Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वर्धापन दिनाला मनसे सामसूम!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेचा दहावा वर्धापन दिवस मुंबईत साजरा केला जात असतांना मनसेची एकमेव सत्ता असलेल्या नाशिकमध्ये मात्र पक्षाची सामसूम स्थिती पहायला मिळाली. मनसेचे सर्वच पदाधिकारी वर्धापन दिनासाठी मुंबईला रवाना झाल्याने पक्ष कार्यालयातही शांतता होती. विशेष म्हणजे महापालिकेतही वर्धापन दिनाबाबत उदासीनता होती.

मनसेची स्थापना मुंबईत झाली असली तरी मनसेला पहिली सत्ता राज्यात प्रथम नाशिकमध्ये मिळाली. नाशिकमध्ये तीन आमदार आणि महापालिकेत सत्ता नाशिककरांनी दिली. त्यामुळे नाशिककरांचे मनसेवर विशेष प्रेम असल्याचे दिसून आले. बुधवारी मनसेचा दहावा वर्धापन होता.त्यामुळे नाशकातही मनसेचा वर्धापन दिन भव्यदिव्य पद्धतीने साजरा केला जाईल अशी अपेक्षा होती. पंरतु, वर्धापन दिनाच्या दिवशी पक्ष कार्यालय राजगड इथे शांतता होती. महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी व पक्षाचे नेते मुंबईच्या कार्यक्रमासाठी मुंबईला रवाना झाल्याने नाशिकमध्ये मनसेचा एकही कार्यक्रम दिसला नाही. विशेष म्हणजे मनसे नगरसेवकांच्या प्रभागात पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमांची वाणवा होती. त्यामुळे मनसेच्या सत्तास्थानीच वर्धापन दिनाबाबत उदासीनता दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटीस्कॅन यंत्र खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाला साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या तीन वर्षांपासून सिटीस्कॅन यंत्रणेविनाच जिल्हावासीयांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलला लवकरच सिटीस्कॅन यंत्र मिळणार आहे. जिल्हा नियोजन विकास आराखड्यातून त्यासाठी दोन ते अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. मे-जून पर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होईल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.

बुधवारी अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णकल्याण समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला सिव्हिल सर्जन सुरेश जगदाळे, डॉ. होले, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी सुशीला वाघचौरे आदी उपस्थित होते. आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटलमधील सिटीस्कॅन यंत्राची उपयुक्तता तीन वर्षांपूर्वीच संपली आहे. तेव्हापासून येथे ही यंत्रणा कार्यान्वित नाही. मध्यंतरीच्या काळात राज्य सरकारने एका खासगी कंपनीला राज्यात ही यंत्रणा कार्यरत करण्यासाठी परवानगी दिली. त्यांना सरकारी परवानग्या मिळवून देतानाच विजेची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी सिव्हील हॉस्पिटलने स्वीकारली. पुण्यात कंपनीने हे यंत्र कार्यान्वित केले. परंतु, एकूणच खर्च परवडत नसल्याने राज्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत कंपनीने असमर्थता दर्शविली. राज्य सरकारने सिव्हील हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन यंत्र बसविण्यास परवानगी दिली असली तरी त्यासाठी निधी पुरविण्यास असमर्थता दर्शविल्याचा मुद्दा या बैठकीमध्ये चर्चेला आला. जिल्हा नियोजन समितीकडून त्यासाठी दोन ते अडीच कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. त्याबाबतचा प्रस्ताव सादर करा असे आदेश बगाटे यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीचे नियम धाब्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर येथील अंडरपास तब्बल आठ महिन्यांनी वाहतुकीसाठी खुला झाला. गेले अनेक दिवस राणेनगरपर्यंत वळसा मारून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी अंडरपास खुला झाल्याचे स्वागत केले. मात्र, त्याचवेळी पोलिसांच्या गैरहजेरीत बेशिस्त वाहतुकीमुळे येथे अपघातांचे प्रमाण बळावेल अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे. पहिल्याचे ‌दिवशी बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या पहायला मिळाली.

नाशिक-मुंबई महामार्गावर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ चौफुली आहे. महामार्ग ओलांडून सिटीसेंटर मॉल तसेच, इंदिरानगरकडे जाता यावे यासाठी येथे अंडरपासची व्यवस्था आहे. मात्र, वाढत्या रहदारीपुढे अंडरपासमधील रस्ता तोकडा ठरू लागला. सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी आणि लहान मोठे अपघात ही येथे नित्याची बाब झाली. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालाचा आधार घेऊन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी १२ जुलै २०१५ पासून हा अंडरपास वाहतुकीसाठी बंद केला. परिणामी तो ओलांडून सिटी सेंटर मॉल, तिडके कॉलनी, इंदिरानगर, वडाळागाव, नाशिकरोडकडे, सातपूर, त्र्यंबकेश्वरकडे जाऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होऊ लागली. नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध होऊ लागला. विविध पक्षांनी पोलिसांच्या या निर्णया विरोधात आंदोलने केली. अखेर वाढत्या जनरेट्यामुळे जगन्नाथन यांनी मंगळवारी रात्री दहापासून हा अंडरपास वाहतुकीसाठी खुला केला.

बुधवारी दिवसभर येथून वाहनांची वर्दळ पहावयास मिळाली. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमार्गे सीबीएस, सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या वाहनधारकांना राणेनगरकडून तर गोविंदनगरकडून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडे जाणाऱ्या वाहनधारकांना १७१ क्रमांकाच्या पीलरखालून जावे लागत होते. मात्र, वाहनधारकांचा हा त्रास कमी झाला असून, ते थेट ये-जा करू शकत असल्याचे पहावयास मिळाले.

