Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गुंतवणूकदारांचे पैसे लवकरच परत करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांना आमचे सहकार्य असून, त्यांना शक्य ती कागदपत्रे पुरविली जात आहेत. गुंतवणूकदारांच्या तक्रारी नसून त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीनुसार २७ जुलैपर्यंत किमान निम्मा परतावा परत दिला जाणार असल्याचा दावा हाऊस ऑफ इन्व्हेसमेंट प्रा. लिम‌िटेड कंपनीचा मुख्य सूत्रधार विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. याउलट पाटील कोणतेही सहाकार्य करीत नसल्याचे पोलिस आणि काही गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.

गुंतवलेल्या पैशांवर वार्षिक २४ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत हाऊस ऑफ इन्व्हेसमेंट प्रा. लिम‌िटेड या कंपनीच्या मुख्य सूत्रधार व त्याच्या काही सहकाऱ्यांनी गुंतणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा चूना लावला आहे. गंगापूर रोडवरील मामामुंगी कार्यालयाशेजारी असलेल्या कंपनीच्या कार्यालयात सुमारे तीन हजार २० गुंतवणुकदारांनी अंदाजे ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे खुद्द गुंतवणूकदार सांगत आहेत. याबाबत शनिवारी आयोज‌ित पत्रकार परिषदे दरम्यान पाटीलने आपण हे सर्व आरोप फेटाळत असल्याचे सांगितले. पोलिसांनी १९ कागदपत्रांची मागणी केली होती. त्यातील काही कागदपत्रे पोलिसांना देण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. वास्तविक आर्थिक गुन्हे शाखेकडे पाटीलने संपर्कच केला नसून एकही कागद सादर केला नसल्याचे संबंध‌ित पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले. पोलिस आणि पाटील यांच्या माहितीत तफावत असून यामुळे गुंतवणुकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. शुक्रवारी साडेपाच वाजेच्या दरम्यान आपला अपघात झाला. त्यामुळे कार्यालयाच्या कार्यक्रमास उशिरा सुरूवात झाली. त्यातून गुंतवणूकदारांचा रोष वाढल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. रात्री उशिरा गुंतवणुकदारांसमवेत बैठक पार पडली. त्यात त्यांना २७ जुलैपर्यंत पैसे परत करणार असल्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे कंपनीचे गुंतवणुकदार मात्र संभ्रमात पडले आहेत. गणेश कवडे, सचिन निफाडे, चेतन साळवे यांच्यासह अन्य काही गुंतवणुकदारांनी सांगितले की, मागील तीन महिन्याचा कंपनीचा अनुभव फारच वाईट होता. वादापेक्षा आम्हाला आमचे पैसे तसेच गाळे मिळणे आवश्यक आहे. पाटीलने प्रामाण‌िकपणे आम्हाला आमचे पैसे परत करावे, अन्यथा आम्हाला दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागेल.

..तर गुन्हा नोंदवू

कंपनीविरोधात तक्रार अर्ज आल्यापासून पाटील यांना १९ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. मात्र, त्यांचा कोणताही प्रतिसाद नसून आणखी सात ते आठ दिवसात त्यांनी कागदपत्रे सादर केली नाही तर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुसऱ्या दिवशीही लोंढेंचा ‘पंचनामा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले नगरसेवक प्रकाश लोंढे यांना पोलिसांनी शनिवारी कोर्टाच्या आवारात घडलेल्या गुन्ह्याचे प्रात्यक्ष‌िक सादर करून दाखवण्यास सांगितले. या घटनेच्या पंचनाम्याआड पोलिस अप्रत्यक्षरीत्या लोंढेंचा बुरूज ढासळवू पाहत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

सातपूर परिसरात काही वर्षांपासून राजकीय आणि छोट्या मोठ्या गुन्हेगारी विश्वावर बस्तान बांधलेल्या नगरसेवक प्रकाश लोंढेंना पोलिसांनी बुधवारी अटक केली. स्वारबाबानगर येथील पीएल ग्रुपच्या कार्यालयात झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना कोर्टाच्या आवारात मद्य पुरवणे तसेच यास विरोध करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास दमदाटी करण्याचा आरोप लोंढेंवर आहे. याच प्रकरणात त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून आज कोठडीचा त्यांचा दुसरा दिवस होता.

सरकारवाडा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी लोंढेंना स्वारबाबानगर परिसरातील त्यांच्या घरी नेऊन सर्च ऑपरेशन राबवले. पोलिसांनी याठिकाणी मद्य व पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स शोधल्याचे कारण सांगितले.

प्रत्यक्षात त्यांच्या समर्थकांना पोलिस आक्रमक झाल्याचा संदेश यातून देण्यात आला. नेत्यावरच कारवाई होणार असेल तर कायकर्त्यांचा टिकाव लागणार नाही, असा संदेश यातून पोलिसांनी पोहचवला. शनिवारी पोलिसांनी पुन्हा हीच कार्यपद्धती अवलंबली. पोलिसांनी दुपारच्या सुमारास लोंढेंना कोर्टाच्या आवारात आणले.

संशयितांना मद्य देताना नेमकी काय परिस्थिती होती? घटनेच्या वेळी नेमके काय झाले, याचे प्रात्यक्ष‌िक पोलिसांनी त्यांच्याकडून करून घेतले.

अर्धातास सुरू असलेल्या या पंचनाम्याचे कोर्टात येणारे अनेक जण साक्षिदार झालेत. दरम्यान, दुहेरी हत्याकांडाच्या तपासाला देखील पोलिसांनी गती दिली असून भूषणबाबतचे काही धागेदोरे हाती लागतात काय, याचा पोलिस कशोशीने शोध घेत आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षण व्यवस्थेत बदल गरजेचे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एनसीईआरटीने केलेल्या ३३ राज्यांच्या सर्वेक्षणानुसार ईशान्येकडील राज्यांचे इंग्रजीवर विशेष प्रभुत्व आहे. यासारखी आव्हाने पेलण्यासाठी आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेतही महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत, असे मत शिक्षण संचालक के. एन. जरग यांनी व्यक्त केले.

शिक्षण संचालनालय, पुणे आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यशाळेत नाशिकमधील मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला. यावेळी जरग बोलत होते. मावळ येथील ग्रामविद्या प्रबोधिनी येथे ही कार्यशाळा पार पडली. यावेळी एसएससी व एचएससी बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा बोर्ड पॅटर्ननुसार घेणार येणार आहेत. यंदा झालेल्या दहावीच्या परीक्षेत आयसीटी विषयात तेराशे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, याबद्दल मम्हाणे यांनी चिंता व्यक्त केली.

