Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चोरीच्या मोटरसायकलींसह दोघे ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. यात एका चोरट्याकडून नऊ मोटरसायकली, तर दुसऱ्या चोरट्याकडून एक मोटरसायकल हस्तगत केली आहे. दरम्यान, पुण्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या कृष्णा रुपवते या चोरट्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले असून, सुमित जाधव या मोटरसायकल चोरट्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कृष्णा रुपवते (रा. सिन्नर, हल्ली मुक्काम पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सातपूर पोलिसांनी त्याच्याकडून नऊ मोटरसायकली हस्तगत केल्या. दरम्यान, पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, पुण्यात देखील मोटरसायकल चोरीची गुन्हा दाखल असल्याने संशयित चोरटा रुपवते याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुसऱ्या एका तपासात सुमित जाधव या मोटरसायकल चोरट्याकडून एक वेगो गाडी ताब्यात घेण्यात आली असून, त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोज करंजे व गुन्हे शाखेच्या टिमने मोटरसायकल चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समतोल राखण्यासाठी जपा निसर्ग

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

ना‌शिक : उद्याच्या आयुष्यात उद्‍भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सर्वांनी सक्षम व्हावे. भारतीय संस्कृती ही माती, पाणी, जंगल यावर आधारित आहे. या संपदेचे रक्षण केले तरच आपले आयुष्य अबाधित राहणार आहे. निसर्ग जपला, तर निसर्ग त्याचा समतोल राखत आपल्याला जपणार आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजार (आदर्श गाव) चे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. एचपीटी आर्ट्स अॅण्‍ड आरवायके सायन्स कॉलेजतर्फे हिवरे बाजार येथे अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील असंख्य गावातून आदर्श गाव पुरस्कारप्राप्त गावचे व्यवस्थापन कसे असते, हे कॉलेजियन्सला जाणून घेण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित केला होता. बुधवारी (२३ मार्च) रोजी पोपटराव पवार यांनी अभ्यास दौऱ्यातील सहभागी कॉलेजियन्ससोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी गावची पार्श्वभूमी, आतापर्यंतचा प्रवास, आलेल्या अडचणी आणि गावाची खासियत कॉलेजियन्सला सांगितली. तसेच, त्यांचे अनेक अनुभव देखील शेअर केले. गावाच्या विकासासाठी प्रशासकीय, राजकीय आणि स्थानिक ही चौकट महत्त्वाची ठरते. या तीन गोष्टी एकत्र आल्यास सर्व गावे आदर्श व्हायला वेळ लागणार नाही. यासोबत त्यांनी गावातील मुख्य प्लॅन्टस कॉलेजियन्सला दाखवत त्याची माहिती दिली. कॉलेजचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रतिनिधी सुरेश नखाते, सौरभ बेंडाळे, मयूर लष्करे यांनी अभ्यास दौऱ्याचे संयोजन केले.

हिवरे बाजाराची वैशिष्ट्ये सर्व घरांवर महिलांच्या नावे पाट्या. प्रत्येक घरावर घोषवाक्य लिहिले आहेत. प्रत्येक घराबाहेर पाळीव प्राण्यांसाठी खास जागा आहे. वर्षाकाठी गवत/चारासाठी शुल्क घेत जनावरांचे पोषण केले जाते. गावात पाण्याची माथा ते पायथा उपाययोजना आहे. गावातील शाळेत सीसीटीव्ही, संगणक कक्ष, व्यायामशाळा आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इपॉकमधून जपली सामाजिक बांधिलकी

$
0
0

अमोघ पोंक्षे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : एम.ई.टी भुजबळ नॉलेज सिटीच्या एमबीए विभागातील विद्यार्थ्यांनी इपॉक या कार्यक्रमांतर्गत सामाजिक उपक्रम राबवून एकूण ८६,८५३ रुपये एवढा निधी उभा केला. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन मुख्यमंत्री दुष्काळ सहाय्यता निधीसाठी या निधीचा धनादेश नुकताच प्रदान केला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन इपॉकच्या निमित्ताने सिटी सेंटर मॉल येथे भरवण्यात आले होते. त्या प्रदर्शनातून उभा केलेल्या निधीचा सामाजिक कार्यासाठी विनिमय व्हावा, या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमास विवो स्मार्ट फोन्स हे प्रायोजक होते. महाराष्ट्रावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून कमावलेला पैसा हा विधायक कामासाठी वापरला. हा तरुणांचा कौतुकास्पद प्रयत्न आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे संचालक डॉ. नीलेश बेराड यांनी केले. महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षवर्धन गोखले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाउपासनेतून मिळाला येशूचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या येशू ख्रिस्तांचा 'बलिदान दिन' म्हणून पाळल्या जाणाऱ्या 'गुड फ्रायडे'निमित्त शहरात शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वधस्तंभाची मिरवणूक, प्रवचन असे कार्यक्रम या निमित्त पार पडले. येशू ख्रिस्तांनी समाजाला दिलेला संदेश यावेळी महाउपासनेतून देण्यात आला.

येशू ख्रिस्तांनी ज्या दिवशी क्रुसावर आपले बलिदान दिले, तो दिवस 'गुड फ्रायडे' म्हणून पाळतात. जगभरात सर्वत्र हा दिवस पाळला जातो. नाशिकमधील शरणपूररोड येथील सेंट आंद्रिया चर्चमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या अनुषंगानेच गुड फ्रायडेच्या सकाळीच वधस्तंभाची मिरवणूक काढण्यात आली होती. ९० किलो वजनाचा व १२ फूट उंचीचा वधस्तंभ ख्रिस्ती धर्मियांनी खांद्यावरून वाहून नेत हा शोकदिवस पाळला गेला. शरणपूररोड येथील सेंट आंद्रिया चर्चमध्ये दुपारी १२ ते ३ या वेळेत रेव्हडंट डी. एस. गायकवाड यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर दिलेल्या 'हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही, मी तुला खचित सांगतो, आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील, माझ्या देवा! तू माझा त्याग का केला?, मला तहान लागली आहे, बाई, यावर त्यांनी प्रवचन दिले. शेकडो ख्रिस्ती धर्मियांची उपस्थिती होती.