एकेरी वाहतुकीची गरज

इंदिरानगरकडून सीबीएस, सिटी सेंटर मॉलकडे जाण्यासाठी पाऊण ते एक किलोमीटरचा वळसा घालण्यास वाहनधारक उत्सुक नसल्याने त्यांनाच अंडरपासमधून प्रवेश दिला जावा.

गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी १७१ क्रमांकाच्या पीलरखालूनच जावे असा पोलिसांचा कयास आहे. मात्र सर्रास दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाल्याने त्यामुळे गोंधळात भर पडली आहे. प्रायोगिक स्तरावर १५ दिवसांसाठी हा अंडरपास खुला करण्यात आला असला तरी जनरेट्यामुळे तो त्यानंतरही खुलाच ठेवला जाण्याची शक्यता अधिक आहे.

बेशिस्तपणाचा कळस

अंडरपास परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनधारक बेशिस्तपणाचा कळस करीत असल्याचे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. लेन कटींग, अतिवेगात वाहने चालविणे, विरुध्द बाजूने वाहन दामटविणे, अरुंद रस्त्यावर एकमेकांच्या पुढे वाहन नेण्याचा प्रयत्न करणे यांसारखे प्रकार घडू लागले आहेत. येथे वाहतूक पोलिस असेल तरच वाहतुकीचे नियम पाळायचे अन्यथा सर्रास नियमांची पायमल्ली करीत वाहने दामटविण्याचे प्रकार येथे घडू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटक नटाचे तर चित्रपट‌ दिग्दर्शकाचे माध्यम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाटक हे नटाचे माध्यम आहे आणि चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. त्यामुळे आम्ही केलेला चित्रपट हा चांगलाच होता यात शंका नाही. चित्रपट करताना काही बदल करणे गरजेचे होते. त्यामुळे तो चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावला असल्याचे प्रतिपादन अभिनेता नाना पाटेकर यांनी केले.

कुसुमाग्रज स्मरण यात्रेनिमित्त कुसुमाग्रज स्मारकात 'नटसम्राट नाटक ते सिनेमा' या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते विश्वास जोशी, अभिजीत देशपांडे, किरण यज्ञोपवीत उपस्थित होते. नाना पाटेकर म्हणाले की, चाळीस वर्षांपासून या नाटकातील बेलवलकरांच्या पात्राने मला डंख मारला होता. नट म्हणून मला भूमिका करणे जास्त आव्हानात्मक वाटत होते. तात्यासाहेबांची भाषा आणि स्क्रिन प्ले यामुळे गणित जमून आले. ३६ दिवसात हा चित्रपट तयार केला असून त्यात विक्रम गोखले, मेधा मांजरेकर आणि सगळ्याच कलाकारांच्या भूमिका अप्रतिम झाल्या.

या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, हा चित्रपट बनवताना नाटकासारखा बनवायचा नव्हता. नाटकाला देखील धक्का लागू द्यायचा नव्हता. ही मोठी सर्कस होती. चित्रपट सुरू करण्यापूर्वी अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेसाठी नानाच डोळ्यासमोर होता. नानाने ती भूमिका अजरामर केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातील एका प्रसंगानंतर अडकलो हाते. त्यानंतर विक्रम गोखलेचे पात्र तयार केले. त्यामुळे हा चित्रपट आणखी एका उंचीवर गेला. चित्रपटाचे संवाद लिहिताना दडपण आले नाही का, असा प्रश्न किरण यज्ञोपवित यांना विचारला असता ते म्हणाले की, चित्रपटाची प्रक्रिया सुरू असताना जास्त चांगले सुचत गेले. त्यामुळे दडपण आलेच नाही. चित्रपटाची तांत्रिक भाषा आणि आणि साहित्यिक मूल्य या दोघांचे मेळ बसल्याने मोहून गेलो होतो. त्यामुळे दडपण वाटले नाही. या पिढीला हा चित्रपट आपलासा वाटला पाहिजे यासाठी जवळ जाण्याचा प्रयत्न करीत होतो.

या चित्रपटाचे निर्माते विश्वास जोशी म्हणाले की, या चित्रपटासाठी पैसे लावताना अनेकांनी मला सुचवले, अरे यात नाना आणि महेश दोघेही काम करता आहेत त्यामुळे हा चित्रपट पूर्ण होईल का याबाबत शंका होती. मात्र, नाना आणि महेशची या चित्रपटाबाबत अप्रतिम कमिटमेंटमुळे हा चित्रपट वेळेआधी पूर्ण होऊ शकला. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप साळवेकर यांनी केले तर गोवा कला अकादमीचे सर्वेसर्वा रामकृष्ण नायक यांचा सत्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला.
प्श्नांरनाही दिली उत्तरे

उपस्थित प्रेक्षकांनी चित्रपटातील कलाकारांना प्रश्न विचारले. चित्रपटातील अप्पासाहेबांची भूमिका ही नशेच्या आहारी गेलेल्या नटाची होती असा आरोप रामकृष्ण नायक यांनी केला. त्यावर नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर यांनी उत्तरे दिली. या चित्रपटाचे हिंदीत रिमेक करणार नाही, असेही महेश मांजरेकर यांनी सांगितले. यावेळी कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृह प्रेक्षकांच्या उपस्थितीने तुडूंब भरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निसाका’साठी आज मूकमोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि जप्तीच्या विळख्यात सापडलेल्या निफाड सहकारी साखर कारखाना वाचावा, यासाठी निफाड तालुक्यातील युवक पुढे सरसावले आहेत. त्यासाठी आज (दि. १०) सकाळी १० वाजता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.

