Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बंदमुळे पाडव्याचे सोने झाकोळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक केंद्रीय उत्पादन शुल्काच्या निषेधार्थ गेल्या ३८ दिवसांपासून सुरू असलेला सराफांचा बंद गुढीपाडव्यासाठी नुकसानकारक ठरणार आहे. या बंदमुळे सोने झाकोळणार असून, नाशिकमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तामुळे होणारी सुमारे २५ कोटींची उलाढाल थांबणार आहे. त्यामुळे शुक्रवारी, आज नाशिक परिसरात कडकडीत बंद असेल, असे सराफांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारने सराफ व्यावसायिकांवर एक टक्का अबकारी कर लावल्याच्या निषेधार्थ बेमुदत बंद सुरु असून ग्राहकांना यंदा पाडव्याच्या सोने खरेदी पासून वंच‌ित राहवे लागणार असल्याची माहिती नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व सराफ सुवर्णकार व्यावसायिक भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राज‌‌ीनामा देणार असल्याचेही सांगण्यात आले.

आंदोलनामुळे पाडव्याला एक ग्रॅम सोने घेणाऱ्यांचा मुहूर्त टळणार आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत चांगली धामधूम असते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंबरोबरच सोनेखरेदीला प्राधान्य दिले जाते. दरवर्षी नवीन वस्तुंबरोबरच एक ग्रॅम तरी सोने घरात यावे, असा काहींचा आग्रह असतो. मात्र सध्या सराफांचा बेमुदत बंद असल्याने सोने खरेदीला आळा बसणार आहे.

महाराष्ट्र सराफ व सुवर्णकार असोसिएशनने पाडव्याच्या दिवशी दुकाने बंदचा निर्णय घेतल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याने यंदाचा पाडवा झाकोळला जाणार आहे. दरम्यान, जळगावमध्ये सराफांनी सराफ बाजार सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांच्या मदतीला मोबाइल फॉरेन्सिक सपोर्ट युनिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साक्षीदार, फिर्यादींच्या जबाबातील तफावत, कोर्टाच्या कसोटीला अपुरे पडणारे पुरावे आणि त्यामुळे कमी होणारा गुन्हासिद्धतेचा टक्का या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने मोबाइल फॉरेन्सिक सपोर्ट युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेले हे युनिट नाशिक ग्रामीण पोलिस दलाला उपयुक्त ठरू शकते.

या युनिटने गुरुवारी सकाळी आपले काम सुरू केले. या वेळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, प्रादेशिक न्यायसहाय्यक प्रयोगशाळा नाशिक विभागाच्या उपसंचालिका रा. अ. शिंदे उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील वाढत्या औद्योगीकरणामुळे लोकसंख्येत भर पडत आहे. आधुनिकतेचे वारे अगदी वाड्या-वस्त्यांवर पोहोचत असून, अनेकदा गुन्हेगार याच तंत्रज्ञानाचा वापर गंभीर घटनांमध्ये करीत असतो. गुन्हा करताना काय काळजी घ्यावी, याचाही विचार गुन्हेगारांकडून होतो. त्यामुळे पुरावा संकलनावेळी पोलिसांची जबाबदारी वाढते. सबळ पुरावेच समोर येत नसल्याने गुन्हासिद्धतेचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने घटते आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मोबाइल फॉरेन्सिक सपोर्ट युनिट सुरू करण्याचे आदेश दिले होते. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील काही ठिकाणी हे युनिट सुरू करण्यात आले असून, यात नाशिक ग्रामीणचाही समावेश आहे. मोबाइल फॉरेन्सिक सपोर्ट युनिटमुळे संशयितांकडून घटनास्थळी सुटलेले अगदी छोटे पुरावे संकलित करता येतील. पुरावे संकलित करणे व त्यांचे जतन करणे ही बाब महत्त्वाची ठरते. त्यामुळे या युनिटमध्ये फिंगर प्रिंट व फॉरेन्सिक तज्ज्ञ, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे सर्व साहित्य पोलिसांच्या वाहनातच असून, जिल्हाभरात एखादी गंभीर घटना झाल्यास हे युनिट तिथे पोहोचून बारकाईने पुरावे संकलित करतील. याचा चांगला फायदा दिसून येईल, असे मत पोलिस अधीक्षक मोहिते यांनी व्यक्त केले.

अत्याधुनिक साहित्य

मोबाइल फॉरेन्सिक सपोर्ट युनिटसाठी अत्याधुनिक पद्धतीचे साहित्य पुरवण्यात आले आहे. यात, फिंगरप्रिंट कीट, व्हिडीओ कॅमेरा, डिजिटल फोटो कॅमेरा, दुर्बिण, होकायंत्र, टॉर्च, सर्च लाइट, घटनास्थळ सुरक्षित ठेवणारे क्राइमसीन पट्टी, एक्स्प्लोझिव्ह डिटेक्टिव्ह कीट यांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएचआरच्या ठेवीदारांचे लाक्षणिक उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या ठेवीदारांना एमपीआयडी कायद्यान्वये ९० दिवसांत ठेवी परत मिळाव्यात म्हणून राज्यभरातील नियुक्त सक्षम प्राधिकारी यांनी संस्थेच्या संचालकांच्या अहवालातील मालमत्तांची ताबा, जप्ती, लिलाव व विक्रीप्रक्रिया करून महिनाभरात विल्हेवाट लावावी; अन्यथा लोकायुक्तांकडे तक्रारी करण्याचा इशारा रायसोनी संस्थेच्या ठेवीदारांच्या बैठकीत देण्यात आला.

जनसंग्राम संघटनाप्रणीत राज्य ठेवीदार समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ठेवीदारांची नाशिक विभागीय बैठक गुरुवारी दुपारी १२ वाजता येथील हुतात्मा स्मारकात झाली. ठेवींच्या पाठपुराव्यासाठी २५ एप्रिल रोजी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. राज्य संघटक श्रीकृष्ण शिरोडे यांनी प्रास्ताविक केले. एस. व्ही. पंधारे, देवकिसन भुतडा, पंडित चितोडकर, पांडुरंग पाठक, प्रकाश बूब आदींनी भूमिका मांडल्या. बैठकीस नाशिक विभागातील योगेश क्षेत्रीय, अंबादास नवले, अविनाश धामणे, धनाजी पवार, भास्कर आयरेकर, चंद्रकांत ठाकुर, तुकाराम देवरे, विष्णू वाणी, श्याम जाधव, सुभाष गुजराथी, विष्णू शिंदे, मंगल भांमरे, संतोष मांगू चौधरी, दत्तात्रेय वाणी, वीणा चंदावरकर आदी उपस्थित होते.