रविवारी रॅली गुड फ्रायडेनंतर येणारा 'ईस्टर संडे' यादिवशी येशूचे पुनरुत्थान झाले असल्याने हा दिवस ख्रिस्त धर्मियांसाठी महत्त्वाचा असतो. यानिमित्त रविवारी (दि. २७) पहाटे ५ वाजता कॅण्डल्स घेऊन रॅली काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा पारा ४० अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गतवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार याचे स्पष्ट संकेत आताच मिळू लागले आहेत. एरवी एप्रिल आणि मे मध्ये ४० अंशापर्यंत पोहोचणारा तापमानाचा पारा मार्चमध्येच ४० अंशाच्यावर पोहोचला आहे. मालेगावात शुक्रवारी (२५ मार्च) राज्यातील सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शहरातही तापमानाची चाळीसीकडे वाटचाल सुरू असून, ३९.७ अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले.

गतवर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ३८.७ अंशापर्यंत पोहोचले होते. यंदा शहरात हेच तापमान ३९.७ अंशावर पोहाचले असून मालेगावात आताच ४२ अंशाच्या वर तापमान गेल्याने यंदाचा उन्हाळा असह्य ठरणार हे स्पष्ट झाले आहे. या वर्षीचे सर्वाधिक तापमान आज नोंदविण्यात आले असून त्याने गतवर्षीच्या मार्च महिन्यातील तापमानाचेही रेकॉर्ड मोडले आहेत.

एकेकाळी आरोग्याला पुरक हवामानामुळे पर्यटकांना नाशिक हवेहवेसे वाटत असे. अजूनही पर्यटकांचा नाशिककडे ओढा असला तरी वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे पर्यटकांच्या संख्येवर त्याचा परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बिघडले आहे. खान्देशला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यातही उन्हाच्या तप्त झळांचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे.

राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पोहोचलेली उष्णतेची लाट नाशिक जिल्ह्यातही तेवढ्यात तीव्रतेने दाखल झाली आहे. मालेगावात शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल जळगावातही ४२ अंश सेल्सियसएवढे कमाल तापमान नोंदविले गेले. अकोला, नागपूर, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि वर्ध्यातही तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे.

नाशिक शहरातील तापमानाचा आलेखही दिवसेंदिवस चढता असून नागरिकांना उष्णतेचा दाह सहन करावा लागतो आहे. वृक्षतोड, वाढते प्रदूषण, कॉँक्र‌िटीकरण तापमान वाढीला कारणीभूत ठरत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद होण्याची शक्यता असून त्यास तोंड देण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावंत बंधू साकारणार जॉर्डनचे सौंदर्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिकचे सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत या दोघा चित्रकार बंधूंना आखाती देशातील जॉर्डनमध्ये इंटरनॅशनल पेंटींग वर्कशॉपसाठी नुकतेच आमंत्रण प्राप्त झाले आहे. ते लवकरच जॉर्डन येथे रवाना होत आहे.

जॉर्डन देशाची राजधानी अमान शहरामधील सुप्रसिध्द स्ट्राटेंजिक ग्राफिक डिझाईन कंपनीतर्फे २६ मार्च ते १५ एप्रिल या काळात त्यांच्या ग्राफिक डिझायनर्स चित्रकार व कर्मचाऱ्यांना सृजनशील, दृष्टीकोन व कलात्मक तांत्रिक ज्ञान वृध्दींगत होण्यासाठी या चित्र कार्यशाळा होणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक चित्रकार म्हणून राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत या चित्रकार बंधूंना जॉर्डन देशात आंमत्रित करण्यात आले आहे. जॉर्डन देशात जाऊन आपली कला सादर करणारे ते पहिले भारतीय चित्रकार ठरणार आहेत.

