे अनेकदा कारवाईवरून समोर आले आहे.

रात्रपाळी करून आल्यावर बेकरीच्या दुकानातून ब्रेडचा पाव विकत घेतला होता. घरी गेल्यावर मुलाने ब्रेडचा पुडा फोडल्यावर त्यात उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. संबंधित बेकरीचालकास सांगितल्यावर त्याने मुजोरीची भाषा वापरली. यानंतर एफडीएकडे रितसर तक्रार नोंदवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक जिल्ह्यात सर्व पॅथींचे मेडिकल कॉलेज!

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com

Tweet@jitendratartemt

ना‌शिक : राज्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नागरी आरोग्याचा समतोल साधण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने महत्त्वपूर्ण प्रस्ताव चौथ्या नियोजन आराखड्यात मांडला आहे. या नव्या प्रस्तावानुसार प्रति पाच लाख लोकसंख्येनुसार प्रत्येकी एक मेडिकल कॉलेजची रचना यापुढे प्रस्तावित आहे. यापुढील पाऊल टाकत प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पॅथीचे मेडिकल कॉलेज आता या आराखड्यामुळे प्रस्तावित राहणार आहे.

आरोग्य विद्यापीठाच्या स्थापनेदरम्यानच्या धोरणांनुसार महाराष्ट्राचे तीन प्रमुख विभाग करण्यात आले होते. यात विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीन भागांमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्यात आले होते. यानंतरच्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज यानुसार रचना उभारण्यात आली. आता मात्र भविष्यातील लोकसंख्येच्या गरजेनुसार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक पाच लाख लोकसंख्येमागे एक मेडिकल कॉलेज व प्रत्येक जिल्ह्यात सर्व पॅथीची मेडिकल कॉलेजेस उभारण्याचा प्रस्ताव सन २०१६ ते २०२२ या पाच वर्षांसाठीच्या आराखड्याव्दारे मांडण्यात आला आहे.

विषमता उघड

हा आराखडा तयार करताना विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणात मेडिकल कॉलेजच्या वस्तुस्थितीसंदर्भात काही बाबी अधोरेखित झाल्या आहेत. यानुसार राज्यातील तब्बल १३ जिल्ह्यांमध्ये एकही मेडिकल कॉलेज नाही. १६ जिल्ह्यांमध्ये एकही डेंटल कॉलेज नाही. दहा जिल्ह्यांमध्ये एकही आयुर्वेद, ३० जिल्ह्यांत एकही युनानी, नऊ जिल्ह्यांत एकही होमिओपॅथी, तीन जिल्ह्यांत एकही नर्सिंग, २० जिल्ह्यांत एकही फिजीओथेरपी, ३३ जिल्ह्यांत एकही ऑक्युपेशनल थेरपी आणि ३२ जिल्ह्यांत एकही बीएएसएलपी कॉलेज नाही.

...तर उत्तर महाराष्ट्रात सहा नवे मेडिकल कॉलेजेस

राज्यात मेडिकल कॉलेजेसच्या संख्येत असणारी विषमता दूर करून समतोल साधण्यासाठी नवे तब्बल ४४ मेडिकल कॉलेजेस प्रस्तावित आहेत. पैकी उत्तर महाराष्ट्रासाठी सहा मेडिकल कॉलेजेस प्रस्तावित आहेत. यात नाशिकसाठी एक मेडिकल, एक आयुर्वेदीक आणि एक नर्सिंग कॉलेज, नगर जिल्ह्यासाठी एक होमीओपॅथी, तर एक नर्सिंग कॉलेज आणि जळगावसाठी एक होमिओपॅथी असे एकूण नवीन सहा कॉलेजेस प्रस्तावित आहेत. याप्रमाणे अंमलबजावणी झाल्यास आरोग्य क्षेत्रातील मोठा असमतोल दूर होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नासाका’साठी सर्वपक्षीय ऐक्य

$
0
0

कामगार युनियन, लोकप्रतिनिधींची शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

संचालकांच्या कार्यक्षमतेअभावी सुमारे १०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे. त्यामुळे नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक आर्थिक मदत मिळावी यासाठी शुक्रवारी (दि. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रालयात जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, नासाका कामगार यूनियन व सभासद प्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

या बैठकीस राज्याचे सहकार मंत्रीही हजर राहणार असून नासाकासाठी गेल्या तीन वर्षांत प्रथमच जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदतीस हिरवा कंदील दिल्यास नासाकाच्या चाकांना लागलेली कर्जाची उटी दूर होणार आहे.

गेल्या तीन गळीत हंगामापासून नासाकाची चाके फिरलेली नाहीत. त्यानंतर हा कारखाना सुरू व्हावा यासाठी संचालक मंडळाने कधी रस दाखवला नव्हता. परंतु ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी यांच्या भवितव्याचा भागीदार असलेला नासाका सुरू होणे काळाची गरज लक्षात घेऊन नासाका कामगार युनियन व सभासदांनी नासाका सुरू होण्याकामी वारंवार प्रयत्न सुरूच ठेवले होते. परंतु त्यात अद्याप यश आलेले नव्हते.

