Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उपकेंद्रांची जागा ही धुळे महानगरपालिकेने मोफत देण्याचा ठराव करून शासनस्तरावर पाठविला होता, मात्र नुकताच हा ठराव निलंबित करून मनपा प्रशासन आणि राज्य सरकार हे विद्यार्थी विरोधी असल्याचे दाखवून देत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनप्रसंगी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफी मिळण्याची मागणी केली आहे. परंतु ही रक्कम काही विद्यार्थ्यांना परत मिळालेली नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच मागावर्गीय विद्यार्थ्यांची गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती थकीत असून, त्याअभावी विद्यार्थ्यांचे शोषण होत आहे. आंदोलनात संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष यशवर्धन कदमबांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सत्यजित सिसोदे, शहराध्यक्ष कांतीलाल दाळवाले, मयूर ठाकरे, सचिन आखाडे, कुणाल पवार, संदीप हजारे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्याचे महापौरपद राष्ट्रवादीकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना महाले यांची महापौरपदी, तर उमेर अन्सारी यांची उपमहापौरपदी निवड झाली.

मनपामध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, शहर विकास आघाडीचे नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत. महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा करण्यात आल्याने विद्यमान महापौर जयश्री अहिरराव यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या आदेशाने जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. महापौर पदासाठी कल्पना महाले व उपमहापौर पदासाठी उमेर अन्सारी यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला होता. मनपामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्याने राष्ट्रवादीकडेच पुन्हा सत्ता जाणार असल्याचे संकेत होते.

सेना-भाजपचा पराभव

शिवसेनेतर्फे महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ज्योत्स्ना पाटील, उपमहापौर पदासाठी भाजपच्या बिरबला मंडोरे यांना प्रत्येकी १४ मते मिळाल्याने त्यांचा पराभव होऊन धुळे मनपाची सत्ता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे.

आयुक्त गैरहजर

या निवडणूक प्रक्रियेप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. नामदेवराव भोसले हे सभागृहात आले नाहीत. फक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिसाळ हेच उपस्थित होते. आयुक्त भोसले नेमके कोठे गेलेत यावर सभागृहात चर्चा चालली होती.

नगरसेविका तटस्थ

शहर विकास आघाडीच्या नगरसेविका सारिका अग्रवाल या निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सभागृहात आल्या पण स्वाक्षरी करून तटस्थ राहिल्या, तर बसपाच्या सुशिलाबाई ईशी, राष्ट्रवादीकडून निवडून आलेले पण सध्या शिवसेना महानगरप्रमुख पदावर असलेले सतीश महाले यांच्या पत्नी मनिषा महाले, राष्ट्रवादीचे चंद्रकांत केले आणि काँग्रेसचे इस्माईल पठाण आदी नगरसेवक गैरहजर राहिले.

पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस - ३४, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष - २, शहर विकास आघाडी - १२, शिवसेना - ११, काँग्रेस - ७, भाजपा - ३, बसपा - १.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजानचा खंड पूर्ण; ईदच्या खरेदीला वेग

$
0
0

पवित्र रमजानुल मुबारक महिन्यातील ११ उपवास (रोजा) पूर्ण झाले आहेत. त्यामुळे रमजानच्या तीन खंडांपैकी एक खंड (अशरा) पूर्ण होऊन दुसऱ्या खंडात रमजानने प्रवेश केले आहे. दरम्यान, शुक्रवारी रमजानमधील दुसरा जुमाअ साजरा होणार असून, यानिमित्त दुपारी शहरातील मशिदींत जुमाअचे खास सामूहिक नमाजपठण करण्यात आले.

रमजान महिना हा तीन खंडांत विभागलेला असून, तीन खंडांतील उपवासांना धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. तीनही खंडांतील उपवास करणाऱ्यांवर अल्लाकडून कृपा होते, विशेष सरंक्षण, नरक यातनांपासून मुक्ती मिळते. अंतिम खंडात २० व्या उपवासापासून शहरावरील विविध संकटे नाहीशी होऊन सर्वांवर ईश्वराची कृपा सदैव कायम राहण्यासाठी विविध मशिदीत मौन धारण करून एतेकाफमध्ये केले जाते. रमजान ईदचे चंद्रदर्शन घडेपर्यंत हे एतेकाफ मशिदीत सुरू असते. यंदा पावसाने दडी मारल्याने देशात विविध उत्पन्न होत असलेले संकटे नाहीशी होऊन भरपूर पाऊस यावा, यासाठी खास दुअापठणही रमजानच्या प्रार्थना काळात केले जात आहे. २६ वा उपवासांच्या दिवशी शब-ए-कद्रची पुण्यप्राप्तीची रात्र साजरी होईल. यानिमित्ताने गरिबांना दान केले जाईल.

दरम्यान, रमजान ईद ही १७ दिवसांवर येऊन ठेपल्याने त्यानिमित्त विविध वस्तू खरेदीला वेग आला आहे. मुस्लिमबांधवांच्या गर्दीने शहरातील बाजारपेठ फुलली आहे. यंदाच्या रमजानवरही महागाईचे सावट कायम आहे. उपवासाच्या विविध खाद्यपदार्थांसह ईदच्या विविध वस्तू महागल्या आहेत. ईदला विविध फॅशनमधील कपडे शिवून घेण्यासाठी शहरातील टेलर्सकडे गर्दी वाढत आहे. ईदच्या नमाजपठणासाठी पठाणी, कुर्ता-पायजमा व जॅकेट आदींना बाजारात वाढती मागणी आहे. जुने नाशिक परिसरात विविध ठिकाणी रेडिमेड कुर्ता-पायजमाची दुकाने थाटली आहे. याशिवाय शीरखुर्म्यासाठी लागणाऱ्या सुक्यामेव्याची दुकाने पुढील आठवड्यात थाटली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांनी लुटला शूटिंगचा आनंद

$
0
0



पिस्तूल आणि रायफल या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शूटिंग प्रशिक्षण शिबिराला नाशिककरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शिबिराचे आयोजन महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले. यात विनर्स शूटिंग क्लबच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले.

आडगाव नाका येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलातील विनर्स शूटिंग क्लबमध्ये झालेल्या शिबिरात विविध प्रकाराच्या पिस्तूल आणि रायफल हातात घेऊन शूटिंग केल्यानंतर सहभागी झालेल्या नाशिककरांच्या चेहऱ्यांवरून आनंद ओसंडून वाहत होता. उपक्रमामध्ये लहान मुले, युवक, महिला अशा सर्व वयोगटांतील व्यक्ती सहभागी झाल्या. शूटिंगची, तसेच सुरक्षा नियमांची माहिती घेत त्यांनी रायफल आणि पिस्तूल शूटिंगचा आनंद लुटला.