जॉर्डनमधील वैशिष्ट्यपूर्ण सुप्रसिध्द नऊ शहरांमध्ये पेंटिंग वर्कशॉप होणार आहे. त्यासर्व ठिकाणी चित्रकार सावंत बंधू जॉर्डनचे सौंदर्य टिपणार आहेत. त्यात जॉर्डन देशाच्या राजधानी शहर अमान, पेलेस्टाईन, उम कॉईस, अज्लुन, जेराश, साऊथ जॉर्डन, मडबा, अस्साल्त, इरबेड या शहरांचा समावेश आहे. या शहरातील अमानमधील जगप्रसिध्द कास्टेल माऊण्टन, अल हुसैनी मोस्क, सीटी सेंटर, अशराफेह, व रेणबो स्ट्रीट हया स्थळांचा समावेश आहे. पेलस्टाईन शहरात जेरुसलम नाब्लूस, रामअल्लाह ही ठिकाणे चित्रीत होणार आहेत. अज्लुन येथील ओल्ड मोस्क एरिया तर जेराश येथील सौंदर्यपूर्ण जेराश डाऊटाऊन तसेच साऊथ जॉर्डन येथील भव्य जगप्रसिध्द वर्ल्ड हेरिटेज पेट्रा सिटी, अल करक पुरातन किल्ला व त्याभोवतालचे मनोहरी शहर, तसेच इरबेड येथील क्लॉक टॉवर, इरबेड म्युझियम, तर जगप्रसिध्द निसर्गरम्य मडबाचे नेबो माऊण्टन ही ठिकाणे २१ दिवसात चित्रकार सावंत बंधू आपल्या कुंचल्यात चितपरीचित चित्रशैलीत साकारणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीड‌ियावर रंगली धुळवड !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक दुष्काळामुळे धुळवडीला पाण्याचा वापर टाळण्याच्या आवाहनाला नाशिककरांनी प्रतिसाद देत सोशल मीडियावर धुळवडीचा आनंद लुटला. तरुणाईनेही सामंजस्य दाखवत एकमेकांवर व्हॉट्सअप व फेसबुकवर शुभेच्छांचा वर्षाव करीत धुळवड साजरी केली. धुळवड रंगपंचमी अशा सणांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. या दिवसांमध्ये होळीसाठी वृक्षतोड केली जाते तर काही जणांकडून धिंगाणा घातला जातो. अशाने सणांचे पावित्र्य मलीन होते. सण साजरे करताना परंपरा जपत निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे. असा संदेश देत तरुणांनी पुढाकार घेऊन सोशल मीड‌ियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देत धुळवड साजरी केली. बुधवारी रात्रीपासूनच वॉट्सअपच्या माध्यमाद्वारे संदेशाची देवाणघे‍वाण सुरु करण्यात आली होती तर काहींनी यासाठी खास वॉल तयार केले होते. यात नैसर्गिक रंगानी, पाण्याचा वापर न करता एकमेकांना शुभेच्छा व विचारांचे आदान-प्रदान करूनही आनंदाने धुळवड साजरी केली जाऊ शकते हे दाखवून दिले. होळीचा खरा अर्थ आपल्यातील दूरगुण, विकृती जाळून सत्कार्याची आणि सद्भावनेची होळी साजरी करणे हा संदेश तरुणाईने आपल्या अंमलबजावणीतून करून दिला. 'होली वही जो स्वाधीनता की आन बन जाये, होली वही जो गणतंत्रता की शान बन जाये, भरो पिचकारियों में पानी ऐसे तीन रंगों का, जो कपड़ो पर गिरे तो हिंदुस्तान बन जाये. होली की हार्दिक शुभकामनाये' अशा प्रकारचे देशप्रेम देखील व्यक्त करण्यात येत होते. 'वाणी आणि पाणी जपून वापरा, वाणीमुळे आपला वर्तमानकाळ व पाण्यामुळे आपला भविष्यकाळ सुरक्षीत राहणार आहे. सर्वाना धुलवडीच्या हार्दिक शुभेच्छा!' असे देखील मॅसेज व्हॉट्सअप व फेसबुकवर एकमेकांना देण्यात येत होते. दरवर्षी धुळवडीच्या काळात पाण्याने भरलेले फुगे मारणे, पाण्याने होळी खेळणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणे याच्या परिणामांचे तोटे नागरिकांनाच सहन करावे लागत होता. याऐवजी सामाजिक भान जपत अशा दुष्काळग्रस्तांसाठी काही मदत मिळवून देऊ शकलो तर ही होळी खऱ्या अर्थाने दु:ख हरणारी ठरेल. अशा आशयाचे मॅसेजेस फेसबुकच्या माध्यामातून देण्यात येत होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशन स्वच्छ; परिसर अस्वच्छ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
नाशिकरोड रेल्वेस्टेशनला स्वच्छतेबाबत देशात सहावा क्रमांक मिळाला आहे. मात्र, स्टेशनबाहेर नागरिकांच्या बेशिस्तीमुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. देशात सहावा क्रमांक मिळवणारे नाशिकरोडचे रेल्वेस्टेशन पाहून बाहेर आल्यावर परगावच्या प्रवाशांना बाहेरची अस्वच्छता पाहून धक्काच बसतो.

नो' पार्किंग झोन'मध्येच प्रवाशी आणि नागरिक आपली वाहने लावत आहेत. त्यामुळे स्टेशनमधून चारचाकी वाहनांना ये-जा करणे अवघड झाले आहे. पार्किंगबरोबरच सार्वजिनक स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. रेल्वेस्टेशनमध्ये मुख्य प्रवेशद्वारावर बसस्थानक आहे. तेथील अतिक्रमण काही दिवसांपूर्वी हटवून तेथे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. परंतु, आता तेथे रिक्षाचालकांनी अतिक्रमण केल्याने रेल्वेस्टेशनमध्ये प्रवेश करणे अवघड झाले आहे. देवीचौकातून आल्यावर तिकीट बुकिंग कार्यालया शेजारी रेल्वेचे दुसरे प्रवेशद्वार आहे. तेथे चारचाकी वाहनचालक प्रवाशांना उतरवून पुढे निघून जातात. मात्र, या मार्गावरच दुचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे चारचाकी वाहनचालकांना स्टेशनमध्ये प्रवेश करता येत नाही. येथेही रिक्षा स्टॅन्ड आहे. तेथे रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे वाहनचालकांची कोंडी झाली आहे.

नावापुरती कारवाई

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी रेल्वेस्टेशनचा दौरा करतात. तेव्हा स्टेशन परिसरातील बेकायदेशीर उभी असलेली वाहने रेल्वे सुरक्षा दलाचे जवान जप्त करतात. वाहनचालकांना मनमाडच्या कोर्टात उभे करतात. तेवढ्यापुरती ही कारवाई

मर्यादित असते. नियमित कारवाई केल्यास वाहने उभी राहणार नाही आणि प्रवाशांना मुक्तपणे प्रवेश करता येईल.

नागरिकांनी रेल्वेस्टेशन आपले समजून स्वच्छ ठेवावे. देशात सहावा क्रमांक मिळवणारे हे नाशिकरोड स्थानक आतून जसे स्वच्छ आहे तसेच त्याचा परिसरही स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. सामाजिक संघटना त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत.

- महेंद्र शहा, ना‌गरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तृप्ती देसाईंनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्तात शुक्रवारी सकाळी अखेर त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथे त्यांनी पूजाविधी तसेच अभिषेकही केला. मात्र, त्यांना गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला नाही. दर्शनानंतर मंदिराच्या आवारातून बाहेर पडत असताना, काही स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी देसाई यांना वेळीच बाहेर काढल्याने संभाव्य संघर्ष टळला.महिलांना गाभाऱ्यात प्रवेश मिळावा द्यावा यासाठी आपण आलो होतो, असे देसाई यांनी स्थानिक महिलांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेमोसमी पावसाची जिल्ह्यात हजेरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड/ मालेगाव

