Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘मनमाड-इंदूर’साठी निधी

0
0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरेंची संयुक्त बैठक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव, धुळे लोकसभा मतदारसंघ आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाला आता मूर्तरूप प्राप्त होणार आहे. या मार्गावरून रेल्वे धावायला लागणाऱ्या सर्व मंजुरी, प्राथमिक गरजा, आवश्यक निधीची तरतूद पूर्ण झाली आहे. या रेल्वेमार्गासाठी लागणारा निधी देण्याचे प्रत्यक्ष आदेश केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

रेल्वे अर्थसंकल्प २०१६ मध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाची घोषणा केली होती. मात्र केवळ अर्थसंकल्पीय मंजुरी मिळवून या प्रकल्पाचे काम जलदगतीने मार्गी लागावे, यासाठी राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी प्रयत्न सुरू केले होते. मागीलवर्षी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. भामरे यांना या प्रकल्पास परिवहन मंत्रालयाकडून शक्य मदत केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवारी, (दि. ३) रोजी केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी नुकतीच एक बैठक पार पडली. बैठकीत नितीन गडकरी, सुभाष भामरे यांच्यासह परिवहन मंत्रालयातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत परिवहन मंत्रालयाच्या वतीने रेल्वेमार्गाचे महत्त्व विषद करणारे २० मिनिटाचे पॉवरपॉइंट सादरीकरण दाखविण्यात आले. हा रेल्वेमार्ग जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टसाठीही फायदेशीर आहे व दळणवळणाच्या दृष्टीने हा कार्यान्वित झाल्यास मोठा फायदा परिवहन मंत्रालयाला होऊ शकतो, असे राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी यावेळी लक्षात आणून दिले.


प्रत्यक्ष मूर्तरूप येण्यास चालना

यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे परिवहन मंत्रालयाकडून सर्वोतपरी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना पुढील रूपरेषा ठरविण्याचा आदेश दिला. त्या अनुषंगाने रेल्वे मंत्रालय व परिवहन मंत्रालय यांच्यात Memorandum of Understanding (MOU) तयार करण्यात येऊन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. यामुळे या रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष मूर्तरूप येण्यास चालना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदापार्ककडे महापालिकेची पाठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, गंगापूररोड

गोदावरीला आलेल्या महापुराने अनेक ठिकाणी दैना उडविली असून, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कचीही वाताहत झाली आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या पाहणीनंतर गोदापार्ककडे महापालिकेने, तसेच ज्या रिलायन्स कंपनीने गोदापार्कचे सुशोभीकरण केले त्यांनीदेखील दुर्लक्ष केल्याने लाखो रुपयांच्या वस्तू येथे पडून आहेत. चोरट्यांनी या वस्तू गायब करण्याअगोदर महापालिका व रिलायन्सने याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पावसाने यंदा जोरदार हजेरी लावल्याने गोदावरी, नंदिनी व दारणासह अन्य नद्या-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्यांना पुराचा मोठा फटका बसला. यामध्ये गोदापार्कचाही समावेश आहे. रिलायन्सच्या माध्यमातून आसाराम बापू पुलाला लागून तयार केलेल्या गोदापार्कचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले होते. परंतु, गोदावरीला आलेल्या महापराने ठाकरे यांच्या स्वप्नातील गोदापार्क वाहून गेला आहे. विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गोदापार्ककडे महापालिका व रिलायन्सने चक्क दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे साहित्य येथे पडून आहे. चोरट्यांनी या वस्तू गायब करण्याअगोदर महापालिका व रिलायन्सने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


गोदावरी नदीकिनारी फेरफटका मारण्यासाठी मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी सुंदर अशा गोदापार्कची निर्मिती केली होती. परंतु, महापुरामुळे गोदापार्क वाहून गेला आहे. येथे लाखो रुपयांच्या वस्तू पडून असल्याने महापालिका व रिलायन्सने लक्ष देण्याची गरज आहे.

-भूषण कन्सारा, पर्यटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्र आणि प्रसृतीकरणात हवी सांगड

0
0

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

परंपरेच्या नावाखाली अंधपणाने शिकविण्याचे काम करायला नको, या मताची मी आहे. आमच्या काळी गुरूंनी विचारतादेखील येत नव्हते, की काय शिकवित आहात. मात्र आजकालच्या शिष्यांचे त्याकडे पूर्णपणे लक्ष असते, ते गुरूंना तसे विचारतातही. त्यामुळे गुरूंच्या शिकविण्यात व शिष्याच्या शिकण्यात स्पष्टपणा येतो. शास्त्र आणि प्रसृतीकरण यात सांगड हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी केले.

ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमाचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. या कार्यक्रमाचे १७ वे वर्ष आहे.

डॉ. अत्रे पुढे म्हणाल्या, कोणतीही कला शिकविणाऱ्या गुरूंनी आपण शिष्याला काय शिकवतोय याचा विचार करायला हवा. परंपरेच्या नावाखाली आपण अंधपणाने शिकवत तर नाही ना याचा विचार केल्यास अधिक स्पष्टपणा येईल.

आईने शिकायला घेतलेली संवादिनी पुढे आपली मैत्रीण झाली. पुढे सुरेशबाबूंकडे सहा वर्षे गाणे शिकले. त्यांच्यानंतर त्यांच्या उंचीचा गुरू भेटलाच नाही. त्यानंतर माझा प्रवास एकलव्याचा झाला. माझा स्वभाव गाण्यासाठीच होता हे मला कळल्याने मी त्यातच करिअर केले. संगीतातून स्पष्ट होता येते. परंतु, त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तो सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असल्याने मी लिहायलाही शिकले, मी पुस्तके लिहू लागले. त्यातून अधिक स्पष्टपणा येत गेला, असेही डॉ. अत्रे म्हणाल्या. संगीताविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, सुरांची भाषा प्रत्येकाला कळत नाही. संगीत अमूर्त असते. ते ज्या ईश्वरापर्यंत घेऊन जाते तोदेखील अमूर्तच आहे. त्याला भेटणे जितके कठीण आहे तितकेच ही कला समजून घेणे कठीण असल्याचे अत्रे म्हणाल्या. काहींना गायन आवडते, परंतु गायन समजून घेऊन आवडणे ही अवस्था महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या डॉ. चेतना बनावत यांनी मारूबिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना' ही बंदिश कार्यक्रमात ऐकवली. तबल्यावर सुजीत काळे होते. मुलाखत राजा पुंडलिक यांनी खुमासदार बनवली. सूत्रसंचालन वसंत खैरनार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उरले शेवटचे दोन दिवस

