Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिंहस्थातील खर्चाची बेरीज-वजाबाकी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मुख्य पर्वणी होऊन सहा महिने उलटले तरीही काही विभागांनी खर्चाचा अहवाल, उपयोगीता प्रमाणपत्र तसेच गुणवत्ता प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत. अशा विभागांनी बुधवारी (दि. २३) ही प्रमाणपत्रे व खर्चाचा तपशील सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्राप्त निधीपैकी महापालिकेकडे ६१ कोटींचा तर पोलिसांकडे सात कोटींचा निधी शिल्लक राहीला आहे. तर काही विभागांचा प्राप्त निधीपेक्षा साडेसहा कोटींचा अतिरिक्त खर्च झाल्याची बाब पुढे आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून कोट्यवधींचा निधी देण्यात आला होता. कामांच्या प्रगतीनुसार टप्प्याने हा निधी वितरीत करण्यात आला. त्या-त्या वेळी उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पुढील टप्प्यासाठी निधी न देण्याचे धोरण प्रशासनाने अवलंब‌िले होते. शेवटच्या टप्प्यात केलेल्या कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र काही विभागांनी सादर न केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट झाले. राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला निधी आणि प्रत्यक्षात कामांवर झालेल्या खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी सरकारच्या २१ यंत्रणा कार्यरत होत्या. नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्‍वर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोल‌िस, आरोग्य, वीज, पाटबंधारे, महावितरण या खात्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. कामांसाठी सुमारे २४०० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सरकारने त्या-त्या खात्याला निधी उपलब्ध करून दिला. कामे गुणवत्तापुर्ण असावीत, अशी आग्रही भूमिका प्रशासनाची होती. खर्चाचा तपशील, त्या कामाची गुणवत्ता तपासणी, उपयोगीता अहवाल घेण्याची जबाबदारी कुंभमेळा कक्षाकडे सोपविण्यात आली होती.

महापालिकेकडे ६१ कोटींचा तर ग्रामीण आणि शहर पोलिसांकडे प्रत्येकी साडेतीन कोटींचा निधी पडून आहे. हा निधी सरकारकडे परत जाण्याची शक्यता आहे. वितरित केलेल्या निधीनुसार झालेल्या कामांचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात आले.

त्यामुळे हा निधी अडवून ठेवण्यात आला. वन विभाग, वीज महामंडळ, पाटबंधारे, जीवन प्राधिकरण, शहर पोलिस, ग्रामीण पोलिसांकडील अहवाल प्राप्त झाले आहेत. पोल‌िस विभागाकडे सुमारे ७ कोटींचा निधी वापराविना पडून आहे. तो सरकारला परत केला जाणार असून, पुरातत्व आणि रेल्वे विभागाची कामे मात्र कुंभमेळयानंतरही आस्ते कदम सुरू असल्याचे दिसून आले. तसेच कुंभमेळा काळात ऐनवेळी करण्यात आलेल्या सुमारे साडेसहा कोटींच्या कामांचाही खर्च सादर होणे बाकी आहे. हा सर्व अहवाल उद्यापर्यंत सादर करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवकालीन शस्त्रांनी जागविला इतिहास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शिवकाळातील शस्त्रास्त्रांचे वर्णन आपण पुस्तकांमधूनच वाचतो, टीव्हीवर पहातो मात्र, त्यांचे प्रत्यक्ष दर्शन याची देही याची डोळा नाशिककरांना घडल्याने त्यांच्या शिवकालीन गौरवशाली इतिहासाच्या स्मृती जाग्या झाल्या.

जेलरोडच्या आयएसपी व सीएनपी प्रेस शिवनेरी गृपतर्फे जिमखाना हॉल येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शन बुधवारपर्यंत (दि. २३) सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील गिरीश जाधव या शिवप्रेमीच्या संग्रहातील ४५ विविध शस्त्रे बघताना स्फुरण चढते. लातूरचे संग्राहक नंदकुमार भोईटेकर, संयोजक शाम वाघ आदी उपस्थित होते.

प्रदर्शनात दांडपट्ट्यांपासून धनुष्यबाणापर्यंत शस्त्रे बघायला मिळतात. ही शस्त्रे मराठा सैनिक कसे वापरत होते, प्रत्येकाचा उपयोग काय आदी प्रश्नांची सरबत्ती मुले करत होते. मोबाइल कॅमेऱ्यात या शस्त्रांचे फोटो काढण्यात मुले दंग झालेली दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगे झेपावे सौरऊर्जेकडे...!

$
0
0

संतोष मंडलेचा वेगाने वाढणारे औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाच्या परिणामी विविध घटक प्रभावित होत आहेत. या घटकांपैकी वीज हा ही एक प्रमुख घटक. उद्योगांना दिवसेंदिवस सताविणारा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी सौरऊर्जेचा पर्याय अधिकाधिक प्रभावी ठरू शकतो. विजेस असणारी मागणी अन् तिचा पुरवठा करताना निर्माण होणारी ‌तफावत याच्या परिणामी या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसविणे कठीण बनते आहे. ‍

या स्थितीच्या परिणामी तब्बल १२ तासांचे भारनियमनही ग्रामीण भागात बघण्यास मिळते. सलग तीन वर्षांपासून निसर्गाची राज्यावर अवकृपा आहे. पाऊस कमी पडल्याने धरणेही कोरडी पडली असून त्या धरणांवरील वीजप्रकल्प कसे चालवावेत याची सरकारला काळजी आहे. तर दुसरीकडे पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचे साठेही कमी होत आहेत. यामुळे नजीकच्या काळात विजेचे संकट मोठ्या प्रमाणावर उभे राहील यात शंका नाही.

