Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रेशन दुकानदार जाणार संपावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील परवानाधारक कुटुंबाना महिन्याकाठी ३५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, रॉकेल परवानाधारकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील रेशन व केरोस‌िन परवानाधारक १ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोस‌िन परवानाधारक संघटनेची शनिवारी कालिका माता मंदिर परिसरातील सभागृहात बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आमदार सीमा हिरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, संघटनेचे विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे-पाटील, विजय गुप्ता (पुणे), आप्पासाहेब तोडकरी (सातारा), बाबुराम ममाणे (सोलापूर), संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे आदी उपस्थित होते. सरकार दरबारी परवानाधारकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माल न उचलण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. यावेळी संप यशस्वी करण्यासाठी संघटनेची एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट गुणपत्रिका प्रकरणात लिपिकांचा सहभाग

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

बिटको कॉलेजमध्ये उघडकीस आलेल्या बनावट गुणपत्रिकांच्या घोटाळ्यात कॉलेजमधील दोन कनिष्ठ लिपिकांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने कॉलेजमधील दोन कनिष्ठ लिपिकांचा सहभाग असल्याचा अहवाल संस्थेस सादर केला आहे. तसेच या चौकशीमध्ये १७ नवीन विद्यार्थ्यांचे गुणपत्रके बनावट आढळून आल्याने आता बनावट गुणपत्रके सादर केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ४१ इतकी झाली आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको या नामांकित कॉलेजमध्ये एसवाय बीए व एसवाय बीकॉमच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थ्यांनी मूळ गुणपत्रकांत फेरफार करून बनावट गुणपत्रके कॉलेजकडे सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या कॉलेज प्राचार्यांनी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीने या प्रकरणातील विद्यार्थ्यांची चौकशी केली असता आणखी १७ नवीन विद्यार्थ्यांची गुणपत्रके बनावट आढळून आली आहे.

याशिवाय चौकशी समितीच्या अहवालानुसार याच कॉलेजमधील दोन कनिष्ठ लिपिकांचा या प्रकरणात सहभाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या दोन्ही कनिष्ठ लिपिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय बनावट गुणपत्रक सादर केलेल्या सर्व ४१ दोषी विद्यार्थ्यांचे प्रवेश बिटको कॉलेज प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहेत. विद्यार्थी हित लक्षात घेता या दोषी विद्यार्थ्यांपैकी एफवायच्या ऑक्टोबरच्या परीक्षेचे फॉर्म भरु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यास कॉलेजने अनुमती दिली आहे. या प्रकरणात दोषी सापडलेल्या एफवाय बीकॉम या वर्गातील १२ विद्यार्थी, एफवाय बीए च्या वर्गातील २६ विद्यार्थी व एफवाय बी एस्सी च्या३ अशा एकूण ४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रार मागे घेण्यासाठी तरुणास दमदाटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजीव गांधी भवनजवळील जैन होस्टेलमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे घ्यावी, यासाठी फिर्यादीस दमदाटी करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आकाश जैन यास शुक्रवारी दुपारच्या सुमारास चार ते पाच तरुणांनी मारहाण केली होती. यामुळे आकाशच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना लागलीच जेरबंद केले. त्यापैकी एक संशयित अनिकेत बनकर याचे पालक कैलास मधुकर बनकर व त्यांच्या तीन जोडीदारांनी शुक्रवारी सायंकाळी लागलीच होस्टेलमध्ये जाऊन आकाश जैन यास मुलाविरोधात केलेली तक्रार मागे घेण्याबाबत दम दिला. तक्रार मागे घेतली नाही, तर तुला सोडणार नाही, असा दमही त्यांनी आकाशला दिला. याबाबत आकाशने शनिवारी पोलिस स्टेशन गाठून कैलास बनकरसह इतर तिघांविरोधात फिर्याद​ दिली. या प्रकरणी पोलिसांनी कैलास बनकर यास अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटस्फोटासाठी केली पत्नीचीच बदनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेजरोडसारख्या ठिकाणी दुकान, पॉश समजल्या जाणाऱ्या ठिकाणी घर आणि संसाराच्या वेलीवर उमललेली दोन फुलं, असा संसाराचा चांगला गाडा जमलेला असताना 'तो' ओळखीतील युवतीच्या प्रेमात पडला. प्रेयसीसाठी त्याने १५-२० वर्षांच्या संसाराला लाथ मारण्याचे ठरवले. मात्र, घटस्फोटासाठी पत्नी तयार होईना. यामुळे अडथळा दूर करण्यासाठी पत्नीचे आक्षेपार्ह चित्र व मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत पल्लवी (नाव बदलेले) या महिलेच्या तक्रारीनुसार गंगापूररोड पोलिसांनी तिचा पती नीलेश (नाव बदलेले) आणि प्रियेसी मुमताज (नाव बदलेले) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गंगापूर रोडवरील पाइपलाइन परिसरात ४२ वर्षीय नीलेश वास्तव्यास आहे. त्याचे ओळखीतीलच मुमताज या युवतीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. नीलेश आणि मुमताजला विवाह करायचा आहे. मात्र, त्‍यास नीलेशची पहिली पत्नी पल्लवी विरोध करीत आहे. दोन मुले असलेल्या नीलेशला पल्लवीपासून घटस्फोट हवा आहे. मात्र, पल्लवी त्यालाही तयार होत नसल्याने नीलेशने तिच्या बदनामीचा डाव आखला. काही दिवसांपूर्वी त्याने पल्लवीचे आक्षेपार्ह फोटो व मजकूर व्हॉट्स अॅप, तसेच फेसबुकवर व्हायरल केला. ही माहिती समजताच पल्लवीला धक्का बसला. तिने या प्रकरणाची शहानिशा केली. त्यानुसार तिने गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये पती नीलेश आ​णि त्याची प्रेयसी मुमताजविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अद्यापपर्यंत संशयितांना अटक झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल योजनेला नव्हती तांत्रिक मंजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