नाशिक जिल्ह्याच्या काही भागांत बेमोसमी पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. प्रामुख्याने निफाड व मालेगाव तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. निफाड तालुक्यात रात्री आठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दुपारच्या सुमारासही या भागात हलक्या सरी कोसळल्या होत्या.निफाड व परिसरातील व गावांना पावसाने झोडपल्याने द्राक्ष, कांदा व गहू उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे. मालेगाव परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ फार्महाऊस ‘अशोका’च्या पैशातून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ यांचा नाशिकमधील आलिशान बंगला अशोका बिल्डकॉन कंपनीच्या पैशांतून उभा राहिल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला. या बंगल्यासाठी कंपनीने ४० कोटी रुपये दिल्याचे पुरावे सक्तवसुली संचलनालयाकडे (ईडी), अँटी करप्शन ब्युरो तसेच पोलिसांकडे दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात झालेल्या केबीसी, मैत्रेय तसेच इतर आर्थिक घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आज दुपारी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची​ भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी भुजबळांवरील नवीन आरोपांची माहिती दिली. भुजबळ सध्या आपल्या कृत्याची फळे भोगत असून, पुढील महिन्यात अजित पवार आणि सुनील तटकरे हे सुध्दा जेलमध्ये दिसतील, असा दावा सोमय्या यांनी केला. भुजबळांचा भव्यदिव्य बंगला बांधण्यासाठी `अशोका बिल्डकॉनच्या अशोक कटारीया यांनी तब्बल ४० कोटी रुपये दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचा शिमगा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात होळीचा उत्सव साजरा होत असतानाच दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीचा राजकीय शिमगा रंगला. शिवसैनिकांनी भाजपचा महिला मेळावा उधळल्यानंतर भाजपकडून सुरू असलेल्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे धावून आले. `आमच्या नादाला लागाल तर आडवे करू`, अशा शब्दांत त्यांनी भाजपला लक्ष्य केले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनीही भाजप हा भुंकणारा कुत्रा असल्याची शेलकी टीका केली. भाजपनेही मग गेली २० वर्षे हा भुंकणारा कुत्रा शिवसेनेला कसा चालला, असा सवाल केला.


नादी लागाल, तर आडवे करू!

शिवसेनेची कबर खोदण्याची भाषा करणाऱ्या भाजपला एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ``शिवसेनेला डिवचण्याचे काम करू नका. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. पण आमच्या वाटेला कोणी आला तर, त्याला आडवा करून सोडतो``, असा गर्भित इशारा शिंदे यांनी भाजपला दिला आहे. जो महाराष्ट्र तोडण्याची भाषा करेल, त्याच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल, असे सांगतानाच अखंड महाराष्ट्रासाठी आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या कार्यक्रमावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले.

शिंदेंनी कारागृहात घेतली शिवसैनिकांची भेट

भाजपच्या महिला मेळाव्यावरील हल्ल्यानंतर भाजपकडून सुरू असलेल्या दबावाच्या राजकारणाला शिवसेनेकडून जशास तसे उत्तर देण्यासाठी नाशिकच्या मैदानात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना उतरविण्यात आले आहे. शिंदे यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये येऊन कारागृहात असलेल्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह शिवसैनिकांची भेट घेत त्यांचे मनोधैर्य वाढविले. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना कार्यालयात येऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

यावेळी बैठकीत बोलतांना शिंदे यांनी भाजपचे थेट नाव न घेता शाब्दिक हल्ला चढवला. शिवसैनिकांवर भाजपतर्फे सुरू असलेल्या अन्यायाची गंभीर दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. शिवसैनिकांचे अभिनंदन करण्यासाठी पक्षप्रमुखांनी आपल्याला इथे पाठविले आहे. जो महाराष्ट्र तोडण्याची भाषा करेल, त्याच्या विरोधात शिवसेना कायम रस्त्यावर उतरेल. आम्ही सत्तेत असलो तरी शिवसेनेची नाळ सामान्य माणसासोबत आहे. त्यागातून महाराष्ट्र उभा राहिला आहे. त्यामुळे आंदोलकांच्या बाजूने शिवसेना खंबीरपणे उभी राहिली राहिल्याचे त्यांनी सांगितले.

ही आणीबाणी आहे का?

एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्तालयात आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेतली. तसेच शिवसैनिकांनी दिलेल्या तक्रारींचेही गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना शिंदे यांनी पोलिस दबावाखाली असून, पोलिसांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला. आमच्या कार्यकर्त्यांनाही मारहाण झाली. परंतु, त्यांचे गुन्हे दाखल झाले नाहीत असे सांगतानाच दरोड्याचे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पोलिस घरात जावून शिवसैनिकांना शोधत आहेत ही आणीबाणी आहे का, असा सवाल करीत, पोलिसांची पक्षपाती कारवाई सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

जो महाराष्ट्र तोडण्याची भाषा करेल, त्याच्या विरोधात शिवसेना कायम रस्त्यावर उतरेल. पोलिसांवर दबाव टाकून शिवसैनिकांवर कारवाई केली जात आहे. शिवसैनिकांच्या तक्रारीही पोलिसांनी नोंदवून घ्याव्यात. - एकनाथ शिंदे, शिवसेना नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री


'भाजप म्हणजे भुंकणारा कुत्रा'

भाजप हा भुंकणार कुत्रा असून, भुंकणारे कुत्रे कधीच चावत नाही, अशा शेलक्या शब्दांत शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी भाजपला लक्ष्य केले. शिवसेनेची कबर खोदणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बापजाद्यांनी कधी खड्डा खोदला होता काय? असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे पोलिस राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे का दाखल करीत नाही, असा सवालही चौधरी यांनी विचारला.


शिवसेनेला आताच कसे समजले?

भाजप हा भुंकणारा कुत्रा आहे, हे शिवसेनेला आताच कसे समजले? गेली २० वर्षे संसार करतांना हे दिसले नाही? महिलांवरील हल्ला हा शिवसेनेच्या संस्कृती बसतो का? आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राहिले असते तर त्यांनी हे सहन केले नसते.
- लक्ष्मण सावजी, माजी शहराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत पाणी देणाऱ्या सेवाभावींचा सत्कार

$
0
0

खासदार डॉ. हिना गावीत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गावाचा विकासात्मक आराखडा तयार करण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना विश्वासात घ्यावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. हिना गावित शिवजयंती निमित्त इंद्रधनुष्य युवा फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात केले. या वेळी दुष्काळ परिस्थितीत गावात स्वखर्चाने खासगी बोअरवेलमधून पाणी उपलब्ध करून देणाऱ्यांचा खासदार डॉ. हिना गावितांकडून सत्कार करण्यात आला.


