Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सत्यशोधन करूनच न्याय द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

न्यायाधीश व वकील एकच असून, न्यायाधीश म्हणजे नोकरी स्वीकारलेला वकीलच आहे. कोर्टात जर न्याय होणार नसेल, तर या व्यवस्थेचे अस्तित्वच उरणार नाही. त्यामुळे नवीन नियुक्त होणाऱ्या न्यायाधीशांपुढे सत्यशोधन करून न्याय देण्याचे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल ढवळे यांनी केले.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा व नाशिक बार असोसिएशन यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या न्यायिक मार्गदर्शन केंद्राच्या (ज्युडिशिअल सर्व्हिस अ‍ॅज अ करिअर) शुभारंभावेळी ते बोलत होते. 'न्यायसंस्था' हा देश, राज्य वा संस्था यामधील अविभाज्य घटक असून, स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या न्यायसंस्थेला अधिकारही अधिक आहेत. कायद्याचे ज्ञान, नि:स्वार्थी, नि:स्पृह न्यायाधीश असतील तर न्यायदान अधिक चांगल्या पद्धतीने होईल. वकील व न्यायाधीश हे दोघेही न्यायव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक असून, न्यायसंस्था टिकविणे त्यांची सामूहिक जबाबदारी असल्याचे ढवळे यांनी स्पष्ट केले.

न्यायाधीशांनी आपली प्रतिमा जपण्याबरोबरच समोर येणारे पुरावे व कायदा यानुसार न्यायदान करणे गरजेचे आहे. न्यायिक मार्गदर्शन केंद्रामध्ये न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्या वकिलांना कायद्याच्या ज्ञानाबरोबरच गुण व संस्कारही देणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत वकिलांची कामाची पद्धती, व्यवसायिक नीतिमूल्यांचे उल्लंघन यामुळे त्यांचा समाजातील दर्जा घसरत चालला असून, त्यांनी आपली प्रतिष्ठा जोपासणे आवश्यक असल्याचे ढवळे म्हणाले. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल तसेच नाशिक बार असोसिएशन यांच्यातर्फे न्यायाधीशपदाच्या परीक्षेत उर्त्तीर्ण झालेले अ‍ॅड. सुरेखा कदम-मोरे, अ‍ॅड. वसिम शेख, अ‍ॅड. विशाल धोंडगे, अ‍ॅड. पंडित देवरे, अ‍ॅड. विशाल देशमुख, अ‍ॅड. जाहेद इनामदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत कानिटकर, सुधाकर आव्हाड, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे, अ‍ॅड. प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी प्रास्ताविक केले. गत तीन वर्षांपासून न्यायिक सेवा मार्गदर्शन उपक्रम सुरू असून, या मार्गदर्शन केंद्रातील सुमारे सव्वाशे अ‍ॅडव्होकेट न्यायाधीशपदाची परीक्षा पास झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथिंचे स्वागत अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. सुरेश निफाडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजीपाला दरात वाढ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणीटंचाईची झळ बसू लागल्याने भाजीपाल्याच्या दर्जा तसेच दरावर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. मिरचीच्या दरातील तेजी कायम असून पालेभाज्याचे दरही चढेच आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट वाढले आहे.

सुरुवातीला अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे नुकसान केले. आता पाणीटंचाईची सर्वाधिक झळ भाजीपाल्यांना बसत आहे. यामुळे आवक व दर्जावर परिणाम झाला आहे. टोमॅटो वगळता इतर सर्व भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापासून वाढले आहेत. कोबी व फ्लॉवरची आवक चांगली होत असली तरी दर गत आठवड्यापासून स्थिरावले आहेत. मेथी व को‌थिंबीरचे दर मात्र वाढले आहेत. कारले, गिलके, दोडके यांची आवक व दर स्थिर आहेत. मिरचीचे तेजी कायम राखली आहे. गेल्या दीड महिन्यापासून मिरचीचे दर साठ रुपये किलोवर स्थिर झाले आहेत. आगामी काळात पाणीटंचाईची झळ पहाता भाजीपाल्याचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

टरबुजांची वाढली आवक

शहरात टरबूज व खरबुजांची आवक वाढली आहे. यामुळे दरही कमी झाले आहेत. पाच रुपयांपासून ६० रुपये नगप्रमाणे टरबूज मिळत आहे. यामुळे यंदा नाशिककरांना संत्री, पपई पाठोपाठ टरबूज खाण्याचा मनसोक्त आनंद घेता येत आहे. यंदा पाणीटंचाईची झळ अधिक भेडसावत असली तरी फळांची आवक मात्र वाढतीच राहिली. संत्री, पपई या फळांची यंदा सर्वाधिक आवक झाली. आता टरबुजांचीही आवक खूपच वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी टरबूज विक्रेते नजरेस पडत आहेत. यामुळे दरावर परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात लालेलाल टरबुजांवर नाशिककर ताव मारत आहेत.






मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तसेच काही फोटो प्रसारीत करण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीविरोधात पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीष चंद्रकांत कदम, असे संशयिताचे नाव आहे.

होलाराम कॉलनी परिसरातील कस्तुरबा नगर येथे राहणाऱ्या कदमने नाशिकरोड परिसरातील २९ वर्षीय विवाहितेला वेळावेळी धमकी देत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. यास विरोध केला असता पीडित विवाहितेच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी कदमने दिली. २८ जानेवारी २०१५ ते २३ जानेवारी २०१६ या कालावधीत हा प्रकार घडला. संशयिताने पीडित महिलेचे काही फोटोग्राफ्स काढले होते. हे फोटोग्राफ्स सार्वजनिक करण्याची धमकी संशयिताने दिल्याचे पीडित विवाहितेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तरुणीचा विनयभंग

कपडे वाळत घालणाऱ्या तरुणीचे छेड काढून तिचा विनयभंग केल्याची घटना नाशिकरोड परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी गोरवाडी परिसरातील अमित खिर या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी कपडे वाळत घालत होती. त्यावेळी संशयिताने अश्लील हावभाव केले. या गोष्टीचा जाब विचारला असता खिरने तिचा विनयभंग करून दम दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांसविक्रीचे सत्र थांबता थांबेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक / इंदिरानगर

मालेगावहून नाशिकमार्गे मुंबईकडे घेऊन जाणारे गो मांसचा ट्रक विल्होळी जकात नाका येथे अंबड पोलिसांनी पकडला. गेल्या आठवड्यातच रस्त्यावर मांस टाकण्याचा प्रकार घडल्यानंतर पुन्हा असा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गाडीसह चालक व अन्य एकास ताब्यात घेतले आहे.