लोकायुक्तांकडे करणार तक्रारी

महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षक अधिनियम १९९९ या कायद्यातील तरतुदीप्रमाणे संस्थेचे संचालक मंडळ व संशयित आरोपींच्या मालमत्ताजप्ती व विक्रीप्रक्रियेतून ठेवी परत मिळाव्यात म्हणून वारंवार पाठपुरावा केला जातो आहे. ९० दिवसांचा कालावधी संपूनदेखील संस्थेवर नियुक्त अवसायक व राज्यभरातील उपजिल्हाधिकारी दर्जाचे सक्षम प्राधिकारी यांनी कारवाई केली नाही. यामुळे कायद्याची पायमल्ली केली म्हणून संस्थेचे अवसायक, राज्यातील सर्व प्राधिकृत सक्षम प्राधिकारी व संस्थेच्या संचालकांविरुद्ध दाखल ५९ गुन्ह्यांचा तपास करणारे पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात राज्याच्या लोकायुक्तांकडे प्रत्येक ठेवीदाराने स्वतंत्र तक्रारी करण्याचे या वेळी ठरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलाढालीला दुष्काळाची झळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याला सोने-चांदी, वाहन किंवा वास्तू खरेदी करण्यात येते. या एका दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यंदा मात्र, सराफ व्यावसायिकांचा बंद आणि दुष्काळ अशा दुहेरी कात्रीत गुडीपाडावा सापडला. वाहन खरेदी, नवीन घरासाठी नोंदणी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठात उलाढाल झाली. मात्र, गत वर्षीपेक्षा त्यात काही प्रमाणात घट पहावयास मिळाली. दिवाळी, दसरा तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. सोने-चांदी, वाहन, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक बाजारपेठा गर्दीने फुलून जातात. यंदा मात्र या सर्व व्यवसायांना दुष्काळाची झळ बसली आहे. तसेच, केंद्र सरकारने उत्पादन शुल्कासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात सराफ असोसिएशनने बंद पुकारल्याने मार्केटमध्ये अपेक्षित उलाढाल झाली नाही. दिवाळीच्या दरम्यान चारचाकी वाहनांमध्ये सहा लाख रुपयांपेक्षा जास्त ​किमतीच्या कारसाठी चांगली मागणी होती. गुढीपाडव्यादरम्यान मात्र हीच मागणी घटली. सहा लाख रुपयांपेक्षा कमी किमती असलेल्या कारसाठी ग्राहकांनी पसंती दर्शवली. कार आणि दुचाकी मार्केटमधील एकूण उलाढाल सुमारे ५० कोटी रुपयांपर्यंत झाली. काही प्रमाणात मंदीत असलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्रात यामुळे चैतन्य पसरले. सध्या, दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी कार तसेच दुचाकी विक्रीने वेग पकडला असल्याचा दावा काही शोरूम चालकांकडून केला जात आहे. चालू वर्षात मोपेड (गेअर नसलेल्या दुचाकी) दुचाकींना चांगली पसंती असून यात लक्षणीय वाढ होऊ शकते, असा दावा आरटीओ अधिकाऱ्यांनी केला. यामुळे वाहन क्षेत्रात तेजी येण्याची शक्यता आहे.

गतवर्षाच्या तुलनेत विक्रीत घट दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या उलाढालीला सुध्दा काही प्रमाणात ब्रेक लागला. यंदा शहरातील वेगवेगवळ्या कंपन्यांच्या शोरूममधून फारतर १ हजार ३०० दुचाकींची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी हाच आकडा १ हजार ८०० च्या दरम्यान होता. पॅसेंजर कार विक्रीचा आकडा ५५० ते ६०० दरम्यान राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात आठ ते १० टक्के घट झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला मंगेशने ओढल्या बारागाड्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूरला गुढीपाडव्यानिमित्त बारागाड्यांची यात्रा उत्साहात झाली. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी यात्रेला हजेली लावली. गणेशाचा मान असलेले मंगेश प्रकाश निगळ यांनी भवानी मातेचे रूप घेत त्र्यंबक रोडवर उभ्या असलेल्या बारा गाड्या ओढल्या. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त होता. सातपूर पंचक्रोशित गुढीपाडव्याला बारा गाड्या ओढण्याची प्रथा आहे. सातपूरमधील निगळ परिवारातील दरवर्षी एका व्यक्तीला गणेशाचा मान देत बारा गाड्या ओढल्या जात असतात. पाडव्याच्या दिवशी सांयकाळी चार वाजेपासून बारा गाड्या ओढणाऱ्या गणेशाला भवानी मातेचा पेहराव चढविला गेला. यानंतर सातपूर गावातून गणेशाची सवाद्य मिरवणूक काढून मारूती मंदिरात नेण्यात आली. प्राचीन मारुती मंदिराचे दर्शन घेतल्यावर गणेशाने त्रंबक रोडवर उभ्या असलेल्या बारा गाड्यांना प्रद‌क्षिणा घालत एमआयडीसीतील सातपूरचे ग्रामदैवत सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. यानंतर पुन्हा त्र्यंबक रोडवर उभ्या असलेल्या बारा गाड्या गणेशाने ओढल्या. पंचक्रोशितील हजारो भाविकांनी मोठ्या श्रध्देने बारा गाड्या यात्रेचा लाभ घेतला. यावेळी आमदार सीमा हिरे, उपमहापौर गुरुमीत बग्गा, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, सातपूर प्रभाग सभापती उषा शेळके, नगरसेवक प्रकाश लोंढे, नगरसेविका सविता काळे, सुरेखा नागरे, नंदिनी जाधव, सातपूर यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक मौले, उपाध्यक्ष गोकुळ निगळ, आयोजक शांताराम निगळ, प्रकाश निगळ, राजाराम निगळ आदी उपस्थित होते.