यापूर्वी नासाका कामगार युनियनच्या वतीने नासाका चालविण्यास घेण्यासाठी मुंबईतील एका उद्योगपतीलाही साकडे घातले गेले होते. परंतु त्यातही यश मिळाले नव्हते. अखेरीस युनियनने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली थेट सहकार मंत्र्यांपुढे हा प्रश्न मांडला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच निर्णय घेतील असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत नासाकाबाबत मंत्रालयात खास बैठक होत आहे. बैठकीस नासाका कामगार युनियन प्रतिनिधींसह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहून नासाकास राज्य सरकारकडून आर्थिक मदतीसाठी आग्रही मागणी करणार आहेत.


संचालकांचा पोटभरू कारभार भोवला

यापूर्वीच्या व विद्यमान संचालक मंडळाच्या दूरदृष्टिहीन व पोटभरू कारभारामुळे नासाकाच्या साखरेला तब्बल १०० कोटी रुपयांच्या कर्जाचा कडवटपणा प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने थकित कर्जाच्या वसुलीसाठी न्यायालयाची दरवाजे ठोठावली होती. अखेरीस नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व सिन्नर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या साखर कारखान्यांच्या चाकांना कर्जाची उटी लागल्याने ती थांबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निर्विघ्नपणे पार पडलेल्या गणेशोत्सवाला ऐन विसर्जनाच्या दिवशी गालबोट लागू नये, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. डीजे वापराला बंदी असल्याने मंडळांनी मिरवणुकीत डीजेचा वापर कटाक्षाने टाळावा, असे आवाहन पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केले आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याखेरीज विसर्जन घाटांवर अनुचित घटना घडू नये यावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. मिरवणुकीतील वाहने वगळता अन्य खासगी वाहनांना मिरवणुकीच्या मार्गांवर प्रवेश बंद असणार आहे. शहरात नाशिकरोड, सिडको, सातपूर, कॉलेजरोड, गंगापूर रोड, श्रमिकनगर, अबंड या परिसरांमधील सार्वजनिक तसेच घरगुती गणपतींचे त्या परिसरातील जलाशयांमध्ये विसर्जन होणार आहे.

असा असेल बंदोबस्त

पोलिस आयुक्त १, पोलिस उपायुक्त ४, सहायक पोलिस आयुक्त ४, पोलिस निरीक्षक १०, सहायक पोलिस निरीक्षक १७, पोलिस कर्मचारी १६८
शीघ्र कृती दलाच्या तुकड्या ३, राज्य राखीव दल तुकडी २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागरचना प्रसिद्धीपूर्वीच वादात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नव्याने तयार करण्यात आलेली प्रभागरचनेवर भाजपच्या मित्र पक्षानेच आक्षेप घेतल्याने ही रचना प्रसिद्धीपूर्वीच आरोपांच्या फेऱ्यात सापडली आहे. शिवसेनेचे नेते व माजी सभागृह नेते भगवान भोगे यांनी नवीन प्रभागरचना भाजपच्या प्रभावाखाली तयार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी ही रचनाच रद्द करण्याची मागणी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे. भाजपला फायदेशीर अशी प्रभागरचना तयार करण्यात आल्याचा आरोप करत, महापालिकेतील नगररचना विभागातील एका अधिऱ्यावर थेट आरोप केले आहेत.

पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी चार सदस्यीय प्रभागरचना तयार करण्यात आली आहे. ६१ प्रभागांची संख्या कमी होवून ती ३१ प्रभागांवर आली आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कोअरटीमने ही प्रभागरचना तयार केल्यानंतर विभागीय आयुक्त डवले यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने त्यावर शिक्कामोर्तब केले असून, ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली आहे. ही रचना आयोगाकडून येत्या १० ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर हरकती मागविल्या जाणार आहेत. प्रभागरचना निवडणूक आयोगाच्या गाईडलाइन प्रमाणे तयार केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

परंतु, महापालिकेने तयार केलेल्या या रचनेवर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर भोगे यांनी थेट आरोप करत, त्यांच्या हस्तक्षेपाने प्रभागरचना तयार केल्याचा दावा केला आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या कोअर टीममध्ये सानप यांचे नातेवाईक कार्यकारी अधिकारी घुगे यांचा समावेश असून नगररचना विभागातील घुगे यांनी प्रभागांच्या तोडफोडीत मोलाची भूमिका बजावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सानप व घुगे यांचे फोन कॉल्स चेक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सध्या सानप हे प्रभागरचना कशी केली याची बतावणी शहरात करत आहेत, असा आरोपही भोगे यांनी केला आहे.

