Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाकडून अनेकदा जुगार व अवैध देशी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. परंतु कारवाई झाल्यानंतर पुन्हा ते अड्डे टवाळखोरांनी भरलेले असतात. यामुळे यावर कायमस्वरूपी बंदची कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक अवैध दारूचे अड्डे झोपडपट्टी भागात असल्याने पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवावे, अशी मागणीही होत आहे.

एखाद्या व्यवसायाचे परवाने काढताना संबंधित चालकाला अनेक शासकिय कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु अवैधपणे व्यवसाय करणाऱ्यांना मात्र कुठल्याच कागदपत्रांची गरज भासत नाही. त्यामुळे शहरातील अनेक भागात जुगार अड्डे व अवैध देशी दारू मिळण्याचे ठिकाणे गुन्हेगारांच्या हक्काच्या जागा बनल्यात.

फौजदारी करा

शहरातील नाशिकरोड, पंचवटी, जुने नाशिक, नवीन नाशिक सिडको व सातपूर भागातील अड्ड्यांवर कारवाई करायला हवी. यासाठी जागा मालकावरच फौजदारी गुन्हा दाखल का करू नये असा सवालही उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेडिकल फाटा बस स्टॉपवर धोकादायक वाहतूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

औरंगाबाद नाक्याजवळील आडगाव परिसरातील मेडिकल फाटा बस स्टॉपवर कॉलेज सुटण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्यावेळी या ठिकाणी बसेस थांबत नाही. तसेच विद्यार्थ्यांना धावत बस पकडावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. तसेच याचा फटका जेष्ठांनाही बसतो आहे. बसचालक आपल्या मनाप्रमाणे स्टॉपवर बस न थांबवता थोड्या अंतरावर बस थांबवतो. अशात अपघाताचा धोकाही वाढतो. त्यामुळे या बेशिस्त बसचालकांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी करत आहे.

येथील मेडिकल फाटा बस स्टॉपला मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, डी. फार्मसी कॉलेज, डी. एम. एल. टी व वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय येथील रुग्ण, मेट कॉलेजचे विद्यार्थी, स्थानिक नागरिक यांची मोठी वर्दळ या असते. यांना याची झळ पोहचत आहे. येथील बसेस स्टॉपवर थांबत नाही आणि थांबले तरी दूर अंतरावर उभ्या करतात. यासाठी विद्या‌र्थ्यांना धावत बस पकडावी लागते. त्यात विद्यार्थ्यांचा अपघात होण्याची भीती असते. अनेकवेळा तर बस पूर्ण रिकामी असते पण तरीही बस स्टॉपवर थांबत नाही. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने बेशिस्त बस चालकांवर कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमीच्या भिंतीचे काम रोखा

$
0
0

अंबड गावातील नागरिकांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अंबड गावातील स्मशानभूमीला संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असून, या कामाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. या भिंतीचे काम नागरी वस्ती असूनही करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी हे काम रोखण्याबाबतचे निवेदन आमदार सीमा हिरे, मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, महापौर, स्थानिक नगरसेवक यांना दिले.

सर्वे नंबर २६९ चा भूभाग हा रहिवासी क्षेत्रात आहे. मात्र याठिकाणी नाशिक महानगरपालिकेमार्फत अंबड येथील स्मशानभूमीच्या तसेच त्याच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामास सुरुवात केली. पण या कामास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या स्मशानभूमीच्या चारही बाजूस मोठ्या प्रमाणावर नागरिक वस्ती असून याचठिकाणी काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्‍त केले आहे. यात कंम्फर्ट झोन सोसायटी, अंबिका पॅराडाईज, सोहम प्लाझा, यश अपार्टमेंट, माधव रो हाऊस यासह इतर गृहप्रकल्पातील नागरिकांनी प्रस्तावित स्मशानभूमीचे काम त्वरित रद्द करण्याबाबत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना समक्ष भेटून नुकतेच निवेदन दिले.

आमदारांचे आश्वासन

येथील नागरिकांनी या समस्येबाबत आमदार सीमा हिरे यांनाही आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात त्यांनी हे काम बंद करून याठिकाणी बालोद्यान किंवा सांस्कृतिक भवन उभारावे, अशी मागणी केली. या मागणीस आमदार हिरे यांनीसुद्धा अनुकूलता दर्शवत हे काम रद्द करण्यात येईल, असे आश्वासन दिले. नागरिकांचा विरोध असतांनाही हे काम सुरुच राहिले तर याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ जुनी इमारत धूळ खात

$
0
0

एमआयडीसीला मल्टी स्टोअरेज पार्किंग करण्याची उद्योजकांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वाढत्या उद्योग क्षेत्रात उद्योग भवनाची उभारणी केली होती. परंतु एमआयडीसीची जुनी इमारत गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. या पडून असलेल्या इमारतीच्या जागी मल्टी स्टोअरेज पार्किंगची उभारणी एमआयडीसीने करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

नाशिक विभागातील उद्योजकांना एकाच ठिकाणी उद्योगांशी संबंधित शासकिय कामे व्हावीत या हेतूने उद्योग भवनाची उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केली होती. परंतू वाढत्या उद्योग क्षेत्रांमुळे उद्योग भवनात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने वाहने पार्किंगसाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे येथे आपली वाहने रस्त्यावर उभी करण्याची वेळ उद्योजक तसेच कामगारांवर आली आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर या पाच जिल्ह्यातील उद्योगांशी संबंधित उद्योजक व कामगार आयटीआय सिग्नलजवळील उद्योग भवनात येत असतात. यात सातत्याने उद्योजकांची संख्या वाढत असल्याने चारचाकी वाहनांना रस्त्यावर पार्क करण्याची वेळ येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२६ शेतकरी कुटुंब मदतीस अपात्र

