Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘भूमाता’ला रस्त्यातच रोखले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर/त्र्यंबकेश्वर

महिला दिन म्हणजे पुरोगामी विचारांच्या दिशेने टाकलेले एक पाऊलच! मात्र, याच दिवसाच्या पूर्वसंध्येला महिलांनी महिलांनाच मंदिर प्रवेशापासून रोखून `आगळावेगळा` पायंडा पाडत पुरोगामीत्वाची वाट अडवली. शनिशिंगणापूरपाठोपाठ त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून महिलांना रोखण्यात आले. भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सिन्नर तालुक्याच्या हद्दीतच पोलिसांनी अडविले. दुसरीकडे, ब्रिगेडच्या आंदोलकांना रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील शेकडो महिला तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मंदिराभोवती कडे करून उभे होते.

भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई व त्यांच्या सुमारे ५० महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी सिन्नर येथील नांदूर शिंगोटे येथेच रोखल्याने पुढील संभाव्य संघर्ष टळला. महिला कार्यकर्त्यांना त्र्यंबकेश्वर येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केल्याने सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले. सिन्नरच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाला विरोध केला. महाशिवरात्रीपर्यंत महिलांना त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा अल्टिमेटम भूमाता ब्रिगेडने १८ फेब्रुवारीला दिला होता. त्यानंतर विविध संघटनांनी त्र्यंबकेश्वरमधील म‌हिलांना परंपरा मोडणाऱ्या भूमाता ब्रिगेडविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला त्र्यंबकेश्वरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.

महिलांसह, साधूमहंत, नगरपरिषद सदस्य, जेष्ठ नागरिक, पुरोहित संघ, हिंदुत्ववादी सघंटना एकत्र आल्या. नगराध्यक्षा विजया लढ्ढा, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा प्रभावती तुंगार, बांधकाम सभापती तृप्ती धारणे आणि शहरातील शेकडो महिला सोमवारी सकाळीपासून मंदिरात ब्रिगेडला रोखण्यासाठी जमल्या होत्या. ब्रिगेडच्या महिला मंदिरात जाऊ नये म्हणून हिंदु संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून तयारी केली होती.

हरसिद्धगिरींचा प्रयत्न फसला

दुपारी बाराच्या सुमारास साध्वी हरसिध्दगिरी या त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झाल्या. आपणास अध्यक्षांना भेटावयाचे आहे तसेच आपणास थेट गाभाऱ्यात जायचे आहे, असा आग्रह त्यांनी मंदिर विश्वस्तांकडे धरला. त्यांना समजावण्याचा प्रयत्न सदस्यांनी करून पाहिला. मात्र, त्या ठाम राहिल्याने त्र्यंबकेश्वरच्या संतप्त झालेल्या महिलांनी साध्वीला मंदिराबाहेर काढले. साध्वींनी आपण आंदोलन करणार असल्याचे सांगून तेथेच बैठक मारली. मात्र, महिलांनी त्यांना तेथून जाण्यास भाग पाडले.

पोलिसांच्या केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. हा सरकारचा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आहे. गाभाऱ्यात प्रवेशापासून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न निरर्थक आहे. याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत.-तृप्ती देसाई, अध्यक्ष, भूमाता ब्रिग्रेड

महिलांना गाभाऱ्यात प्रवेश ही त्र्यंबकची परंपरा नाही. त्यामुळे प्रथा परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कधीही यशस्वी होऊ देणार नाही. त्र्यंबकच्या सर्वस्तरातील महिला एकत्र आल्या असून, भूमातेचा आम्ही विरोध करीत आहोत.-विजया लढ्ढा, नगराध्यक्षा, त्र्यंबकेश्वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या तंत्रज्ञानाचे लढाऊ विमानाला कवच

$
0
0

mahesh.pathade@timesgroup.com

नाशिक : भारतीय वायुसेनेला फायदेशीर ठरणारे 'केनोपी इनफ्लेटेबल सील' नावाचे तंत्रज्ञान नाशिकच्या एचएएलने विकसित केले आहे. नाशिकचे एचएएलचे व्यवस्थापक हितेंद्र सौंदाणकर यांनी त्यावर संशोधन केले असून, ते मूळचे धुळे येथील आहेत. हे तंत्रज्ञान लढावू विमानात वापरले जाते. त्यामुळे कॉकपिटमध्ये हवेचा दाब मेंटेन राहू शकतो. यापूर्वी हे तंत्रज्ञान विदेशातून आयात करावे लागत होते. मात्र, भारतातच ते विकसित करण्यात आल्याने एचएएलचा निम्मा खर्च वाचला आहे. या शोधकार्याला केंद्र सरकारच्या रसायन व खत मंत्रालयाने नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे.

'इनफ्लेटेबल सील' हे तंत्रज्ञान इलोस्टोमेटिक मटेरिअलपासून बनविण्यात आले आहे. विदेशातून हेच सील आयात करण्यासाठी जेवढा खर्च लागतो, तो एचएएलच्या संशोधनामुळे आता निम्म्यावर आला आहे. नाशिकचे व्यवस्थापक (स्वदेशीकरण)हितेंद्र सौंदाणकर यांनी या संशोधनात विशेष योगदान दिले असून, या तंत्रज्ञानाचे भारतीय वायुसेनेनेही कौतुक केले आहे. 'टेक्नॉलॉजी इन इनोव्हेशन' या प्रकारात या तंत्रज्ञानाला केंद्र सरकारने राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले आहे.

