Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशकातील तरुणाई ‘इंटरनेट अॅडिक्ट’

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : नाशकातील तरूण हे इंटरनेट वापरात मध्यम स्तरावर असल्याची बाब समोर आली आहे. एचपीटी कॉलेजमध्ये आयोजित अंकुर फेस्टिव्हल दरम्यान ही इंटरनेट चाचणी घेण्यात आली. त्याचे निष्कर्ष आले असून, चार तरूण इंटरनेटच्या पूर्णतः आहारी गेल्याचेही स्पष्ट झाले आहे.

एचपीटी कॉलेजच्या सायकॉलॉजी विभागातर्फे नुकतेच अंकुर फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टमध्ये इंटरनेट अॅडिक्शन संदर्भात माहिती तसेच, टेस्ट देण्यासाठी एक विभाग ठेवण्यात आला होता. या दरम्यान कॉलेजियन्सचा इंटरनेट वापराबाबतचा सर्व्हे देखील करण्यात आला. इंटरनेट वापरामुळे होणारे मानसिक आणि शारीरिक परिणाम यावेळी तरुणांना सांगण्यात येत होते.

इंटरनेट अॅडिक्शन काय असते, हे समजावून सांगून त्याचे साइड इफेक्टची माहिती देण्यात आली. यावेळी नाशिकमधील अनेक कॉलेजियन्सनी इंटरनेट अॅडिक्शनची टेस्ट देत आपण अॅडिक्ट आहोत का याची तपासणी करवून घेतली. अंकुर फेस्टच्या अगोदर काही दिवस सायकॉलॉजी विभागातील कॉलेजियन्सनी यासंदर्भात अनेकांच्या चाचण्या घेत जनजागृती केली होती. यावेळी आणि फेस्ट दरम्यान झालेल्या सर्वेक्षणात सुमारे दोनशे यंगस्टर्सनी (तरुण आणि तरुणी) इंटरनेट अॅडिक्शनची टेस्ट दिली. यात सुमारे ११६ यंगस्टर्स अॅडिक्शनच्या पहिल्या लेव्हलला, सेकंड लेव्हलला ८० यंगस्टर्स निदर्शनास आले. अनेक यंगस्टर्स इंटरनेट वापरात माध्यम स्तरावर दिसत असली तरीही हायर लेव्हल म्हणजेच पूर्ण अॅडिक्टेड असे चार यंगस्टर्स निदर्शनास आले. या अॅडिक्टेड यंगस्टर्सला लवकरच एचपीटी कॉलेजचा मानसशास्त्र विभाग संपर्क साधणार असून, त्यांची इच्छा असल्यास त्यांचे कौन्सिलिंग करून देणार आहेत.

नाशिकच्या यूथ मध्येही इंटरनेटचं भूत चांगलंच सवार झालं असल्याचं या सर्वेक्षणातून दिसून येते. इंटरनेट ही काळाची गरज असली तरी त्याचा वापर हा काळजीपूर्वक तसेच गरजेपुरताच होणे फायदेशीर असल्याचे मानसशास्त्र सांगते. यासोबतच जे यंगस्टर्स पहिल्या आणि दुसऱ्या लेव्हल वर आहेत, त्यांनीही खबरदारी बाळगणे महत्त्वाचे आहे. इंटरनेटचा वापर तोलामोलात करण्यासाठी सेल्फ कंट्रोल ही सर्वोत्तम थेरी असल्याचे एचपीटी कॉलेजच्या सायकॉलॉजी विभागातर्फे सांगण्यात आले. इंटरनेट वापराचे आणखी धोके जसे, पाठ दुखणे, झोप न लागणे, डोळ्यांच्या बाजूस काळवणने, हाताची बोटे दुःखू लागणे अशी लक्षणे जाणवत असल्याचे डॉ. चुडामण बडगुजर यांनी सांगितले.

अनेक यंगस्टर्स सध्या इंटरनेटच्या आहारी गेले आहेत. इंटरनेरमुळे होणारे सायकॉलॉजिकल आणि बायॉलॉजिकल इफेक्टस् या सर्वेक्षणा दरम्यान अनेकांना समजावून सांगण्यात आले. जे यंगस्टर्स संपूर्ण अॅडिक्टेड निदर्शनास आले आहेत, अशा तरुणांशी एचपीटी सायकॉलॉजी विभाग लवकरच संपर्क साधणार असून, त्यांना समुपदेशन हवे असल्यास ते देणार आहे. त्याचसोबत इतर यंगस्टर्सला याबाबत आपली टेस्ट वा माहिती हवी असल्यास एचपीटी सायकॉलॉजी विभागात संपर्क साधावा. - डॉ. चुडामण बडगुजर, विभागप्रमुख, एचपीटी सायकॉलॉजी विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५६० विद्यार्थ्यांची निवड

$
0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या गंगापूर रोडस्थित संस्थेत मेगा जॉब मेळा आयोजन करण्यात आले होते. जवळपास तीस कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात ५६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

नाशिकमध्ये पहिल्यांदाच इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये अशा प्रकारचा जॉब मेळा घेतला गेला. प्रामुख्याने इन्फोसिस, हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन, रिलायन्स, टाइम्स ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, जिंदाल, इंडस हेल्थ प्लस, एचबीएल ग्लोबल, सेवा मेडिकल्स, पाइम फोकस वर्ड, ग्लोबल सर्विस, एल. आय. सी., वैभव प्लेसमेंट, एडिक्को इंडिया लियासारख्या कंपन्यांचा समावेश होता. यात सॉफ्टवेअर डेव्हलपर, आयटी ट्रेनी, मॅकेनिकल, सिव्हिल, फायनान्स, अकाऊंट, एचआर, सेल्स, नॉनटेक्निकल सपोर्ट, डोमेस्टिक वॉइस या पदांसाठी जवळपास ५६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

जेआयटी कॉलेजच्या दहापेक्षा जास्त विद्यार्थांना जॉब प्लेसमेंट मिळाल्याचे जेआयटीचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश पाटील यांनी सांगितले. भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थांना त्यांच्या आवडीनुरूप आणि योग्यतेनुसार जॉब मिळावा, यासाठी कॉलेज व्यवस्थापन कटिबद्ध असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. व्ही. भटकर यांनी दिली.