परिसरातील प्राणीमित्रांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मालेगाव येथून एक पिकअप गाडी गो मांस घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार या प्राणीमित्रांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी विल्होळी येथून जाणाऱ्या (एम. एच.४१ जी.१२२९) या गाडीस अडविले. गाडीत काय आहे असे विचारातच त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. गाडीची तपासणी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणावर मांस आढळून आले. यावेळी पोलिसांनी गाडीसह संशयित म्हणून शेख याकूब आयूब (वय २६) रा. पवारवाडी मालेगाव व शेख वासिम सलीम (वय १९) मालेगाव यांना ताब्यात घेतले. मांसाचे परीक्षण करीत डॉ. संजय महाजन यांनी हे नमुने मुंबई कार्यालयात पाठवणार असल्याचे स्पष्ट केले. जर हे गो मांसच असेल तर संशयितांवर गोमासाची अवैध वाहतूक करणे व गोवंश हत्या बंद कायद्याचे उल्लंघन करणे अशे कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येऊ शकतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अशी होते वाहतूक

मांस घेऊन जाणाऱ्या गाडीची रचना अशा पद्धतीत करण्यात आली आहे, की त्या गाडीच्या मागील बाजूस पत्र्याचा हौद तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पाणी आणि बर्फ यामध्ये हे मांस ठेवण्यात आले होते. यामुळे गाडीतून वाहतूक करताना दुर्गंधी पसरणार नाही व कोणालाही यातून मांस घेऊन जात असल्याचा संशय येणार नाही. याची दक्षता घेण्यात आली होती.



कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका कत्तलीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाच गोरे व दोन गायींची भद्रकाली पोलिसांनी मुक्तता केली. या प्रकरणी चौकमंडई येथे राहणाऱ्या आदम कचरूभाई शेख या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठा राजवाडा येथील कसाईवाडा येथे काही जनावरे कत्तलीसाठी आणली असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना समजली होती. त्यानुसार, सहायक पोलिस निरीक्षक​ विलास शेळके व त्यांच्या पथकाने रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास छापा मारून पाचा गोरे व दोन गायींची सुटका केली. या प्रकरणी संशयित आरोपी शेख विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरण आटले जलसंकट दाटले !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणे तळ गाठत असून, पुढील महिन्यापासूनच पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील चार धरणं कोरडी पडली आहेत. तर अन्य पाच धरणांमधील पाणीसाठाही १० टक्क्यांच्या खाली गेला आहे. येत्या १५ दिवसांत या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठाही शुन्यावर जाण्याची शक्यता असून जलसंकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

नाशिक जिल्ह्यात २३ धरणे आहेत. त्यापैकी सात धरणे मोठी असून १६ धरणे मध्यम आकाराची आहे. ६६ हजार १६१ दशलक्ष घनफुट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता आहे. मान्सुनने यंदा जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने बहुतांश धरणे पूर्ण भरू शकलेली नाहीत. अनेक धरणे ५० टक्क्यांहूनही कमी भरली. अशा परिस्थितीतही प्रशासनाने जिल्हावासियांना पाणी वाटपाचे नियोजन केले. परंतु जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. आजमितीस गंगापूर धरणामध्ये ३० टक्के एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा तो निम्म्याहून अधिक कमी झाल्याने पाणी वापराबाबत काटकसरीचे धोरण अवलंबिल्याशिवाय गत्यंतर राह‌िलेले नाही. गतवर्षी याच कालावधीत गंगापूर धरणामध्ये ६७ टक्के पाणीसाठा होता. तर गंगापूर धरण समूहामध्ये ५६ टक्के पाणीसाठा होता. यंदा समुहात २४ टक्केच पाणी आहे. त्यातही गंगापूर धरण समुहातील गौतमी गोदावरी धरणातील पाणीसाठा शुन्यावर पोहोचला आहे. पालखेड धरण समुहातही गतवर्षी २७ टक्के पाणी साठा होता. तो यंदा २० टक्क्यांवर आला आहे. नांदुरमध्यमेवर बंधारा कोरडा पडला आहे. २० हजार २३१ दशलक्ष घनफूट एवढी या समुहाची पाणी साठवण क्षमता असली तरी आजमितीस तीन हजार ९५५ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे.

गिरणा खोऱ्यात पाणीसाठा कमालीचा खाली गेला आहे. २४ हजार ७५३ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या गिरणा समुहामध्ये अवघा २९२९ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. एकूण पाणीसाठ्याच्या नऊ टक्के एवढा अत्यल्प हा पाणीसाठा आहे. त्यातही गिरणा आणि नागासाक्या या धरणांमध्ये पाण्याने तळ गाठला आहे. तेथे शून्य टक्के पाणी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील मोठ्या धरणांची पाणी साठवण क्षमता ४८ हजार २९१ दशलक्ष घनफूट आहे. तर मध्यम आकाराच्या १६ प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता १७ हजार ७८० दशलक्ष घनफूट आहे. ६६ हजार १६१ दशलक्ष घनफूट पाणी साठवणीची क्षमता असली तरी सध्या केवळ १७ टक्के म्हणजेच ११ हजार १०९ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे.

पाच धरणांमध्ये १० टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील चार धरणांमध्ये १० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पालखेड धरणात अवघा चार टक्के म्हणजेच २८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. तिसगाव धरणात १० टक्के (४५ दशलक्ष घनफूट), मुकणे धरणात पाच टक्के (३८२ दलघफूट) आणि भोजापूर धरणात चार टक्के (१३ दलघफूट) पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च अखेरीस तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने ही पाणीपातळी येत्या काही दिवसांत अधिक खालवण्याची शक्यता आहे.