स्क्रिनने आणली रंगत यंदा बारा गाड्या यात्रेला दोन स्क्रिन लावल्याने रंगत आली होती. स्क्रिनमुळे लहान मुलांसह महिलांनी बारा गाड्या ओढणाऱ्या गणेशाला जवळून पाहता आले. दरवर्षी यात्रा उत्सव समितीने यात्रेत स्क्रिन लावावे, अशी मागणी भाविकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या वाहनांच्या अपघातांमध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील मणेगाव येथे राहणारे परशराम सोनवणे (वय ५०) शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कुऱ्हेगाव येथून जात होते. तिथे एका वळणावरून सोनवणेंच्या दुचाकीस अपघात झाला. अपघाताची दुसरी घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील मोराडे मळा येथे घडली. या ठिकाणी दुचाकीवरून (एमएच १५ एफसी ३२१७) जात असताना व्यक्तीचा अपघात होऊन त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यातच तो मृत्युमुखी पडला. या तरुणाची ओळख पटली नाही. अपघाताची आणखी एक घटना आडगाव पोलिस स्टेशन हद्दीत बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. पेठरोड येथे राहणारे विजय एस. म्हस्के हे मोटरसायकल (एमएच १५ सीएक्‍स ३१२२) ओझरकडून नाशिककडे जात असताना हरिसन लॉजसमोर पाठीमागून भरधाव येत असलेल्या वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यात म्हस्केंचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वेगवेगळ्या भागात सातत्याने चेन स्नॅचिंग होत असून, या आठवड्यात गुन्हेगारांनी लाखो रुपयांचे स्त्रीधन लुटले. सातत्याने होणाऱ्या घटनांचा माग काढणे पोलिसांना अद्याप शक्य झालेले नाही. शहरात मागील ४८ तासांत तीन ठिकाणी चेन स्नॅचिंगचे प्रकार घडले. शुक्रवारी इंदिरानगर भागातील कलानगर परिसरात सकाळी पाऊणे नऊ वाजेच्या सुमारास वैशाली आसोले (वय ४८) या पायी जात होत्या. यावेळी पत्ता विचारण्याच्या निमित्त्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले. आसोलेंना काही कळायच्या आत भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये ​किमतीची सोन्याची चेन तोडून पोबारा केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी गुरुवारी गंगापूर आणि उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत दोघा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. कॉलेज रोडवरील कारवा सोसायटी येथे राहणाऱ्या नलिनी मधुकर दीक्षित या त्यांच्या मैत्रीण समवेत सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ चौकातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडेतीन ग्रॅम वजनाची आणि ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. तिसऱ्या घटनेत मौलाना आझाद चौक येथील सत्यलक्ष्मी सोसायटीतील मलकितसिंग चरणसिंग राणा यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची चेन तोडून नेली. उपनगर येथील छत्रपती शिवाजी हॉल जवळून राणा पायी जात असताना तिथे उभ्या असलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदू नववर्षाचे सेलिब्रेशन सोशल मीडियावरही व्हर्च्युअल गुढीपाडव्याच्या रूपात दिसून आले. परंपरेनुसार चैत्र महिन्यात आपले नवीन वर्ष सुरू होत असते. ते साजरे करण्यात आजच्या धकाधकीच्या 'स्मार्ट' जीवनात यंग इंडियाही मागे राहिलेला नाही. ज्या तत्परतेने यंग ब्रिगेड हॅप्पी न्यू इयरसाठी एसएमएस, व्हॉटस्अॅप, सोशल साइटसवर शुभेच्छा देतात. त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडवाही या सोशल मीडियावर साजरा करण्यात आला. मोबाइल आणि स्मार्टफोनद्वारे आपल्या भावना मित्र, नातेवाइकांना पोहचविण्यासाठी ज्येष्ठांनीही या सोशल मीडिया आणि व्हॉटस्अॅपचा उपयोग करून घेतला. त्यामध्ये काहींनी आपल्याच नावाने संदेश देण्यात धन्यता मानली तर क‌ाहींनी गुढीपाडव्याच्या गुढीसोबत आपला सेल्फी काढत व्हॉटसअॅप आणि सोशल साइटसवर टाकले आहेत. कामाच्या व्यस्ततेत आपण नातेवाईकांना सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर करतो.

दुष्काळाची झालर या सर्व गोड शुभेच्छांमध्ये सोशल मीडियावरही बळीराजासाठी आणि पाण्यासाठी या नववर्षात पाणी वाचविण्याचे संदेशही याद्वारे काहींनी दिले. या नवीन वर्षात आपण सर्वांनी पाणीटंचाईमुळे पाणी वाचवत जपून वापर करा, असाही संकल्प देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नववर्षाचे हर्षोल्हासात स्वागत

$
0
0

हजार ढोलांचे वादन नाशिक : ढोलताशाच्या गजरात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आले. गोदावी घाटावरील मंदिरावर रोषणाई करण्यात आली. नववर्षाच्या स्वागतासाठी संस्कृती संवर्धन मंडळातर्फे १ हजार ढोलांचे वादन करण्यात आले. मिरवणुकीत ढोल ताशे, लेझीम, पारंपरिक मर्दीनी खेळ इत्यादींचा समावेश होता.

चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे पाडवा. प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. हिंदू नववर्ष आणि पाडव्याचे औचित्य साधून रामनवमीच्या उत्सावाला पाडव्यापासून सुरुवात झाली. यावेळी काळाराम मंदिरात विशेष पूजा झाली. यावेळी महंत सुधीरदास पुजारी व विश्वस्त अॅड. अजय निकम सहभागी झाले. कपालेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक घालत नवे वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावे अशी प्रार्थना करण्यात आली.

