Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाणी टँकर्सची जिल्ह्यात शंभरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून, टँकरच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार दिल्यापासून तालुकावासीयांना दिलासा मिळू लागला आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक पाण्याचे दुर्भिक्ष्य असून, तेथील ११ गावे आणि ९२ वाड्यांना १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १३ टक्केच पाणी शिल्ल्क आहे. त्यावर जुलैपर्यंत शहर आणि जिल्हावासीयांची तहान भागविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. विहिरी, बंधारे आटले असून मोठ्या प्रमाणावर भूजल उपसा झाल्याने अनेक ठिकाणी हातपंपांनीही मान टाकली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची भिस्त टँकरवरच अवलंबून आहे. आजमितीस जिल्ह्यात १०४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील ११६ गावे आणि २१४ वाड्या अशा ३३० ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागला आहे. त्यासाठी ३५ सरकारी, ६९ खासगी अशा १०४ टँकर्सची मदत घेण्यात येते आहे. येवल्यात सर्वाधिक ४३ गावांमध्ये सध्या टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. सर्वाधिक ९२ वाड्या नांदगावातील आहेत.

सर्वाधिक टँकर येवल्यात येवल्यात २४, नांदगावात १९, सिन्नर आणि बागलाणमध्ये प्रत्येकी १६ तर देवळ्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पेठमध्ये तीन तर दिंडोरी, चांदवड, सुरगाणा, निफाड आणि इगतपुरीत प्रत्येकी दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राजधानी’चा ना‌श‌िकला थांबा

$
0
0

मुंबईहून दिल्लीला अहमदाबादमार्गे जाण्यासाठी असलेली राजधानी एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेद्वारे चालविली जाणारी जलदगती प्रवासी रेल्वे आहे. राजधानी एक्सप्रेस नवी दिल्ली व मुंबई या देशातील दोन सर्वात मोठ्या शहरांना जोडत असल्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला ती उतरली आहे. सन १९७२ साली सुरू झालेली सर्वात वेगवान एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध आहे. याच मार्गावर ऑगस्ट क्रांती ही दुसरी राजधानी एक्स्प्रेस आता धावते. अशीच गाडी मुंबईमार्गे नाशिकहून धावावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते त्याला आता हिरवा कंदील मिळाला आहे.

राजधानी एक्स्प्रेस मुंबईहून दुपारी २ वाजता सुटणे प्रस्तावित असून ती नाशिक येथे ६ वाजता तर भुसावळ येथे रात्री ८ वाजताच्या सुमारास येईल. नवी दिल्ली येथे सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान पोहचेल. राजधानी आठवड्यातून ५ दिवस धावणार आहे. नाशिकसह भुसावळ, मध्य प्रदेशातील भोपाळ, उत्तर प्रदेशातील मथुरा येथे तिचे थांबे असतील. नाशिकहून दिल्लीला जाण्यासाठी अनेक रेल्वे आहेत. मात्र, त्यासाठी बराच वेळ खर्ची पडतो. त्यामुळेच नाशिककरांची पसंती मुंबईहून विमान प्रवास किंवा अहमदाबादमार्गे राजधानीला आहे. मात्र, नाशिकमार्गे राजधानी सुरू झाल्यास त्याचा फायदा नाशिक आणि भुसावळला फायदा होईल.

अशी असतो राजधानीचा थाटबाट देशभर २२ राजधानी एक्स्प्रेस धावतात. या सर्व गाड्या संपूर्ण वातानुकुलित असतात. तसेच प्रवास भाड्यातच खान-पान सेवेचा समावेश असतो. थांबे कमी असल्यामुळे प्रवासाला वेळ कमी लागतो, आरामदायी प्रवासासाठी अनेकांची या एक्स्प्रेसला पसंती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नी, मुलीसह स्वत:ला संपविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा मुलीचा गळा दाबून तिची हत्या केल्यानंतर पत्नीचा दाबून तिलाही पतीने फासावर लटकविले. त्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सटाणा शहरात उघडकीस आली. हत्या आणि आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळा तालुक्यातील मेशी येथे राहत असलेल्या योगेश विठ्ठल बोरसे (२८) याने पत्नी वैशाली (२४) व मुलगी काजल (६) यांचा गळा दाबून हत्या करीत वैशालीला गळफास देत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश बोरसे देवळा येथील सह्याद्री पेट्रोल पंपावर कामास होता. त्याचा तीन वर्षांपूर्वी वैशालीशी विवाह झाला होता. वैशालीचे हे दुसरे लग्न असून, तिला पहिल्या नवऱ्यापासून काजल ही मुलगी होती. मात्र काजल सटाणा येथे वैशालीची आई म्हणजेच आजी लल‌िताबाई बाळासाहेब गायकवाड यांच्याकडे राहत होती. सहा दिवसांपूर्वी वैशाली आपला कान दुखत असल्याने उपचारासाठी आईकडे सटाण्याला वीर सावरकरनगर येथील चाळीतील घरी आली होती. सोमवारी दुपारी ११.३० च्या सुमारास काजलच्या आजीने काजलला जिल्हा परिषदेच्या शाळेतून शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी आणले. घरी आल्यावर मुलगी वैशालीची तब्येत ठिक नसल्याने तिच्यासाठी कलिंगड आणण्यासाठी वैशालीची आई बसस्थानकावर आल्या. दरम्यान, वैशालीचा पती योगेश अचानक घरी सटाण्यात सासुबाईंच्या घरी आला. घरात वैशालीयोगेशमध्ये जोरदार भांडण झाले. संतापलेल्या योगशने दरवाजाला आतून कुलूप लावून घेत वैशालीच्या पहिल्या पतीपासून असलेली सहा वर्षाच्या काजलचा गळा दाबून खून केला. यामुळे वैशाली हिने जोरात आरोळ्या मारल्या; मात्र दरवाज्याला आतून कुलूप असल्याने कुणीही मदतीस येऊ शकले नाही.