जळगाव नगरपालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेचा अर्थसंकल्प आणि इतर कामासाठी तांत्रिक मंजुरी घेण्यात आलेली नव्हती. याबाबत महारा‌ष्ट्र जीवन प्राधीकरणाकडून माहिती प्राप्त झाल्याचे घरकुल प्रकरणाचे तपास अधिकारी तत्कालीन पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी धुळे जिल्हा विशेष न्यायालयात सांगितले.

घरकुल खटल्याचे कामकाज विशेष न्यायालयाचे न्यायाधिश आर. आर. कदम यांच्यासमोर सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी, अॅड. प्रवीण चव्हाण हे तत्कालीन तपास अधिकारी ईशू सिंधू यांची सरतपासणी घेत आहेत. सिंधू यांनी न्यायालयात सांगितले की, ९ जानेवारी २०१२ रोजी, जीवन प्राधीकरणाकडून प्राप्त झालेल्या पत्रात घरकुल योजनेसाठी तांत्रिक मान्यता घेण्यात आली नसल्याची बाब पुढे आली. यात शासन आदेश व निर्णयाचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. ईसीपी, खान्देश बिल्डर्स या कंपनीबाबत माहिती देऊन त्यात कोण-कोण संचालक होते याची माहितीही सिंधू यांनी न्यायालयात दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरांच्या संरक्षक भिंती कोसळल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

सिडको परिसरात शहराच्या तुलनेत सर्वाधिक पावसाळी नाले असून, या नाल्यांभोवती संरक्षक भिंतींची मागणी करूनही महापालिका टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा नाल्यांच्या किनाऱ्यावरील अनेक घरांच्या संरक्षक भिंती कोसळल्या असून, नाल्यांशेजारी राहणाऱ्या रहिवाशांना महापालिकेच्या दुर्लक्षाचा फटका बसला अाहे. अशा दुर्घटनांमध्ये भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सिडकोतील नाल्यांच्या सभोवताली राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी वारंवार नगरसेवकांनी प्रभाग सभेत मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु, यावर कोणताही ठोस निर्णय महापालिका प्रशासन घेत नाही. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे प्रभाग क्रमांक ४९ मधील विठ्ठलनगर परिसरात दोन ठिकाणी घराच्या संरक्षक भीती कोसळल्या आहेत. येथील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या जिवालादेखील धोका निर्माण झाला आहे. प्रभागाचे नगरसेवक तानाजी जायभावे यांनी सदर ठिकाणी भेट दिल्यानंतर अनेकांच्या रोषास त्यांना सामोरे जावे लागले.

नाल्यांशेजारी असणाऱ्या काही इमारतींच्या संरक्षक भिंतींना तडे गेले असून, जोरदार पाऊस झाला, तर त्यादेखील कोसळू शकतात. अशा स्थितीत महापालिका प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. भिंती कोसळल्याने रहिवाशांच्या मनात भीतीचे सावट निर्माण झाले असून, पावसाच्या पाण्यामुळे उपद्रवी प्राण्यांचा वावर वाढला असून, येथील रहिवासी साहेबराव परदेशी यांच्या घरामागे गेल्या दोन दिवसांपासून साप आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या घराच्या मागील दरवाजा बंदच करून ठेवावा लागत आहे. त्याचा बांधकामाचा व्यवसाय असून, घरामागील साहित्यदेखील मोठ्या प्रमाणात या नाल्यांच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

महापालिका प्रशासनास येथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी वारंवार सूचित केले आहे. पण, यावर काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे येथे जीवित हानी होण्याची दाट शक्यता असून, येथील रहिवासी त्याचा रोष आमच्यासमोरच व्यक्त करीत आहेत.