संपूर्ण जिल्हाभरात शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी होत असताना, तालुक्यातील धानोरी गावातील इंद्रधनुष्य युवा फाऊंडेशनच्या वतीने शिवजंयती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. खासदार गावीत पुढे म्हणाल्या की, सामाजिक व विकास कामांमध्ये गावाने पुढाकार घ्यावा. तसेच राजकारणाच्या पलिकडे जाऊन गावाचा विकास होत असतो. त्यात युवकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, उत्पादन शुल्क अधीक्षक नंदा पाडवी, ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र दोरकर, तानाजी वसावे, सरपंच ललिताबाई वळवी, सुनिल वसावे, ग्रा.पं.सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महेंद्र चित्ते, राहुल चौधरी, सचिन वरसाळे, जयेश चौधरी, हिरालाल वरसाळे, उमेश वळवी, आशिष शर्मा, राजा चौधरी, सागर भोई, भूषण पाटील, किरण चौधरी, गणेश पाडवी, विशाल चौधरी, गोलु चौधरी, प्रंशात पाटील, चेतन चौधरी, भूषण चौधरी, यांनी परिश्रम घेतले. असई धनगर, उदेसिंग वळवी, मनोज चौधरी, अधिकार बोरसे, दिनेश वळवी यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट्रल किचनविरोधात ‘सीटू’चा एल्गार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

राज्यात आघाडी सरकार असतांना विरोध झालेली सेंट्रल किचन (केंद्रीय स्वयंपाकगृह) योजना आता युती सरकारने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास 'सीटू' कामगार संघटनेने विरोध केला असून येत्या १९ एप्रिल रोजी धरणे तर २० एप्रिल रोजी मुंबईतील आझाद मैदानावरून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

सेंट्रल किचनच्या मुद्यावरून महिला बचत गटांची खुटवडनगर येथील सीटू भवनात नुकतीच बैठक झाली. यावेळी शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या महिला बचतगटांच्या सदस्यांनी अधिकाधिक संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी केले आहे. राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी २१ मार्च २०१६ रोजी आदेश काढून शालेय पोषण आहार योजने अंतर्गत नागरी भागात सन २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षांमध्ये सेंट्रल किचन मार्फतच विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे कळविले आहे. यामध्ये शिक्षण संचालकांनी नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार कामगार किंवा महिला बचत गटांमार्फत पुरवठा करण्यासाठी करार करू नयेत असे निर्देश दिले आहे. सेंट्रल किचन योजनेमुळे नाशिक जिल्ह्यातील ७ हजारांच्यावर कामगार व महिला बचत गटांना त्याचा फटका बसणार आहे. त्यांचा रोजगार हिरावला जाणार असल्याचा आरोप डॉ. कराड यांनी केला.

मोजक्याच लोकांचे भले!

सेंट्रल किचन योजनेमुळे राज्यभरातील १ लाख ५० हजार कामगार व महिला बचत गट बेरोजगार होणार आहेत. केवळ काही मोजक्याच कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी ही योजना राबविण्याचे पाप युती सरकार करत असल्याचा आरोप डॉ. कराड यांनी केला. बैठकीस अॅड. वसुधा कराड, सीताराम ठोंबरे, कल्पना शिंदे यांच्यासह शालेय पोषण आहार पुरविणारे महिला बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिंपळगाव बसवंत येथे गुंडगिरी विरोधात निघालेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करावेत. तसेच भारतीय संविधानाच्या उद्दशिकेची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अत्याचार विरोधी कृती समितीने केली आहे. अत्याचार विरोधी कृती समितीने याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

पिंपळगाव बसवंत येथे अलीकडेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये मोर्चेकऱ्यांनी निफाड फाट्यावरील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिकृतीची विटंबना केली. मोर्चा पिंपळगाव पोलिस स्टेशनवर पोहोचताच तेथे जातीवाचक प्रक्षोभक भाषणे देण्यात आली. त्यामुळे समाजातील विशिष्ट घटकांच्या भावना दुखावल्या आहेत. भारतीय संविधान उद्दिशिकेची प्रतिकृती जैसे थे असून तिची पुर्नस्थापना करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे. संबंधितांवर अॅट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मोर्चात भाषण करणाऱ्यांचे ध्वनिचित्र मुद्रण पोलिसांनी केले आहे. या ध्वनिचित्रफितिची तपासणी करून या प्रकारामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणी राहुल तुपलोंढे, अनिल आठवले, रमेश पाथरे, विष्णू मगर, अनिल कळंके, अविनाश आहेर, सतीश संसारे, सुमीत आहिरे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारची काच फोडून चोरी

$
0
0

ना‌शिक : गंगापूर रोडवर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी लॅपटॉपसह इतर वस्तू चोरी केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. कॉलेजरोडवरील रहिवासी भाग्येश प्रमोद कुलकर्णी यांनी आपली फोर्ड आयकॉन कार चोपडा लॉन्सच्या गेटजवळ उभी केली होती. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ते कारजवळ आले असता कारच्या मागील बाजूची काच फोडून चोरट्यांनी डेल कंपनीचा लॅपटॉप व गॉगल असा २७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले.

दरम्यान, गंगापूर रोडवरील एका हॉटेलशेजारील उभ्या असलेल्या कारच्या दरवाजाची काच फोडून लॅपटॉपसह किमती ऐवज चोरून नेल्याची आणखी एक घटना घडली. पुणे येथील सचिन अरुण चौधरी यांनी स्विफ्ट कार हॉटेल चिलीशेजारी उभी केली होती. कारमधील एचपी कंपनीचा लॅपटॉप, सोनी कंपनीचा कारटेप व सहा पेन ड्राईव्ह असा ४९ हजार २०० रुपयांचा रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञ जगताच्या प्रदेशात...!

$
0
0

अशांत किरकिरकर

काही विचारप्रवाह इतके व्यापक असतात की त्यांच्याविषयी कितीही बोलले तरी ते संपूर्ण उष्टावले जात नाहीत. विविध पंथ किंवा संप्रदाय हे महाराष्ट्रातले असेच विचारप्रवाह आहेत. वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, दत्त संप्रदाय नवनाथ पंथ, लिंगायत पंथ असे वेगवेगळे विचारप्रवाह महाराष्ट्रात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे महानुभाव पंथ.

