Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नवनिर्माणासाठी झाडांवर कुऱ्हाड?

$
0
0

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या संकल्पनेतून पांडव लेणीशेजारी असलेल्या ९३ हेक्टर वनजमीनीवर बोटॅनिकल गार्डन साकारण्यात येत आहे. टाटा फाऊंडेशन सीएसआर निधीतून हे बोटॅनिकल गार्डन विकसित केले जात असून त्याचे कामही सुरू आहे. परंतु, या गार्डनमध्ये पाथवे करण्यासाठी १७४ औषधी झाडे आडवी येत आहेत. त्यामुळे ही झाडे तोडण्याची मागणी टाटाने महापालिकेकडे केली आहे. महापालिकेने ही १७४ झाडे तोडण्यासाठी थेट वनविभागाकडे अर्ज केला आहे. पांडवलेणीतील झाडे तोडण्याचा वाद जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित असतांनाच संभाव्य वृक्षतोडीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सोलर सेन्सर बसविणार टाटातर्फे बोटॅनिकल गार्डनचे काम सुरू करण्यात आले असून गार्डनच्या सुरक्षेसाठी चार किलोमीटरचे सोलर फेन्सिंग बसविण्यात येणार आहे. या सोलर फेन्सिंगमुळे गार्डनमध्ये कोणी अनधिकृत प्रवेश केल्यास तत्काळ यंत्रणेला समजणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणुकीसाठी मनसेचे मुस्लिम कार्ड

$
0
0

मनसेने महापौरपदाच्या निवडणुकीत दोन वेळा ओबीसी समाजाला संधी दिल्याने महापौरपदाच्या शर्यतीत असलेले मुस्लिम व मराठा उमेदवार दुखावले होते. महापौरपदाच्या शर्यतीत सलिम शेख दोन वेळा होते. गेल्या वेळी शेख हेच महापौर होणार असे मानेले जात होते. मात्र, ऐनवेळी अशोक मुर्तडक यांची लॉटरी लागली होती. स्थायी अध्यक्षपद महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचे पद असले तरी त्यास महासभेतच किंमत असते. त्यामुळे सभागृहनेतेपदावर शेख समाधानी नव्हते. चालू पंचवार्षिकचे हे शेवटचे वर्ष आहे तर योगायोगाने सभापतीपद मनसेच्या वाट्याला आले. त्यामुळे सभापतीपदावर जाण्याची इच्छा शेख यांनी व्यक्त केली. मनसेनेही मुस्लिम मतांचा विचार करून त्यांना उमेदवारी बहाल केली. महापौरपदाच्या वेळी शेख यांनी केलेल्या 'मदती'ची पक्षाने परतफेड केल्याचे मानले जात आहे.

सभागृहनेतेपदी मराठा उमेदवार मनसेने महापौर पदावर दोन वेळा ओबीसींना संधी दिली आहे.आता स्थायी समितीवर सलिम शेख यांच्या रुपाने मुस्लिम समाजाला महत्त्व दिले आहे.तर शेख यांच्या राजीनामाने रिक्त होणाऱ्या सभागृह नेेते पदावर आता महिला किंवा मराठा समाजाला संधी दिली जाणार असून जातीपातीचे गणित पूर्ण केले जाणार आहे.मनसेतील मराठा महिलेची सभागृहपदावर संधी लागून महीलांसह मराठा समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्टँडिंग’साठी काँग्रेसचे ‘अंडरस्टँडिंग’

$
0
0

शहर काँग्रेसमधील अनागोंदी अजूनही कायम असून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक यांच्यात कोणतेही तालमेल नसल्याचे चित्र अजूनही कायम आहे. स्थायी समितीसाठी प्रदेश काँग्रेसकडून लक्ष्मण जायभावे यांचे नाव आले असतांना गटनेता शाहू खैरे यांनी स्वतःचे नाव देत पक्षाला आव्हान दिले होते. त्यामुळे थेट पक्षप्रभारींना मुंबईहून नाशिकला धाव घ्यावी लागली होती. हा वाद मिटला असतांनाच स्थायी समितीसाठी कोणाला मतदान करायचे यासंदर्भात पक्षाने शेवटपर्यंत स्पष्ट भूमिका घेतली नाही. दोन दिवसापूर्वी गटनेता शाहू खैरे यांनी आम्ही महाआघाडीत नसल्याचे सांगत, 'आरपीआय'ला मतदान करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, मंगळवारी रात्री काँग्रेसचे लक्ष्मण जायभावे हे मनसेच्या कॅम्पमध्ये दाखल झाले. त्यापाठोपाठ विमल पाटील यांनीही मनसेचा रस्ता धरला. सदस्यांच्या भूमिकेची पूर्व कल्पना शहराध्यक्ष शरद आहेर यांना असतांनाही त्यांनी कोणत्याही भूमिका घेतली नाही. कोणत्या पक्षाला

मतदान करायचे याचा आदेश शेवटपर्यंत शहराध्यक्षांनी दिला नसल्याने सदस्यांनी ऐनवेळी मनसेच्या पारड्यात मते टाकून आपण महाआघाडीत असल्याचे सांगितले.

पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. त्यामुळे शहराध्यक्षांनी कोणाला मतदान करावे याचे आदेश सदस्यांना देणे अपेक्षित होते. मात्र, सभागृहात प्रवेश करेपर्यंत कोणताच आदेश काढला नसल्याने सदस्यांनी आपली सोयीची भूमिका घेत काँग्रेस कार्यालयाच्या घरपट्टीची वसूली करून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायीच्या चाव्या मनसेच्या हाती