नाव नोंदणीसाठी गर्दी सकाळी आठ वाजेपासूनच विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी कॉलेज परिसरात गर्दी केली होती. सुमारे दोन हजार विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित होते. विद्यार्थ्यांत विशेषतः बी. ई., डिप्लोमा, आयटीआय, एम. बी. ए., बी. कॉम. ई. झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय पाटील यांना यंदाचा ‘नाशिक भूषण’

$
0
0





परशुराम साईखेडकर सभागृहात सोमवारी (दि. ७) सायंकाळी ६.३० वाजता मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे. गंजमाळ येथील रोटरीच्या हॉलमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी जायखेडकर यांनी सांगितले, की संजय पाटील यांनी नाविन्यपूर्ण कल्पनांमधून आर्किटेक्चरद्वारे नाशिकचे नाव उज्ज्वल केले. पत्रकार परिषदेस संस्थेचे सचिव अनिल सुकेणकर, जनसंपर्क संचालक मनीष चिंधडे, डॉ. श्रेया कुलकर्णी, दिलीपसिंग बेनिवाल, मिलिंद जहागिरदार उपस्थित होते.

पाटील यांचा परिचय

संजय पाटील सन १९८० सालापासून आर्किटेक्चर क्षेत्रात कार्यरत आहेत. निसर्ग व परंपरा यातून प्रेरणा घेऊन पर्यावरण संवेदनशील वास्तूरचना निर्मिती करण्यात त्यांचा हातखंडा आहे. रहिवासी, कॉमर्स, औद्योगिक, संस्थानिर्मिती क्षेत्रात अनेक नामांकित प्रकल्पांची त्यांनी निर्मिती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपळगाव बसवंत

पिंपळगावच्या क. का. वाघ कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांसाठी संकलित केलेल्या ४६ हजाराच्या निधीतून जोपूळ आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

प्राचार्य डा. दिलीप शिंदे, उपप्राचार्य एस. वाय. मोळोदे, डी. डब्ल्यू. शेळके, एनएसस प्रमुख प्रा. ज्ञानोबा ढगे, डॉ. शंकर बोऱ्हाडे, प्रा. डॉ. बाळकृष्ण शेलार, प्रा. शिवाजी गांगुर्डे, शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या साखरे, अशोक देवरे, अधीक्षक एकनाथ भामरे, बी. आर. गुळवे, प्रियंका ढोकरे व्यासपीठावर होते. एनएसएसचे विद्यार्थी सरस्वती जाधव, प्रतीक्षा रकिबे, अभिषेक गांगुर्डे, गोकुळ निंबाळकर, जर्नादन कडाळे, अपेक्षा रकिबे आदींनी निधी संकलित केला. आदिवासी विद्यार्थ्यांना फॅन, संतरंज्या, पंचपात्री, बल्ब, शूज आदी वस्तू वाटण्यात आल्या. प्राचार्य शिंदे म्हणाले की, या आश्रमशाळेत पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आदी भागातील आदिवासी विद्यार्थी आहेत. त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने मदत देणे गरजचे होते. विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारी दाखवून दिली.

शिक्षक नानासाहेब धनराव यांनी प्रास्तविक, तर दीपाली रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब निकम यांनी आभार मानले. जर्नादन भरसट, सुनीता चौधरी, मनीषा पाटील, राजेंद्र शेवाळे, मीना क्षीरसागर, ओकांर जाधव, मीना क्षीरसागर, विशाल सायखेडे आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेमुळे पाणीपुरवठा विस्कळीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर डॅम सबस्टेशनचा वीज पुरवठा खंडित झाल्याने सुमारे चार तास पंपिंग बंद असल्याने नाशिक शहराचा शुक्रवारी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलकुंभात पाणीच पोहचले नसल्याने सिडको, सातपूर, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व पंचवटी या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, विभागवार पाणीकपातीमुळे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडे आता नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून पाण्याअभावी नागरिक व महिलांचे शिष्टमंडळ महापालिकेत धडकायला लागले आहेत.

शहर परिसरात गुरुवारी मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तब्बल चार तास वीज पुरवठा खंडीत झाला. त्याचा सिडको, सातपूर, नाशिक पूर्व, पश्चिम व पंचवटीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. पंपिंग स्टेशनमधून पाणी उचलले न गेल्याने जलकुंभ पूर्णक्षमतेने भरले गेले नाहीत. परिणामी अनेक भागात विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. महिलांची पाण्यासाठी वणवण झाली. अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागवावे लागले. शनिवारी सुद्धा काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहेे.

प्रशासन वैतागले

विभागवार पाणी नियोजनानंतर शहरातील पाणापुरवठा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. नागरिक थेट महापालिकेत येवू लागल्याने पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही महिलांनी उपमहापौर गुरूमीत बग्गा यांची शुक्रवारी भेट घेऊन पाण्यासंदर्भात तक्रारी केल्या. नगरसेवक व नागरिकांना समजावितांना प्रशासन वैतागले आहे.

आठवड्यातला

एक दिवस 'ड्राय'

पाणीपुरवठा विभागाने १५ दिवसापासून सुरू असलेल्या विभागवार पाणीपुरवठ्याचा अभ्यास सुरू केला आहे. पाणी नियोजनात बदल करीत आठवड्यातून एक दिवस सरसकट पाणीपुरवठा बंदचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अधीक्षक अभियंत्यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांचीही रोजच्या त्रासातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. बहुतेक नागरिक व नगरसेवकांचा कल हा आठवड्यातून एक दिवस पाणीबंद ठेवण्याचा असून त्याबाबतचा निर्णय एक दोन दिवसात अपेक्षित आहे.

