Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लिप‌िकांचे लेखणीबंद आंदोलन

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या लिप‌िकवर्गीय कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पेमध्ये सुधारणा करा, प्रशासकीय बदल्यांचे अन्यायकारक धोरण रद्द करा, अशा विविध मागण्यासाठी शनिवारपासून राज्यभर बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील १५०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिप‌िकवर्गीय कर्मचारी संघटेतर्फे विविध मागण्यांसाठी वेळोवेळी बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली आहे. पण हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसत कामबंद आंदोलन पुकारले असल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यात मुख्यालय स्तरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत लिपीकांनी सहभाग घेतला आहे. राज्य सरकारकडे

१५ मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, त्यातील प्रत्येक मागणीला शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात

आल्याचे राज्य कोषाध्यक्ष बाळासाहेब टिळे, हेमंत सानप, सदाशिव बारगळ, अरुण दोंदे, अंबादास पाटील, राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाघ हत्याकांडातील परदेशी गँगला कोठडी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील सुनील वाघ हत्याकांडातील संशयित व मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या कुंदन परदेशी गँगला विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी शनिवारी दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

कुंदन सुरेश परदेशी (रा.दळवी चाळ, हनुमानवाडी), याच्यासह मयूर शिवराम कानडे (रा. मेहरधाम, पेठरोड), श्रीनिवास सुरेंद्र कानडे (रा. विसेमळा, कॉलेजरोड), मयूर गोपाल भावसार (यशोदानगर, मेहरधाम), आकाश विलास जाधव (रा. मखमलाबादनाका, पंचवटी), अजय जेठा बोरिसा (रा. चैतन्य सोसा. साईबाबा मंदिराशेजारी पंचवटी), करण रवींद्र परदेशी (रा. दळवीचाळ, हनुमानवाडी), अक्षय कैलास इंगळे (रा. हनुमानवाडी, पंचवटी) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

मखमलाबाद मार्गावरील क्रांतीनगर येथे २७ मे रोजी भेळ विक्रेता सुनील रामदास वाघ याची निघृण हत्या करण्यात आली होती. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला होता. यामध्ये सुनीलचा भाऊ हेमंत हा देखील गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ पाच ते सहा संशयितांना अटक केली. दोघांना येवल्यातून ताब्यात घेतले. या टोळीचा मुख्य सूत्रधार कुंदन परदेशी, अक्षय इंगळे व अजय बोरिसा फरार होते.

या टोळीने पंचवटीतील एका बांधकाम व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या घरावर गोळीबार केला होता. त्यामुळे पोलिस त्यांच्या मागावर होते. तिघेही कोर्टाच्या आवारातच पोलिसांच्या हाती लागले. त्यांची रवानगी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.ॉ या सर्व संशयितांवर पोलिसांनी यापूर्वीच मोक्कान्वये

कारवाई केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव कोर्टाने कारवाई फेटाळली. मात्र पोलिसांनी पुन्हा परदेशी गँगवर संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार मोक्कान्वये कारवाई केली. या आठ संशयितांना आज कडेकोट बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आले. संशयितांना आर्थिक पुरवठा तसेच सहाय्य करणाऱ्यांचा शोध घेता यावा, यासाठी त्यांना १० दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण व सरकारपक्षाच्या वकीलांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकूण कोर्टाने संशयितांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकीलवाडीने अनुभवला थरार!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वक‌ीलवाडीसारख्या गजबजलेल्या परिसरात सुमारे ४० वर्षांपूर्वीचे कडू निंबाचे झाड उन्मळून पडले. या झाडाखाली सापडल्याने तीन जण जखमी झाले असून, दोन कार आणि तीन मोटरसायकलींचेही मोठे नुकसान झाले. महावितरणच्या खांबाचेही नुकसान झाल्याने परिसरातील विजेचा खेळखंडोबा झाला. शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर वैद्य (वय २४, रा. इंदिरानगर) आणि हासीम कुरेशी (वय २५, रा. सिडको) अशी या घटनेत जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. वक‌ी‌लवाडीतील हाजी मिठाई या दुकानाजवळ कडूनिंबाचे झाड आहे. या परिसरात येणारे लोक या झाडाखाली वाहने उभे करतात. शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास हे झाड अचानक उन्मळून पडले. त्याचवेळी तेथून मोटरसायकलवर चाललेले दोन तरूण या झाडाखाली सापडले. वर झाड आणि खाली दुचाकी यात तरुणाचा पाय अडकल्याने त्या तरुणाला काढण्यासाठी नागरिकांनी धडपड सुरू केली. हा परिसर वर्दळीचा असल्याने बघ्यांची गर्दीही होऊ लागली. पोलिस तसेच अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. तीस ते चाळीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर दोघांना सुखरूप बाहेर काढून सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

स्थानिक व्यापाऱ्यांनी बचाव कार्यात मदत केली. अग्निशमन दलाच्या दोन रेस्क्यू व्हॅन तसेच पंचवटी, के. के. वाघ कॉलेज आणि मुख्यालयाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्यात सहभाग घेतला. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अनिल महाजन यांच्यासह जगदीश आहिरे, संजय कानडे, पंड‌ित पगारे, सुनील घुगे, सुनील शिलावट, इरफान पानसरे, महेंद्र सोनवणे, राजेंद्र पवार आदांनी झाड हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

घटनास्थळी झालेल्या गर्दीमुळे वकीलवाडी आणि एम. जी. रोड परिसरात मोठ्या प्रमाणात

वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अग्निशमन दलाची वाहने तसेच पोलिसांनाही घटनास्थळावर ये-जा करताना कसरत करावी लागली. एमजी रोड आणि अशोक स्तंभ येथून वकीलवाडीकडे होणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली. बॅरिकेडस् टाकून हा रस्ता काही काळासाठी बंद ठेवण्यात आला. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी रस्त्यांचा अवलंब करावा लागला.