कोळसा वापरून विजेची निर्मिती केली जात असली तरीही मोठ्या प्रमाणावर प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम हा ऋतुचक्रावर पडतो. यामुळे निसर्गातील ऋतुचक्र बिघडले जाते. या सर्वांचा विचार करता आपल्या गरजा भागविण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विचार गरजेचा ठरतो. उद्योगांचा विचार करता वीज हा उद्योगासाठीचा मोठा घटक आहे. विजेला उद्योगाचा आत्माच म्हणता येईल. पूरक प्रमाणात विजेचा पुरवठा न झाल्यास उद्योग चालविणे कठीण होईल. उद्योग बंद पडून बेकारी वाढीला लागेल. सामाजिक जीवनावर याचा मोठा परिणाम होईल. या सर्वांचा विचार करता आपणास अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विचार करणे गरजेचे आहे. हॅण्डबुक ऑफ सोलर रेडिएशन ओव्हर इंडिया यांच्या म्हणण्यानुसार भारतात वर्षाकाठी किमान २५० ते ३०० दिवस सूर्यप्रकाश उपलब्ध होतो. यापासून प्रति तास ४ ते ७ किलो वॅट सौरऊर्जा प्राप्त होऊ शकते. सूर्यापासून मिळणाऱ्या सूर्यकिरणांच्या फोटो व्होल्काईक सेलमार्फत त्याचे विजेत रूपांतर केले जाते यातूनच विजेची निर्मिती होते.

सौरऊर्जेचा वापर घरासोबतच शेती आणि उद्योगातही मोठ्या प्रमाणावर शक्य आहे. घरगूती वापरासाठी आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून त्याद्वारे निर्मित वीज ही इन्व्हर्टरमार्फत आपण घरातील उपयोगासाठी वापरू शकतो. यासाठी एक ते दहा किलो वॅट कार्यक्षमतेचे सोलर पॅनल्स उपलब्ध आहेत. शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी सौरऊर्जा पंप दोन ते पाच अश्वशक्ती क्षमतेचे करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीऐवजी त्यांना सौरऊर्जा पंप देण्यात यावेत अशी योजना महाराष्ट्र चेंबर्सच्या वतीने महाराष्ट्र शासनाला देण्यात आली होती. यानुसार सरकारनेही हा प्रस्ताव मान्य करून अर्थसंकल्पात तरतूद करून आता पाच लाख कृषी पंप देण्यात येणार आहेत. उद्योगाच्या घटकात विजेचा सर्वाधिक वापर केला जातो. सद्यस्थितीतील विजेची उत्पादनक्षमता व मागणी, पुरवठ्याचा विचार केल्यास उद्योगांनी सौरऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. जे उद्योग आज सौरऊर्जेचा विचार करतील तेच भविष्यात उभ्या राहणाऱ्या संकटांचा सामना करू शकणार आहेत. उद्योगांना मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या विजेसाठी सोलर कॅप्टिव्ह प्लान्ट वापरला जातो. या सिस्टीममध्ये तयार होणारी वीज ही ग्रीट सिस्टीममध्ये उपयोगात आणता येते. तसेच जास्तीची वीज इतरांना विकता येणेही शक्य होते. आज साधारणत: या प्लान्टचे पाचशे मेगा वॅटपर्यंतच उत्पादन यात होत आहे. भविष्यात सन् २०२२ पर्यंत १७५००० मेगा वॅटपर्यंत ही क्षमता वाढविण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे.

पारंपरिक विजेची सद्यस्थिती बघता केंद्राच्या वतीने अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशन योजना सन् २००९ मध्ये सुरू केली. या योजनेंतर्गत सौरऊर्जेच्या उपयोगासाठी विशेष अनुदान देण्यात यत आहे. सौरऊर्जेचा उपयोग वाढविण्याच्या उद्दिष्टासाठी या योजनेंतर्गत सौरऊर्जेचे उत्पादन सुमारे २ हजार मेगा वॅटपर्यंत नेण्याचा मानस आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. आजमितीला इतर राज्यांच्या तुलनेत गुजरात, राजस्थान व ओरिसामध्ये सौरऊर्जेचा वापर व उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौरऊर्जा मिशनच्या माध्यमातूनही सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी विविध सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

मेक इन इंडियांतर्गत भारत सरकार विविध सोलर उत्पादकांना सबसिडी देत आहे. उद्योजकांनी या योजनांचा फायदा घ्यायला हवा. नाशिकमधील उद्योजकांनी सौरऊर्जेचा उपयोग केल्यास त्यांना चोवीस तास विजेची उपलब्धता होईल. शिवाय उत्पादकीय खर्चातही बचत होईल. मायकोसारखा मोठा उद्योग समूह या सौरऊर्जेचा उपयोग करतो आहे. भविष्यात त्याचा विस्तार करण्याची योजना आहे. याचेच अनुकरण इतर लहान मोठ्या उद्योग समूहांनी करावे व देशाच्या सौरऊर्जा अभियानात सहभागी व्हावे.