$
0
0

महापालिकेतील महाआघाडीने शेवटच्या क्षणी एकीचे दर्शन घडवत, युतीच्या आरपीआय कार्डला धूळ चारली आहे. शेख यांच्या निवडीनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने पंचवार्षिकच्या शेवटच्या वर्षी सभापतीपद आपल्याकडे राहण्यासाठी सत्ताधारी मनसेने सर्व शक्ती पणाला लावली होती. मनसेने राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष व काँग्रेसची एकत्रित मोट बांधत सभापतीपदावर दावा ठोकला होता. विजयासाठी अपेक्षित नऊचा आकडा मनसेने आधीच पूर्ण केल्याने बुधवारी या पक्षाच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. पावणे अकरा वाजता मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष असे ११ सदस्य सभागृहात दाखल झाले. सभापतीपदासाठी मनसेतर्फे सलिम शेख यांच्या रुपाने तगडा उमेदवार मैदानात असल्याने भाजप-सेनेने आरपीआयकार्ड खेळत पराभवाची औपचारिकता पूर्ण केली. अर्ज माघारी घेण्याच्या दहा मिनिटे अगोदर शिवसेना व भाजपच्या सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या दिनकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतल्याने सलिम शेख आणि प्रकाश लोंढे यांच्यात सरळ सामना झाला. मनसेतर्फे शेख यांच्यासह अशोक सातभाई, मेघा साळवे, यशवंत निकुळे, सुरेखा भोसले, 'राष्ट्रवादी'चे संजय साबळे, समाधान जाधव, रंजना पवार, काँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, विमलताई पाटील, अपक्ष रशिदा शेख असे ११ सदस्यांनी मतदान केले. तर लोंढे यांच्या बाजूने लोंढेसह मनीषा हेकरे, मंगला आढाव, दिनकर पाटील, फुलाबाई बोडके यांनी मतदान केले. त्यामुळे शेख यांना ११, तर लोंढे यांना ५ मते मिळाल्याने पीठासन अधिकारी रावसाहेब बागडे यांनी शेख यांच्या निवडीची घोषणा केला.

बंदोबस्ताअभावी निवडणूक

स्थायी समिती निवडणुकीत राडा होत असल्याने दरवर्षी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त लावला जातो. परंतु, यावेळेस सलिम शेख यांनी एकतर्फी विजयाचे गणित जुळवून लावले असल्याने पोलिसांनी बंदोबस्ताकडेच पाठ फिरवली. त्यामुळे प्रथमच महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनीच पूर्ण सुरक्षा सांभाळत निवडणूक प्रक्रिया पार पाडली. शेवटच्या क्षणी गोंधळ होताच पोलिस दाखल झाले. त्यामुळे राडा होणारच नाही, अशी पूर्वकल्पना पोलिसांना होती की काय अशी चर्चा होती.

आरपीआय पदाधिकाऱ्यांची दादागिरी स्थायी समितीतील पराभव आरपीआयचे पदाधिकारी पचवू शकले नाहीत. सभापती निवडीनंतर रामायणजवळ मनसेचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करतांना, आरपीआयच्या काही पदाधिकाऱ्यांनी जल्लोषाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. ढोल ताशे बंद करीत, काही जणांना मारहाण करण्यापर्यंत या पदाधिकाऱ्यांची मजल गेली होती. त्यामुळे मनसे-आरपीआय कार्यकर्ते एकमेकांना भिडले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वाद सोडवला.

युतीची खेळी अपयशी मनसेला नामोहरण करण्यासाठी शिवसेना-भाजपतर्फे ऐनवेळी आरपीआयकार्ड खेळण्यात आले. महाआघाडीत दलित मते आपल्या पारड्यात पडतील, या हिशेबाने प्रकाश लोंढे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, महाआघाडीतील सदस्यांची एकजूट कायम राहिल्याने युतीची खेळी अपयशी ठरली. चालू पंचवार्षिकमध्ये मनसेला तिसऱ्यांदा सभापतीपदाचा मान मिळाला आहे. आर. डी. धोंगडे, राहुल ढिकले यांच्यापाठोपाठ आता सलिम शेख यांच्या रुपाने हाती तिसऱ्यांदा स्थायीच्या चाव्या आल्याने शेवटच्या वर्षी मनसेला नवनिर्माण करून देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मनसेने दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची सुंदर व स्वच्छ नाशिकची संकल्पना पूर्ण करू. सर्वपक्षीय सदस्यांना सोबत घेऊन नाशिकचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ. - सलिम शेख, नवनियुक्त सभापती, स्थायी समिती

आरपीआयला पाठिंबा देवून शिवसेना-भाजपने शब्द पाळला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार केवळ बोलण्यापुरताच असल्याचे काँग्रेस राष्ट्रवादीने कृतीतून दाखवून दिले आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला आहे. - प्रकाश लोंढे, आरपीआय, उमेदवार

महापालिकेतील अपक्ष महाआघाडीचा हा निर्णायक विजय आहे. सर्वपक्षीयांना सोबत घेवून आम्ही नाशिकचा विकास करीत आहोत. जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. - अशोक मुर्तडक, महापौर, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्री हाणामारी; सकाळी मात्र दिलजमाई

$
0
0

पाणी, वीज, टीडीआरच्या प्रश्नांवरून नाशिकमध्ये भाजप विरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी स्वतंत्र मराठवाड्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेने अधिक आक्रमक होत त्यांच्या नाशिकमधील कार्यक्रमावर हल्ला चढवत, तोडफोड केली. तर भाजपनेही शिवसेनेला प्रतिउत्तर देत, रस्त्यावर उतरले. या दोन्ही पक्षांच्या भांडणामुळे मात्र नाशिककर रात्रभर वेठीस धरले गेले. शहरातील अनेक भागात या दोन्ही पक्षातील भांडणामुळे तणाव होता. त्यामुळे शिवसेना व भाजपमध्ये तणाव निर्माण होवून दोन्ही पक्ष वेगळेच राहतील असे चित्र होते.

शिवसेना-भाजपमधील संघर्ष बुधवारी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत समोर येईल असे वाटत होते. परंतु, निवडणुकीत शिवसेना-भाजपने एकत्रीत येवून 'आरपीआय'च्या मागे आपले बळ उभे केले. विशेष म्हणजे शिवसेना व भाजपचे सदस्य सत्तेसाठी एकत्रितच सभागृहात दाखल झाले. 'आरपीआय'चे लोंढे चमत्कार करतील अशा अपेक्षेने दोन्ही पक्षांनी जोर लावत सत्तेसाठी रात्रीची हाणामारी विसरले. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या हाणामारीच्या राजकारणावरही आता शंका उपस्थित केल्या जात आहेत. सत्तेसाठी एकत्र यायचे आणि जनतेच्या प्रश्नांचा कळवळा दाखवित एकमेकांच्या विरोधात भांडणाची नौटंकी करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मनसेने या दोन्ही पक्षांच्या राजकारणावर टीकास्र सोडले आहे.