$
0
0

आत्महत्याग्रस्त ३७ शेतकरी कुटुंबांना लाभ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी आत्महत्यांचे सत्र काहीसे थांबले असले तरी गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात ६४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यापैकी ३७ शेतकरी कुटुंब मदतीस पात्र ठरले असून, काही शेतकरी आत्महत्या मदतीच्या निकषांत न बसल्याने अशी २६ प्रकरणे जिल्हा प्रशासनाने फेटाळून लावली आहेत.

अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळासारखी निसर्गाची अवकृपा, सावकारी पाश, कर्ज परतफेडीसाठी बँकांकडून सुरू असणारा ससेमिरा यासारख्या अनेक कारणांमुळे शेतकरी स्वत:ची जीवनयात्रा संपवित आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या पीडित कुटुंबाला राज्य सरकारकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाते. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या ६४ घटना घडल्या. त्याबाबतचे अहवाल त्या त्या तालुक्यांमधील तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले. मदतीसाठीचे सरकारी निकष आणि प्राप्त अहवालांची पडताळणी करून जिल्हा प्रशासनाने ३७ प्रस्ताव पात्र, तर २६ प्रस्ताव अपात्र ठरविले आहेत. एका प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

शुक्रवारी (दि. २६) याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत जूनपासूनची १५ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी आठ प्रकरणे मंजूर, तर सहा प्रकरणे नामंजूर करण्यात आली.

मदतीस पात्र ठरलेले शेतकरी कुटुंब

ज्ञानेश्वर शिवराम शिंदे (वय ४२, वनसगाव, ता. निफाड), महेश नामदेव नंदन (वय २७, रा. ताहराबाद, सटाणा), यशवंत यादव पवार (वय ६०, रा. अजमीर सौंदाणे, बागलाण), दत्तू राघो बोरसे (वय ४२, रा. साकोरा, नांदगाव), अजयसिंग रामसिंग देवरे (नांदगाव बु, ता. मालेगाव), रामदास त्र्यंबक मोरे (वय ४२, रा. भेंडी, ता. कळवण), दशरथ त्र्यंबक भोये (वय ४२, रा. दलपतपूर, ता. त्र्यंबकेश्वर), गणेश फकीर बर्डे (वय ३४, रा. म्हेळुसके, दिंडोरी)

अपात्र ठरविण्यात आलेली कुटुंब

बाबाजी रामनाथ जाधव (वय ४०, रा. औरंगपूर, निफाड), शांताराम नथू वाजे (वय ६०, रा. श्रीरामपूर, ता. निफाड), रामा गंगाराम खाने (वय ७०, जातेगाव, ता. त्र्यंबकेश्वर), रामदास शिवाजी गाजरे (वय २३, गाजरवाडी, ता. निफाड), विकास ज्ञानदेव बोरस्ते (वय ३५, रा. साकोरे, निफाड), भरत अशोक शेवाळे (वय ३२, रा. बागलाण)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशीसाठी पोलिस एजंटसह दिल्लीला रवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

देवळाली येथील आर्टिलरी सेंटरमध्ये लष्कराची फसवणूक करून चौघाजणांची बोगस भरती करणाऱ्या राजस्थान रेजिमेंटचा जवान गिरिराज घनशाम चौहाण याचे बिंग फुटले. या प्रकरणाचे पाळेमुळे दिल्लीत असल्याचे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याने अटक केलेल्या एजंटला घेऊन उपनगर पोलिसांचे एक पथक पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहे. या प्रकरणाची व्याप्ती थेट राजधानीत भिडल्याने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केली आहे.

बनावट कागदपत्रे व बनावट शिक्के, लष्करी अधिकाऱ्यांच्या सह्या असलेले कागदपत्रे आर्टिलरी सेंटर येथे प्रशिक्षणात सहभागी चार जवानांनी सादर केल्याचे कागदपत्रे पडताळणीत उघड झाले होते. त्यानंतर आर्टिलरी सेंटरच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादिवरून बलवीर गुजर, सुरेश महंतो, तेजपाल चोपडा व सचिन किशनसिंग या चार जवानांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात 11 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा सर्व प्रकार राजस्थान रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेला जवान गिरिराज घनशाम चौहाण याने दिल्ली स्थित एजंटच्या सहभागातुन केल्याचे पोलिस तपासात उघड झाल्यावर उपनगर पोलिसांनी राजस्थानातील अलवार व दिल्ली येथून टेकचंद सीताराम मेघवाल व मदन मानसिंग या एजंटांना बेडया ठोकून दोन दिवसांपूर्वी नाशकात आणले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-नगरसह आता पर्यटन सर्किट!