इनफ्लेटेबलचे फायदे

- उच्च दर्जा व अधिक वर्षे सेवा देणारे

- पारंपरिक कच्च्या मटेरियलऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचे मटेरियल

- विदेशातून सील मागविण्याची गरज नसल्याने खर्च निम्म्याने कमी

- विदेशी चलनात बचत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृप्ती देसाई पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरकडे कूच करण्याचा प्रयत्न केला मात्र, नांदूर शिंगोटे येथे पोलिसांनी आंदोलकांना रोखून ताब्यात घेतले आहे.

शनिशिंगणापूरनंतर तृप्ती देसाई यांनी त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा, अशी मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. काल महाशिवरात्रीदिवशी देसाई व त्यांच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वरकडे कूच केली असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले होते. त्यानंतर आज सकाळीच पुन्हा एकदा या महिला कार्यकर्त्यांनी तसाच प्रयत्न केला. त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून पूजा करणारच, असा चंग या महिलांनी बांधला असून पोलिसांनी खबरदारी म्हणून देसाई व सर्व कार्यकर्त्यांना रोखत ताब्यात घेतले. पोलिसांनी काहीवेळ स्थानबद्ध करून या महिलांची सुटका केल्याचे सांगण्यात येत आहे.

सिन्नरमधील नांदूर शिंगोटे येथून त्र्यंबकेश्वर सुमारे ८० किलोमीटर दूर आहे. भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस वारंवार कारवाई करत आहेत. मात्र, देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अद्याप सिन्नर सोडलेले नसल्याने तणावाची स्थिती कायम आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वरला जाण्यापासून आम्हाला का रोखलं जात आहे?, असा सवाल करताना पोलीस चुकीचे वागत आहेत, असा आरोप देसाई यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळनगरला प्रतीक्षा सुविधांची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
रासबिहारी-मेरी रोडवरील गोकुळनगर आणि ईश्वरी हौसिंग को ऑपरेटीव्ह सोसायटीला गेल्या दहा वर्षांपासून पाणी आणि रस्त्याच्या समस्यांनी जेरीस आणले आहे. मुलभूत सुविधांअभावी या भागातील रहिवाशी त्रस्त झाले असून महापालिकेने या भागाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
या भागात दहा वर्षांपासून एकदाही नळाला पुरेशा दाबाने पाणी आलेले नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या भागातील अंतर्गत रस्त्यांचे सुद्धा अद्याप डांबरीकरण झाले नाही. २००५ सालापासून कॉलनीत ३६ बंगले आहेत. इतकी लोकवस्ती असतानाही महापालिका या भागाकडे दुर्लक्ष करीत आहे. अत्यंत कमी दाबाने पाणी मिळत असल्याने ते दिवसभर पुरत नसल्याचेही रहिवाशांनी सांगितले.
प्रारंभीच्या काळात या भागातील रोडचे खडीकरण झाले. पण अनेकवेळा मागणी करून डांबरीकरण झाले नसल्याने सर्व खडी वरती आली आहे. त्यामुळे पायी चालणे अवघड झाले आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी व वृद्धांना बसण्यासाठी उद्यान किंवा कोणतेही मैदान या भागात नाही. दहा वर्षे कमर्शियल पद्धतीने घरपट्टी वसूल करुनही पाणी व रस्त्यासारख्या मूलभूत सुविधाही पुरविल्या जात नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली असता त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
मूलभूत सुविधांसोबतच या भागातील सुरेक्षकडेही मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. विजेच्या डीपी उघड्या आहेत. त्यांना मागे व पुढचे झाकण नाही. त्यामुळे या डीपींच्या बाजूने जाताना आणि येताना भीती वाटत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली आहे. परंतु ती कमी व्यासाची टाकलेली असल्याने बऱ्याचदा पाणी साचते आणि दुर्गंधी पसरत असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
'महापालिका प्रशासनाने निदान पाणी द्यावे, रस्ते नीट करावेत व ड्रेनेज लाईन टाकून द्यावी. पावसाळ्यात देखील आम्हाला पाणी मिळत नाही. अतिशय वाईट परिस्थिती आहे आमची.'
- शिव चरणसिंग,
रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रंदिवस पाण्याचा अपव्यय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
मुंबई आग्रा महामार्गावरील के. के. वाघ कॉलेजसमोरील सर्व्हिस रोडला लागून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून रात्रंदिवस पाणीगळती सुरू आहे. या पाईपच्या व्हॉल्व्हमधून रात्रंदिवस हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
एकीकडे नागरिकांना प्यायला पाणी नसताना इथे मात्र पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. पाण्याचा होणारा हा अपव्यय आणि गळती त्वरित थांबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असलेले पाहून पंचवटी विभागाच्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या पाण्याच्या पाईपलाईनचे पूजन करून निषेध व्यक्त केला.
प्रशासनाचे शहरातील पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी श्याम पिंपरकर, सोमनाथ बोडके, सुनील फरताळे, चन्द्रशेखर पंचाक्षरी यासह परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गौरी पटांगणावर कचऱ्याचे साम्राज्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
गोदावरी नदीच्या काठावरील गौरी पटांगण समोर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. शेजारील सर्व दुकानदार आणि व्यापारी वर्गाला याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.
सातत्याने सूचना देऊन आणि सूचन फलक लावूनही परिसरातील रहिवाशी, नागरिक आणि भाजीपाला विक्रेते या ठिकाणीची कचरा कुंडी सोडून बाहेरच कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाऱ्यामुळे इथला सुका कचरा वेगाने उडतो आणि परिसरात घाण पसरते. या ठिकाणी कायमच घंटागाडी असावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आम्हाला रात्रंदिवस या दुर्गंधीचा आणि कचऱ्याचा सामना करावा लागतो. महापालिकेने या ठिकाणी कायमच घंटा गाडी उभी करावी.
- देवांग जानी, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटारींच्या ढाप्यांनी अपघाताला आमंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर
अशोकनगर परिसरात रस्त्यावरील गटारींच्या ढाप्यांमुळे वाहनचालकांना कसरत करुन वाहने चालवावी लागत आहेत. महापालिकेच्या पावसाळी गटार विभागाने रस्त्यात खड्डे बनून असलेले हे ढापे रस्त्याला समांतर करावेत, अशी मागणी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांनी केली आहे.
महापालिकेने पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पावसाळी गटारी तयार केल्या आहेत. परंतु अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये टाकण्यात आलेल्या पावसाळी गटारींचे ढापे रस्त्यातच खड्डे बनून बसल्याने वाहनचालकांना वाहने चालवितांना नेहमीच करसत करावी लागते. या ढाप्यांचा खड्डा वाचविण्याच्या नादात वाहनचालक एकमेकांवर धडकल्याचे अनेकदा अपघात घडले आहेत. दीड महिन्यांपूर्वीच एका कामगाराचा पावसाळी गटारीच्या ढापा वाचविताना महामंडळाच्या बसची धडक लागून अपघातात मृत्यु झाला होता.
पावसाळी गटारींची उभारणी केल्यानंतर टाकण्यात आलेले ढापे हे रस्त्यांच्या खाली असल्याने खड्डे निर्माण झाले आहेत. महापालिकेच्या पावसाळी गटार विभागाने नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा छावण्यांसाठी शिवसेना आक्रमक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुष्काळाच्या दाहकतेत येवला तालुका सापडला असून तालुक्यातील गावोगावच्या विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांना चारा मिळत नाही. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी जनावरे आणि बैलगाड्यांसह येवला तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात आला. येत्या आठ दिवसात तालुक्यात चारा छावण्या सुरू झाल्याच पाहिजे, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी दिला.