'आरपीआय'सोबत राहण्याचा निर्णय शिवसेना व भाजपने घेतला होता. त्यामुळे आम्ही युतीधर्माचे पालन करत स्थायीसाठी युती म्हणून एकत्र आलो. यात कोणतेही राजकारण नाही. - दिनकर पाटील, नगरसेवक, भाजप

घोडेबाजार थांबावा म्हणून आम्ही महाआघाडी केली आहे. परंतु, शिवसेना-भाजपमध्ये काल रात्री हाणामाऱ्या झाल्या आणि सकाळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत आहेत. सत्तेसाठी एकत्र आणि जनतेसाठी नौटंकी या दोन्ही पक्षामंध्ये सुरू आहे. - राहुल ढिकले, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस संस्थांपासून बचावासाठी अलर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दहावी अन् बारावीच्या परीक्षेपाठोपाठ आता व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शैक्षणिक संस्थांना त्यांचा प्रवेशाचा कोटा भरण्याचे वेध लागले आहेत. या संस्थांप्रमाणे मुख्य यंत्रणांची मान्यता अन् संलग्नतेवाचून अस्तित्वासाठी झटणाऱ्या बोगस संस्थांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन डीटीई (तंत्रशिक्षण संचलनालय) ने विद्यार्थ्यांना अलर्ट दिला आहे.

विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतेवेळी त्या संस्थेतील अभ्यासक्रमाची मान्यता अन् डीटीईशी असणारी संलग्नता याची खात्री स्वत: करून घ्यावी. गरजेनुसार तंत्रशिक्षण संचलनालयाशी संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्याच्या अगोदर त्या संस्थेशी संलग्नात व संबंधित अभ्यासक्रमांना असणारी मान्यता तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संचलनालयाच्या वेबसाईटवर मान्यताप्राप्त संस्थांची यादी देण्यात आली आहे. या यादीचा संदर्भासाठी उपयोग करावा. संस्थाच्या अधिक माहितीसाठी संचलनायाशी संपर्क साधला तरीही मार्गदर्शन करण्यात येईल.

शैक्षणिक संस्थांना मान्यता देणाऱ्या संस्थांमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, विद्यापीठ अनुदानआयोग यासारख्या संस्थांचा समावेश आहे. तर अभ्यासक्रमांमध्ये राज्यातील इंज‌िनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, एमबीए, एमएमएस, एम.फार्मसी, एमई, एम.टेक., एमएचएमसीटी आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी dtemaharashtra.gov.in या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुभाष देसलेंची अखेर हकालपट्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष देसले यांना बेकायदेशीर मुदतवाढ भोवली असून त्यांनी हकालपट्टी ओढवून घेतली आहे. त्यांच्या विरोधातील वाढत्या तक्रारी आणि नाबार्डच्या आक्षेपामुळे जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यावर दबाव आल्यानंतर त्यांनी देसले यांना पदावरून हटव‌लिे आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर प्रभारी म्हणून यशवंत शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेचा कारभार आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सुभाष देसलेंची नियुक्ती वादग्रस्तच ठरली आहे. संचालक मंडळांला हाताशी धरून देसलेंनी कार्यकाळ संपल्यानंतरही ३१ मे २०१७ पर्यंत कार्यकाळ वाढवून घेतला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. म्हणून धुळे जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीही नेमण्यात आली होती. देसले यांच्या संदर्भात विभागीय आयुक्तांकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच देसले यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी द्विसदस्यीय समितीने पूर्ण करून तसा अहवाल जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक तसेच जिल्हा बॅँकेकडे पाठविला होता. ठाकूर यांच्या चौकशी अहवालात देसले यांना नाबार्डने दिलेल्या मुदतवाढीबाबत प्रश्न उपस्थित करून त्यांची मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचा शेरा मारला होता. त्यामुळे देसले यांची गच्छती अटळ मानली जात होती.

प्रशासकीय पातळीवरच विद्यमान संचालकांची नाराजीही देसलेंना भोवली. त्यामुळे दराडेंनी तातडीने त्यांना पदावरून हटव‌ण्यिाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियुक्तीच्या एक वर्षाआधीच देसलेंना पदावरून दूर व्हावे लागले आहे. देसलेंचे समर्थन करणारे संचालक आता अचडणीत येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील शिलालेख दुर्लक्षित !

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com
ना‌शिक : इतिहासाची साक्ष देणारे व अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे शिलालेख नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असले तरी ते दुर्लक्षीत आहेत. जिल्ह्यात जवळपास ५० दुर्मिळ आणि प्राचीन स्वरुपाचे शिलालेख आहेत. पण, या शिलालेखांच्या जतनासाठी सरकारी पातळीवर असलेली निराशाही या शिलालेखांच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरत आहे.

कळवण तालुक्यातील हतगड किल्ल्यावर ४६९ वर्षांपूर्वीचा शिलालेख नुकताच सापडला आहे. नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी जवळपास ५० शिलालेख असून त्यांचे योग्य पद्धतीने जतन होणे आवश्यक आहे. भारतात सर्वात जास्त शिलालेख असणारा किल्ला म्हणजे मालेगाव तालुक्यातील गाळणा किल्ला होय. नाशिक जिल्ह्यात मालेगावजवळ गाळणा टेकड्यांच्या डोंगररांगेत हा गड वसला आहे. गिरिदुर्ग प्रकारातील सुमारे २ हजार फूट उंचीच्या गाळणा किल्ल्याची इतिहास काळात 'बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार' म्हणून ओळख होती. या किल्ल्यात सर्वात जास्त म्हणजे ३० शिलालेख आजही व्यवस्थीत स्थितीत आढळतात यातील काही शिलालेख पर्शियन लिपीतील आहेत तर काही शिलालेख देवनागरी लिपीतील आहेत. निजामशाहीच्या काळातील १३९० ते १६३५ या कालावधीतील हे शिलालेख आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या आशेवाडीजवळ असलेल्या रामशेज किल्ल्यावर देखील पेशवेकालीन देवनागरी शिलालेख आहेत. चांदवडजवळ असलेल्या धोडप आणि इंद्राई या किल्ल्यावर पर्शियन भाषेतील मुगलकालिन शिलालेख आजही चांगल्या अवस्थेत आहेत. त्याच प्रमाणे अलंग किल्ल्यावर एक महत्त्वाचा शिलालेख आहे. औरंगजेबाचा सरदार महासिंग भादुरीया याच्यासंबंधी हा शिलालेख माहिती देतो. त्याची बायको या किल्ल्यात सती गेली त्या संबंध‌िचा उल्लेख या शिलालेखात आहे. नुकताच हतगड किल्ल्याच्या परिसरात दोन शिलालेख सापडले असून त्यातील एक शिलालेख अस्पष्ट तर दुसरा शिलालेख अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. धोडप किल्ल्यावर असलेल्या काही शिलालेखांच्या कपच्या निघायला सुरुवात झाली असून काही शिलालेखांवर चुना फासण्यात आला आहे.