धरण पाणीसाठा टक्केवारी पाणीसाठा टक्केवारी

(वर्ष २०१५) (वर्ष २०१६)

गंगापुर ६७ ३०

काश्यपी ५८ ३०

गौतमी गोदावरी २३ ०

पालखेड ७ ४

करंजवण ३४ ३०

वाघाड २७ १२

ओझरखेड ३८ ३१

पुणेगाव ४१ २०

तिसगाव १७ ०

दारणा ३३ ३३

भावली १७ २१

मुकणे २७ ५

वालदेवी १६ २७

आळंदी ५३ ३८

पुनद ६१ ५३

नागासाक्या ४ ०

गिरणा १७ ०

धरण समूह वर्ष २०१५ वर्ष २०१६

गंगापूर ५६ २४

पालखेड २७ २०

गिरणा ३१ १७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आज महामोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक केंद्र सरकराने १ मार्चपासून सराफ सुवर्णकार व्यावसायिकांवर १ टक्का अबकारी कर लावल्याच्या निषेधार्थ आज बुधवार रोजी नाशिक जिल्हा सराफ सुवर्णकार संघटना व नाशिक सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्णकार सराफांच्या आंदोलनाचा आजचा तिसावा दिवस आहे. संपूर्ण भारतातील सुवर्ण सराफ व्यावसायिकांनी तीस दिवसापासून बंद पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला सकाळी १० वाजता बी. डी. भालेकर मैदानापासून सुरुवात होणार असून, त्याची सांगता सराफ बाजारात होणार आहे. या महामोर्चात नाशिक जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार, त्यांचे कुटुंबीय व कारागिर सहभागी होणार आहेत. मोर्चा बी. डी. भालेकर मैदानातून सुरू होणार असून, त्यानंतर, शालीमार, परशुराम साईखेडकर नाट्यगृह, महाबळ चौक, महात्मा गांधी मार्ग, मेहेर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येणार आहे. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर सीबीएस शिवाजी रोड, जुने सिव्हील हॉस्पिटल, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉईंट, बोहरपट्टी मार्गे सराफ बाजारात पोहचणार आहे. येथे जाहीर सभा होणार असून, राज्यातील मान्यवर या सभेला संबोधित करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंग लावण्याच्या कारणावरून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

युवतीला रंग का लावला, या वादातून एका संशयिताने युवकावर तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना कुंभारवाडा परिसरात घडली. सोमवारी, रंगपंचमी खेळत असताना काझीची गढी परिसरातील कुंभारवाडा येथे संतोष राज बल्की खेताडे (वय ३४) व त्याच्या भावाने परिसरातील एका युवतीस रंग लावल्याची कुरापत डिंगर अळी येथील संशयित संजय भीमराव गोतरणे याने काढून वाद घातला. तसेच, तलवारीने वार करून जखमी केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित गोतरणे यास अटक केली.

खंडणीखोरास अटक

मद्यप्राशन करून हॉटेल चालकाकडे खंडणी मागणाऱ्या संशयितास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. सचिन अशोक माईंदकर (वय २१) असे या संशयिताचे नाव आहे. तिडके कॉलनी परिसरात राहणारा संशयित रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास कॅनडा कॉर्नरवरील गोल्डन चॅरेट हॉटेल येथे गेला होता. तेथे त्याने हॉटेल चालकाकडे फुकट मद्य मागितले. तसेच, १ हजार २०० रुपये खंडणी देखील मागितली. हॉटेलचालकाने त्यास विरोध केल्याने संशयिताने बियरची बाटली फोडून वेटरला मारहाण केली. तसेच, बारची तोडफोड करण्याची धमकी दिली.

चेन स्नॅचिंग

गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिराजवळ वाहनात बसलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून नेली. गंगापूर गाव येथील किर्ती रतन गोधडे या पतीसोबत वाहनात बसलेल्या होत्या. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी गोधडे यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल लंपास

महात्मानगर परिसरातून दुचाकीच्या डिक्कीतून मोबाइल आणि रोकड चोरून नेल्याची घटना घडली. एबीबी सर्कल परिसरात राहणाऱ्या सुमीता अजय यादव (वय ४०) या सोमवारी महात्मानगर परिसरातील गणपती मंदिराजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने आल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून मोबाइल, नऊ हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असा १९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

तीन गायींची सुटका

गंगापूररोड : मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुंगसरा गावातून तीन गायी व दोन गोऱ्हे घेऊन जाणाऱ्या वाहनाला माहितीच्या आधारे गंगापूर पोलिसांनी आनंदवलीत ताब्यात घेतले. यावेळी गायींची बेकायदा वाहतूक करीत असल्याचे निर्दशनास आले. विकास गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी वाहनचालक वालिद शेख व अलबीर शेख या दोन ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अबकारी’चा जाच नको, हवी सुस्पष्टता!

$
0
0

सरकारची आश्वासने फसवी

एक्साइज ड्यूटी ही जो व्यक्ती वस्तू उत्पादीत करतो त्यावर लावली जाते. आम्ही उत्पादक नाही ही गोष्ट प्रामुख्याने सरकारने विचारात घेतली पाहिजे. प्रत्येक व्यापाऱ्याला विक्रीसाठी आलेल्या वस्तू, दुरुस्तीच्या वस्तू व स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू असा वेगवेगळा स्टॉक ठेवावा लागणार आहे. सरकार व्यापाऱ्यांना जी आश्वासने देत आहे ती अत्यंत फसवी आहेत. तीन प्रकारचे रेकॉर्ड ठेवणे अव्यवहार्य आहे. सन १९६३ मध्ये जो सुवर्ण कायदा अमलात आणला होता त्याची पुनरावृत्ती करण्याचे काम हे सरकार करीत आहे. हा कायदा व्यावसायिकांना किती मारक आहे हे सराकरला समजण्यासाठी तीस वर्ष घालवावी लागली. सन १९६३ चा कायदा १९९० मध्ये रद्द करण्यात आला. सरकारने दोन लाखाच्या खरेदीवर पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. आज ८४ टक्के लोकांकडे पॅनकार्ड नाहीत. ही सरकारची आकडेवारी आहे. भारत सरकारला सर्वात जास्त आयात कर हा सोन्यापासून मिळतो तरीही सरकार याच व्यावसायाला बुडवू पहात आहे.

- गिरीष टकले, सराफ व्यावसायिक

व्यापाऱ्यांची अडवणूक थांबणार

केंद्र सरकारने लावलेला अबकारी कर दोन प्रकारे अंमलात आणण्यात येणार आहे. सहा टक्के आणि साडेबारा टक्के असे दोन पर्याय व्यापाऱ्यांसाठी खुले केले आहेत. या पर्यायांमध्ये खात्याकडून कोणत्याही प्रकारची अडवणूक केली जाणार नाही. कोणत्याही अधिकाऱ्याची दुकानात व्ही‌जिट होणार नाही वा दुकानात असलेल्या मालाची तपासणी करणार नाही, अशी यात तजवीज आहे. तुमच्या चार्टड अकाउंटंटने दिलेल्या विवरणानुसारच कर आकारणी केली जाणार आहे. यात रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑनलाइन सुविधा करण्यात दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी ऑफीसमध्ये येण्याची गरज नाही. याचे रिटर्न घरातून भरता योणार आहे.