येवला शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने मंगळवारी दुपारी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शिवसैनिक, तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाबाहेर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

कांदे यांनी स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांवर कडक शब्दात टीका केली. आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी शिवसेनेची नाळ ही सरकारशी नव्हे तर आम जनता आणि शेतकऱ्यांशी जुळलेली आहे. अधिकाऱ्यांनी सरकार दरबारी चुकीचे अहवाल पाठवू नये. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतांनाही अधिकारी राज्य सरकारला चाऱ्याबाबत चुकीचे अहवाल पाठव‌ीत आहेत. चाराटंचाई असतानाही या चुकीच्या अहवालामुळेच तालुक्यात सरकारकडून मोफत चारा छावण्या सुरू होवू न शकल्याचा आरोप कांदे यांनी केला.

येवला तालुक्यात चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत कृषी अधिकारी, महसूल विभागाने नव्याने सर्वेक्षण करावे, यासाठी गरज पडल्यास आमच्यासह पक्षाचे पदाधिकारी तुमच्यासोबत सर्वेक्षणासाठी येतील, असे आवाहनही त्यांनी केले. चारा छावण्या सुरू न केल्यास सरकारी अधिकाऱ्यांच्या घराबाहेर जनावरे बांधू, असा इशाराही कांदे यांनी दिला.

राज्यात सत्ता बदल होवूनही स्थानिक सरकारी अधिकारी जुन्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली कामे करीत आहेत. शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या काही अधिकारी देत असल्याचा आरोप येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी केला. तालुक्यातील सरकारी अधिकाऱ्यांना पाणी व चाराटंचाईची समस्या दिसत असूनही ते झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख यांनी केला. मोर्चात बाजार समितीचे संचालक साहेबराव सैद, सर्जेराव सावंत, चंद्रकांत शिंदे, वाल्मिक गोरे, राजेंद्र लोणारी, छगन आहेर, अमोल सोनवणे, विठ्ठल महाले यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वारिप’चा येवला तहसीलवर मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतकरी, शेतमजूर, विधवा, घटस्फोटीत महिला, मागासवर्गीय आदींच्या विविध मागण्यांसाठी येवल्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी येवला तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे निळे ध्वज हाती घेत व जोरदार घोषणा देत निघालेल्या या मोर्चात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत होती.

विंचूर चौफुलीवरून मोर्चाला सुरुवात झाली. मनमाड-नगर राज्य महामार्गावरून जोरदार घोषणा देत मार्गस्थ झालेला हा मोर्चा येवला तहसील कार्यालयावर धडकला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, विशेष घटक योजना एक लाखावरून तीन लाख रुपये करण्यात यावी, या योजनेचा कालावधी ठरविण्यात यावा, जनरल शिधापत्रिका धारकास देखील प्रति महिना ३५ किलो धान्य देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेची जाचक अट रद्द करून जातीच्या व उत्पन्नाच्या दाखल्यानुसार भूमिहीन व बेघर लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, विधवा, घटस्फोटीत महिलांना व अपंगांना जमिनीची अट रद्द करून मासिक वेतन सुरू करावे, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना प्रत्येक गावात सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. 'स्वारिप'चे येवला तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, विक्रम पवार, अमोल निकम, शशिकांत जगताप मोर्चात सहभागी झाले होते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रियाज हा ‘रिवाज’ असतो