गंगापूर रोडला स्वागतयात्रेचा जल्लोष नाशिक : डोंबिवली, पुणे शहरांप्रमाणेच नाशिक येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रांनी एक वेगळेच आकर्षण निर्माण केले आहे. या स्वागत यात्रांमधून परंपरा जपतानाच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही जतन करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. नाशिकमध्ये सर्वप्रथम एकाच परिसरातून सुरू झालेली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आता शहराच्या विविध भागांतून निघू लागल्या असून या यात्रांमधील नागरिकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून किमान तीन महिने आधीपासून तयारी केलेली स्वागत यात्रा गंगापूर रोड येथून जाताना हर्षोल्हास देऊन गेली. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आयोजित विविध वेशभूषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सामूदायिक गुढी स्पर्धांनी ही यात्रा गाजली. यात्रेत लेझीम पथक, ढोल पथक तसेच फेटे घातलेले पुरुष-महिला, विविध वेशभूषा केलेले चिमुरडे यांचा सहभाग होता.

बीवायके कॉलेज येथे सकाळी १० वाजता यात्रेचा समारोप झाला. यावेळी प्रा. यशवंत पाठक यांचे व्याख्यान झाले. आमदार सीमा हिरे, महेश हिरे, भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुरेश पाटील, किशोर विग यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत यात्रांसाठी प्रकाश दीक्षित, विवेक पवार, सुहास करंदीकर, अशोक अमृतकर, अतुल देशपांडे, अजित कुलकर्णी तसेच वसुधा लगड यांनी यात्राप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. व्यसनमुक्तीचा संदेश पंचवटी : संस्कृती संवर्धन न्यास संचलित नववर्ष स्वागत समिती व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे पाडवा पहाट, शोभायात्रा व गुढी पूजन झाले. ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे पंचवटी सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी पुष्पा दीदी यांच्या हस्ते गुढीपूजन झाले. संस्थेच्या राजयोग शिक्षिका पूनम दीदी, ब्रह्माकुमारी अनिता दीदी, स्वागत यात्रा समितीचे सदस्य सोमनाथ बोडके, दिगंबर धुमाळ, रुपेश पालकर आदी उपस्थित होते.

नागचौकात गुढी पूजनानंतर शोभायात्रा काट्यामारुती पोलिस चौकी, गजानन चौक, पाथरवट लेन, पंचवटी कारंजा, मखमलाबाद नाका, गंगाघाट या मार्गावरून आल्यानंतर भाजीबाजार मैदानावर समारोप करण्यात आला. तेथे व्यसनमुक्ती विषयावर नाटिका सादर करण्यात आली. तसेच बेटी बचाव आणि पाणीबचतीच्या घोषणा देण्यात आल्या.

देवळालीमध्ये विद्यार्थ्याचा उत्साह देवळाली कॅम्प : संसरीनाका येथील देवळाली प्लाझापासून शुभारंभ झालेल्या शोभा यात्रेस शीतलदास बालानी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश आखाडे, मंगेश गुप्ता, दीपक बलकवडे, कैलास गायकवाड, भगवान कटारिया आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ झाला. नूतन विद्यामंदिर, डॉ. गुजर सुभाष हायस्कूल विद्यार्थ्यांनी लेझीमचे सादरीकरण केले. टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी भजन सादर केले. मराठमोळ्या पेहरावातील महिला पथकातील फुगडी व विविध पारंपारिक खेळांनी देवळालीकरांचे लक्ष वेधले. मिरवणुकीत अग्रभागी देवदेवतांसह राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिकांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी जिवंत देखाव्यांनी शोभायात्रेची शान व हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविले. जीवन गायकवाड, नारायणदास चावला, प्रा. सुनिता आडके आदींनी आयोजक केले. शोभायात्रेस शिक्षण मंडळ भगूरचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, नगरसेवक सचिन ठाकरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, तानाजी करंजकर, दीपक बलकवडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप गायकवाड, विशाल शिरसाठ, लक्ष्मण मुसळे, बाळकृष्ण घोलप, संतोष पिंपळे आदी प्रयत्नशील होते. शोभायात्रेचे देवळालीकरांनी रस्त्यावर ठिककिठकाणी आकर्षक रांगोळ्या रेखाटत स्वागत केले. जुन्या बस स्थानक येथे शोभायात्रेचा समारोप करण्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. शोभायात्रेत देवळालीकर पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाले होते.

पाणीबचत, आरोग्याची गुढी नाशिकरोड : राजसारथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन देशपांडे आणि महालक्ष्मी मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आढाव यांच्या पुढाकाराने जेलरोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवसंकल्पाची ५१ फुट उंच गुढी उभारण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरसेवक अशोक सातभाई, संभाजी मोरुस्कर, मनसेचे नेते विक्रम कदम, शिव प्रतिष्ठानचे शाम वाघ, उद्योजक धनंजय बेळे, महिला बँकेच्या संचालिका प्रेरणा बेळे प्रमुख पाहुणे होते. महिला सक्षमीकरण, हितसंबंध जोपासणे, योगसाधना, वाचन, अंधश्रद्धा निर्मूलन, पाणीबचत आदींचा संकल्प वकील, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, कलाकार, ज्येष्ठ नागरिक, उद्योजक आदींच्या उपस्थितीत गुढी उभारण्यात आली.

भारत मातेचा जयघोष सिन्नर फाटा : भारत मातेचा जयघोष करीत नाशिकरोड शहरातून हिंदू नववर्ष समितीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक भगत यांच्या हस्ते गुढीचे पूजन झाले. शोभा यात्रेचे संयोजक उदय शेवतेकर, नाना पाटील, गोपाल लाल, अक्षय एडके, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, आदींनी केले.

शोभायात्रेत ब्रह्मध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक मराठमोळ्या वेषात अश्वारुढ तरुणी, शिवरायांसह स्वामी विवेकानंद, राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या थोर महापुरुषांच्या वेषभूषा व श्री मनकामेश्वर महादेव प्रतिष्ठाणचे ढोल पथकाने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोभा यात्रेत के. जे. मेहेता हायस्कूल, इस्कॉन यांनीही सहभाग घेतला. देवळाली गावातून प्रारंभ झालेली शोभायात्रा पुढे लिंगायत कॉलनी, गाडेकर मळा, दत्तमंदिर रोड, राजधानी चौक, आनंद नगर, जगताप मळा, दत्तमंदिर चौक, मोटवाणी रोड या मार्गे जावून पुरुषोत्तम हायस्कूल या शाळेच्या मैदानावर विसर्जित करण्यात आली. शोभायात्रेत सहभागी चित्ररथांनी पाणीबचत व स्त्रीभृणहत्या या विषयांवर संदेश दिला.