(लेखक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोतनीसांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुदतीनंतर गुंतवणूकदारांना पैसे देण्यास टाळाटाळ केल्याच्या आरोपामुळे गोत्यात आलेले 'गावकरी'चे संचालक वंदन पोतनीस आणि अरविंद पोतनीस यांनी मंगळवारी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली. फिर्यादी पक्षाकडून यास हरकत घेण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी आज, बुधवारी होईल. दरम्यान, १८ तारखेस आदेश देऊनही अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नसल्याने कोर्टाने पोलिसांना फटकारले. आपले म्हणणे मांडण्यासाठी बुधवारी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांनाही दिले.

मुदत ठेवींवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये घेण्यात आले. मात्र, मुदतीनंतरही गुंतविलेली रक्कम व व्याज देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्या प्रकरणी 'गांवकरी प्रकाशन'चे संचालक अरविंद दत्तात्रय पोतनीस, वंदन अरविंद पोतनीस यांच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी सरकारवाडा पोलिसांना शुक्रवारी दिले. कोर्टाच्या आदेशानंतर मंगळवारी संध्याकाळपर्यंत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. याबाबत, पंचशीलनगर येथील जनरल पोस्ट ऑफिसच्या मागे राहणाऱ्या गौतम रतन जाधव यांनी नाशिकच्या विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात अ‍ॅड. मंदार भानोसे यांच्यामार्फत फौजदारी दावा दाखल केला होता.​ किराणा दुकानाचा व्यावसाय करणाऱ्या जाधव यांनी २०१२ मध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे गांवकरी प्रकाशनच्या विविध मुदतठेव योजनांमध्ये पाच लाख ५५ हजार २०० रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, मुदत पूर्ण झाल्यानंतर पोतनीस यांनी पैसे परत केले नाही. पोलिसांकडून मदत मिळण्याची शक्यता नसल्याने दोन्ही संचालकांविरोधात एमपीआयडी अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत जाधव यांनी कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक होण्याची शक्यता गृहीत धरून वंदन पोतनीस यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. त्यावर आज, बुधवारी सुनावणी होईल.

मंगळवारी संध्याकाळपर्यंत कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही. तक्रारदार किंवा कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळताच गुन्हा दाखल करण्यात येईल. या प्रकरणी कोणालाही मोकळीक देण्याचा प्रश्नच नाही.

- सीताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक, सरकारवाडा

पोतनीसांच्या अटकपूर्व जामिनाला आम्ही विरोध केला आहे. तक्रारदारांच्या संख्येत वाढ होत आहे. १८ मार्च रोजी कोर्टाने आदेश देऊनही पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. याची गंभीर दखल कोर्टाने घेतली आहे. सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

- अ‍ॅड. मंदार भानोसे, फिर्यादीचे वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होळीसाठी नाशिककर सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फाल्गून महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या होळीसाठी तरुणाई सज्ज झाली असून, महिनाभरापासून लाकडे जमविण्याची तयारी केली होती. आज मोठ्या जल्लोषात हा सण साजरा होणार आहे.

नाशकात सर्वात मोठी होळी गोपाळ मंगल कार्यालयाजवळ सरदार चौकात पेटवली जाते. या ठिकाणी नैवेद्य दाखविण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. त्यापाठोपाठ नेहरू चौक, रविवार कारंजा, घनकर गल्ली आणि पंचवटीतील नागचौकात होळी उत्सव साजरा केला जातो. सध्या नाशिकच्या प्रत्येक भागात होळी पेटत असल्याने गल्लोगल्ली हा उत्सव साजरा होतो. आज प्रदोष काळात प्रतिपदा येत आहे. तरीही सायंकाळी ५.३० वाजेच्या आत होळी प्रज्ज्वलीत करण्यासाठी चांगला मुहूर्त आहे.

होळी हा संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: उत्तर महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होणारा सण आहे. होलिकोत्सव, धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी. धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात. पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात.


होळी करा साजरी

पौर्णिमेच्या सायंकाळी देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी होळी पेटवावी. शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. नंतर त्याच्या भोवती गोवऱ्या व लाकडे रचावीत. व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर 'होलिकायै नम:' हा मंत्र म्हणून होळी पेटवावी. होळीची प्रार्थना करावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी. नंतर जमलेल्यांना नारळ, अननस यांसारखी फळे वाटावीत. दुसऱ्या दिवशी पहाटे होळीच्या राखेची पूजा करून ती राख अंगाला लावून स्नान करावे, म्हणजे मानसिक व्यथा, चिंता दूर होतात व रोग होत नाहीत, अशी माहिती अमोल किरपेकर गुरूजी यांनी दिली.


या लोकोत्सवात होलिकोत्सव (होळी), धूलिकोत्सव (धूळवड) आणि रंगोत्सव (रंगपंचमी) हे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करण्याचा किंवा समाजातल्या विकृती भस्मसात करून त्यांच्या नावाने शिमगा करत सदवृत्तींचा जयघोष करण्याचा हा उत्सव आहे. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंदान सण साजरा करावा.