मुकुंदराजांनंतर आणि ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. 'महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः' या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. महानुभाव या संप्रदायाचा लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्य आणि चरित्रग्रंथ आहे. पंडित म्हाइंभट सराळेकर हे लीळाचरित्राचे कर्ते आहेत. हा ग्रंथ अनलंकृत शैलीमुळे तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेख आहे. सर्व महानुभाव वाङमयाचे बीज या ग्रंथात असून त्याची रचना इ. स. १२७८ मध्ये करण्यात आली. ग्रंथात सुमारे साडेनऊशे ओव्या आहेत. एकांक-पूर्वार्ध-उत्तरार्ध असे या ग्रंथाचे तीन विभाग आहेत. श्रीचक्रधरांचे चरित्र हा ग्रंथाचा विषय आहे. लीळाचरित्राच्या यशाचे निम्मेअधिक श्रेय श्रीचक्रधरांच्या व्यक्तिमत्त्वाला जाते. तत्कालीन महाराष्ट्रातील जीवनाचे चित्र लीळाचरित्रात उमटलेले आहे. त्यावेळचा समाज, चालीरीती, व्रतवैकल्ये, सणवार, वस्त्रेप्रावरणे, खाणीपिणी, नाणीगाणी, व्यापारटापार इत्यादी विविध अंगांचे दर्शन, स्थितीगती याची चांगली कल्पना लीळाचरित्रातून येते. नागदेव, बाइसे, आउसे, सारंगपंडित, जानोपाध्ये या अनेक व्यक्तींची स्वभावचित्रे या ग्रंथात आहेत. चरित्रकार म्हाइंभट चतुरस्त्र, साक्षेपी, कष्टाळू, प्रामाणिक, भावनिष्ठ शैलीकार आहेत. नागदेवाचार्य आणि म्हाइंभट यांच्या संवादातच लीळाचरित्राची प्रेरणा आहे. भाषा, इतिहास, साहित्य, समाजदर्शन, तत्त्वज्ञान या सर्वच दृष्टींनी या ग्रंथाचे महत्त्व जाणवते.

अशा या महान ग्रंथाचा समावेश महाराष्ट्रात कुठल्यातरी कोपऱ्यात, एका कुठल्या तरी शहरातील, एका कुठल्यातरी मैदानावर अथवा सभागृहामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नावाच्या मेळाव्यानिमित्त होणाऱ्या ग्रंथपालखीत करावा अशी मागणी महानुभाव पंथाने या संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याकडे केली. किती खुजे करून टाकले या महान ग्रंथाला! एखाद्या फुटकळ पालखीत समावेश झाल्याने लीळाचरित्र लहान अथवा मोठे होत नाही कारण हा ग्रंथ मूळात मोठा आहे. ज्यांची ख्याती वर्णिता वर्णत नाही अशा चक्रधर स्वामींच्या लीळा या ग्रंथात आलेल्या असल्याने त्याला प्रचंड साहित्यिक मूल्य प्राप्त झालेले आहे, त्यामुळे अशी मागणी करून पंथीयांनी काय साधले? विशेष म्हणजे ही मागणी मूळातच चुकीची आहे कारण या ग्रंथ पालखीमध्ये लीळाचरित्र आधीपासून स्थानापन्न आहे. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या संमेलनात जी ग्रंथपालखी निघाली होती त्यात ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, राज्यघटना, सकल संत गाथा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ, शिवाजी सावंत यांची कादंबरी, मंगेश पाडगावकर यांचे कविता संग्रह, महानुभाव साहित्यातले लीळाचरित्र, भगवतगीता, चिंचवडच्या मोरया गोसावी यांचे चरित्र आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. परंतु शोकांतिका अशी आहे की राजकीय वक्तव्ये करण्यातच वेळ खर्च करणाऱ्या आपल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना हे माहीतच नाही. महानुभाव पंथियांनी मागणी केली व यांनीही त्यांना अगदी भरभरून आश्वासन दिले की मी महामंडळाला तसे एक पत्र देईल. लीळाचरित्राचा समावेश ग्रंथदिंडीत झालाच पाहीजे वगैरे वगैरे. संमेलनाध्यक्षांना ग्रंथदिंडीतील ग्रंथांची माहिती नसावी यापेक्षा मोठे दुर्देव ते काय?

म्हाइंभटाने जीव ओवाळून टाकावे असे साहित्य निर्माण केले आणि या पंथाची डोर आज ज्यांच्या हाती आहे त्यांनी इतकी खुजी मागणी करून या ग्रंथाचा अवमान केला. बरं 'म्हाइंभट' की 'माईमभट्ट' हे ज्यांना माहीत नाही त्यांनी ही मागणी करावी म्हणजे नवलच! तरीही महानुभाव पं‌थीयांची भावना रास्त आहे, आपल्या पंथाच्या ग्रंथाचा सन्मान झाला पाहीजेच परंतु त्याआधी त्यांनी थोडी माहिती घेतली असती तर वस्तुस्थिती वेगळीच आहे हे त्यांच्या लक्षात आले असते. वाईट याचे वाटते की एकवेळ पंथीयांपैकी काहीजणांना ज्ञात नसेलही परंतु ज्यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे त्यांना ही गोष्ट माहीत असायला हवी होती की ग्रंथ आधीच पालखीत आहेत, राजकारण्यांसारखी आश्वासने देण्याच्या नादात त्यांनी हेदेखील आश्वासन देऊन टाकले असावे. असो. माननीय संमेलनाध्यक्ष इतक्यावरच थांबले नाही तर ज्ञानेश्वर-तुकारामांच्या ग्रंथाचा समावेश या पालखीत असावा असेही म्हणाले. महाशय, संपूर्ण जगाला अमृताने न्हाऊ घालणारी भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी अनंत काळापासून संमेलनाच्या पालखीत असते, तुकारामबावांची गाथाही या पालखीत असते. याचा आपल्याला विसर पडलेला दिसतो. आपण एखाद्या पंथाच्या अनुयायाला अधिकार मागायला शिका असा सल्ला कसा काय देऊ शकतात? अधिकार मागायला सांगून आपण त्या अनुयायाला भडकवण्याचेच काम करीत आहात. आपण म्हणता की मोजक्या ग्रंथांची पालखी निघते; परंतु ते मोजके ग्रंथ म्हणजे मराठी समुदायाचे प्रतिनिधीत्व करणारे ग्रंथ आहेत, याचाही आपणास विसर पडला काय? मराठी भाषा सर्वांची आहे म्हणून त्यात सर्व धर्मियांचे ग्रंथ असावेत असे चुकीचे पायंडे पाडून आपण काय साध्य करीत आहात, इतकेच की आपण वादग्रस्त संमेलनाध्यक्ष आहात. तुम्हाला इतरांमध्ये उठून दिसायचे आहे इतकाच काय तो आपला अट्टहास. आपण वर्षभर संमेलनाध्यक्ष आहात, आपण बोलाल ते मराठी जनांच्या वतीने बोलत आहात इतके जरी ध्यानात ठेवले तरी पुरेसे. ...आणि ग्रंथपालखीचा जीव तरी कितीसा, त्यात ग्रंथ तरी किती मावणार? याचादेखील विचार आपण करावा असे वाटते.