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत' 'मटा श्रावणक्वीन' स्पर्धा पॉवर्ड बाय 'आयुर्वेदा थेरपीज'मध्ये सहभागासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. या स्पर्धेचा नाशिकमधील एलिमिनेशन राऊंड गुरुवारी (११ ऑगस्ट) होणार आहे. सोमवार (८ ऑगस्ट) ही नावनोंदणीची शेवटची तारीख आहे. यानंतर स्पर्धेसाठी नावनोंदणी करता येणार नाही. त्यामुळे आजच आपले नाव नोंदवा आणि या संधीचं सोनं करा. या कार्यक्रमासाठी 'िऱ्हदम म्युझिक' हे म्युझिक पार्टनर, 'द एमराल्ड पार्क हॉटेल' व्हेन्यू पार्टनर, 'उपाध्ये क्लासेस' नॉलेज पार्टनर, तर 'व्हीएलसीसी' स्टाइल पार्टनर आहेत. ज्यांनी वेबसाइटवर नोदनोंदणी केली आहे, मात्र फोनवर नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी आजच फोनवरही नावनोंदणी करायची आहे.

नावनोंदणीसाठी...

फोन ः ०२५३-६६३७९८७
वेळ ः सकाळी ११ ते सायं. ५.

ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी...

http://www.mtshravanqueen.com या वेबसाइटला भेट द्या

मिळाला उत्तम प्लॅटफॉर्म

श्रावणक्वीन हे तरुणींसाठी उत्तम व्यासपीठ आहे. यामधून तुम्हाला तुमची स्वप्नं पूर्ण करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर स्वतःमध्ये बदल घडविण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा नक्कीच फायदा होतो. 'श्रावणक्वीन'नंतर मला मिळालेल्या संधी आणि त्यामधून माझ्यात घडत गेलेला बदल खूप महत्त्वाचा आहे. 'श्रावणक्वीन'मुळे तुमचंही जीवन नक्कीच बदलू शकेल.
- नेहा तावडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ विद्यार्थ्यांना मिळाले शैक्षणिक बळ

0
0

'मटा हेल्पलाइन' उपक्रमातून सन्मानाने घेताहेत शिक्षण; दानशुरांना मदतीसाठी आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २०११ पासून सुरू झालेल्या 'मटा हेल्पलाइन' या उपक्रमाने आत्तापर्यंत २७ विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे. यातील अनेकजण आज नाशिककरांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून व 'कमवा व शिका' या योजनेच्या हातभारातून शिक्षण घेत आहेत. या २७ जणांना सामाजिक जगतात मान वर करून जगण्याचे 'मटा'ने शिकवलेच परंतु, नाशिककरांनी दिलेल्या पैशांतून हे विद्यार्थी चांगले आयुष्यही जगत आहेत.

'महाराष्ट्र टाइम्स'ची नाशिक आवृत्ती २०११ या वर्षी सुरू झाली. त्याचवर्षापासून मुंबईच्या धर्तीवर 'मटा हेल्पलाइन' उपक्रम नाशिकलाही सुरू करण्यात आला. पहिल्या वर्षी तेजस आमले, तेजस शिंदे आणि रोशनी गांगुर्डे या तीन विद्यार्थ्यांच्या निवडीने या उपक्रमाची सुरुवात झाली. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आलेल्या या तिघांनी दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले असल्याने त्यांना मदतीचा हात देण्यात आला. या तिघांसाठी नाशिककरांकडून मदत मागविण्यात आली. दानशूरांनीही भरभरून दान देत त्यांची झोळी भरली. त्यातून त्यांच्या शिक्षणाचा अडलेला प्रवास पुन्हा सुरू झाला. २०१२ मध्ये रोशनी भालेराव, स्वप्नील पवार, प्राजक्ता पाटील व राहूल बोरसे या चौघांची 'मटा हेल्पलाइन'साठी निवड करण्यात आली. यावेळी निवडीचे तंत्र वेगळे ठेवत नाशिककरांकडूनच नावे मागविण्यात आली. ही नावे सिलेक्ट झाल्यानंतर चेकचा अक्षरशः पाऊस पडला. नाशिककरांची दानशूर वृत्ती या उपक्रमामागे बळकटपणे उभी राहिल्याने हे सर्व शक्य झाले. २०१३ मध्ये रूपेश गांगुर्डे, निकिता देवरगावकर, चैताली तुंगार, अमृता निकम यांच्या रूपाने नाशिकरोडलाही या उपक्रमात समावेशित करून घेण्यात आले. साधारणत: दोन महिने धनादेश जमा झाल्यानंतर एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्यात हे चेक विद्यार्थ्यांना देण्यात येतात. २०१४ मध्ये विद्यार्थ्यांची संख्या चारवरून सहावर नेण्यात आली. यावेळी गौतमी धोकटे, प्रतीक्षा खानंदे, रोशन हरिणखेडे, विशाल चव्हाण, जितेश सोनवणे आणि भावेश सोनवणे ही सहा मुले निवडण्यात आली. त्यांनाही नाशिककरांनी भरभरून मदत केली. २०१५ मध्ये 'मटा हेल्पलाइन' उपक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या १० करण्यात आली. कविता रंजवे, पूर्वा शेटे, अक्षता पवार, सोनल लोखंडे, शुभम गांगुर्डे, मंदार रोकडे, हर्षदा भामरे, मंगेश चौधरी, सौरभ वाघ, अनुराज ढोबळे या १० जणांना मदत करण्यात आली. तर यंदाही १० जण निवडण्यात आले असून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे.

अश्विनी जाधव, अशोक खाडे, भाग्यश्री पाटील, कृष्णा निंबाळकर, कुणाल सोनवणे, नीलेश सावळे, प्रसाद देवकर, शिवानी देशमुख, श्रीवरद चव्हाण आणि वेदांगी भावसार हे १० विद्यार्थी यंदा निवडण्यात आले. हेल्पलाइनसाठीचे चेक १६ ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येतील. नाशिककरांच्या मदतीतून, 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून हे २७ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीड‌ियाचा अतिवापराचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यातच फ्रेण्डशीप डेच्या पूवसंधेलाच सोशल मीडियावरील मैत्रीमुळे विवाहितेचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित विवाहितेच्या पतीने सरकारवाडा पोलिस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. फेसबुकच्या माध्यमातून परराज्यातील दोघा युवकांनी पत्नीचे अपहरण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे.