आतंरराष्ट्रीय शूटिंग कोच मोनाली गोऱ्हे यांनी सुरक्षेचे नियम समजावून सांगितले. रायफल किंवा पिस्तूल हे इम्पोर्टेड असतात. ते हाताळताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. रायफल किंवा पिस्तूल हे शस्त्र हातात घेण्यापूर्वी गोळ्यांनी भरलेले आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी लागते. शस्त्राचे बॅरेल छताकडे किंवा जमिनीकडे असावे. कारण, या शस्त्रामधून बाहेर पडणाऱ्या गोळीचा वेग प्रतिसेकंद १५० मीटर इतका असतो.

ऑलिम्पिक स्पर्धेबाबत मार्गदर्शन ऑलिम्पिकमध्ये होणाऱ्या शूटिंग स्पर्धांची माहिती देताना कोच मोनाली गोऱ्हे यांनी सांगितले, की या खेळात अठरापेक्षा कमी, १८ ते २१ आणि २१ पेक्षा अधिक असे तीन वयोगट असतात. १० मीटर, २५ मीटर अशा अंतराच्या स्पर्धा असतात. प्रथम राउंडमध्ये पुरुषांसाठी ६० शॉट, ६०० पॉइंट आणि एक तास १५ मिनिटांचा वेळ असतो, तर महिलांसाठी ४० शॉट, ४०० पॉइंट आणि ५० मिनिटांचा वेळ असतो. त्यानंतर दुसऱ्या राउंडमध्ये २० शॉट व प्रत्येक शॉटसाठी ५० सेकंदांचा वेळ असतो. या वेळी उपस्थित सभासदांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या उपक्रमाचे कौतुक केले.

नाशिकमध्ये शूटिंगची माहिती जास्त लोकांना नसावी. मात्र, 'मटा'ने शूटिंग प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, ही कौतुकास्पद बाब आहे. शूटिंग केल्यामुळे प्रचंड आनंद झाला आहे. 'मटा'ने अशाच अनोख्या उपक्रमांचे आयोजन करावे. - आशा गुजर

'मटा'ने अतिशय सुंदर उपक्रम घेतला. मी मुलासह शूटिंग करण्याची संधी अनुभवली. नाशिकमध्ये शूटिंगबाबत फारशी माहिती मिळत नाही. मात्र, 'मटा'च्या या कार्यक्रमामुळे पुणे, मुंबईसारखे शूटिंग प्रशिक्षण मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. - तुषार पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढिम्म प्रशासन हलणार कधी?

$
0
0




समाजात अनेक समस्या आहेत. यातील काही तर अनेक वर्षांपासून कायम आहेत. नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड देतादेता नाकीनऊ येते. अशा परिस्थितीत ढिम्म प्रशासन हलणार कधी, असा परखड सवाल 'मटा सिटीझन रिपोर्टर्स'नी केला.

महाराष्ट्र टाइम्सने सिटीझन रिपोर्टर हे अॅप सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे समाजात, परिसरात आणि ठिकठिकाणी घडणाऱ्या बातम्या, घटना तसेच अडीअडचणी ते बिनधास्त मांडू शकतात, पाठवू शकतात. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप मोफत उपलब्ध असून आजवर हजारो सिटीझन रिपोर्टर्सनी ते डाऊनलोड करून त्याद्वारे विविध समस्या पाठविण्यास प्राधान्य दिले आहे. या रिपोर्टर्सनी पाठविलेल्या समस्या, फोटो आदी दररोज 'मटा'मध्ये प्रसिद्ध केले जातात. काही अडचणी तर विशेष चर्चेच्याही ठरतात. काही अडचणींची तातडीने दखल घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना केली जाते. आठवड्यातील चार बेस्ट सिटीझन रिपोर्टर्सला 'मटा'च्या वतीने सन्मानित करण्यात येते. या आठवड्यातही चार जणांचा शुक्रवारी सायंकाळी 'मटा'च्या कार्यालयात प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. कृतिका वाघ, वसंत कुरुप, जयवंत पाटील, अभिषेक शिंदे या चार रिपोर्टर्सच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी त्यांना 'टाइम्स ऑफ इंडिया'चे नाशिक ब्युरो चीफ वेणुगोपाल पिल्ले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

मी नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. आमच्या गावाकडे आठवडाभर पाणी येत नाही आणि येथे नळी लावून विविध ठिकाणी पाण्याची उधळपट्टी केली जाते, याचे मला खूप वाईट वाटले. त्यामुळेच पाण्याच्या उधळपट्टीचे फोटो मी पाठवले होते. यापुढेही मी समस्या पाठवेन. - कृतिका वाघ

उड्डाणपुलालगत असलेल्या सर्व्हिसरोडवर पार्किंग करणे बेकायदा आहे. मात्र, तेथे सर्रास पार्किंग केले जाते. गॅरेजच्या गाड्या लावल्या जातात. यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होते. हे सारे पोलिसांना दिसत नाही का? की ते दुर्लक्ष करतात? - जयवंत पाटील

कचरा खुल्या हवेत जाळणे अयोग्य आहे, असा प्रचार महापालिका करते. मात्र, महापालिकेचेच अधिकारी कचरा जाळत असल्याचे दिसून येते. हीच बाब मी पाठविली होती. आता तरी महापालिकेला जाग येईल, अशी अपेक्षा आहे. - वसंत कुरुप

विहितगाव येथील बसस्टॉपच्या ठिकाणी निवारा शेडच नाही. ऊन आणि पावसात प्रवासी तसेच उभे राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून स्थिती अशीच आहे. हे चित्र बदलण्याची मानसिकता दिसत नाही. - अभिषेक शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकत सर्वेसाठी फेरनिविदा

$
0
0

शहरातील मिळकतींच्या सर्वेक्षण दृष्टीपथास दिसत असून महापालिकेने काढलेल्या निविदापूर्व बैठकीत आठ कंपन्यानी सहमती दर्शवली आहे. फेरनिविदेत आठ कंपन्यांनी सहभाग घेतला असून त्यात कोलकता, पुणे, मंबई येथील नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. यापूर्वीच्या निविदा प्राकलन दरापेक्षा जास्त असल्याने फेटाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता फेरनिविदा काढण्यात आल्या.