चंद्रपूरला विदर्भ साहित्य संघ संमेलनाच्या ग्रंथदिंडीत संत तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, संपूर्ण रामायण, लीळाचरित्र या ग्रंथांसह डॉ. आंबेडकर चरित्र, महात्मा गांधी ते महात्मा, ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय, भारताचे संविधान, डॉ. नरेंद्र जाधवांचे आमचा बाप आणि आम्ही, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे सर्वोदय दर्शन अशा एकूण १२ ग्रंथ आणि पुस्तकांचा समावेश यंदा होता. महाराष्ट्राच्या एका छोट्याशा भागात झालेल्या संमेलनात जी लीळाचरित्र ग्रंथ ठेवण्यात येत असेल तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातली त्याची जागा कुणीच हिरावू शकत नाही, हे महानुभाव पंथीयांनीही लक्षात घ्यावे. एका निवेदनाच्या प्रतिपलीकडे जो तुम्हाला काही देऊ शकणार नाही अशा व्यक्तीकडे मागणी करायची की अबोध लिपीमध्ये मांडून ठेवलेले आपले साहित्य साध्या सोप्या भाषेत आणून जनमाणसाच्या हवाली करायचे हा निर्णय सर्वस्वी तुमचाच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकहितवादी’च्या अध्यक्षपदी जातेगावकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकहितवादी मंडळाची सर्वसाधारण सभा राका कॉलनी येथे होऊन २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात मंडळाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश जातेगावकर, तर उपाध्यक्षपदी नवीन तांबट व भगवान हिरे यांची निवड करण्यात आली.

लोकहितवादी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा वसंतराव गुप्ते सभागृहात झाली. यात संस्थेचे सरचिटणीस नवीन तांबट यांनी सभेच्या नोटीसचे वाचन केले. त्यानंतर वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. संस्थेने २०१४-१५ या कालावधीत केलेल्या कार्याचा अहवाल वाचून दाखवण्यात आला. तसेच २०१४-१५ वर्षात मुकुंद कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली मंडळाने ज्या स्पर्धेत पारितोषिक मिळवली आहेत, त्या स्पर्धेतील कलावंताचे अभिनंदन करण्यात आले.

सन २०१४ व १५ च्या हिशेब पत्रकास मंजुरी देण्यात येऊन २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवडण्यात आली.


अशी आहे कार्यकारिणी

अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष मुकूंद कुलकर्णी, उपाध्यक्ष नवीन तांबट, भगवान हिरे, सरचिटणीस सुभाष पाटील, सहचिटणीस सी.एल. कुलकर्णी, अपूर्वा शौचे देशपांडे, अर्थ चिटणीस किरण समेळ, कार्यकारिणी सदस्य फणिंद्र मंडलीक, सुनील भुरे, मुक्ता बालिगा, विवेक वालावलकर, रमेश काळे, निर्मल अष्टपुत्रे, जयेश आपटे. लोकेश शेवडे, सुरेश मेणे, रमेश देशमुख यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे विश्वस्त दिलीप साळवेकर, शाम पाडेकर यांच्यासह मुक्तेश्वर मुनशेट्टीवार व कलावंत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अनुवादातूनच होईल संस्कृतीचे आदानप्रदान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय एकात्मतेचे महत्त्व कायम राखायचे असेल, तर संस्कृतीचे आदानप्रदान महत्त्वाचे आहे. अनुवादातून संस्कृतीची ही आदानप्रदान शक्य होऊ शकते. भारत बहुभाषिक देश असल्याने या भाषा आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

ब्रह्मा व्हॅली कॉलेजमध्ये दोनदिवसीय बहुभाषी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजच्या प्रांगणातच शनिवारी सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना सबनीस म्हणाले की, भारतात सांस्कृतिक वैविधता आहे. प्रत्येक प्रांताची वेगळी भाषा, संस्कृती आहे. ती जाणून घेण्यासाठी यांसारखी संमेलने महत्त्वाची आहेत. देशातील विविध भाषिकांमध्ये संस्कृतीचे आदानप्रदान होण्यास यामुळे मदत होऊ शकेल. अनुवाद करतानाच संबंधित प्रांताची माहिती, तेथील संस्कृती माहिती असणे गरजेचे आहे. तरच त्या अनुवादाला तो अनुवादक न्याय देऊ शकेल. शिवाजी महाराजांचा इतिहास अनेक देशांमध्ये शिकवला जातो. शेक्सपियरसारख्या लेखकांना आपण भारतातील एखाद्या छोट्याशा शहरातही अभ्यासतो. महात्मा गांधींचे विचारही भारताबरोबरच इतर देशांमध्येही अभ्यासले जातात. ते केवळ अनुवादामुळेच. यामुळे अनुवादाचे महत्त्व ज्ञान संकलन करण्यासाठी थोर आहे. मात्र, केवळ अनुवादावरच न थांबता त्या भाषाज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारातही करता आला पाहिजे, असेही ते म्हणाले.