- तानाजी जायभावे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव गुणांनंतरही विद्यार्थ्यांवर अन्याय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभारमुळे यंदा इंजिनीअरिंगचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नापास झाले आहेत. त्याची भरपाई म्हणून विद्यापीठाच्या समितीने नापास विद्यार्थ्यांना दहा गुण वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, वाढीव दहा गुण हे केवळ दहा पैकी नऊ विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोरील पास होण्याचे संकट अधिक गहिरे झाले आहे.

विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याची भूमिका विद्यार्थी मंचातर्फे सदस्य प्रणव भदाणे, समाधान भारतीय, सागर खुर्दळ, मयूर शेवाळे, तुषार हिरे, गौरव जोशी आदींनी 'मटा'शी बोलताना स्पष्ट केली. इंजिनीअरिंगला प्रत्येक वर्षाला दहा विषय असतात. दहापैकी सात विषयात पास होणाऱ्यांनाच पुढील वर्षात प्रवेश मिळतो. वाढीव दहा गुण फक्त याच विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय तीन सदस्यीय समितीने घेतल्याचे मंचाच्या प्रतिनिधींना सांगण्यात आले. वर्षभरात एकाच विषयात जो विद्यार्थी नापास आहे, त्यालाच हे दहा गुण दिले जाणार आहेत. तोच विद्यार्थी पुढील वर्षाला प्रवेश घेऊ शकतो. विदयापीठाच्या गैरकारभारमुळे जे विद्यार्थी नापास झाले आणि जे तीन व चारपेक्षा जास्त विषयात नापास आहेत त्यांना वाढीव दहा गुणांचा लाभ मिळणार नाही. त्यांचे वर्ष व पैसा वाया जाणार असून मनस्तापही होणार आहे.

इंजिनीअरिंगच्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहा गुण वाढवून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असला तरी हे दहा गुण कोणत्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना किती व कसे देणार याबाबत संभ्रमावस्था होती. विद्यार्थी मंचचे सदस्य आणि काही विद्यार्थी पुणे विद्यापीठात आज गेले. त्यांनी याबाबत विचारणा केली असता वाढीव गुणांचे सुधारित मार्कशीट विद्यार्थ्यांना पाठवले जाईल, असे सांगण्यात आले.

जे इंजिनीअरिंगचे विद्यार्थी पास झाले आहेत आणि ज्यांना पुढील वर्षात प्रवेश मिळाला आहे त्यांनाच दहा गुणांचा लाभ मिळणार आहे. विद्यापीठाचा हा निर्णय नापास विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. - प्रणव भदाणे, सदस्य, विद्यार्थी मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मास्टर शेफ मनोहर यांचा ‘टाइम्स’तर्फे ‘कुकरी शो’

$
0
0

नाशिक ः देशभरातील विविध प्रकारच्या रेसिपी आ‌णि खाद्यसंस्कृती जाणून घेण्याची संधी नाशिककरांसाठी 'टाइम्स ग्रुप'तर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी (दि. २२) मास्टर शेफ विष्णू मनोहर यांचा 'द कुकरी शो' होणार असून, ते विविध रेसिपी प्रात्यक्षिकांसह सादर करणार आहेत.

देशात ऋतुमानानुसार विविध प्रकारची खाद्यसंस्कृती पाहावयास मिळते. प्रत्येक राज्यात आहाराची खास लज्जत अनुभवायला मिळते. अशाच विविध प्रकारच्या रेसिपी आ‌णि खाद्यसंस्कृती जाणून घेण्याची संधी नाशिककरांना शरणपूररोड येथील हॉटेल एमरल्ड पार्कमध्ये दि. २२ जुलै रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणाऱ्या 'द कुकरी शो'द्वारे उपलब्ध झाली आहे. या शोमध्ये मास्टर शेफ विष्णू मनोहर विविध प्रकारच्या ग्रेव्ही कशा तयार करायच्या हे प्रात्यक्षिकांसह सादर करणार आहेत. नेहमी भाज्यांची तीच तीच रेसीपी बनवून घरच्यांनादेखील भाजी खाण्याचा कंटाळा येतो. त्यात तर बालगोपाळांना भाजी न खाण्याचा नवीन बहाणाच मिळून जातो. एकच भाजी वेगवेळ्या प्रकारच्या ग्रेव्हीमध्ये कशी तयार करता येऊ शकेल, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन मास्टर शेफ विष्णू मनोहर करणार आहेत. 'टाइम्स ग्रुप'तर्फे आयोजित 'द कुकरी शो'मध्ये जास्तीत जास्त नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात

आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दांडीबहाद्दर डॉक्टरांवर करडी नजर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कामावर असूनही दांडी मारणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आता राज्यस्तरावरच करडी नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी 'सिव्हिल'मध्ये आधार संलग्न बायोमॅट्रिकच्या नव्या मशिन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे हे मशिन बसवले जाणार आहे. या कार्यपध्दतीची माहिती व्हावी, यासाठी सोमवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये कार्यशाळा झाली. त्यातून सर्वांना प्रशिक्षण व माहिती देण्यात आली.

कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद घेणाऱ्या या आधुनित तंत्रज्ञानाच्या मशिनची लिंक वेतनाशी जोडण्यात येणार आहे. यापूर्वी, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे काही ठिकाणी या बायोमॅट्रिक मशिन बसवण्यात आले होते. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. काही ठिकाणी त्या नव्हत्या तर काही ठिकाणी त्या नादुरुस्तच झाल्या. त्यामुळे नेमके किती डॉक्टर हजर आहे, किती कर्मचारी कामावर आहे, याबाबतची माहिती फोनवरून कलेक्ट करण्यात येत होती. पण त्यात सातत्य नव्हते.आता या मशिनही कुचकामी ठरल्या असून त्या आधारशी लिंक होत नसल्यामुळे आता नव्या तंत्राच्या बायोमॅट्रिक मशिन बसवण्यात येणार आहे. आधारशी लिंक झाल्यानंतर जिल्हा व राज्यस्तरावर सुध्दा प्रत्येक शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची माहिती अधिकाऱ्यांना बघता येणार आहे.

राज्य सरकारने नागरिकांना आरोग्य सुविधा तत्पर व चांगली मिळावी यासाठी हे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे अनेकांना वेळवर आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. नुकत्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही याचे पडसाद उमटले. त्यामुळे या नव्या तंत्राच्या बायोमॅट्रिक मशिन महत्त्वाच्या ठरणार आहेत.

हजेरी 'आधार'शी लिंक जिल्ह्यातील आरोग्य संस्था, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मासिस्ट, वार्ड बॉय व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आता या बायोमॅट्रिक मशिनद्वारेच आपली हजेरी द्यावी लागणार आहे. या मशिन आधार नंबरशी संलग्न करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपली वैयक्तिक माहिती वेबसाइटवर भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंडाराजमुळे तरणतलाव परिसरात संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

येथील प्रभाग ५९ मधील आंतरराष्ट्रीय जलतरणतलाव परिसरातील नागरिक आणि व्यावसायिक गेल्या काही महिन्यांपासून गुंडाराजमुळे संतप्त झाले आहेत. गुंड प्रवृत्तीच्या काही युवकांकडून व्यावसायिकांना धमकावणे, उघड्यावर मद्यपान करणे, तलवारीने केक कापणे, वेगात गाड्या चालविणे, मुलींची छेडछाड करणे आदी प्रकार सर्रासपणे सुरू असल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे.

नगरसेविका संगीता गायकवाड, नाशिकरोड बँकेचे संचालक हेमंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी उपनगरचे पोलिस निरीक्षक अशोक भगत यांना घटनास्थळी बोलावून परिस्थितीची गांभीर्य लक्षात आणून देत गुंडांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

तलवारीने कापला जातोय केक

नाशिकरोड येथे बिटको कालेजमागे जिजामाता आंतरराष्ट्रीय तलाव आहे. तलावासमोरच व्यापारी संकुल आहे. परिसरात नवीन वसाहती झाल्या अाहेत. येथे काही महिन्यांपासून गुंड व्यापाऱ्यांकडून फुकट वस्तू नेत असून, पैसे मागितल्यास धमकी देत आहेत. मिठाईच्या दुकानांमध्ये मौजमजा केल्यानंतर पैसे न देताच दमदाटी करून निघून जात आहेत. हे गुंड भरचौकात गाड्या उभ्या करून मद्यपान करताना दिसतात. मद्याच्या बाटल्या एकमेकांना फेकून मारण्याचा खेळही खेळला जातो. एवढेच नव्हे, तर वाढदिवसाला रस्त्यातच तलवारीने केक कापण्याचे प्रकारही होत असून, विरोध करणाऱ्यांना मारहाणीच्या घटनाही घडत आहेत.