यावेळी शेजारच्यांनी तातडीने वैशालीच्या आई लल‌िताबाईंना मोबाइलवर फोन करीत तातडीन घरी येण्यास सांगितले व दोघे भांडत असल्याची माहिती दिली. त्या घरी आल्यावर दरवाज्याला कुलूप असल्याने दरवाजा उघडत नव्हता. यामुळे चाळीच्या मालकीण सुनंदा देवरे यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला असता योगेश व वैशाली दोघेही घराच्या छताच्या लोखंडी अ‍ॅगलला दोरीच्या सहायाने फाशी लावल्याचे आढळले. तर काजलचा मृतदेह जमिनीवर आढळून आला. पोलिसांनी व शेजारील रहिवाशांनी तात्काळ नज‌िकच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाभारा पुरुषबंदी : त्र्यंबक ग्रामस्थ आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थानने पुरुषांनाही गाभारा प्रवेश बंद केल्याने या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवारी त्र्यंबकचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. 'विश्वस्तांनो खुर्च्या खाली करा','देव आमाच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा' अशा घोषणा देत मोर्चा काढला. मंदिर देवस्थानने तातडीने गाभारा प्रवेश बंद‌ीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महिलांना गाभाऱ्यात प्रवेश द्यावा लागेल म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थानने सर्वांनाच गाभारा प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला; मात्र याचे संतप्त पडसाद त्र्यंबकनगरीत उमटले आहेत. शेकडो वर्षांपासून गाभाऱ्यात जाण्याच्या हक्कावर पुरुषांवर गदा आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. 'आमचा हक्कावर गदा आणण्याचा देवस्थानला अधिकार नाही' असे म्हणत ग्रामस्थ सकाळी ९ वाजेच्या सुमारास मंदिर चौकात जमा झाले. विशेष म्हणजे पुरुषांना गाभाऱ्यात प्रवेश मिळावा या मागणीसाठी जमलेल्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चा काढीत आलेले ग्रामस्थ मंदिरात पोहचले व नंतर कोठी संस्थान इमारतीच्या प्रांगणात त्यांनी ठिय्या मांडला. 'आपले निवेदन विश्वस्तांनी घ्यावे,' अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. येथे माजी नगराध्यक्ष मांगीलालशेठ सारडा, व‌िशाल जोशी, मंगेश धारणे आदींसह ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. विश्वस्त यादवराव तुंगार, अॅड. श्रीकांत गायधनी, लल‌िता शिंदे येथे उपस्थित होते. यादवराव तुंगार यांनी असा निर्णय का घेण्यात आला याची माहिती दिली व आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. ग्रामस्थांनी समन्वयाने प्रश्न सोडवावेत, असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले. त्र्यंबकच्या ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात देवस्थानने नागरिकांना संविधानाने दिलेल्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद केले. दर्शनाचा हक्क न मिळाल्यास उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी शिवसेनेनेही ग्रामस्थांच्या आंदोलनात पाठिंबा दर्शवला.

हिंदु परिषदेकडून स्वागत

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे विश्व हिंदु परिषदेने स्वागत केले आहे. जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव मुळे यांनी तसे प्रसिध्दीपत्रक दिले असून, न्यायालय आणि राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच अतिक्रमणांवर गोविंदनगरमध्ये हातोडा

$
0
0

नाशिक महापालिकेच्या वतीने गोविंद‍नगर येथील कृष्णकुंज सोसायटीतील तसेच मौजे पाथर्डी गांवातील ५ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीणकुमार गेडाम याचे व अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांच्या मागदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. यावेळी विभागीय अधिकारी बी. वाय. शिंगाडे, अधीक्षक एम. डी. पगारे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविली. यावेळी पोलिस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास आराखडा १५ मे पूर्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराच्या विकास आराखड्याचे काम प्रगतीप्रथावर आहे. १५ मे पूर्वी आराखडा तर डीसी रूल महिनाभरात अंतिम करण्याचे आश्वासन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे शहरातील कपाटांचा प्रश्न मिटणार असून, सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. नाशिक शहर विकास आराखड्या संदर्भातील कार्यवाही २०११ पासून सुरू आहे. सहसंचालक नगररचना यांनी विकास आराखड्याबाबत सरकारकडे पाठविलेला अहवाल गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३१ अन्वये सदर आराखडा अहवाल प्राप्तीनुसार सहा महिन्यांच्या आत पूर्ण किंवा भागश: मंजूर करणे आवश्यक आहे. मूळ विकास आराखडा बनविण्याची प्रक्रिया सन २०११ मध्येच सुरू झाल्यामुळे जवळपास पाच वर्षांचा मोठा कालावधी उलटून गेल्यावरही सरकारने अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सदर आराखड्याबाबत शहरातील जनतेकडून हरकती व सूचना मागवूनही त्याबाबत सरकारकडून अद्यापपर्यंत ठोस निर्णय झालेला नाही. नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यासंदर्भात सरकार स्तरावर कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, नाशिक शहरातील विकासक आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करून मुदतीच्या आत १५ मे २०१६ पूर्वी आराखडा मंजूर केला जाईल आणि तत्पूर्वी म्हणजे साधारणतः महिनाभरात शहराचे डीसी रूल्स मंजूर केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकीटमार महिला पंचवटीमध्ये ताब्यात