$
0
0

नाशिक-नगरसह आता पर्यटन सर्किट!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोणावळा-खंडाळा येथील पर्यटनाचा भार कमी करण्यासाठी मुंबईतील पर्यटकांना आता नाशिक नगरच्या पर्यटन स्थळांकडे वळविण्याचा प्रयत्न पर्यटन विभागाने सुरू केला आहे. मुंबईतील नागरिकांसाठी व येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी नाशिक-नगर पर्यटन डेस्टिनेशन विकसीत केले जाणार आहे. पर्यटन वृद्धीसाठी मुंबई-अहमनगर-नाशिक-मुंबई असे नवे पर्यटन सर्किट साकारणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी येथे दिली. नाशिक व नगरमधील उत्कृष्ट हवामान व पर्यटनस्थळाकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार मार्केटिंग करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पर्यटन आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना रावल यांनी सांगितले, की मुंबईकर पर्यटनासाठी खंडाळा व लोणावळा गाठतात. या ठिकाणी पर्यटकांची खूपच गर्दी होते. परंतु, इगतपूरी, भंडारदरा, त्र्यंबकेश्वरचे हवामान व पर्यटनस्थिती लोणावळा, खंडाळ्यासारखीच आहे. त्यामुळे मुंबईतल्या पर्यटकांसाठी मुंबई, इगतपुरी, भंडारदरा, शिर्डी, शनी शिंगणापूर, नांदूर माध्यमेश्वर, त्र्यंबकेश्वर व परत मुंबई असे पर्यटन सर्किट असावे, अशी सूचना विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केली आहे. त्या सुचनेनुसार हा नवा पर्यटन सर्किट तयार केले जाणार आहे. त्यासाठी दोन रात्री व तीन दिवसाचे एक पॅकेज टूर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपन्याच्या मदतीने तयार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

-

एकच प्लॅटफॉर्मवर परवानग्या

राज्यात पर्यटन स्थळांचा विकास करायचा असेल तर त्यासाठी वेगवगळ्या विभागाच्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यासाठी वर्षानुवर्षे पर्यटन प्रकल्प रखडतात. त्यामुळे पर्यटन मंत्रालयाने पर्यटन स्थळांच्या विकासाठी लागणाऱ्या परवानग्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्याला पर्यटनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्व विभागांची एकत्रित बैठक होणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

-

विमानसेवेसाठी सवलत

पर्यटन वाढीसाठी ओझर एअरपोर्टसह लहान एअरपोर्ट सुरू करण्यासाठी विमानाचे तिकीट अडीच हजार रुपयेच ठेवण्याचा प्रस्ताव आहे. विमानतिकिटावर असलेले विविध कर केंद्र व राज्य सरकार दूर करणार असून, अडीच हजार रुपयांपेक्षा जास्तीचा येणार खर्च हा केंद्र व राज्य सरकार ८०-२० च्या रेषोमध्ये उचलणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ समर्थकांना दे धक्का?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी मंत्री छगन भुजबळ म्हणजेच नाशिकची राष्ट्रवादी हे समीकरण महापालिका व जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोडीत काढण्यासाठी प्रदेश राष्ट्रवादी सरसावली आहे. माजी मंत्री भुजबळांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांच्या संपत्तीची सुरू असलेल्या मोजदादचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वीच पक्षाला संजीवनी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहर व ग्रामीण राष्ट्रवादीची बैठक होत असून पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी २०१७ मध्ये नाशिक महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व पाच नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी सत्तारूढ पक्ष असलेल्या शिवसेना व भाजपने अगोदरच तयारी सुरू केली आहे. मनसेच्या ताब्यातील महापालिका जिंकण्यासाठी शिवसेना व भाजपने ताकद लावली आहे. काँग्रेसनेही पंधरा दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. त्यात महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेना, भाजप, मनसे व काँग्रेसने निवडणुकीची तयारी केली असताना राष्ट्रवादी मात्र जर्जर झाली आहे.

या निवडणुकांसाठी आता आता राष्ट्रवादीही मैदानातही उडी घेणार आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे पक्षाला नाशिकमध्ये मरगळ आली आहे. तसेच या आरोपांमुळे राष्ट्रवादीला डोके काढणेही अवघड झाले आहे. रोजच्याच आरोपांमुळे राष्ट्रवादीची अडचण झाली आहे, तर ग्रामीण व शहर मध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी आहे. भुजबळ समर्थक, पवार समर्थक राष्ट्रवादी अशी नाशिकमध्ये राष्ट्रवादीची ओळख आहे. भुजबळांमध्ये प्रदेश पातळीवर नेतेही नाशिकमध्ये लक्ष घालत नव्हते. पंरतु, आता भुजबळ अडचणी असल्याने नाशिकचे प्रभारीपद जितेंद्र आव्हांडाकडे दिले आहे. त्यांनीही जोर लावला असला तरी त्याला वेग आलेला नाही. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षच नाशिकमध्ये लक्ष घालणार आहे. त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा होत असून शहर व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होणार आहे.

कोणता गट बाजी मारणार

शहर व ग्रामीणच्या नेतृत्त्वाविषयी अनेक तक्रारी आहेत. विशेषतः जिल्ह्यात व शहरात अजित पवार समर्थक व छगन भुजबळ समर्थक अशी पदाधिकाऱ्यांची विभागणी आहे. शरद पवारांना माणणारा स्वतंत्र वर्ग आहे. आतापर्यंत छगन भुजबळांनी पवार समर्थकांना डोके वर काढू दिले नाही. त्यामुळे गजानन शेलार, देविदास पिंगळे, दिलीप बनकरांनी शांत राहणेच पसंद केले आहे. या सर्वांनी ग्रामीण व शहरात नेतृत्वबदलची मागणी केली आहे. त्यावरही या बैठकीत विचार केला जाणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार गट सत्तेत येणार की, भुजबळ गट कायम राहणार याकडे नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये दोघांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वृद्धासह एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. भगवान ऐंशीराम मखमले (वय ६०) आणि दत्तू रामनाथ लोखंडे अशी या व्यक्तींची नावे आहेत.