महापालिका हद्दीतल्या मिळकतींचा सर्वेक्षणासाठी महापालिकेन २००७ मध्ये हैद्राबाद स्थित स्पेक सिस्टीम्स लिमिटेड ही कंपनी नियुक्त केली होती. मात्र, त्या कंपनीने अर्धातच काम सोडले. त्यामुळे सहा वर्षांपासून रखडलेली ही प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. स्मार्ट सिटी प्रस्तावात करवाढ फेटाळल्यानंतर महापालिकेने शहरातील रेकॉर्डवर नसलेल्या मिळकती शोधून त्याद्वारे उत्पन्न वाढीचा निर्णय घेतला आहे. शहरात सद्यस्थितीत ३ लाख ९८ हजार मिळकती आहेत. यांच्याकडून सुमारे सव्वाशे कोटी रुपये महापालिकेला मिळणे अपेक्षित आहे. परंतु, तरीही वसुली ही ८० कोटीच्या पुढे जात नाही. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी नव्या मिळतींचा समावेश करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महापालिकेने मिळकतींच्या सर्वेक्षण हे खासगी कंपनीकडून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु या निविदा या प्राकलन दरापेक्षा जास्त असल्याने प्रशासनाने त्या फेटाळून लावल्या होत्या.

मिळकतींच्या सर्वेक्षणासाठी काढण्यात आलेल्या फेरनिविदेत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील आठ कंपन्यानी भाग घेतला. या कंपन्यामध्ये कोलकता, मुंबई, पुणे, नागपूर येथील कंपन्याचा समावेश आहे. या कंपन्याच्या प्रतिनिधींची प्रीबीड बैठक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासोबत झाली. त्यात या कंपन्यानी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. महापालिकेने सर्वेक्षणासाठी सात कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे या निधीच्या आत संबंधित कंपन्यांनी काम करण्याची तयारी दाखविल्यास मिळकत सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

२५ टक्के मिळकती वाढणार मिळकतींचा सर्वेक्षण सॅटेलाईट पद्धतीने केले जाणार आहे. त्याचे थेट नियंत्रण महापालिकेत असणार आहे. तसेच निवासी इमारतींचा होत असलेला व्यावसायिक वापरही या सर्वेक्षणातून पुढे येणार आहे. गेल्या १० वर्षात लोकसंख्या वाढली तरी, मिळकतींचे सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे यात जवळपास २५ टक्के अधिक मिळकती वाढतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे उत्पन्न २०० कोटीपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् उलगडले ‘त्या’ संजीवन समाध्यांचे रहस्य

$
0
0



नाशिक : प्रभू रामचंद्रांच्या परमपावन चरणकमलांनी सुगंधित झालेल्या नाशिकला आध्यात्मिकतेचा मोठा वारसा आहे. या वारशाला साष्टांग प्रणिपात करून येथे अनेक अवलियांनी संज‌ीवन समाधी घेतलेल्या आहेत. परंतु, नाशिकला ज्ञात असलेल्या सहा संजीवन समाध्यांमध्ये आणखी दोन समाध्यांची भर पडली असून त्या खुद्द काळाराम मंदिरात विराजमान आहेत. या समाध्यांखाली असलेल्या शिलालेखामुळे या गोष्टीवर प्रकाश पडला असून संजीवन समाध्यांचे अभ्यासक असलेल्यांना त्या खुणावत आहेत. या दोन संजीवन समाध्या नाथपंथियांच्या आहेत.

अनेक अलौकिक गोष्टींनी भारलेले नाशिक आध्यात्मिक बाबींनीही परिपूर्ण आहे. कुंभमेळ्यामुळे नाशिकला प्राचिन इतिहास प्राप्त झाला असला तरी प्रभू रामचंद्रांनी खुद्द येथे लक्ष्मण व सीतादेवी यांच्यासह वास्तव्य केल्याने ही भूमी पावन झाली आहे. गोदावरी काठावर प्रभू रामचंद्रांनी तपश्चर्या करून शंकर भगवानांना प्रसन्न करून घेतल्याची आख्यायिका आजही पुराणात नमूद केलेली आहे. या सर्व अलौकिक घटनांमुळे गोदावरी नदीच्या तीरावर आपले अंतिम क्षण व्यतित व्हावे, अशा हेतूने अनेक अवलिये गोदाकाठी आले आणि येथेच त्यांनी संजीवन समाधीही घेतली. कपालेश्वर मंदिरासमोरील अजगरेश्वर महाराजांची समाधी, कानडे मारुती लेनमधील श्री स्वामीनारायण महाराज व वामनमहाराज या गुरूशिष्यांची समाधी, एकमुखी दत्त मंदिरामागे रघुनाथ उर्फ भटजी महाराजांची समाधी, नारोशंकर मंदिराच्या पश्चिमेला नरसिंग महाराजांची समाधी आणि काळाराम मंदिराच्या बाहेर पुणे विद्यार्थी वसतिगृहामध्ये केशव महाराजांची समाधी या सहाही समाध्या नाशिकमधील संजीवन समाधी म्हणून प्रसिध्द आहेत. परंतु, याच समाध्यांच्या बरोबरीने आणखी दोन संजीवन समाधी नाशकात असून प्रसिध्द काळाराम मंदिरात त्या विराजमान आहेत. या दोन समाध्या गुरू शिष्यांच्या असून त्यावर शिलालेखही लिहिलेला आहे. काळाराम मंदिरात गेल्यानंतर मुख्य मंदिराच्या समोरच डावीकडे या समाध्या पहायला मिळतात.

फार पूर्वी येथे नवनाथ संप्रदायाचा आखाडा होता. कालांतराने या आखाड्याने हनुमान सभामंडपासाठी जागा दिली. त्याबदल्यात कुंभमेळ्याच्या वेळी येथे महिनाभर थांबू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले, म्हणूनच येथे नाथांच्या झुंडी महिनाभर थांबतात. - धनंजय पुजारी, पुजारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना पदाधिकाऱ्यासह चौघांना जुगार छाप्यात अटक

$
0
0



पाथर्डी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शिवसेना माजी उपमहानगरप्रमुख सुदाम डेमसे यांच्यासह अन्य चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला आहे. पाथर्डी शिवारात डेमसे यांच्या मळ्यातील एका बंद खोलीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्‍त श्रीकांत धिवरे व इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सदानंद इनामदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी जुगार अड्डयावर सुदाम डेमसे यांच्यासह रोहन शहा, सिमाज खान, सागर पाटील, विजय राऊत हे जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ११ मोटार सायकली, ७ मोबाइलसह ३१ हजार पाचशे रुपयांचा असा ऐवज जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नंदिनी’चा २१ जूनला हेरिटेज वॉक