या घटनेमुळे जुन्या आणि धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वर्दळीच्या परिसरातील अशी धोकादायक झाड काढावीत, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, प्राथमिक उपचारानंतर जखमी तरूणांना सिव्ह‌िल हॉस्प‌िटलमधून घर सोडण्यात आले आहे.

...या वाहनांचे झाले नुकसान

या घटनेत दोन कारसह तीन मोटरसायकलींचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये सुनील ठ‍क्कर यांची एमएच १५ बीएल ३३८७ ही कार आणि इमरान शेख यांची एमएच १५ सीटी ५४१९ या कारचे नुकसान झाले आहे. याखेरीज एमएम १५ डीजी २९८०, एमएच १५ टीसी ७५२ आणि एमएच १५ बीई ९७४६ या मोटरसायकलींचे नुकसान झाले.

सेल्फीप्रेमींच करायचं काय ?

घटनास्थळी दोन युवक झाडाच्या अवजड बुंध्याखाली विव्हळत असताना त्यांना मदत करण्याचे सोडून अनेकजन सेल्फी आणि मोबाइलवर फोटो काढण्यात धन्यता मानत होते. त्यामुळे मदत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता. नागरिकांचे मोबाइल प्रेम यावेळी टीकेचा विषय बनला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंदुकीचा धाक दाखवून लुटमारीचे प्रकार शहरात सुरूच आहेत. खोडेनगर परिसरात अशाच प्रकारे तरुणाची लूट करण्यात आली. विशेष म्हणजे रिक्षाचालक व त्याचा साथीदार राजरोसपणे अशाप्रकारे विद्यार्थ्यांची लुटमार करीत असल्याने खळबळ उडाली आहे.

संकेत राजाराम खोडे (वय १९, रा. परबनगर, इंदिरानगर) या तरुणाने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तो नाशिकरोड येथे जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. घरापासून काही अंतरावरच रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराने त्याला बळजबरीने रिक्षात बसविले. यानंतर खोडेनगर हरिओमनगरमार्गे जात असताना सावता माळी मार्गावर रिक्षातील एकाने त्याला पिस्तुलचा धाक दाखवून गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल व काही रोकड असा ६६ हजार रुपयांचा ऐवज लुटला. त्यानंतर त्याला निर्जन ठिकाणी उतरवून दिले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. महिनाभरातील ही अशाप्रकारची चौथी घटना आहे. उपनगर हद्दीतील फेम थिएटरसमोर उभ्या तरुणाजवळील मोबाइल व रोकड रिक्षाचालकाने अशाप्रकारे लुटली होती. दुसरी घटना पंचवटीतील अमृतधाम भागात घडली होती. चहा पिण्यासाठी जाणाऱ्या दोघा भावंडांना रस्त्यात अडवून पिस्तूलचा धाक दाखवून जबरी लूट करण्यात आली होती. या घटनेत रिक्षातील संशयितांनी सहा हजारांच्या रकमेसह दोन मोबाइल लांबविले होते. पंचवटीतील एकास मारण्याची धमकी देत रिक्षातील दोघांनी एक लाखाची मागणी केली व नंतर पिस्तूलचा धाक दाखवून हातातील सोन्याची अंगठी, महागडा मोबाइल व काही रोकड हिसकावून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परकीय गुंतवणुकीमुळे बेरोजगारीचे सावट’

$
0
0



म. टा. प्रतिनीधी, सातपूर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशी गुंतवणूक भारतात आणण्यास आतूर झाले आहेत. परंतु, ही गुंतवणूक आल्यास देशावर बेरोजगारीचे सावट वाढणार असल्याचा हल्लाबोल सीटूचे सरचिटणीस खासदार तपन सेन यांनी केला. डीजीपीनगर-२ येथील माऊली लॉन्स येथे कामगार मेळाव्यात सेन बोलत होते. मोदी सरकार पूर्णतः कामगारांच्या विरोधात असून, कामगार चळवळ संपविण्याचा सरकारचा कुटील डाव आहे, असा आरोपही सेन यांनी केला.

सीटू भवनात तीन दिवस चाललेल्या कामगार नेत्यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीचा समारोप माऊली लॉन्स येथे भव्य कामगार मेळावा घेऊन करण्यात आला. याप्रसंगी व्यासपिठावर जेष्ठ कामगार नेते तथा रेल्व कामगार नेते बसुदेव आचार्य, सीटूचे राज्य अध्यक्ष नरसय्या आडम, किसान सभेचे नेते जीवा पांडू गावित, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, देविदास आढोळे, श्रीधर देशपांडे, अॅड. वसुधा कराड, नगरसेवक तानाजी जायभावे, सीताराम ठोंबरे यांसह हजारोंच्या संख्येने कामगार उपस्थित होते.

खासदार सेन म्हणाले, की मोदींनी खोटी भाषणे करीत भारतीयांना वेड्यात काढून सत्ता आणली आहे. ते मीडियाशी बोलतांना देश पुढे जात आहे. प्रगतीच्या वाटेवर आहे. चीनच्याही पुढे भारत गेला आहे, असे सांगतात. परंतु, प्रत्यक्षात दरवर्षी हजारो कामगार बेरोजगार होत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, याचा विसरच मोदींना पडला असल्याचा आरोप सेन यांनी केला.