गेल्या तीन हंगामापासून निफाड सहकारी साखर कारखाना बंद आहे. उत्पादन बंद, कर्जाची रक्कम वाढत असताना सह्योगी तत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळाली नाही. त्यामुळे थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई सुरू केली. तीन वेळा कारवाई पुढेही ढकलण्यात आली. मात्र, कोणतीही ठोस पावले न उचलल्यामुळे आता जप्तीची कारवाई अटळ असल्याने निसाका वाचला पाहिजे, यासाठी निफाडच्या गोदाकाठ भागातील तरुणांनी एकत्र येत गावागावात बैठका घेतल्या. यातून निर्णय होऊन आज या मूक मोर्चा काढला जाणार आहे.

अखेरीची घटका मोजणारा निसाका वाचविण्यासाठी तालुक्यातील कोणीही नेता पुढे येत नसल्याने या तरुणांनी सोशल मीडियाचा आधार घेत जनजागृती केली. त्याला प्रतिसाद मिळत गेला. गोदाकाठातील शिंगवे, करंजगाव, म्हाळसाकोरे, चांदोरी, सायखेडा येथे बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये जर वसाका सुरू होऊ शकतो तर निसाका का नाही? असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी, कामगार, व्यावसायिक अशा अनेक घटकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या निसाकाला वाचविणे आपले कर्तव्य आहे. या भावनेतून विजय कारे, गोकुळ गिते, अश्पाक शेख, संपतराव गावले आदींनी निसाका बचावसाठी पुढाकार घेतला आहे.

या मूक मोर्चाला सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, कामगार यांनी सहभागी व्हावे, यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवावे, असे आवाहन निसाका बचाव कृती समितीने केले आहे. आज सकाळी दहा वाजता बी. डी. भालेकर मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. निसाकाबाबत असा उठाव करण्याची वेळ निघून गेली आहे. त्यामुळे या मोर्चाचा कितपत उपयोग होतो, हे आज समजेल. कारण निसाका हा केवळ भावनेवर सुरू होऊ शकत नाही, त्यासाठी लढा तीव्र करावा लागेल. शासनाला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करावे लागेल.

मंत्रालयातील बैठक पुढे ढकलली

आमदार अनिल कदम यांनी निसाका व रासाका वाचविण्यासंदर्भात आज (दि.१०) मंत्रालयात सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलल्याची माहिती आमदार कदम यांनी कळवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याजवळील तीन लाख हिसकावले

$
0
0

नाशिक : बँकेत पैसे भरण्यासाठी चाललेल्या शेतकऱ्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी त्याच्याजवळील तीन लाखांची रोकड लांबविली. गंगापूर रोडवरील थत्तेनगर परिसरात बँक ऑफ महाराष्ट्र समोर बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.

दत्तात्रय दामोदर बर्वे (वय ६०, रा. माडसांगवी) यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यांनी पंचवटीतील आयसीआयसीआय बँकेतून तीन लाख रुपये काढले. ही रोकड प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ते गंगापूर रोडवरील आयडीबीआय बँकेकडे चालले होते. ते थत्तेनगरकडे पायी चालले होते. बँकेसमोर येताच मोटरसायकलवरून आलेल्या दोघा ंनी बर्वे यांच्याकडील पैशांची पिशवी हिसकावून नेली. पोलिस घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.


महागड्या वस्तूंसह कागदपत्रे चोरीस

नाशिक : वाहनतळावर पार्क केलेल्या कारचा दरवाजा उघडून चोरट्यांनी कारमधील लॅपटॉपसह आयपॉड, मोबाइल आणि महत्त्वाची कागदपत्र चोरून नेल्याची तक्रारी मंदार मोरेश्वर पाठक (रा.टाकळी रोड) यांनी सरकारवाडा पोलिसांकडे केली आहे. सोमवारी रात्री सिबल हॉटेल जवळ हा प्रकार घडला. चोरट्याने कारचा दरवाजा उघडून सुमारे १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांकडून शालेय साहित्याची तोडफोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

रायगड चौकातील महापालिकेच्या विद्यानिकेतन क्रमांक चार या शाळेत टवाळखोरांनी धुडगूस घालत शालेय वस्तूंची तोडफोड केली. टवाळखोरांची या भागात दहशत वाढली असून, शालेय परिसरला मद्यपींचा अड्डा बनवला आहे. या टवाळखोरांवर कारवाई करण्याबरोबरच पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

शाळा परिसरात टवाळखोरांची हिमत वाढली आहे. याबाबत शाळेने अनेकदा मनपा शिक्षण मंडळ व अंबड पोलिसांकडे तक्रारही केली. मात्र, टवाळखोरांवर कारवाई होत नसल्याचे केंद्र प्रमुख जयश्री पंगुळवाले यांनी सांगितले. या शाळेत मंगळवारी मद्यपी टवाळखोरांकडून तोडफोड करण्यात आली. यात मुख्याध्यापिका यांच्या दालनातील महापुरुषांचे फोटो, बॅचेस, ट्यूब लाईट, विजेच्या फिटिंग आदी शैक्षणिक साहित्याची टवाळखोरांनी तोडफोड केली. दरम्यान, अंबड पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.

रायगड चौकातील महापालिकेच्या शाळेत टवाळखोरांचा अड्डा नेहमीच भरत असतो. याबाबत अनेकदा पोलिस प्रशासन व महापालिका शिक्षण मंडळाला कळविले होते. मंगळवारी टवाळखोरांनी शाळेच्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान केले. पोलिसांनी शाळेच्या परिसररात रात्री गस्त वाढविण्याची गरज आहे.