मनसेने उभारली महागुढी मनसेच्या वतीने शाळा क्रमांक १२५ जवळील राजधानी चौकात महागुढी उभारली. यावेळी नगरसेविका संगिता गायकवाड, अशोक सातभाई यांच्यासह हेमंत गायकवाड, प्रकाश कोरडे, शाम गोहाड, किशोर जाचक आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंभुनाद ढोल पथकाच्या वादनाने नागरिकांना आकर्षित केले.

जेलरोडला शोभायात्रा तहकूब शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब गाडगीळ यांचे पाडव्याच्या पूर्वसंध्येला अचानक निधन झाल्याने जेलरोडला आयोजित नववर्षाची शोभायात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणचे काही कार्यकर्त्यानी देवळाली गावातील शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला.

सातपूरला तरुणाईचा जल्लोष सातपूर : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सातपूर कॉलनीत स्वागत यात्रा निघाली होती. जुनी कॉलनीतील इच्छामणी गणपती मंदिरावरून सकाळी ७ वाजता निघालेली स्वागत यात्रा मिरवणूक मुख्य रस्त्यांवरून फिरून पुन्हा गणपती मंदिरात आणण्यात आली. स्वागत यात्रे ढोल ताश्यांच्या पथकासह फेटे बांधलेले तरुण, लहान मुले, महिला तसेच भाजपाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. यात्रेचे आयोजन भाजप सातपूर मंडलचे अध्यक्ष राजेश दराडे यांनी केले.

जुने नाशिकमध्ये उत्साहात स्वागत जुने नाशिक : पाडव्यानिमित्ताने हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे सकाळी साडे सहा शोभायात्रा व धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहीद भगतसिंग चोक, श्री टेमब्लाई माता मंदिर, द्वारकापासून तर गंगा घाटपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी रामसिंग बावरी, बाळासाहेब मोरे, प्रसाद बावरी, विजय पवार, दीपक अहिरे, करणसिंग बावरी, अशोक गांगुर्ड, अंकुश राऊत, उमेश चव्हाण आदी सहभागी झाले. शोभायात्रेमध्ये पाच मंडळांचे चित्ररथ सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा सिटीझन रिपोर्टर’ अॅपमुळे मिळाले व्यासपीठ

$
0
0

सिटीझन रिपोर्टर अॅपद्वारे शहरातील समस्यांचे वार्तांकन करणाऱ्या गार्गेय कुलकर्णी, सोनाली शेटे, संतोष पराये व शरदचंद्र भालेराव यांना 'मटा' नाशिकचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. 'मटा'चे हे अॅप आधुनिक पद्धतीने व वापरण्यास अत्यंत सोपे असल्याचे मत या चारही सिटीझन रिपोर्ट्सनी व्यक्त केली. आपली समस्या प्रकाशझोतात आणण्यासाठी हे अॅप अत्यंत प्रभावशाली असल्याचे सांगत याचा वापर करणे शहरासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

पाण्याचा अपव्यव केवळ सिडको वगैरे याठिकाणीच नाही तर कॅनडा कॉर्नरसारख्या मोठ्या भागांमध्येही होत असतो. याविषयीची समस्या प्रकाशझोतात येणे गरजेचे होते. त्यानुसार मी ही बातमी 'मटा'च्या 'सिटीझन रिपोर्टर अॅप'वर टाकली. त्याची तत्काळ दखल घेऊन हा विषय समोर आला, याचा आनंद वाटला. - गार्गेय कुलकर्णी

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा अपव्यय होणे ही मोठी बाब असते. मात्र, तरीही शहरात अनेक ठिकाणी याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. गंगापूर रोडवरील सावरकरनगर येथेही अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा अपव्यय होत असतो. हे पाहूने, समाजासाठी आपण काहीतरी करावे, असे वाटायचे. मात्र, त्यासाठी मार्ग दिसायचा नाही. 'मटा'ने अॅपमार्फत या बाबी शेअर करण्यासाठी संधी दिली. त्यामुळे अशा गोष्टी आम्हालाही समोर आणता येतील. - सोनाली शेटे

मुंबई नाक्यावरील सर्व्हिस रोडचा प्रश्न गंभीर आहे. अनेक गाड्या येथे उभ्या असतात. तसेच रस्ताही छोटा असल्याने लहानमोठे अपघात घडण्याची शक्यता असते. अशा अनेक बातम्या घरातून बाहेर पडल्यावर दिसतच असतात. काहीवेळा सामाजिक बांधिलकीने आम्हालाही पुढे येणे गरजेचे असते. त्यासाठी 'मटा सिटीझन रिपोर्टर' हे अॅप फायदेशीर ठरत आहे. आम्हालाही समाजासाठी काही करण्याची संधी मिळते. - संतोष पराये

रस्त्याच्या मधोमध चेंबर उघडे असल्याचे दिसून आले. यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे जाणवले. त्यामुळे 'मटा सिटीझन रिपोर्टर अॅप'वर माहिती दिली. त्याची दखल घेतली गेल्याने आत्मविश्वास वाढला आहे. हे अॅप वेगळ्या व अत्याधुनिक पद्धतीचे आहे. कोणालाही सहजरित्या बातम्या कळविता येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनाही व्यासपीठ मिळालेे. - शरदचंद्र भालेराव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरती अंकलीकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