भारतात युवा शक्ती अधिक असल्याचे मोदीच भाषणात सांगतात. परंतु, तेच मोदी विदेशी गुंतवणूक आणून आहे त्या कामगारांना बेरोजगार करण्यामागे लागले आहेत. शेतक-यांच्या बाबतीत देखील कुठलेच ठोस उपाय मोदी सरकारकडे नसल्याने आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन वर्षांत गव्हाचे उत्पादन पाच लाख हेक्टरवर कमी झाले असल्याचाही दावा सेन यांनी केला. सत्ता आणण्यासाठी दोन कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे म्हणणा-या मोदी सरकारकडून रोजगार तर उपलब्ध झाला नाही, पण बेरोजगारीचे प्रमाण झपाट्याने वाढविले असल्याचा आरोपही सेन यांनी केला. येत्या २ सप्टेंबरला मोदी सरकारला कामगार व शेतकरी काय असतो, हे देशव्यापी बंदमधून

दाखवून देणार आहोत, असा इशाराही सेन यांनी दिला.

सीटूचे राज्य अध्यक्ष माजी आमदार आडम यांनी विडी कामगारांना देशोधडीला लावण्याचे मोठे पाप मोदी सरकारने केला असल्याचा आरोप केला. किसान सभेचे नेते गावित यांनी रोजगार वाढविण्याऐवजी बेरोजगारच मोदींच्या काळात झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नाशिक जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यात सुमारे ३६ लाखांच्या मद्यासह ५५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात जव्हार रोडवरील अंबाई फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. पथकाने दोन संशयितांना अटक केली असून, अन्य चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दमण येथे उत्पादित केलेले मद्य नाशिकमध्ये विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक सुभाष जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार दुय्यम निरीक्षक अशोक तारू, प्रदीप अवचार शुक्रवार (१५ जुलै) पासून नाशिक जव्हार रस्त्यावरील वाहतुकीवर लक्ष ठेऊन होते. शनिवारी (१६ जुलै) सकाळी सातच्या सुमारास एक १० चाकी ट्रक दमनहून नाशिकच्या दिशेने चालला होता. राज्य उत्पादनच्या पथकाने अंबोली गावाजवळील अंबाई फाटा येथे आर. जे २३ जी.ए ३०८५ क्रमांकाचा ट्रक अडविला. त्याची पाहणी केली असता त्यामध्ये दमनमध्ये उत्पादित केलेले विदेशी मद्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले. १९ लाख ९२ हजार रुपये किमतीचे ४१५ बॉक्स विदेशी मद्य आणि १२ लाख २० हजार ४०० रुपये किमतीचे १५१ बिअरचे बॉक्स असा अवैध साठा यावेळी आढळून आला.

पथकाने ट्रकचालक गुलाम मुर्तुझा तोहीद खान (वय २४, रा. बलिठा, वापी) आणि सुनील राजमन दुबे (वय ३२ रा. वापी) यांना अटक केली. मद्यसाठ्यासह दोन मोबाइल आणि ट्रक असा तब्बल ५५ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दमण येथे मद्य निर्मिती करणाऱ्या संशयित धनसुख भाई कांमळी (रा. दमण), गाडी मालकासह अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी तारू यांनी फिर्याद दिली असून, दारूबंदी गुन्ह्यांतर्गत संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाती देशात हिट ठरणार कार्गो सेवा

$
0
0

२१ जुलैला पुन्हा बकऱ्यांची होणार निर्यात

bhavesh.brahmankar @timesgroup.com

नाशिक : ओझरहून शारजाह येथे १६४८ शेळ्या-मेंढ्यांची यशस्वी निर्यात झाल्यानंतर आखाती देशात कार्गो सेवा थेट कनेक्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २१ जुलैला पुन्हा शेळ्या-मेंढ्यांची निर्यात केली जाणार असून, त्यापाठोपाठ कृषीमालासह अन्य उत्पादनांच्या निर्यातीलाही चालना मिळणार आहे.

एचएएलच्या अखत्यारीतील ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणाहून सप्टेंबर २०११ मध्ये कार्गो सेवेचा श्रीगणेशा झाला. एचएएल आणि कॉनकॉर यांच्या संयुक्त विद्यमाने हॅलकॉन या कंपनीद्वारे ही सेवा सुरू करण्यात आली. मुंबईहून देशासह परदेशात होणाऱ्या मालवाहतुकीला ओझर हा पर्याय करण्याचे विचाराधीन होते. यासाठीच ओझर येथे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. मात्र कार्गो सेवेला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर डिसेंबर २०१२ मध्ये एअरब्रिज कार्गो एअरलाईन्स्चे बोईंग ७४७-४०० इआरएफ (एक्स्टेंडेड रेंज फ्रेटर) हे ५८ मेट्रिक टन क्षमतेचे रशियन मालवाहू विमान ओझरच्या विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. तेरा बॉक्सची ही आयात यशस्वी ठरली. त्यानंतरही कार्गोची सेवा जमिनीवरच राहिली. पण, अमिगो लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड आणि सानप अॅग्रो अॅनिमल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नातून ओझरहून थेट शारजाह येथे १६४८ शेळ्या-मेंढ्यांची निर्यात शुक्रवारी संध्याकाळी करण्यात आली. अवघ्या तीन तासांत ओझरहून शारजाह येथे माल पोहचू शकतो, हे यातून सिद्ध झाले आहे. आखाती देशामध्ये भारतातून शेळ्या-मेंढ्या समुद्र बोटींमार्गे निर्यात केल्या जातात. साधारण चार दिवसांच्या प्रवासात या प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते. मान्सूनकाळात (पावसाळा) भारतातून आखातात होणारी निर्यात ठप्प असते. ही निर्यात थेट सप्टेंबरमध्येच सुरू होते. आखातात मोठी मागणी असतानाही निर्यात नसल्याने शेळ्या-मेंढ्यांचे दर तेथे अधिक असतात. मात्र, या साऱ्या प्रकारावर अमिगो आणि सानप या दोन्ही कंपन्यांनी तोडगा काढत थेट ओझरहून विमानाद्वारे प्राण्यांची निर्यात करण्याचा धाडसी प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. या निमित्ताने ओझरची कार्गो सेवा देशभरातच चर्चेची बनली आहे. शनिवारी दुबईच्या प्राणी बाजारात (कॅटल मार्केट) केवळ नाशिकच्याच शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती सानप प्रा. लिचे संचालक जयंत आणि प्रशांत सानप यांनी 'मटा'शी बोलताना दिली. दरम्यान, एचएएल आणि कस्टम यांनी केलेल्या सहकार्यातूनच हा प्रयोग यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे, इमिग्रेशनच्या प्रक्रियेसाठी एचएएलने गो एअरच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण केले होते. त्यामुळे सर्वंकष प्रयत्नातून कार्गो सेवेला मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत. (क्रमशः)