$
0
0

बासरीचे नादावणारे सूर आणि तबल्यावर सर्रकन् फिरणाऱ्या हाताच्या बोटांची जादुई करामत, अशी जबरदस्त मोहिनी घालणाऱ्या, रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या तबला बासरीच्या जुगलबंदीने 'स्वर-नाद संवाद' या कार्यक्रमाने 'कुसुमाग्रज-पहाट'चा सुरेल प्रारंभ झाला. कुसुमाग्रज स्मरणमध्ये निसर्ग देहूकर या तरुण तबलावादकाने 'स्वर-नाद संवाद' या कार्यक्रमाची आखणी केली होती. निसर्ग देहूकर हा ज्येष्ठ कवयित्री रेखा भांडारे-देहूकर यांचा मुलगा. नाशिककर निसर्गशी साधलेला हा मुक्तसंवाद...!



g मैफल सादर करण्यामागची तुमची भूमिका काय?

श्रद्धेय कुसुमाग्रजांना शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड होती. मी अगदी लहानपणापासून त्यांना खूप जवळून पाहिलंय. अनेकदा ते आमच्या घरी यायचे. मला तबला वाजवायला सांगायचे. माझा पियानो आवडीने वाजवायचे. माझी आई तेव्हा संवादिनीवर लेहरा धरायची आणि मैफल रंगत जायची. त्यात त्यांचे मित्रमंडळी सहभागी व्हायचे; असे अनेकदा घडले. म्हणूनच त्यांच्या जयंतीला त्यांना अभिवादन करून कार्यक्रम करणे, हे माझं कर्तव्य होतं.

g इंजिनीअरिंग, मॅनेजमेंटच्या शिक्षणानंतर तबलावादनाकडे कसे वळलात ?

मी तबलावादनाकडे कसा वळालो हे विचारणं म्हणजे मी श्वास कधीपासून घ्यायला लागलो असं विचारण्यासारखं आहे. अगदी जन्मापासून तबला माझ्यासोबत आहे. माझी नैसर्गिक ओढ तालाकडेच होती. मी दोन तीन वर्षांचा असतांना आई मला अनेक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना घेऊन जायची. घरी आल्यावर स्वयंपाक घरातले मोठे डबे घेऊन ते उलटे ठेवून त्यावर ऐकलेले ते दणादण वाजवायचो. कालिकेच्या यात्रेतून ढोलके आणले जायचे. हे सर्व पाहून आईने मला तबला-डग्गा आणून दिला. तो आजतागायत माझ्याबरोबर आहे, मित्रासारखा. संगीताचे प्राथमिक ज्ञान अलंकार, सांगितीक संज्ञाचे अर्थ इत्यादी माला आईकडूनच मिळाले. २००६ साली मी स्पिकमॅकेची राष्ट्रीय शिष्यवृत्ती जिंकलो त्यावेळी डागर घराण्याचे ज्येष्ठ उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांच्याबरोबर राहून एक विद्यार्थी म्हणून मला धृपद-धमार संगतीचे शास्रशुद्ध शिक्षण आणि कोणत्याही गायनाच्या संगतीसाठी आवश्यक असणारा 'मिजाज' उस्तादांकडून मनावर बिंबवला गेला.

g उस्ताद फजल कुरेशींचा शिष्य होण्याचा अनुभव कसा आहे?

खरं सांगायचं तर मी लहानपणापासूनच अब्बाजी (उस्ताद अल्लारखाँ) फजलभाई आणि झाकिरभाईंना खूप ऐकलंय. त्यांचा तबला ऐकतच मी मोठा झालोय. त्यामुळेच माझ्या तबलावादनावर पंजाब घराण्याचा प्रभाव आहे. या घराण्याची नैसर्गिक ओढ मला होती, परंतु त्यांचा शिष्य होणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण मला असं वाटतय की मी खूप लकी आहे की एक उत्तम गुरू म्हणून मला फजलभाई लाभले. जवळपास नऊ वर्षांच्या घरंदाज तालीमीनंतर त्यांनी स्वत:च मला त्यांच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं आणि स्वत‌ंत्र कार्यक्रम करण्यासाठी खूप उत्तेजन दिलं. गेली अनेक वर्षे त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यक्रमांना जाणं, कार्यशाळांना जाणं या सर्वांतून त्यांचा लाभलेला वैयक्तिक सहवास हा खूप मोलाचा ठरला.

g रियाजासाठी वेळ केव्हा काढता?

रियाज हीच जीवनशैली आहे. फक्त तबल्यावर होणारा अभ्यास हाच रियाज नसून रियाज ही एक व्यापक गोष्ट आहे. किंबहुना रियाज हा एक रिवाज आहे. ही कष्टसाध्य कला आहे आणि रियाजाला पर्याय नाही. रियाज हा करावा लागत नाही तो होतच असतो, चालूच असतो.

g बॉलीवूडच्या गाण्यांसाठीही तुम्ही तबलावादन केलंय, त्याबद्दल...?

बॉलीवूडमध्येही आता शास्त्रीय रागतालांवर आधारित असलेली अनेक गाणी होतात. अशा गाण्यांचा एक भाग व्हायला मलाही आवडतं. नुकताच २०१५ मध्ये 'एबीसीडी २' चित्रपट येऊन गेला. त्यामध्ये तबलावादनाची संधी मला मिळाली होती, ते गाणे रसिकांनी जरूर ऐकावे.

g झाकिरभाईंसोबतचा एखादा संस्मरणीय किस्सा...?