अंजनेरीच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात संस्कृत शिलालेख आहे. हे शिलालेख यादवकालिन असून आजही अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरतो. त्याचप्रमाणे साल्हेर-मुल्हेर येथे देखील शिलालेख असून त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यावर प्रक्रिया जपण्याची आवश्यकता आहे.

नाशिक जिल्ह्यात शिलालेखांचा मोठा साठा आहे. त्याची जपणूक करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणतेही पावलं उचलीत नसून आहे ती शिलालेख नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यातील काही शिलालेख अत्यंत जीर्ण झाले असून या शिलालेखांवर रासायनिक प्रकिया करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या शिलालेखांच्या सुरक्षेसाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे याला धोका निर्माण झाला आहे. या शिलालेखांच्या संरक्षणाचेी जबाबदारी सरकारने घेतली पाह‌िजे, अशी मागणी इतिहास अभ्यासकांकडून होत आहे.

सरकारने किल्ले व शिलालेखांच्या संरक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्यास नाशिक शहराचा वारसा सुरक्षित ठेवता येईल. निधी नसल्याने पुरातत्व खाते देखील हतबल आहे.

गिरीश टकले, शिलालेख अभ्यासक



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्रिवेणी संगमा’मुळेच वसाका रुळावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

राज्य सरकारचे थकहमीपत्र, राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जाचे केलेले पुनर्घटन व आर्थिक मदत करून जिल्हा बँकेने दिलेली साथ या त्रिवेणी संगमामुळे राज्यात 'नवीन पॅटर्न' तयार करून वसाकाची चिमणी पुन्हा पेटव‌तिा आली. यासोबतच गेल्या तीन वर्षांपासून कारखान्याच्या कामगारांनी कोणताही मोबदला न घेता कारखाना चालू करण्यासाठी दिलेली मोलाची साथ ही अभिनंदनीय आहे, असे मत कारखान्याचे मुख्य प्राधिकृत अधिकारी तथा आमदार डॉ. राहुल आहेर यांनी व्यक्त केले.

गुरुवारी वसाकाच्या ३० व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ व अखेरच्या साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते.

गळीत हंगामाच्या अखेरच्या साखर पोत्याचे पूजन आमदार डॉ. राहुल आहेर, प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा आहेर, जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, बाळासाहेब बच्छाव, अभिमन पवार, यांच्यासह कारखान्याचे माजी संचालक व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी संचालक वसंतराव निकम, प्रभाकर पाटील, मधुकर शेलार, शिवाजी सोनवणे ,कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे आदींनी मनोगत व्यक्त करून 'वसाका पॅटर्न'चे कौतुक केले.

आमदार डॉ. आहेर पुढे म्हणाले, सुदैवाने यावर्षी साखरेच्या भावात वाढ झाली असल्याने त्याचा लाभ मिळणार आहे. कारखान्याच्या आदिवासी सभासदांसाठी सरकारकडून एक कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे कारखान्याच्या आगामी वाटचालीस बळ मिळेल. हे सगळे पाहता कारखाना खरेच चालू होईल का? असे म्हणणाऱ्यांना आपण आपल्या कामातून उत्तर दिल्याने आज खऱ्या अर्थाने आनंद होत आहे. वसाकाच्या ३० गळीत हंगामात ९१ हजार ९७७ मेट्रिक टन उसाचे गाळप होवून ९३ हजार ९१० क्विंटल (पोती) साखरेचे उत्पादन होऊन १०.२१ इतका साखर उतारा मिळाला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

याप्रंसगी माजी संचालक संतोष मोरे, रामदास देवरे, फुला जाधव, शांताराम जाधव, पंचायत समितीचे सभापती अशोक बोरसे ,हिरामण पगार, मधुकर पगार, शरद गुंजाळ,विलास निकम ,माणिक निकम, जयवंत पाटील वसाका मजदूर युनियनचे सरचिटणीस रवींद्र सावकार शेतकी अधिकारी संजय दिघे, सभासद, शेतकरी, कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यकारी संचालक बी. डी. देसले यांनी केले. कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठी पारंपरिक वीरांचा जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुताऱ्यांसह ढोल-ताशांचा आवाज, त्या आवाजाच्या ठेक्यावर नाचणारे वीर, देवीदेवतांचे रंगवलेले मुखवटे आणि चिमुरड्यांनी केलेल्या विविध वेशभूषा असो माहोल होता, होळीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धूलिवंदनाला प्रथेनुसार निघालेल्या वीरांच्या मिरवणुकीत. पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत वीरांची मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकातील होळीभोवती विविध देवदेवतांच्या तसेच महापुरुषांच्या वेशभूषेत सजलेले वीर मिरवणुकीत सहभागी झाले.

सायंकाळी गंगाघाट परिसरात वीरांची मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांसह खंडेराव, श्रीकृष्ण, भगवान शंकर, हनुमान आदी देवदेवतांच्या वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले. वीरांना पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन असते. याच दिवशी बाशिंगे आणि दाजिबा वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. येथील होळीला वीरांकडून प्रदक्षिणा घालण्यात आली. खोबऱ्याच्या वाटीसह नवीन कापडात गुंडाळलेल्या देवतांचे टाक म्हणजेच प्रतिमांना गोदाजलाचा अभिषेक यावेळी घालण्यात आला. लहान मुलांना खांद्यावर घेऊन नागरिक वाद्याच्या चालीवर नाचतांना दिसून आले.