समुद्रमार्गे होणाऱ्या निर्यातीपेक्षा हवाई निर्यातीला दुप्पट खर्च येतो. पण, सप्टेंबरपर्यंत ठप्प असलेली निर्यात हवाईमार्गे कार्यरत होऊ शकते, हे यातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे येत्या २१ जुलै रोजी पुन्हा शेळ्या-मेंढ्यांची निर्यात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- हेमंत सानप, संचालक, सानप अॅग्रो अॅनिमल्स प्रा. लि.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ दोन्ही मुलींचे मृतदेह आढळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

भगूर-पांढुर्ली मार्गावरील दारणा नदीपात्रात आपल्या दोन मुलींसह विवाहितने गुरुवारी आत्महत्या केली होती. यापैकी विवाहितेचा मृतदेह शुक्रवारी, तर दोन्ही मुलींचे मृतदेह शनिवारी आढळून आले.

विंचूरी दळवी येथील योगिता संदीप शेळके (वय २७) हिने आपल्या दोन मुली, सोनाली (वय ४) आणि मोनाली (वय २) यांच्‍यासह दारणा नदीत उडीत घेऊन गुरुवारी आत्महत्या केली होती. योगिताचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला, तर सोनाली व मोनाली यांचे मृतदेह शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोनवडे गावाजवळील नदीपात्रात आढळून आले. सोनाली व मोनाली यांचे मृतदेह तिचे चुलत चुलते विलास शेळके यांनी ओळख पटविल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

दरम्यान, योगिता हिच्या मृतदेहावर माहेरी नाणेगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी माहेरच्या लोकांनी योगिताच्या सासरच्यांविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये भादंवि ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक लोकरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३४७ ठिकाणी साचते पाणी महापालिकेच्या नोटिसा

$
0
0

नदीकाठावरील १९६ घरांना महापालिकेच्या नोटिसा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक भागात साचलेल्या पाण्याची महापौर अशोक मुर्तडक यांनी गंभीर दखल घेतली आहे. सर्व विभागांकडून त्यांनी पावसाळ्याचे पाणी साचण्याचे स्पॉट शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरात जवळपास ३४७ ठिकाणी पावसाळ्याचे पाणी साचत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सर्व स्पॉट तत्काळ बंद करण्याचे आदेश त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच महापालिकेने शहरातील १८४ धोकेदायक घरांना, तर नदीकाठावरील १९६ घरांना नोटिसा बजावल्या आहेत.

गेल्या आठवड्यात दोन दिवसात झालेल्या विक्रमी पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते बंद झाले होते. याबाबत आमदार देवयानी फरांदेसह नागरिकांना थेट पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे महापौर अशोक मुर्तडक यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना शहरात कोणत्या ठिकाणी पाणी साचते ती ठिकाण शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सर्व्हेक्षण केले आहे. पाणी साचल्याने या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढू शकते. शहरात रोगराईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

३८० नोटिसा

महापालिकेच्या हद्दीत पावसाळ्यात दुर्घटना होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीन शहरातील १८४ धोकेदायक घरे व वाड्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये नाशिकरोड भागात ६१, नाशिक पश्चिम ६४, सातपूर १८, सिडको ३६ घरांचा समावेश आहे. नदीकाठावर राहणाऱ्या १९६ घरांना पुराचा धोका संभवतो म्हणून पालिकेच्या वतीने सुरक्षात्मक उपाय म्हणून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

ठेकेदाराने पूल तोडला

सिंहस्थात चोपडा लॉन्स येथे नव्याने पूल बांधण्यात आला आहे. परंतु, पूल बांधताना संबंधित ठेकेदाराने पाण्याच्या निचरा होण्याची चारीच बंद केली. त्यामुळे रस्त्याचे पाणी थेट पुलावर येऊन रस्ताच बंद करावा लागला होता. तक्रारी जाताच संबंधित ठेकेदाराने पाण्याचा निचरा होण्यासाठी थेट पुलालाच क्रॅक करून तोडफोड करीत पाणी काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुलाचे नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथा पंधरा फुटांच्या झाडांची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रस्त्यावरील झाडे तोडण्याच्या बदल्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार शहरात २१ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेने टाकलेल्या कठोर अटी-शर्तींमुळे ही वृक्षलागवडच अडचणीत सापडली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने दहाऐवजी १५ फुटांची झाडे लावण्याच्या जाचक अटींमुळे ठेकेदारांनीच माघार घेतली आहे. पंधरा फूट झाडाचे बुंधे रस्त्यावरच बसत नसल्याने व ती जगतही नसल्याने पाच ठेकेदारांनी काम अर्धवट सोडले आहे. त्यामुळे महापालिकेला ही रखडलेली प्रक्रिया पुन्हा पहिल्यापासून सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी १५ फुटांची अट आता १० फुटांवर आणण्यात येणार आहे.