भगवान ऐशींराम मखमले (६०) या वृद्धाने गळफास घेत आत्महत्या केल्याची बाब शनिवारी रात्री उघडकीस आली. आडगाव शिवारातील महेश पटेल यांच्या बांधकाम साइटवरील वॉचमनच्या शेडमध्ये मखमले यांनी साडीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार जनाबाई आनंदा चौधरी यांच्या लक्षात आला. त्यांनी इतरांना ही माहिती दिल्यानंतर आडगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मखमले यांनी आत्महत्या का केली, याचा तपास आडगाव पोलिस करीत आहेत. दुसऱ्या घटनेत दत्तू रामदास लोखंडे (२८, रा. आगार टाकळी, उपनगर) याने शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नासर्डी गोदावरी संगम रोडवरील लिंबाच्या झाडास गळफास घेतला. लोखंडेच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी महादू रामदास लोंखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमाच्या भावविश्वातले ‘प्लेझंट सरप्राइज’

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

कॉलेज लाइफ जगताना नायकाचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम जडते. पेशाने डॉक्टर झाल्यावर त्याच एकतर्फी प्रेमातील तरुणीचा प्रेमभंग झाल्याने तिची केस नायकाकडे येते. यातून कॉलेजच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात, तर खऱ्या आयुष्यातील प्रेयसीसोबत लग्न ठरूनही नायक पेशंट म्हणून आलेल्या एकतर्फी प्रेमातील तरुणीवर भावतो. या सस्पेन्स कथेतून तरुणाईच्या प्रेमाचं भावविश्व उलगडत गेलं.

कालिदास कलामंदिरात रविवारी (२८ ऑगस्ट) 'प्लेझंट सरप्राइज' नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कल्चर क्लबच्या वतीने वाचकांसाठी सवलतीच्या दरात या नाटकाचे आयोजन केले गेले होते. सर्व स्तरातील रसिकांनी या नाटकाला हजेरी लावली होती. सुयोग आणि अभिनय प्रॉडक्शननिर्मित हे नाटक होते. नाटकातील प्रमुख भूमिकेत सौरभ गोखले, प्राजक्ता माळी, मयुरी देशमुख आणि समीर खांडेकर हे कलाकार होते.

मुलानेच कायम प्रपोज का करावं, असं म्हणत नायकाला त्याची खरी प्रेयसी प्रपोज करते. त्यानंतर काही काळाने त्यांचं लग्न ठरत. नायकाचा कॉलेजचा जिगरी दोस्तदेखील दुबईवरून लग्नास येणार असतो. याच काळात कॉलेज लाइफमध्ये आवडत असलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची केस नायकाकडे येते. यातून त्याच्या आठवणी पुन्हा जागृत होतात. त्या एकतर्फी प्रेमातील प्रेयसीची मानसिक ट्रीटमेंट करताना नायक आपल्या खऱ्या प्रेयसीकडे दुर्लक्ष करू लागतो. सायको ड्रामा थेरपीद्वारे नायक त्या पेशंट तरुणीला डिप्रेशनमधून बाहेर काढतो. या वेळी नायकाचा मित्र त्याच्या खऱ्या प्रेयसीला नायकाच्या कॉलेजच्या प्रेमाचे किस्से सांगतो अन् यातून पुढे खरी तरुणी आणि नायकात गैरसमज होत त्यातून योग्य मार्ग निघत होणाऱ्या सस्पेन्स लव्ह स्टोरीतून नाटकाचा शेवट होतो. सस्पेन्स असलेल्या या 'प्लेझंट सरप्राइज'ने रसिकांना चांगलेच खिळवून ठेवले होते. कॉलेजियन्सच्या लाइफमध्ये प्रेमातून होणाऱ्या घटनांवर नाट्य भाष्य करणारे होते. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून, निर्माते संदेश भट व अभिजित भोसले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीचे नाव धम्मगिरीनगर करा

$
0
0

दलित मुस्लिम क्रांती मंचची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी शहराचे नाव धम्मगिरीनगर करावे, अशी मागणी दलित मुस्लिम क्रांती मंचने केली आहे. याबाबतचे निवेदन मंचाकडून नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

विपश्यना साधना ही देशातील प्राचीन ध्यानधारणा विद्या आहे. मानसिक शांती प्राप्तीसाठी प्राचीन काळात ऋषी, मुनी या साधनेचा निरंतर अभ्यास करीत असत. यामूळे मानवी मनातील षडरिपू नाहीसे होत असून मनुष्य नैतिकतेच्या मार्गावर चालू लागतो. विपश्यना साधनेला वैज्ञानिक दृष्टीकोनही सर्वमान्य झाल्याने मानवी जीवनाच्या कल्याणार्थ कल्याणमित्र सत्यनारायण गोएंका गुरूजी यांनी इगतपुरीत जागतिक किर्तीचे विपश्यना विश्व विद्यापीठ धम्मगिरी स्थापित केले.