..

रंगली दाजिबा वीराची मिरवणूक (फोटो)

जुन्या नाशकातील बुधवार पेठेतून दुपारी चार वाजता मानाच्या वीर दाजिबा मिरवणुकीला प्रारंभ केला. वाघ्या-मुरळीच्या वाद्यवृंदात नाचत-गाजत वीरांच्या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. परिसरातील युवकांनी नाचत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नवसाला पावणारा म्हणून श्रद्धा असल्याने नागरिकांनी वीराला बाशिंगाचा जोड, हार, नारळ अर्पण केले. बुधवार पेठ, डिंगरअळी, संभाजी चौक, जुनी तांबट गल्ली, म्हसरूळ टेक, तिवंधा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा या मार्गे 'वीर' मिरवणूक गोदाघाटावर पोहचली.

..

वीरांचे जल्लोषपूर्ण नृत्य

गोदाघाटावरील सर्वात मोठ्या होळीभोवती वीर प्रदक्षिणा घालतात. घरातील देव्हाऱ्यात आपल्या वंशपरंपरागत आजोबा आजी यांचे वीर म्हणजेच चांदीचे टाक असतात. हा टाक खोबऱ्याच्या वाटीत टाकून त्याभोवती लाल कपड्याने (बसन) बांधण्यात येते. त्यानंतर ही खोबऱ्याची पाटी घेऊन होळीभोवती प्रदक्षिणा मारण्यात येतात. होळीभोवती फिरणाऱ्या चैतन्यकणांनी अनेक आजार दूर होतात तसेच उत्साह प्राप्त होतो अशी आख्यायिका असल्याने होळीभोवती फेर धरून वीर जल्लोषात नाचले.

..

डफ-सुंदरी वादक उत्साहात

चारही दिशेने येणारे वीर गोदाघाटावर जमा होतात. या वीरांसोबत घरातले वीर नाचविण्याचीही पध्दत असल्याने गोदाघाटाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या ठिकाणी हौशे-नवशे-गवशे जमा झाल्याने प्रचंड प्रमाणात गर्दी झाली. वीर पाहण्यासाठी नाशिककर गोदाघाटावर सजून आलेले होते. यात विशेष म्हणजे चिमुरड्यांची विविध वेशभूषा करून त्यांना नाचण्यासाठी आणण्यात आले. डफ आणि सुंदरी वाजवणारेही या वीरांना नाचविण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना त्यासाठी दहा-वीस रुपये मिळतात. ज्यावेळी घरून कुणी वीर घेऊन येते तेव्हा दोन-पाच मिनिटे या डफवाल्यासमोर नाचायचे, तोदेखील चांगला ताल देऊन वाजवत असतो. त्यानंतर त्याला बिदागी म्हणून काही पैसे द्यायचे असे डफ वाजवणारे गोदाघाटावर विखुरलेले होते.



शिंगवे बहुला येथे वीरांची मिरवणूक

बुधवारी होळी उत्साहात साजरी झाल्यानंतर गुरुवारी शिंगवे बहुला येथे वीरांची मिरवणूक काढण्यात आली. फाल्गुन वद्य प्रतिपदेला वीरांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. घरातील पूर्वजांचे टाक म्हणजेच वीर खोबऱ्याच्या वाटीसोबत बांधून लहान लहान मुलं हे वीर घेऊन नाचतात. यावेळी लहान मुलांनी आकर्षक वेष परिधान केले होते. डोक्यावर आकर्षक फेटे, हातात तलवारी, यांमुळे वीर लक्ष वेधून घेत होते. गावामध्ये या वीरांची मिरवणूक काढून त्यानंतर होळीला पाच प्रदक्षिणा घातल्या गेल्या. त्यानंतर वीरांना सन्मानाने घरी आणून वीरांची तळी भरून खोबरे वाटी प्रसाद म्हणून वाटली जाते. यावेळी गावातील वातावरण उत्साहाने भारून गेले. शेकडो वर्षांपासून गावात ही परंपरा पाळली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घेईल त्याची आडत’ला उपनिबंधकांकडून खतपाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील बाजार समितीत घेईल त्याची आडत पद्धत बेकायदेश‌ीरपणे सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा उपनिबंधकांनी ही पद्धत बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाही ही पद्धत सुरू आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच शेत मालाचा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी दाभाडी येथील प्रगतिशील शेतकरी अंबुदास नारायण निकम यांनी केली आहे.

येथील सरकारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मालेगाव बाजार समितिकडून बेकायदेशीर घेईल त्याची आडत पद्धतीला कशा पद्धतीने अभय दिले जाते आणि यामुळे शेतकऱ्याचे कसे आर्थिक नुकसान होते आहे याबाबत माहिती दिली. निकम म्हणाले की, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सहकार पणन कायद्याने बाजार समिती अंतर्गत शेतकरी (विक्रेता) आडत्या (खरेदी विक्री मध्यस्थ) खरेदीदार (व्यापारी) असे तीन घटक अंतर्भूत असतात.

यातील आडत्या हा शेतमालाच्या विक्रीनंतर शेतकाऱ्याला मालाचे पैसे खरेदीदाराच्यावतीने रोख स्वरुपात देतो. या बदल्यात शेतकरीकडून ३ ते १० टक्के आडत कपात केली जाते.

यातून आडत्या कोट्यवधी रुपये कमावतो. ही बाब व्यापाऱ्यांनी लक्षात घेत 'घेईल त्याची आडत' ही बेकायदेशीर पद्धत जन्माला घातली आहे. मालेगाव बाजार समितीत देखील हीच पद्धत सुरू असून लाखो शेतकऱ्यांची लूट होत आहे.

दरम्यान याबाबत आपण अनेकवेळा बाजार समिती प्रशासन सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे वारंवार तक्रार केली आहे.