या कार्यशाळेत इयत्ता नववीच्या वर्गातील ज्या शाळांचे निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त व गळतीचे प्रमाण शून्य टक्के आहे, अशा शाळांच्या मुख्याध्यापकांचा या उपक्रमात सहभाग होता. राज्यभरातून सुमारे पावणे दोनशे मुख्याध्यापकांनी यात सहभाग घेतला. 'नववीमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी उपाय योजना' व 'माध्यमिक शिक्षणाची दिशा ठरविणे' या विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

नववीमधील विद्यार्थ्यांचे अनुत्तीर्णतेचे प्रमाण कमी करणे, शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करणे यानुसार माध्यमिक शिक्षणाची दिशा ठरविण्याचे उद्द‌िष्ट यात होते. पाठ्यपुस्तकाच्या सुरूवातीला प्रश्नपत्रिका व गुणदान आराखडा देण्याची मागणी संघाचे विद्यासचिव एस. बी. देशमुख यांनी यावेळी केली. शिक्षण संचालक के. एन. जरग यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे, पुण्याचे सहसंचालक दिनकर पाटील, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रावसाहेब आवारी, सचिव नंदकुमार बारावकर, विद्यासचिव एस. बी. देशमुख, मारूती खेडेकर, मनोहर सुरगडे, युनूस पटेल यांनी विचार मांडले. यात शाळेत दाखल मुलामुलींची गळती थांबविणे, गळतीची कारणे व उपाय, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांचा समावेश होता. या कार्यशाळेसाठी नाशिकमधून माणिक मढवई, राजेंद्र लोंढे, प्रशांत पवार, सुनिल फरस यांनी सहभाग घेतला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या विरोधात वकिलांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी गेलेल्या वकिलास मारहाण करून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करीत नाशिक बार असोसिएशनच्या वतीने शनिवारी पोलिस आयुक्तालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रभारी पोलिस आयुक्त अर्चना त्यागी यांना निवेदन सादर करण्यात आले. पोलिस आणि वकिलांमधील संवाद वाढविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील एका गुन्हातील संशयिताना पकडण्यासाठी गेलेल्या पोल‌िस पथकावर वकील व जमावाने हल्ला केल्याचा बनाव करत मुंबई नाका पोलिसांनी संशय‌ितांना बेदम मारहाण केल्याचा वक‌िलांचा आरोप आहे. बार असोसिएशनचे वकील अॅड. अन्सारी यांच्यासह इतर सहा संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयीन कामकाज करताना पोलिस व वकील यांना कायम एकमेकांस पुरक कामकाज करावे लागते. परंतु, पोलिस कर्मचारी वकिलांशी गैरवर्तन करतात. तसेच गुन्हेगारांनी वकिलांविरोधात तक्रार केल्यास पोलिस आक्रमक पवित्रा घेऊन वकिलांच्या चौकशीत दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या वकिलावर आरोप होत असतील तर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेष अधिकार समिती स्थापन वकिलांवरील कारवाईबाबत निर्णय घेण्यासाठी बार असोसिएशनच्या वतीने विशेष अधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत अॅड. नितीन ठाकरे अध्यक्ष असून जेष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे, अविनाश भिडे, विलास लोणारी, संतोष गटकळ, कैलास पाटील, सुरेश निफाडे यांचा सामावेश आहे. वकिलांवरील कारवाई पूर्वी पोलिस या समितीकडे चौकशी करतील. अशाच पद्धतीची पोलिस अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिकेतील वेगाचा अभ्यास नानांमुळे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाना म्हणजे जयराम शिलेदार आमच्यासाठी सारे काही होते. नाटकातील भूमिकेच्या वेगाच्या अभ्यासाची जाण नानांमुळेच आम्हा बहिणींना झाली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रीया वडाची पूजा करतात. मात्र, आम्ही जन्मोजन्मी हेच आईबाप मिळावे म्हणून वडाची पूजा करायला तयार आहोत, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयातर्फे १७५ व्या वर्षाचे औचित्य साधत शनिवारी वाचनालयाच्या औरंगाबाद सभागृहात आयोजित मुलाखत व नाट्यपदगायन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संगीत रंगभूमी हेच आपले जीवन मानून आयुष्यभर वाटचाल करणारे गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. मराठी रसिकांना आपल्या सौंदर्यपूर्ण गायकीने तृप्तता देणारे जयराम शिलेदार यांचे स्मरण या वर्षात व्हावे या सुत्राला अनुसरून हा कार्यक्रम झाला.

शिलेदार पुढे म्हणाल्या की, आमच्या आई-वडिलांचे दैवत म्हणजे बालगंधर्व. ते सांगतील ती पूर्व दिशा. कालांतराने त्यांनी बालगंधर्वांसोबत कामही केले. बालगंधर्वांनी स्वत:च एक दिवस सांगितले की, 'प्रमिलेला आता रूक्मिणी बनू द्या' आणि त्या दिवसापासून माझी आई, प्रमिला जाधव रूक्मिणी झाली. विशेष म्हणजे माझे नाना, जयराम शिलेदार कृष्ण होते. पुढे दोघांमध्ये नाते निर्माण होऊन त्यांनी लग्न केले.

नभांगण धरणीवर आले 'अवघाचि संसार... सुखाचा करीन' हे नाट्यपद गायल्यानंतर कीर्तीताई शिलेदार यांनी नाशिकची एक आठवण सांगितली. हे पद गात असताना लाईट गेले, माईक मात्र सुरू होता. मी पद गात राहिले व त्यावेळी सर्व रसिकांनी आपआपले मोबाईल फ्लॅश लाईट सुरू करून स्टेजच्या दिशेने धरले होते. मला त्यावेळी नभांगण धरणीवर आल्यासारखे वाटले होते. हा माझ्या दृष्टीने मोठा चमत्कारच होता असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात आज आज, १९ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता लोकशाहीर राम जोशी हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटातील राम जोशींची भूमिका जयराम शिलेदार यांनी केली असून ती अजरामर म्हणून सर्वमान्य आहे. हा चित्रपट पाहणे हीदेखील एक आनंद पर्वणी आहे.