मनसेतर्फे आजपासून टँकरसेवा

नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडल्यानंतर भाजपला कोंडीत पकडण्याची संधी राजकीय पक्षांना मिळाली आहे. शहरात निर्माण झालेल्या पाणीबाणीचा फायदा घेण्यासाठी मनसे पुढे सरसावली आहे. पक्षातर्फे शहरात नागरिकांना पाणी देण्यासाठी मोफत टँकर सेवा सुरू करण्यात येणार आहे. मनसे शहर कार्यालय राजगड येथे शनिवारी (दि. ५) शहरासाठी ६ टँकर सुरू केले जाणार आहेत. महापालिकेच्या बोअरवेल्समधून मोफत पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. नागरिकांनी फोन केल्यानंतर हे टँकर्स नागरिकांना घरपोच पाण्याची सुविधा देणार आहे. या टँकर्समुळे मनसेचेही ब्रॅण्डिंग केले जाणार असून भाजपला सुद्धा कोंडीत पकडता येणार आहे. त्यामुळे मनसेच्या या टँकर मोहिमेची आता चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतापुढील आव्हानांवर चर्चा

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

ह्यूमन रिसोर्स या मुख्य विषयाशी निगडीत विषयांवर चर्चा व्हावी, यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व एम.ई.टी भुजबळ नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद पार पडली. पहिल्या ‌दिवशी 'डिजिटल इंडिया २०२० आव्हाने व संधी' या विषयावर मान्यवरांनी आपापली मते मांडत विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले.

परिषदेचा पहिला दिवस शुक्रवारी दिमाखात पार पडला. परिषदेसाठी शार्प इंडिया लिमिटेड कंपनीचे एम. डी टोमियो इसागोई हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. त्यांनी जपानच्या विकासाचा आलेख मांडला. तसेच, भारत व जपानच्या एकत्रित प्रगतीत आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सहकार्य करणार असल्याचे नमूद केले.

भारतातील कृषी क्षेत्रावर प्रकाश टाकत डॉ. विजय पागे यांनी भविष्यातील आव्हानांबद्दल लोकांशी संवाद साधला. उदयपूर येथील महाराजा कॉलेज ग्रुपचे प्राध्यापक डॉ. सतीश शर्मा यांनी डिजिटल भारत या विषयावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटचे डीन डॉ. खेडकर यांनी ही डिजिटल इंडिया विषयावर जोर देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दोन दिवसाच्या या राष्ट्रीय परिषदेत ७५ हून अधिक प्राध्यापक, रिसर्च स्कॉलर, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कॉलेजच्या वतीने इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर नीलेश बेराड, डीन हर्षवर्धन गोखले, शेफाली भुजबळ यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

शोधनिबंधांचाही आढावा राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी सादर झालेल्या शोधनिबंधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. खेडकर यांच्यासह बिजसोल लिमिटेड कंपनीचे संचालक वेंकटचलम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते मेटारॉईड या जर्नलचे अनावरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ, पवार यांना पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाचे वि‌. वा. शिरवाडकर व वसंत कानेटकर पुरस्कार जाहीर झाले आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहसंपादक व ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना वि. वा. शिरवाडकर लेखन, तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे लेखन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना वि. वा. शिरवाडकर लेखन, तर नाट्यक्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांना वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कारांनी गौरविण्यात येते. शुक्रवार, २७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी व अभिनेते दीपक करंजीकर यांची उपस्थिती राहील.

पुरस्कारमूर्ती जयंत पवार हे एक मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत 'काय डेंजर वारा सुटलाय' या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना

कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या 'महाराष्ट्र रंगभूमी' तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.

सन २०१४ मध्ये महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. जयंत पवार यांना 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहाला २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन, दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून

उठला मोर (कथासंग्रह), माझे घर, होड्या (एकांकिका) हे साहित्य लिहिले आहे.

दुसरे पूरस्कारमूर्ती अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून, दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घराघरात पोहोचला आहे. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे. प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.

पुरस्कारमूर्ती सुषमा अभ्यंकर यांनी ५२ वर्षे शिक्षिका म्हणून सेवा दिली आहे. अरगडे प्रकाशनातर्फे तीन पुस्तके, अक्षरमुद्रा प्रकाशनातर्फे आठ पुस्तके, तर आपलं प्रकाशनतर्फे २२ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच, १७ बालनाटकांचे लेखन केलेले आहे.

या समितीने केली निवड

निवड समिती प्रमुख म्हणून प्रा.रविंद्र कदम, सुनील ढगे, विवेक गरूड, डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी व रवींद्र ढवळे यांनी काम पाहिले.

अभ्यंकर यांना जीवनगौरव

नाट्यरिषदेतर्फे नटवर्य बाबुराव सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार बालनाट्य चळवळीच्या सुषमा अभ्यंकर यांना जाहीर झाला. पाच हजार रुपये रोख, शाल श्रीफळ, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यापूर्वीचे पुरस्कार विजेते

याआधी नाट्यलेखन पुरस्कार पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, महेश एलकुंचवार, शं. ना. नवरे, सतीश आळेकर, मधुकर तोरडमल यांना तर रंगकर्मी पुरस्कार डॉ. श्रीराम लागू, मोहन वाघ, विजया मेहता, पुरूषोत्तम बेर्डे, सुलभा देशपांडे, चित्तरंजन कोल्हटकर, रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले यांना देण्यात आला आहे. यापूर्वीचा नटवर्य बाबुराव सावंत पुरस्कार नेताजी भोईर यांना देण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधूंची निर्दोष सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाही मिरवणुकीदरम्यान चांदीची नाणी उधळल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या चार साधू महंतांची पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. सन २००३ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही मिरवणुकी दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत २९ भाविकांचा मृत्यू झाला होता, तर ११८ भाविक जखमी झाले होते.