$
0
0


ऋतुरंग परिवारातर्फे झालेल्या पहाट पाडव्यास नाशिकरोड परिसरातील शास्त्रीय गायनाच्या रसिक श्रोत्यांनी गर्दी केली. यावेळी त्यांच्या गायनास वैभव खांडोळकर यांनी तबला, तन्मय देवचके-हार्मोनियम, दिगंबर सोनवणे पखवाज, अमोल पाळेकर-तालवाद्य, अबोली गद्रे, स्वरूपा बर्वे यांनी तंबोऱ्यावर साथ देत सहगायनही केले. आरती अंकलीकर यांनी अहिर भैरव रागात विलंबित तीनताल मध्ये रसिया म्हारा आवोजी मेरे द्वार हि बंधीश, द्रुत तिनताल मध्ये जागो रे माई जागो ही बंदिश सादर केली. ख्यातनाम गायिका किशोरी अमोणकर यांनी संगित बध्द केलेल्या 'अवघा रंग एक झाला' या भैरवीने सुश्राव्य कार्यक्रमाची सांगता झाली. ध्वनी संयोजन पराग जोशी यांनी केले. ऋतुरंग परिवाराचे राजा पत्की यांनी प्रास्ताविक केले. संतोष जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमामुळे रसिकांचा पाडवा गोड झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरड्याठाक रामकुंडात अखेर खळाळले पाणी

$
0
0

पाणी सोडण्याच्या मुद्यावरून श्रध्दा व पर्यावरणवादीमध्ये वादावादी सुरू झाली आहे. गुरूवारी सायंकाळी ७ वाजता रामकुंडात गांधी तळ्याचे पाणी गेटद्वारे सोडण्यात आले. नंतर रात्री बाराच्या सुमारास तीन टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले. गांधीतळ्यात साठलेल्या पाण्यात, टँकरचे पाणी सोडल्यानंतर पाण्याला वास येत असल्यामुळे शुक्रवारी पंचवटी जलकुंभातून शुध्दीकरण केलेल पाणी लक्ष्मणकुंडाशेजारी असलेल्या पाइपलाइनमधून सकाळी ७.३० वाजता सुमारे तास भर पाणी सोडण्यात आले.

महापौर अशोक मुर्तडक यांनी गुरूवारी रामकुंडाची व गाळ हटवण्याच्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर होळकर पुलाच्या पुढील भागात बोअर घेण्याच्या ठिकाणी ते गेले. गोदाकाठच्या सर्व भागाची पाहणी केल्यानंतर टँकरधारकांनी रामकुंडात पाणी सोडावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच आजुबाजुच्या विहिरीचे पाणी रामकुंडात आणता येईल का? यावरही त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी रामकुंडात दहाव्याचे पिंड टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही दिला. महापौराच्या भेटीनंतर प्रशासनाने तात्काळ पाणी सोडण्याची कारवाई केली. पहिले गांधी तळ्यात साठलेले पाणी सोडले व रात्री टँकरचे त्यानंतर सकाळी पिण्याचे पाणी सोडले.

असे सुचविले पर्याय पंचवटी जलकुंभ व टँकरने पाणी सोडण्याच्या कृतीला अनेकांनी आक्षेप घेतला असून काही पर्यायांवर चर्चा सुरू झाली आहे. आनंदवल्लीपासून होळकर पुलापर्यंत साठलेले बँकवाँटरचे पाणी रामकुंडात पंपिंगद्वारे सोडता आले असते. तसेच हेच पाणी गांधीतळ्याच्या गेटद्वारेही सोडता आले असते. अरुणानदीचे इंद्रकुंड येथील पाणी पूर्वी रामकुंडात येत होते. पण या नदीच्या मार्गावर रस्ता केल्यामुळे या नदीचा स्त्रोत बंद झाला. त्यामुळे पाणी पंपिंग करून घेता येवू शकते. काँक्रीटीकरणामुळे रामकुंडाशेजारी असलेले १६ कुंड दाबले गेले आहे. या कुंडातच अनेक झरे असून ते मोकळे केल्यास पाण्याच मोठा साठा उपलब्ध होऊ शकतो.

गोदावरीच्या नावावर केल्या जात असलेल्या धार्मिक फसवणुकीला आमचा विरोध आहे. रामकुंडावर पाणी सोडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतांना पंचवटीकरांच्या हक्काचे पिण्याचे पाणी सोडण्यात आले. टँकरचे पाणी नाशिकरांना भीषण पाणीटंचाईत उपयोगात आणता आले आहे. बँक वॉटर व इंद्रकुंडाचे पाणी असे अनेक पर्याय उपलब्ध असतांना हायकोर्टाच्या आदेशाचा अपमान करून लक्ष्मण कुंडाशेजारील पाइपद्वारे पिण्याचे पाणी सोडणे ही दुर्दैवी बाब आहे. - देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी नागरी सेवा समित‌ी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएचआर राज्यातील शाखा करणार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑप सोसायटी (बीएचआर) अवसायानात आल्यानंतर बँकेने आता राज्यभरातील आपल्या शाखेतील लॉकर्स जळगावच्या मुख्य शाखेत जमा करून आपल्या शाखा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे. स्थानिक शाखा कर्ज वसूल करून आपले पैसे देईल या आशेवर असलेल्या काही गुंतवणूकदारांना या निर्णयाचा धक्का बसला आहे. जळगावात मुख्यालय असलेल्या बीएचआरच्या विविध शाखांच्या लॉकर्समधील पैसे व दागिने अनेक ठेवीदारांनी अगोदरच काढून घेतले आहेत. मात्र, यातील काहींनी चाव्या जमा न केल्यामुळे या बँकेचे अवसायक यांनी सात दिवसांच्या आत चावी जमा करण्याची नोटीस दिली आहे. हे लॉकर्स जळगावच्या मुख्य शाखेत जमा करून राज्यभरातील शाखा आता बंद केल्या जाणार आहेत. बीएचआरमध्ये चार महिन्यापूर्वी अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नेमणूक करण्यात आली. आतापर्यंत त्यांनी थकीत कर्जदारांकडून साडेचार कोटी रुपये वसूल केले आहेत. या मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटीत ७०० हून अधिक येणे आहे. बीएचआरमधील पैसे लवकर मिळावे, यासाठी गुंतवणूकदार वारंवार खेटे मारत असताना, त्यांना अद्यापपर्यंत समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. सरकारने अवसायकाची नेमणूक केली असली तरी त्यांचे काम धीम्या गतीने सुरू आहे.

महिनाभरात सॉफ्टवेअर बीएचआरचा डाटा मिळत नसल्यामुळे अनेक गुंतवणूकदार संताप व्यक्त करीत आहेत. मात्र, सर्व डाटा उपलब्ध असून, केवळ कोअर बँकिंग पध्दत नसल्यामुळे हा डाटा एकत्र जमा करता येत नाही. त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित केले असून, महिन्याभरात सुरू होणार आहे.