मुलींचा निर्लज्जपणा

तरणतलाव चौकात युवक खुलेआम मद्यपान करून महिलांची छेडछाड करतात. खेदाची बाब म्हणजे या युवकांसमवेत चार-पाच मुलीही असतात. या टोळक्यांचे अश्लील चाळे चालतात. रहिवाशांना हा तमाशा निमूटपणे बघावा लागतो. बिटको कॉलेज, तरणतलावावर येणाऱ्या मुला-मुलींवर या प्रकारांमुळे वाईट संस्कार होत आहेत. हेच गुंड बिटको कॉलेजमध्ये जाऊन मुलींची छेडछाड करीत असल्याच्याही तक्रारी आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांना नगरसेविका संगीता गायकवाड यांनी बोलावून गुंडांवर कारवाईची विनंती केली. नागरिकांनी भगत यांच्यापुढे गुंडागर्दीचा पाढा वाचून कठोरात कठोर कारवाईची मागणी केली. याप्रसंगी हेमंत गायकवाड, सूर्यभान घाडगे, श्रीमती एलिझाबेथ, गुप्ता, संदीप भिंगारे, शांतीलालजी पटेल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांअभावी तिजोरीत ठणठणाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर्मचाऱ्यांची वानवा असतांना जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 'बीएलओ'च्या कामाला जुंपल्याने महापालिकेसमोर सध्या वसुलीचे मोठे संकट उभे राहिले आहे. महापालिकेकडून तब्बल सव्वाशे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतले असून, त्यातील ८९ कर्मचारी हे एकट्या विविध कर संकलन विभागाचे आहेत. या विभागाचे जवळपास सगळेच कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतल्याने मिळकत विभागाची वसुली ठप्प झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा कणाच मोडला गेला असून तिजोरीवरही त्याचा परिणाम होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणुकी शाखेककडून सध्या मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी विविध कार्यालयाकडून कर्मचारी आयात करून त्यांच्याकडून कामे करून घेतली जात आहे. महापालिकेकडून निवडणूक शाखेने सव्वाशे कर्मचारी घेतले असून त्यांना 'बीएलओ'च्या कामाला जुपले आहे. महापालिकेच्या सव्वाशे कर्मचाऱ्यांपैकी ८९ कर्मचारी हे विविध कर संलकन विभागाचे आहेत. सध्या महापालिकेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलांचे वितरण सुरू आहे. परंतु, या विभागाचे कर्मचारी सध्या 'बीएलओ'चे काम करत आहे. हे काम ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळे महापालिकेची वसुली रखडली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर सध्या महापालिकेचा गाडा सुरू आहे. परंतु, 'बीएलओ'च्या कामांमुळे सध्या विविध करसंलकन विभागाची वसुली ठप्प आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचप्रकरणी शेखर कावळे निलंबित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

बांधकाम विभागात अनामत रक्कम परत देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शेखर निवृत्ती कावळे या वरिष्ठ लिपिकास महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी निलंबित केले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) अहवाल आल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या निलंबनाची कारवाई केली.

नाशिकरोड येथील विभागात विविध कर संकलन विभागात वरिष्ठ लिपिक असलेल्या शेखर कावळे यास 'एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान २० हजाराची लाच घेतांना अटक केली. यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. तक्रारदार ठेकेदाराने आडगाव आणि मखमलाबाद येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाचे वॉल कंपाऊंडच्या बांधकामाचा ठेका घेतला आहे. बांधकामाचा ठेका घेताना तक्रारदाराने एक टक्का याप्रमाणे २५ हजार ६६१ रुपये अनामत रक्कम महापालिकेकडे जमा केली होती. ही अनामत रक्कम परत घेण्यासाठी अर्ज केला असता लिपिक का‍वळे याने ३० हजारांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे बांधकाम विभागातून त्यांची बदली झाली असतांनाही त्यांनी बांधकाम विभागासाठी लाच मागितली. संबंधित ठेकेदाराने 'एसीबी'कडे तक्रार केल्यानंतर त्यांना ट्रॅप करण्यात आले होते. कावळेंना दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.