- अमोल किरपेकर गुरूजी, वेदशास्त्रसंपन्न

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता करणार जप्त!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात खाण माफियांनी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले असून, कित्येक ब्रास गौण खनिजांची रॉयल्टीही प्रामाणिकपणे भरलेली नाही. खाण मालकांनी ३१ मार्चपर्यंत रॉयल्टी भरावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अवैध उत्खननावरील दंड न भरल्यास वेळप्रसंगी संबंधितांची घरजप्ती करीत ती विकून दंड वसुली केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

खडी उत्खनन आणि क्रशिंगमधून गेल्या काही वर्षांत बेहिशेबी उत्खनन झाल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाने नोंदविले आहे. ज्या प्रमाणात उत्खनन झाले, त्या प्रमाणात खाण माफियांनी रॉयल्टी भरली नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. अनेकांनी परवानगी घेऊन उत्खनन सुरू ठेवले. जमेल तशी रॉयल्टी देखील भरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महसूल बुडून सरकारचे नुकसान झाले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारने २०१२ साली ईटीएस मोजणीचे आदेश दिले. मात्र, ही मोजणीही होऊ शकली नाही. परंतु, आता जिल्हा प्रशासनाने व्हॅल्यूमेट्रीक मोजणी आणि उत्खनन ासाठी किती युनिट वीज वापरली गेली, किती उत्खनन झाले आणि कितीची रॉयल्टी भरली याबाबतचे मोजमाप सुरू केले आहे. त्यानुसार संबंधितांकडून रॉयल्टी भरून घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडाच्या लिपिकास लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सदनिका हस्तांतरण करण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाच्या (म्हाडा) ​वरिष्ठ लिपिकास अॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. कैलास भिकाजी शेळके असे, या लिपिकाचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे अहमदनगर येथील असून, त्यांच्या वडिलांच्या नावे अल्प उत्पन्न गट या योजनेमध्ये सिव्हिल हाडको येथे ६८४ क्रमाकांचा गाळा आहे. तक्रारदारांच्या वडिलांचे वय झाले असून, सदराचा गाळा तक्रारदारांच्या नावे होण्यासाठी त्यांनी ३ मार्च रोजी सर्व कागदपत्रांसह संशयित आरोपी शेळके यांच्याकडे अर्ज सादर केला. मात्र, शेळके यांनी या कामासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने नाशिकच्या एसीबी युनिटकडे तक्रार दिली.

याआधारे मंगळवारी दुपारी नाशिक म्हाडा कार्यालयात एसीबीने सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या शेळकेस अटक केली. दरम्यान, लाचखोर अधिकारी वा कर्मचाऱ्यांबाबत सर्वसामान्यांना तक्रार करायची असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच ०२५३-२५७५६२७, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात सेना-भाजपमध्ये वाढला तणाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेने विजया रहाटकर यांच्या मराठवाड्या संदर्भातील वक्तव्याचा आधार घेत थेट भाजपच्या कार्यक्रमावर हल्ला चढवल्याने आता सेना भाजपमधील तणाव वाढला आहे. भाजपने या हल्ला प्रकरणी थेट शिवसैनिकांवर अटकेची मागणी केल्याने वाद वाढला असून, भाजपकडून या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमधील तणाव वाढला असून, शहरातील बंदोबस्तात पोलिसांनी वाढ केली आहे.

नाशिक-पुणे मार्गावर नासर्डी पुलाजवळ कृष्णा मंगल कार्यालयात सायंकाळी सातला आदिशक्ती महिला संघटना आणि भाजप महिला आघाडीतर्फे कर्तबगार महिलांचा सत्कार समारंभ होता. कार्यक्रम सातला सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात शिवसेना नेत्या सत्यभामा गाडेकर, सुधाकर बडगुजर, तीन चार महिला तसेच सुमारे दीडशे शिवसैनिक अचानक चालून आले. काहीच कारण न देता किंवा संवाद न साधता त्यांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत त्यांनी हल्ला चढवला. काहीएक कारण न देता लहान मुलांना जमिनीवर पटकले. महिलांना मारहाण केली. खुर्च्यांची मोडतोड केली. अडीच वर्षाचा एक मुलगा बेशुद्ध पडला. संयोजिका संध्या कुलकर्णी या भाजपच्या चिटणीस आहेत. त्या गरोदर असताना त्यांनाही बहाद्दर शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. एकच गोंधळ उडाला. सर्वजण सैरावैरा धावत सुटले. या हल्ल्यात भाजपच्या रोहिणी नायडू, स्नेहा खांदवे, स्मिता बोडके, पुष्पा शामराव या महिला जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

महागात पडणार

दरम्यान, या हल्ल्याची कल्पना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांनाही दिली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या समर्थक गटाने नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून चमकोगिरी करण्याच्या नादात थेट हल्ला करून संकट ओढवून घेतले आहे. राऊंताची मर्जी जिंकण्यासाठी या गटाने महिलांवरच हल्ला चढवत शिवसेनेबाबत नाशिकमध्ये असलेली सहानुभूती गमावण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे.

सत्यभामा गाडेकर यांची धुलाई!