- जयश्री पंगुळवाले, केंद्रप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयाकडून सासऱ्यास मारहाण

$
0
0

जावयाकडून सासऱ्यास मारहाण

नाशिक : माहेरी गेलेल्या पत्नीशी वाद सुरू असताना मध्यस्थी करणाऱ्या सासऱ्याला जावयाने बेदम मारहाण केली. मखमलाबाद येथील वडजाई माता नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. गोरक्षनाथ पुंडलिक भालेराव (रा.चिंचखेड, ता. दिंडोरी) असे त्या जावयाचे नाव आहे. पंचवटी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कल्याणी भालेराव यांनी फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अज्ञात युवतीच्या हत्येची करा चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिक महिला दिनी सायखेडा रोड परिसरात एका अज्ञात युवतीची अमानुषपणे हत्या करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला होता. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी केली. पोलिस अधीक्षकांना यावेळी निवेदन देण्यात आले. सिन्नर तालुक्यातील हिवरगाव परिसरात एका युवतीची अमानुषपणे हत्या करून तिच्या शरीराचे विविध अवयव एका पिशवीत भरून रस्त्यालगत टाकण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बाइक रॅलीसाठी रजिस्ट्रेशन केलंत का?

$
0
0

संपूर्ण शहराला महिला शक्तीचे दर्शन घडविण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'मार्फत १३ मार्चला (रविवार) महिला बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या रजिस्ट्रेशनला २० वर्षांच्या युवतीपासून साठीच्या आजीपर्यंत महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

येत्या रविवारी (१३ मार्च) सकाळी ७.३० वाजता भोसला मिलिटरी कॉलेजपासून या रॅलीला सुरुवात होणार असून, यामध्ये महिलांना आपल्या बाइकसह सहभागी व्हायचे आहे. परंतु यासाठी गरजेचे आहे ते रजिस्ट्रेशनची. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जॉगर्स ग्रुप, किटी ग्रुप, कॉलेजच्या मुलींचे ग्रुप्स असे विविध ग्रुप्स यासाठी रजिस्ट्रेशन करत आहेत. गेल्या वर्षीच्या बाइकर्णींना या बाइक रॅलीसाठी 'मटा'चे आग्रहाचे निमंत्रण आहे. तसेच गेल्या वर्षी यामध्ये सहभागी होऊ न शकलेल्या महिलांचेही यंदा होणाऱ्या रॅलीमध्ये स्वागत आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही महिलेला यामध्ये सहभागी होता येणार असून, रॅलीवेळी ड्रायव्हिंग लायसन्स सोबत असणे आवश्यक आहे.




भोसला मिल‌िटरी कॉलेज-जेहान सर्कल-नवश्या गणपती-सोमेश्वर-बारदान फाटा-मोतीवाला कॉलेज-त्र्यंबकरोड-एबीबी सर्कल-एमरल्ड पार्क-कॅनडा कॉर्नर-बीवायके कॉलेज आणि पुन्हा भोसला मिलिटरी कॉलेज असा या रॅलीचा मार्ग असणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाइलवर BikerallyNSK टाइप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करा किंवा ६६३७९३९ या नंबरवर संपर्क साधा.



नाशिकमध्ये असा काही उपक्रम राबविला जातो आहे ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. महिलांना एकत्र येऊन स्वत:मधील आत्मविश्वास जागृत करण्याची ही संधीच आहे. जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन संधीचे सोने करावे. - स्नेहा शेरगील, मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स २०१६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागाची महापौरांकडून झाडाझडती

$
0
0

डोअर टू डोअर करणार सर्व्हे; ब्लॅकस्पॉट बंद करण्याचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यू व स्वाईन फ्ल्यूसह साथीच्या रोगांनी पुन्हा डोके वर काढल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी गुरूवारी वैद्यकीय व आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांना रामायण बंगल्यावर बोलावित तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. शहरात धूर फवारणी वाढविण्यासह साथीच्या आजारांची व्याप्ती जाणून घेण्यासाठी डोअर टू डोअर सर्व्हे करण्याचेही आदेश दिले आहे.

अनेक दिवसापासून शहरातील डासांची संख्या झपाट्याने वाढल्याने साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. स्वाईन फ्ल्यूचे तीन रुग्ण शहरात नव्याने आढळून आहे. धूर फवारणी शहरात कुठेही होत नसल्याने डासांची संख्या नियंत्रित राहत नाही. त्यामुळे साथीचे आजार वाढले असू मलेरिया, फ्ल्यू, तापाचे रुग्ण घरोघरी आढळून येत आहेत. तर दुसरीकडे वैद्यकीय व आरोग्य विभागात डास नियंत्रित करण्याबाबत अनास्था असून दोन्ही विभाग झोपल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. त्यामुळे महापौर मुर्तडक यांनी गुरूवारी आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, वैद्यकीय अधीक्षक बी.आर. गायकवाड यांच्यासह विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात महापौरांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आदेश दिले. शहरात धूर फरावरणी वाढवण्यासाठी पेस्ट कंट्रोलचा विषय मार्गी लावण्याचे आदेश दिले. ठेकेदाराला सहा महिने मुदतवाढ देवून ठेकेदाराचे काम दिसत नसल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्यबाबत नागरिकांच्या तक्रारी नगरसेवकांकडे वाढल्या आहेत. शहरात सुमारे दीडशे ब्लॅक स्पॉट आहेत. तेथे डासांची संख्या वाढत आहे. हे ब्लॅक स्पॉट बंद करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

आजारांबाबत जनजागृती

नागरिकांच्या आरोग्यासह साथीच्या आजारांबाबत डोअर टू डोअर भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेण्याचे आदेश महापौरांनी वैद्यकीय विभागाला दिले. त्यामुळे वैद्यकीय विभाग आता घरोघरी जावून साथीच्या रुग्णांची संख्या जाणून घेण्यासह प्रतिबंधात्मक औषधींचे वितरण आणि आजारांबाबत जनजागृती करणार आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना दररोज विभागाच्या वतीने केलेल्या कामकाजाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या आहेत.