शरणपूररोडवर परिसरात हे दाम्पत्य राहत असून २०१४ मध्ये त्यांचा विवाह झाला. पती व्यावसायिक आहे. उच्चशिक्षीत पत्नीकडे स्मार्ट फोन असून ती सातत्याने फेसबुकवर असायची. काही महिन्यांपूर्वी या विवाह‌ितेचा उत्तरखंड राज्यातील पंचायत जिल्ह्यातील लोहाघाट येथील देव धोनी आणि नथू भंडारी या युवकांशी संपर्क आला. फेसबूकवर त्यांच्यातील संवाद वाढला. रोजच तिघे एकमेकांच्या संपर्कात राहत होते. याकाळात संशय‌ितांनी संबंधित महिलेला आमिष दाखवले. एवढेच नव्हे तर १२ जुलै २०१६ रोजी दोघा युवकांनी तिला राहत्या घरातून पळवून नेले अशी तक्रार तिच्या पतीने दिली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयितांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अहिरराव करीत आहेत. काही महिन्यापूर्वी व्हॉट्स अॅप वापरू देत नाही म्हणून एका विवाह‌ितेने थेट घटस्फोटासाठी अर्ज सादर केल्याचा प्रकार शहरात घडला होता. आता, फेसबुकमुळे विवाह‌ितेचे अपहरण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीड‌ियाचा वापर करताना सावधातना बाळगावी, मत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे यांनी व्यक्त केले. संशयितांच्या मागावर दोन पथके पाठव‌िण्यात आली असल्याचे पीआय कोल्हे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक पदवीधरसाठी भाजपतर्फे डॉ. पाटील

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून भाजपतर्फे डॉ. प्रशांत पाटील यांची उमेदवारी शनिवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयाने जाहीर केली. या निवडणुकीसाठी भाजपतर्फे अॅड. नितीन ठाकरे, कोपरगावचे बिपीन कोल्हे, धुळे येथील धनराज विसपुते यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. मात्र, भाजपने डॉ. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत सर्वांनाच धक्का दिला.

डॉ. प्रशांत पाटील हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेले प्रतापदादा सोनवणे यांचे मावसभाऊ असून, केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या भावाचे जावई आहेत. त्यांच्या या नात्यागोत्याचा फायदा त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी झाला.

डॉ. पाटील यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या बार्न स्कूलमध्ये झाले असून, ते एम. एस. आर्थोपेडिक्स आहेत. विविध सामाजिक संस्थांत त्यांनी काम केले असून, ते सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत. त्यांचे मूळ गाव सटाणा तालुक्यातील आडई आहे. विशेष म्हणजे प्रतापदादा सोनवणे आमदार व खासदार असताना त्यांचे काम नाशिकहून डॉ. पाटील बघत होते. त्यामुळे त्यांना पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा तगडा अनुभव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्रेंडशिप डे विथ ‘व्हिक्टोरिया’!

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

नाशिकच्या तरुणाईकडून अनेक समाजसेवी उपक्रम सध्या राबविण्यात येत आहेत. फ्रेंडशिप डे व्हर्च्युअल करण्यापेक्षा सोशल करण्याचा फंडा तरुणाई करीत आहे. नाशिकमध्ये रविवारी, ७ ऑगस्ट रोजी अनोखा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट होणार आहे. अनेक पूर अंगावर झेलत कणखरपणे उभ्या असलेल्या व्हिक्टोरिया पुलाने जी साथ दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाशिककर फ्रेंडशिप डे साजरा करणार आहे.

तब्बल १२५ वर्षांपासून ऐतिहासिक 'व्हिक्टोरिया' (होळकर पूल) निसर्गाचे अनेक प्रकोप झेलत आहे. या पुलासोबत नाशिकच्या अन् नाशिककरांच्या अनेक घटना किंबहुना अविस्मरणीय आठवणी जोडल्या आहेत. फ्रेंडशिप डेनिमित्त या अनमोल साथीदाराचे आभार मानून त्याचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. याच भूमिकेतून नाशिकच्या यंगस्टर्सनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. फ्रेंडशिप डेनिमित्त ७ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार आहे. नाशकातील अनेक समाजसेवी यूथ संघटना यासाठी एकवटल्या आहेत.

पुलाविषयी आठवणींचे बॅनर!

व्हिक्टोरिया पुलाबद्दल मित्रत्वाच्या भावनेतून अनेक आठवणी तरुणाई लिहिणार आहेत. पुलावर एक बॅनर लावून तिथे आपली मतं मांडण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिककरांनीही आपली भूमिका मांडण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. रविवारी सकाळी १० वाजता व्हिक्टोरिया पूल येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. 'सनविवि फाउंडेशन, युवान, विवेकवाहिनी, विद्यार्थी न्याय मंच, स्पार्टन, एकनिष्ठ युवा फाउंडेशन, शिवकार्य गडकोट मोहीम, तसेच नाशकातील अनेक समाजसेवी संघटना यात सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाचे जोरदार कमबॅक; गोदावरीला पुन्हा पूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी पाणलोट क्षेत्रात शनिवारी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. गोदावरीला शनिवारी पुन्हा पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात ५६९ मिलिमीटर पाऊस झाला. इगतपुरीत १२० मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये ९४ मिमी, पेठमध्ये १०६ मिमी, सुरगाण्यात ८४ मिमी पावसाची नोंद झाली.

मालेगाव तालुका वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत जिल्ह्यात ३५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर नाशिक शहरात २४ तासांत ३३ मिलिमीटर आणि नऊ तासांत १४.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे गोदावरीतील पाणी पातळीत मोठी वाढ झाली. पंचवटीतील दुतोंड्या मारुती पाण्याखाली बुडाला. सराफ बाजार आणि तत्सम नदीकाठच्या परिसरात पाणी शिरल्याने स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांची धांदल उडाली.


दिवसभरात तालुकानिहाय पडलेला पाऊस


तालुका पाऊस (मि.मी)

नाशिक ९.५

इगतपुरी ६५.०

त्र्यंबकेश्वर ५४.५

दिंडोरी २८.०

पेठ ८२.०

निफाड ५.२

सिन्नर ९.०

चांदवड ९.०

देवळा ५.८

येवला १.०

नांदगाव ०.०

मालेगाव ०.०

बागलाण ५.०

कळवण १८.२

सुरगाणा ६०.०

एकूण ३५२.२

जिल्ह्यातून झालेला पाण्याचा विसर्ग...