या शहराची ऐतिहासिक दखल कायमस्वरुपी राहावी यासाठी त्याचे नाव धम्मगिरीनगर असे करावे, अशी मागणी शाम गायकवाड, आशिष तेजाळे, रवी गांगुर्डे, मुन्नी पठाण, धर्मराज चव्हाण आदींनी केली.

जगभरात ओळख

जगभरातून हजारो लोक हा विधी आत्मसात करण्यासाठी इगतपुरी येथे येत असतात. त्यामुळे इगतपुरी शहर जागतिक नकाशावर ओळखले जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिलेल्या निवेदनात क्रांती मंचाने म्हटले आहे. इगतपुरीच्या या विपश्यना विश्व विद्यापीठाचे भारतात आणि परदेशात १७४ सेंटर्स कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ताशोध परीक्षेत ‘केटीएचएम’ची बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मविप्रच्या वतीने संस्था स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या गुणवत्ताशोध व विकास परीक्षेत केटीएचएम कॉलेजने बाजी मारली आहे. जानेवारी २०१६ मध्ये ही परीक्षा झाली. यातून पाच विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाते. यंदा पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये केटीएचमच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

संस्थेत दुसरा व केटीएचएममध्ये प्रथम आलेला आकाश दिलीप चव्हाण अंध विद्यार्थी आहे, तसेच देविदास कचरू गोडसे, शर्वरी संजय वाघ, अनिकेत माधव शिंदे, अश्विन विलास जोर्वेकर यांनी यश मिळविले.

परीक्षेची तयारी करण्यासाठी संस्थेकडून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने, परिसंवाद आयोजित केले जातात, तसेच ओएमआर पद्धतीने परीक्षा घेतली जाते. अत्यंत नाममात्र शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करतात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हे उद्दिष्ट या परीक्षेमागे ठेवण्यात आले आहे. प्रा. संजय भगवंतराव पाटील स्पर्धा परीक्षाप्रमुख आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोट क्लबचा धरणाला धोका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणावरील प्रस्तावित बोट क्लब सुरू करण्याचा प्रशासनाचा घाट आहे. मात्र, त्यामुळे पाणी प्रदूषित होण्याबरोबरच धरणाला धोका निर्माण होणार आहे, असा आक्षेप नोंदवून निर्मल गोदा अभियान, मानव उत्थान मंच, गिव्ह, मी नाशिककर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात, करमणुकीसाठी बोट क्लब सुरू करण्याला आमचा विरोध आहे. बोट क्लबमुळे गंगापूर धरणातील पाणी प्रदूषित होण्याचा मोठा धोका आहे. हे धरण मातीचे धरण असून, बोट क्लबमुळे अपघात झाल्यास धरणाचे नुकसान होऊन जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. तसेच काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी बोट क्लब सुरू करण्याचा जो प्रयत्न होत आहे, ती मूळ जमीनमालकांची फसवणूक आहे, असेही यात नमूद केले आहे.

एकीकडे बोट क्लब करण्याचा घाट सुरू आहे. दुसरीकडे शहराची प्रमुख ओळख असलेली गोदावरी नदी आज प्रचंड प्रदूषित आहे. बोट क्लबसारखे प्रकल्प प्रदूषणात भर घालणारे आहेत. जे प्रशासन गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करू शकत नाही तेच बोट क्लब सुरू करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनएलला वेगाने धावण्याची गरज

$
0
0

समितीच्या बैठकीत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी मोबाइल फोन कंपन्यांच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर बीएसएनएलला वेगाने धावण्याची गरज आहे. आज अनेक मोबाइल, फोन नेटवर्क कंपन्या कमी किमतीत अधिक सुविधा पुरवित आहेत. त्यामुळे साहजिकच ग्राहकांचा कल त्यांच्याकडे वाढत आहे. तर दुसरीकडे बीएसएनएलच्या रेंजबाबत ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी बीएसएनएलने प्रभावी भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत दूरसंचार सल्लागार समितीचे सहअध्यक्ष व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

बीएसएनएल भवनमध्ये दूरसंचार सल्लागार समितीची चौथी बैठक शनिवारी (दि. २७) पार पडली. यावेळी आपली भूमिका मांडताना चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यातून तालुक्याकडे प्रवास करतानाही अनेकदा नेटवर्क मिळत नसल्याची समस्या जाणवते. डोंगराळ भागात तर ही समस्या फारच मोठी आहे. बीएसएनएलमध्ये कर्मचाऱ्यांचा, साधनांचा तुटवडा यामुळे या समस्या लवकरात लवकर मार्गी लागत नसल्याचे दिसते. या समस्या सोडविण्यासाठी बीएसएनएलनी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा स्पर्धेत टिकणे अवघड होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बीएसएनएल नाशिकचे महाप्रबंधक सुरेशबाबू प्रजापती यांनी बैठकीत मांडण्यात आलेल्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, बीएसएनएलला सरकारकडून कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे सर्व समस्या सोडविण्यावर काही बंधने आहेत. मात्र, परिस्थिती सुधारत आहे. खेडेगावांपर्यंत बीएसएनएलचा लाभ कोणत्याही त्रुटींशिवाय घेता यावा, यासाठी नवनवीन योजना येत आहे, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. तसेच थ्रीजी टॉवर न मिळणे, कव्हरेज एरिया कमी असणे, नेटवर्क नसणे आदी प्रश्नांवरही प्रजापति यांनी उत्तरे देत सदस्यांचे समाधान केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, बीएसएनएलचे अधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.