जिल्हा निबंधकांना माहिती अधिकारात पाठविलेल्या पात्रालाही त्यांनी व्यापऱ्यांच्या हितासाठी केराची टोपली दाखविली आहे. तसेच या प्रकरानवरून गेल्या काही दिवसात जीवे मारण्याच्या देखील धमक्या देण्यात आल्याचे त्यांनी संगितले. मालेगाब बाजार

समितीत सुरू असलेली बेकायदेशीर पद्धत बंद करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा विद्यमान सभापती संचालक व सचिव यांच्या

विरोधात कायदेशीरपणे न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा इशारा प्रगतिशील शेतकरी अंबुदास नारायण निकम पत्रकार परिषदेत दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व यंत्रणांची माहिती मिळविण्याचा हक्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता यावी, तसेच सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी माहिती अधिकार अधिनियम २००५ ची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय संविधानाद्वारे लोकशाही गणराज्य स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांना या अधिकारामार्फत सर्व यंत्रणांची माहिती मिळवता येऊ शकते किंबहुना तो त्यांचा हक्कच असतो, असे प्रतिपादन माहिती अधिकार तज्ज्ञ अशोक पवार यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत नाशिकमधील मनमाड व येवला येथे कार्यशाळा झाली. समाजातील उपेक्षित घटकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्याप्रसंगी स्थानिकांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये नागरिक व सरकारी माहिती यांमध्ये पारदर्शकता आणणे व त्यातून भ्रष्टाचाराला आळा घालणे आजची गरज आहे. सरकार व त्यांची यंत्रणा प्रजेला जाब देण्यासाठी जबाबदार असते. या अधिकारामार्फत नागरिकांना सर्व कामकाजाची माहिती घेता येऊ शकते. माहिती म्हणजे नोंदी, कागदपत्रे, शेरे, मेमो, इ-मेल्स, सल्ले, मते, प्रसिद्धीपत्रके, आदेश, परिपत्रके, रोजनिशी, करारनामा, अहवाल, कागद, उदाहरणे, नमुने या आणि अशा स्वरूपातील कोणतेही साहित्य तसेच इलेक्ट्रोनिक माध्यमात असलेली कोणत्याही स्वरूपाची खासगी माहिती, जी प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणास जाणून घेण्याचा अधिकार आहे. अशा अनेक माहिती मिळविण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. याशिवाय सामान्य नागरिकाला या कायद्याविषयी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मनमाडचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे होते. डीवायएसपी राहुल खाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेचे नियोजन विभागीय सहाय्यक प्रकल्प संचालक श्रीकांत आहेर, प्रकल्प अधिकारी बी. वाय. पाटील व जनसंपर्क अधिकारी पल्लवी पगारे यांचा मार्गदर्शनाखाली तालुक्याचे सामतादूत मनोज पांडव व गणेश बच्छाव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता गनिमी काव्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,येवला

महिलांना मंदिर प्रवेश देण्याबाबत सुरू केलेला लढा हा कुठला धर्म अथवा परंपरेच्या विरोधात नसून वाईट रुढींच्या विरोधात आहे. मंदिर प्रवेशाबाबतची ही लढाई सुरूच राहणार आहे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिर प्रवेशाचा पहिला प्रयत्न फसला असला तरी भूमाता ब्रिगेडच्या महिला आता गनिमी काव्याने थेट गाभाऱ्यापर्यंत प्रवेश करतील, असा इशारा ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला.

महिलांना विविध ठिकाणच्या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी सर्वांचेच लक्ष वेधणाऱ्या तृप्ती देसाई गुरुवारी दुपारी निफाड तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी जात असतांना काही वेळ येवल्यात थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भारतीय संविधान अत्यंत महत्त्वाचे असून संविधानाने या देशातील महिलांना पुरुषांबरोबर समान हक्क दिलेले आहेत. या हक्कांसाठीच आमची लढाई सुरू असल्याचे देसाई म्हणाल्या.

शनीशिंगणापूर व त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक रहिवाशी महिला ह्या तेथील परंपरेच्या पगड्याखाली दबल्या गेलेल्या आहेत. संपूर्ण देशातील महिलांचा मंदिरासह शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर प्रवेशासाठी भूमाता ब्रिगेडला मोठा पाठींबा मिळत असल्याचा दावाही देसाई यांनी केला. मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, काँग्रेस यांच्यासह मायावती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्या पाठीशी असल्याचे त्या म्हणाल्या.

केरळसह इतर काही राज्यांमध्ये काही ठिकाणी पुरुषांना मंदिर प्रवेशास बंदी असल्याचे त्यांनी सांगितले. पुरुषांना त्या मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आपण येत्या एप्रिल महिन्यात कोल्हापूरपासून आंदोलनाला प्रारंभ करणार असल्याचेही त्या म्हणाला. त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाबाबत येत्या ३ एप्रिलनंतर मंदिराच्या विश्वस्तांसह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख आणि भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक जिल्हा प्रशासनाने आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग सुट्यांमुळे कोट्यवधींचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

मार्च एण्ड आणि सणासुदीच्या निमित्ताने आलेल्या सलग १२ दिवस सुट्यांमुळे लासलगाव बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा

आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा व धान्य लिलावाचे कामकाज या दिवसात बंद राहणार असल्याने कोट्यवधींचे व्यवहार येत्या ठप्प राहणार आहेत. २३ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत बाजार समिती बंद राहणार आहे. सध्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक सुरू असून ओघ काहीसा थंडावला आहे.

काही दिवसांपासून नवीन उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. मात्र आता मार्च एण्ड व सणानिमित्त सुट्या आल्याने सुटीनंतर पुढील महिन्यात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आवक वाढली की कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दहा दिवसांच्या सुटीत कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

दुष्काळामुळे प्रसंगी टँकरने पाणी आणून उन्हाळ कांद्याला पाणी देऊन पिक जगव‌लिे आहे. याच पिकावर शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न, घरगुती सोहळे, शिक्षण अवलंबून आहे. मात्र १२ दिवसांच्या खंड त्यातच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात येत असलेला कांदा यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ठाणे’दार वाढविणार शिवसैनिकांचे बळ!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेच्या विरोधात भाजपने आमदारांची व वरिष्ठ नेत्यांची फळी मैदानात उतरविल्यानंतर शिवसेनाही जशास तसे उत्तर देणार आहे. भाजप महिला मेळाव्यावरील हल्ल्यानंतर भाजपची आक्रमकता वाढल्याने नाशिकमधील शिवसैनिकांना बळ देण्याची जबाबदारी मातोश्रीवरून ठाण्याचे किल्लेदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिंदे आज, शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत असून, शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शिवाय, कारागृहात असलेल्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह नऊ शिवसैनिकांचीही भेट घेणार आहेत.

पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्या तरी वर्षभरापूर्वीच शिवसेना व भाजपमधील संघर्ष टोकाला पोहचला आहे. शिवसेनेने विविध प्रश्नांवरून मोर्चा काढून भाजपला कोंडीत पकडले आहे. त्यातच मंगळवारी स्वतंत्र मराठवाड्याचे समर्थन केल्यावरून शिवसेना नेत्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह दीडशे शिवसैनिकांनी भाजपचा मेळावा उधळला. त्यामुळे दोन्ही पक्षांतील संघर्ष पोलिस स्टेशनपर्यंत पोहचला. भाजपतर्फे सत्याभामा गाडेकरांसह शिवसैनिकांवर लुटमारीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटक करून त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. भाजपने थेट शिवसेनेची कबर खोदण्याचा इशारा दिला आहे. गृहमंत्रालय मुख्यमंत्र्याकडेच असल्याने सत्तेचा वापर करीत शिवसैनिकांवर अन्याय केला जात असल्याचे भावना निर्माण झाली आहे.

भाजपच्या आक्रमकतेला शिवसेनाही जशासतसे उत्तर देणार असून, त्यासाठी थेट मातोश्रीवरून शिवसेनेचा ठाण्याचा गड शाबूत ठेवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना नाशिकमध्ये धाडण्यात आले आहे. शिंदे शुक्रवारी नाशिकमध्ये येऊन प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते कारागृहात जावून गाडेकरांसह शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवणार आहे. भाजपविरोधातील आक्रमकतेची रणनीती शिंद यांच्या उपस्थितीत आखली जाणार असून, त्यासाठी `ठाणे पॅटर्न` वापरला जाणार आहे. त्यामुळे आता भाजपलाही आक्रमकतेनेच उत्तर मिळणार असल्याने दोन्ही पक्षातील संघर्ष टोकाला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंदिर प्रवेश: तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

केशव ढोन्नर । त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गनिमी काव्यानं त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी त्या इथं आल्या होत्या. स्थानिक महिलांनी यावेळी त्यांना धक्काबुक्कीही केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी त्र्यंबकेश्वरमध्ये तणावाचे वातावरण आहे.

देसाई यांनी याआधीही त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रत्येक वेळी स्थानिक महिलांनी तो हाणून पाडला. त्यामुळं त्यांनी गनिमी काव्यानं गाभाऱ्यात प्रवेश करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज सकाळी साडेनऊच्या सुमारास काही महिला कार्यकर्त्यांसह त्या गावात थडकल्या. देसाई गावात आल्याचे समजताच स्थानिक महिलांनी मंदिरात गर्दी केली. त्याआधीच देसाई मंदिरात गेल्या होत्या. मात्र, नैवेद्याच्या वेळ असल्यानं गाभारा बंद होता. त्यामुळं केवळ पूजा-अभिषेक करून आणि गाभाऱ्याच्या बाहेरून दर्शन घेऊनच त्यांना परत फिरावे लागले.

मंदिरातून बाहेर पडताना देसाई यांना स्थानिक महिलांनी गाठले आणि मंदिर प्रवेशाचा जाब विचारला. देसाई यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. 'मी महिलांना गाभाऱ्यात प्रवेश द्यावा यासाठी त्र्यंबकेश्वराची प्रार्थना करण्यासाठी आले होते. मी धार्मिक वृत्तीची आणि श्रद्धाळू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मी रीतसर दर्शनासाठी येईन,' असं त्या म्हणाल्या. मात्र, संतप्त स्थानिक स्थानिक महिलांनी त्यांच्या या भूमिकेला विरोध केला. 'हे कदापि घडणार नाही. आम्ही तुम्हाला कधीच गाभाऱ्यात प्रवेश करू देणार नाही,' असं म्हणत त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी मंदिरासमोरील पोलीस चौकीबाहेर महिलांचा मोठा जमाव जमला. देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळं तणाव निर्माण झाला. अखेर पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांनी हस्तक्षेप करून देसाई यांना परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांना पोलीस जीपमध्ये बसवले. त्यानंतर स्थानिक महिलांनी पोलिसांच्या वाहनाकडं मोर्चा वळवला. मात्र, लोकांना हटवून पोलीस देसाई यांना घेऊन गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'भुजबळांच्या घरात गरम पाण्याचा स्विमिंग पूल'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माजी मंत्री छगन भुजबळ यांचा नाशिकमधील अलिशान बंगला अशोका बिल्डकॉन या कंपनीच्या पैशांतून उभा राहिल्याचा आरोप भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला. या बंगल्यासाठी कंपनीने ४० कोटी रुपये दिल्याचे पुरावे सक्तवसुली संचालनालय (ईडी), अँटी करप्शन ब्युरो तसेच पोलिसांकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसंच, भुजबळ यांच्या लोणावळ्यातील बंगल्यात गरम व थंड पाण्याचे असे दोन स्विमिंग पूल असल्याचा दावाही त्यांनी केला.

​जिल्ह्यात झालेल्या केबीसी, मैत्रेय तसेच इतर आर्थिक घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आज दुपारी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याशी चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भुजबळांवरील नवीन आरोपांची माहिती दिली. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भष्ट्राचाराचे नवनवीन विक्रम रचले आहेत. भुजबळ सध्या आपल्या कृत्याची फळे भोगत असून पुढील महिन्यात अजित पवार आणि सुनील तटकरे हे सुद्धा जेलमध्ये दिसतील, अशी भविष्यवाणी सोमय्या यांनी वर्तवली. भुजबळांचा नाशिक शहरात अलिशान बंगला आहे. हा बंगला बांधण्यासाठी अशोक बिल्डकॉनच्या अशोक कटारिया यांनी तब्बल ४० कोटी रुपये दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. नाशिकमधील एका रस्त्याच्या कामासाठी अवघ्या ५ कोटी रुपयांचा खर्च होणार होता. मात्र, ते काम ७५ कोटी रुपयांना देण्यात आले. त्यातील ४० कोटी रुपये बंगल्याच्या कामासाठी वापरण्यात आले. लोणावळा येथील भुजबळ यांच्या बंगल्यात गरम पाण्याचा स्विमिंग पूल तसेच थंड पाण्याचा स्विमिंग पूल तयार करण्यात आला होता. हेलीपॅडची सुविधा होती. नाशिकच्या बंगल्यातही असेच काम झाले असून ते जनतेसमोर आणण्यासाठी आपण तिथे भेट देणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान, सोमय्या भुजबळ फार्मला भेट देणार असल्याची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिथे धाव घेतली. कायदा व सुव्यवस्था कायम राखावी, यासाठी शहर पोलिसांनी सोमय्या यांना भुजबळ फार्म हाऊस येथून माघारी पाठवले.