धरण वेळेनुसार ‌विसर्ग (क्युसेकमध्ये)


सकाळी ६ सकाळी १० दुपारी १ दुपारी ३ सायं ६


गंगापूर ८००० १२७०८ १५६१८ १५६१८ १५६१८

दारणा १३००० १५४०१ २०१७९ २०१७९ २०१७९

पालखेड १०००० २३४९० २१५५७ २४५२४ २२६१२

कडवा ७४६ ५६१६ ५६१६ ५६१६ ९६३०

होळकर ब्रीज १४१९० १४१९० १६९८४ १९०७७

नांदूरमध्यमेश्वर ४९४७८ ५९७४८ ७७३५० ७९८४३


शहरात अडीच महिन्यांत ९२० मिमी पाऊस

जिल्ह्यातील केवळ पाणलोट क्षेत्रातच नव्हे, तर शहरातही यंदा जोरदार पाऊस झाला आहे. नाशिक शहरात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरी ६५० मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. मात्र, यंदा अवघ्या दोन- सव्वादोन महिन्यांतच शहरात ९२० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांतही पाऊस हजेरी लावत असल्याने यंदा पाऊस रेकॉर्ड करणार, अशी शक्यताही सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

खदानीत बुडून एकाचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने १३ जणांचा बळी घेतला आहे. येवला येथील मनोज रामदास घुले (वय २२) या तरुणाचा शुक्रवारी पन्हाळसाठे येथील खदानीत बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील टंचाई शाखेने दिली आहे. शनिवारी दुपारपर्यंत त्याचा मृतदेह मिळून आला नव्हता. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील खरशेत येथून बेपत्ता झालेल्या एकनाथ भोरू राऊत (वय ४८) यांचा मृतदेह गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आढळून आल्याची माहिती तहसीलदार नरेश बहिरम यांनी दिली आहे. १ ऑगस्टपासून राऊत बेपत्ता होते. पावसामुळे वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते दमणगंगा नदीत वाहून गेले. त्यांचा मृतदेह गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आढळून आला. याशिवाय दिंडोरी येथील दाम्पत्य, मालेगाव येथील एकाचा मृतदेहदेखील सापडल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.


पावसाचा जोर वाढला तरी महापुराची शक्यता नाही. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने गोदावरीसह गौतमी धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढला तरच पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. तशा पूर्वसूचना नदीकाठच्या रहिवाशांना दिल्या जातील. महापुरासंबंधीच्या अफवा पसरवू नयेत आणि अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. - रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज वितरणाबाबत निर्णय घ्या

0
0

आमदार अनिल कदम यांचे अल्टिमेटम

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाबार्ड, जिल्हा बँक, विकास सेवा संस्था अशा त्रिसूत्रीने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होतो. पावसाळी अधिवेशनात नाबार्डने जिल्हा बँकेला कर्ज वितरणासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे जिल्हा बँक उद्दिष्टांच्या पुढे कर्जपुरवठा करण्यास हतबल झाली. त्यामुळे या कर्ज वितरणाबाबत जिल्हा बँकेने मंगळवारपर्यंत निर्णय न घेतल्यास बुधवारी, (दि. १०) शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवर विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेना आमदार अनिल कदम यांनी निफाड येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात दिला.

जिल्हा बँकेकडून कर्ज पुनर्गठण, पीक कर्ज, इतर कर्जांबाबत शेतकऱ्यांची गेल्या महिनाभरापासून अडवणूक होत असल्याबाबत निफाड बाजार समिती सभागृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात आमदार अनिल कदम बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जयदत्त होळकर, सुभाष कराड, राजेंद्र डोखळे, पंढरीनाथ थोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात राजेंद्र डोखळे यांनी बाजार समितीची नियमनमुक्तीमुळे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, जिल्हा बँकेला कर्जफेड करूनही नवीन कर्ज मिळण्यास होणाऱ्या अडचणींवर ठोस निर्णयाची वेळ आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या वतीने जानकीराम धारराव, भीमराव काळे, भगीरथ शिंदे, एस. आर. शिंदे यांनी सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप केला.


प्रसंगी राजीनामा देऊन उभा राहीन

एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष विचलित करण्यात भाजपवाले माहीर आहेत. बाजार नियमनमुक्ती विधेयकामुळे शेतकरी व व्यापारी नियमनमुक्त होत आहेत. शेतकऱ्यांना उत्पादित मालाला भाव व बाजार मिळण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने आपण त्या विधेयकाला विरोध केला. केवळ बाजार समिती निवडणुकीत झालेला पराभव पचवता न आल्याने भाजपवाले लासलगाव बाजार समिती बरखास्त करत असतील तर ते मी होऊ देणार नाही, प्रसंगी आमदारकीचा राजीनामा देऊन या लढ्यात उभा राहीन, अशी ग्वाही आमदार अनिल कदम यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तालपरिक्रमा’त प्रेक्षक मंत्रमुग्ध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तबल्याचे बोल, डग्ग्याचा घुमार यांच्या संगतीने सादर होणाऱ्या विविध तालांतील चक्रदार, परण, कायदे, पलटे, त‌िहाई यांच्या वादनाने परशुराम साईखेडकर नाट्यगृह दणाणून गेले होते. निमित्त होते, गुरूकृपा तबला अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने रविवारी आयोजित 'ताल परिक्रमा'या कार्यक्रमाचे.