सिंहस्थापूर्वी शहरातील रस्ते रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्यात आली. त्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे हायकोर्टाने एका झाडाच्या बदल्यात पाच जिवंत झाडे लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने साडेपाच कोटी रुपये खर्चून २१ हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ठेकेदारांना १५ फूट झाड लावण्याची अट टाकण्यात आली. फेब्रुवारीमध्येच ही झाडे लावायची होती; परंतु सुरुवातीला एवढी उंच झाडे लावण्यास ठेकेदार पुढे आलेच नाहीत. त्यामुळे या झाडांसाठी तीनदा निविदा काढण्यात आल्या. त्यानंतर कसेबसे आठ ठेकेदार महापालिकेला मिळाले. मात्र, त्यांनी उन्हाळ्यात झाडे लावण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेने त्यांना पावसाळ्यात झाडे लावण्याची सूट दिली. यातील पाच ठेकेदारांनी पश्चिम बंगाल, आसाममधून १५ फूट उंचीची दोनशे झाडे आणली.

पावसाळ्यात ही झाडे लावण्याचा प्रयत्न ठेकेदारांनी केला. मात्र, तो अपयशी ठरला आहे. रस्त्यावर १५ फूट उंचीचे झाड लावण्यासाठी जमिनीत झाडाला आवश्यक पकड मिळत नाही. त्यामुळे ठेकेदाराने लावलेली सुरुवातीची २१ झाडे जगलीच नाहीत. त्यामुळे उर्वरित झाडे लावण्यास सर्वच ठेकेदारांनी आता पुन्हा नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची तयारी सुरू केली आहे. या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून नव्याने निविदा काढल्या जाणार आहेत. मात्र, पहिल्या वेळेस केलेली चूक आता महापालिका टाळणार आहे. झाडाची अट आता १५ फुटांवरून १० फुटांवर आणण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीला जादा बोगी नाहीच !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानच्या चौथ्या प्लॅटफॉर्मवरील तिकीट कार्यालय सुरू ठेवावे, त्याची योग्य प्रसिद्ध करावी, पंचवटी रेल्वेगाडीला जादा बोगी जोडाव्यात आदी मागण्या रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आल्या. दरम्यान, पंचवटीला जादा बोगीची मागणी रेल्वेने फेटाळली. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

भुसावळ येथे रेल्वेचे भुसावळ विभाग प्रमुख सुधीककुमार गुप्ता, अरुणकुमार गुप्ता, उपप्रबंधक आचार्य तसेच रेल्वेचे सर्व विभागाचे अधिकारी या बैठकीला हजर होते. नाशिककरांतर्फे समितीचे सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे यांनी मांडली.

राजेश फोकणे म्हणाले की, पंचवटी एक्सप्रेसमधील प्रवाशांचे हाल लक्षात घेता नाशिकमध्ये उघडणारी पासधारकांची बोगी जोडण्याचे रेल्वेने मागच्या बैठकीत मान्य केले होते. अधिकाऱ्यांनी पाहणीही केली होती. परंतु, कार्यवाही झालेली नाही. गेल्या फेब्रुवारीत पंचवटी पासधारकांच्या बोगीची मोजणी झाली. त्यामध्ये या बोगींची सरासरी उपयोगिता ४९ टक्के (१०८ पैकी ५३) असल्याचे दिसले. मे मध्ये पुन्हा पाहणी झाली, तेव्हा उपयोगिता ५२ टक्के आढळली. त्यामुळे जादा बोगी जोडणे संयुक्तिक नाही. फोकणे म्हणाले की, फ्लॅटफार्म एकवर रेल्वे पोलिस दलाच्या मागे सुरक्षेसाठी बॅरिकेडींग लावले आहेत. ही जागा तसेच आरक्षण केंद्राच्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करावे. त्यावर अधिकाऱ्यांनी प्रस्तावावर विचार करु, फ्लॅटफार्मवर थेट वाहने नेऊ नयेत यासाठी उपाययोजनेच्या सूचना दिलेल्या आहेत असे सांगितले.

तिकीट कार्यालय सुरू करा

नाशिकरोड पूर्व स्थानकावरील तिकीट कार्यालय सुरु करावे, चौथ्या फ्लॅटफार्मचा वापर रेल्वेगाड्यांसाठी करावा, अशी मागणी नितीन चिडे यांनी केली. ऑक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१६ या कालावधीत या तिकीट कार्यालयातून दिवसाला सरासरी १२३ तिकीटे विकली गेली. ते परवडत नसल्याने हे तिकीट कार्यालय बंद करण्यता आले. १२ जुलैपासून ते पुन्हा सुरु झाले आहे. काही दिवस आढावा घेतल्यानंतर ते सुरु ठेवायचे की, नाही याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. नाशिकरोड स्थानकात हबीबगंज (गुरुवार) आणि दुरांतो गाड्यांना थांबा द्या, अशी सूचना चिडे यांनी केली. त्यावर प्रशासनाने सांगितले की, हबीबगंज साप्ताहिक एक्सप्रेसला नाशिक येथे थांबा देण्यासाठी रेल्वे मुख्यालयाला पत्र दिल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गत रविवारी स्वत:चेच सर्व रेकॉर्ड निकालात काढणाऱ्या पावसाचा जोर आठवडाभरातच ओसरला आहे. गत रविवारी (१० जुलै) अवघ्या नऊ तासांत शहरात १३२ मि. मी एवढा रेकार्डब्रेक पाऊस पडला होता. मात्र या रविवारी (दि. १७ जुलै) शहरात अवघा ०.२ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातही सकाळी साडेआठपर्यंत अवघ्या ४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. सिन्नर, मालेगावसह जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांत पावसाने दांडी मारली.