शासन निर्णयाप्रमाणे अधिकारी व कर्मचारी ४८ तास पोलिस कोठडीत राहिल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन खातेनिहाय चौकशी करण्यात येते. 'एसीबी'कडून महापालिकेला सोमवारी त्यांच्या अटकेसंदर्भात अहवाल मिळाला. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश तयार केले. आयुक्त कृष्णा यांनी त्या आदेशावर सही केली. त्यामुळे कावळे यांना आता सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगारींना उचलले; मद्यपींना टाळले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये पोलिसांनी शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात छापासत्र सुरू केले आहे. मात्र, अशी कारवाई करताना पोलिसांकडून दुजाभाव होत असल्याची बाबही समोर आली आहे. सातपूर परिसरातील अशोकनगरला एका जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. मात्र, शेजारी अवघ्या दोन फूट अंतरावरील देशी दारूच्या अवैध अड्ड्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. गुन्हे शाखेच्या या कारवाईकडे संशयास्पद नजरेने बघितले जात आहे. घडल्या प्रकाराने परिसरातील नागरिकही चक्रावले असून, हा दुजाभाव 'अर्थपूर्ण' तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मागील काही दिवस शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने पोलिस यंत्रणेविरोधात नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात होता. गृहखाते आणि सोबतच नागरिकांच्या दबावापोटी शहरातील पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्यानंतर त्यांचे कौतुकही केले जात आहे. मात्र, हे कोडकौतुक औटघटकेचे ठरते की काय, असे वाटू लागले आहे. अशोकनगरला महिंद्रा कंपनीच्या मटेरियल गेट समोरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून गुन्हे शाखेने जुगार खेळणाऱ्या १४ जणांना ताब्यात घेतले. परंतु, याच ठिकाणी दोन फूट अंतरावर देशी दारूच्या अनधिकृत अड्ड्याकडे सपशेल काणाडोळा करण्यात आला. पोलिसांनी सातपूर भागात जुगार खेळणाऱ्या अड्डयांवर छापासत्र सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सातपूर गावातील खोका मार्केट येथे छापा टाकत १५ जुगारींना ताब्यात घेतले होते. यानंतर अशोकनगर भागात गुन्हे शाखेच्या युनिट - २ चे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. ए. साळुंखे यांनी आपल्या टीमसह महिंद्रा मटेरियल गेट समोरील जुगार अड्ड्यावर छापा टाकत जुगारींना ताब्यात घेतले. मात्र, कारवाईतून शेजारील देशी दारुचा अड्डा वगळण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांना देशी दारूच्या या अनधिकृत अड्ड्याबद्दल माहिती होती. आता गुन्हे शाखेने पुन्हा अशोकनगर भागात येऊन देशीचा अड्डा उद्धवस्त करावा, अशी मागणी होत आहे.

नगरसेवकपुत्राचा अड्डा! सातपूर भागातील वादग्रस्त नगरसेवकाच्या पुत्राचा हा देशी दारुचा अड्डा असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत स्थानिक लोकांना माहिती आहे, तर ती पोलिसांना नसेल का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. ज्या जागेवर हा अड्डा आहे ती जागा ईएसआय हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका नर्सची असल्याचीही माहिती पुढे आली आहे. संबंधित महिलेकडून करारनामा करून ही जागा नगरसेवकाच्या मुलाने ताब्यात घेतली असल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोपर्डी प्रकरणी संघटना आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचे पडसाद सोमवारी नाशिक शहरात उमटले. या घटनेचा निषेध करीत बहुतांश राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. आक्रमक कार्यकर्त्यांनी मेहेर चौकात रास्ता रोको केला. तसेच, टायर जाळून या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंगळवारी बी. डी. भालेकर मैदानापासून महामोर्चा काढण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे एका मुलीवर काही नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर तिचा निघृणपणे खून करण्यात आला. या घटनेचे पडसाद शहरात उमटले. मराठा एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. त्यानंतर मेहेर चौकात रास्ता रोको केला. तसेच, वाहनांचे टायर जाळून निषेध नोंदविला. सुमारे एक तास हे आंदोलन सुरू होते. सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. या प्ररकणात सरकारी वकिल अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. पीडित कुटुंबीयांना २५ लाखांची सरकारी मदत देण्यात यावी आदि मागण्या मांडण्यात आल्या. या आंदोलनामुळे या मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी मराठा एकिकरण समितीचे राम खुर्दळ, कपिल गोवर्धने, संकेत नेवकर, नाना बच्छाव, जगन काकडे, रमेश ठाकूर, नीलेश कुबे, गणेश सोनवणे, राजू देसले आदि सहभागी झाले होते. आरोपींना अटक करण्यास कुचराई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. निर्भया अत्याचार व हत्याकांड प्रकरणानंतर कायद्यामध्ये जो बदल केला, त्यानुसार या प्रकरणातही अतिजलद गतीने तपास होऊन गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करावी, वेळप्रसंगी कायद्यात बदल करून अशा नराधमांना शिक्षा द्यावी. पीडित कुटुंबाला सरकारकडून तातडीची २५ लक्ष रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुरेखा निमसे, प्रियंका शर्मा, वैभव देवरे, कुंदा सहाणे, गणेश जाधव, किरण बोरसे, जगदिश अहिरराव, राजाभाऊ सोनवणे आदि उपस्थित होते. सामाजिक अत्याचार कृती समितीतर्फे सुनील मालुसरे, प्रभाकर वायचळे, कृष्णा शिलावट, महादेव खुडे, पदमाकर इंगळे, मंगला गोसावी आदींनी अशाच प्रकारचे निवेदन दिले. छावा संघटना, माकप, मनसे यांनीही निदर्शने करीत निषेध नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेनेरिक औषधांसाठी सरकार आग्रही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेवानिवृत्त पेन्शनधारक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मेडिक्लेमची सुविधा सुरू केली आहे. या योजनेमध्ये प्रिस्क्रिप्शनसाठी नव्याने दोन हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातील १२०० रुपये तपासणीसाठी आणि ८०० रुपये औषधांसाठी दिले जाणार आहेत. परंतु, केवळ जेनेरिक औषधांचीच बिले मंजूर केली जाणार असल्याने या सेवानिवृत्तांना आता जेनेरिक मेड‌िकल स्टोअर्स शोधावी लागणार आहेत. सहसंचालक लेखा व कोषागारे विभागाच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय विमा योजनेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेंतर्गत विमा काढलेल्या ग्राहकांच्या विम्याची मुदत २५ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे विमाधारकांनी त्वरीत मुदतवाढ करून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. नाशिकमधील १० हजार ग्राहकांच्या विम्याची मुदत २५ जुलैला संपत असून, त्यांचे त्वरीत नूतनीकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकचे ३२ विद्यार्थी सीए परीक्षेत उत्तीर्ण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाच्या वतीने मे २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, त्यात एकाच वेळेस दोन्ही ग्रुप देणारे ३२ विद्यार्थी पास झाले आहेत. या परीक्षेत ग्रुप वनचे ७१, तर ग्रुप टूचे ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. एकूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८३ आहे. चार्टर्ड अकाऊंटंटच्या निकालाबरोबरच सीए सीपीटीचाही निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत ३१६ विद्यार्थी पास झाले आहे. डिस्टीक्शनमध्ये ७३ विद्यार्थी आहेत. या परीक्षा जूनमध्ये घेण्यात आल्या होत्या. दुपारी २ वाजता हा निकाल ऑनलाइन पध्दतीने जाहीर झाला. या परीक्षांसाठी काही वर्षांपासून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे या निकालाची सर्वांनाच उत्सुकता होती. गेल्यावर्षी सीए परीक्षेच्या निकालात नाशिकच्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला होता. त्यावेळेस नाशिकमधून १२०४ विद्यार्थ्यांनी सीए आणि सीपीटी परीक्षा दिली होती. पैकी २४३ विद्यार्थ्यांनी यश मिळविले होते. यात सीए फायनल परीक्षेत शहरातून २५ विद्यार्थ्यांनी यश मिळविले होते. राष्ट्रीय पातळीवर जाहीर झालेल्या या निकालात ५५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी आणि देशातील पहिले ५० विद्यार्थी यांचीही यादी वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सीए इन्स्टिट्यूटचे चेअरमन रवी राठी, सेक्रेटरी मिलिंद लुणावत यांसह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून करून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