$
0
0

'नंदिनी बचाव' या उपक्रमात मंगळवारी (दि. २१) आगरटाकळी येथील संगमापासून नंदिनीचा हेरिटेज वॉक करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता आगर टाकळीच्या श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठापासून होणार आहे. काठे गल्लीपर्यंत हा वॉक करण्यात येणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स' व 'टाइम्स ऑफ इंडिया'चा इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट असलेल्या 'नंदिनी बचाव' या उपक्रमाच्या नदी स्वच्छता शुभारंभानंतर दुसऱ्या टप्प्यात पदार्पण झाले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वर्धापनदिनी ८ जून रोजी सातपूर येथील गोरक्षनाथ पूलाजवळ स्वच्छतेचा प्रारंभ करण्यात आला. या हेरिटेज वॉकमध्ये नंदिनी नदीकिनाऱ्यावरील दोन्ही बाजुच्या शाळा, कॉलेजेस, विविध संस्था, गणेशोत्सव मंडळे यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. या शाळांजवळून जाताना तेथील विद्यार्थी यात सहभागी होणार असून स्वच्छता व सुशोभिकरणाविषयी जगजागृती केली जाणार आहेत. या वॉकमध्ये नंदिनीचे पौराणिक महत्त्व व आख्यायिका सांगण्यात येणार आहे. नंदिनीविषयी जाणून घेण्यासाठी सहभागाचे आवाहन 'मटा'तर्फे करण्यात येत आहे.

शाळा, कॉलेजेसला आवाहन आगर टाकळी ते काठे गल्ली असा नदी हेरिटेज वॉक करण्यात येणार असून या भागातील शाळांना सहभागाचे आवाहन करण्यात येत आहे. 'नंदिनी बचाव' उपक्रमामध्ये नंदिनी नदीकिनाऱ्यावरील शाळा, कॉलेजेस तसेच विविध गणेश मंडळांनाही आवाहन करण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छता तसेच सुशोभिकरणाच्या दृष्टीकोनातून काय पुढाकार घेता येईल, याविषयी विचार करावा, सहभागी व्हावे. यासाठी इच्छुकांनी प्रशांत (९५०३६७७७४०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोढा समितीच्या शिफारशीने क्रिकेटच संपेल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीसीसीआयचे कामकाज कसे चालावे, यासाठी न्यायालयाने लोढा समितीची नेमणूक केली आहे. या समितीने अनेक आक्षेपार्ह बदल सुचवले आहेत. त्यामुळे क्रिकेट संपेल की काय, अशी शंका येते. याबाबत लोकांच्या माध्यमातून उठाव झाला पाहिजे, असे मत बीसीसीआयचे नवनिर्वाचित सचिव अजय शिर्के यांनी व्यक्त केले. नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनतर्फे शिर्के यांचा नाशिक येथे शुक्रवारी हॉटेल गेट-वेमध्ये सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार हेमंत टकले, विलास लोणारी, भीष्मराज बाम आदी या वेळी उपस्थित होते. शिर्के म्हणाले, की, बीसीसीआयने क्रिकेटच्या जगतात फार मोठे काम केले आहे. केवळ काही लोकांमुळे बीसीसीआय बदनाम होत आहे. बीसीसीआयने आजपर्यंत अत्यंत पारदर्शी कराभार केला असून, पुढील काळातही असाच कारभार करेल, यात शंका नाही. ज्या लोकांना या क्षेत्रातले काही समजत नाही असे लोक यात आपले मत प्रदर्शित करीत आहेत.

जाहिरात बंद करणे घातक

काही झाले, की न्यायालयाचा आधार घेतला जातो. न्यायालय सर्वज्ञ असल्याने ते दुष्काळाच्या बाबतीत निर्णय देतात व क्रिकेटच्या बाबतीतही निर्णय देतात. त्यामुळे क्रिकेटचे नुकसान होत आहे. ८७ वर्षे जुनी असलेली संस्था चुकीच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. लोढा समितीने जाहिरात बंद करावी, असा आदेश दिला आहे. त्यामुळे ८० टक्के उत्पन्न कमी होणार आहे. हा क्रिकेटसमोरचा सर्वांत मोठा धोका आहे. न्यायालयात याचिका दाखल झाल्याने पुण्याला होणारे आयपीएलचे सामने झाले नाही याचा फार मोठा फटका क्रिकेटला बसला. ही बाब गंभीर आहे. बीसीसीआयला अंतर्गत आव्हाने फारशी नाहीत. प्रशिक्षकाच्या नियुक्तीबाबत देशी आणि विदेशी असा वाद नाही. जो चांगला प्रशिक्षक आहे त्याची नेमणूक केली जाईल, असे ते म्हणाले. नुकतीच महाराष्ट्राचे कोच म्हणून श्रीकांत कल्याणी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

खेळाडूंना जास्त सामने खेळावे लागतात, यावर बोलताना ते म्हणाले, की ही बाब खरी आहे. याबाबतही लवकर निर्णय घेण्यात येईल. काही कालावधीनंतर भारताच्या दोन टीम तयार कराव्या लागतील असे ते म्हणाले. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी क्रिकेटचा ग्रामीण भागात कसा प्रसार होतो, याची माहिती दिली. विलास लोणारी यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की आम्ही कायमच शिर्केंसोबत आहोत. क्रिकेट घराघरांत पोहोचवण्याचे काम शिर्के यांनी केले आहे. या वेळी हेमंत टकले म्हणाले, की क्रिकेटकडे कमी आणि इतर बाबींकडेच जास्त लक्ष दिले जात आहे. क्रिकेटमध्ये बदलाना सामोरे जायचे असेल तर शिर्के यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. आपण बीसीसीआयचे सचिव झालो, परंतु महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करू नका असे त्यांनी सांगितले. विनायकादादा पाटील म्हणाले, की क्रिकेटच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून बांधिलकी जपली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्यांच्या नियमांचा अहवाल द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धोकादायक फटाक्यांमुळे दरवर्षी शेकडो नागरिकांचा मृत्यू होतो. नुकतेच केरळ राज्यातील एका मंदिरातदेखील १२३ पेक्षा जास्त व्यक्तींना फटाक्यांमुळे प्राणास मुकावे लागले. फटाक्यांच्या धोकादायक साठवणुकीला, निर्मितीला, तसेच वापराला १९८६ च्या एक्स्प्लोझिव्ह अॅक्टनुसार मर्यादा घालण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचे पालन होत नाही. राज्य सरकारने या नियमावलीबाबत, तसेच त्यानुसार केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला आहे.