गेल्यावर्षीच्या गुरूपौर्णिमेला मुंबईला झालेल्या अब्बाजींच्या गुरूवंदना सोहळ्यात फजलभाईंनी मला सोलो तबलावादन करण्यासाठी सांगितले होते. त्या कार्यक्रमाची प्रेरणा आखणी अर्थातच झाकिरभाईंची आणि त्या कार्यक्र्रमासाठी झाकिरभाईंसोबत देशविदेशातले अनेक नामांकित संगीत कलाकार उपस्थित होते. त्या सोलोवादनात थोड्याशा क्लिष्ट गणितावर आधारित पेशकाराला झाकिरभाईंनी दिलेली जोरदार दाद मला प्रेरणेची संजीवनी देऊन गेली. शेवटच्या तिहाईला इतकावेळ हाताने ताल धरून असलेले झाकिरभाई खुर्चीवरून उठून मोठ्याने म्हणाले 'बहोत अच्छे' ही मनमोकळी मिळालेली दाद, हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही. माझा सोलो झाल्यावर मी जेव्हा प्रेक्षकांत त्यांच्या पाया पडायला गेलो तेव्हा त्यांनी मला कडकडून मारलेली मिठी आणि भरभरून दिलेला आशीर्वाद हे माझ्यासाठी कुठल्याही पुरस्कारापेक्षा फार मोठे आहे व राहतील.

(शब्दांकन : प्रशांत भरवीरकर)






मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबल चालकांविरोधात मालेगावी आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

टीव्ही केबल चालकांकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याने याबाबत चौकशी करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी माजी आमदार रशीद शेख यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.

शहरातील केबलधारकांना सेट टॉप बॉक्स बसव‌िणे अनिवार्य करण्यात आले आहे. मालेगाव शहरात सुमारे एक लाखाहून अधिक केबलधारक आहेत. वारंवार मागणी करूनही केबल चालक सेट टॉप बॉक्स बसव‌िण्यास तयार नाहीत. तसेच शहरातील केबल चालक सेट टॉप बॉक्ससाठी किंमत १६०० ते १८०० रुपये घेतात. मासिक फी देखील २०० रुपये आकारली जात आहे. आंदोलनकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.






मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्बल महिलांना करा सक्षम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

स्त्री ही सक्षम झाली आहे. मात्र, अजूनही काही भागात महिला मागे आहेत. ज्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून सक्षम आहेत, त्यांनी इतर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले.

कलिका देवी मंदिर संस्थान आणि क्रीडा साधना यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाशिक शहरात विशेष कामगिरी केलेल्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अशोक मुर्तडक बोलत होते. महापौर पुढे म्हणाले की, आज महिला अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांनी कोणतेही काम मनापासून केले, तर त्यांची आणखी चांगली प्रगती होण्यास मदत होईल. उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी सांगितले की, सर्वांनी भारताच्या राज्यघटनेचे पालन करावे. त्यामुळे गढूळ वातावरण पुसून टाकण्यास मदत होईल. यामुळे महिलांची आणि पर्यायाने संपूर्ण समाजाची प्रगती होण्यास मदत होणार आहे. या वेळी पुरस्कारार्थी महिलांच्या वतीने मैथाली गोखले, वीणा नवले, सिस्टर ईगुन्नी डिसुझा, प्रणिता कुमावत, माधुरी ढोली यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या नवदुर्गांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारार्थींमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके, वीणा नवले (शिक्षण), रेखा महाजन (संगीत, गायन), सिस्टर ईगुन्नी डीसुझा (सामाजिक कार्य), प्रणिता कुमावत (शिक्षण अधिकारी- क्रीडा), वैशाली शहाणे (सोनार) (पत्रकारिता), मैथाली गोखले (लेखन), चित्रलेखा कोठावळे (बी. डी. ओ.), पोलिस उपआयुक्त एन. अंबिका यांचा समावेश होता.

या बरोबर वर्षभरात विविध खेळात राष्ट्रीय स्तरावर नाशिकचे नाव उज्वल करण्याऱ्या ५० महिला खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला जम्परोप या खेळाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आनंद खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी उपमहापौर गुरुमीत बग्गा, माजी आरोग्य मंत्री शोभा बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व पाहुण्यांचे स्वागत कलिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील आणि क्रीडा साधनाचे अध्यक्ष अशोक दुधारे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक सायकलिस्टतर्फे वूमन्स सायकल रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, नाशिक सिटी पोलिस, ग्रॅव्हिटी जीम आणि एस. एस. के सॉलिटेअर यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने' 'सेलिब्रेटिंग वूमन' या थीम अंतर्गत महिलांच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत नाशिकच्या महिला पोलिसांसोबतच समाजातील सर्व स्तरांवरील डॉक्टर्स, वकील, विद्यार्थिनी अशा दोनशेहून अधिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