$
0
0

पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांना पाकिटमार महिला यांची माहित मिळताच गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांना माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचून संशयित महिलांना ताब्यात घेतले. यात चंद्रा ढालवाले, अनिता अनवडकर, अनुसया कसबे आणि पार्वता कसबे यांचा समवेश आहे. त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोरखचिंचेची फळे अखेर काढली

$
0
0

निलकंठेश्वरनगरमधील गोरखचिंचेच्या फळांमुळे स्थानिक रहिवाशी हैराण आहेत. सुमारे दीड ते पाच किलो वजनाच्या या फळाचा कधीही आघात सहन करावा लागू शकतो, या विचाराने नागरिक धास्तावलेले आहेत. यासंदर्भात रहिवाशांनी महापालिकेला देखील अनेकदा कळविले होते. गोरखचिंचेच्या फळांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झालेले आहे. दरम्यान, शनिवारी (दि. २) निलकंठेश्वर नगरमध्ये मित्राला भेटण्यासाठी आलेले शेख उभे असतांना अचनाक त्यांच्या डोक्यावर गोरखचिंचेचे फळ पडले. या आघातामुळे ते गंभीर जखमी झाले. याबाबत 'मटा'ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यांनतर उद्याने विभागाने गोरखचिंचेच्या झाडावरील सर्व फळे काढून घेतली. यावेळी रहिवाशांनी झाडाच्या फांद्यांची छाटणी करण्याची मागणी महापालिकेकडे निवदेनाद्वारे केली. प्रशासनाची रिसतर परवानगी घेऊनच झाडाची छाटणी करणार असल्याचे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंदिरानगर परिसर सर्वार्थाने दुर्लक्षित

$
0
0

इंदिरानगर ते पाथर्डी परिसर दिवसेंदिवस विकसित होत आहे. शहरातीलच नव्हे तर शहराबाहेरीलसुद्धा बांधकाम व्यवसायिक याच भागात आपले नवनवीन प्रकल्प उभारतांना दिसून येत असतात. नवीन इमारतींमध्ये नागरिक रहिवसासाठी येतात. परंतु रस्ते, पाणी, पथदीप या सुविधाव्यतिरिक्त अन्य गरजाही नागरिकांच्या असतात. भाजीमंडई, नाट्यगृह, विरंगुळा केंद्र, यासारख्या सुविधांची नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असतात. त्या नसल्याने इंदिरानगर म्हणजे फक्त रहिवास क्षेत्रच झाले आहे. काहीही असले तरी शहराकडे धाव घ्यावी लागत असल्याने इंदिरानगरला स्वतःचे असे अस्तित्वच नसल्याचे दिसून येत असते. नाशिक महापालिकेने या भागात एकही प्रकल्प उभारलेला नाही, ज्यामुळे इंदिरानगरवासीयांबरोबरच नाशिककरांनाही त्याचे आकर्षण निर्माण होईल. उच्चशिक्षितांबरोबरच सामान्य कामगारांची ही वस्ती असून संमिश्र असलेल्या या भागाच्या विकासासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. या ठिकाणी असलेल्या खुल्या जागांचा वापर करून चांगले काही खास प्रकल्प येथे उभे राहणे गरजेचे आहे. इंदिरानगरला जॉगर्स क्लब, हास्य क्लब, विविध खेळांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांबरोबरच संगीत, गायन व कथक सारखे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही या भागात कार्यरत आहेत. सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने या भागाकडे लक्ष दिले तर शहराचा नावलौकिक निश्चितच होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. सध्या इंदिरानगरमध्ये एक जॉगिंग ट्रॅक वगळता अन्य कोणताही लोकोपयोगी प्रकल्प नसल्याने केवळ महापालिकेकडून रस्ते, पाणी व पथदीप याच सुविधा मिळणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाइव्ह शिवजयंतीला तीन लाख हिटस्

$
0
0

मनसे नाशिकरोड शिवजयंती समितीने २६ मार्चला जगातील पहिली ऑनलाइन शिवजयंती साजरी केली. जयंतीचे वृत्त महाराष्ट्र टाइम्समध्ये ऑनलाइन प्रतिसाद लक्षणीयरित्या वाढला. मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे अध्यक्ष विक्रम कदम आणि कार्याध्यक्ष रोहन देशपांडे आदींनी आठ उपक्रम राबवले. ऑनलाइन जयंतीला मार्च अखेरीपर्यंत २ लाख ९० हजार ६०७ तर १ ते ४ एप्रिल दरम्यान २२ हजार ३०६ हिटस् मिळाल्या आहेत. यासाठीचे सॉफ्टवेअर नाशिकरोडचे तज्ज्ञ आनंद सुंदरराज यांनी विकसित केले. व्हॉटस अॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून अनेकांनी हा जयंती सोहळा अनुभवला. बॅनरबाजी, डीजे, ओंगळवाणे नृत्य यांना फाटा देत समितीने आदर्श शिवजयंती साजरी केली. विशष म्हणजे नाशिक परिसरातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता लोकवर्गणी मागण्यात आली नाही.