वैश्विक सोहळा म्हणून गणला जाणारा सिंहस्थ कुंभमेळा दर बारा वर्षांनी नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये होतो. सन २००३ मध्ये कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीला म्हणजे २७ ऑगस्ट २००३ रोजी शाही मिरवणुकीदरम्यान मालवीय चौकात वृंदावन, मथुरा येथील स्वामी ग्यानप्रकाशजी महाराज, स्वामी मुकेशरदासजी महाराज व अन्य दोघे हत्ती व वाहनांवरून तपोवनातील साधुग्रामकडे परत जात होते. त्यांनी भाविकांच्या दिशेने प्रसाद म्हणून चांदीची नाणी, मणुके, चॉकलेट, फुले व इतर वस्तू फेकले. त्यामुळे भाविकांची झुंबड उडाली आणि राममंदिराकडून येणाऱ्या भाविकांमुळे गर्दी उसळून चेंगराचेंगरी झाली. यात २९ भाविक ठार झाले, तर ११८ भाविक जखमी झाले होते. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटला सुरू झाल्यानंतर साधूंतर्फे अॅड. श्रीरंग भांड, अॅड. प्रवीण अंतापूरकर यांनी काम पाहिले. सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सिन्नर फाटा येथील युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. योगेश बारकू सजगुरे (३०, असे मृत्युमुखी झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांकडे झालेल्या नोंदीनुसार गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा परिसरातील राहणारा योगेश हा आपल्या मोटरसायकलवरून निफाडकडे निघाला होता. सिन्नर फाटा येथेच भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. यामध्ये योगेश गंभीर जखमी झाला. त्यास तानाजी पवार यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात महिला ठार

दुचाकीच्या अपघातात सुरगाणा तालुक्यातील सानपाडा येथील महिलेचा मृत्यू झाला. भारती अशोक बोराईत (वय २५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सानपाडा येथील खोतळी दिगर येथे राहणाऱ्या भारती बोराईत गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पतीसमवेत मोटरसायकलवरून सानपाडाकडे येत होते. गोळशी फाटा येथे त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या भारती यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

दोघांची आत्महत्या

शहरात विविध ठिकाणी घडलेल्या दोन घटनेत शुक्रवारी सकाळी दोघा व्यक्तींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. चुंचाळे गावातील आंबेडकरनगर येथे राहणाऱ्या दिलीप गांगुर्डे (वय ५०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेआठ वाजता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना द्वारका परिसरात घडली. याठिकाणी राहणारे पकंज हिरामण केदारे (वय ३५) यांनी घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही बाब शेजाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केल.

सायकल चोरी

स्टारकेन निओ कंपनीची २४ गिअरची सायकल अज्ञात चोरट्याने पळवू नेली आहे. ही सायकल २४०० रूपये किंमतीची असून, गंगापूर पोलिस स्टेशनला याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेच्या तिजोरी खरेदीत भ्रष्टाचार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेतील वाढत्या दरोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने खरेदी केलेल्या पहिल्या टप्प्यातील ४५ तिजोऱ्यांची खरेदी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जिल्हा बँकेचे संचालक जे. पी. गावित यांनी या तिजोरी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला असून, यासंदर्भात थेट विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार केली आहे.

अध्यक्षांसह संचालक मंडळाने प्रत्येक तिजोरीमागे तीन लाखाचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आल्याने अध्यक्षांचा कारभार व प्रस्तावाला मंजुरी देणारे संचालक अडचणीत आले आहेत. गावित यांनी या खरेदीला विरोध करीत चौकशीची मागणी केली आहे. जिल्हा बँकेत पडणाऱ्या दरोड्यांच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने त्या १६२ तिजोरी नव्याने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ४५ तिजोऱ्या खरेदी करण्यास मंजुरी दिली असून, त्यासाठी २ कोटी ७० लाख रुपये दिले जाणार आहेत. गोदरेज कंपनीला एक कोटी ८३ लाख रुपये अदा केले आहेत. प्रत्येक तिजोरीची किमत ही ५ लाख ९८ हजार दाखवली आहे. प्रत्यक्षात बाजारात याच तिजोरीची किमत ही २ लाख ९७ हजार रुपये आहे. त्यामुळे अध्यक्षांसह संचालक मंडळाने तिजोरीमागे कंपनीला तीन लाख रुपये अतिरिक्त मोजले आहेत. संबंधित खरेदीला आपला विरोध असल्याचे आमदार जे. पी. गावित यांनी म्हटले असून, तिजोरीच्या बिलांना व निर्णयाला आपला विरोध असल्याचे पत्र त्यांनी विभागीय सहनिंबधक एम. ए. आरीफ यांना दिले आहे.

बाजारात एका तिजोरीची किमत ही तीन लाख रुपये असताना जिल्हा बँक सहा लाख रुपये मोजत आहे. यास विरोध असून, या संशयास्पद बिल व ठरावाशी आपला काहीच संबंध नाही.

- जे. पी. गावित, संचालक

तिजोरी खरेदी प्रकरणावर तीन म‌हिने उशिराने आक्षेप घेतला आहे. रितसर निविदा प्रक्रिया राबवून तिजोऱ्या खेरदी केल्या आहेत. यामुळे कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही.

- नरेंद्र दराडे, अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी जिल्हाभर राष्ट्रवादी रस्त्यावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याची दिरंगाई न लावता युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी व कांद्याला हमी भाव जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रसेतर्फे जिल्हाभरात निदर्शने करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष अॅड. पगार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात तालुकावार निर्दशने करून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी दिला.

इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाप्रसंगी अॅड. रवींद्र पगार म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याने राज्यकर्त्यांच्या सुल्तानी कारभाराने हतबल असलेला शेतकरी अस्मानी संकटाने देखील वेढला गेला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीची कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला ही पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. पंचनामे करण्यात दिरंगाई होऊ नये व सरसकट सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत म्हणजे शेतकऱ्याला मदतीचा हात मिळेल. अन्यथा शेतकऱ्याचे भवितव्य अंधकारमय होईल, असेही पगार यांनी नमूद केले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, तालुकाध्यक्ष गोरख बोडके, शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव, महिला अध्यक्ष आशा थोरात, जिल्हा पदाधिकारी फिरोज पठाण, विलास सानप, नामदेव वाघचौरे, ज्ञानेश्वर फोकणे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

दिंडोरीत आमदार नरहरी झिरवाळ, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, राजेंद्र उफाडे, गंगाधर निखाडे, शंकरराव काठे, आदी आंदोलनात सहभागी झाले होते. नाशिकमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, विष्णूपंत म्हैसधुणे, तानाजी गायधनी, सोमनाथ खातळे, सचिन पिंगळे, नितीन मोहीते, प्रेरणा बलकवडे, दीपक वाघ, सोमनाथ बोराडे, रत्नाकर गायकवाड, अलका साळुंखे, मंदाताई निकम, रामदास पिंगळे, कचरू तांबेरे आदी उपस्थित होते.