महिलांप्रती आदरभाव व्यक्त करणे आणि महिला दिवस शहरातील सर्व महिलांसोबत अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट करण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे या वूमन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात गोल्फ क्लब मैदानातून महिला पोलिस उपायुक्त एन. अंबिका, सायकलपटू डॉ. महाजन बंधू यांच्या मातोश्री देविका महाजन, ऑलम्पिक शुटिंग कोच मोनाली गोऱ्हे, नॅशनल शुटर श्रद्धा नलामवर, मिस इंटरनॅशनल नमिता कोहक यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. गोल्फ क्लब ग्राउंड मार्गे टिळकवाडी, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, सायकल सर्कल, त्र्यंबकरोड, मायको सर्कल मार्गे, चांडक सर्कल, एस. एस. के सॉलिटेअर (तिडके कॉलनी) पर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपाल सिंघ बिरदी, एस. एस. के सॉलिटेअरचे शैलेश कुटे, ग्रॅव्हिटी जीमचे प्रमोद परशराम पुरिया, गोपाल जाधव, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपाल सिंघ बिरदी, योगेश शिंदे, श्रीकांत जोशी, सोफिया कपाडिया, मनीषा रौंदळ, मनीषा भामरे, नीता नारंग, स्नेहल देव, अनघा जोशी, मनीषा इंगळे, प्रतिभा आहेर यांसह आदी नाशिक सायकलिस्टचे सदस्य उपस्थित होते.

थिरकण्याचा लुटला आनंद रॅलीनंतर एस. एस. के सॉलिटेअर येथे महिलांनी डी. जे च्या तालावर थिरकण्याचा आनंद लुटला. तसेच, महिला दिनानिमित्त सायकलवर महिलांप्रती संदेश देणाऱ्या फ्लायकार्डची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम प्रतिभा चौधरी, द्वितीय डॉ.श्वेता भिडे, तृतीय राखी पारेख यांना ग्रॅव्हिटी जीमतर्फे बक्षिसे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिलांच्या सुरक्षेसाठी कटीबध्द’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला तसेच मुलींना टवाळखोरांचा उपद्रव सहन करावा लागत असेल, तर त्यांनी निसंकोचपणे त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. महिलांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य असून, टवाळखोर आणि रोडरोमियोंची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सोमवारी दिली.

सावतानगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिवशंकर चौक मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बर्डेकर यांच्या हस्ते दुपारी ओंकारेश्वराची आरती झाली. उपद्रवी प्रवृत्तींची माहिती तत्काळ पोलिसांना द्या, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी पहाटे साडेपाचला रूद्राक्ष पूजा झाली. नऊला नगरसेवक सुधारक बडगुजर यांच्या हस्ते आरती झाली. दुपारी सामाजिक कार्यकर्ते दप्तरे यांच्या हस्ते ओंकारेश्वराला खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर भाविकांना खिचडीचे वाटप केले.

महादेवाची गायली म‌हिमा सायंकाळी विविध भक्तिगीतांमधून महादेवाची महिमा गाण्यात आल्याने वातावरण भारावून गेले. परिसरातील स्वानंदी महिला भजनी मंडळाच्या पुष्पा धोंडगे, त्रिशाला चवळे, यशोदा चवळे, गीता सोनवणे, मीरा इंगळे, प्रतिभा साळुंके, मंदाकिनी केल्ले आदींनी सुमधूर गीते सादर केली. भोळा महादेव माझा, बेल डवना, रास रचो है, कैलास के निवासी, परण्या सोड अवघे, शिवजी भोला यांसारख्या गीतांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगर अंडरपास खुला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला इंदिरानगर अंडरपास सुरू करण्याचा निर्णय अखेर पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. हा अंडरपास बंद असल्याचा सर्वच स्तरातून निषेध सुरू होता. वाढत्या जनरेट्यापुढे अखेर पोलिस प्रशासन नमले असून, मंगळवारी (दि. ८) मार्च रोजी रात्री दहापासून हा अंडरपास खुला होणार आहे.

मुंबई नाक्याहून राणेनगरकडे जाताना मुंबई-आग्रा महामार्गावर गोविंदनगर जवळ अंडरपास आहे. सिटी सेंटर मॉल, तिडके कॉलनीतून इंदिरानगर, वडाळागाव, नाशिकरोडकडे तर नाशिकरोडहून सिडको, सातपूर, त्र्यंबकेश्वरकडे जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा रस्ता जवळचा मार्ग ठरत होता. मात्र, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि लहान मोठ्या अपघातांमुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी घेतला. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालाचा आधार घेऊन हा निर्णय घेण्यात आला. १२ जुलै २०१५ पासून येथे एकतर्फी वाहतुक सुरू होती. परिणामी नागरिकांना तब्बल एक किलोमीटरचा वळसा घालून जाणे भाग पडू लागले. पोलिस प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. स्वयंस्फूर्तीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. सर्वपक्षीय आंदोलने झाली. आमदार देवयानी फरांदे, आम आदमी पक्ष, मनसे आणि अन्य पक्षांकडूनही हा मुद्दा उचलून धरण्यात आला. तरीही अंडरपास बंदच ठेवण्याच्या निर्णयावर पोलिस प्रशासन ठाम राहिले. अंडरपासची रूंदी वाढविल्यानंतरच तो सुरू करता येईल, अशी भूमिका पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र, हा तोडगा खर्चिक आणि व्यवहार्यतेच्या कसोटीवर टिकला नाही.अखेर राजकीय पक्षांचा दबाव आणि जनरेट्याचा सन्मान करून पोलिस आयुक्त जगन्नाथन यांनी अंडरपास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक स्तरावर १५ दिवसांसाठी हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.