गत आठवड्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी मदतगार ठरणाऱ्या त्र्यंबकेश्वर पाणलोट क्षेत्रात एकाच दिवशी सर्वाधिक १५० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीला पूर आला होता. गत रविवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊच तासांत जिल्ह्यात ९९१ मि.मी. पाऊस पडला. पाणलोट क्षेत्रात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा १५ वरून ३८ टक्क्यांवर पोहोचला. गत रविवारच्या तुलनेत यंदाचा रविवार (दि. १७ जुलै) पूर्णत: कोरडाच गेला. जिल्ह्यात कमाल तापमान २८.१ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत शहरात अवघ्या २.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच याकाळात पावसाचा जोर अधिकच ओसरला. या नऊ तासांत शहरात अवघा ०.२ मि.मी. पाऊस झाला. वातावरण ढगाळ असले तरी पावसाने मात्र हुलकावणी दिली. पावसाने दिलेली उघडीप आणि रविवारची सुटी यामुळे नाशिककरांनी पर्यटनाची पर्वणी साधली. त्र्यंबकेश्वरसह अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी पहावयास मिळाली.

आठ तालुक्यांत पावसाची दांडी

जिल्ह्यात शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत ६१ मि.मी. पाऊस झाला. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक ३२ मि.मी., तर पेठ तालुक्यात १२ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वरमध्ये ७ मि.मी. पाऊस झाला. मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण, देवळा, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये पावसाने दांडी मारली. येवला, सुरगाणा आणि नाशिक तालुक्यातही जेमतेम पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यरात्री रिक्षांची तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा हाकणाऱ्या चालकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती आढळून येतात. अनेकदा या व्यक्ती प्रवाशांना लुटतात किंवा त्यांच्याकडून जादा भाडे आकरतात. या पार्श्वभूमीवर क्राईम ब्रँचचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी रविवारी पहाटे १ ते ४ या काळात पाच ते सहा पथकांच्या मदतीने तपासणी मोहीम राबवली. पोलिसांनी तब्बल ७५ संशयित रिक्षांवर कारवाई केली.

गेल्या महिन्याभरात रिक्षाचालकाने वेगवेगळ्या ठिकाणी युवकांना बंदुकीचा धाक दाखवून लुटून नेल्याच्या चार घटना घडल्या. तसेच रात्रीच्या सुमारास रिक्षाचालकांकडून प्रवाशांना लुबाडण्यात येत असल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचल्या होत्या. रिक्षाचालक म्हणून काही संशयित काम करीत असल्याचे वारंवार समोर आले असून, या पार्श्वभूमीवर धिवरे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षांची तपासणी मोहीम हाती घेतली. शहरातील १३ पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांनी रिक्षाचालक म्हणून काम करणाऱ्या गुन्हेगारांचा, नियमबाह्यपध्दतीने रिक्षा हाकणाऱ्यांचा शोध घेतला. यासाठी सहा पथके तैनात करण्यात आली होती. तपासणीदरम्यान रिक्षाचालकांचे ओळखपत्र, रिक्षांची कागदपत्रे पोलिसांनी तपासली. रिक्षाचालकाचा संशय आल्यास त्याला अधिक चौकशीसाठी लागलीच जवळच्या पोलिस स्टेशनला पाठवण्यात आले.

१४४ रिक्षाचालकांची चौकशी

पहाटे एक ते चार या कालावधीत पोलिसांनी १४४ रिक्षाचालकांची तपासणी केली. तसेच ७५ रिक्षा जप्त केल्या. याबरोबर ७ रिक्षाचालकांना १ हजार ३०० रुपयांचा दंड आकरला. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे. तसेच प्रवाशांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमदार पावसाने शेतीकामांना वेग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहर आणि तालुक्यात गेल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने गेल्या आठ दिवसांत तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यातील ८६ टक्के क्षेत्रांवर पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे अत्यल्प आणि असमान वितरण राहिल्याने केवळ ३९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. गेल्या आठवड्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे पेरणीच्या क्षेत्रांत कमालीची वाढ झाली आहे. या पावसाने धरणसाठ्यातही वाढ होत पाणीसंकट टळले आहे. तालुक्यात खरीपचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ७९ हेक्टर असून आतापर्यंत एकूण ६८,९४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे झाली आहेत.

तालुक्यात जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. त्यामुळे जून व जुलैचा पहिला आठवडा उलटूनदेखील तालुक्यात पेरणीची कामे खोळंबली होती. मात्र १० जुलै रोजी तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. यात २४ तासातच जूनच्या १०२ मिलीमिटर एवढा पाऊस झाला होता. यामुळे गिरणा व मोसम नदी क्षेत्रात पूरपाणी देखील वाहू लागले.

यानंतर तालुक्यात खरीपच्या पेरणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यातही तृणधान्यात सर्वाधिक क्षेत्र मक्याचे असून २४,५४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर त्या खालोखाल १६,९८५ हेक्टर इतक्या क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे.