- किशोर कुलकर्णी, सहायक आयुक्त, अबकारी कर विभाग



हस्तकला संपवण्याचे काम

हस्तकला हा भारतीयांचा आत्मा आहे. तो संपवण्याचे काम या सरकारकडून होत आहे. एकीकडे अच्छे दिनचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे लहान व्यावसायिकांना संपवायचे हे सरकारचे धोरण आहे. एक वस्तू तयार होताना अनेक कारागिरांच्या हाता खालून जाते. त्यामुळे प्रत्येकाला याची नोंद ठेवावी लागणार आहे. धंदा कारायचा की कारकुनी करायची हा मोठा प्रश्न आहे. सुवर्ण कारागिरी हा कुटीरोद्योग व्हावा, ही गेल्या ४० वर्षांपासूनची मागणी आहे. ती करणे तर दूरच उलट व्यावसायिकांना छळण्याचे काम करीत आहेत. ग्राहकाने पाच ग्रॅम सोने दिले, त्यात सोनाराने दोन ग्रॅम भर टाकून दागिना तयार केला तर ग्रहकाला सात ग्रॅम सोन्यावर एक्साईज ड्युटी भरावी लागणार आहे.

- राजेंद्र दिंडोरकर, सराफ व्यावसायिक

सरकारने आम्हाला फसवले

संपूर्ण सोनार समाज रसातळाला जात असताना तो नेस्तनाबूत करण्याचे काम या सरकारकडून होत आहे. चार वेळा या कायद्याला विरोध केला तेच सरकार हा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी धडपडत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, त्याचप्रमाणे सराफ व्यावसायिकांना देखील आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत १० ते १२ व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. मशिनवर तयार होणाऱ्या वस्तूला अबकारी कर लावला जातो, मात्र हे सरकार हस्तकलेला संपवू पहात आहे. या कायद्यामुळे छोटे व्यावसायिक संपणार असून, देशोधडीला लागणार आहेत. सुवर्ण नियंत्रण कायद्याच्या वेळी १०९ लोकांचे प्राण गेले, त्याप्रमाणे जीव जाण्याची सरकार वाट पहात आहे, असे वाटते. एकीकडे सरकार मेक इन इंडियाची घोषणा करते त्यांच्याच घोषणेला सुरुंग लावण्याचे काम केले जात आहे. या सरकारचे प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे.

- राजेंद्र ओढेकर, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक


अधिकारी कारखान्यात जाणार नाही

दिल्लीतील काही सराफ व्यावसायिकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. तुमच्या दुकानात कुणी अधिकारी आला, तर तुम्हाला जाब विचारता येणार आहे. हायर अॅथोरिटी सांगत नाही तोपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याला दुकानात येता येणार नाही. रजिस्ट्रेशनसाठी पाच मे ही तारीख दिली आहे. आज तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रियल एरियात जाऊन एक्साईज डिपार्टमेंटचा त्रास होतो का? असे विचारले, तर आम्हाला अधिकारी देखील माहीत नाही, असे उत्तर मिळेल. आमचा कोणताही अधिकारी कारखान्यात जात नाही. या कायद्यात सर्चिंग हा विषय असणार नाही. कुणावरही कारवाई होणार नाही.

- एच. पी. शर्मा, अधीक्षक, अबकारी कर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेचा ‘दे धक्का’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीस एक वर्ष बाकी असतांना नाशिकमध्ये पक्षांतराला जोरात सुरूवात झाली आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेला मंगळवारी जोरदार झटका दिला. आपल्याच एका बंडखोरासह तिघा नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक व नगरसेवक विनायक खैरे, मनसेच्या रत्नमाला राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या डी. जी. सूर्यवंशीही स्वगृही परतले आहेत. दरम्यान, शिवसेनेत सुरू झालेल्या इनकमिंगमुळे पक्षात मोठी नाराजी सुरू झाली असून आतापर्यंत पक्षासाठी सतरंज्या उचलणाऱ्यांचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गेल्या महिन्यात शिवसेनेने मनसेचे माजी महापौर अॅड. यतीन वाघ, रमेश धोंगडे यांच्यासह अरविंद शेळके यांनी प्रवेश केला होता. त्यामुळे मनसेत भूकंप आल्याच्या चर्चा थांबण्यापूर्वीच शिवसेनेने नगरसेवक फोडाफाडीचा पार्ट टू मंगळवारी सादर केला. भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले विनायक खैरे हे 'राष्ट्रवादी'त अडगळीत पडले होते. मनसेच्या नगरसेविका रत्नमाला राणे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले सूर्यवंशी स्वगृही परतले. जुन्या नाशिकमध्ये शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने खैरे यांना शिवसेनेने प्रवेश दिला.

गजानन शेलारांची तक्रार

शहरात या तीन नगरसेवकांसोबतच राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलार यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा सोशल मीडियात मंगळवारी रंगली. परंतु, शेलार यांनी शिवसेना प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावत उलट सोशल मीडिया विरोधात त्यांनी भद्रकाली पोलीसा तक्रार दाखल केली. आपल्या बदनामीसाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. आपण बहुजन विचाराचे असून राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच नाही. जो कोणी असे करत असेल त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

आयात उमेदवारांवर शिवसेनेची भिस्त आहे. मनसेकडे सक्षम कार्यकर्ते आहेत. काही गद्दार गेले तरी त्याचा पक्षावर फारसा फरक पडत नाही. गद्दारांचे काय होते हे विभागीय आयुक्तांच्या निर्णयाने सिद्ध झाले आहे.

- राहुल ढिकले, शहराध्यक्ष, मनसे

मनसेचा जन्मच शिवसेनेतून झाला आहे. मनसेला शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. भ्रमनिरास झाल्याने नगरसेवक आमच्याकडे येत आहेत. कमकुवत आहोत तेथेच प्रवेश दिले जात आहेत. - अजय बोरस्ते, महानगर प्रमुख, शिवसेना