जयराम शिलेदार यांच्या प्रेमाची कथा सांगताना कीर्तीताईंनी आण्णासाहेब किर्लोस्करांच्या 'शाकुंतल' या नाटकाचे काही किस्से सांगितले. या नाटकात दुष्यंतची भूमिका जयराम व शकुंतलेची भूमिका प्रमिला करीत असे. पुढे त्यातूनच प्रेम होऊन लग्न झाले. परंतु त्याआधी या दोघांनी मिळून मराठी रंगभूमी नावाची संस्था स्थापन केली. मुलाखत व नाट्यपद गायन असा हा कार्यक्रम चांगलाच रंगला. त्यांनी 'स्वयंवर' नाटकातील नाथ हा माझा हे पद गायले. नाट्यपद गाण्याची सुरुवात त्यांनी 'नवनिशचरणा', 'तुम्हा तो शंकर सुखकर हो' या जोडनांदीने केली. त्यांनतर त्यांनी 'अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक' हे पद सादर केले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेक्टर कचेरीतील अनागोंदी थांबवा

$
0
0

‌रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील पुरवठा विभागासह अन्य विभागांमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून रेशन व केरोसीन मिळत नसल्याने अनेक लाभार्थींवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रश्नांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (दि.१८) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात, जिल्हा पुरवठा विभागात झालेल्या रेशन घोटाळ्यानंतर जिल्ह्यातील पुरवठा खात्यात विस्कळीतपणा आला आहे. त्यामुळे धान्य पुरवठ्यात अनियमितता आली असून गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुकानिहाय सेतू कार्यालयातून तत्सम जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले मिळण्यास अडचणी येत आहेत. या अडचणी तत्काळ सोडवाव्यात, देणग्या घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी, सरकारी, निमसरकारी, शैक्षणिक, सहकार खात्यातील मागासवर्गीय, ओबीसी, एन. टी., एस. टी. च्या रिक्त पदांचा अनूशेष भरावा, काश्यपी धरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या वारसांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, मागासवर्गीय महामंडळाकडून दिलेले कर्ज प्रस्ताव नाकारणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाई करावी अशी मागणी रमेश म्हस्के, फुलचंद जाधव, संजय सानप आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३ जूनला पाळणार काळा दिवस

$
0
0

सर्वपक्षीय नेत्यांसह पाणीप्रश्नावरून मनमाडकरांचा एल्गार

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी सरकार दरबारी सातत्याने प्रयत्न करूनही हा प्रश्न पडूनच आहे. तसेच या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी विविध पर्याय उपाययोजना सुचवूनही राज्याचे मंत्री, शासकीय अधिकारीही दखल घेत नाही. यासाठी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी २३ जूनला आंदोलनाचा इशारा देत काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे.

मनमाड शहराच्या पाणी समस्येवर वारंवार वारंवार मंत्रालयात पाठपुरावा करूनही काहीही झालेले नाही. तसेच शहरातील विकासकामांना निधी मिळत नाही म्हणून त्याच्या निषेधार्थ सर्व मनमाडकरांच्या वतीने येत्या गुरुवारी, (दि. २३) रोजी शहरात काळ्याफिती लाऊन काळा दिवस पाळण्यात येणार आहे. तसेच मंत्री, सरकारी, अधिकारी यांचा निषेध करण्यात येणार आहे.

यावेळी मनमाड शहरातून रॅली काढण्यात येऊन सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असून यामध्ये सर्व पक्ष, सामाजिक, राजकीय संघटना, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना सामील होतील अशी माहिती नगराध्यक्ष प्रवीण नाईक, शिवसेना गटनेते संतोष बळीद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी रिपाईचे नेते राजाभाऊ आहिरे, काँग्रेसचे रवींद्र घोडेस्वार यांच्यासह प्रमोद पाचोरकर, अमीन पटेल, रफिक शेख, विठ्ठल नलावडे, संतोष आहिरे, दिलीप सोळसे यांनी सरकार दाद देत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत मनमाडकरांना या अभिनव आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी बोलताना सर्वपक्षीय नेत्यांनी मनमाड शहराला राज्य सरकार दरबारी उपेक्षीत वागणूक मिळत असल्याचे सांगितले. शहराच्या विकासासाठी निधी मंजूर होतो पण पदरात पडत नाही केवळ झुलवत ठेवले, असा आरोपही यावेळी करण्यात आला. पाणीप्रश्नांसह इतर विकासकामांबाबत हीच वागणूक असल्याने 'आम्ही मनमाडकर' या झेंड्याखाली एकत्र येऊन काळ्याफितीसह काळा दिवस पाळणार आहोत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. विलास कटारे, विनय आहेर, हर्षद पाटील, दरगुडे, अशोक पद्मर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कर्जमुक्त करणे हेच शिवसेनेचे ध्येय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शेतकरी या देशाचा कणा असून राज्यातील शेतकरी कर्जमुक्त करणे हेच शिवसेनेचे ध्येय असणार आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षनिमित्ताने बाजार समिती व सामाजिक संस्थांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना बी बियाणे व शेती साहित्य वाटप करण्याचा उपक्रम शनिवार, (दि. १८) रोजी घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. बाजार समिती, मालेगाव अॅग्रो डीलर असो., मालेगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. जलयुक्त व शिवजलक्रांतीच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असेही भुसे म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख सुहास कांदे, सुनील देवरे, बंडू बच्छाव, यशवंत मानकर, अविनाश पाटील, सुरेश बागड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामीण भागात आता टॅबद्वारे परवाना परीक्षा

$
0
0

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाचा पायलट प्रोजेक्ट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोटार वाहन नियमांबाबत तोंडी चाचणी घेऊन शिकाऊ वाहन चालविण्याचा परवाना देण्याची पारंपरिक पध्दत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने हद्दपार केली आहे. कार्यपध्दतीत कालानुरूप बदल करीत टॅबसारख्या अत्याधुनिक साधनाद्वारे आता ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ही कार्यपध्दती अंमलात आणणारा नाशिक हा पहिला जिल्हा ठरला असून, लवकरच राज्यातही त्याचे अनुकरण करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात प्रादेशिक परिवहन विभागाकडून शिबिरांमध्ये उमेदवारांची तोंडी चाचणी घेऊनच परवाना देण्याची पध्दती आतापर्यंत कायम होती. यात बदल करीत प्रादेशिक प‌रिवहन विभागाने टॅबद्वारे ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. घोटी येथील शिबिरात त्याची घेतलेली चाचणी यशस्वी झाली असून, १ जुलैपासून जिल्हाभरात टॅबद्वारेच चाचणी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुदाम सूर्यवंशी, गणेश डगळे, हर्षल माळी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात दरवर्षी साधारणत: ६० हजार लोक शिकाऊ वाहन परवाना काढतात. त्यापैकी २५ हजार परवाने ग्रामीण भागात दिले जातात. प्रादेशिक परिवहन विभागाने महाआरटीओ अॅप विकसित केले आहे. हे अन्ड्रॉइड बेस अॅप्लिकेशन असून, लवकरच गुगल प्ले स्टोरवर नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अशी असणार परीक्षा