आढावा घेऊन घेणार कायमचा निर्णय

मंगळवार (दि. ८ मार्च) महिला दिनी रात्री दहापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. १५ दिवसांत येथील वाहतुकीच्या परिस्थितीचा अभ्यास करून हा निर्णय कायम करायचा की नाही याबाबतची सुधारीत अधिसूचना काढण्यात येईल, असे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले आहे. या बदलाबाबत कुणाच्या हरकती, सूचना असतील तर त्या पोलिसांकडे लेखी किंवा इमेलद्वारे करता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विक्रमने वाचविले दोघांचे प्राण

$
0
0

निफाडमधील टाकळी परिसरात बिबट्याचा तिघांवर प्राणघातक हल्ला

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगावपासून जवळच असणाऱ्या टाकळी (विंचूर) परिसरात द्राक्षबागेत धबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला. वस्तीवरील शेतकऱ्याच्या मुलाने धाडस दाखवत बिकट प्रसंगाला सामोरे जात बिबट्यावर प्रतिहल्ला करून पिता आणि पुतण्याला वाचवले. बिबट्याला घरात कोंडले. या दरम्यान बिबट्याने तीन लोकांना जखमी केले. पाच तासाच्या प्रयत्नाने बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

मंगळवारी सकाळी ही घटना घडली. बाळू सुरासे हे आपल्या द्राक्षबागेत काम करीत होते. त्यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात दोघांची झटापट झाली. बिबट्याने बाळू यांच्या पोटावर पंजाने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर जवळच असलेल्या शांताराम सुरासे यांच्या वस्तीवर लपण्यासाठी घराच्या पाठीमागील भागाने दाखल झाला. घराबाहेर बसलेले पुंजाबा सुरासे यांच्यावर हल्ला करून जखमी केले. त्यानंतर देवीदास सुरासे यांच्यावर हल्ला चढवून जखमी केले. शेजारी राहणारा मुलगा विक्रम ही घटना पाहून धावून आला. त्याने वडील व पुतण्याला घरात ओढून नेत असतानाच बिबट्यानेही घरात प्रवेश केला. विक्रमची त्यावेळी तारांबळ उडाली. त्याने जवळ पडलेली बादली हातात घेऊन बिबट्याला मारले. बिबट्याला मारताच तो मागे सरकला. विक्रमने जखमी वडील व पुतण्याला घराबाहेर काढण्यात यश मिळवून घराचे दार बंद केले. यामुळे बिबट्या घरात जेरबंद झाला.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बंद खोलीच्या दरवाजाबाहेर पिंजरा लावला. पण, हा बिबट्या जेरबंद होण्यासाठी तब्बल पाच तास लागले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात आणण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. या बिबट्याला बेशुध्द करण्याचा प्रयोगही केला. मात्र, अडगळीमुळे तो अयशस्वी झाला. फटाकेही वाजवून पाहिले. मिरचीचा धूर करून प्रयत्न केला. मात्र, तोही अयशस्वी झाला. शेवटी पाठीमागील बाजूने भिंतीला खड्डे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी झालेल्या आवाजामुळे या बिबट्या पळाल्याने पिंजऱ्यात अडकला. यासाठी चार तासाहून अधिक कसरत करावी लागली. बिबट्याला पकडल्यानंतर नाशिकला रवाना करण्यात आले.

विक्रमच्या धाडसाचे कौतुक

समोर बिबट्या चवताळलेला असतानाही विक्रमने अतिशय धाडसाने त्याला घरात कोंडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. गेल्या आठ दिवसाच्या कालावधीत निफाड तालुक्यात तीन बिबट्याना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सातत्याने या भागात बिबट्यांचा संचार दिसून येत आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर राष्ट्रवादीचे १७ नवे उपाध्यक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक दिवसापांसून रखडलेली नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जम्बो शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष जयंत जाधव यांनी मंगळवारी जाहीर केली. जम्बो कार्यकारिणीत ६८ जणांचा समावेश करण्यात आला असून, तब्बल १७ उपाध्यक्ष, ७ सरचिटणीसपदांचा समावेश आहे. छबु नागरे यांचे कार्याध्यक्षपदावर समाधान करण्यात आले असून, माजी शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांना कायम निमंत्रितांमध्ये स्थान देण्यात आले आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जम्बो कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे.

पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसमवेत नवीन व जुन्या चेहऱ्यांना तसेच महिलांना संधी देण्यात आली आहे. आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काही कार्यक्षम कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत समवेश करण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी आतापासूनच नवनिर्वाचित सदस्यांनी जोमाने कामास लागून पक्ष संघटना मजबूत करावी, असे आवाहन यावेळी जाधव यांनी केले. नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी व प्रदेश प्रतिनिधी यांचा कायम नियंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

कार्यकारिणी कार्याध्यक्ष - छबू दगडूजी नागरे

उपाध्यक्ष - निवृत्ती विठोबा अरिंगळे, अनिल रखमाजी चौघुले, अशोक मोगल पाटील, रामू किसन जाधव, पद्माकर पाटील, मधुकर विठ्ठल मौले, बाळासाहेब आनंदराव पाटील, वसंतराव खंडेराव मुळाणे, यादवराव गुलाबराव पाटील, शब्बीर भाई मर्चंट, भगवान सुकदेव दोंदे, सुरेश गायकवाड, शाम चाफळकर, मधुबाला भोरे, संजय डी. चव्हाण, विनोद उल्हास देशमुख, शेख जाहिद अल्लाव्द्दिन, संजय नंदू खैरनार

खजिनदार - दिलीप जगन्नाथ खैरे

सरचिटणीस - शेख रशीद चांद, मनोहर यशवंत बोराडे, महेश देवबा भामरे, संजय माधवराव पाटील, विनायक अशोकराव गोवर्धने, शंकरराव निवृत्ती पिंगळे,

चिटणीस - मधुकर जाधव, चित्रा जगन्नाथ तांदळे, ज्ञानेश्वर पवार, सतीश आमले, संदिप शिंदे, दिपा अमोल कमोद, मकरंद यशवंत सोमवंशी, देवेंद्र किशोर काळे, योगेश वसंत दिवे, अॅड. संजय मुरलीधर वझरे, प्रकाश पवार.