दीपाली कुलकर्णी भाजपच्या वाटेवर

इंदिरानगर : मनसेच्या डॉ. दीपाली कुलकर्णी यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला असून येत्या २ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी त्यांची मंगळवारी चर्चा झाली. यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला. डॉ. दीपाली आणि त्यांचे पती सचिन कुलकर्णी भाजपात सक्रीय होते. गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेत प्रवेश केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणकर्त्यांपुढे विद्यापीठाचे दबावतंत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मुक्त विद्यापीठात सलग सहा वर्षांपासून सहाय्यक या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी अन्यायाच्या भावनेनंतर अखेर सोमवारी उपोषणाचे शस्त्र उपसले. मात्र, या कर्मचाऱ्यांनी उपोषणाची भूमिका घेताच गत आठवड्यात संवाद साधण्यास तयारही नसणारे विद्यापीठ प्रशासन छुप्या पध्दतीने दबावतंत्राचा वापर करू लागले आहे. यानंतरही उपोषणकर्त्यांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली आहे. विद्यापीठासमोर उपोषणाला बसलेल्या महिला कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी विद्यापीठाने स्वच्छतागृहाचा उपयोग करू दिला नाही. त्यासाठी उपोषणकर्त्यांना प्रशासनाचा पाठपुरा करून परवानगी घ्यावी लागली. उपोषणकर्ते कर्मचारी जेथे उपोषणासाठी मुक्कामी आहेत तेथे विद्यापीठाने सीसीटीव्ही कॅमेरे जाणीवपूर्वक वळते केले आहे. परिणामी, उपोषण मंडपातील महिला कर्मचाऱ्यांच्या खाजगी जीवनावर कॅमेऱ्यांचे अतिक्रमण विद्यापठाच्या या दबावतंत्राने होत असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर विद्यापीठाने कर्मचाऱ्यांशी कुठलाही समन्वय साधला नाही. यामळे पूर्वनियोजित इशाऱ्यानुसार हे सर्व कर्मचारी सोमवारी विद्यापीठाच्या प्रवेशव्दारासमोर उपोषणाला बसले आहेत. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यासंबंधी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनावर नामदेव टर्ले, भूषण चव्हाण, मयुरेश साळुंके, प्रशांत अडांगळ, दिगंबर गाडे , उज्ज्वला डुंबरे, अंकुश गोधडे, संध्या दुर्गावाड, स्वाती चौधरी, शेखर जगताप आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामायनी एक्स्प्रेस बॉम्ब अफवेने लेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सायंकाळी मुंबईला जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यामुळे पोलिसांनी मनमाड आणि नाशिकरोडला गाडीची कसून तपासणी केली. त्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे गाडीला सव्वातास उशीर झाला.

मंगळवारी रेल्वेस्थानक परिसरात जिलेटीन आणि डिटोनेटर जप्त करण्यात आले होते. त्यामुळे कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन रेल्वेला येताच पोलिसांनी घटना गांभीर्याने घेतली. ही गाडी मनमाड येथे थांबवून अर्धा तास बाम्बशोधक पथकाने तपासणी केली. नाशिकरोडला गाडी साडेसातला पोहचताच पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे, जुबेर पठाण, बॉम्ब शोधक पथकाचे विजय वाघ, मिलिंद तेलोरे, ए. पी. चव्हाण, वसंत पाळदे, गौरव वर्मा, आर. के. सिंग, जब्बार खान, विनोद सुरळकर आदींनी कसून तपासणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी एक्स्प्रेस व्हावी आदर्श ट्रेन!

$
0
0

पंचवटी एक्स्प्रेसमधील सी-३ आदर्श कोचचा नववा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. लिम्बा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सलग तीन वेळा या कोचची नोंद झाली आहे. आमदार जयंत जाधव, रेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी, गुरुमितसिंग रावत, व्ही. जे. आर्य, कमलेश बाफना, निशीकांत मुळे, प्रिया तुळजापूरकर, मिलिंद कुंभेजकर, अशोक हुंडेकरी, अभिजित रानडे आदी उपस्थित होते. आमदार जयंत जाधव म्हणाले, की पुढील पिढ्यांसाठी नाशिकची प्रगती होणे आवश्यक आहे. पंचवटीतील हा कोच आदर्श झाला तशी आपली सोसायटी, कॉलनी, गल्ली आदर्श ठेवण्याचा संकल्प सोडू या. आपले शहर आदर्श करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.

आदर्श कोच का? पंचवटी एक्स्प्रेस कोचमधील प्रवाशी रेल परिषदेच्या नियमांचे पालन करतात. स्वच्छता व शांतता पाळणे, इगतपुरी गेल्यानंतर कोचमधील मोबाइल बंद ठेवणे, इतर प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, खाद्य व अन्य विक्रेत्यांना कोचमध्ये बंदी आदी गोष्टींमुळे हा वातानुकुलित कोच आठ वर्षांपासून आदर्श म्हणून ओळखला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देसाई स्मृती ब्रिज स्पर्धेस सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राष्ट्रीय ब्रिज खेळाडू दिवंगत प्रशांत देसाई यांच्या स्मरणार्थ नाशिक जिल्हा ब्रिज संघटना आणि मित्राविहार क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत राज्यातील ३२ संघ व २०० खेळाडू सहभागी झाले आहेत. गुप्ता गार्डन येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उदघाटन व्ही. एम. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मित्राविहार क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर हे होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अतुल दशपुत्रे, स्पर्धा सचिव सूर्या रेड्डी, डॉ. प्रशांत पुरंदरे, डॉ. भालचंद्र कुलकर्णी, डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, प्रफुल्ल शाह, सुनील पत्की, भास्कर अहिरराव, रमेश तलाज‌िया, मोहन उकीडवे, बाबुराव वाघ, स्पर्धा संचालक भालचंद्र दक्षिणदास आदी उपस्थित होते. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुनील माचर संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल पाध्ये, अजय खरे, राजू तोलानी, सुनील माचर यांचा समवेश आहे, तर मुंबईच्याच राधेय संघात व्ही. एम. लाल, भिवणकर, आर. श्रीधरन, सुभाष ढाकरे या नावाजलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. त्याचप्रमाणे डॉ. वहाल‌िया हे ८५ वर्षांचे वयोवृद्ध खेळाडू नाशिकच्या संघाकडून प्रतिनिधित्व करत आहेत, तर महिलांमध्ये सुनंदा रानडे या ७७ वर्षांच्या महिलादेखील सहभागी झाल्या आहेत. दिवंगत प्रशांत देसाई हे मित्राविहार क्लबचे राष्ट्रीय खेळाडू होते. त्यांनी अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची चुणूक दाखवून क्लबचे नाव उंचावले होते. त्यांचा नाशिक येथील ब्रिज स्पर्धा आयोजनात मोठ्या प्रमाणात सहभाग असायचा. त्यामुळे त्यांच्या स्मृती कायम राहण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. अतुल दशपुत्रे यांनी प्रास्तविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन हेमंत पांडे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जहांगीर इराणी, माधव दीक्षित, दिलीप गोसावी, संजय विसपुते, इसाक राजे, चंद्रकांत बापट, शरद टाकणे, शिरीष अलूरकर, अशोक कोल्हटकर, कर्नल एस. सी. कोहली, टी. के. पडवळ, मुकुंद खाडिलकर आदी परिश्रम घेत आहेत. स्पर्धेच्या सात फेऱ्यांनंतर पहिले पाच संघ व यजमान नाशिकचा एक असे एकूण सात संघ पात्रता फेरीत प्रवेश करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना चषक कुस्ती स्पर्धेचा विवेक नायकल विजेता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शिवसेनेच्या वतीने येवला शहरात रविवारी सायंकाळी शिवसेना चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोकमठाण येथील जंगली महाराज कुस्ती केंद्राचा मल्ल विवेक नायकल हा या कुस्ती दंगलीत विजेता ठरला. त्याला चांदीची गदा व रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले. औरंगाबाद, नगर, जळगाव आदी जिल्ह्यांतील मल्लांचा या स्पर्धेत सहभाग होता. येवला शहर व तालुका शिवसेनच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शनिवारी शहरातून शानदार मिरवणूक काढली गेल्यानंतर रविवारी सायंकाळी 'शिवसेना चषक'कुस्त्यांची दंगल पार पडली. शहरातील स्वर्गीय भाऊलाल पैलवान लोणारी क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने मल्ल सहभागी झाले होते. साडेतीन तासांच्या वर रंगलेल्या या दंगलीतील अनेक कुस्त्यांमध्ये मल्लांकडून प्रेक्षणीय डाव-प्रतिडाव टाकले जात होते. त्याला उपस्थित कुस्तीशौकिनांकडून क्षणोक्षणी दाद मिळत होती. उदयोन्मुख लहान मल्लांपासुन ते नामांकित मोठ्या मल्लांपर्यंत या कुस्त्यांमध्ये सहभागी झाल्याने येवलेकरांनी कुस्त्यांची पर्वणी साधली. शिवसेना चषकासाठी झालेल्या अटी-तटीच्या अंतिम कुस्तीत कोकमठाण येथील जंगली महाराज कुस्ती केंद्राचा मल्ल विवेक नायकल याने भगूरच्या रमेश कुकडे याच्यावर विजय मिळवला. दुसऱ्या एका महत्वाच्या कुस्तीत येवल्याचा युवा मल्ल रोहन लोणारी याने प्रेक्षणीय घिस्सा डावावर आपला प्रतिस्पर्धी नगरच्या श्याम मार्तंड यास चीतपट केले. शिवसेना चषकाचा मानकरी ठरलेल्या विवेक नायकल यास माजी आमदार संजय पवार, पोल‌िस निरीक्षक दीपककुमार वाघमारे व इतर मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा व रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते मल्ल्लांचे आराध्य दैवत महाबली हनुमान प्रतिमा तसेच लाल मातीच्या आखाडा पूजनाने कुस्त्यांना प्रारंभ झाला. मान्यवरांची स्पर्धेस उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेट बुकींची ‘विकेट’