११५ मिमी. पावसाची नोंद

शहरातील पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले आहे. चणकापूर धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली असून एकूण ४५ टक्के पाणीसाठा शनिवारपर्यंत झाला असून ६६८ क्युसेस पाणी नदीपत्रात सोडण्यात आले आहे. तालुक्यात आतापर्यंत ११५ मिमी. इतका पाऊस झाला आहे. त्यातील ९१ मिमी पाऊस गेल्या पंधरा दिवसात झाला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या १०२ मिलीमिटरच्या सरासरी ९० टक्के म्हणजे ९१ मिमी. इतका पाऊस याच पंधरवड्यात झाला आहे. तर आतापर्यंत मालेगाव तालुक्यात झालेला पाऊस हा एकूण २३.९६ टक्के इतका झाल्याचे जाहीर आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवानगी नसताना उभारला माेबाइल टॉवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ झालेल्या नवीन दुमजली इमारतीवर परवानगी न घेता मोबाइल टॉवर उभारण्यात आला आहे. याला स्थानिक रहिवाशांचा विरोध असून निफाड नगरपंचायतीची परवानगीही नाही. तरीही या टॉवरचे काम सुरू असलेले टॉवरचे बांधकाम रविवारी (दि. १७) स्थानिक रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर नगरपंचायतीने बंद केले.

निफाडमधील संत जनार्दन स्वामी नगरमध्ये रेणुका अपार्टमेंट या नवीन झालेल्या इमारतीवर ७ ते ८ महिन्यांपूर्वी या टॉवरचे काम सुरू असताना स्थानिकांनी विरोध केला होता. त्यासाठी रहिवाशांनी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन नगरपंचायतीचे तत्कालीन प्रशासक तहसीलदार, प्रांत यांना निवेदनही दिले. त्यात या टॉवरमुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकत असल्याने या टॉवरला विरोध असल्याचे सांगत काम बंद पाडले होते. तसेच प्रशासनानेही संबंधिताने परवानगी मागितली असता परवानगी दिली नव्हती. मात्र रविवारी, सुटीचा दिवस पाहून या इमारतीवर पुन्हा या टॉवरचे काम सुरू करण्यात आले. हे काम पुन्हा सुरू झाल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी नगरपंचायतीचे नगरसेवक दिलीप कापसे यांना फोन करून याची माहिती दिली. यानंतर कापसे यांनी नगरपंचायतीचे कर्मचारी पाठवित हे काम बंद केले.

काय आहे प्रकार?

रेणुका अपार्टमेंटच्या इमारतीवरील टॉवर हा इंडस कंपनीचा आहे. ९ मीटर उंचीच्या या टॉवरवर अनेक मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क कनेक्शन आहेत. मात्र आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार या टॉवरच्या लहरींमुळे परिसरातील मानवी आरोग्यावर घातक स्वरूपाचा परिणाम होऊ शकतो. तसे अनेक रुग्णदेखील तपासले आहेत, त्यामुळे येथील रहिवाशांनी या टॉवरला विरोध केला आहे. नगरपंचायतीची परवानगी नसताना हा टॉवर उभारलाच कसा हा प्रश्न नागरिकांच्या समोर आहे.

या टॉवरसाठी आमच्याकडे परवानगी मागितली होती परंतु आम्ही स्थानिक रहिवाशांचा विरोध आणि आरोग्याचा निर्माण होणारा प्रश्न यामुळे परवानगी दिलेली नाही. तरीही बेकायदा सुरू असलेले हे काम त्वर‌ित बंद करत संबंधिताला नोटीस बजावणार आहोत.

राजाभाऊ शेलार, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यापाऱ्यांचे कार्यालय फोडले

$
0
0

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पिंपळगाव बसवंतला आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

शेतमालाच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी न होता पिंपळगाव बाजार समितीकडे खरेदी परवाने सादर करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी असोसिएशनच्या कार्यालय व फलकाचीही तोडफोड करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यापारी असोसिएशनच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार, उपाध्यक्ष साहेबराव मोरे, महानगर प्रमुख नितीन रोठे पाटील, कार्याध्यक्ष शरद लभडे, नीलेश कुसमोडे, किरण देशमुख, विकी गायधनी, संतोष गोराडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी व्हायचे नसेल, तर त्यांनी परवाने जरी परत केले असले तरी गाळे, खळे, मार्केट फी त्यांनी परत करावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत, असे वडघुले यांनी सांगितले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी साठवण केलेला माल मार्केटमध्ये जमा आहे. जीवनावश्यक वस्तू साठवू शकत नाही. मात्र व्यापारी याचे उल्लंघन करीत आहेत, असा आरोप केला. तसेच व्यापाऱ्यांची एकही मालवाहतूक गाडी बाहेर पडू न देण्याचा इशाराही दिला.

पिंपळगाव बसवंत परिसरातील कांदा व्यापाऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गावठी कांद्याची साठवणूक केली आहे. कांद्याचे लिलाव बंद करून मागणी वाढवत नफा मिळवायचा व्यापाऱ्यांचा डाव संघटना हाणून पाडेल. व्यापाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणीही आम्ही करीत आहोत.

- हंसराज वडघुले

युवा प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड रेल्वेस्थानकावर आधुनिक सुविधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

गेल्या दोन वर्षाँत मनमाडच्या रेल्वेस्थानकात ऑनलाइन पार्सल सुविधा, प्रवाशांसाठी स्वयंचलित तिकीट मशीन तसेच बालकांसाठी जननी सेवा यासारख्या आधुनिक सुविधा सुरू झाल्या आहेत. यासोबतच नवा पादचारी पूल, ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट ही विकासकामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती रेल्वेस्थानकात नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीत देण्यात आली.