कर्ज वसुली सुरू आहे. त्यानंतर मालमत्तेचा लिलावही केला जाणार आहे. गुंतवणूकदारांचे पैसे लवकरच दिले जातील. कर्जवसुली झाली तर गुंतवणूकदारांचे पैसे ताबडतोब दिले जातील. - जितेंद्र कंडारे, अवसायक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकूर; वडाळात तणाव

$
0
0

जुने नाशिकः व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रेषितांविषयी अवमानकारक व आक्षेपार्ह धार्मिक मजकूर आल्याने वडाळा गावात तणाव निर्माण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. धर्मगुरू व समाजबांधवांनी घटनेचा निषेध नोंदवून दोषींवर कारवाईची मागणी सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच त्यांनी शांतता पाळण्याचे आवाहन केल्याने तणाव निवळला. या प्रकरणी वडाळा गावाच्या गणेशनगर भागात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी करत त्याचा मोबाइल जप्त केला. या मुलाचा मोबाइल नंबर हॅक करून त्यावरून आक्षेपार्ह धार्मिक मजकूर टाकला जात असल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे. मध्य प्रदेशातून हे आक्षेपार्ह मजकूर येत असल्याची माहिती पुढे येत आहे. मुंबई व स्थानिक सायबर सेल या प्रकरणी शोध घेत आहेत. वडाळा गावात शांतता प्रस्थापित झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धारणगावला बिबट्या जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे बिबट्याच्या मादीला शुक्रवारी पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.

धारणगाव खडक येथील सुधाकर सोनवणे शेतात राहतात. त्यांच्या घराबाहेर बुधवारी रात्री बिबट्याने त्यांच्या शेळीला ओढून नेले. सोनवणे यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करीत बिबट्याचा पाठलाग केला. अखेर बिबट्याने शेळीला मृतावस्थेत सोडून पलायन केले. या घटनेची माहिती येवला वन विभागाला देण्यात आली.

येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी बी. आर. ढाकरे, वनपाल ए. पी. काळे, वनरक्षक व्ही. आर. टेकनर, वन कर्मचारी दिलीप अहिरे, विजय लोंढे आदींच्या पथकाने सोनवणे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी गुरुवारी सापळा रचला. विशेष म्हणजे बिबट्याची मादी त्याच दिवशी रात्री आठ वाजता सोनवणे यांच्या वस्तीवर आली आणि पिंजऱ्यात जेरबंद झाली. बिबट्याची मादी दोन ते अडीच वर्षांची आहे. वन विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्रीच जेरबंद मादीला नाशिक येथे हलवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात शाळेची जाळपोळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पाच वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून शुक्रवारी संतप्त जमावाने मदर आयेशा प्राथमिक शाळेची तोडफोड करीत जाळपोळ केल्याचा प्रकार घडला. आयेशानगर भागातील खातून एज्युकेशन सोसायटीची ही शाळा आहे. संतप्त जमावाने पोलिस दलावरही दगडफेक करीत पाच वाहने जाळल्याने शहरात खळबळ उडाली होती. शहरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.

मदर आयेशा शाळेत शिक्षण घेत असलेल्या पाच वर्षीय बालिकेचा शाळेतील सफाई कामगार अजय दणके याने अश्लील वर्तन करून विनयभंग केला. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्याचे निलंबन करावे, अशी मागणी करीत संतप्त जमावाने शाळेतील साहित्याची तोडफोड, नासधूस केली. जमाव अधिक वाढल्यानंतर काहींनी शाळेला आग लावल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. शाळेच्या आवारात शिरलेल्या जमावाने दगडफेक, तोडफोड, जाळपोळ सुरू केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती पोलिस प्रशासनास मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. अधीक्षक कडासणे, माजी आमदार रशीद शेख यांनी शांतता राखण्याचे आवाहन करूनही जमावाकडून दगडफेक सुरूच होती. यात पोलिसांची दोन वाहने, तीन दुचाकी जाळण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढचा मुख्यमंत्री खान्देशातून हवा- सबनीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्याचे मुख्यमंत्रिपद वेळोवेळी पश्चिम महाराष्ट्राच्याच वाट्याला आले. खान्देशवर मात्र, दरवेळी अन्याय करण्यात आला. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री हा खान्देशातून झाला पाहिजे, अशी जोरदार मागणी पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या शुभारंभप्रसंगी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली. खान्देशात वैज्ञानिक महामंडळ स्थापन झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

खान्देश विकास प्रतिष्ठानतर्फे धुळ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते शनिवारी, संमेलनाचा शुभारंभ झाला. मराठी साहित्य संघाचे कर्नाटक राज्याचे उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, ओडिसातील साहित्यिक विजयालक्ष्मी महापात्र, चौथे अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला चव्हाण, खासदार ए. टी. पाटील, आमदार सतीश पाटील, काशिराम पावरा, शिरीष चौधरी, आसिफ शेख, चंद्रकांत रघुवंशी, गुलाबराव पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.

श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी भाषेसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन केले तर या भाषेचा प्रचार व प्रचार होण्यास मदत होईल. सरकारने अहिराणी साहित्य संमेलनाला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.

यानिमित्ताने अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे व ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. माजी मंत्री रोहिदास पाटील, पालकमंत्री दादा भुसे, ह. भ. प. सखाराम महाराज, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, युवराज करणकाळ, जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, महापौर जयश्री अहिराव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्रिपद खान्देशलाही मिळायला हवे

$
0
0

डॉ. श्रीपाल सबनीस यांची धुळ्यात मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्याचे मुख्यमंत्रिपद वेळोवेळी पश्चिम महाराष्ट्राच्याच वाट्याला आले. खान्देशवर मात्र, दरवेळी अन्याय करण्यात आला. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री हा खान्देशातून झाला पाहिजे, अशी जोरदार मागणी पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या शुभारंभप्रसंगी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली. खान्देशात वैज्ञानिक महामंडळ स्थापन झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

खान्देश विकास प्रतिष्ठानतर्फे धुळ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते शनिवारी, संमेलनाचा शुभारंभ झाला. मराठी साहित्य संघाचे कर्नाटक राज्याचे उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, ओडिसातील साहित्यिक विजयालक्ष्मी महापात्र, चौथे अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला चव्हाण, खासदार ए. टी. पाटील, आमदार सतीश पाटील, काशिराम पावरा, शिरीष चौधरी, आसिफ शेख, चंद्रकांत रघुवंशी, गुलाबराव पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.