या कार्यक्रमात गुरुकृपा तबला अकादमीच्या सर्व शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तबला सहवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ तबलावादक विजूकाका हिंगणे, पंड‌िता शैलाताई ओक, पं. अविराज तायडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर ज्येष्ठ गायक पं. मकरंद हिंगणे यांनी 'सूर शाम'हा बडा ख्याल सादर केला. अकादमीमध्ये सध्या शिक्षण घेत असलेल्या व संगीतजगतात आपले पाय घट्ट रोवून वादनात करिअर केलेल्या विद्यार्थ्यांनी तीनताल, पंचमसवारी, अष्टमंगल, झपताल सादर केला. त्याचप्रमाणे पंड‌ित अल्लारख्खा खाँ व अमजद थिरकवा साहेब यांच्या दुर्मिळ बंदीशी आणि कायदे अप्रतिमरित्या फुलवले. पुण्याचे ज्येष्ठ वादक हरिश भावसार यांनी साडेदहा मात्रांचा अवघड ताल सादर केला. अकादमीचे गुरुवर्य जयंत नाईक यांचे शिष्यांच्या वतीने गुरुपूजन करण्यात आले. जयंत नाईक यांचे गुरू विजूकाका हिंगणे यांचे पूजन जयंत नाईक यांनी केले. पवार तबला अकादमीचे ओंकार कोडीलकर व राधिका रत्नपारखी यांनीही वादन सादर केले. वयाने लहान असलेल्या साक्षी ह‌िच्या तबला वादनाने रसिकांना एक वेगळीच अनुभूती दिली. तसेच शौनक राजहंस यांचेदेखील वादन झाले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात नृत्यांगना सुमुखी अथनी हिने कथ्थक नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संध्याकाळी अभिषेक, सुहास, वैदेही यांचे सहवादन झाले. त्यांनी लालित्यपूर्ण वादन सादर केले. आदिताल तबला अकादमीचा वादक रसिक कुलकर्णी व निमिष घोलप यांचे एकल वादन झाले. त्यानंतर अभिनव पध्दतीने सादर केलेल्या फ्यूजनने रसिकांना डोलायला लावले. यात १० मात्रांच्या झपतालाबरोबर जेम्बे, ड्रम, ऑक्टोपॅड यांची उत्तम साथ लाभली. या सर्व कलाकारांना हार्मोनियमवर सुभाष दसककर, गायनासाठी ज्ञानेश्वर कासार, आशिष रानडे, हार्मोनियमवर दिव्या रानडे, पुष्कर भागवत, सागर कुलकर्णी यांनी साथ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टॉल एकाच ठिकाणी

0
0

शहरात विभागनिहाय फटाके विक्रीवर येणार मर्यादा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विभागनिहाय फटाक्यांची विक्री होऊ देणार नाही. सुरक्षेसाठी शहरातील एकाच ठिकाणी सर्व फटाके दुकाने सुरू होतील, याची काळजी घेण्यात येईल. या नियमाचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्याकरिता विशेष पथक नियुक्त करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत फटाक्यांची विक्री होऊ देणार नाही, असे स्पष्टीकरण गृह विभागाच्या अप्‍पर मुख्य सचिवांनी लोकायुक्तांकडे दिले आहे. मात्र अनधिकृत फटाक्यांबाबत सुरू असलेल्या सुनावणीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

तक्रारदाराने पकडून दिलेला फटाक्यांचा ट्रक कारवाई न करता सोडून दिल्यानंतर तक्रारदारालाच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणाची लोकायुक्त कार्यालयाने दखल घेत त्यावर जानेवारी २०१६ पासून सुनावणी सुरू केली आहे. यापूर्वी सुनावणीसाठी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, तसेच गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनावणीसाठी हजर होते. याबाबत चंद्रकांत लासुरे यांनी तक्रार दिली आहे.

अनधिकृत फटाके (स्फोटक वस्तू) विक्रीबाबत जनजागृती करणे, त्यांची अनधिकृत विक्री थांबवणे, यासाठी लासुरे अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. अनधिकृत फटाके विक्रीबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही पोलिस कारवाई करीत नाही. राज्य सरकारदेखील याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप करीत लासुरेंनी राज्याच्या लोकायुक्तांकडे पुराव्यानिशी तक्रार दिली. ६ नोव्हेंबर २०१५ रोजी लासुरे यांनी सहा टन फटाक्यांचा मुद्देमाल पोलिसांना पकडून दिला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई करीत असल्याचे दाखवत सदर ट्रक संशयास्पद पध्दतीने सोडून दिला. याबाबत लासुरे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे वेळोवळी तक्रारी केल्या. मात्र, तुमच्यावरच खोटा गुन्हा दाखल करू, आमच्या नादी लागू नका अशी दमबाजी लासुरे यांना करण्यात आली. लासुरेंच्या नावाने खोटे शपथपत्र लिहून घेण्यात आले असून, एका पोलिस कर्मचाऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे लासुरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. यानंतर लासुरेंनी लोकायुक्तांकडे धाव घेतली. लासुरेंच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने ही तक्रार लोकायुक्त कार्यालयाने दाखल करून घेतली.

दरम्यान, गृह विभागाच्या या पवित्र्यामुळे महापालिकेचे अर्थकरण कोलमोडू शकते. महापालिका दरवर्षी सहा विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी फटाके दुकानांना मंजुरी देते. मात्र, १०० पेक्षा जास्त ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुविधा पुरवणे महापालिकेला शक्य होत नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला फटाके विक्रीच्या गाळ्यावरून गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकायुक्तांकडे सुरू असलेल्या सुनावणीचा अंतिम निर्णय अद्याप बाकी असल्याचे चंद्रकांत लासुरे यांनी सांगितले. मात्र या निर्णयामुळे विभागनिहाय फटाके विक्रीवर मर्यादा येणार आहेत. यामुळे फटाके विक्रेते काय पाऊल उचलतात, याकडेही लक्ष लागले आहे. यामुळे यंदा फटाके विक्रीचा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.

ठाणे, वाशीचे करणार अनुकरण

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, गृह विभागाच्या अप्‍पर सचिवांनी नाशिक शहरात जागोजागी फटाक्याचे स्टॉल उभे राहणार नाहीत, याची ग्वाही दिली. ठाणे आणि वाशी याठिकाणी ज्या पध्दतीने फटाक्यांचे स्टॉल लागतात, त्याच पध्दतीने ही कार्यवाही होईल, असे सचिवांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबकला गर्दी

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रावण महिना सुरू झाला असून, महिन्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येस त्र्यंबकेश्वरला भाविकांची ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावणाच्या पहिल्या सोमवारचा पर्वकाल साधण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतील, असा अंदाज गृह‌ित धरून प्रशासन सज्ज झाले आहे.

यासाठी पोलिस खात्याने सर्वप्रकारची खबरदारी घेऊन श्रावण महिना निर्विघ्न पार पडेल याकरिता सुक्षनियोजनावर भर दिला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी बंदोबस्ताचे नियाजन केले आहे.