या कार्यक्रमांना प्रचंड पसंती शिवरुद्राभिषेक, पाणीबचतीचा शपथ समारंभ, रक्तदान शिबिर, आरोग्य पुस्तकांचे वितरण, मराठ मोळी नृत्ये, शिवपुतळा परिसर दोन दिवसांसाठी वायफाय करणे, महिलांना हिरकणी पुरस्काराचे वितरण, शिवकालीन दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक, शोभेच्या दारुगोळ्याद्वारे शिवाजी महाराजांना अभिवादन, या कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

आंबेडकर जयंतीला मदत उपक्रमाबाबत विक्रम कदम म्हणाले, की शिवजयंतीप्रमाणे नाशिककरोडची आंबेडकर जयंतीही राज्यात प्रसिद्ध आहे. या जयंतीतील उत्साह व थरार जगभरातील लोकांना अनुभवता यावा, पाहता यावा यासाठी आंबेडकर जयंती समित्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असून त्यांना तांत्रिक सहाय्य देऊ केलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईपीएस पेन्शनधारकांचा सोमवारी संघर्ष मेळावा

$
0
0

जिल्ह्यातील एपीएस ९५ स्किमचे अंतर्गत निवृत्त झालेल्या सर्व पेन्शनरांचा संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पेन्शनर असोसिएशनने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की इपीएस ९५ ची पेन्शन योजना अत्यंत फसवी असून हल्ली महागाईच्या काळात मिळणारी रक्कम अत्यंत कमी असून पेन्शनर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. सरकारने निवडणूक पूर्वकाळात दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. यात बदल होणे गरजेचे आहे. या मेळाव्यात अभ्यासू व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात खा. कोशियारी कमिटीच्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात त्यात तीन हजार अधिक महागाई भत्ता त्वरीत द्यावा, पुढे ६ हजार ५०० अधिक महागाई भत्ता त्वरित देण्यात यावे या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटी, गटसचिव यांच्यासह अधिकाधिक पेन्शनधारकांनी मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन पेन्शनर फेडरेशनचे सदस्य एन. एस. कुलकर्णी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६५० किलोमीटर अंतर २१ तासांत पार !

$
0
0

नाशिकचे इनफिल्ड बुलेट रायडर मितेश आणि प्रशांत यांचा विक्रम

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक : नाशिकमध्ये सायकल रायडर्सची मोठी श्रृंखला तयार होत असून, महाजन बंधूंच्या जागतिक यशानंतर आता आणखी दोन तरूणांनी नाशिकचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकावला आहे. अत्यंत खडतर आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी पुणे-बंगळुरु-पुणे ही राईड शहरातील क्रुझींग गॉड या इनफिल्ड बुलेट रायडर क्लबच्या मितेश वैश्य आणि प्रशांत परदेशी यांनी पार केली आहे. १६५० किलोमीटर्सचे हे अंतर अवघ्या २१ तासात पूर्ण करुन या दोघांनीही नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

अमेरिकेतील लाँग डिस्टन्स राईड ( एलडीआर) या संस्थेतर्फे या राईडचे आयोजन करण्यात येते. यंदा ही राईड स्थानिक पातळीवर आयोज‌ित करण्याचा मान औरंगाबादच्या थ्रॉटलर्स क्लबला मिळाला होता, त्यांनी व पुण्यातील इनफिल्ड रायडर क्लब यांच्यावतीने राईडचे आयोजन करण्यात आले होते. या राईड मध्ये १२ तासात आठशे किलोमीटर, २४ तासात सोळाशे किलोमीटर व ३६ तासात चोवीसशे किलोमीटर असे तीन ग्रुप तयार करण्यात आले होते. यातील चोवीस तासात सोळाशे किलोमीटर या राईडमध्ये मितेश व प्रशांत यांनी वेळे आधी म्हणजेच २१ तासात हे अंतर पूर्ण केले. या प्रकारात भारतातील ४० स्पर्धक सहभागी झाले होते. यातून प्रथम येण्याचा मान नाशिकच्या तरूणांना मिळाला आहे. ही राईड पूर्ण करण्यासाठी मितेश व प्रशांत यांनी तीन महिन्यांपासून सराव केला होता. त्यासाठी फिजिकल फिटनेस व मेंटल फिटनेस, बाईक प्र‌िपरेशन अशा सर्व बाबींची सातत्याने चाचणी घेण्यात येत होती. तसेच सराव करण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीत नाशिक-मुंबई, नाशिक- इंदूर अशा मार्गांवर रात्रीचा प्रवास केला. यात २४ तास अन्न न घेता राहयचे असल्याने आहार तज्ज्ञांची मदत घेतली होती. त्यासाठी लिक्व‌िड डायट वर भर देण्यात आला. ही राईड वेळेत पूर्ण करणे सर्वांना शक्य होत नाही. चोवीस तास अखंड ड्रायव्ह‌िंग करायचे असल्याने झोपेवर व शरीरावर नियंत्रण मिळवण्यासाठी योगाचा देखील अभ्यास केला.

२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता पुण्याच्या सातारारोडहून राईडला सुरूवात झाली. सकाळी सहा वाजता दोघेही बंग‍ळुरु येथे पोहचले. नियमानुसार प्रवासादरम्यान जेथे जेथे बुलेटमध्ये पेट्रोल टाकले त्या ठिकाणच्या पावत्या सादर करणे बंधनकारक होते. रात्री प्रशांत याची गाडीचा सायलेन्सर कोल्हापूरजवळ निसटला तेथे नवीन सायलेन्सर लावण्यासाठी एक तास घालावा लागला तसेच मितेश यांची गाडीही एकदा पंक्चर झाल्याने त्यांनाही थोडा उशीर झाला अन्यथा २० तास या विक्रमी वेळेत पूर्ण झालेली रॅली आणखी कमी वेळात पूर्ण झाली असती, असे मितेश व प्रशांत यांनी सांगितले. या आधीही या दोघांनी १४ तासात बाराशे किलोमीटरची राईड पूर्ण केली आहे. ही राईड पूर्ण केल्यानंतर नाशिक इनफिल्ड बुलेट रायडर क्लब व अध्यक्ष मकरंद उदावंत तर्फे मॉडेल कॉलनी चौकात त्यांचे ढोल ताशाच्या गजरात हेल्मेट सलामी देऊन स्वागत करण्यात आले.