बागलाणमध्ये माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा पदाधिकारी धर्मराज खैरनार, फईम शेख, नगरसेवक काका रौंदळ, भारत खैरनार आदींच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. देवळ्यात जिल्हा परिषदेच्या सभापती उषा बच्छाव, सदस्या डॉ. भारती पवार, जिल्हा पदाधिकारी जगदीश पवार, योगेश आहेर, चिंतामण आहेर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कळवण जिल्हा परिषदेचे गटनेते रवींद्र देवरे, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा पदाधिकारी नारायण हिरे, पंचायत समितीचे सदस्य हिरामण पगार, कौतिक पगार, रामा पाटील यांनी निदर्शन केली.

येवल्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, ज्ञानेश्वर शेवाळे, नीलेश पटेल यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. नांदगावात तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, मनमाडचे शहराध्यक्ष राजेंद्र पगारे, जिल्हा पदाधिकारी साईनाथ गिडगे, विष्णू निकम, नाना शिंदे, महेंद्र शिरसाठ, किसन गायधनी आदींनी निदर्शन केली.

चांदवडमध्ये प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, तालुकाध्यक्ष सयाजी गायकवाड, उत्तम आहेर, विजय जाधव, अभिमन्यू ठाकरे, महेश देशमाने, आदी आंदोलनात सहभागी झाले होते. पेठ व सुरगाण्यात ही आंदोलन करण्यात आले. मालेगावात तालुकाध्यक्ष गुलाब चव्हाण, अरुण देवरे, धर्मा भामरे, बाळा बागूल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सिन्नरमध्ये तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, डॉ. विष्णू अत्रे, कल्पना रेवगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. त्र्यंबकेश्वरमध्ये तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज कान्नव, गोकुळ बत्तासे, स्वप्नील बागडे, कैलास वाटाणे आदीने आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीसाठी दारात ढोलताशे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक महापाल‌िकेत जकात व एलबीटी बंद झाल्यापासून उत्पन्नही कमी झाले आहे. यासाठी महापाल‌िका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रयत्न सुरू केले असून, थकबाकीदारांकडून वसुलीसाठी आता त्यांच्या दारात ढोलताशे वाजविण्यात येणार आहेत.

दहा हजारांच्यावर थकबाकी असलेल्या ग्राहकांकडून वसुली करण्यासाठी खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकाला मदत करण्यासाठी ढोल-ताशे लावून महापाल‌िका थकबाकीदारांकडून वसूली करत आहे.

शनिवारी आनंदवली, कामगारनगर, वनविहार कॉलनी, काळेनगर आदी भागात महापाल‌िकेचे वसुली पथक विभागीय अधिकारी चेतना केरुरे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरले होते. यात ढोल-ताशांच्या गजरात थकबाकीदारांच्या दारात जावून महापाल‌िकेची थकबाकी भरा, अशी विनंती करत होते. यावेळी काही थकबाकीदारांनी आधी ढोल-ताशा बंद करा लगेचच थकबाकीची रक्कम भरतो, असे विनवणी केली. सातपूरच्या वसुली पथकात आर. बी. सूर्यवंशी, गिरीश आहेर, रतन शिंदे, एन. एस. गुरव, एम. ए. पानसरे आदींनी दिवसभरात साडेतीन लाखांहून अधिक थकबाकी वसुली केली आहे. ढोल-ताशांचा गजर कानावर पडल्यावर अनेक रहिवाशी उत्सुकतेने घराबाहेर येऊन पाहत होते. नेमके थकबाकीदाराच्या दारात ढोल-ताशा गेल्यामुळे त्यांनादेखील महापाल‌िकेची शक्कल चक्रावून सोडणारी होती. ढोल-ताशा वाजवत महापाल‌िकेची वसुली मोहीम असल्याचे समजल्यावर नाचक्की होऊ नये म्हणून थकबाकीदारांनी लगेच चेक किंवा रोख आपली थकबाकी तत्काळ भरली. महापाल‌िकेच्या ढोल-ताशा लावून वसुली करणाऱ्या मोहिमेचे सूज्ञ नागरिकांकडून कौतुक होत आहे.

दरम्यान, महापाल‌िकेत असलेल्या बड्या थकबाकीदारांकडून देखील ढोल-ताशांचा गजर करून वसुली करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

खुटवडनगर भागातील कार्तिकेय नगरातील रहिवाशी महिन्याभरापासून पाणीटंचाईला तोंड देत आहेत. याकडे कुणी लक्ष देत नसल्याने महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाला जाग आणण्यासाठी महिलांना हंडा मोर्चा काढावा लागला. यावेळी महिलांचा रोष पाहून पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

सध्या शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाणीटंचाईची दाहकता वाढीस लागल्याने कपातीवर भर देण्यात आला आहे. मात्र, आता एकवेळही पुरेसे पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कार्तिकेय नगरातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे महिलांनी हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. पाण्याची समस्या लक्षात घेता पोलिसांनी मध्यस्थी करीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना कार्तिकेय नगर येथे बोलावून निवेदन स्वीकारण्यास सांगितले. यावेळी महिलांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

एक वेळ का होईना परंतु, पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याचा आरोप महिलांनी केला. यावेळी पाणीपुरवठा अधिकारी बच्छाव व दादाजी आहेर यांनी धरणात पाणीसाठा कमी असल्याने पाणी कमी येत असल्याचे उत्तर दिले. यानंतर महिलांनी पुन्हा अधिकाऱ्यांना लक्ष करीत शहरात केवळ खुटवडनगर भागासाठी धरणात पाणीसाठा कमी झाला का असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे अधिकारीही निरुत्तर झाले. यानंतर महिलांना शांत करीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी निवेदन स्‍वीकारले. यावेळी मकरंद वाघ, संजय पटेल, अतुल झोपे यांनीही महिलांसमवेत मोर्चात सहभाग घेतला.