फटाक्यांचा धोकादायक पद्धतीने वापर होतो. स्फोटक वस्तूंसंदर्भात असलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली होते. उत्पादकापासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत ही साखळी असून, पोलिस दल याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होतो. या पार्श्वभूमीवर शहरातील चंद्रकांत लासुरे यांनी मुंबई हायकोर्टात २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. अवैध फटाक्यांचा साठा, त्याचा वापर व पोलिस प्रशासनाची भूमिका या मुद्द्यांवर लासुरे २०११ पासून लढा देत आहेत. याबाबत लासुरेंनी अनेक तक्रारी केल्या. फटाक्यांचा योग्य पद्धतीने वापर झाल्यास जीवित हानीचा धोका टळू शकते, असे त्यांचे म्हणणे असून मुंबई हायकोर्टातही त्यांनी हीच बाजू अनेकदा मांडली. एक्स्प्लोझिव्ह अॅक्टच्या सर्व तरतुदींची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे लासुरे यांनी 'मटा'शी बोलताना स्पष्ट केले.

याबाबत गेल्या गुरुवारी न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. लासुरे यांच्या वतीने अॅड. ऋतुजा लोकर, अॅड. परब, अॅड. आशीष देशमुख यांनी बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे अक्षय कपाडिया आणि एजीपी एम. पी. ठाकूर उपस्थित होते. खंडपीठाने एक महिन्याची मुदत दिली असून, सरकारने या कालावधीत एक्स्प्लोझिव्ह अॅक्टच्या तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत काय उपाययोजना राबवल्या, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरडाळीचे दर स्थिर ठेवणार! : गिरीश बापट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात तूरडाळीचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला असून, त्यावर राज्यपालांची सही झाली आहे. हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविला असून, मंजुरी मिळताच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. डाळींचा बम्पर स्टॉक करण्याची परवानगी राज्य सरकारने केंद्राकडे मागितल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये दिली.

रेशन दुकानदार आणि केरोसिन परवानाधारकांच्या प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीसाठी बापट नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की तूरडाळीचा प्रश्न सामान्य नागरिकांनी समजून घ्यायला हवा. देशवासीयांच्या एकूण गरजेच्या केवळ ३० टक्के तूरडाळीचे उत्पादन भारतात होते. त्यामुळे दरवर्षी ७० टक्के तूरडाळ अन्य देशांमधून आयात करावी लागते. त्याचे टेंडर सरकार नव्हे, तर व्यापाऱ्यांकडून काढले जाते. मात्र ते दोन तीन महिन्यांसाठी न काढता दोन वर्षांसाठी काढावे, असे सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे हंगामात डाळींच्या भाववाढीवर नियंत्रण येण्यास मदत होईल, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला. यंदा केंद्राने डाळीचा बम्पर स्टॉक केला आहे. राज्य सरकारने केंद्राकडे दोन हजार टन डाळीची मागणी केली. परंतु, पहिल्या टप्यात केवळ ६०० टन डाळ मिळाली आहे. डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकार अनेक पातळीवर प्रयत्न करीत आहे. तुरीचे भाव स्थिर ठेवण्याचा कॅबिनेटने निर्णय घेतला असून, त्यावर राज्यपालांनी सही केली आहे. राष्ट्रपतींची मान्यता मिळताच त्याची अंमलबजावणी होईल. वाहतूक व तत्सम खर्चामुळे जिल्हानिहाय डाळीच्या दरात थोडीफार तफावत असेल. मात्र, नागरिकांना ती तुलनेने स्वस्त दरात मिळू शकेल. केंद्राप्रमाणे राज्यातही तूरडाळीचा बम्पर स्टॉक करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती बापट यांनी दिली.

तूर पेरणीसाठी प्रोत्साहन तुरीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. तुरीचे बियाणे, खत आणि औषधे शेतकऱ्यांना सबसीडीने देण्यात येणार आहेत. डाळीला आधारभूत किमत वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जो शेतकरी आपल्या शेतामध्ये तूर लावेल त्याला प्रोत्साहन म्हणून तूर लागवडीसाठी हेक्टरी किंवा एकरी उचल पैसे देण्याचे विचाराधीन असल्याची माहिती बापट यांनी दिली. तूर साठ्यावर बंधने आणली असून, कुठल्याही परिस्थितीत काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे ते म्हणाले.

डाळ घोटाळ्याचा आरोपही खोटा माझ्यावर तूरडाळ घोटाळ्याचा आरोप झाला होता. खरे तर डाळीचे भाव वाढावेत यासाठी साठेबाजांनी जहाजे समुद्रात उभी करून ठेवली होती. मात्र, आम्ही त्यावर बंधने आणली. ५१ कोटींची डाळ लोकांसाठी ग्राहकपेठ, तसेच अन्य माध्यमांतून विक्री केली. त्या वेळी विद्वानांनी अर्थ लावत मोठा आर्थिक घोटाळा असल्याची आवई उठवली. देशात व राज्यात १० वर्षांत जेवढी डाळ लागत नाही, तेवढ्या रकमेचा डाळीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजनेरीच्या पायथ्याशी प्रेमीयुगलाचे मृतदेह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी गडाच्या पायथ्याशी शुक्रवारी तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तरुणाने तरुणीच्या डोक्यात दगड घालून खून केला व नंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली, असा पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी परिस्थितीवरून निष्कर्ष काढला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर-अंबड लिंक रोड येथील दिलीप वामन आघाव (वय २३) आणि कोमल प्रकाश झाल्टे (वय १९) हे प्रेमीयुगल मोटारसायकलने शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंजनेरी येथे आले होते. तेथे पायथ्यापर्यंत वाहने जातात. पुढे रस्त्याने आल्यानंतर काही वेळात दिलीपने कोमलच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. नंतर स्वतः विष प्राशन केले. दोन्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. कोमल बारावी पास झाली होती, तर दिलीप नापास झाला होता. कोमलला दुसरीकडे शिकायला पाठविणार होते. ती आपल्याला सोडून जाईल, या विचारानेच दिलीपने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तत्पूर्वी, या घटनेची माहिती गुराख्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबड्डीपटूंवर आता नव्या नियमांची पकड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना व भारतीय हौशी कबड्डी महासंघाने खेळाडूंसाठी नवे नियम लागू केले असून, या नियमांमुळे कबड्डीपटूला आता राज्य, जिल्हा बदलण्याबरोबरच संघ बदलण्यालाही चाप बसणार आहे. त्याचबरोबर कबड्डी महासंघाने प्रत्येक खेळाडूला ओळखपत्र बंधनकारक केले असून, ओळखपत्राशिवाय संघटनेशी संलग्न असलेल्या कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही.