सरावामुळे अडचणींवर मात

बुलेट राईड पूर्ण करणे प्रत्येक रायडर्सचे स्वप्न असते तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आम्ही हे साध्य करु शकलो. यासाठी मेंटली फिटनेसवर जास्त भर दिला त्यामुळे हे शक्य झाले. या राईड पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त रात्रीचा सराव केला, त्यामुळे प्रत्यक्ष राईड करताना फारसा काही त्रास जाणवला नाही, काही तांत्र‌िक प्रॉब्लेम आले; परंतु त्यावर मात करुन आम्ही ही राईड पूर्ण करु शकलो, असे मितेश वैश्य व प्रशांत परदेशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेयची कुंडली कोर्टासमोर सादर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैसे परत देण्याची आमची तयारी आहे. मात्र, सेबीने आमच्यावर बंधने लादली आहेत, असा युक्तिवाद करीत मैत्रेय ग्रुपने मंगळवारी कोर्टात बचावात्मक पवित्रा घेतला. दुसरीकडे सरकारी पक्षाने मात्र पोलिसांनी तपासाअंती उघड केलेला मैत्रेय ग्रुपचा आर्थिक लेखाजोखा सादर करीत इस्क्रो खात्यात पैसे भरावेच अशी आग्रही लावून धरली. त्यास संचालिका वर्षा सत्पाळकर तसेच अरविंद जनार्धन परूळेकर यांनी संमती दर्शवली. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर १८ तारखेस पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कोर्टाच्या पुढील निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी सुनावणीदरम्यान अॅड. राहुल कासलीवाल यांनी सत्पाळकरांच्यावतीने आपले म्हणणे मांडले. मैत्रेय ग्रुप गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यादृष्टीने एक आराखडा तयार करून त्यांनी कोर्टाला सादर केला. या आराखड्यानुसार २०१६ ते २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यात येणार असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, सेबीने आपल्यावर आर्थिक निर्बंध टाकले असून, त्यामुळे व्यवहार ठप्प पडले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर, सरकारी पक्षाने बचाव पक्षाचा युक्तिवाद खोडून काढला. कंपनीने गुंतवणूकदारांकडून जमा केलेला पैसा चल आणि अचल संपत्तीत गुंतवलेला आहे. चल संपत्तीबाबत निर्बंध आहेत. अचल म्हणजे मैत्रेय ग्रुपचे १२५ खात्यांमध्ये असलेले पैसे, जमीन खरेदीसाठी देण्यात आलेले अॅडव्हान्स, ठेवी, शेअर्स, कर्ज, विविध वि​त्तीय संस्थांना पुरवलेली आर्थिक मदत, असे कोट्यवधी रुपये मैत्रेयचे संचालक जमा करू शकतात, याविषयी कोर्टाला अवगत केले. तशी यादीच पोलिसांनी कोर्टात सादर केली. मैत्रेय ग्रुपची अशा प्रकारची संपत्ती ३८० कोटी २८ लाख रुपये इतकी असून ती इस्क्रो खात्यात जमा होऊ शकते. मैत्रेयकडून इस्क्रो खात्यात जमा होणारी रक्कम देशभरातील गुंतवणूकदारांसाठी असून, सेबीच्या आर्थिक निर्बंधाबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मैत्रेय ग्रुपतर्फे होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारानंतर गुंतवणूकदारांचा प्राधन्याने विचार व्हावा, अशी अपेक्षा यामागे असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. आजवर या खात्यात सुमारे दीड कोटी रुपये जमा असून, पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच १८ एप्रिलपर्यंत त्यात वाढ होऊ शकते, असा दावा करण्यात येत आहे.परूळेकर मंगळवारी कोर्टात हजर झाले होते.

मैत्रेयची हायकोर्टात याचिका मैत्रेय ग्रुपविरोधात देशभरातील गुंतवणूकदार पुढे येत आहेत. विशेषतः राज्यात हा आकडा दिवसागणिक वाढत आहे. नुकतेच यवतमाळ जिल्ह्यात देखील मैत्रेय ग्रुपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपूरमधील गुंतवणूकदार सुध्दा पुढे आले आहेत. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यास सर्वच प्रक्रियेला खो बसू शकतो. शिवाय सत्पाळकरांना प्रत्येक गुन्ह्यात अटक होऊ शकते. यापार्श्वभूमीवर त्यांच्यामार्फत हायकोर्टत याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होईल. साधारणतः नाशिक पोलिसांकडेच राज्यातील सर्व गुन्हे वर्ग होण्याची शक्यता आहे.

मैत्रेय ग्रपविरोधी वाढत्या तक्रारी आजमितीस नाशिक पोलिसांकडे २ हजार २५८ तक्रारी प्राप्त ठेवीदारांचे ४ कोटी ७४ लाख रुपये मैत्रेय ग्रुपला देणे. चंद्रपूर जिल्ह्यातील १४८ तक्रारदारांचा समावेश. गुंतवणूकदारांचे तब्बल १३०० कोटींहून अधिक पैसे मैत्रेयच्या विविध स्किममध्ये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधाकर बडगुजरांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

भाजप महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यातील संशयित आरोपी म्हणून शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना मंगळवारी पोलिसांनी त्यांच्या संपर्क कार्यालयातून अटक केली. संपर्कप्रमुख अजय चौधरी नाशिकमध्ये असतानाच बडगुजरांवर अटकेची कारवाई झाली असतांनाही पक्षाने या घटनेकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने या कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. संपर्कप्रमुखांचा पुतळा जाळण्याप्रकरणी हकालपट्टी झालेल्या शिवसैनिकांनी दिलेल्या कबुली जबाबामुळे शिवसेनेने बडगुजर यांच्या अटकेपासून अंतर राखल्याचे चित्र आहे.