टॅबवरील या प्रणालीमध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषांचे पर्याय असतील. शिकाऊ वाहनचालकाचा परवाना मिळविण्यासाठी येणाऱ्याचे पूर्ण नाव, छायाचित्र अपलोड केले जाईल. त्यानंतर १० प्रश्न विचारून उत्तराचे अ, ब, क असे तीन पर्याय असतील. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ३० सेकंदांचा अवधी असेल आणि परीक्षेनंतर लगेचच निकालही समजणार आहे. दहापैकी किमान सहा प्रश्नांची अचूक उत्तरे देणारा उमेदवार उत्तीर्ण समजला जाईल. त्याला चार दिवसांत शिकाऊ परवाना मिळू शकेल. टॅबलेट चार्ज केले जाणार असल्याने वीजपुरवठा खंडित असला तरी वापर करता येणार आहे.

राज्यात प्रथमच नाशिकमध्ये अशा प्रकारची यंत्रणा वापरण्यात येत आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचीदेखील डिजिटल आरटीओकडे वाटचाल सुरू झाली आहे. नाशिकमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला असून, लवकरच राज्यभर त्याची अंमलबजावणी होणे शक्य आहे.

- भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे महापालिका आयुक्तपदी धायगुडे

$
0
0

धुळे ः गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या धुळे महापालिकेचे आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी आयुक्तपदी संगीता धायगुडे या पदभार स्वीकारणार आहेत. सोमवारी, (दि. २०) त्या पदावर रूजू होतील.

धुळे महापालिकेच्या नुतन आयुक्तपदी संगीता धायगुडे या सध्या कोकण विभागात उपसंचालक पदावर कार्यरत आहेत. मात्र यापूर्वी त्या वसई-विरार महापालिकेवर उपायुक्तपदी असताना त्यांनी स्वच्छतेवर भर दिला होता. नागरिकांमध्येही जनजागृती केली होती. स्वच्छतेवर भर देऊन शहराला स्मार्ट बनविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवासेनेकडून गरजूंना दप्तरांचे वाटप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिवसेना प्रेरित युवासेनेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून 'एक दप्तर महत्त्वाचे' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मार्च, एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर युवासेनेकडून शहरात विविध भागात पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते. यातून जुनी दप्तरे व पुस्तके नागरिकांनी युवासेनेकडे जमा करावीत, असे सांगत शहरातील गोरगरीब व काम करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही दप्तरे देण्यात येतात.

या अभिनव उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शालेय साहित्याची चणचण दूर व्हावी, तसेच त्यांची शिक्षणाची ओढ कमी होऊ नये यासाठी हा उपक्रम युवासेनेकडून राबविण्यात येत असल्याचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज गोरे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. शहरातील विविध भागामधून युवासेनेकडून दोन महिन्यांपासून जमा करण्यात येणारी ही जुनी दप्तरे व पुस्तके घेऊन ती दुरूस्त करण्यात आली. युवासेनेच्या उपक्रमात जिल्हाध्यक्ष पंकज गोरे, शहरप्रमुख संदीप मुळीक, हरीष माळी, ऐश्वर्या अग्रवाल आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निशाणी दिलेल्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आलेले आणि निशाणी दिलेल्या दस्तऐवजात काही ठिकाणी खाडाखोड करण्यात आली असल्याची माहिती काबरे अॅण्ड चौधरी फर्मचे वास्तुविशारद अरुण काबरे यांनी धुळे जिल्हा विशेष न्यायालयात दिली. जळगावच्या घरकुल घोटाळा प्रकरणी सरकारी पक्षातर्फे पाचवा साक्षीदार म्हणून काबरे यांची उलटतपासणी आरोपी जगन्नाथ वाणी यांचे वकील एक. के. शिरोडे यांनी घेतली. अॅड. शिरोडे यांनी काबरे यांना प्रश्न केला की, रमेश चौधरी व अरुण काबरे यांच्यापैकी कोण वास्तुविशारद झाले. त्यावर रमेश चौधरी यांनी प्रथम पदवी घेतली. सन १९७७ मध्ये दोघांनीही नोंदणी केली असल्याची माहिती काबरे यांच्याकडून देण्यात आली. सन २००६ पूर्वी आपण कधीही पोलिसांकडे गेले नव्हतो. घरकुल कामाच्या सुपरव्हीजनसाठी आपण जात नसल्याचे म्हणणे संपूर्णपणे खोटे असून, आपण नियमित सुपरव्हीजन करून तशी टिपणही केले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुर्ग संवर्धन’चे कुलंग किल्ला येथे बीजारोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी या गावाजवळील राज्यातील अवघड चढाईचा किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुलंग किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबवून विविध वृक्षांचे बीजारोपण करण्यात आले.

प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात हा किल्ला सर करून माथ्यावर आंबा, फणस, चिंच, लिची, जांभूळ, आवळा, तसेच विविध देशी वृक्षांच्या दोन हजार बियांचे किल्ला परिसरात रोपण केले. हा किल्ला जैवविविधतेने भरलेला अाहे. मात्र, या ठिकाणी मोठी वृक्षतोड सुरू असून, पूर्ण झाड जंगलातच जाळण्याचे प्रकार होत आहेत. या किल्ल्यावर जाण्यासाठी जंगलातून वाट असून, वन विभागाने कोणतेही माहितीफलक लावले नसल्याने पर्यटक रस्ता चुकल्याचे अनेक प्रकार येथे घडले आहेत. आंबेवाडी गावातील गोरख ढवळे व त्यांचे तीन साथीदार या अवघड किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वांना मदत करतात. याबाबत त्यांनी वन विभागाशी संपर्कही साधला. परंतु, त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या मुलांना वन विभागाने कोणतेही मानधन दिले नसून, साधे ओळखपत्रदेखील दिलेले नाही. हे युवक शिक्षित असून, त्यांनी आतापर्यंत अनेक पर्यटकांचे प्राणदेखील वाचविले आहेत. या किल्ल्यालगतच अलंग व मदन हे किल्ले असून, त्यावर जाण्यासाठी दोरीचा आधार घ्यावा लागतो. वन विभागाने आवश्यक ठिकाणी एक लोखंडी शिडी केली, तरी हे दोन किल्ले नाशिकरांना बघता येणार आहेत.