परिक्रमा फेरी मार्गावरदेखील पुरेसा बंदोबस्त राहणार आहे. खास करून साध्या वेषातील पोलिस टवाळखोर, भुरटेचोर यावर लक्ष ठेवणार आहे. यामुळे केवळ हौसेखातर व फेरीच्या नावाखाली येणारे, मादक पदार्थ सेवन करून 'पिकनिक'साठी व छेडछाड करणाऱ्यांना चाप बसणार आहे. आरोग्यासेवेसाठीही उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. भागवत लोंढे यांनी गर्दीच्या कालावधीत आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात केले आहे. पहिला, दुसरा आणि चौथ्या सोमवारी रुग्णालयात असलेल्या नियमित तीन वैद्यकीय अधिकारी अन्य कर्मचाऱ्यांमार्फत व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध असेल तर तिसऱ्या सोमवारी मात्र चार ठिकाणी फिरते आरोग्य पथक तैनात करण्यात येईल, असे त्यांनी कळविले आहे. वाहतूक व्यवस्था एस. टी. महामंडळातर्फे तिसऱ्या सोमवारव्यतिरिक्त नेहमीच्या टायमिंग १५० गाड्यांव्यतिरिक्त ५० जादा बसेस रविवार, सोमवार या दोन दिवसांत सोडण्यात येतील. तात्पुरत्या स्वरूपात जव्हार फाट्यावरील बसस्थानक सुरू करून तेथूनच गाड्यांचे नियोजन केले जाणार अशी माहिती परिवहन विभागाने दिली. नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘..तर कांदा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकार खुल्या पध्दतीने शेतमाल विक्रीचे धोरण राबवित असताना नाशिकमध्ये मात्र बाजार समित्या आणि व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहेत. शेतकऱ्यांची पिळवणूक यापुढे कदाप‌ि खपवून घेतली जाणार नाही. सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करून पर्यायी व्यवस्था उभी केली जाईल, असा इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी नाशिकमध्ये दिला.
जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना भेटून होत असलेल्या अन्यायाचे गाऱ्हाणे मांडले. बाजार समितीमधील व्यापारी, अडते यांच्याकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवा, असे साकडे महाजन यांना यावेळी घालण्यात आले. सरकारने बाजार समितीत येणारा शेतीमाल नियमनमुक्त करण्याचा अध्यादेश काढला असून, सर्वच बाजार समित्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांकडून त्यास विरोध होत असून, तो खपवून घेतला जाणार नाही असे महाजन यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, 'जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्याकडे गोणी पध्दतीने कांदा विक्रीचा आग्रह धरून त्यांचा खर्च वाढविण्याचे काम व्यापारी करीत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. गोणीसाठीचा खर्च, तसेच ती भरण्यासाठी लागणारी मजुरी शेतकऱ्यांना परवडत नाही. म्हणूनच व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका न घेता खुल्या पध्दतीनेच कांद्याची खरेदी करावी, यासाठी व्यापाऱ्यांना आपण आवाहन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यवहाराप्रमाणे व्यवहार हवे असतील, तर व्यापाऱ्यांनी त्यांना साथ दयावी. एका जिल्ह्याला एक व दुसऱ्या जिल्ह्याला दुसरा न्याय या पध्दतीने भूमिका ठेवून चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मार्केट कमिटी किंवा व्यापारी शेतकऱ्यांकडील कांदा खरेदी करू शकणार नसतील तर त्यांनी परवाने परत करावेत. ते परवाने रद्द करण्याची सरकारची तयारी असून, शेतकरीहिताचे निर्णय राबवावेच लागतील, अशी भूमिका महाजन यांनी स्पष्ट केली. याबाबत कोणी अतिरेक करणार असेल, तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

चि‌त्रीकरण तपासण्याचे आदेश

लासलगाव येथील बाजार समितीसमोर व्यापारी आणि शेतकरी यांच्यात वाद उद्भवून ३ ऑगस्ट रोजी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांवर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले. आम्ही चोर, दरोडेखोर नाही. आमच्यावरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना घेराव घातला. लासलगाव येथे झालेल्या गोंधळाचे चित्र‌िकरण तपासण्याचे आदेश महाजन यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यानंतरच शेतकऱ्यांवरील गुन्हे ठेवायचे की मागे घ्यायचे हे ठरविले जाईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना मुद्दाम त्रास दिला जात असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असे सांगतानाच वेळप्रसंगी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यास सांगू, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील धरणांत ६९ टक्के पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वरुणराजाने नाशिककरांवर केलेल्या कृपादृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण अशी ओळख असलेल्या गिरणा धरणातील पाणीसाठा गतवर्षी चार टक्के होता, तो आता ४२ टक्क्यांवर पोहोचल्याने मालेगावसह जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

नाशिक जिल्ह्यात छोटी-मोठी २३ धरणे असून, त्यांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८७४ दशलक्ष घनफूट एवढी आहे. गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. आजमितीस या धरणांमध्ये ४५ हजार ३२६ दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त पाणीसाठा असून, धरणे ६९ टक्के भरल्याची माहिती प्रशासनाने दिली. जून महिन्यापर्यंत दुष्काळाची दाहकता अनुभवणाऱ्या नाशिककरांना अवघ्या सव्वा महिन्यात चित्र पूर्ण बदलेल असे वाटतही नव्हते. मात्र जुलैमध्ये आणि आता श्रावणातही पावसाने जिल्ह्यात धुव्वांधार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे गंगापूर, गिरणा आणि पालखेड समूह क्षेत्रात पावसाचा चांगला जोर असल्याने दररोज धरणांमधील पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढच होते आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडत असल्याने आता पावसाचे सर्व पाणी साठवून ठेवण्याऐवजी त्याचा विसर्ग करण्यावरही जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे.

२३ पैकी १९ धरणांमधून विसर्ग

प्रशासनाला जिल्ह्यात यंदा प्रथमच २३ पैकी १९ धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. गंगापूर धरणातील तीन, पालखेड धरण समूहातील सर्वाधिक नऊ, तर ‌गिरणा खोऱ्यातील चार धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तिसगाव, भावली, वालदेवी, आळंदी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे १०० टक्के भरली असून करंजवण, वाघाड, ओझरखेड या धरणांनी शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे.