चार घरांना पाणीच नाही महिनाभरापासून पाण्याची समस्या भेडसावत असताना कार्तिकेय नगरातील चार घरांना तर पिण्याचे पाणीच मिळत नाही. शेजारून अथवा हातपंपावरून पाणी आणण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. याबाबत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना माहिती असून देखील पाणी समस्येकडे काणाडोळा करीत असल्याचा आरोप चारही रहिवाशांनी केला.

पाणीपुरवठा अधिकारी नावालाच! सिडकोतील पाणीपुरवठा अधिकारी केवळ नावालाच असल्याचे प्रभाग बैठकीत नगरसेवक नेहमीच आरोप करीत असतात. प्रभागाच्या बैठकीत देखील अधिकारी नेहमीच उपस्थित राहत नसल्याने त्यांची बदली करण्याची मागणी नगरसेवकांनी वेळोवेळी केली आहे. परंतु, महापालिका आयुक्त नगरसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नगरसेवक करतात. यात सिडकोच्या विस्तारलेल्या भागात सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग व नगरसेवक यांच्याकडे कार्तिकेय नगरातील पाण्याच्या समस्येबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. परंतु, याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. अखेर महापालिकेच्या सिडको विभागाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढावा लागला. - मकरंद वाघ, रहिवाशी, कार्तिकेय नगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी मोजाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी भाजपचे वार्ड क्रमांक सातचे नगरसेवक बाबुराव मोजाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सचिन ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांच्याकडे उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी कॅन्टोन्मेंटच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सीईओ पवार यांनी निवडीसंबंधी मार्गदर्शन केल्यानंतर कार्यवाही सुरू झाली. मावळते उपाध्यक्ष ठाकरे यांनी मोजाड यांचे नाव सुचविल्यानंतर दिनकर आढाव यांनी त्यास अनुमोदन दिले. दुसऱ्या कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे अध्यक्षांनी बाबुराव मोजाड यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे घोषित केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, ब्रिगेडियर सुधीर सुंदुबरेकर, मेजर पीयूष जैन, नगरसेविका प्रभावती धिवरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, बाबुराव मोजाड, कावेरी कासार, मीना करंजकर आदी उपस्थित होते. उपाध्यक्षपदी निवड जाहीर होताच समर्थकांनी फटक्यांची आतषबाजी व गुलाल उधळीत मोजाड यांची मिरवणूक काढली. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते, कर्नल कक्कर, बळवंत गोडसे, दिनकर पाळदे, तानाजी करंजकर, रतन कासार, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे यांसह शिंगवे बहुला ग्रामस्थ व देवळालीकर उपस्थित होते. यावेळी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर प्रदीप कौल यांच्या हस्ते मोजाड यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलादिनानिमित्त ऑफर्सला बहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक महिला दिन जसजसा जवळ येऊ लागतो, तसतसे मोठमोठ्या दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड झळकू लागतात. महिलावर्गाला आपल्या दुकानांकडे खेचण्याची ही संधी विक्रेते सोडू इच्छित नाही. यंदाही मार्केटिंगची ही ट्रिक विक्रेत्यांनी आजमावली आहे.

महिला दिनाला खरेदीची जोड असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. हे लक्षात घेत दरवर्षी विविध ऑफर्स विक्रेत्यांकडून दिल्या जातात. यावेळीही या ऑफर्सला बहर आला आहे. यामध्ये प्रामुख्याने कपड्यांच्या दुकानांमध्ये ५० टक्क्यांपासून सुरुवात आहे. मोठ्या ब्रॅण्डेड दुकानांमध्ये जाण्यास अनेकदा मध्यमवर्गीय महिलांना पाय आखडते घ्यावे लागतात. त्याच महिलांची पावले आता ऑफर्समुळे या दुकानांकडे वळू लागली आहेत. कपडे, दागिने, घरगुती वस्तू अशा अनेक वस्तूंवर भरघोस ऑफर्स देण्यात आली आहे.

मुख्य दिवसांना विशेष सूट देऊन मार्केटिंगचे तंत्र विक्रेते साधत असल्याची चर्चाही यानिमित्ताने ऐकण्यास मिळत आहे. दुकानातील वैशिष्ट्येपूर्ण वस्तूंची ओळख करून दिली म्हणजे वर्षभर महिलावर्ग खरेदीसाठी आपल्या दुकानाला प्राधान्य देतील, असा दुकानदारांचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

पॅकेजच्या ऑफर्स महिलांचे आरोग्य नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. महिला आरोग्याची काळजी घेत नाही, आहार, व्यायाम याकडे दुर्लक्ष करतात. महिला दिनानिमित्त तरी त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, या हेतूने शहरातील अनेक फिटनेस सेंटर्सनी विविध ऑफर्स देऊ केल्या आहेत.