स्वतःच्या जिल्ह्यातून खेळण्यास न मिळाल्यास अनेक कबड्डीपटू अन्य जिल्ह्यांतून अथवा राज्यांकडून खेळण्यास पसंती देत होते. त्याचबरोबर बदलाची ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोणताही कालावधी आणि किती वेळा जिल्हा किंवा राज्य बदलायचे याला कोणतेही नियम नव्हते. त्यामुळे अनेकदा इतर खेळाडूंची अडचण व्हायची. मात्र, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने नव्या नियमांनुसार कबड्डीपटूला १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या मुदतीतच ही बदलाची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्याचबरोबर एकदा बदलाची प्रक्रिया पार पडल्यास तीन वर्षांपर्यंत त्याला त्यात बदल करता येणार नाही.

खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी

भारतीय हौशी कबड्डी महासंघाने खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केली आहे. नोंदणी केलेल्या खेळाडूंनाच कायम ओळखपत्र देण्यात येणार आहे. ज्या खेळाडूकडे ओळखपत्र असेल त्यांनाच कबड्डी महासंघ व महासंघाशी संलग्न संस्थांच्या स्पर्धांत खेळू दिले जाणार आहे. ही ऑनलाइन नोंदणी www.indiankabaddi.org या वेबसाइटवर करता येणार आहे.

जिल्हा, राज्य, संघ बदलाचे नियम

- जर खेळाडूला जिल्हा, राज्य किंवा संघ बदलायचा असेल तर बदलीसाठी अर्ज करण्याची मुदत १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर अशी असेल.

- राज्य बदलायचे असेल तर राज्य संघटनेचे, जिल्हा बदलायचा असेल तर जिल्हा संघटनेचे व संघ बदलायचा असेल तर मूळ संघाचे 'ना हरकत' प्रमाणपत्र बंधनकारक असेल.

- राज्य बदल करण्यासाठी २,००० रुपये, जिल्हा बदलासाठी १००० रुपये, तर संघ बदलण्यासाठी ५०० रुपये शुल्क असेल.

- एकदा बदली झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत पुन्हा जिल्हा, राज्य, तसेच संघ बदलता येणार नाही.

- लीग स्पर्धा खेळण्यासाठी संघटनेची परवानगी बंधनकारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझी बदनामी, ही तर काँग्रेसवाल्यांची विकृती!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सत्तेपासून दूर झाल्यामुळे काँग्रेसवाले अस्वस्थ आणि जर्जर झाले आहेत. त्यामुळेच सोशल मीडियाद्वारे त्यांनी बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणायचे असेल तर खुशाल आणावे. जनता सर्व पाहते आहे. सोशल मीडियाद्वारे माझी बदनामी करण्याचा प्रकार म्हणजे काँग्रेसवाल्यांची विकृती असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी नाशिक येथे शुक्रवारी केला.

पुरवठा विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांची सुनावणी घेण्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माझ्या एका मित्राच्या मुलीने फडणवीस यांच्यासमवेत फोटो काढण्याची इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली. तिला मी २५ ते ३० वर्षांपासून ओळखतो. थोडा वेळ थांब, असे मी तिला सांगितले. तिचा हात धरून मी असभ्य वर्तन केल्याचा फोटो गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या सर्व प्रकरणावर संबंधित महिलेने लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये बदनामी करणाऱ्यांविरोधात फिर्याद दिल्याचे बापट यांनी सांगितले.

असेच एका असोसिएशनच्या कार्यक्रमात मला पोहोचण्यास उशीर झाला. माझ्या एका नातलगाची मुलगी स्टेजवर येऊन मला सेकहँड करून निघून गेली. त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. मंत्री म्हणून आम्ही अनेकदा मैदानांवर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यास जातो. तेथे महिला, तसेच पुरुष खेळाडूंना सेकहँड करतो. काँग्रेसवाल्यांची सत्ता गेल्यामुळे त्यांच्यामधील अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळेच ते एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण आणत असल्याचा आरोप बापट यांनी केला. मात्र, जनता हे सर्व पाहतेय. मी असो, खडसे किंवा महाजन असो, आमच्या मंत्र्यांवर बेछूट आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशीसाठी माजी न्यायमूर्तींची समिती नेमली असून, तथ्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


…तर घरकुलचे काम पूर्ण झाले असते

$
0
0

कोर्टासमोर अरुण काबरे यांची साक्ष

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव नगरपालिकेकडून नऊ ठिकाणी घरकुल योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. नंतर या कामासाठी ठेकेदाराला नऊ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. सर्व परिस्थिती अनुकूल असती, तर नऊ महिन्यांत घरकुलांचे काम पूर्ण झाले असते, अशी माहिती काबरे अॅण्ड चौधरी कंपनीचे प्रमुख वास्तुविशारद अरुण काबरे यांनी शनिवारी उलटतपासणीत दिली.

धुळे जिल्हा विशेष न्यायालयात न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर जळगाव घरकुल घोटाळ्याचे कामकाज सुरू आहे. त्यात आतापर्यंत चार साक्षीदारांची साक्ष झाली. काबरे-चौधरी फर्मचे वास्तुविशारद अरूण काबरे यांची सरतपासणी शनिवारी, सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण, अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी घेतली. आरोपी राजेंद्र मयूर यांचे वकील अविनाश भिडे यांच्याकडून काबरे यांची उलटतपासणी घेण्यात आली. घरकुलाच्या कामकाजाबाबत काबरे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांच्याकडून उत्तरे देण्यात आली. पोलिसांकडे यापूर्वी जबाब देताना कोणतीही कागदपत्रे दाखविण्यात आली नव्हती. तसेच सरतपासणीत जी कागदपत्र दिली तीच पोलिसांना जबाबच्या वेळी दिली. फेब्रुवारी २००६ ते फेब्रुवारी २०१२ या काळात घरकुलांबाबत कोणताही चार्ट बदलण्यात आला नसल्याचेही त्यांनी सांगितले. नगरपालिकेकडून घरकुलाचे काम नऊ महिन्यांत पूर्ण करावे, असे सुचविण्यात आले होते. मात्र त्याबाबत प्रदीप रायसोनी यांनी सूचना दिली होती. जमिनीची प्रत पाहूनच कोणत्या प्रकारचे बांधकाम करायचे हे ठरवले जाते. कोणत्याही प्रकारचे बांधकाम व पाया करायचा याबाबत तांत्रिक सल्लागार निर्णय घेतो. ते ठरविण्याचा अधिकार हा ठेकेदाराला नसतो. घरकुल योजनेसाठी पी. आय. भंगाळे हे सेक्टर सल्लागार होते. घरकुलाच्या सहा जागा या प्रिंपाळा शिवारात बदलण्याचा निर्णय भंगाळे यांच्या सल्ल्याने झाल्याचे म्हणणे खोटे आहे. या जागांची प्रत पाहून सेक्टर सल्लागार यांनी पाइप फाउंडेशनची गरज असल्याचे सूचविले होते. ही गोष्ट आपण २४ जून २००६ रोजी दिलेल्या जबाबात सांगितली होती, अशी माहिती काबरे यांच्याकडून देण्यात आली. या संदर्भातील इतरही प्रश्नांबाबत त्यांनी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनोखा प्रकाशोत्सव