उपनगर येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात महाराष्ट्राच्या विभाजनावरून वक्तव्य केलेल्या रहाळटकर यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी या महिला मेळाव्यात धुडगुस घातला होता. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून काही शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईनाका पोलिसांनी या प्रकाराचा तपास सुरू केल्यानंतर या गुन्ह्यात नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचाही संबंध असल्याचे लक्षात आल्याने त्यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू होती. मंगळवारी मुंबईनाका पोलिस ठाणे व अंबड पोलिस ठाण्याच्या संयुक्तिक कार्यवाहीत बडगुजर यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतले. यावेळी समर्थकांनी गर्दी करीत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

कारवाई संशयास्पद!

हल्ला प्रकरणात अटकेत असलेल्या सत्यभामा गाडेकर यांना भेटण्यासाठी थेट सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आले होते. परंतु, बडगुजर यांची अटक होत असतांना संपर्कप्रमुखांनी त्यांची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या अटकेपासून पक्षाने अंतर राखल्याचे चित्र होते.

भाजप मेळाव्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांकडून बडगुजरांवर अगोदरच कारवाई अपेक्षित होती. परंतु, बडगुजर यांचे भाजप नेत्यांसोबत असलेल्या मधुर संबधामुळे कारवाई केली जात नव्हती. संपर्कप्रमुख अजय चौधरी यांचा पुतळा जाळल्याप्रकणी त्यांना पक्षाने नोटीस बजावली होती. त्याचा खुलासाही त्यांनी सादर केला होता. मंगळवारी चौधरी हे नाशिक दौऱ्यावर येण्यापूर्वीच पुतळा जाळल्याप्रकरणी हकालपट्टी झालेल्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री बबनराव घोलप यांची भेट घेतली. या प्रकरणात आपला हात नसल्याचा खुलासा

त्यांनी केला. तसेच आम्हाला

दुसऱ्याच कारणासाठी बोलावल्याचे सांगत त्यांनी बडगुजरांकडे अंगुलीनिर्देश केला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली?

$
0
0

भाजप आमदारांच्या दबावापुढे झुकले मुख्यमंत्री

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे, नाशिकला स्मार्ट सिटीच्या दिशेने नेणारे व भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ ठरलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. भाजपचे पालकमंत्री तसेच त्यांच्या आमदारांच्या दबावानंतर मुख्यमंत्र्यांनी अखेर गेडाम यांच्या बदलीला सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या बदलीचे आदेश निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या डॉ. गेडाम यांच्या पाठिशी नाशिककर उभे राहतील काय, याकडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत.

डॉ. गेडाम हे नोव्हेंबर २०१४ मध्ये महापालिका आयुक्त म्हणून रूजू झाले होते. पदभार स्वीकारताच त्यांनी सिंहस्थाचे आव्हान यशस्वीपणे पेलले. डॉ. गेडाम यांच्या बळावरच सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पडला. महापालिकेतील पूर्वीच्या अनागोंदी कारभारालाही वेसण घातली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. महापालिकेतील भ्रष्टाचाराला चाप लावताना, प्रसंगी लोकप्रतिनिधींना अंगावर घेत जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न गेडाम यांनी केला. अनधिकृत कपाट प्रकरण उजेडात आणत बिल्डरांच्या बेकायदेशीर कारभारालाही त्यांनी चाप लावला होता.

मराठवाड्याला पाणी सोडल्याच्या प्रकरणात सत्ताधारी मनसेला डॉ. गेडाम साथ देत असल्याचा ठपका भाजप आमदारांनी त्यांच्यावर ठेवला. पाणीकपातीवरून त्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न झाले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशीही त्यांचे जमेनासे झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या बदलीसाठी आग्रह धरला जात होता. नाशकात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातही गेडाम यांच्या तक्रारी करण्यात आल्या. गेडामांची बदली करा, अन्यथा महापालिका का गमावली, हे आम्हाला विचारू नका, असा निर्वाणीचे आमदारांकडून सांगितले गेले. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बदलीला होकार दिल्याचे समजते.

स्वच्छ कारभारच नडला!

भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ म्हणून डॉ. गेडाम प्रसिद्ध आहेत. वाळू माफियांविरोधातील धडक कारवाई, तुळजापूरच्या भवानी मंदिरातील भ्रष्टाचार, पंढरपूर देवस्थानमधील भ्रष्टाचार असो वा जळगावमधील घरकुल घोटाळा, त्यांनी नेहमीच आपली कारकीर्द गाजवली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा बिमोड करायला निघालेल्या भाजपच्या गळ्यातील ते ताईत बनतील, अशी अपेक्षा होती. परंतु, सत्तेपुढे शहाणपण चालत नसल्याने स्वच्छ व पारदर्शी कारभारच त्यांना आता नडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...अन् पालखेडचे आवर्तन सुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तहानलेल्या मनमाड, येवलेकरांसह ३८ गाव पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्यांसाठी मंगळवार एखाद्या सणाइतकाच इतकाच आनंदाचा ठरला. पालखेड धरणातून मंगळवारी सकाळी आठ वाजता आवर्तन सुटले आणि परिसरातील शेतकऱ्यांसह मनमाड, येवलेकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. दरम्यान, पाणी चोरी होऊ नये यासाठी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पालखेडच्या डाव्या कालव्यातून ७५० क्युसेकच्या वेगाने पाणी सोडण्यात आले. तब्बल ८८ किलोमिटरचा प्रवास करून हे पाणी ७२ तासानंतर मनमाड व येवल्यातील धरणात पोहोचणार आहे.