$
0
0

याबाबत माहिती देताना सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी सांगितले, की सध्या 'टी ट्वेन्टी'वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा सुरू असून रोमहर्षक सामन्यांमुळे शहरात काही सट्टेबाज कार्यरत झाल्याची माहिती समोर आली आहे. फोनद्वारे होणाऱ्या या जुगारात प्रत्येक चेंडूनंतर सट्टा लावण्यात येतो. या पार्श्वभूमीवर सर्वच सामन्यांच्या काळात पोलिस सतर्क राहत असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. नुकत्याच पार पडलेल्या भारत ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी शहर पोलिसांनी गंगापूर आणि आडगाव परिसरात छापे मारून पाच संशयितांना अटक केली. यात एका महिलेचाही समावेश आहे. गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर काळे, पीएसआय, विजय पवार, कॉन्स्टेबल फैयाज सैयद, कर्मचारी नितीन नेटारे, बाळू जाधव यांनी ही कारवाई केली.

नाशिक-पुणे हायवेवरील डीजीपीनगर एक परिसरातील टागोरनगर येथील उत्सव बंगला येथून मोठ्या प्रमाणावर फोन कॉल्स होत असून तेथे भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यावर बेटींग सुरू असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून खेमचंद छत्ताराम रमणानी या मुख्य संशयितासह पद्मा खेमचंद रमणानी, सौरभ शशिकांत माथूर आणि मनीष मनोज सेन यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी २७ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास छापा मारला. याठिकाणाहून १७ मोबाइल आणि एक लॅपटॉप असा ७१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, याच सामन्यावेळी आडगाव पोलिसांनी बेटींग घेणाऱ्या सतनाम दिलीपसिंग राजपूत (२७) या युवकास रंगेहाथ पकडले. आडगाव शिवारातील बळीराजनगर येथील रेखाराणी व्हिला येथे राहणाऱ्या राजपूतकडून आडगाव पोलिसांनी इनोव्हा कार (एमएच १५ सीडी ०२३२), एक लॅपटॉप, आठ मोबाइल आणि ३२ इंच एलईडी टीव्ही असा तीन लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हवालदार सपकाळ यांनी​ दिलेल्या फिर्यादीनुसार, जुगार प्रतिबंधक कायदा ४ व ५ प्रमाणे आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पीएसआय बाकले करीत आहे. दरम्यान, वर्ल्डकप सामने सुरू झाल्यापासून सातत्याने बुकींना अटक होत असून आजवर पोलिसांनी पाच यशस्वी छापे मारले आहेत.

कडक उपाययोजना मोबाइलच्या सहज उपलब्धतेचा फायदा सट्टेबाजांना होत आहे. अनेकदा हे सट्टेबाज जागा बदलतात. त्यांचे ग्राहक नेहमीचेच असल्याने ठिकाण गौण ठरते. यापूर्वी परजिल्ह्यातील काही बुकींना शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या बुकीचे ग्राहक अर्थातच परजिल्ह्यातील होते. या पार्श्वभूमीवर उर्वरित सामन्यांसाठी पोलिसांनी कडक उपाययोजना राबविण्याचे ठरविले आहे.