चिडलेल्या महिला आक्रमक होताच आणि नागरिक जमू लागताच शिवसैनिकांनी धूम ठोकली. सत्यभामा गाडेकर यांची महिलांनी चांगलीच धुलाई केली. आमदार बाळासाहेब सानप यांनी मध्यस्थी करून त्यांची सुटका केल्याचे घटना पाहणारे महेश हिरे यांनी सांगितले. आदिशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या संगीता पाटोळे आणि जयश्री खोडे यांनी सांगितले की, चार महिलांचे मंगळसूत्र हल्लेखोरांनी ओरबाडून नेले. भाजपच्या व्दारका मंडल उपाध्यक्षा सुमन विश्वकर्मा यांनी सांगितले की, शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे. त्यांच्या नावाखाली गुंडांनीच हल्ला केला असावा. लहान मुलांनांही त्यांनी सोडले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेमुदत बंदवर सराफ ठाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अमित शहा यांच्या समवेत झालेल्या सराफ व्यावसायिकांच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून, अबकारी कर रद्द होत नाही तोपर्यंत बेमुदत बंद सुरूच राहणार असल्याचा निर्णय पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

ही बैठक क्रिष्णा सुंदर गार्डन म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख सराफ व्यावसायिक व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला दिल्ली येथे झालेल्या बैठकीचा वृत्तांत सांगण्यात आला. त्यानंतर उपस्थित व्यावसायिकांची मते जाणून घेण्यात आली. एक मार्चपासून सराफांचे बंद आंदोलन सुरू असून, याबाबत निर्णय घेण्यासाठी सराफांच्या राज्यस्तरीय संघटना आणि केंद्रीय संघटना यांच्यात १९ मार्च रोजी दिल्लीतील भाजप कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जेम्स अॅण्ड ज्वेलरी असोसिएशन, महाराष्ट्र सराफ आणि सुवर्णकार असोसिएशन इत्यादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. यावेळी केंद्र सरकार केंद्रीय अबकारी कर कमी करण्यास सरकार तयार नसून, त्यात शिथिलता आणली जाईल, असे अमित शहा यांनी सराफांच्या शिष्यमंडळाला आश्वासन दिले. याबाबत साठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे देखील त्यांच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, गेल्या २० दिवसांपासून तोडगा न निघाल्याने सराफ व्यावसायिक नाराज होते. दुकाने उघडायची की नाही याबाबत साशंकता होती. याबाबत संघटनेमध्ये एक मत होत नसल्याने काही सराफ व्यावसायिकांनी रविवारी आपली दुकाने उघडली. मात्र, बंदच्या निर्णयानंतर दुकाने पुन्हा बंद करण्यात आली.

दुकाने बंद

पुण्यात बंदबाबात निर्णय झाल्याने आता दुकाने बेमुदत बंद राहणार आहेत. ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कुणीही दुकाने उघडू नये असे गिरीष टकले, राजेंद्र ओढेकर, गिरीष नवसे, कन्हैय्या आडगावकर यांनी आवाहन केले आहे.मात्र, नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनने आदेश दिल्यानंतर पुन्हा दुकाने बंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये सेना-भाजप भिडले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये पाण्यावरून सुरू असलेली धुसफूस मंगळवारी हाणामारीत रूपांतरित झाली. राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या भाजपच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा महिला मेळावा शिवसैनिकांनी उधळून लावला. शिवसैनिकांनी मेळाव्यावर थेट हल्ला चढविला. या वेळी दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली.

शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करून भाजपच्या आमदारांनीही नाशिक-पुणे रस्त्यावर रास्ता रोको केला. त्यानंतर मुंबई नाका पोलिस स्टेशनवर मोर्चा काढून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. स्वतंत्र मराठवाडा ही लोकभावना असल्याचे विधान विजया रहाटकर यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केले. त्यामुळे भाजपला लक्ष्य करण्याचे निमित्तच शिवसेनेला मिळाले. भाजप महिला आघाडी आणि आदिशक्ती महिला संघटनेच्या कार्यक्रमावर शिवसेनेच्या नेत्या सत्यभामा गाडेकर, सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी शिवसैनिकांनी हल्लाबोल केला. कार्यक्रमात शिवसैनिकांनी अक्षरशः धुडगूस घालून खुर्च्यांची तोडफोड केली. या वेळी महिलांसह लहान मुलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना कार्यकर्ते घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर यांना मारहाण केली. बोधलेनगर येथे घडलेल्या या प्रकाराने परिसरात तणावाचे वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात कचऱ्याची होळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा पोलिस दल व अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे यंदाही पोलिस कवायत मैदानावर कचऱ्याची होळी पेटवून होलिकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख साहेबराव पाटील, अंनिसचे प्रा. दीपक बाविस्कर, राजेश बागूल, रत्नाकर वाघ, चंद्रवीर साळवे, रंजना नेवे तसेच शहरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मंगळवारी सायंकाळी हा कचऱ्याची होळी करण्याचा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमास थोडा एशीर झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून सरकारी गाड्यांद्वारे प्रकाश करण्यात आला. यामुळे या होळीदरम्यान कार्यक्रमात इंधनाचीही मोठ्या प्रमाणात नासडी करण्यात आली , अशी चर्चा सुरू होती.

इंधनाची नासाडी

इंधन बचतीसाठी सरकारकडून विविध उपक्रम राबविले जातात. तर वेळोवेळी जनजागृतीही केली जाते. मात्र जिल्ह्यातील एक जबाबदार अधिकारी जर होलिकोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पोलिस दलातील वाहने सुरू ठेवून त्यांच्या हेडलाईटचा वापर करत कार्यक्रम साजरा केला. तब्बल एक ते दीड तास कार्यक्रम सुरू राहिला त्यामुळे तेवढा वेळ वाहने सुरू ठेवून हा कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रमा संपेपर्यत कोणालाही वाटले नाही की, इंधनाचा गैरवापर होत आहे?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवेदनशील भागात संचारबंदी कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे


नंदुरबार शहरात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या काळी मशिद भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास किरकोळ कारणावरुन दोन गटात दगडफेक व जाळपोळ झाली होती. यात पोलिसांच्या वाहनांसह खासगी वाहनांचे हे नुकसान झाले होते. तर चार पोलिस कर्मचाऱ्यांसह एक अधिकारी जखमी झाला होता. यानंतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र घटनेच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
बुधवारी सकाळी शहरात पुन्हा दोन्ही गटात वाद उफळला होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात असलेल्या उपपोलिस अधीक्षक शिवाजीराव गावित व अन्य दोन पोलिस कर्मचारी जखमी झालेत. नाशिक परिक्षेत्रातील विशेष पोलिस महासंचालक विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस दलासह राज्य राखीव पोलिस बलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ऐन होळी, रंगपंचमी सणावेळीच आनंदावर विरजण पडले आहे, अशी खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर होळीच्या सणानिमीत्त मंगळवारच्या बाजारपेठेतील लाखो रुपयांची उलाढाल थांबली. दरम्यान शहरातील काळी मशिदसह सुभाष चौक, भाजीपाला मार्केट, यासह गर्दीच्या ठिकाणी संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाशिंगे वीर परंपरेचा आज नाशकात जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्रातील एकमेव आणि अनोखी समजली जाणारी पारंपरिक बाशिंगे वीरांची मिरवणूक गुरुवारी (२४ मार्च) दुपारी २ वाजता बुधवार पेठेतील मिरजकर गल्लीतून निघणार आहे. बेलगावकर घराण्याकडे पिढ्यान् पिढ्या चालत आलेली ही अनोखी परंपरा राज्यभरात चर्चेचा विषय असते. मंडपचा व्यवसाय करणारे विनोद हिरामण बेलगावकर हे बाशिंगे वीर होणार असून, गेल्या २१ वर्षांपासून ते धुरा सांभाळत आहेत. या मानासाठी त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत कडक उपवासही करावा लागत आहे. राज्याच्या अनेक भागात धुळवडीच्या दिवशी वीरांची मिरवणूक निघते. मात्र, बाशिंगे वीरांची मिरवणूक केवळ नाशिक शहरातच निघते. या मिरवणुकीची परंपरा प्राचीन आहे. रात्रभर दाजीबा वीरांना मिरवल्यानंतर शुक्रवारी (२५ मार्च) सकाळी सहा वाजता मिरजकर गल्लीत समारोप होणार आहे. या पूजेचा मान मागील अनेक वर्षांपासून बेलगावकर घराण्याकडे आहे. गेली २१ वर्षे विनोद बेलगावकर त्याची धुरा सांभाळत आहेत. त्याआधी २६ वर्षे ही परंपरा त्यांचे वडील हिरामण बेलगावकर यांनी सांभाळली आहे. बाशिंगे वीरांची रस्त्यात पूजा करुन विविध प्रकारचे नवस बोलले जातात. ज्यांची मनोकामना पूर्ण होते अशांचे नवसही यादिवशी फेडण्याची प्रथा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीकरांच्या दारी आज पाणी

$
0
0

सणासुदीच्या दिवसात नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये या हेतूने प्रशासनाने नदीमध्ये जेसीबीच्या सहाय्याने चारी खणून पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्नांना यश आले. ऐन धुलिवंदनाच्या दिवशी नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. गेल्या ३६ तासांपासून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून सोमवारी लष्कराच्या बंधाऱ्यातून पाणी उचलून एक दिवसापुरती सोय केली होती. पुन्हा जेसीबीच्या सहय्याने नदीपात्रात सुमारे ८ फुट रुंदीची चारी खणून त्याद्वारे उपलब्ध होणारे पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी स्टेनरच्या पातळीपर्यंत आणण्यासाठी ही चारी खणण्यात आली. याद्वारे साठवण केलेले पाणी शुद्ध करून नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैतन्यमय वातावरणात होळी साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक गवऱ्यांची अन् ऊसाची केलेली आकर्षक मांडणी, खोबऱ्याचे तोरण, लहानग्यांपासून ज्येष्ठांमध्ये ओसंडून वाहणारा उत्साह, पुरणपोळीमुळे वातावरणात दाटलेला गोडवा अन् मंत्रोच्चारात पार पडलेले विधी..! अशा चैतन्यपूर्ण वातावरणात शहर व परिसरात बुधवारी होळी सण साजरा करण्यात आला. एकमेकांना खोबऱ्याचा प्रसाद वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.

फाल्गुन महिन्याच्या हुताशनी पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो. प्रांतानुसार या सणाच्या पद्धती बदलत असल्या तरी अपवित्र, अमंगल प्रवृत्तींचा नायनाट करण्याच्या उद्देशाने या सणाचे माहात्म्य मोठे आहे. सरदार चौकातील गोपाळ मंगल कार्यालयाजवळ मोठ्या उत्साहात होळी केली जाते. अनेक वर्षांपासून याठिकाणी होळी पेटव‌िली जात असल्याने नाशिककरांनी यंदाही येथे गर्दी केली होती. याबरोबरच शहर परिसरात, सोसायट्यांसमोर होळी साजरी केल्याचे चित्र दिसून आले.