पालखेडच्या डाव्या कालव्यातून ७५० क्युसेकच्या वेगाने पाणी सोडण्यात आले. तब्बल ८८ किलोमिटरचा प्रवास करून हे पाणी ७२ तासानंतर मनमाड व येवल्यातील धरणात पोहोचणार आहे. जिल्हा प्रशासनाने दोन एसआरपीच्या तुकड्या तैनात केल्या असून सायंकाळी उश‌िरानंतर गस्त सुरू केली केली आहे. सकाळी ८ वाजता पाणी सुटल्यानंतर दुपारी अडीच वाजता पिंपळगाव बसंवत येथे पोहोचले.

बंदोबस्तातही चोरीचे फंडे

जिल्हा प्रशासनाने बंदोबस्त ठेवला असला तरी या ८८ किलोमिटरच्या पल्यात हा बंदोबस्त तोकडा असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी चोरीचे अनेक फंडे शोधले आहेत. पाणी आपल्या शेतातील विहीर व शेततळ्यात घेण्यासाठी कालव्यातून पाईप टाकले असून ते कोणाच्याही लक्षात येणार नाही याची व्यवस्था केली आहे. काहींनी रात्री मोटारी लावून पाणी चोरीची तयारी केली आहे. पाणी चोरी होऊ नये म्हणून वीजवितरण कंपनीने पाटा शेजारील सर्व वीजपुरवठा खंडीत केला आहे.

चार महिने पुरवावे लागणार पाणी

पालखेडमधून मिळालेल्या पाण्याचे हे शेवटचे आवर्तन आहे. त्यानंतर पाणी मिळणे शक्य नाही. म्हणून आता मिळालेले पाणी येवला, मनमाड आणि ३८ गाव पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या गावांना जुलैअखेरपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार आहे. पालखेडमधून या अगोदर ७ जानेवारीला आवर्तन सोडण्यात आले होते. सध्या मनमाड शहरात महिन्यातून एकदा तर येवल्यात १० दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर मनमाड रेल्वेस्थानक, येवला, निफाड तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेवरील गावही पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. त्यामुळ जिल्हा प्रशासनाने पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला.

पालखेड डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग कमी असला तरी तो नंतर वाढणार आहे. ७२ तासानंतर तो मनमाड, येवला येथे पोहचेल, पाण्याची चोरी होवू नये यासाठी दक्षता घेण्यात आली आहे.

राजेंद्र तायडे, अभ‌ियंता, पालखेड विभाग

७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडणार

२० दशलक्ष घनफूट मनमाडसाठी

५० दशलक्ष घनफूट येवलासाठी

५ दशलक्ष घनफूट मनमाड रेल्वेसाठी

४० दशलक्ष घनफूट ३८ गाव योजनेसाठी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोका बिल्डकॉनवर छापा

$
0
0

आयटी, ईडीचे 'अशोका'वर संयुक्त छापे; भुजबळांशी आर्थिक संबंध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ व कुटुंबियाना आर्थिक सहकार्य करणारे देखील आता ईडी व आयटीच्या रडारवर आले आहेत. छगन भुजबळांना ४० कोटीची मदत केल्याच्या खासदार किरीट सोमय्यांच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर अशोका बिल्डकॉन या कंपनीच्या कार्यालयांवर व अशोक कटारीया यांच्या निवासस्थानावर मंगळवारी आयटी व ईडीतर्फे सयुंक्त छापा टाकण्यात आले. तसेच अशोका बिल्डकॉनच्या नाशिकमधील मुख्य कार्यालयासह पिपंळगाव येथील पीएनजी टोलवे कंपनीच्या कार्यालयावरही छापे टाकण्यात आले. दिवसभर चाललेल्या या छापासत्राने शहरात खळबळ उडाली आहे.

ईडी व आयटीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अशोक बिल्डकॉन कंपनीच्या अशोका रोडवरील मुख्य कार्यालयासह कंपनीचे मालक अशोक कटारीया याचे निवासस्थान, पिंपळगाव येथील पीएनजी टोलवे कंपनीच्या टोलच्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकत अशोकाचे मुख्य कार्यालय सील करीत कंपनीचे मालक अशोक कटारीया यांची चौकशी सुरू केली. कंपनीच्या कार्यालयात पडलेल्या छाप्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पथकातील अधिकाऱ्यांनी कार्यालयातील सर्व कागदपत्र सील केले. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू राहणार असून दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनी लाँडरिंग प्रकारात छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ सध्या कारागृहात आहेत. ईडी ( अंमलबजावणी संचालनालय) व इन्कम टॅक्सतर्फे त्यांच्या विविध कंपन्याची चौकशी सुरू आहे. भुजबळ कुटुंबियांशी आर्थिक संबंध करणाऱ्या कंपन्याचीही चौकशी सुरू आहे. भुजबळ सार्वजनिक मंत्री असताना त्यांनी कंत्राटाच्या बदल्यात मोठ्या आर्थिक रकमा कंत्राटदाराकडून स्वीकारल्याचा आरोप केला जात आहे. त्यात नाशिकच्या अशोका बिल्डकॉन कंपनीतर्फे भुजबळांना रोड व पूलच्या कॉन्ट्रॅक्टच्या बदल्यात ७५ कोटी द्याल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यात ४० कोटी रुपये विविध खात्यातून भुजबळांकडे ट्रान्सफर झाल्याचे कागदोपत्री पुरावे सोमय्या यांनी ईडीकडे सादर केले होते. या पैशातूनच भुजबळ फार्मची उभारणी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे ईडीने आता भुजबळांना मदत करणाऱ्या विविध कंत्राटदारांविरोधात फास आवळण्यास सुरूवात केली आहे.