धरणाचे नाव सद्य पाणीसाठा

गंगापूर ८०, काश्यपी ८९, गौतमी ८६, पालखेड ९१, करंजवण ९२, वाघाड ९२, ओझरखेड ९४, पुणेगाव ८४, तिसगाव १००, दारणा ७९, भावली १००, मुकणे ५७, वालदेवी १००, नांदुरमध्यमेश्वर ०, कडवा ८४, आळंदी १००, भोजापूर १००, चणकापूर ६४, पुनद ६०, हरणबारी १००, केळझर १००, नागासाक्या ०, गिरणा ४२, एकूण ६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार मानधनप्रश्नी अध्यापक भारती आक्रमक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्यात विना अनुदानित धोरण स्वीकारून आता १५ वर्षांपासून अधिक काळ झाला आहे. ज्ञानदाता शिक्षक वेतनाविना निम्मे आयुष्य अक्षरशः वेठबिगारी-बिनपगारी काम करून जीवन जगत आहे. 'बूट पॉलिश' आंदोलनापासून 'भीक मांगो' आंदोलनापर्यंत सव्वाशेहून अधिक आंदोलने करून त्यांच्या हाती फुटकी कवडीही महाराष्ट्र शासन देत नाही. दुसरीकडे आमदारांना मानधनवाढ देण्याचा निर्णय घेतला जात आहे. हा कोणता न्याय? याविरोधात संघटनेतर्फे आवाज उठविण्यात येणार असल्याचे पत्रक अध्यापक भारती संघटनेतर्फे प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी शाळा-तुकडीच्या वयाचा विचार न करता मूल्यांकणात पात्रघोषित शाळा व तुकड्यांचे २० टक्के अनुदानाची घोषणा हवेत विरली. त्याचा जी आर नाही की आर्थिक तरतूद नाही. या पावसाळी अधिवेशनात त्याबाबत चर्चा, शिक्षणाची बिघडलेली घडी आणि शेतीसह सर्वच क्षेत्र नागरिकांची कुचंबना होत असताना पक्षीय राजनीतीत गुंतलेले राजकारणी एकिकडे तर दुसरीकडे दिवसा काम करून रात्रीच्या वेळी शिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी रात्रशाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी असलेल्या रात्रशाळा बंद करण्याचा घाट, विनाअनुदानित शाळांमधील विना अनुदान हजारो शिक्षकांप्रमाणे अशा शाळांच्या तुकड्यांमधून शिकणारे लाखो विद्यार्थी शासनाच्या मोफत पाठ्य पुस्तक, शालेय गणवेश, शिष्यवृत्ती योजनांसह अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. प्राथमिक गरजही पूर्ण नसताना त्यांना शिक्षण देणे शासनाची जबाबदारी असून ती आपल्या हितासाठी विसरून आणि शिक्षकांप्रती कोणताही सकारात्मक निर्णय न घेता शासनाने हे आमदार मानधन वाढीचे विधेयक विनाचर्चा एक मुखी मान्य केले आहे. हा अन्याय का, असा सवाल अध्यापक भारतीतर्फे करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळांच्या मागणीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने बाजारात फळांची रेलचेल वाढली आहे. पावसाळी हंगाम असला तरी सर्व प्रकारची फळे आज बाजारात उपलब्ध आहेत. सण, उत्सवांना सुरुवात होऊनही किंमती मात्र अजून आवाक्यात आहेत. आज पहिला श्रावण सोमवार असल्याने फळांची मागणी वाढणार आहे. यामुळे दर दोन ते पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात भाजीपाल्यासह फळांच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. यामुळे सर्वसामान्यांचा खिसा खरेदी करताना रिकामा होत होता. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून फळे व भाजीपाल्यांच्या किंमती आवाक्यात आल्या आहेत. श्रावण महिन्यातील सण, उत्सवालाही सुरुवात झाली आहे. रविवारी नागपंचमी झाल्यानंतर पुढील आठवड्यात पतेती, रक्षाबंधनाचा सण येत आहे. तसेच रविवारी संकष्ट चतुर्थी अन् लगेच दुसरा श्रावण सोमवार असे एकामागून एक सण, उत्सव येत असल्याने फळांची मागणी वाढणार आहे.

सध्या बाजारात सर्व प्रकारची फळे उपलब्ध आहेत. सफरचंदांची आवक वाढल्याने दर दहा ते वीस रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच पपईचीही आवक वाढली आहे. पपई चाळीस रुपये किलोने विक्री होत आहे.

फळांचे किलोचे दर

सफरचंद - १२० ते १६०, पपई - ४०, डाळिंब - ६० ते १००, आंबे - ८० ते १००, संत्री - ६०, चिकू - ६०, किवी - ३० रु. ला एक, केळी - ३० रु. डझन, अननस - ५० रु. ला एक, नारळ पाणी - ३० रु. ला एक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाज्यांची आवक वाढल्याने दरात घसरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आवक वाढल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांचेही दर कमी झाले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर दर आले आहेत. यामुळे ग्राहक समाधानी असला तरी भाजीपाला उत्पादक मात्र काहीसा निराश झाला आहे. मुंबई व गुजरातला भाजीपाला जात असल्याने दर किमान टिकून आहेत. अन्यथा दर आणखी घसरण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

जुलै महिन्यात गगनाला भिडलेले दर पावसामुळे ‌आज आवाक्यात आले आहेत. आता सर्वच भाज्यांचे दर ५० रुपये किलोच्या आत आले आहेत. शंभर रुपये जुडीपर्यंत पोहोचलेली कोथिंबीर १० ते १५ रुपये जुडीपर्यंत खाली आली असून, दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. मेथी, कांदापात, शेपू, पालक यांचे दरही दहा रुपये जुडीवर आले आहेत. मिरची अजूनही तिखटच असून ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे.

कारले, गिलके, दोडके, टोमॅटो, भेंडी, वांगे यांची आवकही वाढली असून ४० रुपये किलोने विक्री होत आहे. कोबी व फ्लॉवरचे दरही गेल्या आठवड्यात आवकेअभावी वाढले होते. मात्र त्यांच्याही दरात दहा रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. येत्या आठवड्यात भाजीपाला आवकेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे दर आणखी कमी होण्याय मदत होणार आहे.

भोपळा महागच

पावसामुळे भोपळ्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे भोपळा १० ते १५ रुपये नगने विक्री होत आहे. भोपळ्याचे वेल व भोपळे पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने आवक घटली आहे.

भाजीपाल्याचे किलोचे दर

कोबी - ४०, फ्लॉवर - ३०, भेंडी - ३०, वांगे - ३०, गवार - २०, कारले - ४०, गिलके - ४०, दोडके - ४०, मिरची - ५०, टोमॅटो - २५, काकडी - १५, शेवगा - ४०, कोथिंबीर - ५ ते १५ रु. जुडी, मेथी - १५ ते २०, कांदापात - १० ते १५, शेपू - ५ ते ८, पालक - ४ ते ८, भोपळा - १० ते १५ रु. नग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बोगस’वरून पिचड-चव्हाण यांच्यात जुंपली

0
0

सटाण्यात राष्ट्रवादीकडून माजी मंत्री मधुकर पिचडांच्या पुतळ्याचे दहन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड हेच मुळात बोगस आदिवासी आहेत. काचेच्या घरात वास्तव्य करणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगडफेक करू नये, असे संतप्त प्रतिपादन नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी केले. रविवारी (दि. ७) सटाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यावेळी सूर्यवंशी बोलत होते. दरम्यान, आमदार दीपिका चव्हाण यांनी आपण मधुकर पिचड यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांमध्ये आता 'बोगस'वरून चांगलीच जुंपली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बागलाणच्या आमदार सौ. दीपिका संजय चव्हाण यांना बोगस आदिवासी आमदार असल्याचे जाहीर वक्तव्य माजीमंत्री मधुकर पिचड यांनी शनिवारी, नाशिक येथे केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या पुतळ्याचे दहन व प्रतिमेला जोडे लगावो आंदोलन केले.