वर्ल्ड कप मॅच सुद्धा प्रायोजित

दक्षिण अफिक्रेत काही वर्षापूर्वी फुटबॉल वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एका महत्वपूर्ण लढतीसाठी समीर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. या दौऱ्याचा सर्व खर्च अशोका बिल्डकॉन या कंपनीने केला होता. जनतेच्या पैशांवरती गब्बर झालेल्या अशोक चव्हाण, सुनील तटकरे, अ​जित पवार, विजय दर्डा यांच्याविरोधात आपली लढाई सुरूच राहणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप म्हणजे भुंकणारं कुत्रं, शिवसेनेची टीका

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

राज्यात सत्तेत एकत्र असूनही भाजप आणि शिवसेना एकमेकांवर चिखलफेकीचे राजकारण करताना पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये भाजपच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी घातलेल्या गोंधळानंतर शहरात भाजप-शिवसेनेचा वाद चिघळत चालला आहे. भाजपवर बोलताना शिवसेनेच्या नेत्यांनी खालची पातळी गाठली.

महिला मेळाव्यात गोंधळ घातल्या प्रकरणी पोलिसांनी १०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच ९ कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आली. त्यानंतर नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी एका पत्रकार परिषदेत भाजपची तुलना थेट कुत्र्यासोबत केली. 'भाजप म्हणजे निव्वळ भुंकणारं कुत्रं आहे, त्यांना सत्तेचा गर्व चढला आहे.' असे शब्द अजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत वापरले. तसेच फर्ग्युसन कॉलेजमधील धक्काबुक्की करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरोधात अशी कारवाई करण्यात येईल का?, असा सवालही अजय चौधरी यांनी केला. तसेच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडे आंदोलक म्हणून बघितले पाहिजे होते, मात्र अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही. शिवसेना अशा कारवाईला घाबरत नाही, असे शिंदे म्हणाले.

दरम्यान, भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर देताना त्यांच्या भाषेवर टीका केली आहे. 'भाजपकडून शिवसेनेवर टीका केली जात नाही. शिवसेनाच आमच्यावर टीका करते. मात्र टीका करताना अशी शिवराळ भाषा वापरणे, महिलांवर हल्ले करणं ही मर्दुमकी वाटत असेल तर काय बोलणार', असा टोला माधव भंडारी यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लामकानी’ प्रकरणी पुण्यातून आरोपींना अटक

$
0
0

२८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

ऐन दिवाळी सणात घरासमोरच सराफ व्यावसायिकावर हल्ला करत सोने-चांदी व रोकड घेवून पोबारा करणाऱ्या लुटारूंचा शोध लावण्यात तालुक्यातील सोनगीर पोलिसांना यश आले आहे. गेल्यावर्षी ९ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी लामकानी गावातील सराफ अनिल उत्तमचंद बाफना यांच्यावर अज्ञात दरोडेखोरांनी बंदूकीने गोळ्या मारत त्यांना गंभीररित्या जखमी केले होते. त्यांच्याकडे असलेले दागिने व रोकडे घेवून ते पसार झाले होते.



दिवाळीच्या दिवशी झालेल्या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली होती. त्यात बाफना यांच्यावर गोळ्याही झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी सोनगीर पोलिसांचे पथक या दरोडेखोरांच्या मार्गावर होते. त्यापैकी तीन जणांना पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले आहे. त्यात गोरख गोविंद राठोड, धरतीपूत्र शंकर राजपूत, लवकुश फुला राठोड (सर्व रा. आंबीमावळ, जि. पुणे) यांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ८,३३,५०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.



या घटनेची माहिती सहायक पोलिस निरीक्षक धनजंय पाटील यांना मिळताच वरीष्ठांना माहिती देवून धुळे जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली होती. मात्र तरीही हे दरोडेखोर पोलिसांच्या तावडीतून निसटले होते. त्यांच्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नेमून तपासचक्रे फिरवली. त्यात दरोडखोरांनी वापरलेल्या मोटारसायकली पुणे, पिंपरी चिंचवड भागातील आढळून आल्या. त्यावरुन पुणे येथील आळेफाटा याठिकाणहून तीन आरोपींना पोलिसांनी पकडले. त्यांनी दिलेल्या कबुली जबाबावरुन सोने-चांदीचे दागिणे हे दौंड जि. पुणे येथील एका सराफाला विकले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तीनही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींकडून जिल्ह्यातील इतर दरोड्यांचेही धागेदोरे गवसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेची क्रांती; युवाशक्तीच्या हाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाला स्वच्छतेच्या वाटेवर न्यायचे असेल, तर प्रत्येकाने सामाजिक भान जपून पाऊल उचलणे आवश्यक आहे. युवकांनी ही बाब गांभीर्याने घेतली, तर निश्चितच हे युवकच स्वच्छतेची क्रांती घडवून महात्मा गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करू शकतील, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व केटीएचएम कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय स्वच्छ भारत अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सोनवणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेकरिता वर्षातून शंभर तास देणे आवश्यक आहे. याप्रमाणे काम केल्यास देशातील स्वच्छतेची मोठी समस्या लोप पावण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला स्वच्छ भारत अभियानाकडे गंभीरतेने बघणे आवश्यक आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे व गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. बी. जे. भंडारे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यशाळेचा उद्देश व नियमित उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धोंडगे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वच्छता हा एक अनमोल संस्कार असून, स्वच्छतेशिवाय आपला विकसनशील देश विकसित होऊ शकणार नाही. स्वच्छता आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची असल्याने प्रत्येकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images