पेस्ट कंट्रोल कागदावरच

शहरातील डासांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने भाजपच्या एका बड्या नेत्याला पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराला महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर राजकीय अभय असल्याने ठेकेदारामार्फत पेस्ट कंट्रोल कागदावरच केले जात असल्याचे अधिकारीच खासगीत सांगत आहेत. संबंधित ठेकेदाराला आतापर्यंत १५ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराबाबत अनेक तक्रारी आहेत. परंतु, त्यांनाच मुदतवाढ दिली जात आहे. संबंधित ठेकेदार कामाच्या बदल्यात अन्यत्र काम करून मनसेला अडचणीत आणत आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम सुरू आहे.

महाआरोग्य अभियान

महापालिकेच्या वतीने १५ मार्चपासून शहरात महाआरोग्य अभियान राबविण्यात येणार आहे.या आरोग्य अभियानात गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी केली जाणार आहे. अभियान १५ दिवस चालणार आहे. सोबतच या १५ दिवसात महापालिकेच्या वतीने आरोग्याबाबत जनजागृती मोहिमेही राबविली जाणार आहे. डासांच्या उत्पत्ती स्थळांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिडासंस्कृतीला मिळणार चालना

$
0
0

जेलरोडमध्ये उभारले जाणार सहा कोटींचे संकुल

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोड येथील प्रभाग ३२ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सहा कोटीचा निधी मंजूर केला असून महापालिका ७५ लाखांची तरतूद करणार आहे. क्रिडासंकुलाचे भूमिपूजन शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे यांच्याहस्ते शुक्रवारी (दि. ११) सकाळी अकराला होणार आहे.

क्रिडासंकुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने केंद्र सरकारी योजनाचा थेट लाभ मिळणार आहे. केंद्राच्या शहरी क्रिडासंकुल योजनेतून अशा प्रकारचा निधी मिळण्याचे देशातील हे पहिलेच पहिलेच उदाहरण असावे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेतर्फे राज्य व केंद्र सरकारकडे क्रिडासंकुलासाठी प्रस्ताव पाठवला होता. खासदार हेमंत गोडसे, नगरसेवक शैलेश ढगे यांनी संकुलासाठी प्रयत्न केले होते. बांधकाम उपअभियंता निलेश साळी, जिल्हा क्रिडाधिकारी संजय सबनीस यांनीही प्रकल्पासाठी मदत केली. सहा कोटी निधी मंजूरीचे पत्र गोडसे यांना केंद्राकडून मिळाले आहे.

असे असेल क्रिडासंकुल

सायखेडा रोडवरील आढावनगर भागातील सर्वे क्रमांक ४९, ६२ व ६८ मध्ये क्रिडासंकुल उभारले जाणार आहे. त्यात लहान मुलांसाठी स्वतंत्र मैदान असेल. संकुलाचा आकार ४० बाय ४० मीटरचा असेल. त्यात व्हॉलिबॉल व टेबल टेनिसचे प्रत्येकी दोन कोर्ट, कॅरम, बुद्धीबळसाठी स्वतंत्र रुम, पुरुष व महिलांसाठी व्यायामशाळा, पाचशे मीटरचा जॉगिंग तर २०० मीटरचा काँक्रिटचा ट्रॅक असेल. ३४ मीटर बाय ३ मीटर लांबीचे सिंथेटीक कोर्ट असेल. संकुलात प्रशिक्षक व कर्मचारी नियुक्त केले जातील.

मोबाइल, टीव्हीच्या आहारी गेलेल्या युवापिढीला क्रिडासंकुलामुळे नवी दिशा मिळेल, क्रिडासंस्कृती वाढेल. जेलरोडच नव्हे तर नाशिकरोड परिसरातील क्रिडाप्रेमींना संकुलाचा लाभ होईल.

- शैलेश ढगे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायदंडाधिकारी परीक्षेत जिल्ह्यातील सहा उत्तीर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेत जिल्ह्यातील सहा जणांना यश मिळाले आहे. शहरातील अॅड. सुरेखा अशोक कदम-मोरे यांचाही त्यात समावेश आहे. राज्यभरातील २२७ जणांची निवड झाली असून आज, गुरुवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीपदाच्या २२७ जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेण्यात आली होती. या पदासाठी राज्यातून सुमारे २५ हजार वकिलांनी परिक्षा दिली होती. त्यातील २ हजार ३८० वकिल मुख्य परीक्षेस पात्र ठरले होते. ५४७ वकिलांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर आज जाहिर झालेल्या निकालात २२७ वकिलांची न्यायदंडाधिकारीपदासाठी निवड झाली. २५० पैकी १६७ गुण मिळवत अॅड. वर्षा झेंडे या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. नाशिकच्या अॅड. सुरेखा कदम-मोरे यांनी १५६ गुण मिळवत अठरावा क्रमांक पटकावला. मनमाडचे अॅड. विशाल देशमुख, सिन्नरचे अॅड. वासिम शेख यांच्यासह अॅड. पंडित देवरे, अॅड. बाळासाहेब पवार आणि अॅड. दिप्ती सरनाईक यांची देखील न्यायदंडाधिकारीपदी निवड झाली आहे. या यशाबाबत नाशिक बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड नितीन ठाकरे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. जयंत जायभावे, अॅड. अविनाश भिडे, सरकारी वकिल अॅड. राजेंद्र घुमरे यांच्यासह इतर वकिलांनी निवड झालेल्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारावलेल्या शब्दांत भिजला ‘गोदावरी गौरव’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्रोत्यांच्या प्रचंड कडाडणाऱ्या टाळ्या... प्रत्येक पुरस्कारागणिक होणारा हर्षोल्हास...भारावलेले शब्द अन् ओथंबलेल्या भावना असा माहोल गोदावरी गौरव पुरस्कार सोहळ्यात तयार झाला होता. लोकसेवा, विज्ञान, वास्तुशिल्प, नृत्य, चित्रपट या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना 'कृतज्ञतेचा नमस्कार' करण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन होते.