श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी भाषेसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन केले तर या भाषेचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल. सरकारने अहिराणी साहित्य संमेलनाला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. यानिमित्ताने अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे व ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. माजी मंत्री रोहिदास पाटील, पालकमंत्री दादा भुसे, ह. भ. प. सखाराम महाराज, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, युवराज करणकाळ, जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, महापौर जयश्री अहिराव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपसोबत युती नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नसल्याचे संकेत सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. भाजपसोबत युती होण्याची शक्यता नसल्याने कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. सोबतच शिवसेनेचा २४ एप्र‌िल रोजी होणारा उत्तर महाराष्ट्र मेळावा यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

शिवसेनेचा २४ एप्र‌िल रोजी होणारा मेळावाच्या तयारी संदर्भात ग्रामीण विभागाची बैठक शिवसेना कार्यालयत झाली. दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हा प्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, सत्यभामा गाडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना भुसे म्हणाले, भाजप व शिवसेनेतील संबंध ताणले गेले आहेत. भाजपकडून सेनेचा सन्मान केला जात नाही. त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपसोबत युती होण्याची शक्यता कमी आहे .त्यामुळे आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. शिवसेनेची ताकद वाढव‌िण्यासाठी निवडणूक स्वतंत्रपणे आपण लढणार असून त्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी केले. भाजपच्या महिला मेळाव्यावरील हल्ला प्रकरणात जेलमध्ये गेलेल्या गाडेकरांसह अन्य शिवसैनिकांचा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांच्या सुट्यांमुळे कोटींचे व्यवहार ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सराफ बाजाराचा बंद, बाजारात असलेले मंदीचे सावट व त्यात बँकांना मिळणाऱ्या सलग सुट्यांमुळे नाशिक शहरात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले असून, व्यापार व उद्योजकांना याचा जबर फटका बसला आहे.

या आठवड्यात शुक्रवारी गुढीपाढवा, त्यानंतर सेकंड सॅटर्डे व त्यानंतर रविवारची सुटी आल्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद होत्या. आता पुढच्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रामनवमीची सुटी असल्यामुळे बँका दोन दिवस बंद राहणार आहेत.

या दोन आठवड्यांतच नाही, तर वर्षातून बुहतांश महिन्यांत अशा सलग सुट्या येतात. त्यामुळे व्यापारावर त्याचा परिणाम होतो. यात सामान्य व्यापाऱ्यांना मोठा फटका बसतो. चेकचे क्लिअरिंग न होणे, पैसे काढता न येणे, पैसे ट्रान्स्फर न होणे, ड्राफ्ट काढता न येणे आदी समस्यांना सामोरे जावे लागते.

व्यापारामध्ये अशा सुट्या नसल्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवहार बंद ठेवता येत नाहीत. त्यामुळे व्यवहार सुरू ठेवले तर बँकांचे व्यवहारही सुरू राहणे गरजेचे आहे. बहुतांश व्यापारी आता बँकेद्वारे व्यापार करतात, तर उद्योजकांचेही व्यवहार हे बँकेद्वारेच चालते. त्यामुळे बँकांच्या या सुट्यामुळे व्यवहार करता येत नाहीत व त्याचा तोटा सर्वांनाच होतो. आता नेट बँकिंग व एटीएममुळे बँका बंद असल्या तरी व्यवहार करता येतो; पण त्याचा वापर आजही तुलनेने कमी असल्यामुळे बँकांच्या सुट्या हा विषय कधी कधी व्यापारी व उद्योजकांमध्ये संतापजनक ठरतो.

बँकांच्या सुट्यांमुळे एटीएमवर मोठी गर्दी होते. त्यात सलग तीन दिवस बँका बंद असल्या तर कॅश संपते. बँकांच्या या सुट्यांवर आरबीआयने व सरकारने त्यातून उपाय शोधण्याची गरज आहे. काहींच्या मते बँकेने सुट्यांचे रोटेशन ठरवायला हवे.

सराफ बाजार बंद असल्यामुळे अगोदरच त्याचा परिणाम बाजारात अप्रत्यक्षपणे पडला आहे. त्यात बाजारात फारशी तेजी नाही. त्यामुळे बँकांच्या या सुट्यांचा फटका कोट्यवधीच्या व्यवहाराला बसत आहे.

सलग बँका बंद असल्यामुळे त्याचा व्यापारी व उद्योजकांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प होतो. चेकचे क्लिअरिंग होत नाही. त्यामुळे आरबीआने व केंद्र सरकारने यावर तोडगा काढायला हवा, असे ​महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले.

सलग सुट्या आल्या की मार्केटमध्ये चलन थांबते. व्यवहार न झाल्यामुळे सर्वांचे नुकसान होते. सामान्य लोकांनाही याची झळ बसते. रोटेशन पद्धतीने बँकांनी सुटी घेतल्यास त्याचा व्यापार व उद्योजकांना फायदा होईल, सीए चेतन लोढा यांनी सांगितले.

तीन दिवस सुटी, तीन दिवस बँक
एपिल महिन्यात आठ तारखेला गुढीपाडव्याच्या सुटीनंतर तीन दिवस बँका बंद होत्या. त्यानंतर आता पुढील आठवड्यात तीन दिवस बँका सुरू राहतील. त्यानंतर १४ एप्रिलला आंबेडकर जयंती व रामनवमीची दोन दिवस सुटी असेल. त्यानंतर शनिवारी बँक सुरू राहतील. पुन्हा रविवारी बँक बंद, सोमवारी बँक सुरू व नंतर मंगळवारी १९ एप्रिलला महावीर जयंतीची सुटी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images