कुलंग गडावर अनेक तळी असून, त्यांचा उपयोग गावाच्या पाण्यासाठी करून घेता येऊ शकतो. या किल्ल्याच्या पायथ्याशी रांजण खळगीही आढळून आल्या असून, त्यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. किल्ल्यावर रानमेवा भरपूर असून करवंदे, गावठी आवळे, कारवीची हजारो झाडे व वडाच्या अनेक जाती येथे बघावयास मिळतात. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, भीमराव राजोळे, सागर बनकर, आकाश जाधव, आशिष बनकर, धनंजय बागड, अजित जगताप, अशोक धोंगडे, मंगेश पगार, रोशन पेलमहाले, दर्शन घुगे, सागर घोलप, पप्पू जगताप, गोरख ढवळे आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयकॉनने भारावला ‘जनस्थान’ सोहळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, कवी किशोर पाठक आणि कवी कैलास पाटील यांच्यातील कलावंताला सलाम करीत यंदाचा 'जनस्थान आयकॉन २०१६' हा मानाचा पुरस्कार अभिनेते मिलिंद गुणाज‌ी यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वानंद बेदरकर यांनी केले. जनस्थान आयकॉन पुरस्कार हे या वर्धापनदिन सोहळ्याचे आकर्षण होते. या कलावंतांच्या कार्यकर्तृत्त्वाची ध्वनीचित्रफित सादर करीत त्यांना हे पुरस्कार देऊन मानाचा मुजरा करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना सदानंद जोशी म्हणाले की, मेलोड्रामा ते वास्तव असा नाटकातील प्रवास मी केलेला आहे. त्या ४६ वर्षांच्या कामाची पावती म्हणून हा पुरस्कार मला मिळत असल्याचे समजतो. कवी किशोर पाठक म्हणाले की, आयकॉन ही व्यक्ती नसते, त्यांनी केलेले काम असते. कवी कैलास पाटील म्हणाले की, जनस्थान हे एक कुटुंब आहे. त्याचा मी सदस्य असल्याचा अभिमान आहे.

व्यासपीठावर महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, अॅड. विलास लोणारी, मिलिंद जहागिरदार आणि जनस्थान ग्रुपचे अॅडमीन अभय ओझरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भूषण मटकरी यांनी सूत्रसंचालन केले. अभिनेते दीपक करंजीकर यांनी प्रास्ताविक केले.

चित्रप्रदर्शनाचे उद्‍घाटन मिलिंद गुणाजी यांनी गेल्याच महिन्यात स्कॅन्डिनेव्हियन देशांची सहल केली. त्यावेळी त्यांनी टिपलेल्या अत्यंत अद्‍भूत, सर्वांग सुंदर, लोभस आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या प्रदेशाच्या छायाचित्रांचे प्रदर्शनासह चित्रकार राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, छायाचित्रकार प्रसाद पवार, मूर्तिकार श्रेयस गर्गे, यतिन पंडित, शाम लोंढे यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात

आले. परशुराम साईखेडकर नाट्यमंदिराच्या नवीन कलादालनात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २३ जूनपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी नि:शुल्क खुले राहणार आहे.

कार्यक्रमात आज आज, २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता सई परांजपे लिखित आणि अभिनेत्री विद्या करंजीकर दिग्दर्शित 'माझा खेळ मांडू दे' या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राम जोशी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून पसंती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पूजा-अर्चनेकडून तमाशा-लावणीकडे वळेलेले राम जोशी, भावाच्या समजावण्यावरून पंडितांच्या दरबारात माफी मागण्यासाठी न जाता त्यांच्यासमोर फड मांडणारे राम जोशी, अशी राम जोश्यांची एक ना अनेक रूपे 'राम जोशी' या मराठी चित्रपटातून उलगडत गेली. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर हॉलमध्ये दाखविण्यात आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

संगीत रंगभूमी हेच आपले जीवन मानून आयुष्यभर वाटचाल करणारे गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. मराठी रसिकांना आपल्या सौंदर्यपूर्ण गायकीने तृप्तता देणारे जयराम शिलेदार यांचे स्मरण या वर्षात व्हावे म्हणून सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे हा चित्रपट दाखविण्यात आला. लोकशाहीर राम जोशी या चित्रपटात राम जोशींची भूमिका जयराम शिलेदार यांनी केली असून, ती अजरामर म्हणून सर्वमान्य आहे.

चित्रपटात राम जोशी उनाड असल्याने त्याचे बंधू, मुदगलशास्त्री त्याला घरातून घालवून देतात. कीर्तनाऐवजी हा तमाशातील वग लिहित बसतो म्हणून त्यांचा त्याच्यावर राग असतो. परंतु, राम जोशी हा तमाशातील अव्वल नंबरचा लावणीकार बनतो. त्याला अमाप धन, दौलत मिळते; पण प्रतिष्ठा कधीच मिळत नाही. कालांतराने त्याला पश्चात्ताप होऊन तो एका पंडिताकडे व्याकरणाचे धडे गिरवतो आणि घरी येऊन भावाचे अधुरे राहिलेले कीर्तन पूर्ण करतो. त्यामुळे मुदगलशास्त्रींनाही प्रसन्नता वाटते, असा चित्रपटाचा आशय होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परदेशी टूरच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परदेशी टूर करण्याच्या बहाण्याने गुजरातमधील एका एजंटने शहरातील काही व्यक्तींची तब्बल एक लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. संबंधित एजंट पारस यादवने पुणे येथेही अनेक व्यक्तींना गंडा घातला असून, पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माडसांगवी येथे राहणाऱ्या ज्ञानेश्वर कारभारी पैठणकर (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ ते २७ एप्रिल या काळात पारस यादव आणि फिर्यादीचा संपर्क झाला. पटाया येथे जाण्याच्या तयारीत असलेल्या पैठणकर यांना यादवने या टूरसाठी १ लाख ६८ हजार रुपये बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्यानुसार पैठणकर यांनी माडसांगवी येथी बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये एकदा एक लाख ६० हजार, तर दुसऱ्या वेळेस आठ हजार इतकी रक्कम डिपॉजिट केली. मात्र, पैसे भरल्यानंतर यादवने पटाया यात्रेला कात्री लावण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने पैठणकर यांनी आडगाव पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, अहमदाबाद जिल्ह्यातील मोटेरा येथील ऊर्जा मोटेरा कॉम्पलेक्स येथे कार्यालय असलेल्या यादवने राज्यातील अन्य नागरिकांचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या असून, पोलिसांनी त्यास अटकदेखील केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजीवन ‘योग’ आरोग्यमंत्र

$
0
0





दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह नाशिक शहरासह जिल्हाभरात दिसून आला. केवळ शालेय संस्था, कॉलेजेसच नव्हे, तर सामाजिक संस्थांनीही योगाचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी पुढाकार घेतला. शास्त्रशुद्ध माहिती असलेल्या प्रशिक्षकांच्या मदतीने योगासने करण्यात आली आणि संजीवन आरोग्याचा मंत्र स्वीकारण्यात आला.