या विशेष बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अजय कुमार, स्थानक प्रबंधक एन. पी. बडगुजर, वाणिज्य निरीक्षक अनिल बागले आदींनी दोन वर्षांच्या कालावधीत मनमाड रेल्वेस्थानकात झालेल्या विविध प्रवासीभिमुख सोयीसुविधांचा आढावा घेतला. रेल्वेस्थानकास अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी उपस्थितांनी स्पष्ट केले. रेल्वे सल्लागार समितीचे कांतीलाल लुनावत, उमाकांत रॉय, भाजपचे नितीन पांडे आदींनी मनमाड कसारा लोकल सुरू करा, प्रवाशांसाठी आरक्षण रद्द खिडकी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी एम. के. सैनी, रजनीश यादव, एस. पी. कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिशादर्शकाची हरवली दिशा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड-चांदवड तालुक्याच्या सीमेवरील देवरगाव गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशादर्शक फलकाचा पत्रा एका बाजूला पूर्ण निघाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनचालकांना रस्ता नेमका कुठे चालला, ठिकाणांचे अंतर किती या गोष्टींचा अंदाज येत नाही. त्यांची पूर्णत: गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. लवकरात लवकर याकडे लक्ष देत दुरुस्तीची मागणीही करण्यात आली आहे.

देवरगाव ता चांदवड हे निफाड चांदवड रस्त्यावरील गाव या गावाच्या जवळ हा दिशादर्शक भव्य बोर्ड लावला आहे मात्र आठ दिवस झालेत या बोर्डाच्या एका बाजूचा पत्रा चिरून फाटला आहे. एखाद्यावेळेस तो येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर पडून मोठा अपघात होऊ शकतो. याससाठी गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, चांदवड यांना याबाबत कळविले. परंतु त्यांनीही याची कोणतीही दखल घेतली नाही. या कमानीजवळ निफाड सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द संपते असेही लिह‌िले आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

हा मार्ग निफाड, चांदवड, सटाणा, मालेगाव, देवळा या गावांना जाण्यासाठी अत्यंत जवळच्या मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची चांगलीच वर्दळ सुरू असते. परंतु निफाड़ची हद्द संपली की देवरगाव ते भोएगाव, भोएगाव ते भाटगाव, भाटगाव ते शिरसाने व सोग्रस फाटा या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. हजारांपेक्षा जास्त खड्डे या मार्गावर आहेत. मात्र चांदवड सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकड़े दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर येथील लोकप्रतिनिधींनीही या गावांच्या रस्त्याकडे ढुंकूनही पाहत नाही, अशा प्रतिक्रिया या गावकऱ्यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलशुद्धीकरण केंद्राची दुर्दशा

$
0
0

सटाण्यात शिवसेनेकडून दूषित पाणीपुरवठ्याबाबत नगरपरिषदेला अल्टिमेटम

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राची दुर्दशा व केंद्राकरिता आवश्यक औषधे वापरण्यात येत नसल्याने शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होऊन विविध रोगांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रविवारी, (दि. १७) जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पालिका प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. यावेळी पालिका प्रशासनाकडून शहरवासीयांना होत असलेला पाणीपुरवठा अत्यंत दूषित असल्याचा दावाही शिवसेनेचे माजी नगरसेवक अरविंद सोनवणे यांनी केला.

सटाणा शहरात रविवारी सुटीचा दिवस साधून पहाटे शिवसैनिकांनी येथील जलशुद्धीकरण केंद्रास अचानक भेट दिली. या वेळी जलशुद्धीकरण केंद्राच्या कारभाराबाबतीत तक्रारी करण्यात आल्या. केंद्रात पाणी स्वच्छ करण्यासाठी ज्या प्रमाणात औषधे वापरली पाहिजेत ती वापरण्यात येत नसल्याचे यावेळेस उघडकीस आले. तसेच शुद्धीकरणाच्या अनुषंगाने अत्यावश्यक विद्युत मोटारी बंद आढळून आल्याने पाण्याचे शुद्धीकरण होते की नाही, ही बाब शिवसैनिकांनी निदर्शनास आणून दिली.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख सुभाष नंदन, शहरप्रमुख शरद शेवाळे, राजनसिंग चौधरी, आंनदा महाले, विराज सोनवणे, कल्पेश निकम आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील बाजार समित्या उद्यापर्यंत राहणार बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक जिल्ह्यातील सर्व बंद असलेल्या बाजार समित्यांचा निर्णय मंगळवारी सकाळी पणन मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन करण्यात येईल, असा निर्णय रविवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. यामुळे मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत.

नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत पिंगळे यांनी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्यासमोर लिलाव सुरू करण्याबाबतचा प्रस्तावही ठेवला होता. मात्र, त्यांनी निर्णय मागे घेण्यात नकार दिला. बैठकीस लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, पोलिस उपनिरीक्षक जनार्दन सोनवणे, प्रसाद हिरे, आत्माराम कुंभार्डे, गणपत कांदळकर, गुरुदेव कांदे, उमेश देवरे, धनंजय पवार, विलास देवरे यांच्यासह संचालक राजेंद्र डोखळे, पंढरीनाथ थोरे, सचिन ब्रह्मेचा, ललित दरेकर, रमेश पालवे, अशोक गवळी, सोहनलाल भंडारी, नंदकुमार डागा, नितीन जैन, दिलीप ठक्कर, खंडू देवरे, किसान ठक्कर, हिरालाल पगारिया, सुरेश पारख, अतुल शहा, विजय ठक्कर, संदीप लुंकड, भिका कोटकर, प्रवीण हेडा, ओमप्रकाश राका, समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांची भूमिका

आमचा आडतला कुठलाही विरोध नसून, शेतकरी हितासाठी आम्ही बाजार समिती बंदचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या दुटप्पी धोरणाला आमचा विरोध असल्याचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भंडारी यांनी स्पष्ट केले. त्याच संदर्भात व्यापाऱ्यांची भूमिका मांडताना ते पुढे म्हणाले, की महाराष्ट्रात बाजार समिती कायदा हा समान असताना राज्यातील इतर बाजार समितीत वेगळा न्याय आणि नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांना वेगळ न्याय का? असा प्रश्न उपस्थित करून सरकारचा बाजार समित्या संपविण्याचा डाव असल्याची टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images