टूर्सवरही ऑफ काही नामांकित ट्रॅव्हल एजन्सींकडून महिला दिनानिमित्त विशेष टूर्स प्लॅन करण्यात आल्या आहेत. एरवी फिरायला जायचे म्हणजे मोठी रक्कम भरणे आले. पण, या दिवसासाठी भरघोस सूट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही एजन्सीजनी तर मोफत टूर अशा जाहिराती केल्या आहेत. या कंपन्या खरेच अशी सूट देत आहेत की ग्राहकांना ऑफर्समार्फत हूल देत आहेत, पडताळणीतूनच कळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१२ हजार शेतकरी बाधित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात सात हजार १७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे १२ हजार शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला असून, कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. शनिवारी पावसाने उघडीप दिली असली तरी हवामान विभागाने येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने २८ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील पिकांना अक्षरश: झोडपून काढले. गुरुवारी मध्यरात्री तर पावसाने नाशिक तालुक्यात कहरच केला. एकाच दिवसात जिल्ह्यात ११२ मि.मी. पावसाची नोंद झाली. या सहा दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने केवळ पिकांचेच नुकसान केले असे नाही, तर चार व्यक्तींसह अनेक जनावरेही मृत्युमुखी पडली. महसूल मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने पंचनाम्यांचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे झाले आहे. चार हजार ४२१ हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले असून, सर्वाधिक म्हणजेच तीन हजार ४३५ हेक्टर क्षेत्र एकट्या बागलाण तालुक्यात आहे. मालेगावात ४३० हेक्टर तर नांदगावात २९८ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सुमारे ११३० हेक्टरवरील गहू वादळी वाऱ्यासह आलेल्या या अवकाळी पावसामुळे झोपला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ६३४ हेक्टरवरील गव्हाचे एकट्या निफाड तालुक्यामध्ये नुकसान झाले आहे. ५६४ हेक्टरवरील भाजीपाला आणि ४६९.७१ हेक्टरवरील द्राक्षबागांची हानी झाली आहे. निर्यातक्षम द्राक्षांचे मणी फुटल्याने शेतकऱ्यांना यंदा मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. ३५४ हेक्टरवरील हरभरा आणि १८२ हेक्टरवरील डाळिंबाचेही नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

बागलाणला सर्वाधिक फटका जिल्ह्यात एकूण सात हजार १७१ हेक्टरवरील ‌पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान बालगाण तालुक्यातील चार हजार ५०३ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. एकूण ११ हजार ७०९ शेतकऱ्यांपुढे या पावसामुळे आर्थिक संकट उभे राहिले असून, त्यामध्ये सात हजार २९६ शेतकरी एकट्या बागलाण तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल निफाडमधील एक हजार ४२४ शेतकऱ्यांच्या ७३४ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. सर्वात कमी नुकसान येवला तालुक्यात झाले आहे. तेथे दोन हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाचे नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांची संख्याही केवळ दोन आहे. जिल्ह्यात एकूण १८६ गावे बाधित झाली असून, एकट्या निफाड तालुक्यातील ४४ गावांचा त्यामध्ये समावेश आहे. मालेगावातील २९, बागलाणमधील २५ आणि त्र्यंबकेश्वरील २३ गावे या अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहेत.

३५ जनावरे मृत्युमुखी जिल्ह्यात ३५ जनावरांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. त्यामध्ये १३ बैल, ८ गायी, ८ म्हैस, ५ शेळ्या आणि एका वासराचा समावेश आहे. सर्वाधिक ९ जनावरे मालेगाव तालुक्यात मृत्युमुखी पडली आहेत. बागलाणमध्ये आठ तर कळवण, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यात प्रत्येकी तीन जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रशासनाने दिली.

नुकसानग्रस्त पीक एकूण बाधित क्षेत्र ७१७१
& पीक - हेक्टर कांदा ४४२१ गहू ११३० भाजीपाला ५६४ द्राक्षे ४६९ हरभरा ३५४ डाळिंब १८२ फळपिके ५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोतवाल, तलाठी, तहसीलदारवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत तलाठी, कोतवाल, तहसीलदार अशा शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचीही नावे असल्याने खळबळ उडाली आहे.

फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, कागदपत्रे बनावट असल्याचे ठाऊक असूनही खरे म्हणून दाखवणे, संगनमत करून फसवणूक करणे या कलमांखाली हा गुन्हा दाखल झाला आहे. अॅड. प्रकाश निवृत्त ताजनपुरे (वय ५८, सिन्नरफाटा) यांनी फिर्याद दिली आहे. देवळाली शिवारातील सर्वे क्रं. १९०/१ आणि १९० व/१ फ या जागेची खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या संशयितांमध्ये देवराम लक्ष्मण अरिंगळे, संजय नेताजी अरिंगळे, रामदास राजू अरिंगळे, दिलीप संतू अरिंगळे (रा. अरिंगळे मळा, सिन्नरफाटा), राहुल रामचंद्र राठी (बिल्डर, राठी सदन), राहुल जोशी (देवळालीगाव), गणेश राठोड (तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधीकरण, तहसील कार्यालय, नाशिक), ए. एल. डावरे ( तेलाठी, देवळालीगाव), प्रवीण ज्ञानेश्वर गोंडाळे (मंडल अधिकारी, देवळालीगाव), गणेश इंगोले (कोतवाल, देवळालीगाव) यांचा समावेश आहे.

तलाठी कार्यालय आणि उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि वरील नमूद संशयितांनी संगनमत केले. त्यांनी वर नमूद केलेली मिळकत बिल्डरला विक्री करता यावी यासाठी बहिणीचे हक्कसोड पत्र घेतले. फिर्यादी प्रकाश ताजनपुरे यांची आजी सुंदराबाई लक्ष्मण अरिंगळे यांचे नाव कमी केले. सुंदराबाईच्या नावे ही जमीन ६० ते ६५ वर्षे होती. त्यांचे निधन झाले होते. मात्र, वरील मिळकतीची खोटी कागदपत्रे तसेच जाहिरात करून आणि जमीन पडिक असल्याचे दाखवून राठी बिल्डर्स यांना बेकायदेशीर विक्री करण्यात आली. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कागदपत्रे खोटी असल्याचे ठाऊक असूनही ती खरी असल्याचे भासवून रेकार्ड तयार केले असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक टी. एम. राठोड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षकाराला भूलथापा देणे थांबवा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्वसामान्य नागरिक न्यायाच्या अपेक्षेने वकिलांकडे पोहचतो. आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल, अशी त्याची अपेक्षा असते. वकिली व्यावासाय पैसे कमवण्यासाठी नसतो. त्यामुळे पक्षकाराला भूलथापा देण्याचे काम कधीही करू नका. पक्षकाराचा विश्वास टिकवा. त्यातून न्याय व्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास आणखी दृढ होईल, असे जेष्ठ वकील आणि पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. जेष्ठ वकील अॅड. दौलतराव घुमरे यांच्या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