यावेळी व्यासपीठावर पुरस्कारमूर्ती चेतना सिन्हा, डॉ. शशिकुमार चित्रे, आर्किटेक्ट बाळकृष्ण दोशी, डॉ. कनक रेळे, नाना पाटेकर, डॉ. हितेंद्र महाजन व डॉ. महेंद्र महाजन यांच्यासह कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कार्यवाह मकरंद हिंगणे व कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. कर्णिक यांच्या हस्ते गोदागौरव पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मधु मंगेश कर्णिक म्हणाले की, जीवनाला उन्नत करणाऱ्या क्षेत्रात कृतज्ञतेचा नमस्कार करण्यासाठी हे पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे दिले जातात. महाराष्ट्राचे केवढे भाग्य की तात्यासाहेब त्याच्या वाट्याला आले. चेतना सिन्हा म्हणाल्या की, हा पुरस्कार मी माणदेशी स्त्रीयांना अर्पण करतेय. त्या महिलांच्या टॅलेंटमुळेच आज मी उभी आहे. कनक रेळे यावेळी म्हणाल्या की, नृत्यात शिष्यवृत्ती देण्याचा प्रतिष्ठानचा विचार असेल तर नालंदा विद्यापीठातर्फे लागणारी सर्व मदत मी करेल. डॉ. शशिकुमार चित्रे यांनी तात्यासाहेब महाराष्ट्राचे कालिदास होते. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले ते एक रत्न होते, असा उल्लेख केला. बाळकृष्ण दोशी यांनी, काही वेळेला चमत्कार होतात जसा आज झाला आहे असा पुरस्काराचा उल्लेख केला. महाजन बंधूंनी या पुरस्काराची २१ हजार रूपये रक्कम नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनसाठी अर्पण केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले. प्रास्ताविक कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांचा सत्कार प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला. प्रारंभी मकरंद हिंगणे यांनी संगीतबध्द केलेले 'प्रकाशदाता जीवनदाता हे सविता उदयाचली ये' हे गीत सादर करण्यात आले. या गीताचा ट्रॅक स्वरांजय धुमाळ व आनंद अत्रे यांनी बनवला होता.

संगीत क्षेत्रासाठी १ लाखाची शिष्यवृत्ती

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ग्रंथांच्या अभ्यासासाठी १ लाख रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. याच पार्श्वभूमीवर संग‌ीत विषयाचा अभ्यास करण्यासाठी १ लाखाची शिष्यवृत्ती लवकरच देण्यात येणार असल्याचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी जाहीर केले. या शिष्यवृत्तीसाठी एक समितीही गठीत करण्यात आलेली आहे. ही समिती निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही हिंगणे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ वादातून टोळक्याची हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ वादातून शिवाजीनगर परिसरातील इंदिरा गांधी उद्यानासमोर दोन गटात मंगळवारी रात्री हाणामारी झाली. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पिंटू हिरा सिंग (२१) हा त्याच्या घरासमोर दुचाकी लावत असतांना संशयित मयुर गजानन वांद्रकर, सागर संजय पाटील आणि एका संशयिताकडे पिटुंने पाहिले. आमच्याकडे का पाहतो, असे म्हणून पिटूंसह त्याचा भाऊ ब्रिजभुषण व धर्मेद्र यांना बेदम मारहाण केली. त्यात दगड, विटा आणि लाकडी फळीने मारहाण केल्याने तिघांना गंभीर दुखापत झाली. पिंटू सिंग याने वांद्रकर, पाटील आणि अल्पवयीन मुलाविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल केली आहे. तर अल्पवयीन मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पिंटू सिंग, ब्रिजभूषण सिंग आणि धर्मेंद्र सिंग यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट खात्याद्वारे फसवणूक

दुसऱ्या व्यक्तीची कागदपत्रे देत बँकेत खाते तयार करून त्यावर आर्थिक व्यवहार करून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार पंचवटीतील एका बँकेत घडला. याप्रकरणी बँकेच्या शाखाधिकाऱ्याने संशयिताविरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पेठरोडवरील दत्तात्रय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नितीन गणेश शेळके याने १३ जुलै २०१५ रोजी पंचवटीतील अभ्युदय को. ऑप बँकेत मोहन रामा अडाळे या नावाने खाते उघडले होते. खाते उघडण्यासाठी संशयित शेळकेने अडाळे याच्या नावे बनावट कागदपत्रे दिले होते. ही बाब बँकेचे शाखाधिकारी चंद्रभूषण कपिलदेव त्रिपाठी यांच्या लक्षात आली. त्यांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बँकेची फसवणूक झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना राहुरी रोडवरील पालवे वस्तीसमोर घडली. सुरेश रामचंद्र आव्हाड (५५) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुरी गावत राहणारे आव्हाड दुचाकीने (एमएच १५ एएफ १५२) जात असतांना ती स्लीप झाली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चर्चासत्रातही ‘मुक्त’ सत्काराचा घाट

$
0
0

नियोजित कामात आपला कार्यभाग साधून घेणे अशी वृत्ती आजकाल फोफावताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय मुक्त विद्यापीठाच्या कार्यक्रमात येत आहे. मुक्त विद्यापीठातर्फे १२ मार्चपासून एक राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे विद्याशाखा यांच्यावतीने असलेल्या या चर्चासत्रात विशाखा व रुक्मिणी पुरस्काराचे वितरणही करून घेण्यात येणार आहे. मुळात चर्चासत्रे ही त्या विषयाच्या प्रचार प्रसारासाठी असताना मध्येच पुरस्कार वितरण कशासाठी असा सवाल उपस्थित होतो.