आदिवासींना सुविधा केव्हा?

या बैठकीत, काही सदस्यांनी हरसूलसारख्या इतर आदिवासी गावांमध्ये बीएसएनएलची सुविधा चांगली नाही, असा आरोप केला. तसेच या भागातील सेवेबाबात आपली नाराजी व्यक्त केली. या भागात सुविधा का देता येत नाहीत, असाही सवाल त्यांनी विचारला. त्यामुळे या पट्ट्यांत काही सुविधा मिळत नसतील तर शहराच्या प्रगतीचे आम्ही काय करू? वर्षानुवर्षे ही परिस्थिती बदलत नसेल तरी या कंपन्यांवर आम्ही का विश्वास ठेवावा, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.


'फोर-जी'साठी प्रयत्न

नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील ग्राहकांना फोर-जी नेटवर्कचा लाभ मिळावा, यासाठी बीएसएनएल प्रयत्नशील आहे. ग्राहकांना 'फोर-जी'ची इन हाऊस सर्व्हिस देण्याचा विचार आहे. येत्या काळात बीएसएनएलचे देशभरात चार हजार नवीन टॉवर्स येणार आहेत. त्यापैकी काही टॉवर्स हे 'फोर-जी'चे असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगजागृतीसह दंडात्मक कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पादचारी व्यक्तींसाठी उपयुक्त असलेल्या झेब्रा क्रॉसिंगवर वाहनधारकांचे अति​क्रमण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने प्रबोधनासह दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जुना गंगापूर नाका येथील ट्रॅफिक सिग्नलवर रविवारी ही कारवाई सुरू असल्याचे दिसून आले.

झेब्रा क्रॉसिंग नियमांचे शहरातील सर्वच सिग्नलवर सर्रास उल्लंघन होते. सिग्नलवर पादचारी नागरिकांना अगदी जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. पोलिस असल्यास वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगचे नियम पाळतात. पोलिसांची पाठ फिरल्यानंतर मात्र परिस्थिती बिकट होते. झेब्रा क्रॉसिंगच्या नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी शहर पोलिसांनी सिग्नलवर बोर्डदेखील लावले आहेत. झेब्रा क्रॉसिंगवर स्टॉप लाइन असते. या लाइनच्या पुढे वाहन गेल्यास दंडात्मक कारवाई होते. शहर वाहतूक शाखेच्या सरकारवाडा विभागाचे पोलिस निरीक्षक गुरुनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी झेब्रा क्रॉसिंगचा नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली.

सरकारवाडा डिव्हिजनअंतर्गत आठ सिग्नल्स असून, या सर्वच ठिकाणी अशा स्वरूपाची कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. झेब्रा क्रॉसिंग नियमांचे काटेकोर पालन झाल्यास वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागते. झेब्रा क्रॉसिंग, लेन कटिंग अशा साध्या, पण अत्यावश्यक नियमांकडे वाहनधारक दुर्लक्ष करतात. त्यातून छोटे-मोठे अपघात होण्याचादेखील धोका असून, सुशिक्षित वाहनचालकांनी तरी किमान हे नियम पाळण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत वाहतूक पोलिसांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या निवडणुका सेनापतीविना लढू!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

२००४ मध्ये पक्षाचे नेते शरद पवार आजारी असताना आम्ही सेनापतीविना निवडणुका लढवून यश मिळवले. आता नाशिक जिल्हाही त्याच फेसमध्ये आहे. त्यामुळे येथील जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका सेनापतीविनाच आम्ही लढणार, असे संकेत देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका मांडली.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भवनात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी तटकरे आले होते. भुजबळ अटकेत असल्यामुळे जिल्ह्यात सेनापती कोण असेल, या प्रश्नावर ते बोलत होते. ते म्हणाले, की पक्षाचे नेते छगन भुजबळ कायदेशीर प्रक्रियेमुळे दूर असले तरी कामाला गती देऊन पक्ष चांगली कामगिरी बजावेल. पंधरा वर्षे पक्ष सत्तेत होता. त्यानंतर छगन भुजबळांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली, चलबिचल झाली हे खरे असले तरी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व पक्ष मजबूत करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ही मरगळ दूर झाली आहे. आज मी आलो. यापुढे पक्षाचे नेते अजित पवार, धनजंय मुंडे, जयंत पाटील हे सर्व नेते नाशिकला येतील. जिल्ह्यात पक्षाची भक्कम विचारांची फौज उभारण्याचे काम सुरू असून, त्यातूनच आगामी निवडणुका जिंकू, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जाणार असून, काँग्रेससह समविचारी पक्षांबरोबर स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे आज जिल्हा मेळाव्यात निवडणुकीच्या प्रक्रियेचा एक अंक पूर्ण केला आहे. दुसरा अंक पुढे होईल, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष आमदार जयंत जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयश्री चुंबळे, सचिन पिंगळे, अर्जुन टिळे, अंबादास खैरे, प्रियंका बलकवडे, रंजन ठाकरे, सुनील वाजे, विष्णुपंत म्हैसधुणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षांतर करणाऱ्यांवर कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षांतर केले असले तरी त्यांचे सदस्यत्व रद्द केले नाही व त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही, या प्रश्नावर तटकरे म्हणाले, की पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जर अधिकृत पक्षांतर केले असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल. त्याबाबत कोणतीच तडजोड केली जाणार नाही.