'आर्मस्ट्राँग'वर जप्ती

ईडी व आयटी पाठोपाठ आता आर्थिक देणी थकवल्याप्रकरणी विविध बँकानीही भुजबळांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. भुजबळांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. कंपनीची शिलापूर येथील मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंड‌ियाने जप्त केली आहे. ८ कोटी ८ लाख ६४ हजार रुपयांच्या थकबाकी प्रकरणी बँकेने ही कारवाई केली आहे. समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि रबरएक्स इंडस्ट्र‌िजची मालकी असलेल्या शिलापूर येथील सात हेक्टर जागा व त्या जागेवर असलेली स्थावर मालमत्ता जप्त करत असल्याचे बँकेने जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समित्यांसाठी महाआघाडी एकत्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांच्या सभापतीसाठी येत्या १२ व १३ एप्रिल रोजी निवडणूक होत असून, त्यासाठी आज, गुरुवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या निवडणुका सत्ताधारी महाआघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र, युतीमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरूच आहेत. बुधवारी सहा प्रभाग समित्यांसाठी बारा अर्जांचा विक्री झाली. गुरुवारी दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, मनसेतर्फे फुटीर नगरसेवकांना प्रभाग समित्यांसाठी व्हीप बजावला जाणार आहे. महापालिकेच्या नाशिकरोड, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी व सिडको या सहा प्रभाग समित्यांसाठी १२ व १३ एप्रील रोजी निवडणूक होत आहे. नाशिक रोड प्रभाग समितीत बहुमत असल्याने या ठिकाणी शिवसेनेचा सभापती होणे निश्चित आहे. नाशिक पश्चिममध्ये सत्ताधारी मनसे माघाडी व युतीचे संख्याबळ तुल्यबळ असल्याने या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. पंचवटी, सिडको, सातपूर आणि नाशिक पूर्वमध्ये महाआघाडीचे बहुमत आहे. मनसेला चारपैकी दोन समित्यांचे सभापती पद हवे आहे. काँग्रेस, अपक्ष व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक सभापती पद हवे आहे. त्यामुळे मनसेला एकच सभापतीपद मिळणार आहे. मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत सकाळी महाआघाडीची बैठक झाली. त्यात या संदर्भात चर्चा करण्यात आली. परंतु, त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता आज, गुरुवारीच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे शिवसेना व भाजप युतीचे अद्याप युतीबाबत ठरलेले नाही. पश्चिमध्ये युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीची रणनीती आता गुरुवारीच ठरणार आहे.

बारा अर्जांची विक्री नाशिकपूर्वसाठी रशिदा शेख, समिना मेमन, सुफी जैन, नीलिमा आमले, नाशिक पश्चिमसाठी माधुरी जाधव, पंचवटीत रुची कुंभारकर, दामोदर मानकर, परशराम वाघेरे, तर नाशिकरोडसाठी सुनील वाघ यांनी अर्ज घेतले आहेत. सिडकोमधून अश्विनी बोरस्ते तर सातपूरमधून उषा अहिरे, सविता काळे यांनी अर्ज नेले आहेत.

मनसे बजाविणार व्हीप मनसेच्या जवळपास बारा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे प्रभाग समित्यामंध्ये या नगरसेवकांबाबत मनसे कठोर भूमिका घेणार आहे. या सर्व फुटिरांना मनसेतर्फे व्हीप बजावला जाणार आहे. या सर्वांनी व्हीपचे पालन केले नाही तर त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची तक्रार मनसेतर्फे केली जाणार आहे. दोन नगरसेवकांचे पद रद्द करण्यात मनसेला यश आले आहे. त्यामुळे या फुटीर नगरसेवकांच्या मताकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाई पथकावर मालेगावात दगडफेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहारावळील पवारवाडी, ओवाडीनाला व दरेगाव शिवारातील अवैधपणे जनावरांची हाडे उकळण्याचे, चरबीपासून साबण निर्मिती करण्याचे कारखाने व कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर बुधवारी दगडफेक झाली. यामुळे खळबळ माजली आहे. सोमवारपासून पवारवाडी भागातील अवैध हड्डी, कारखाने व कत्तलखान्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या भागातील कारखानादार आणि मनपा प्रशासन यांचे लागेबंधे असल्याची चर्चा होत आहे. कारवाई प्रसंगी अप्पर पोलिस उपाधीक्षक गजानन राजमाने स्वतः उपस्थित राहात आहेत. पवारवाडी भागातील कारखाने उद्‍ध्वस्त करण्यासाठी राजमाने, नगररचनाकार शाकिल सय्यद, दीपक हाडगे आदींसह प्रशाकीय अधिकारी व पोलिस गेले असता कारखाना परिसरात अज्ञात लोकांकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे काही वेळ कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र, कारवाई सुरूच ठेवण्यात आली.

मालेगाव महानगर पालिकेच्या प्रशासन व पदाधिका-यांच्या हितसंबंधांमुळे सदर कारखाने चालू आहेत. हे सर्व कारखाने पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहेत. तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशाद्वारे होत असलेली ही कारवाई टाळण्यासाठी हा निंदनीय प्रकार केला गेला आहे. - निखिल पवार, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’साठी मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा अधिनियम २००९ नुसार राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. वेबसाईटमधील त्रुटींमुळे नोंदणी करण्यास अडथळे येत असल्याने १५ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्यासाठी ही यंत्रणा खुली ठेवण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील बालकांपर्यंत शिक्षणाचा हक्क पोहोचवण्यासाठी आरटीई प्रक्रिया महत्त्वाची आहे. शाळांच्या नोंदणी प्रक्रियेला विलंब झाल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया वारंवार पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेलाही विलंब झाला. आता विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली असली तरी वेबसाइटमधील त्रुटी पाहता अर्ज भरण्यास अडसर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तशी तक्रारही पालकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. त्यामुळे आता १५ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे.

एकूण जागा............५९०० जागा पहिली.................४८५८ पूर्वप्राथमिक...........१०४२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images