$
0
0

गौतम संचेती महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने नाशिकपासून ७० किलोमिटर अंतरावर असलेल्या भंडारा येथे काजवा महोत्सव घेतला. २१ मे ते ३० जूनपर्यंत या महोत्सवाचा कालावधी जाहीर करण्यात आला. पण पावसाची चाहुल लागल्यामुळे २५ जूनपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने मे व जून महिना हा कोरडा असतो. ही संधी साधत या महोत्सवाचे आयोजन महामंडळाने पब्लिक पार्टनरशिप अंतर्गत केले. नाशिकहून येथे जाण्यासाठी खास वाहने उपलब्ध करण्यात आली व राज्यभर या महोत्सवाचा प्रचार विविध माध्यमांतून केला गेला. खरं तर हा कोणताही मोठा महोत्सव नसतानाही मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळे, बीड, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील पर्यटकांनी या महोत्सवाला भेट देत आनंद लुटला. रोज ५०० हून अधिक गाड्या या ठिकाणी येत असल्यामुळे येथील आदिवासी बांधवांना रोजगारही मिळाला. याच महोत्सवात आलेल्या पर्यटकांपर्यंत महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बढे -मिसाळ यांनी महाराष्ट्राच्या पर्यटन विकास महामंडळाची माहिती देत ब्रँडिंग केले. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला हा महोत्सव तसा नाशिककरांना नवा नाही. पण या महोत्सवात जाऊन फक्त काजवेच बघायचे व त्यासाठी एक हजार रुपये मोजायचे हा प्रश्न मात्र महामंडळाला अनेकांनी विचारला. पण अशा स्थितीत या महोत्सवाचे महत्व सांगत अनेक पर्यटकांना काजवा महोत्सवाची सहल महामंडळाने घडवली. दिवाळीपूर्वीच दिव्यांचा आनंद देत प्रकाशमय वातारवरणात आलेल्या पर्यटकांना हा प्रकाशसोहळा हरखून गेला. चहा, नाष्टा, आद‌िवासी जेवण याबरोबरच भंडारदऱ्याचे साईट सीन व २५ कि. मी. अंतरावर असलेले अमृतेश्वरचे मंदिर हे सर्व पर्यटकांना वेगळेपण दाखवत होते. जेवणामध्ये असलेली बाजरी व तांदळाची भाकरी, गुळाची खीर, भरीत, प‌िठलं, ठेचा व आदिवासी बांधव विकत असलेले आंबा, जांभूळ, करवंदे यामुळे येथे खवैय्यांचीसुध्दा मौज झाली. खरं तर शहरात किंवा इतरत्र काजवे दिसतात. पण त्यांच्या झुंडीच्या झुंडी बघणं ही गोष्ट खूपच आनंददायी असते. अल्प आयुष्य असलेले हे काजवे पावसाची चाहूल लागताच दिसतात व पाऊस पडला की गायब होतात. अशा या काजव्यांचा उजळून निघणारा हा महोत्सव भंडारदऱ्याच्या कुशीत पार पडला. अनेकांनी भेटी दिल्या तर काहींचे राहून गेले. पर्यटन महामंडळाने आपल्या उपक्रमाला उजळण्याचे काम केले असले, तरी त्यातून त्यांची कल्पकता निश्चितच स्वागतार्ह आहे. नाशिक जिल्हा हा पर्यटकांना आकर्षित करणारा जिल्हा आहे. पण येथे मोठमोठे अधिकारी, राजकीय पक्ष व श्रीमंत व्यक्ती येतात ते त्र्यंबकेश्वर व शिर्डीच्या दर्शनासाठी. त्यांचा मुक्काम नाशिकला असला तरी त्यांचे पर्यटन येथे होत नाही. याच संधीचा फायदा घेऊन पर्यटन महामंडळाने काजवा महोत्सवासारखे उपक्रम घेऊन जिल्ह्यातील सौंदर्य फुलवणाऱ्या पर्यटन स्थळाकंडे त्यांना आकर्षित करायला हवे. महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र येथे कितीतरी स्थळे अशी आहेत, तेथे पर्यटकांना आनंद मिळेल. येथील गड-किल्ल्यांना इतिहास आहे. पण त्याकडे पर्यटनाच्या दृष्टीने अजूनही लक्ष दिले गेले नाही. ही स्थळे विकसित केली तरी पर्यटनाचे डेस्ट‌िनेशन म्हणून महाराष्ट्र नंबर एक असेल. पण त्यासाठी ब्रँडिंग करणे तितकेच गरजेचे असेल. त्यात कल्पकता वापरली तर पधारो म्हणण्याची गरज पडणार नाही. पर्यटक आपोआप वळतील, हे निश्चित! Gautam.sancheti @timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववसाहतीत रस्त्यांची वानवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शहरातील महत्त्वाचा रस्ता म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. त्यामुळे अनेकांची या भागाला पसंती दिसून येते. पण, याच गंगापूररोड भागात नव्याने वसलेल्या ग्लोबल टाउनशिपला मात्र रस्त्यांची वानवा भासत आहे. रामेश्वरनगर व कडलग मळा परिसरातील स्थितीही तशीच असून, येथील रहिवाशांची वाट खडतर बनल्याने महापालिका कधी लक्ष घालणार, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे येथील इमारतींमधील २० लाखांपासून ते तब्बल दीड कोटी रुपयांपर्यंतचे फ्लॅट अनेकांनी घेतले असूनही रस्त्यांनी मात्र त्यांची निराशाच केली आहे. महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी ग्लोबल टाउनशिपमधील रहिवाशांनी केली आहे.