बदलत्या काळात अनेक कायदे बदलण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती वेळोवेळी सांगतात. या पार्श्वभूमीवर वकिलांनी सुध्दा अंतर्मुख होण्याची आवश्यकता असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. घुमरे यांनी अर्ली ज्युरी प्रड्युइन्स ऑफ क्रॉस एक्झामिनेशन, अॅप्रिसिएशन ऑफ इव्हिडन्स, अंडरकरंट इन मार्कसिझम या तीन पुस्तकांचे कौतुक केले. कालिदास कलामंदिर येथे संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झालेल्या कार्यक्रमास मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती साधना जाधव, अॅड. धैर्यशील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिल्लीत कोर्टाच्या आवारात झालेल्या कृत्याचे समर्थन कधीही होणार नाही, असे निकम यांनी म्हटले. न्यायमूर्ती साधना जाधव यांनी घुमरे यांच्या पुस्तकांचे कौतुक करीत वकिलाला पक्षकार व न्यायाधीश यांच्यातील दुवा होण्याचे कसब माहिती पाहिजे, असे नमूद केले. अॅड. पाटील यांनी मार्कसिझमचा विषय बारकाईने विषद केला.

पीडित तरुणीचा जबाब किती वेळा घ्यायचा? या कार्यक्रमादरम्यान अॅड. उज्ज्वल निकम यांनी शक्तिमील बलात्कार प्रकरणाचा उल्लेख केला. बलात्कार पीडित महिलेला सर्वप्रथम फिर्याद द्यावी लागते. नंतर प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पुन्हा त्याची नोंद होते. कोर्टातही सातत्याने चर्चा होते. तीन वेळेस पीडित महिलेची तक्रार का नोंदवली जाते, असा सवाल अॅड. निकम यांनी उपस्थित केला. न्यायमूर्ती साधना जाधव यांनी हा सामाजिक बदलांमधून उद्भवलेल्या परिस्थितीचा परिपाक असल्याचे म्हटले. महिलेच्या तक्रारीत दबावामुळे बदल होऊ नये, यादृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा एक अन् विद्यार्थी आठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज जिल्हा प्रशासनाने परीक्षा घेतली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चढाओढ असल्याचे शनिवारी पहावयास मिळाले. सुमारे ८०९ विद्यार्थी या परीक्षेला बसले. त्यापैकी १०० विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या अभ्यासिकेत प्रवेश दिला जाणार आहे.

शांतताप्रिय वातावरणात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा आणि प्रशासकीय सेवेतील मान्यवर अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभावे, यासाठी प्रशासनाने गोविंदनगर परिसरात पांडूरंग गायकवाड अभ्यासिका सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आतापर्यंत आयोजिलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेत प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असला तरी सर्वांनाच तेथे प्रवेश देणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. सीबीएस येथील शासकीय कन्या शाळेत ही ४० गुणांची परीक्षा घेण्यात आली. सामान्य ज्ञानाबरोबरच, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्रवर आधारीत प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आले. ८०९ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी १०० विद्यार्थ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी या अभ्यासिकेत प्रवेश दिला जाणार आहे. तेथे पुस्तके, इंटरनेट सुविधेसह प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन लाभेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी भागात साकारणार मेडिकल कॉलेजेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये होमिओपॅथी मेडिकल कॉलेज साकारण्यासोबतच राज्याच्या आदिवासी भागांमध्ये मेडिकल कॉलेजची संख्या वाढविण्याचा मानस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नव्या बृहद आराखड्यात ठेवला आहे. सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत लोकसंख्येच्या निकषांनुसार मेडिकल कॉलेजेसच्या संख्येचा समतोल राखण्यावर भर देण्यात येणार आहे.

राज्यात तळागाळापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या दृष्टीने एकसमान दर्जेदार आरोग्य शिक्षण देण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.

विद्यापीठाचा सन २०१७-२२ या कालावधीसाठी सुधारीत बृहत आराखड्याच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक, विविध प्राधिकरणांचे सदस्य व संलग्नित कॉलेजेसचे अधिष्ठाता, प्राचार्य व शिक्षण तज्ज्ञ यांच्यासाठी विद्यापीठाच्या नाशिक मुख्यालयात बैठक पार पडली.

यावेळी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, लोकसंख्येच्या निकषांवर राज्यात नवीन मेडिकल कॉलेजेस वाढविण्यात येतील. राज्याच्या सर्वच भागात रुग्णसेवा मिळण्यासाठी एकसमान दर्जेदार आरोग्य शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे, हे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. यादृष्टीने पुढील टप्प्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या शहरांमध्येही या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकींमधून आलेल्या सूचनांवर यात मंथन करण्यात आले.

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अरुण भस्मे म्हणाले की, विद्यापीठातर्फे राज्याच्या विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करून मागविण्यात आलेल्या सूचना ही स्वागतार्ह्य बाब आहे. विद्यापीठाकडून या आराखड्यात नाशिक येथे स्वतःचे होमिओपॅथी कॉलेज स्थापन करण्याबाबत सुचविण्यात आले.

विद्यापीठाच्या नियोजन विभागाचे प्रभारी संचालक महेंद्र कोठावदे यांनी दृकश्राव्य सादरीकरण करून विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसार विद्याशाखा निहाय, जिल्हानिहाय सुरू करण्यात येणारे कॉलेज, पदवी आणि पदव्युत्तर कॉलेजेस सुरू करणे याबाबतच्या नियमांची माहिती दिली. या बैठकीचे प्रास्ताविक, स्वागत व सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

या बैठकीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ, व्यवस्थापन परीषदेचे सदस्य डॉ. अरुण भस्मे, डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. यशवंत पाटील, नियोजन मंडळाचे प्रभारी संचालक महेंद्र कोठावदे व्यासपीठावर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images