तळेगाव दिंडोरी (ता. दिंडोरी) येथे घरगुती वादातून एका वृद्ध शेतकऱ्याने पत्नीला काठीने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिंडोरी पोलिसांनी पतीविरुद्ध पत्नीच्या खुनाचा, तसेच आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तळेगाव दिंडोरी येथील तातीराम अर्जुन उगले (वय ८५) व गीताबाई तातीराम उगले (वय ७६) हे शेतकरी दाम्पत्य दोघेच वस्तीवर राहत होते. रविवारी रात्री त्यांच्यात वाद होऊन तातीराम यांनी पत्नीस त्यांच्याच आधाराच्या बांबूच्या काठीने डोक्यावर मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर तातीराम यांनीही स्वतः राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्यांचा मुलगा आला, तेव्हा दरवाजा बंद आढळला. नातेवाइकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या दाम्पत्याच्या मागे दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिंडोरी पोलिसांनी तातीराम उगले यांच्याविरुद्ध पत्नीच्या खुनाचा, तसेच आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक मधुकर गावित करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हज यात्रेचे टेक ऑफ ओझरहून होणार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथून कार्गो सेवा कार्यान्वित झाल्यानंतर आता पुढील महिन्यातील हज यात्रेचे टेक ऑफ ओझरहून करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासंदर्भात संबंधित यंत्रणांची चाचपणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातून १५०० मुस्लिम बांधव हज यात्रेला यंदा जाणार आहेत. त्यांना या सेवेचा फायदा होऊ शकणार आहे. मक्का येथे होणाऱ्या हज यात्रेला जगभरातून भाविक हजेरी लावतात. आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी, अशी भावना मुस्लिम बांधवांमध्ये आहे. त्यामुळे दरवर्षी या यात्रेला जाणाऱ्या इ्च्छुकांची संख्या मोठी असते. नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी किमान एक हजार भाविक हज यात्रेला जातात. यंदा महाराष्ट्रातून ५५ हजार मुस्लिम बांधवांनी हज यात्रेसाठी अर्ज केले होते. ग्रीन हाऊससाठी (फर्स्ट क्लास) २ लाख १९ हजार ९५० तर अमिमियासाठी (सेकंड क्लास) एक लाख ८६ हजार ५० रुपये भरण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातून अर्ज केलेल्या १५०० जणांची सरकारने लॉटरी पद्धतीने निवड केली आहे. हे सर्वजण मुंबईहून विमानाद्वारे हज येथे जाणार आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात ओझर येथील विमानतळावरुन शेळ्या-मेंढ्यांची शारजाह येथे निर्यात करण्यात आली आहे. तसेच, ओझर येथे अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनलही आहे. या बाबींचा विचार करता हजसाठी मुंबईऐवजी थेट ओझरहून विशेष विमान पाठविता येईल का, याचा गांभिर्याने विचार सुरु आहे. त्यादृष्टीने चाचपणीही केली जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ऑगस्ट महिन्यात हज यात्रा सुरू होत असून, जवळपास वीस दिवस अवधी असल्याने तांत्रिक आणि इतर बाबी येत्या काळात जुळून येऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे ओझरहून थेट सेवा दिली गेल्यास नाशिक, मालेगाव आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुस्लिम बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ट्रॅव्हल कंपन्याही इच्छुक