आधुनिकतेचा पगडा जरी वारंवार दिसून येत असला तरी पूर्णतः पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यास शहरवासियांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. बुधवारी सकाळपासूनच ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाई होळीच्या तयारीत दंग झालेली बघायला मिळाली. पेठरोडवरील भक्तीधामजवळ तर यादिवशी सकाळपासूनच पेठ, सुरगाणा तालुक्यातील अनेक विक्रेते गवऱ्या घेऊन दाखल झाले होते. या परिसरात त्यांनी गवऱ्यांच्या थप्प्याच्या थप्प्या विकावयास ठेवल्या होत्या. दरवर्षी होळीनिमित्त हे विक्रेते येथे दाखल होत असल्याने ग्राहकांनीही खरेदीस पसंती दिल्याचे दिसून आले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विहितगावमध्ये व्हॉल्व्हमधून गळती

$
0
0

गेल्या काही दिवसांपासून या भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे जलवाहिनीचा व्हॉल्व्ह रस्त्याच्या पातळीपासून उंचावर आला आहे. त्या व्हॉल्व्हमधून सतत पाणीगळती होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही परिस्थिती जैसे थे आहे.

रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिक व लोकप्रतिनिधींना या व्हॉल्व्हमधून होणारी शेकडो लिटर पाणीगळती दिसत नाही का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

पाणीटंचाईच्या परिस्थितीतही काही सुजाण नागरिक या गळत्या व्हॉल्व्हमधून वापरासाठी पाणी भरीत आहे; मात्र महापालिका प्रशासन पाणीगळतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गांवकरी’च्या पोतनीसांना सर्शत जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मुदत ठेवींवर आकर्षक व्याजाचे अमिष दाखवून तसेच गोळा केलेल्या ठेवींची मुदत संपूनही ठेवींची रक्कम गुंतवणूकदारांना परत देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी गांवकरी प्रकाशनचे संचालक अरविंद पोतनीस व संपादक वंदन पोतनीस यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी बुधवारी (दि़. २३) सशर्त जामीन मंजूर केला. पोतनीस यांना दररोज तीन तास पोलिस स्टेशनला हजेरी लावणे बंधनकारक असून, मालमत्ता विकण्यास तसेच शहराबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यांच्या जामिन अर्जावर २ एप्रिलला अंतिम युक्तिवाद होणार आहे.

गांवकरी प्रकाशनमध्ये गुंतविलेले ५ लाख ५५ हजार रुपये मुदत संपूनही परत मिळत नसल्याने गौतम जाधव (रा. पंचशीलनगर) यांनी कोर्टात दावा दाखल केला होता. कोर्टाच्या आदेशानुसार पोतनीस पिता-पुत्रांवर सरकारवाडा पोलिसांनी एमपीआयडी अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल केला. अटक होऊ नये यासाठी पोतनीसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर आज दोन्ही पक्षांच्या वकीलांनी सायंकाळी सव्वा सात वाजेपर्यंत युक्तिवाद केला. तो ऐकण्यासाठी ठेवीदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

संशयितांनी बेकायदेशीरपणे मुदतठेवी स्वीकारल्याचे तसेच सुमारे एक हजार लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीतर्फे अ‍ॅड. मंदार भानोसे यांनी कोर्टास सांगितले. फसवणूक झालेल्यांत पेन्शनर, ज्येष्ठ नागरिक, अपंग बांधव मोठ्या संख्यने आहेत. आज, उद्या पैसे देऊ असे सांगत त्यांची बोळवण केली जात असल्याचे न्यायाधिशांना सांगण्यात आले. तर जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र घुमरे यांनी फसवणूक झालेल्या सर्व तक्रारदारांची रक्कम संयुक्त खात्यात भरण्याची मागणी केली. मात्र त्यास संशयितांचे वकील अ‍ॅड. उमेश वालझाडे यांनी विरोध केला.

दोन्ही पक्षांच्या वकीलांनी केलेल्या युक्तिवादानंतर कोर्टाने पोतनीस पिता-पुत्रांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे व अ‍ॅड. पंकज चंद्रकोर यांनी तर

पोतनीसांतर्फे अ‍ॅड. उमेश

वालझाडे व योगेश कुलकर्णी यांनी काम पाहिले.

तक्रार करण्यासाठी...

'गांवकरी'च्या संचालकांविरूद्ध ठेवीदारांना आता पोलिसांकडे जबाब नोंदविता येणार आहे. १०८ गुंतवणूकदारांच्या एक कोटी ३२ लाख रुपयांच्या ठेवी असल्याची माहिती पुढे आली आहे. याखेरीज सुमारे ८० गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची मुदत अलीकडेच संपली आहे. गांवकरीमध्ये मुदतठेवी अडकलेल्या

गुंतवणूकदारांनी सरकारवाडा पोलिसांकडे मूळ कागदपत्रे सादर करून तक्रार करावी.

या अटींवर जामीन

५० हजारांचा प्रत्येकी जातमुचलका

पोतनीस कुटुंबियांनी मालमत्तेची सर्व कागदपत्रे तसेच पासपोर्ट पोल‌िस स्टेशनला जमा करावा.

मालमत्तेचा खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार करू नये

दररोज सकाळी ११ ते दुपारी दोन पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावी.

नाशिक शहर सोडून जाऊ नये

जाधव यांनी गुंतविलेल्या रकमेचा डीडी तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे जमा करावा.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफांनी केली एक्साईजची होळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मोदी सरकारने १ मार्च रोजी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सराफ व्यावसायिकांवर अबकारी कर लागू केला आहे. हा कर सराफ व सुवर्णकार व्यवसायिकांना जाचक असून, त्या कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून बुधवारी ठिकठिकाणी या कायद्याची होळी करण्यात आली.