वर्ल्डकपच नव्हे तर कोणत्याही स्पर्धे दरम्यान बेटींग लावणे किंवा स्वीकारणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यापूर्वी अटक केलेल्या संशयितांच्या माहितीच्या आधारे बेटींग लावणाऱ्या ग्राहकांचा शोध घेण्यात येईल. पुढील सामन्यांवेळी बुकींच्या हालचालीकडे आमचे अधिक लक्ष असेल. - राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोडला रोखली रेल्वे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड सरकारने लावलेला अबकारी कर रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी गेला महिनाभर आंदोलन करीत असलेल्या सराफांनी मंगळवारी नाशिकरोड स्थानकात रेलरोको आंदोलन केले. केंद्र सरकारने सराफी व्यवसायावर अबकारी लद लादल्याच्या निषेधार्थ सकाळी मुंबई-भुसावळ गाडी अडवून रेलेरोको करण्यात आला. सराफांनी केंद्र सरकारच्या व अर्थमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सराफ असोसिएशनच्या जिंदाबादाने रेल्वेस्थानक दणाणून सोडले. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे, अशोक भगत, लोहमार्गचे निरीक्षक चंद्रशेखर भाबल, आरपीएफचे जब्बार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे झालेल्या या आंदोलनात असोसिएशनचे गिरीष टकले, मिलिंद दंडे, राजेंद्र ओढेकर, गिरीष नवसे, योगेश महालकर, सागर कुलथे, अक्षय मंडलिक, कन्हैय्या आडगावकर, राहुल महाले, राजेंद्र दिंडोरकर, योगेश नागरे, राजेश चिंतामणी, सागर अष्टेकर, राजेंद्र कुलथे, सागर कुलथे, नितीन शहाणे, राजेंद्र कपोते, किरण कुलथे, सुनील मंडलिक, किरण बोराडे आदींसह जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध मागण्यांबाबत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी एकजूट काय असते, याचे दर्शन मंगळवारी नाशिककरांना घडविले. जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालतानाच सीबीएस परिसरातील ‍मुख्य रस्त्यांवर ठिय्या मांडून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलकांच्या या पवित्र्यामुळे वाहतुकीचा फज्जा उडाला. पोलिसांचीही चांगलीच धांदल उडाली.

राज्याच्या विविध भागांतून हजारो शेतकरी, महिला लहान मुलांसह नाशिकमध्ये दाखल झाले. अखिल भारतीय किसान सभेच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारकडून होणाऱ्या अन्यायाविरोधोत त्यांनी एल्गार पुकारला आहे. सत्याग्रह महामुक्काम मोर्चात सहभागी झालेले आंदोलक मंगळवारी दुपारपासून गोल्फ क्लब मैदानावर तळ ठोकून होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने त्र्यंबकरोडवर उतरले. खडकाळी, शालिमार अशा पारंपरिक मार्गाने मोर्चा घेऊन न जाता त्यांनी थेट वर्दळीच्या सीबीएस मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मार्गात केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मेहेर सिग्नलपासून त्र्यंबक नाक्यापर्यंत जेथे पहावे तेथे आंदोलकांचीच गर्दी होती.सायंकाळच्या वेळी हा मोर्चा काढण्यात आल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. अनपेक्षितपणे आंदोलकांनी सीबीएसच्या मुख्य चौकात ठाण मांडले. त्यामुळे चारही बाजूने शहराच्या विविध भागात जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या चौकातही राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कर्जमाफीची मागणी करण्यात आली. आंदोलक रस्त्यावरून हटण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी गंगापूर रोड, त्र्यंबकरोड, खडकाळी सिग्नल आणि राजीव गांधी भवनमार्गे वाहतूक वळविण्यात आली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलक नाशिक शहरातच थांबणार असल्याने ते मुक्कामाच्या तयारीनेच नाशिकमध्ये आले आहेत.

भुजबळ, पवार, तटकरेंचा पैसा गोळा करा

दीर्घकाळ मंत्रीपद भोगणारे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे यांनी भ्रष्ट मार्गाने कराडो रुपयांची मालमत्ता कमावली आहे. त्यांच्याजवळील पैसा वसूल करा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, बॅंकांचे कर्ज बुडवून परदेशात पळून जाणाऱ्या विजय मल्ल्याला भारतात परत आणा. त्याने पळविलेला सर्वसामान्यांचा पैसा वसूल करा, अशा मागण्या जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी केल्या.

आंदोलकांत कमालीचा सोशिकपणा...

महामुक्काम मोर्चासाठी उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि राज्यातील २७ जिल्ह्यांमधून हजारो शेतकरी कुटुंबीयांसह आले आहेत. गोल्फ क्लब मैदानासह त्र्यंबक रोडवर खासगी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. तळपत्या उन्हाची पर्वा न करता दुपारी बारापासून सायंकाळपर्यंत आंदोलक गोल्फ क्लब मैदानावर बसून होते.

शहरात वाहतुकीचा फज्जा...

हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाला. दुपारी चारच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार होता. मात्र तो सायंकाळी सातला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हा परिषद, खडकाळी सिग्नल, शालिमार, एम. जी. रोड, सीबीएस परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या पाण्यावर औरंगाबादचे ‘स्विमिंग’

$
0
0

mahesh.pathade@timesgroup.com

नाशिक : नाशिकमध्ये पाण्यावरुन रणकंदन सुरु असताना, नाशिकच्याच पाण्यावर औरंगाबादमधील तरणतलाव बिनदिक्कत सुरु असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. राज्यात पाणी टंचाई असल्याने तरण तलाव बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे पाणी कपातीचे चटके सहन करावे लागत असल्याने नाशिकमधील सर्व तरण तलाव बंद असून औरंगाबादमधील तलावांना लाड का पुरवले जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नाशिककरांनी व्यक्त केली आहे.

औरंगाबादसह जालना परिसराला पिण्यासाठी पाणी नाही म्हणून नाशिकच्या गंगापूर धरणातून ऑक्टोबरमध्ये जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. मराठवाड्याला पाणी दिल्याने नाशिककरांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे. आठवड्यातून एकदा पाणी कपात सहन केल्यानंतर आता आणखी एक किंवा दोन दिवस पाणीकपात होण्याची चिन्हे आहेत. गंगापूर धरणात सध्या मर्यादित साठा शिल्लक आहे. दरडोई १५० लिटर पाणी नाशिककरांना लागते. ही परिस्थिती पाहता हा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल अशी स्थिती नाही. त्यामुळेच नाशिक महापालिकेने पाणीकपात सुरू केली. टंचाईची ही झळ जलतरण तलावांनाही बसली. गेल्या महिन्यात केवळ एकच बॅच सुरू ठेवण्यात आली होती. काही दिवसांपासून आता त‌ीही बंद करण्यात आल्याने मनपाचे पाचही जलतरण तलाव बंद करण्यात आले. नाशिकचे सर्वच जलतरण तलाव बंद होण्याची ३२ वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र औरंगाबादमधील तरण तलाव मात्र सुरूच आहेत.

औरंगाबादमध्ये १२ तरण तलाव !