दरम्यान, ओझर येथून हजसाठीच्या विशेष सेवेबाबत खासगी ट्रॅव्हल कंपन्याही इच्छुक आहेत. या कंपन्यांनी हॅनहोव्हर येथील प्रशासनाशी संपर्क करुन विमानसेवा देण्याबाबत बोलणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी-अधिकाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

बदली होऊनही मुख्यालयात फिरणाऱ्या महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना चाप लावण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आता सर्वांसाठी ओळखपत्र सक्तीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावावे लागणार असून, नियुक्त जागेव्यत‌िरिक्त फिरतांना आढळल्यास थेट कारवाईचा सामना करावा लागणार आहे. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीही डॉ. प्रवीण गेडाम स्टाईल कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी गनिमी काव्याचा वापर करण्याचा निर्णय घेत


पालिका मुख्यालयातून बदली होवूनही अनेक कर्मचारी व अधिकारी हे मुख्यालयातच बदलीपूर्व ठिकाणी काम करतात. शेखर कावळे हा नाशिकरोडला घरपट्टीत बदली झाला होता. तरीही त्याने बांधकाम विभागात येवून लाच स्वीकारली. त्यामुळे आयुक्त कृष्णा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तातडीने हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिपत्रक काढून ओळखपत्र वापरणे सक्तीचे केले आहे. जो कर्मचारी ओळखपत्र वापरणार नाही त्यावर थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.तसेच गैरहजर व अनुपस्थित राहणा-या कर्मचा-यांसाठी लवकरच गनीनी काव्याने कारवाई केली जाणार असल्याचे संकेत त्यानी दिले आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नराधमांना कठोर शिक्षा करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अत्याचार व हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. या घटनेची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर महिनाभराच्या आत कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे करण्यात आली. कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणानंतर शहरात आंदोलनांचा भडका उडाला आहे. मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांनी काळ्या फिती लावून मूक मोर्चाद्वारे निषेध नोंदविला. बी. डी. भालेकर मैदानावरुन या मोर्चाला सुरुवात झाली. शाल‌िमार, रेड क्रॉस सिग्नल, मेहेर चौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. या मोर्चात शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, माकपच्या पदाधिकाऱ्यांसह अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. घोषणाबाजी न करता आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचले. तेथे सीबीएसच्या मुख्य रस्त्यावरच छोटेखानी सभा झाली. आरोपींना फाशीपेक्षाही कठोर शिक्षा लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात डॉ. डी. एल. कराड, अजय बोरस्ते, अॅड. रवींद्र पगार, शरद आहेर, यतीन वाघ, करण गायकर, अॅड. राहुल ढिकले, डॉ. संदीप कोतवाल, विक्रम कदम, विलास शिंदे, अनिल मटाले, अर्जुन टिळे, विलास सातभाई, माधुरी भदाणे, हेमलता पाटील, काजल गुंजाळ, युवराज धात्रक, आकाश पगार, आदी सहभागी झाले होते. आरोपींना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या सर्वांनीच केली. राजकीय पक्ष आणि संघटनांच्या भावना निश्चितपणे राज्य सरकारपर्यंत पोहोचवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

भाजपने राखले अंतर या महामोर्चामध्ये सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असले, तरी भारतीय जनता पक्षाने मोर्चापासून अंतर राखल्याचे पहावयास मिळाले. संशयितांवर कठोर कारवाईसाठी भाजप टीकेचा धनी ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images