महापालिकेतील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या गंगापूररोड भागात आजही नागरी सुविधा मिळत नसल्याने ग्लोबल टाउनशिपमधील रहिवाशांची नाराजी आहे. त्यातच गंगापूररोड भागात फ्लॅट घेण्यासाठी अनेकांची पसंती असल्याने बांधकाम व्यावसायिकांनीदेखील शासनाचे व महापालिकेचे नियम पाळत सुंदर इमारतींचे जाळे गंगापूररोड भागात तयार केले आहे. परंतु, वेगाने वाढलेल्या रामेश्वरनगर व कडलग मळा परिसरातील रहिवाशांचा प्रवास खडतर बनला आहे. या भागात रस्तेच झाले नसल्याने कच्च्या रस्त्यांवरून महागडी वाहने चालविताना रोजच कसरत करण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. नावाजलेल्या गंगापूररोड भागात रस्त्यांची कामे करावीत, यासाठी बांधकाम व्यावसायिकदेखील आग्रहाने महापालिकेकडे मागणी करतात. परंतु, त्यांच्या मागणीकडे

महापालिका कधी लक्ष देणार, असा सवाल रहिवासी उपस्थित करीत आहेत. प्रभाग २१ मध्ये असलेल्या ग्लोबल टाउनशिपकडे नगरसेवकांनी लक्ष घालत रस्त्यांची कामे करावीत, अशी मागणीदेखील रहिवाशांकडून होत आहे.

कॅनाॅलरोडही गेला खड्ड्यात

गंगापूररोडला समांतर असलेल्या कॅनाँलरोडच्या रस्त्यांची अवस्थादेखील बिकट झाली आहे. औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या कॅनाॅलरोडचे रुंदीकरण व डांबरीकरण महापालिकेने करावे, अशी सततची मागणी उद्योजकांनी होत आहे. त्यातच कॅनाॅलरोड झोपड्यांची वसाहत बनला आहे. धडाडीने निर्णय घेणारे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.



शहराची शान असलेल्या गंगापूररोडच्या रामेश्वरनगर भागात सुंदर इमारतींचे जाळे पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणी फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, या भागात रस्त्यांची वानवा असून, महापालिकेने रस्त्यांची कामे हाती घेण्याची गरज आहे.

- सुलोचना कुटे, रहिवासी, रामेश्वरनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमीच डेथ बेडवर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

स्मशानभूमी म्हणजे मृत्यूनंतर चिरंतन विश्रांती घेण्याची पवित्र जागा असते. या जागेशी मानवी जीवनाचे एक अनोखे नाते असते. मात्र, देवळालीगाव येथील स्मशानभूमीतील विस्कळीत पाणीपुरवठा व्यवस्था, नागरिकांच्या बैठकीच्या जागेची दुरवस्था, उघड्यावर ठेवली जात असलेली लाकडे, तसेच मद्यपींचा वाढता वावर आदी समस्यांनी येथील स्मशानभूमीच डेथ बेडवर जाण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

देवळालीगावात लामरोडलगत वालदेवी नदीकाठी स्मशानभूमी आहे. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. येथे सहा डेथ बेड्स आहेत. या ठिकाणी अंत्यविधीसाठी आवश्यक सर्व साहित्यही उपलब्ध असते. महापालिका कर्मचाऱ्यांकडून येथील स्वच्छतेचीही विशेष काळजी घेतली जाते. मात्र, या स्मशानभूमीत मद्याचे घोट रिचविण्यासाठी मद्यपींचे गट दररोज रात्र-रात्र ठाण मांडून बसत असल्याने या जागेचे पावित्र्य हरविल्यासारखे झाले आहे.

पाण्याचा व्हॉल्व्ह नादुरुस्त

या स्मशानभूमीतील सहाही डेथ बेडखाली पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचा मुख्य व्हॉल्व्ह काही वर्षांपूर्वीच तुटलेला आहे. त्यामुळे या सर्व डेथ बेडखाली पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. परिणामी पाणी असून त्याचा वेळेवर वापर करणे अशक्य होत आहे.

महानुभाव व लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था

शेजारीच महानुभाव व लिंगायत समाजाची स्मशानभूमीही आहे.या दोन्हीही स्मशानभूमींच्या व्यवस्थेकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. या दोन्हीही स्मशानभूमींची स्वच्छता राखली जात नाही. काटेरी झुडपांची येथे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.





मद्यपींची डोकेदुखी

देवळालीगावातील स्मशानभूमी मुख्य गावाच्या पूर्णपणे बाहेर आहे. त्यामुळे हा भाग नेहमीच निर्जन असतो. रात्रीच्या वेळी नेमक्या या स्थितीचा गैरफायदा परिसरातील मद्यपी मंडळींकडून घेतला जातो. या ठिकाणी संपूर्ण रात्रभर मद्यपींच्या पार्ट्या झडतात. मद्याचे घोट रिचवून मद्यपी कित्येक तास येथेच लोळत पडलेले असतात. त्यामुळे या जागेचे पावित्र्य लयास जाऊ लागले आहे.



देवळालीगावातील स्मशानभूमीचा वापर देवळालीगाव, सिन्नर फाटा या भागांसाठी होतो. याशिवाय येथील साहित्य चेहेडी, चाडेगाव, पिंपळगाव खांब, वडनेर, विहितगाव येथील स्मशानभूमींसाठीही पुरविले जाते. या स्मशानभूमीतील पाण्याचे व्हॉल्व्ह तुटलेले असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.

- राणू सोनवणे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीवायके’त लॉन्सला दिवसातून दोनदा पाणी!

$
0
0

म. टा. कॉलेज क्लब रिपोर्टर

दुष्काळजन्य स्थितीमुळे एकीकडे शहरात सर्वत्र पाणीबचतीवर भर दिला जात आहे. मात्र, बीवायके कॉलेजच्या कॅम्पसमधील लॉन्सचा मेंन्टेनन्स करताना दिवसातून दोनदा पाणी देण्यासह संबंधित कामगार नळी धुण्यासाठीही मोठ्याप्रमाणावर पाणी वापरत असल्याने शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत अाहे. मात्र, कॉलेजमधील लॉन्सच्या बाजूला असणाऱ्या विहिरीतून पाणीउपसा होत असल्याने पाणी नासाडी होत नसल्याचे कॉलेजचे म्हणणे आहे.

लॉन्सच्या मेंन्टेनन्ससाठी दोन दिवसांतून एकदा पाणी मारले तरी पुष्कळ असते. मात्र, येथे दिवसातून दोन वेळा पाणी मारत असल्याची बाब समोर आली आहे. सोबतच पाणी मारण्यासाठी वापरण्यात येणारी मातीने माखलेली नळी धुण्यासाठीदेखील कित्येक लिटर पाणी सर्रास वाया घालवले जात आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असताना कॉलेजेसकडून होणारी अशी नासाडी तरुणाईसमोर कोणता आदर्श ठेवत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images