चर्चासत्राच्या प्रथम सत्रातच हे कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत. हे कमी झाले की काय चर्चासत्राच्या प्रथम सत्रामध्ये मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सत्कारही करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी होणाऱ्या चर्चासत्रापासून व्याख्याने ठेवण्यात आली आहेत. मुक्त विद्यापीठाची ही कशी पध्दती आहे, यावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

पुढाऱ्यांची हुजरेगिरी कशासाठी? मुक्त विद्यापीठाच्या कार्यपध्दतीवर अनेक आक्षेप आहेत. अशा परिस्थितीत सध्या राष्ट्रीय चर्चासत्रात ठेवण्यात आलेल्या सत्काराचा मुद्दा गाजतोय. मुक्त शिक्षणपध्दती व अभ्यासक्रम देणाऱ्या एका विद्यापीठाने अशाप्रकारे पुढाऱ्यांचे उतराई होण्याचा पहिलाच प्रसंग असून कुलगुरूंनी तरी या कार्यक्रमाला परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

`आप`ने वळवली अंडरपासची वाहतूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वादातीत इंदिरानगर अंडरपास येथील गोविंदनगरच्या दिशेने येणारी वाहतूक हायवेकडे वळवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या चौघा कार्यकर्त्यांना मुंबई नाका पोलिसांनी संध्याकाळी ताब्यात घेतले. तुमचा हेतू चांगला असला तरी वाहतूक नियोजनाचे पोलिसांचे काम पोलिसांनाच करू द्या, असा सज्जड इशारा देऊन त्यांना अर्धा तासाने सोडून देण्यात आले.

सततची वाहतूक कोंडी आणि अपघात यामुळे वादाच्या व राजकारणाच्या भोवऱ्यात सापडलेला इंदिरानगर अंडरपास शहर पोलिसांनी १२ जुलै २०१५ रोजी बंद केला. अंडरपास बंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी काही प्रमाणात विरोध केला. मात्र, येथे होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूरच झाली. दुचाकीवरून थोड दूरून जाणाऱ्या वाहनचालकांना हे सोयीचे होते. मात्र, इंदिरानगर अंडरपास बंद करण्याच्या पोलिसांच्या निर्णयावरून काही महिन्यांपासून राजकारण सुरू झाले. नागरिकांची मागणी या नावाखाली पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी पोहचल्या. शेवटी, हा अंडरपास ८ मार्च रोजी रात्री सुरू करण्यात आला. आता, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, अशी गत झाली आहे. हा अंडरपास एकेरी केला तर वाहतूक कोंडी होणार नाही, असा दावा करीत आम आदमी पक्षाचे जसबीर सिंग व त्यांचा चौघा साथिदारांनी आज, गुरूवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास अंडरपास गाठले. तिथे फ्लेक्स बोर्ड हातात घेऊन त्यांनी गोविंदनगरकडून येणारी वाहतूक प्रकाश पेट्रोल पंपाच्या दिशेने वळवली. याबाबतची माहिती समजताच मुंबई नाका पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

हा अंडरपास सुरू झाल्याने अपघाताच्या घटना घडू शकतात. वाहतूक कोंडीची समस्या सुरू झाली असून, वाहतूक पोलिस मात्र इंदिरानगर अंडरपासला टाळू लागल्याचे ​दिसते. राजकीय निर्णयाचे पडसाद पोलिस वर्तुळात पडत असून, त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना काय फटका बसू शकतो, अशी चर्चा झडते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यंदा कर्तव्य’साठी दोन महिने वेटिंग

$
0
0

लग्नासारखा मोठा सोहळा मुहूर्तावरच पार पडावा, यासाठी बहुतांश लोकं आग्रही असतात. हा सोहळा कोणत्याही विघ्नांशिवाय पार पडावा यासाठी मुहूर्त शोधला जातो. जोडप्याच्या वैवाहिक जोडप्याच्या सुखी भविष्यासाठी शुक्र या ग्रहाचे पाठबळ लग्नात महत्त्वाचे मानले जाते. वंशवृद्धीच्या दृष्टीनेही हे स्थान मोठे असते. याच अनुषंगाने शुक्राच्या अस्ताचा काळ लग्नासाठी योग्य मानला जात नाही. मे, जून या काळात शुक्राचा अस्त होणार नसल्याने या काळात लग्नतिथीमध्ये खंड पडला आहे. हा काळ ६ जुलैपर्यंत असाच राहणार असून त्यानंतर शुक्राचे पाठबळ जोडप्यांना लाभणार आहे. लग्नाबरोबरच मुंज, वास्तुशांती, गृहप्रवेश या शुभकार्येही या काळात केली जाणार नाहीत. या काळात मुहूर्त नसल्यामुळे एप्रिलमधील लग्नतिथींमध्ये लग्न पार पाडण्यास प्राधान्य असणार आहे.

लग्नासाठी इच्छुक वर आणि वधूसाठी शुक्राचे पाठबळ अतिशय महत्त्वाचे असते. विवाह समारंभाचा मुहूर्त काढताना याचा विचार प्रामुख्याने केला जातो. मे, जूनमध्ये शुक्राचा अस्त असल्याने थेट जुलैमध्ये पूरक लग्नतिथी उपलब्ध होणार आहेत. सुमारे दोन महिने लग्नतिथी नसतील. - रत्नाकर संत, पुरोहित

एप्रिलमध्ये मंगल कार्यालये फुल्ल मे, जूनमधील शुक्राच्या अस्तामुळे मुहूर्त नसल्याने एप्रिलमध्ये लग्न पार पाडण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. एप्रिलमध्ये १२ ते १३ मुहूर्त आहेत. या सर्व तारखांना शेकडो लग्न पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी या महिन्यात सर्वच मंगल कार्यालये, लॉन्स बुक झाल्याचे सांगितले जात आहे. पुढचे सव्वा दोन महिने थांबण्याऐवजी याच काळात लग्न उरकण्याकडे अनेकांचा कल असल्याचे यावरून दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान, शहर तापतंय!