पदाधिकाऱ्यांत बदल नाही

राजकीय पक्षात नेतृत्वबदल ही प्रक्रिया नेहमी चालते; पण असे कोणतेही बदल नाशिक व जिल्ह्यात नाही असे सांगत त्यांनी नेतृत्वबदलाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड येथे बसचालकाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुचाकीवरील तीन जणांनी कारण नसताना बसचालक, तसेच वाहकास मारहाण केल्याची घटना बिटको पॉइंट परिसरात शनिवारी सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी बसचालक सुभाष विठ्ठल कुटे यांनी फिर्याद दिली. बेलतगव्हाण येथे राहणारे बसचालक कुटे शनिवारी नेहमीप्रमाणे नाशिकरोड येथे बस घेऊन निघाले होते. मात्र, बिटको पॉइंट येथे दुचाकीवर (एमएच १५/ ईसी ५८४१) ट्रिपलशीट आलेल्या संशयितांनी कारण नसताना कुटे यांना बस थांबवण्यास भाग पाडले. यानंतर संशयितांनी कुटे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्यस्थी करणारे बस वाहक गोरख पगारे यांनादेखील संशयितांनी बेदम मारहाण केली. गर्दी जमा झाल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पंचवटीत दिवसा घरफोडी

पंचवटीतील मेरी लिंक रोडवरील कालिकानगर रो हाऊस येथे भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी रवींद्र काशिनाथ नेरकर यांनी पंचवटी पोलिसांकडे फिर्याद दिली. नेरकर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान घराबाहेर गेले असता चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील ४० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. भरदिवसा घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद आहे.

वाइन शॉप फोडण्याचा प्रयत्न

नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरातील मेट्रो वाइन्स शॉप फोडण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केला. मात्र, चोरट्यांचा प्रयत्न फसला. संतोष अंबादास ननावरे (रा. मखमलाबाद) यांनी या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांकडे तक्रार दिली. फिर्यादीनुसार शनिवारी पहाटे १ ते अडीच वाजेच्या सुमारास एमएम १५/ ईएच ३२१६ या क्रमांकाच्या रिक्षातून दोन संशयित वाइन शॉप येथे आले. त्यांनी वाइन शॉपचे शटर उचकटून दुकानाच्या आतील शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. नाशिकरोड पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

बनावट दस्तावेजाने फसवणूक

बनावट दस्तावेज तयार करून तीन जणांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये एका वकिलासह दहा जणांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोका मार्ग परिसरातील वरदविनायकनगर येथे राहणारे आनंद तानाजी भालेराव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. भालेराव यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी तानाजी रंगनाथ भालेराव, सिंधू तानाजी भालेराव, आसित तानाजी भालेराव, हेमंत तानाजी भालेराव, दिगंबर रंगनाथ भालेराव, राजेश साळुंखे, संजय संघपाळ, अॅड. संतोष भास्कर शेट्टी, अशोक संतू रुमणे, तसेच अॅड. आनंद खैरनार यांनी संगनमत करून फिर्यादी आनंद भालेराव, त्यांचे भाऊ राजेश आणि बहीण रूपाली यांची फसवणूक केली. फिर्यादींना आर्थिक फटका बसावा यासाठी देवळाली शिवारातील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जनरल मुखत्यारपत्र/ खरेदीखत बिल्डरने घेतलेला टीडीआर याबाबतचे खोटे दस्तावेज तयार करून फिर्यादी व त्यांच्या भांवडांऐवजी दुसऱ्याच व्यक्तींना उभे करून फिर्यादींच्या मालकीची मालमत्ता महापालिकेस विक्री केली. ही माहिती समजल्यानंतर आनंद भालेराव यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक शेलकर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासाका प्रश्न हायजॅक

$
0
0

कामगार युनियनचा आरोप; सहकार राज्यमंत्र्यांसोबत आज बैठक

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या व गेल्या तीन गळीत हंगामांपासून कर्जाच्या परतफेडीअभावी नाशिक सहकारी साखर कारखान्याची चाके बंद आहेत. ती पुन्हा सुरू होण्यासाठी गेल्या वर्षभरापासून कामगार युनियनचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सहकार राज्यमंत्र्यांकडे बैठकीचेही ठरविण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे काही राजकीय मंडळींनी याप्रश्नी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून हा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे समोर आले आहे.

सतरा हजार सभासद संख्या असलेल्या या कारखान्यावर आजमितीस सुमारे १०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. संचालक मंडळालाही या कर्जाचा डोंगर कारखान्याच्या डोक्यावरून उतरविण्यात अपयश आल्याने शेवटी हा कारखाना आता अवसायनात निघण्याच्या उंबरठ्यावर येवून पोहचला आहे. या विषयीचे निर्वाणीचे आदेशही यापूर्वीच अहमदनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिलेले आहेत. परंतु कारखाना कामगार युनियन व काही माजी पदाधिकाऱ्यांनी कारखाना आजपर्यंत अवसायनात काढण्यापासून वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत.