संघटक - संतोष हरिभाऊ कमोद, बाळासाहेब ज्ञानेश्वर गिते, शंकरराव कोंडाजी मोकळ, अनिल परदेशी, शेख नदीम फकीर मोहम्मद, रंजना गांगुर्डे, योगेश कपिले, कुंदा सहाणे,

कायम निमंत्रित सदस्य : नाना महाले, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, रंजन ठाकरे, प्रकाश मते, मुख्तार शेख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमविवाहासाठी लपवला पहिला विवाह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणानिमित्त कॅनडा येथे गेलेल्या तरुणाने तिकडेच विवाह केला. भारतात परतल्यानंतर या विवाहाची माहिती दडवून ठेवत सदर मुलाने भारतीय मुलीशी विवाह केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूपाली अंजने या विवाहितेने तक्रार दिली आहे. गंगापूररोड भागातच माहेर असलेल्या रूपालीचा प्रेमविवाह १३ एप्रिल २०१४ रोजी गंगापूररोडवरीलच स्वामी समर्थ केंद्राजवळील उदयनगर येथे राहणाऱ्या दीपक अंजने या युवकाशी झाला. उच्च शिक्षित असलेल्या दीपक अंजनेने लग्नानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या रूपालीने काही व्यवसाय सुरू करून घरखर्चास मदत केली. काही महिने संसार सुखात सुरू असताना नोव्हेंबर २०१५ मध्ये रूपालीच्या हाती एक फाईल सापडली. कॅनडातील स्थानिक कोर्टामार्फत एका वकिलाने ही नोटीस पाठवली होती. नोटिसीतील माहिती वाचून रूपालीला धक्काच बसला. त्यात, दीपकचा कॅनडातील जेना लिंडसे एलिझाबेथ ब्रॅडली या महिलेशी विवाह झाला असून, तिला निहारीका नावाची मुलगीही असल्याचे समजले. आजमितीस ही निहारीका सात वर्षाची आहे. सन २००५ मध्ये शिक्षणासाठी कॅनडा येथे पोहचलेला दीपक जेनाकडेच राहिला. तिथे विवाह झाल्यानंतर त्यांना अपत्य झाले. मात्र, यानतंर दीपक २००८ मध्ये भारतात निघून आल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. रूपालीशी प्रेमविवाह करणाऱ्या दीपकने ही नोटीस तिच्या हातात पडेपर्यंत याबाबत काहीच सांगितले नाही. रूपालीने याबाबत दीपककडे जाब मागितल्यानंतर त्याने तिला मारहाण करून घराबाहेर काढले. सासरे मंगलदास अंजने आणि सासू सरला, दीर विवेक, मधुसुधन आणि चुलत सासू प्रभावती यांनी देखील दीपकला साथ दिल्याचे रूपालीने तक्रारीत नमूद केले आहे. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत टवाळखोरांची महिलेला शिवीगाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी कारंजावरील पिंपळगाव मर्चंट बँकेच्या महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून वाहनाचे नुकसान करण्यात आल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी बँकेच्या महिला कर्मचारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर आल्या. त्यांनी आपली दुचाकी बँकेसमोर असलेल्या पार्किंगमध्ये पार्क केली. थोड्यावेळाने तेथीलच एका टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या काही टवाळखोर मुलांनी महिलेच्या वाहनावर ठाण मांडले. दुचाकीच्या आरशाशी खेळत असलेल्या मुलांना हटकले असता त्या मुलांनी अश्लील शिवीगाळ केली. त्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतदेहाचे केले तुकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील हिवरगाव शिवारात अज्ञात महिलेचा खून करून मृतदेहाचे तुकडे करून फेकून देण्याची घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतदेहाचे शीर धडावेगळे केलेल्या अवस्थेत, तर पायाचे तुकडे करून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरलेले आढळून आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हिवरगाव-सायखेडा मार्गावरील मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात ‌स्त्रिच्या (वय अंदाजे २५) मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिला असल्याची माहिती हिवरगावचे पोलिस पाटील पोमनर यांनी दिली. मृतदेहाजवळ ओळख म्हणून कुठलीही वस्तू न सापडल्याने ही महिला कोण आहे याचा तपास करणे पोल‌िसांपुढे मोठे आव्हान आहे.

या घटनेच्या तपासासाठी घटनास्थळी श्वानपथक बोलाविण्यात आले होते. तसेच फॉरेन्सिक लॅब, फिंगर प्रिंट तज्ज्ञ, तसेच सीआयडी पथकाला माहिती देण्यात आली असून, ओळख पटव‌िण्यासाठी मृतदेहाची डीएनए टेस्ट करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले. श्वान पथकाला माग काढण्यात यश आले नाही. मृतदेह कोणाचा आहे, त्याची ओळख पटविणेही मुश्किल झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images