विशेषतः भाजपचा प्रभाव असलेल्या पंचवटीत प्रभागरचनेची मोडतोड केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपचाच मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्याच नेत्यांनी प्रभागरचनेवर आक्षेप घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून भाजप त्याला काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


छोटे प्रभाग भाजप धार्जिणे
प्रभागांची मोडतोड करतांना, झोपडपट्या एका बाजूला तर भाजपकडे झुकणारे उच्चभ्रू व सवर्ण मतदारांचा एकत्र‌ित प्रभाग तयार करण्यात आला आहे. तसेच छोटे प्रभाग भाजपला कसे फायदेशीर ठरतील या दृष्टीने तयार करण्यात आल्याचेही भोगे यांनी विभागीय आयुक्तांकडील तक्रारीत म्हंटले आहे. विभागीय आयुक्तांनी ही प्रभागरचना तयार करून नव्या टीमद्वारे नवीन प्रभागरचना तयार करण्यात यावी, अशी मागणी भोगे यांनी केली आहे. अन्यथा न्यायालयासह निवडणूक आयोगाकडे जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जनाची जय्यत तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवाची आज (गुरुवारी) सांगता होणार असून, त्यासाठी सार्वजनिक मंडळे सज्ज झाली आहेत. बुधवारी संध्याकाळपासून वाकडीबारव येथे नंबरसाठी गाड्यांच्या रांगा लावण्यात आल्या असून, पोलिसांनीदेखील चोख बंदोबस्त ठेवला आहे.

दहा दिवसांपासून जल्लोषात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज मिरवणुकीने सांगता होणार आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरातील गणपतींचे देखील आज विसर्जन होणार आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी तयारी करण्यात आली आहे. महापालिका आणि पोलिस यंत्रणाही विसर्जन मिरवणुकीसाठी कामाला लागली असून, मिरवणूक शांततेत आणि वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी मंडळांना अनेक अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत.

गेले दहा दिवस गणरायाचा जागर करण्यात येत आहे. विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक मंडळांनी लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचेदेखील आयोजन केले होते. मंडळांनी मिरवणुकीतील ढोल-ताशांचे पथक आणि साहसी खेळ, लेझीम पथके तयार केली आहेत. गुलालवाडी व्यायामशाळेचे लेझीम पथक यंदा पुन्हा सज्ज झाले असून, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय असणार आहे.

अनेक मंडळांची विद्युत रोषणाई असून, त्यांनी रथ सजविण्यास प्रारंभ केला आहे. मिरवणूक मार्गावरील वीजतारा भूमिगत करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावर खड्ड्यांच्या डागडुजीसह अन्य सुविधा देण्याची तयारी केली आहे. मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करण्यात आले आहे. रामकुंडाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने जागोजागी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन व्हावे, यासाठी रासायनिक पावडरचे वितरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अग्निशामक दलाच्या वतीने विसर्जनस्‍थळी जीवरक्षक दल तैनात ठेवण्यात आले आहेत.

गोवर्धन शिवारात विसर्जनास मज्जाव

नाशिक : गोवर्धन शिवारातील गोदापात्र उथळ असल्याने तेथे गणेशमूर्ती विसर्जनाला मज्जाव असणार आहे. गणेशभक्तांनी सोमेश्वर ते रामकुंड परिसरातील गोदापात्रात गणेश विसर्जन करावे, असे आवाहन तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी बुधवारी केले. अनंत चतुर्दशीच्या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार राजश्री आहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीला पोलिस उपविभागीय अधिकारी शामराव वळवी, गंगापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी, गोवर्धनचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते. गेल्या वर्षी गोवर्धन शिवारातील गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आले.

पात्रात फारसे पाणी नसल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. असा प्रकार यंदा पुन्हा घडू नये, यासाठी गंगापूर, गोवर्धन शिवारात तसेच धरणातही गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करण्यात आली आहे. सोमेश्‍वर, बालाजी मंदिर, गंगापूरगाव, गोवर्धन चौफुली, दुगाव चौफुली परिसरात पोलिस बॅरिकेडिंग करणार आहेत. भाविकांनी गणेशमूर्ती दान कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडलेल्या कपाटांसाठी आता अभ्यासगट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने नवीन विकास आराखड्यात फंजीबल एफएसआय दिला तरी, शहरातील प्रलंबित कपाटांचा प्रश्न मार्गी लागणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कपाटांच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी व मार्ग काढण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी क्रेडाई, आर्किटेक्ट असोसिएशन, बिल्डरांचा समावेश असलेला अभ्यासगट तयार केला आहे. अभ्यास गटाच्या निर्मितीमुळे अडीच हजार इमारतींमधील कपाटांचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून निर्माण झालेल्या कपाटांच्या प्रश्नावरून शहरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कपाटांसकट परवानग्या देण्याची प्रथा मोडीत काढत, अवैध बांधकामाला चाप लावला होता. त्यामुळे शहरातील अडीच हजार इमारती या परवानग्याअभावी पडून असून हा वाद शासन दरबारी पोहचला आहे. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखड्यात नऊ मीटर रुंदीखालील रस्त्यांवर फंजीबल एफएसआय लोड करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे यातून काही प्रमाणात कपाटांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परंतु, पूर्ण इमारतींचा प्रश्न सुटणार नाही. जवळपास ४० टक्के इमारतींना तो लागू करता येणार नाही.

उर्वरीत इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्तांनी अभ्यासगट स्थापन केला आहे. त्यात क्रेडाई,आर्किटेक्ट असोसिएशन, बिल्डरांचा समावेश असणार आहे. हा अभ्यासगट इतर पर्यायांचा विचार करून मार्ग काढण्यासंदर्भात पालिकेला अहवाल देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images