$
0
0

जिल्ह्यातही पारा चढाच; मालेगाव तालुक्यात सर्वाधिक तापमान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, पारा ३४ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद मालेगाव तालुक्यात झाली असून, त्याची तीव्रता ३९ अंश सेल्सिअस इतकी आहे. गेल्या काही दिवसापासून शहरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. सकाळच्या हवेत गारवा, तर दुपारच्या वेळी उन्हाचे चटके अनुभवायला मिळत आहे. थंडी कमी झाल्याने सकाळी बाहेर फिरणाऱ्यांची गर्दी वाढली असून सकाळच्या गारव्याचा आनंद घेतांना लोक दिसत आहे. त्याचप्रमाणे रात्री देखील वातावरणात गारवा पसरत असून लोक फिरताना दिसत आहेत.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. १५ मार्च पर्यंत राज्यात हवामान कोरडे रहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता घरातही जाणवत असून, तहानेने घसा कोरडा पडतो आहे. जिवाची लाही होत असताना कितीही पाणी प्यायले तरी तहान काही केल्या भागत नाही. बदलत्या वातावरणाचा परिणाम होत असून, आजारांमध्ये वाढ होऊ नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

थंड पेयांच्या विक्रीत वाढ

उन्हाळ्याची चाहुल लागताच थंडपेयांच्या विक्रीत वाढ झाली आहे. नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत असल्याने नागरिक पाण्याच्या बाटल्या घरातून घेऊन निघतांना दिसत आहेत.

मुलांना, ज्येष्ठांना सांभाळा!

शहराचा पारा वाढतच असून, नाशिककरांना उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागणार आहे. लहान मुले आणि वृद्धांसाठी हा ऋतू विशेष देखभालीचा आहे. दोघांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असल्यामुळे कुठल्याही रोगाचा हल्ला यांच्यावर चटकन परिणाम करतो. पाणी जास्त प्यावे आणि साधे जेवण करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

कमाल तापमान किमान तापमान

५ मार्च ३४.८ १६.३

६ मार्च ३२.९ १४.५

७ मार्च ३३.५ १४.८

८ मार्च ३४.४ १५.४

९ मार्च ३४.९ १६.०

१० मार्च ३४.९ १४.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इन्व्हेस्टिगेशन फंडा’ने तपासाला बूस्ट?

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास करताना पोलिस यंत्रणेला काही आवश्यक खर्च करावा लागतो. त्यासाठी गृह विभाग महिन्याकाठी पैशांची तरतूद करते. मात्र, प्रत्यक्ष तपासाधिकाऱ्यांपर्यंत हे पैसे वेळेवर पोहचत नाहीत. खर्चासाठी पैसे नसलेले तपासाधिकारी तपासात चालढकल करतात. सुदैवाने जानेवारी महिन्यापासून हा निधी सर्वच पोलिस स्टेशन, क्राईम ब्रँच तसेच सहायक पोलिस आयुक्त कार्यालयांना देण्यात आला आहे. यामुळे तपासाचा दर्जा सुधारणार काय, अशी चर्चा पोलिस वर्तुळात सुरू झाली आहे.

एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची पोलिस स्टेशनमध्ये नोंद होऊन तपास होणे महत्वाचे असते. गुन्ह्याचा तपास सखोल झाला असेल तर सहाजिकच गुन्हा सिध्द होण्याचे प्रमाण वाढू शकते. गुन्ह्याचा तपास करताना तपासधिकाऱ्याला कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. बाहेरगावी तपासासाठी जाणे, अत्यावश्यक प्रसंगी वाहने भाडेतत्वावर घेणे, तपासासाठी आरोपी किंवा साक्षीदाराला घटनास्थळी नेणे, त्यांच्या जेवणाची किंवा मुक्कामाची व्यवस्था करणे इत्यादी कामांसाठी पैसा खर्च होतो. यापार्श्वभूमीवर इन्व्हेस्टिगेशन फंड म्हणून गृह विभाग या पैशांची तरतूद करतो. पोलिस स्टेशन, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक किंवा पोलिस उपायुक्त, क्राईम ब्रँच, एटीएस तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हा निधी देण्यात येतो. याबाबत सूत्रांनी सांगितले, की जानेवारीपासून इन्व्हेस्टिगेशन फंड नियमित सुरू झाला आहे. शहरातील सर्वच पोलिस स्टेशन, क्राईम ब्रँच व एसीपी कार्यालयांना फंड मिळाला आहे. इन्व्हेस्टिगेशनसाठी तपासाधिकाऱ्यांकडे पुरेसा पैसे नसेल तर तो हा भार फिर्यादीच्या गळ्यात मारतो. अगदी झेरॉक्स काढण्यासाठीही फिर्यादींनाच सांगण्यात येते. तपासाधिकाऱ्याकडे अनेक गुन्ह्यांच्या तपासाचे काम सोपवलेले असते. तपास करणारे अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने स्व-खर्चाने काम करणे कदापी शक्य नाही. त्यामुळे हा निधी नक्कीच फायदा देणारा ठरेल, असा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला.

अशी होते विभागणी

शहराचा विचार करता ११ हजार २५० रुपयांप्रमाणे १३ पोलिस स्टेशनला हा निधी देण्यात येतो आहे. चार सहायक पोलिस आयुक्त कार्यालयांना प्रत्येकी साडेसात हजार, चार पोलिस उपायुक्त कार्यालयांना प्रत्येकी ११ हजार २५०, क्राईम ब्रँचच्या तीन युनिटसाठी प्रत्येकी ११ हजार २५० रूपये इतका फंड देण्यात येतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images