कारखाना कामगार युनियनच्या वतीने नासाका भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठीही जोरदार प्रयत्न केलेले आहेत. रानवड साखर कारखान्याप्रमाणे नासाका एखाद्या उद्योजकाने चालविण्यास घ्यावा, यासाठी कामगार युनियन व सभासदांनी आतापर्यंत अथक प्रयत्न केलेत. येत्या डिसेंबरपर्यंत नासाका सुरू करण्यासाठी कामगार युनियन, सभासद, जिल्हा बॅंक यांच्या प्रतिनिधींनी नगरच्या साखर सहसंचालकांना विनंती करून कारखान्याची जप्ती टाळली आहे. त्यानंतर स्थानिक आमदारांच्या माध्यमातून येत्या २९ ऑगस्टला मंत्रालयात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत नासाका सुरू करणेकामी महत्वाची बैठकही निश्चित झालेली होती.

मात्र असे असुनही काही राजकीय मंडळींना नासाकाचे ऐनवेळी स्मरण झाले. त्यावर त्यांनी याप्रश्नी नुकतेच थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणासारखे आंदोलन केले. त्यामुळे कामगार युनियनचे आतापर्यंतचे नासाका बचावचे आंदोलन राजकीय मंडळींकडून हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयसिसचे आता आशिया लक्ष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयसिस या दहशतवादी संघटनेचे लक्ष्य युरोप होते. मात्र, युरोपमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी आशिया खंडाला लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला असून, अशा दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारतीय राष्ट्रवादासारखी काऊंटर विचारव्यवस्था प्रबळ करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक डॉ. श्रीकांत परांजपे यांनी रविवारी केले.

ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यासाचा सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे आयोजित 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात ते बोलत होते. गंगापूर रोडवरील कूर्तकोटी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम आणि ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर उपस्थित होते. 'आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि त्याचे भारतावरील परिणाम' या विषयावरील पुष्प गुंफताना डॉ. परांजपे म्हणाले, की युरोपीय देशांना आयसिसने पूर्वी लक्ष्य केले होते. मात्र, तेथे मनसुबे पूर्ण करण्यास त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. आशिया खंडातील देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणे शक्य असल्याचा विश्वास आयसिसला असल्यानेच त्यांनी आशिया खंडाकडे मोर्चा वळविला आहे. विशेष म्हणजे येथे कारवाया करताना त्यांनी कार्यपद्धतीदेखील बदलल्याचे इस्तंबूल आणि ढाका येथे झालेल्या हल्ल्यांवरून स्पष्ट झाले आहे. स्थानिक दहशतवादी प्रवृत्तींनी दहशतवादी हल्ला केला तरी तो आपणच केला, असा कांगावा आयसिस करू लागली आहे. यामुळे स्थानिक दहशतवादी प्रवृत्तींना आपली प्रतिमा जगात आयसिसइतकीच मोठी झाल्याचे वाटू लागते, तर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने आयसिसलाही फारसे कष्ट न घेता जगभरात आपली दहशत निर्माण करता येते. अशा प्रवृत्तींना शह देण्यासाठी काऊंटर आयडियाज उभी करण्याची आवश्यकता असल्याचे परांजपे या वेळी म्हणाले.

काश्मीर प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले, की पूर्वीची दहशतवादी कृत्ये ही श्रीनगरमधील लाल चौकापर्यंत मर्यादित असायची. मात्र, सबंध काश्मीर त्यामुळे दहशतीखाली असल्याचे रूप त्याला माध्यमांकडून दिले जात असे. मात्र, आता काश्मीरमधील खेड्यापाड्यांत असा दहशतवाद पसरू लागला आहे. स्थानिक पातळीवरील अशी कृत्ये हाताळणे आम्हाला सहज शक्य असून, त्यासाठी तसे अधिकार द्यावेत, अशी काश्मीरमधील पोलिसांची मागणी आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्ती पोलिसांऐवजी लष्करावर अधिक विश्वास टाकत असल्याचे परांजपे या वेळी म्हणाले.

दुर्दैवाने आपल्या सर्वच पिढ्यांना नर्मदेच्या उत्तरेकडीलच इतिहास शिकविला जातो. काश्मीरसह पूर्वेकडील इतिहासही शिकविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वसंत खैरनार यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोन नाकारल्यास बँकांवर होणार कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेरोजगार तरुण तसेच छोट्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी 'मुद्रा' योजनेद्वारे बँकांनी भांडवल उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. मात्र, काही बँका बेरोजगारांना कर्ज देण्याऐवजी त्यांना पिटाळून लावत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहेत. अशा बँकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन. बी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये मुद्रा योजनेच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेता. छोट्या व्यावसायिक तसेच बरोजगारांना कर्जपुरवठा करुन जगण्यासाठी बळ देता यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना कार्यान्वित केली. अशा गरजू घटकांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेला देण्यात आले आहेत. योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकानी शिशूकर्ज ५० हजार रुपयांपर्यंत, किशोर कर्ज ५० हजार ते ५ लाखांपर्यंत व तरुण कर्ज ५ ते १० लाखांपर्यंत उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. बेरोजगार तसेच छोट्या व्यावसायिकांना पाठबळ देणारा हा उपक्रम स्तुत्य असला तरी त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी प्रधानमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचा उद्योग सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या.

याची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. कर्ज नाकारणे किंवा कोठा संपला आहे अशी उत्तरे देऊन बँका नागरीकांची दिशाभूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. यापुढे अशा तक्रारी प्राप्त झाल्या तर संबंधित बँकेविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिल्याने बँक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मुद्राची कर्ज प्रकरणे तत्काळ मंजूर करा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images