याबरोबरच मोहम्मद पैगंबरांचा इस्लाम हा शांततेचा व अहिंसेचा संदेश देणारा आहे. मात्र इसिससारख्या दहशतवादी संघटनांनी त्याचा स्वतःच्या सोयीनुसार अर्थ काढला आहे. त्याचे वाईट परिणाम जगभरात उमटताना दिसत आहेत. यावेळी ज्येष्ठ वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या केसेस व जीवनचरित्राचा आढावा घेणाऱ्या प्राचार्य डॉ. बापूराव देसाई लिखित 'राष्ट्रीय जननायक' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. १७ राज्यांमधील सुमारे दीडशे साहित्यिक संमेलनाला उपस्थित होते.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी हिंदी, अहिराणी, लेवा पाटीदारी, गुजराती अशा विविध भाषांमधील परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हिंदी सल्लागार सुभाष चंदर, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, प्रा. डॉ. म. सु. पगारे, डॉ. सुनील पगारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या कुत्र्यांचा पालक

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

समाजसेवा करताना प्रत्येकजण कोणती ना कोणती क्षेत्र निवडत असतो कुणी ज्येष्ठांसाठी काम करतो, तर कुणी शिक्षणाच्या प्रसारासाठी काम करतो, नाशिकचे अशोक जांदे मात्र भटक्या कुत्र्यांसाठी काम करतात. गेल्या २५ वर्षापासून त्यांचा हा नित्यक्रम सुरु असून, वयाच्या ६८ व्या वर्षी रोज भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी रात्रभर फिरत असतात.

अशोक जांदे हे मुळचे नाशिकचे त्यांचे बालपण मोदकेश्वर मंद‌रिाजवळील एका वाड्यात गेले. गंगेच्या काठावर वास्तव्य असल्याने अनेक साधूसंतांचे त्यांच्या घरी येणे जाणे होते. त्यापैकी एक हनुमानदास महाराज त्याच्याकडे आले असताना त्याच्या आईला म्हणाले, 'पाण्यातील मासे भुकेने मरता आहेत त्यांना काही तरी खायला दे.' क्षणाचाही विलंब न लावता अशोक जांदे यानी घरातील डब्यातून कणकेचे पीठ घेऊऩ माशांना खाऊ घातले. अशोक जांदे यांचे शालेय शिक्षण रुंग्ठा हायस्कूल आणि पेठे विद्यालयात झाले. या दोन्ही शाळेत शिकत असताना त्यांच्यावर असलेले समाजसेवेचे संस्कार आणखी दृढ होत गेले. एकदा त्यांनी भिकाऱ्याला पाच रुपये दिले. त्याने ते पैसे त्याच्या अंगावर भिरकावून दिले आणि 'दहा रुपये द्या' असे सांगितले. तेव्हापासून धडधाकट व्यक्तीला पैसे द्यायचे नाहीत, असे ठरवून मुक्या जनावरांची सेवा करायची असा निश्चय केला. सुरुवातील घरची परिस्थिती जेमतेम असल्याने फार खर्च करणे शक्य होत नसे. कालांतराने घरची परिस्थीती सुधारल्यानंतर समाजसेवा आणखी वृध्दींगत होत गेली. सुरवातीला एक बिस्क‌टिचा पुडा आणि एक दुधाची पिशवी घेऊन दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालत होते. कालांतराने हीच सेवा जीवनाचा अविभाज्य घटक बनली.

रात्री १ वाजता जांदेंचा दिवस सुरु होतो. झोपेतून उठल्यानंतर १.३० ते १.४० दरम्यान दुधाच्या १० पिशव्या आणि बिस्कीटचे २० पुढे बरोबर घेऊन ते घराबाहेर पडतात. द्वारका येथून निघाल्यानंतर कानडे मारुती लेनमधील मारुती मंद‌रिाजवळ त्यांचा पहिला स्टॉप असतो. जुन्या तांबट गल्लीजवळ गाडी आल्याचा सुगावा लागताच परिसरातील कुत्री मंद‌रिाजवळ पोहचतात. जांदें बरोबर असलेल्या पातेल्यात दुधाची पिशवी रिकामी करुन बिस्क‌टिाचे पुडे उघडले जातात. जमलेली कुत्री बिस्क‌टि खात असताना तेवढ्यावेळेत मारुतीचे दर्शन होते. तेथून गंगेवर असलेल्या खंडेराव मंद‌रिाकडे जांदे पोहचतात. येथे देखील त्याची सेना वाट पहात असते. येथेही एक दुधाची पिशवी आणि कुत्र्यांची संख्या पाहून जांदे बिस्क‌टि खाऊ घालतात. त्यानंतर रामसेतूच्या मध्यभागी कुत्र्यांची पंगत बघण्यासारखी असते. काहीही शिकवलेले नसताना कुत्री रांगेत येऊन बिस्क‌टि खातात. त्यांनतर सांडव्यावरच्या देवी मंद‌रिात काही कुत्री असतात त्यांना बिस्क‌टिे दिल्यानंतर कपालेश्वर मंद‌रिातील कुत्री आणि एक मांजर वाट पहात असते त्याना खाऊ घातल्यानंतर काळाराम मंद‌रि, नागचौक येथील कुत्र्यांना दूध पाजून जांदे सकाळी ५.३० वाजता घरी पोहचतात. गेल्या २५ वर्षापासून त्यांचा हा क्रम सुरु आहे. फक्त कुत्र्यांचीच सेवा करतात, असे नाही तर आठवड्यातून एक दिवस भटक्या गाईना हिरवा चारा सुध्दा ते खाऊ घालतात. कुत्र्याला बोलता येत नसले तरी त्याच्या डोळ्यातील भाव मला सगळे काही सांगून जातात असे ते म्हणतात.

एखादं कुत्र आजारी असेल तर मला लगेच त्याच्या भावना समजतात. तो देखील आपल्या डोळ्यातून व्यथा सांगतो. कुत्र्यांना फक्त खाऊ घालणे इतकेच जांदे करत नाही तर एखाद्या कुत्र्याला जखम झाली असेल तर जखमेवर हळद लावणे, सोफ्रामायसन किंवा बेटाडीनसारखा मलम लावणे हे देखील काम ते करतात. आजपर्यंत एकदिवस देखील त्यांनी खाडा केलेला नाही. गस्तीवर असलेल्या पोलिसांना देखील जांदेची वेळ माह‌तिी झाली आहे. रात्रीच्यावेळीच तुम्ही हे काम करतात असे विचारल्यावर जांदे म्हणतात. समाजसेवेच प्रदर्शन करायला मला आवडत नाही, रात्रीच्या अधारात मी चांगले काम करतो याचे मला समाधान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images