या वेळी रविवारी, सकाळी ११ वाजता बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. शैलेश सूर्यवंशी यांनी मधुकर पिचड आदिवासी आहेत की नाही, यांची चौकशी करण्यासाठी त्यांची डीएनए चौकशी करावी, असा एकमुखी ठराव मांडला. या प्रसंगी शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, वैभव गांगुर्डे, वसंत भामरे, धर्मराज खैनार, पांडूरंग सोनवणे यांची भाषणे झालीत. आंदोलनात विजय वाघ, दीपक सोनवणे, अमोल बच्छाव, काकाजी सोनवणे, सलीम शेख आदी उपस्थित होते.


आमदार चव्हाण करणार अब्रूनुकसानीचा दावा

नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्यावर बोगस आदिवासी प्रमाणपत्राबाबत वक्तव्य केले होते. यावर आमदार दीपिका चव्हाण यांनी रविवारी (दि. ७) प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे आपल्यावर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले आहे. तसेच पिचडांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्यावर आपण उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड यांनीच उलट बोगस आदिवासी असल्याचा दावा आमदार दीपिका चव्हाण यांनी केला. त्याबाबतचे पुरावेही आपल्याकडे आहेत असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे. या पुराव्यात पिचड यांच्या पूर्वजांच्या नोंदीत 'हिंदू कोळी' असा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे ही 'हिंदू कोळी' आदिवासी अनुसूचित जमात या संवर्गात मोडत नसून ती विशेष मागास प्रवर्गामध्ये मोडते, असे या पत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी चाळीस वर्षे आपल्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून सत्ता उपभोगल्याचेही आमदार चव्हाण यांनी यात सांगितले आहे. माजी मंत्री पिचड यांनी आपल्यावर बोगस आदिवासीचा आरोप करीत धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केला. तसेच इतर आदिवासी जमातींची सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी हा आटापिटा लावल्याचा आरोपही आमदार चव्हाण यांनी यात केला. आपण या सर्व प्रकाराबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींसमोर सविस्तरपणे मांडणार असल्याचे शेवटी आमदार दीपिका चव्हाण यांनी या पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीडब्लूडी’वर कॅगचे ताशेरे

0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक: इमारती देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या भोंगळ कारभारावर भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक विभागाने (कॅग) कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मार्च २०१५ पर्यंतच्या कामांचा हा अहवाल प्रसिद्ध झाला असून, नाशिक विभागाने घेतलेल्या अतिरिक्त ५९ कोटी रुपयांच्या फंडाबाबतही 'कॅग'ने प्रश्न उपस्थित केला आहे.

कॅगच्या अहवालात नाशिक विभागाच्या निधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २०१० ते २०१५ या कालावधीत नाशिक आणि नाशिक पूर्व, प्रेसिडन्सी मुंबई या विभागांनी मंजूर निधीपेक्षा जास्त निधी पदरात पाडून घेतल्याचे 'कॅग'ने म्हटले आहे. मर्यादेपेक्षा जास्त निधीची मागणी का केली गेली, याबाबत 'कॅग'ने आश्चर्य व्यक्त केले. नाशिक विभागाने या कालावधीत इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५९ कोटी रुपये अतिरिक्त घेतल्याचा ठपका 'कॅग'ने ठेवला आहे.

राज्यातील सरकारी कार्यालयांच्या, तसेच निवासस्थानांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पीडब्लूडी विभागामार्फत केले जाते. यासाठी राज्य सरकार दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करते. मात्र, देखभाल दुरुस्तीच्या कामांमध्ये भोंगळ कारभार सुरू असून, मार्गदर्शक तत्त्वांनाच हरताळ फासल्याचे 'कॅग'च्या रिपोर्टवरून स्पष्ट होते. 'कॅग'ने आपला अहवाल तयार करण्यासाठी पीडब्लूडीच्या १३ विभागांतील सात मंडळांतील काम सुरू असलेल्या १२० इमारतींचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमधून पीडब्लूडीच्या कामांमधील अनियमितता समोर आली आहे. प्रिटेंड रजिस्ट्रर ऑफ बिल्डिंग मेंटेन नसल्याने कामाची मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यास आपल्याकडील उपलब्ध पैसा आणि महत्त्वाच्या कामांना प्राधान्य यांचा ताळमेळ घालता आला नाही. वर्षभर देखभाल दुरुस्तीच्या कामांना मंजुरी मिळत असल्याने याचा ताण सरकारी तिजोरीवर पडतो. २०१० ते २०१५ या कालावधीत १३ पैकी ११ विभागांनी आपल्या अर्थसंकल्पातील तरतुदीपेक्षा जास्त खर्च केला आहे. यामुळे मार्च २०१५ पर्यंत पीडब्लूडीला ३४८ कोटी ७२ लाख रुपयांचे देणे बाकी होते. विशेष म्हणजे पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे २०१३- १४ मध्ये १९ कोटींचा अखर्चित निधी परत गेला. इमारत देखभाल दुरुस्तीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मागील १० ते २४ वर्षांत बदल झालेले नाहीत. त्याचा थेट परिणाम आर्थिक घोटाळ्यावर होत असल्याचा निष्कर्षही 'कॅग'ने काढला आहे.

दुरुस्तीच्या नावाखाली गौंडबंगाल

'कॅग'ने आपल्या अहवालात काही गंभीर बाबींवर प्रकाशझोत टाकला. परभणी कारागृहाचे छत, तर संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीऐवजी पीडब्लूडीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरने छताला तात्पुरत्या लोखंडी पट्ट्या ठोकून कार्यभार उरकला. हिंगोली जिल्ह्यात औंध येथील जुने रेस्ट हाऊस दुरुस्तीऐवजी नवे रेस्ट हाऊस बांधण्यास सुरुवात केली. पैसे संपल्याने अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेले काम बंद पडले तर जुन्याचीही दुरुस्ती रखडली. अशा अनेक घोळ 'कॅग'च्या अहवालाने उघड झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images