नाशिक महापालिका नाशिक महापालिकेच्या वतीने योग दिनानिमित्त अनुसया रामचंद्रन, हार्ट फुलनेस इन्स्टिट्यूट यांनी अधिकारी व कर्मचारी यांना योगाबद्दल माहिती व प्रशिक्षण दिले. या सामूहिक योगासन प्रात्यक्षिकात नाशिक महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

आनंद हास्य योग क्लब नाशिकरोड येथील आनंद हास्य योग क्लबतर्फे विविध आसने करून योगदिन साजरा करण्यात आला. नियमितपणे प्राणायामपूरक व्यायाम व हास्य योग अभ्यास करणाऱ्या आनंद हास्य योग क्लबच्या सदस्यांचा आनंद व उत्साह अनोखा होता. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध योगशिक्षक आत्माराम देवाणी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात योग प्रार्थनेने झाली. त्यानंतर आत्माराम दीवानी यांनी विविध प्राणायामाचे प्रकार व योगासने याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व साधकांनी प्रत्यक्ष भाग घेऊन विविध प्राणायाम व योगासने केली. यावेळी क्लबचे अध्यक्ष अॅड. वसंतराव पेखळे म्हणाले, की योगाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण जे हास्य प्रकार करतो त्यातही योगा समाविष्ट आहे. म्हणूनच त्याला हास्स्य योग असे म्हणतात. उपस्थित हास्यप्रेमींनी विचारलेल्या प्रश्नांना देवानी यांनी समर्पक उत्तरे देत शंकांचे निरसन केले. कार्यक्रमास डी. जी. पाटील, केशव वाणी, सुरेश सोनवणे, रमेश नवले, वसंत खालकर आदी उपस्थित होते.

जुने नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद जुने नाशिक : मुख्यध्यापिका सय्यद शिरीन यांच्या मार्गदर्शनाखाली रहेबर तालीम कमिटी संचलित रहेनुमा उर्दू शाळेत, तसेच नॅशनल उर्दू हायस्कूल येथे योगासने करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी योगाचे महत्त्व विशद केले. रंगूबाई जुन्नरे, रवींद्र विद्यालय, न्यू जनता विद्यालय, गांधीनगर, बुरहानिया स्कूल, दारणा हायस्कूल, वडाळागाव महापालिका हायस्कूलसह विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे डॉक्टर्स, रुग्ण व स्टाफ कर्मचारींनी सहभाग नोंदविला. जुने नाशिक परिसरातील अन्य विविध शाळांमध्येही योगासने करण्यात आली.

माहेरघर मंगल कार्यालय माहेरघर मंगल कार्यालयात लाड वाणी समाजाच्या वतीने योग शिबिर झाले. यावेळी संगू गुरुजी व त्यांचे साथीदारांनी योगाचे धडे देऊन योगाविषयी उपस्थितांना माहिती दिली. नीलेश कोतकर, अमोल शेंडे, लाडवाणी समाजाचे अध्यक्ष सचिन बागड, विवेक जायखेडकर यांच्या विशेष प्रयत्नातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

उत्सव मंगल कार्यालय श्री गजानन महाराज देवस्थान व नाशिकच्या योगविद्याधाम यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक ५६ मधील उत्सव मंगल कार्यालयात सामूहिक योग साधना शिबिर झाले. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, डॉ. विश्वास मंडलिक, नाशिकरोड मंडलाध्यक्ष बाजीराव भागवत, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, संगिता गायकवाड, नरेश कारडा, अशोक कुलकर्णी, गजानन तितरे आदी उपस्थित होते. नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नीलेश वाघ, दत्ता कुलकर्णी, नीलिमा जोशी, ज्योती वराडे, हर्षद पटेल, प्रिती सोनी, अनुजा आवटी, अतुल तरटे, निखिलेश भाकरे, कल्पना गिते यांनी योग प्रशिक्षण दिले.

जगताप मळा अभ्यासिका लोकसंकल्प हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने केमिस्टांसाठी जगताप मळ्यातील अभ्यासिका सभागृह येथे योगसाधना घेण्यात आली. माणिक हांडगे, संजय बागुल, महेंद्र शहा या योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबीरात सुमारे ४५ केमिस्ट बंधू-भगिनींनी सहभाग घेतला.

मातोश्री वृद्धाश्रम एकलहरे येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकसंकल्प हेल्थ फाउंडेशनच्या वतीने योगशिक्षक बाळासाहेब मोकळ, संजय बागुल, अमोल जाधव, योगिता पाटील, गोवर्धने या योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग संजिवनी वर्गाचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे ८० ज्येष्ठांनी सहभाग घेतला.

ऋतुरंग भवन नाशिकरोड येथील ऋतुरंग भवनात योगशिक्षिका सुनीता सानप यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास घेण्यात आला. या कार्यक्रमात ऋतुरंग परिवारातील सर्व सदस्य सहभागी झाले.

हजार विद्यार्थ्यांचा योगाभ्यास इगतपुरी : इगतपुरीसह टाकेद-घोटी येथील पंचवटी स्कूलमध्ये योगदिन उत्साहात झाला. यात सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे योगगुरू मीना अग्रवाल, विशाल मेहता, कीर्तीभाई शहा, प्राचार्य अशिषकुमार खुळे, पर्यवेक्षिका तोषा तिवारी आदी मान्यवर होते.

जिल्हा परिषद शाळेत योग प्रशिक्षण कळवण : भेंडी (ता. कळवण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत योगदिन साजरा करण्यात आला. योगशिक्षक भास्कर भामरे यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांकडून प्रात्यक्षिके व योगा करून घेतली. यात प्रार्थना, योगासन पूरक हालचाली, आदींचा समावेश होता. उपस्थितांना योगासनाविषयी संकल्प व शपथ देण्यात आली. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. वाघ, मुख्याध्यापक अशोक भामरे, विजय पगारे, राजेंद्र जगताप, भगवान आहेर आदी उपस्थित होते.