हा कायदा अमलात आला तर सराफ सुर्णकारांपेक्षा ग्राहकांना जास्त त्रासदायक ठरणार आहे. सरकार जरी एक टक्का म्हणत असले तरी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली जाणार आहे. ग्राहकांप्रमाणेच सराफांना व्यवसाय सोडून कागदपत्रांची जमवाजमव करण्यात वेळ जाणार असून त्यासाठी वेगळा स्टाफ नेमावा लागणार आहे. पर्यायाने हा सर्व खर्च ग्राहकांवर माथी पडणार असून हा कायदा रद्द करावा, यासाठी या कायद्याची होळी करण्यात आली. यावेळी संध्याकाळी सराफ बाजारातील सोन्यामारुती चौकात गोवऱ्यावर विविध प्रकारच्या घोषणा लिह‌िण्यात आल्या. यावेळी 'सरकारने वाईट प्रथा मोडीत काढाव्यात','सर्व सामान्य ग्राहकांना अच्छे दिन यावे', अशी प्रार्थना करण्यात आली. महाराष्ट्र सराफ सुवर्णकार संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश नवसे यांच्या हस्ते विधीवत पुजन करण्यात येऊन होळी पेटविण्यात आली. यावेळी सरकार विरोधी घोषणा देण्यात येऊन बोंब मारण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर, राजेंद्र शहाणे, सुनील महालकर, अक्षय मंडलिक, सागर कुलथे, संकेत वडनेरे, ऋषिकेश ठाकूर इत्यादींसह व्यावसायिक उपस्थित होते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज निघणार वीरांची मिरवणूक

$
0
0

नाशिकमध्ये शेकडो वर्षांपासून फाल्गुन वद्य प्रतिपदेला वीरांची धुलिवंदनाला सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात एकट्या नाशिकमध्येच धुलिवंदनाला मोठ्या प्रमाणात ही प्रथा पाळली जाते. घरातील पूर्वजांचे टाक म्हणजेच वीर. हे वीर वर्षातून एकदा, धुलिवंदनाला गंगेवर जाऊन पूजले जातात. खोबऱ्याच्या वाटीत हे टाक घेऊन त्यांना विधीवत स्नान घातले जाते. त्यांना नवीन वस्त्र घातले जातात. यावेळी शंकर, पार्वती, गणपती, हनुमान आदी देवदेवतांच्या वेशभूषा धारण करून मिरवणूक काढली जाते. डोक्यावर फेटे, हातात तलवारी, आकर्षक कपडे असा पेहराव करून वीरांची रुपे घेतलेले नाचत-नाचत गंगेवर दाखल होतात. गंगेकडे जाताना रस्त्यात जिथे जिथे होळीदहन केलेली असते. त्याला पाच फेऱ्या मारण्याची प्रथा निभावत हे वीर गंगेवर जातात.

याबरोबरच दाजीबा वीरालाही यावेळी मोठा मान असतो. ज्या मुलीचे लग्न जमत नसेल तिने दाजीबा वीरला बाशिंग वाहिल्यास लग्न ठरते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच त्याला बाशिंगे वीरही म्हटले जाते.

गोदाकाठी यात्रेचे रुप वीर नाचविण्याची जुनी परंपरा नाशिकमध्ये असल्याने नाशिकजवळील तालुक्यांमधील, परिसरातील लघुविक्रेते शहरात या सोहळ्यासाठी दाखल होतात. धुलिवंदनाची संपूर्ण सायंकाळी हा माहोल असल्याने गोदाकाठाला यात्रेचे स्वरुप होणार असल्याचे बघण्यास मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ ‍लाख गुंतवणूकदार; तेराशे कोटींची देणी !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मैत्रेय कंपनीद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीने कोर्टाच्या आदेशानुसार बुधवारी आर्थिक व्यवहारांचा आराखडा सादर केला. या आराखड्यानुसार मैत्रेय कंपनीचे २८ ‍लाख ३६ हजार २५० गुंतवणूकदार आहेत. कंपनीकडून त्यांना एक हजार ३३५ कोटी ७० लाख १८ हजार २३० रुपयांची देणी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी सरकारी वकिलांनी मुदत मागितली असून कोर्टाने वर्षा सत्पाळकर यांच्या जामीन अर्जावर येत्या ५ एप्रिलला सुनावणी ठेवली आहे.

सेबीने बंदी केल्यानंतरही सत्पाळकर आणि जनार्दन परुळेकर यांनी गुंतवणूकदारांकडून अब्जावधी रुपयांच्या ठेवी जमा केल्या. मात्र ठरल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना आर्थिक परतावा देण्यास टाळाटाळ केल्याने दोघांविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे कोर्टाने सत्पाळकर यांना पोल‌िस व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांना सशर्त जामीन देण्यात आला. कंपनीच्या गुंतवणूकदारांना कसा परतावा देणार याबाबतचा आराखडा देण्यास सांगितले होते. त्यानुसार सत्पाळकर यांनी बुधवारी (दि.२३) कोर्टात आराखडा सादर केला. या आराखड्यात सत्पाळकर यांनी कंपनीच्या मालमत्तेविषयी

माहिती दिली. त्यामुळे कोर्टाने ५ एप्रिलपर्यंत सुनावणी पुढे ढकलून सत्पाळकर यांनाही ५ एप्रिलपर्यंत जामीन मंजुर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images