औरंगाबादमध्ये महापालिकेच्या दोन तरण तलावांसह १२ तरण तलाव आहेत. त्यापैकी महापालिकेचा एक तलाव पाच महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आला आहे. मात्र, एक तलाव अद्याप सुरू आहे. औरंगाबादमधील सर्वोत्तम तलावांपैकी एक असलेला एमजीएम संस्थेच्या तलावासह दहा खासगी तरण तलाव सुरू आहेत. राज्य सरकारचा जीआर आल्याने हे सर्व तलाव एक तारखेपासून बंद होतील, असे औरंगाबाद महापालिकेतर्फे सांगितले जात आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. एमजीएम संस्थेकडे स्वतःच्या विहिरी व बोअरवेल आहेत. त्यामुळे जलतरण तलाव सुरू करण्याइतपत औरंगाबादकडे पाणी असताना नाशिककरांना मात्र पाणीकपात सोसावी लागत आहे.

औरंगाबाद महापालिकेचे दोन जलतरण तलाव आहेत. त्यापैकी जो खासगी संस्थेला दिला आहे, तो बंद आहे. मात्र, जो महापालिकेतर्फे सुरू आहे, तो अद्याप बंद केलेला नाही. शासनाचा जीआर आल्याने तो बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.

रमेश पवार, अतिरिक्त आयुक्त, औरंगाबाद महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांच्या चर्चेबाबत मला माहिती नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकूल योजनेचे काम खान्देश बिल्डर्सला दिले हे गोलाणी ब्रदर्सने माझ्या व मनपाच्या निदर्शनास आणून दिले होते. गोलाणी ब्रदर्सला योजनेचे काम मिळाली नाही म्हणून त्यांनी कोणत्याही मंचावर त्याविषयी वाद केला नव्हता. तर घरकूल योजनेच्या कामांच्या वाटाघाटीनंतर निविदेचा दर हा १७.५ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मात्र ज्यावेळी निविदाचा दर खाली आला. त्यावेळी खान्देश बिल्डर्समध्ये काय चर्चा झाली हे सांगता येणार नाही, असेही डॉ. प्रवीण गेडाम यांनी उलटतपासणीत सांगितले.
यासोबतच त्यावेळेस निविदाचा दर कमी केल्यामुळे १८,५२,८२,००० रुपयांचा नगरपालिकेला फायदा झाला होता. हे मात्र खरे नाही. तसेच निशाणी क्रमांक १८०७ च्या नोटीसमध्ये असे नमूद केले आहे की, खान्देश बिल्डर्सचे नगरपालिकेकडे सुमारे ७०५.२५ लाख रुपये घेणे आहे. मात्र घरकूल योजनेचे अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्याची परवानगी देण्यात यावी, असेही खान्देश बिल्डर्सने न. पा. ला पत्र दिले होते. हे मला माहित आहे. असे जळगाव मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. आरोपी वाणी यांच्या वकीलांनी गेडाम यांना पुढील प्रश्न विचारले.


प्रश्न - सरकारी निविदेमध्ये पोलाद व सिमेंट हे सरकार पुरविणार होते का?

गेडाम - नाही हे त्या-त्या योजनेच्या प्रकारावर अवलंबून असते. बहुतेक निविदांमध्ये सरकार हे पुरवित नाही.

प्रश्न - याबाबत काही कागदोपत्री पुरावा तुमच्याकडे आहे का?

गेडाम - नाही, या क्षणाला तरी नाही मात्र मी याविषयीचे कागदपत्रे सादर करू शकतो.

प्रश्न - घरकूल योजनेचे काम सुरू असताना १० मे २००१ ला मुख्याधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या कारणास्तव बांधकाम थांबविण्याचे पत्र खान्देश बिल्डर्सला दिले होते का?

गेडाम - हे सांगता येणार नाही, आणि खरे नाही.

प्रश्न - या दोन्ही कारणांमुळे नगरपालिकेने ३१ मार्च २००४ रोजी कामाची मुदतवाढ देण्यासाठी पत्र दिले होते का?

गेडाम - माझ्या माहितीनुसार तथापि नगरपालिकेने पारित केलेल्या ठरावात नमूद केले होते.

प्रश्न - ज्यावेळी काम थांबविण्यात आले होते, त्याचवेळी खाँजामिया परिसरातील झोपडपट्टी धारकांसाठी घरकूल बांधण्याचे काम खान्देश बिल्डर्सला देण्यात आले होते का?

गेडाम - हो, हे बरोबर आहे.

प्रश्न - खान्देश बिल्डर्सने ५० लाखांची ४८० घरकूले बांधलीत पण त्यांची बिले नगरपालिेकेने अदा केली नाहीत का?

गेडाम - आता मला ते आठवत नाही.

प्रश्न - २२ एप्रिल २००२ ला घरकूल योजनेचे ६८.४६ कोटींचे काम राहिले होते. त्यासाठी खान्देश बिल्डर्सने न. पा. ला पत्र दिले होते की, दरमहा ३ कोटी रुपये मिळणे गरजेचे आहे.?

गेडाम - हे, मला माहीत नाही.

प्रश्न - जळगाव नगरपालिकेतील अध्यक्ष के. डी. पाटील यांना याचवेळी लाचलुचपत प्रकरणात गोवण्यात आले होते?

गेडाम - हे मला माहित नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव बसवंतला पुन्हा टोलवाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव ते गोंदे या साठ किमीच्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी महामार्ग, उड्डाणपूल, भुयारीमार्ग, सर्विस रोडचे काम अपूर्ण असताना वा‌र्षिक धोरणाच्या नावाखाली पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त टोल नाक्यावर शुक्रवार (१ एप्रिल) पासून प्रती वाहनामागे सरासरी दहा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय टोल प्रशासनाने घेतला आहे. वाहनधारकांचा विरोध पहाता टोलवाढीचा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. वाहनधारकांनी या टोलवाढीला विरोध केला आहे. वार्षिक धोरणाच्या नावाखाली वाहनधारकांची लूट करू नका, अन्यथा पुनच्छ टोलनाका बंद करण्याचा इशारा वाहनधारक व नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, प्रती वाहन अल्प टोलवाढ दिसत असली तरी टोलनाक्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या काही हजारांच्या घरात असल्याले प्रतिदिन लाखो रुपयांचा महसूल टोल कंपनीच्या तिजोरीत जमा होणार आहे. ऐन दुष्काळात सामान्य वाहनधारकांवर टोलधाडीचे संकट कोसळणार आहे. प्रारंभापासून वादग्रस्त ठरलेल्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर यापूर्वी अनेकदा वाहनधारकांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images