पोलिसांचा योगाभ्यास सातपूर : नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शहराच्या सर्वच पोलिस ठाण्यांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी योग दिनात सहभाग घेतला. महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमी, नाशिक शहर पोलिस आयुक्तालय व ग्रामीण पोलिसांनीही योग दिनात भाग घेतला.

नाशिकरोड पोलिस ठाणे नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या सभागृहात लोकसंकल्प हेल्थ फाऊंडेशनतर्फे योग दिनानिमित्त योगासनांच्या प्रात्यक्षिकांत सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांंनी सहभाग घेतला. संगीता पाटील, महेंद्र शहा, वर्षा साळवे, सोनाली सोनवणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

घोटीत पोलिसांसह ग्रामस्थांची योगसाधना घोटी पोलिस व ग्रामस्थ यांनी संयुक्तपणे योगशिबिर घेऊन योगसाधना केली. जैन भवन येथे झालेल्या शिबिरात योगगुरू रुपचंद राठोड व योगगुरू संतोष माने यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. यावेळी घोटी पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक कमलेश बच्छाव यांच्यासह ग्रामस्थ व पोलिस कर्मचाऱ्यांसह सर्व पोलीस पाटील आणि पोलिस मित्र उपस्थित होते. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक आजार निर्माण होऊन शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडत आहे. नियमित योगसाधनेमुळे आजार दूर होतात. कार्यक्षमता वाढते, नवचैतन्य निर्माण होते. शारीरिक ऊर्जा वाढते व मानसिक संतुलन स्थिर राहते. यासाठी जीवणात योगसाधनेला प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन योगप्रशिक्षक राठोड व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी केले. 'आरोग्यसंपन्नतेची योग ही गुरुकिल्ली' प्रत्येक व्यक्तीला सर्वच योगासने लागू पडतीलच असे नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, दोषानुसार कोणते आसन करावे हे सांगितले जाते. आरोग्यसंपन्न होण्याची योग हीच गुरुकिल्ली असून, 'जो जे वांछिल तो ते लाहो' हेच योगाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन योग विद्या गुरूकुलचे कुलगुरू विश्वास मंडलिक यांनी केले. योग विद्या गुरूकुल, योग विद्या धाम आणि नेहरु युवा केंद्र यांच्यातर्फे आयोजित योग शिबीरात ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटनमंत्री राजेंद्र फडके, योगविद्या धामचे उपाध्यक्ष डॉ. रमेश मंत्री, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, योग विद्यालयाचे अध्यक्ष मनोहर कानडे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक भगवान गवई नाना फड, ज्ञानेश्वर मटाले आदी उपस्थित होते. डीजीपी नगर परिसरातील माऊली लॉन्समध्ये सकाळी सात वाजता कार्यक्रम झाला. परिसरातील शेकडो नागरिकांना या शिबिराचा आणि प्रदर्शनाचा लाभ घेतला.

महापालिका शाळांमध्ये उत्साह महापालिकेच्या सातपूर विभागातील शिवाजीनगर शाळेत योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेवक दिनकर पाटील यांनी विद्यार्थ्यांसह शाळेच्या प्रांगणात योगाची प्रात्यक्षिके केली. महापालिकेच्या सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेत योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योगाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला.

नाईक कॉलेजात शिबिर दिंडोरी : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य कॉलेजात योग शिबिर उत्साहात पार पडले. प्राचार्य डॉ. महादेव कांबळे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. याप्रसंगी प्रा. संजय काळे, प्रा. डॉ. धीरज झाल्टे, प्रा. राजेंद्र डोईफोडे, कार्यालय अधीक्षक राजेंद्र तिवडे, सोमनाथ धात्रक यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. क्रीडा संचालक प्रा. अरविंद केदारे, प्रा. अनिल आहिरे यांनी विविध आसनांचे प्रात्यक्षिके सादर करून योगा विषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. धिरज झाल्टे यांनी सूत्रसंचालन केले. शिबिरात कॉलेजातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला. शिबीर यशस्वीतेसाठी प्रा. वैशाली गांगुर्डे, कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्रा. शिवाजी साबळे, प्रा. भास्कर आव्हाड, प्रा. तुषार उफाडे, सुनील चव्हाण, कैलास गांगुर्डे, योगेश बोडके आदींनी परिश्रम घेतले.

मनमाड, नांदगावसह चांदवडमध्ये योगासने मनमाड, नांदगाव शहर परिसर, तसेच चांदवड तालुक्यात विविध ठिकाणी योगासने व प्राणायामाचे कार्यक्रम उत्साहात घेण्यात आले. योगाविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांतर्फे हे कार्यक्रम झाले.

मनमाड येथे छत्रे न्यू हायस्कूल व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे पोलिस परेड ग्राउंडवर योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलिस कर्मचारी व शिक्षक पालक विद्यार्थी यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त योगशिक्षक सुनील ढमाले यांनी योगाविषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे, श्रीराम शैक्षणिक संस्थेचे सचिव दिनेश धारवाडकर, संचालक पी. व्ही. पंचवाघ, मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे, उपमुख्याध्यापक आर. एन. थोरात, पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे आदी उपस्थित होते. हरिश चंद्रात्रे व सहकारी शिक्षकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

नांदगाव शहर व परिसरातील शाळा कॉलेजेसमध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नांदगाव कला वाणिज्य विज्ञान कॉलेजच्या मैदानावर प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रा. दिनेश उकिरडे, प्रा. बी. पी. शिंदे यांनी प्रात्यक्षिके सादर केली. चांदवड शहरात शैक्षणिक संकुल सामाजिक संस्था संघटना यांच्या वतीने योगाविषयी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आला रे आला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांसह सर्वांच्याच संयमाची प्रतीक्षा पाहणाऱ्या मान्सूनने अखेर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. गेले काही महिने पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य अनुभवणाऱ्या जिल्हावा‌सीयांवर पावसाने कृपादृष्टी केल्यामुळे बळीराजासह सारेच सुखावले आहेत. काही भागात पाऊस चांगला झाला असला तरी बळीराजाला अजूनही पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्हावासीय चार महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. त्यामुळे केव्हा एकदा मान्सून बरसणार अन् पाण्याचा प्रश्न मिटणार याची चिंता सगळ्यांनाच लागली होती. केरळमध्ये मान्सून दाखल होऊन लवकरच तो नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाकडून मिळत असूनही प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होत नव्हती. नाही म्हणायला मान्सूनपूर्व पावसाने गेले दोन- तीन दिवस हजेरी लावली. मात्र, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. अखेर मंगळवारी दुपारी पावसाचे जोरदार आगमन झाले.

सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. सोमवारी २८ अंश सेल्सिअसवर गेलेले कमाल तापमान मंगळवारी ३२.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. सिडको, इंदिरानगर, डीजीपीनगर, पंचवटी, अंबड, सातपूर, नाशिकरोड परिसरात सकाळपासूनच विजेचा लपंडाव सुरू होता. शहरातील, तसेच जिल्ह्यातील काही भागात दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाचा जोर अधिक वाढला.

देवळा, सटाण्यात अधिक जोर

जिल्ह्यात सटाणा, देवळा, मालेगाव, चांदवड, इगतपुरी, निफाड, येवला, सिन्नर, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, नांदगाव, दिंडोरी, नाशिक आणि कळवण अशा सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. सोमवारी जिल्ह्यात ५२ मिमी पावसाची नोंद झाली. देवळ्यात सर्वाधिक १५ मिमी पावसाची नोंद झाली. सटाणा तालुक्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वीज अंगावर पडून विशाल सुरेश जगताप (वय २८) या तरुणाचा मृत्यू झाला, तर विकास लक्ष्मण सोनवणे जखमी झाला. याशिवाय तालुक्यात वीज पडून तीन शेळ्या दगावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यामध्ये ६ मिमी पावसाची नोंद झाली.

झाडांची पडझड, विजेचा खेळखंडोबा

शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कॉलेज रोड, पी अँड टी कॉलनीत वायरी, तसेच झाडांच्या फांद्याही तुटल्या. वेदमंदिर, आयटीआय सिग्नल, एचपीटी कॉलेज या परिसरातही झाडांच्या फांद्या तुटण्याचे प्रकार घडले. त्यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला, तर जुना गंगापूर नाका परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराच्या समृध्दीसाठी माऊलीला साकडे

$
0
0

शहरवासीयांकडून संत निवृत्तिनाथ पालखीचे स्वागत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराची भरभराट आणि उज्ज्वलता यासाठी महापौरांनी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांकडे साकडे घातले. नाशिक महानगर पालिकेच्या वतीने संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचे स्वागत सावरकर तरण तलाव येथे महापौर अशोक मुर्तडक यांनी केले. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी दिंडीप्रमुख व वारकरी यांच्या आश्वासनांची पूर्ती केली जाईल, असे सांगितले.

महापौर मुर्तडक म्हणाले की, पालखीच्या स्वागताचा दिवस हा वैभवशाली दिवस असून, माऊलीला समृध्दीसाठी वारकऱ्यांकडून साकडे घालतात. तशाचप्रकारे शहराचा प्रथम नागरिक म्हणून शहराच्या भरभराटीसाठी परमेश्वराला साकडे घालू. या प्रवासात सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसतो. या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या दृष्टीने असणारी मागणी दरवर्षी प्रमाणे मनपातर्फे पूर्ण केली जाईल, असेही महापौर म्हणाले. पालखी स्वागत सोहळ्याप्रसंगी निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष त्रंबकराव गायकवाड, बेलापुरकर महाराज, लहवितकर महाराज, स्वामी सविदानंद सरस्वती, पुंडलिक थेटे, पदमाकर पाटील, लक्ष्मीबाई जायभावे, इच्छामणी केटरिंगचे उत्तम गाढवे यांचा मनपातर्फे पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. पालखीत सहभागी झालेल्या ३५ दिंडी प्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते सतरंजी भेट वस्तु वाटप करण्यात आल्या. वारकऱ्यांना नाश्ता व चहा पानाची व्यवस्था इच्छामणी केटरर्स यांनी केली होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे यांनी केले. यावेळी उपमहापौर गुरुमीत बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, सभागृह नेत्या सुरेखा भोसले, शिक्षण समिती प्रमुख संजय चव्हाण, मनसे गटनेते अनिल मटाले, माकप गटनेते तानाजी जायभावे, नगरसेवक रूची कुंभारकर, अतिरिक्त आयुकत जीवन सोनवणे, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, डी. टी. गोतिसे, अग्निशमन दल प्रमुख अनिल महाजन, विभागीय अधिकारी नितिन नेर, जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा योजना सुरळीत करा

$
0
0

देवळावासीयांचा रास्ता रोकोचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देवळा नगरपंचायतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील पाणीपुरवठा योजना पूर्णत: ठप्प झाली आहे. एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे पाणीपुरवठा सुरळीत नाही यामुळे देवळावासीयांत नाराजीचा सूर आहे. याबाबत शुक्रवार, (दि. २४) रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा देणारे प्रसिद्धीपत्रकही काढण्यात आले आहे.

देवळा सामुदायिक पाणीपुरवठा योजना गेल्या पंधरा दिवसांपासून पूर्णतः ठप्प झाली आहे. येत्या तीन दिवसात देवळा सामुदायिक पाणीपुरवठा योजना सुरळीत झाली नाही. याबाबत नगराध्यक्षा धनश्री आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे.

यात देवळा शहरासह आठ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या देवळा सामुदायिक पाणीपुरवठा योजनेवरील मुख्य विहिरीजवळील चार कुपनलिकांचे विद्युतपंप नादुरुस्त आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सदरच्या कुपनलिका बंद अवस्थेत आहेत. गिरणा नदीला पाणी नसताना सदर कुपनलिकांचे पाणी विहिरीत टाकून सदर योजनेवरील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. याचे विद्युतपंप दोन दिवसात दुरुस्त करण्याचे ठोस आश्वासन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. पी. नंदनवरे यांनी गेल्या चार महिन्यांपूर्वी देवळ्यात झालेल्या आढावा बैठकीत दिले होते. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप सदरच्या कुपनलिका दुरुस्त न झाल्याने पाणीपुरवठा योजना पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे जनतेला कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पत्रकावर नगराध्यक्षा धनश्री आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर, जितेंद्र आहेर, प्रदीप आहेर आदींसह सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पाणी असूनही टंचाई

देवळा शहरासाठी नव्याने कार्यान्वित होणाऱ्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेवरील मुख्य विहिरीला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. मात्र सदर योजनेवरील जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती असल्याने पाणीपुरवठा करता येत नाही. संबंधित ठेकेदाराला अनेकवेळा तोंडी-लेखी कळवूनही गळती थांबविण्यात आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images